का एवढे धप्पा धापा पोलिसांच्या मागे लागलेत लोक ?

वाल्मिक's picture
वाल्मिक in जनातलं, मनातलं
18 Sep 2016 - 5:55 pm

मला 2013 चा जानेवारी महिना आठवतो ,निर्भया प्रकरण आणि मेणबत्ती नुकतेच झाले होते ,कोणतेही वर्तमान पात्र उघड फक्त बलात्कार बातम्या ,जणू भारतात लोक दुसरे काही काम करतच नाहीत

आता पण सध्या गणपतीभर पोलिसांना मारणेच चालू आहे ,ते पण दर वेळी नवीन MO

आता माझा प्रश्न

2012 ला जेव्हा रजा अकॅडेमिच्या वेळी गर्भवती पोलीस कॉन्स्टेबल महिलाना मारहाण झाली ,हाच मीडिया आणि हेच पक्ष का गॅप होते ?

मी राज ठाकरे यांचा पाठीराखा नाहीये पण फक्त त्यांनहीच आवाज उठवला होता

सौजन्य सप्ताह पळून पण लोक पोलिसांबद्दल अढी बाळगून आहेत ,पण अचानक एवढा उद्रेक कसा ?

मांडणीविचार

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Sep 2016 - 6:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

लोकांना पंचिंग बॅग्स हव्या असतात अन पोलीस त्या पंचिंग बॅग्स असतात असे वाटते. पोलिसी भ्रष्टाचार , अकार्यक्षमता, ह्याचीच दुर्दैवाने चर्चा होते. ह्याच चर्चा करणाऱ्या मिपावरच्या अन इतरही लब्धप्रतिष्ठित जनतेला "सी-६० म्हणजे काय असते रे भाऊ?" असे विचारले तरी गुगल शोधावे लागेल बहुतेक, उडदामाजी काळेगोरे हे पोलीस लोकांनाही लागू असतेच. बहुत काय बोलणे, अस्तु.

जेपी's picture

18 Sep 2016 - 6:15 pm | जेपी

सी 60 माहिती आहे..
बाकी मिपाकरांवर घसरण्याचा उद्देश ठावुक नाही.

--
लेखाविषयी-
गेली 15 -16 वर्ष पोलिसांच इतक खच्चीकरण केल गेलय की पुन्हा उभारी येण्यास अजुन काही काळ जाऊ द्यावा लागेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Sep 2016 - 6:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

लेकी बोले सुने लागे? वाकड्यात शिरायचे कारण समजले नाही...

जेपी's picture

18 Sep 2016 - 7:45 pm | जेपी

वाकड्यात कोण शिरतय..
तुम्हालाच सर्व ठावुक आहे..!तुम्हीच काय एक तटस्थ व्यक्तीमत्व...!
या भ्रमातुन बाहेर या..!

बाकी लेबोसुला खाली एकाला लागलय बघा जरा..
-
भावना दुखावल्यास आधीच माफी मागतो.

अहो धागा सोडून बाकी का भांडणे ? जाऊ द्या

संदीप डांगे's picture

18 Sep 2016 - 6:16 pm | संदीप डांगे

सी 60 काय असते रे बापू?

जेपी's picture

18 Sep 2016 - 6:21 pm | जेपी

सी 60 माहिती नाय ??
अच्छा एक लब्धप्रतिष्ठीत मिपाकर सापडला ;)

बोका-ए-आझम's picture

18 Sep 2016 - 10:07 pm | बोका-ए-आझम

म्हणजे कार्बन ६०. कार्बनचा ६० अणू असलेला रेणू किंवा molecule. त्याला फुलरिन किंवा बकी बाॅल असं पण म्हणतात आणि त्याचा नॅनोटेक्नाॅलाॅजीमध्ये खूप उपयोग आहे.
- (अप्रतिष्ठित) मिपाकर

मारवा's picture

18 Sep 2016 - 6:22 pm | मारवा

मला 2013 चा जानेवारी महिना आठवतो ,निर्भया प्रकरण आणि मेणबत्ती नुकतेच झाले होते
दर्जेदार उपहास
याची तीव्रता अजुन वाढवता येइल.
उदा.
निर्भया लफडं आणि सोशलाइट टाइमपास
अजुन येऊ द्या.
+१

सतोश ताइतवाले's picture

18 Sep 2016 - 7:18 pm | सतोश ताइतवाले

गव्हर्मेंट वाल्याना सातवा किंवा अथवा वेतन अयोग्य द्या तरी ते लालची असणारच
ट्राफिक पोलीस बगा किती प्रामाणिक आहेत त्यांना रॉड ज्याम पेक्षा परराज्य मदले
कोणते वाहन आले का ते शोधण्यात रस ,असो ह्या लोकांना
दर्जा चा पण अपमान होईन तिसरा काय हजारवा पण द्याच्या लायकीचे नाहीत
गणपतीला राजकीय पाठबळ मग होणारच उद्रेक पाठीमागील राज रोष
याना जात पॅट काही नाही
फक्त पैसे पैसे

प्रसाद_१९८२'s picture

18 Sep 2016 - 7:22 pm | प्रसाद_१९८२

तुमचे सदस्यनाम आवडल्या गेले आहे.

