हिमाचली पदार्थ - भटुरे (कणकीचे भटुरे)

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
21 Oct 2016 - 8:08 pm

भटुरे नाव ऐकल्यावर मैद्याचे छोले भटुरे आठवतील. पण हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात सक्रेणादेवीच्या मंदिराजवळ असलेल्या गावात भटुरे बनविण्यासाठी मैद्याच्या जागी कणकीचा वापर होतो. बहुतेक सकाळी नाश्त्यासाठी हे भटुरे केले जातात. या भटुरर्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे भटुरे तळून किंवा तव्यावर भाजून केले जातात. (भटुरे बनवितानाचे फोटो खाली दिलेले आहे, कुणाचा चेहरा दाखविणार नाही या अटीवर फोटो काढले होते). मैद्याच्या भटुरर्या सारखे हे भटुरे पण फुलतात. आपल्या मराठमोळ्या पोळी एवढे मोठे पण दुप्पट जाड नक्कीच असतात. आपण आपल्या पद्धतीने भटुर्यांचा आकार निश्चित करू शकतो. चित्रावरून भटुरे कसे बनतात याचा अंदाज घेता येईल.

भटुरे


साहित्य
: एक पेला कणिक, अर्धी वाटी उडीत डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, आले १/२ इंच, लसूण १०-१२ पाकळ्या, मिरची २-३, अर्धा चमचा काळी मिरी, १/२ चमचा जीरा पावडर. स्वादासाठी *कोथिंबीर आणि मीठ. गोडे तेल आवश्यकतानुसार. हिमाचल मध्ये सरसोंचेच तेल वापरतात (*या भागात भाबरी नावाची झुडूपा सारखी वनस्पती असते. भाबरीला कढीपत्या सारखे छोटी-छोटी पाने असतात. भाबरीच्या पानांना एक प्रकारचा सुगंध असतो. भाबरीचा प्रयोग चटणी सारखा किंवा पकौडे इत्यादींचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. भाबरीच्या काळ्या रंगांच्या बियांचा हि वापर स्वादासाठी केला जातो. गावात खालेल्या भटूर्यात भाबरीच्या पानांचा आणि बियांचा वापर केला होता. शहरात भाबरी बाजारात मिळणार नाही. त्या जागी कोथिंबीर वापरता येईल).

कृती:
उडीत डाळ आणि चणा डाळ, रात्रीच भिजवून ठेवायची. सकाळी कणिकत खमीर मिसळून कणकीला भरपूर मळावे किमान दहा एक मिनिटे. नंतर मळलेल्या कणकीला खमीर उठण्यासाठी एक ते दीड तास झाकून ठेवा.

सारण बनविण्यासाठी मिक्सरमध्ये, रात्र भर भिजलेली उडीत डाळ, चणा डाळ आले, लसूण, मिरची, काळी मिरी, जीरा पावडर टाकून जाडसर पिसून घ्या. स्वादानुसार मीठ. (पाटा-वरवांट्यावर जाडसर पिसल्या जाते). खाताना आल आणि लसणाच्या तुकड्यांचा स्वाद जिभेला आला होता.

कढईत तेल गरम झाल्यावर. कणकीच्या गोळ्यांची पारी करून त्यात सारण टाकून हाताने, किंवा पोळी सारखे लाटून भटुरा तैयार करून, मध्यम आचेवर तेलात तळून घ्या. ज्यांना तळलेले चालत नाही. एका तव्यावर थोडे तेल लाऊन मध्यम आचेवर वर भटूरे दोन्ही बाजूनी भाजून घ्या. हे भटुरे छोल्या सोबत खायला चांगले लागतात. (हे भटुरे डाळींएवजी पनीर इत्यादी टाकून हि आपण करू शकतो. सारणात काय टाकायचे हे सर्वस्व आपल्यावर आहे. कृतीत परंपरागत पद्धत दिली आहे).

भटुरे

प्रतिक्रिया

सुंदर, आम्हाला फक्त मैद्याचे माहित होते. हे नव्याने कळले.

मंडीला खाल्लेत हे. छोले भटुरे आणि दही घेतले होते. इतके लुशलुशीत दही होते आणि किती घट्ट!

बोका-ए-आझम's picture

21 Oct 2016 - 8:39 pm | बोका-ए-आझम

अमृतसरमध्ये असे कुलचे खाल्ल्याचं आठवतंय. दोन खाल्ले की पोट गप्प!

