IT BPO बद्दल एवढा राग का ?

वाल्मिक's picture
वाल्मिक in काथ्याकूट
20 Sep 2016 - 3:42 pm
गाभा: 

ह्यावर मिपावरच बरेच धागे आहेत .पण म्हटले नव्याने चर्चा करू या

नॉन IT लोकांचे आक्षेप

1) IT वाल्याना बाकींपेक्षा जास्त पैसे मिळतात ,कामापेक्षा
2) संस्कार वगैरे नसतात ,अमेरिकन संस्कृती फोफावतेय
3) स्वतःला राजे समजतात
4) निवडणुकीत मतदान देत नाही व चुकीचे लोक निवडून येतात ( हे मी खरंच ऐकलेय एकाकडून )
5) जागांचे भाव आणि बाकी महागाई ह्यांमुळे वाढलीये
6) सामाजिक जणींना कमी

पण हे खरंच आहे का ?

तुमचे काय मत आहे ?

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

20 Sep 2016 - 3:53 pm | मराठी_माणूस

नेमेची येतो मग पावसाळा

टवाळ कार्टा's picture

20 Sep 2016 - 4:05 pm | टवाळ कार्टा

कॉल्लिंग स्पा =))

वाल्मिक's picture

20 Sep 2016 - 4:09 pm | वाल्मिक

का ?

मराठी कथालेखक's picture

20 Sep 2016 - 4:15 pm | मराठी कथालेखक

IT आणि BPO ही खूप वेगळी क्षेत्र आहेत. त्यांना एकाच पारड्यात तोलणार्‍यांबद्दल इतकेच म्हणू शकतो की त्यांना दोन्ही क्षेत्रांबद्दल काहीच माहीती नाही.
माझ्या एका नातेवाईकाच्या मते IT professionals हे data entry करत असतात :)

वाल्मिक's picture

20 Sep 2016 - 4:18 pm | वाल्मिक

जेव्हा प्रोजेक्ट मिळत नाही डेव्हलपर लोकांना मेन्टेनेचे आणि डेटा एन्ट्री पण करताना बघतलीये ,मुद्दा दोन्ही सारखे आहेत असा नाहीये

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Sep 2016 - 4:29 pm | अनिरुद्ध.वैद्य

अगदी म्हणजे अगदी १००% खरंय.

वाल्मिक's picture

21 Sep 2016 - 12:04 pm | वाल्मिक

धन्यवाद

मारवा's picture

20 Sep 2016 - 4:36 pm | मारवा

कारभारी जरा
दमान घ्या
तुम्ही एकामागोमाग इतक्या ताकदीने विषय घेत आहात
आमची दमछाक होतेय.
थोड आमच्या सारख्या जनरल पब्लीकच्या कलाने घ्या
ही विनंती.

अभ्या..'s picture

20 Sep 2016 - 4:41 pm | अभ्या..

ताकदीनं कुठलं,
भुरटं पातेलं आहे. एकदा काडी टाकल्यावर नुसते प्रतिसाद वाढवायला येतंय. ना चर्चा ना मुद्दे. काय लिहिलेलं त्यांचं त्यांना तरी समजतंय का देव जाणे. पब्लिक बी आपलं टाकला चारा की तोंडं हलवायची कामे करतय म्हणून याचे फावतेय. बाकी कै नै.

अमु१२३'s picture

20 Sep 2016 - 5:18 pm | अमु१२३

+१ ..

फेदरवेट साहेब's picture

20 Sep 2016 - 4:37 pm | फेदरवेट साहेब

मी काय म्हणतो, आमच्यासमोर जरा कमी स्पीडनं चचपात्या फेका हो, आधी तो मराठा मोर्चाचा धागा आहे तो नीट चावून खाऊ द्या, त्याला तोंड लावले नाही का तुम्ही नवी चपाती तूप लावून टाकली पुढे आमच्या, आम्ही पडलो कुत्री, मिळाले की वखवख खातो मग तडस लागते पोटाला, मग निसर्गनियमाविरुद्ध जाऊन गवत खाऊन उलट्या काढायला लागतात पोट बिघडले की. जरा सावकाश येऊ द्या, आमचे पोट भारत राहिले तर आम्ही तुमच्या आयडीची इमानेइतबारे रखवाली करू बघा.

(इमानदार राखणदार)

ढेल्या.

मारवा's picture

20 Sep 2016 - 4:40 pm | मारवा

श्वान महोदय
आपण श्वानां विषयीच्या अगोदरच असलेल्या प्रेमात व आदरात
भर टाकली.

