ती माझी होती

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जे न देखे रवी...
7 Oct 2016 - 8:35 pm

ती मला खुप आवडायची
कधी कधी खुप रडवायची
तिचा हसरा चेहरा आणि
डोळ्यातील काजळ मला
नेहमी वेड करायचे
ती खरचं एक परी होती,
की आकाशातील पहाटेची शुक्राची
चांदणी,
काय होती ती , की अस म्हणु काय नव्हती ती
शब्दच नाहीत...!!
पण कधीकधी आपोआप या मनातुन शब्द ओठांवर येतात...
ती माझी होती...
माझी आहे...
माझीच राहिल...

स्वप्नांच्या ही पलिकडे तिच्यासाठी एक जादुचा बगीचा मी बनविला होता....
ती खुश रहावी म्हणुन त्या बगीच्यात पारिजातक वृक्ष लावला होता....
ती दिसायची जणु मत्स्यकन्याच..
म्हणुन बगीच्यात होता सोनेरी चंदेरी
तलाव ...
सोनेरी राजहंस तर होतेच तिथे..
सुंदर जलपऱ्या पण रहायच्या..
स्वर्गात पण नसेल अस अमृतकमळ त्या तलावात उमललं होतं.. .

ती निरागस कळी होती,
ती सुर्याची कोवळी किरण होती,
ती एक मृगजळ होती,,
कि माझी आस होती..

होती ती माझी कोकीळा,
झाडाला बांधलेला झोपाळा,
आणखी काय सांगु ....
बस झालं राव आता
कंटाळलोय कौतुक करुन..

कविता

प्रतिक्रिया

रातराणी's picture

7 Oct 2016 - 8:39 pm | रातराणी

हा हा हा!

दिनु गवळी's picture

7 Oct 2016 - 8:51 pm | दिनु गवळी

हा हा काय

जव्हेरगंज's picture

9 Oct 2016 - 10:54 am | जव्हेरगंज

एवढं चांगलं कधीपासून लिहायला लागला ;)

नाखु's picture

10 Oct 2016 - 11:16 am | नाखु

कवीने खुबीने आपल्या पुर्वलिखाणाची झलक आणि विषयावरची पकड या गूढ कवितेत दाखवून दिली आहे, अता ज्ञात आणि अज्ञात पैलूंवर प्रकाश कवडसा टाकू.

ती मला खुप आवडायची

म्हण्जे पहा कसा पेच निर्माण केला वाचकांसमोर आवडायची, अता आवडते का नाही हे गुलदस्त्यात ठेवल्म आहे,आणि तिला कवी आवडायचा का नाही याचा थांगपत्ता लागू दिला नाही.

कधी कधी खुप रडवायची
तिचा हसरा चेहरा आणि
डोळ्यातील काजळ मला
नेहमी वेड करायचे

बघा म्हणजे कविला रडविण्याइतपत करारी व खंबीर होती,भुताची बोबडी वळविणार्याला रडविणे काही सोपे काम नाही.आणि हे ते सव्तः हसत राहून करीत असे,निव्वळ या जगाची दृष्ट लागू नये म्हणून ती काजळ लावीत असावी असा कयास आहे,कावीने आप्ले वेड हे त्या काजळामुळे आहे असे प्रांजळपणे सांगीतले आहे.

ती खरचं एक परी होती,
की आकाशातील पहाटेची शुक्राची
चांदणी,
काय होती ती , की अस म्हणु काय नव्हती ती
शब्दच नाहीत...!!

ती एक परी होती म्हणजे एक अप्राप्य होती हे ही सूचकपणे सांगीतले आहे,या बरोबर कवीही पहाटे लवकर उठतो आणि चक्क जागे होऊन शुक्राची चांदणी बघतो या मुद्द्याकडे अलवार अंगुलीनिर्देश केला आहे.वाचकांच्या कल्पनाशकतीला ताण देण्यासाठी पुढील कडव्याचा उगम झाला आहे आणि शबदच नाहीत असे म्हणून विचारधाग्याला तत्काळ खुंटीला बांधले आहे.

पण कधीकधी आपोआप या मनातुन शब्द ओठांवर येतात...
ती माझी होती...
माझी आहे...
माझीच राहिल...

कवीला कल्पना करण्याची मुभा असल्याने कवी निरागसपणे म्हणतो ती परी त्याची आहे आणि त्याचीच राहिल वाचकांना ढगातून थेट जमिनीवर आणण्याचा "भुईसपाट" प्रयत्न म्हणून दाद द्यायलाच हवी.

स्वप्नांच्या ही पलिकडे तिच्यासाठी एक जादुचा बगीचा मी बनविला होता....
ती खुश रहावी म्हणुन त्या बगीच्यात पारिजातक वृक्ष लावला होता....
ती दिसायची जणु मत्स्यकन्याच..
म्हणुन बगीच्यात होता सोनेरी चंदेरी
तलाव ...
सोनेरी राजहंस तर होतेच तिथे..
सुंदर जलपऱ्या पण रहायच्या..
स्वर्गात पण नसेल अस अमृतकमळ त्या तलावात उमललं होतं.. .