छानच. खमीर म्हणजे काय?

आदूबाळ's picture

22 Oct 2016 - 7:55 pm | आदूबाळ

यीस्ट

पद्मावति's picture

21 Oct 2016 - 11:00 pm | पद्मावति

खूपच टेंप्टिंग!!!!
एस, खमीर म्हणजे यीस्ट.

एस's picture

21 Oct 2016 - 11:06 pm | एस

धन्यवाद.

नक्की करुन बघणार.माझ्या नवर्याला फार आवडतील असे भटुरे.धन्यवाद काका!

नवीनच पदार्थ दिसतोय. पूर्वी मिपावर बेदमी पुरीची पाकृ आली होती त्याची आठवण झाली.

वा.. भारीच लागत असणार. करुन पाहायला पाहिजे.

मंजूताई's picture

22 Oct 2016 - 6:14 am | मंजूताई

आवडली पाकृ! नुसते, चटणी बरोबरही खायला छान सांगतील. पाणी न घालता पिसावे लागेल ... सिलबट्ट्यावर छान वाटले जाईल... खमीर त्या ऐवजी रात्री कणिक भिजवून करता येतील..
आमचे बरेच नातेवाईक हिंदी भाषिक राज्यातले आहेत त्यांच्या बोलण्यात असे हिंदी शब्द असतात .. मजा येते ऐकायला ...

मैदा स्वस्त मिळतो म्हणून हॅाटेलवाले वापरतात.पांढरेही दिसतात.

प्रभाकर पेठकर's picture

25 Oct 2016 - 3:45 am | प्रभाकर पेठकर

>>>>मैदा स्वस्त मिळतो म्हणून हॅाटेलवाले वापरतात.

उत्तरेत रोजच्या जेवणात मैदा वापरण्याची पद्धत आहे. मैदा हा गव्हाच्या पिठाचाच पुढचा भाग म्हणायला हरकत नाही. त्यात कोंडा नसतो. त्यामुळे त्यापासून केलेले पदार्थ हलके होतात. मैद्यात चिकटपणा (गव्हाच्या पिठापेक्षा) जास्त असतो. रोट्या, भटूरे, परोठे, नान करण्यासाठी ह्या चिकटपणाचा पिठ फुलून येण्यास आणि तरीही तरीही एकसंघ राहण्यास मदत होते. आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असे पदार्थ मैद्यामुळेच होतात. गव्हाच्या पिठात कोंड्याचे प्रमाण जास्त असल्याने तो आरोग्यास चांगला असतो पण रोट्या, भटूरे, परोठे, नान आदी पदार्थात वापरण्याची उत्तरेत पद्धत नाही. हल्ली आपल्याकडे पश्चिमेत हॉटेलांमधून मैद्या ऐवजी गव्हाच्या तंदूरी रोट्या, परोठे मिळतात पण अजुनही नान आणि भटूर्‍यांसाठी मैदाच योग्य ठरतो.

पैसा's picture

22 Oct 2016 - 12:22 pm | पैसा

नक्कीच करून बघणार!

इरसाल's picture

22 Oct 2016 - 1:45 pm | इरसाल

भटुरे छानच....पण,
हिमाचल सरकार कडुन,
मंडी जिल्हाधिकार्याकडुन,
आणी सक्रणादेवी कडुन काही मिळत असल्याशिवाय तुम्ही त्यांचे नाव घेवुन लेख लिहीलाच नसता....हो की नाही ??????

विवेकपटाईत's picture

23 Oct 2016 - 7:55 am | विवेकपटाईत

इरसाल साहेब, गावाचे नाव लिहण्याचे विसरून गेलो, अन्यथा ग्राम पंचायती कडून हि खिरापत मिळाली असती. बाकी सक्रेणा देवीचे (जलपा माता)चित्र खाली देत आहे, तुम्हाला काही आशीर्वाद मिळतो कि नाही बघून घ्या. बाकी गावाचे नाव गुणस्वाई (गुणी लोकांचे गाव).

सक्रेणादेवी

अहो काका, इरसाल काकांनी सार्क्यास्टिक मारला होता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Oct 2016 - 10:06 am | कैलासवासी सोन्याबापु

मस्त आहे रेसिपी आवडली

मस्त भटुरे ! दिवाळीत करेन नक्की.

विशाखा राऊत's picture

25 Oct 2016 - 2:28 am | विशाखा राऊत

मस्त रेसेपी