फेदरवेट साहेब's picture

20 Sep 2016 - 4:54 pm | फेदरवेट साहेब

तुमच्यासाठी खास स्वतःचे शेपूट स्वतः पकडणे, अन वाळूच्या ढिगाऱ्यावर मजेत उड्या मारणे हे दोन खेळ मी करून दाखवणार आहे =)) फार कमी लोकं मिळतात हो आमच्यासारख्या कलुंग्या कुत्र्यांना जीव लावणारी.

(कृतज्ञ)

ढेल्या

एका कुतुहल तुम्ही असा आयडी का म्हणिण घेतलाय बर ;)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2016 - 4:28 pm | अत्रुप्त आत्मा

=))
जिल्बुचा आली. =))

अता पांडूऊऊऊऊऊऊ... तू पण ये....... =))

IT hamal's picture

20 Sep 2016 - 4:42 pm | IT hamal

लोकांकडे लक्ष नका देऊ हो......दोन्ही fields मधले लोक शेवटी हमाली च करतात...

सिरुसेरि's picture

20 Sep 2016 - 5:01 pm | सिरुसेरि

आयटीची बायटी होणे असे खुपदा खुपजणांना ऐटीत बोलताना ऐकले आहे .

दोन्ही क्षेत्रे नवीन आहेत. जुन्या पिढीला जास्त माहिती नाही म्हणून हि निष्फळ बडबड. सरकारी हापिसात किंवा बॅंकेत काम करणाऱ्यांची सामाजिक जाणीव आणि अमेरिका विषयी असलेली घृणा, देशप्रेम इत्यादी पाहून वेळावेळी कंठ दाटून वगैरे यावा अशी परिस्तिथी आहे काय ?

ब्रिटिश सरकार जेंव्हा पोस्टांत कारकून घेत होते तेंव्हा सुद्धा म्हाताऱ्या लोकांनी अशीच "वेदशास्त्र पारंगत चतुरंग शास्त्र्यांचा मुलगा हापिसात बसून इस्माईल खानच्या `ह्या ईदचा बकर्याला मास नाही दुसरा पाठवा` असल्या तारा पाठवतो हो. धर्म आणि लाज म्हणून काही राहिली नाही आजच्या पिढीला" असल्या बाता केल्या असतील.

संदीप डांगे's picture

21 Sep 2016 - 8:47 am | संदीप डांगे

दुसरा पॅरा आवडला, कडक!

खटपट्या's picture

21 Sep 2016 - 12:18 am | खटपट्या

सामाजिक जणींना कमी

या कीतीजणी आहेत ?

प्रभास's picture

21 Sep 2016 - 11:13 am | प्रभास

=))

वाल्मिक's picture

23 Sep 2016 - 4:01 pm | वाल्मिक

:)

सतिश गावडे's picture

21 Sep 2016 - 12:21 am | सतिश गावडे

बेंचवर काय सध्या? फार मिपा मिपा करु नका हापिसात. सिस्टीमवाल्यांना कळलं तर ब्लॉक करतील मिपा.

आम्हाला तुमच्याकडून होणारी करमणूक कायमची हवी आहे. तुम्ही घाई केलीत तर आम्हाला त्या करमणुकीला कायमचे मुकावे लागेल.

नाखु's picture

21 Sep 2016 - 8:56 am | नाखु

सहमत आहे.

करमणुकीचा पिटातला प्रेक्षक नाखु

वाल्मिक's picture

22 Sep 2016 - 2:04 pm | वाल्मिक

कोण कोण ?

चौथा कोनाडा's picture

21 Sep 2016 - 10:47 am | चौथा कोनाडा

मला तं भौ येगळंच डौट युन ऱ्हायला !
सध्या निघणारया मूक मोर्चाच्या अनेक कारणांमध्ये ह्ये एक कारणं नसावं ना ?

मनिमौ's picture

23 Sep 2016 - 5:54 pm | मनिमौ

कसल्या भराभर जिलेब्या पाडताय.RBS च्या प्रोजेक्ट वर होता काय

एकुलता एक डॉन's picture

24 Sep 2016 - 4:56 pm | एकुलता एक डॉन

barclays

टवाळ कार्टा's picture

24 Sep 2016 - 5:09 pm | टवाळ कार्टा

इथे प्रतिसाद देतानासुद्धा आयडी बदलायचा विसरलास रे, उग्गीच नाही पातेलं म्हणतात तुला =))

च्यायला. कसलं भुरटं हाय राव हे.
टक्या तू घे धुवून.

एकुलता एक डॉन's picture

24 Sep 2016 - 6:09 pm | एकुलता एक डॉन

mi evdhach vicharlay mi barcllays chya projectwar hota ka
taka patlechya premat ahe ekdam