या मर्त्य जगात जागेचे भाव प्रचंड वाढले आहेत आणि अश्या अनवट परीला साधे-सुधे घर देण्यापेक्षा एक सूंदर बघीचा बनविल्याचे सांगून कवीने आपण पर्यावरण प्रेमी असल्याचेही नम्रपणे नमूद केले आहे.तो बगीचा आणि तदंभूत बाबी ह्या स्वर्गातही आलाभ्य आहेत हे सांगण्यासही कवी कचरत नाही.

ती निरागस कळी होती,
ती सुर्याची कोवळी किरण होती,
ती एक मृगजळ होती,,
कि माझी आस होती..

इथेही कवीने खुबीने ती हे होती ते होती असा जप लावून वाचकांना अता ती निरागस व कळी आहे का नाही,मृगजळ आहे का नाही हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिले आहे.(उडवा पतंग कल्प्नांचे पुढे मीच काटणार आहे ते)

होती ती माझी कोकीळा,
झाडाला बांधलेला झोपाळा,
आणखी काय सांगु ....
बस झालं राव आता
कंटाळलोय कौतुक करुन..

तिचा (गायनाचाही) गळा सुरेख आणि सुरेल होता हे मोठ्या खुबीने सांगतानाच ती वजनदार नव्हती हे झोपाळ्याचा झोका देऊन सांगीतले आहेच.शेवटी अत्यंत विनम्रतेने कवीने आणखी सांगू शकत नाही असे मोठ्या मनाने सांगीतले आहे.आणि तो (ही) कंटाळलाय गुढ कवीता करून हे सांगण्याचे धाडस खरेच कौतुकास्पद आहे.

नाखु परिक्षाणवाला

जव्हेरगंज's picture

10 Oct 2016 - 11:33 am | जव्हेरगंज

cat

बोका-ए-आझम's picture

12 Nov 2016 - 9:25 pm | बोका-ए-आझम

तो पण लहानपणीचा!

चांदणे संदीप's picture

13 Nov 2016 - 6:31 am | चांदणे संदीप

ती बाजूलाच असलेली गोजिरी-साजिरी मनी कोण आहे तेवढं सांगा? ;)

यशोधरा's picture

13 Nov 2016 - 2:30 pm | यशोधरा

उचकलेली वाटतेय आणि! =))

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2016 - 6:20 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा ... !
येकदम खतरी रसग्रहण !

या मर्त्य जगात जागेचे भाव प्रचंड वाढले आहेत आणि अश्या अनवट परीला साधे-सुधे घर देण्यापेक्षा एक सूंदर बघीचा बनविल्याचे सांगून कवीने आपण पर्यावरण प्रेमी असल्याचेही नम्रपणे नमूद केले आहे.तो बगीचा आणि तदंभूत बाबी ह्या स्वर्गातही आलाभ्य आहेत हे सांगण्यासही कवी कचरत नाही

इथेही कवीने खुबीने ती हे होती ते होती असा जप लावून वाचकांना अता ती निरागस व कळी आहे का नाही,मृगजळ आहे का नाही हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिले आहे.(उडवा पतंग कल्प्नांचे पुढे मीच काटणार आहे ते)

लै भारी ! :-)))

गळा सुरेख आणि सुरेल होता हे मोठ्या खुबीने सांगतानाच ती वजनदार....

सिनेमाची जाहिरात ? आजकाल कोण कुठे जाहिरात करेल सांगता येत नाही. (कृहघे)

बाकी, नाखु रॉक्स !

प्रदीप's picture

12 Nov 2016 - 6:24 pm | प्रदीप

:)

पैसा's picture

10 Oct 2016 - 12:25 pm | पैसा

जाऊंद्याना बाळासाहेब

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2016 - 5:31 pm | चौथा कोनाडा

गुढ "ग्रेस"फुल कविता ?
(आमाला तं बाबा, काईचं कळ्ळं नाय,
आमाला तं बाबा, काईचं कळ्ळं नाय ! )

पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

पिशी अबोली's picture

12 Nov 2016 - 5:34 pm | पिशी अबोली

मला शीर्षक बघून वाटलं तुम्ही हजाराच्या बँकेत बदलाव्या लागलेल्या नोटेबद्दल बोलत असावात..

सचु कुळकर्णी's picture

13 Nov 2016 - 3:32 pm | सचु कुळकर्णी

णिसो कुठायत आजकाल ?

अभी ची तनु's picture

7 Jan 2017 - 11:09 am | अभी ची तनु

खुप मस्त जमलिय कविता दिनु जी
आता एखादी भन्नाट भयकथा येऊद्या