फेदरवेट साहेब's picture

18 Sep 2016 - 7:27 pm | फेदरवेट साहेब

+ १ होता होता राहिले प्रसादजी, मी पण आवडल्याचे सांगणार होतो, कारण मी सतोश ताईतवाले ऐवजी "सदोष टाईपवाले" वाचले होते. अन आयडी नाम सार्थ म्हणून आवडले जाणार होते, पण असो.

अतीगचाळ मराठी. पुलंचे 'बिगरी ते मॅट्रिक' मधले एक वाक्य आठवले. ते इथे लिहित नाही.
हे पुन्हा एकदा शुध्द मराठीत लिहुन दाखव बघू!

वाल्मिक's picture

19 Sep 2016 - 7:27 pm | वाल्मिक

हे

ज्योति अळवणी's picture

18 Sep 2016 - 8:47 pm | ज्योति अळवणी

थोडं धाग्या विषयी...

अनेक वाईट आणि चांगल्या घटना सतत घडत असतात. पण दुर्दैवाने असे म्हणावे लागते आहे की त्या घटनांना 'बातमी'ची किंमत असते त्याच घटना चर्चेत येतात आणि मग तशा इतर घटनांचा शोध घेतला जातो आपल्या दृक-श्राव्य किंवा लिखित 'मिडिया' मध्ये.

कदाचित् उदाहरण चुकीचं असेल... पण मला वाटत जसं एखाद्या विषयावरचा सिनेमा भरघोस चालला की लगेच त्याच विषयाचे अनेक सिनेमे इथून तिथून गोल फिरत सादर केले जातात... तसच बातम्यांच्या बाबतीत होत.

पोलिसांची आजची परिस्थिती त्यांनी स्वतः आणली आहे. हे एक दिवस होणारच कोणी कितीही नाही म्हटले तरी पोलिस विभागाने आपल्या ब्रिदवाक्यातील पहिल्या आणि तिसर्‍या शब्दाची अदलाबदल केलेलीच आहे. जे हात पोलिसांवर उठतात ते आपण म्हणता त्या सामान्यांचे नाहीत. ते अभिप्रेत असलेले सामान्य आजही वर्दीला घाबरतात. ज्याला पोलिसाच्या दहशतीचा आणि गुंडगिरीचा त्रास झालेला आहे अशी संख्या समाजात त्यांनी ज्यांच्यावर उपकार केले त्यांच्यापेक्शा कितीतरी जास्त आहे आणि हे एक सार्वत्रिक सत्य आहे. (याबाबत माझेकडे कोणताही विदा नाही) आणि जर पोलिसांना यातुन बाहेर पडायचे असेल तर पुन्हा लोकांचा विश्वास मिळवावा लागेल. त्यासाठी द्यावयाची किंमत आणि वेळ पोलिसांकडे आहे का हा खरा प्रश्न असला पाहिजे.

कपिलमुनी's picture

18 Sep 2016 - 10:37 pm | कपिलमुनी

सध्या या बातम्यांना TRP आहे म्हणून दाखवत आहे

एकुलता एक डॉन's picture

18 Sep 2016 - 10:39 pm | एकुलता एक डॉन

बातम्यांचा TRP कसा काढायचा ?

माझीही शॅम्पेन's picture

18 Sep 2016 - 11:11 pm | माझीही शॅम्पेन

हे सर्व एका दिवसात झालेल नाही , आता माज हा आता फक्त एका वर्गाची मक्तेदारी राहिलेली नाही
पोलिसांनी खास करून ट्रॅफिक पोलिसांनी लाचखोरीची हद्द केलेली आहे , डोळ्या समोर वाहने सिग्नल तोडत असताना केवळ सावज हेराण्यात ही मंडळी मग्न असतात , काही ठिकाणी सीसी टीवी लावायला सुद्धा घाबरतात असो म्हणोन त्यांच्यावर हल्ले हेही समर्थनीय नाही

जव्हेरगंज's picture

18 Sep 2016 - 11:54 pm | जव्हेरगंज

वेळी नवीन MO = हे काय असतं?

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Sep 2016 - 8:00 am | कैलासवासी सोन्याबापु

MO = MODUS OPERENDI

कार्यपद्धती, कार्यशैली

जव्हेरगंज's picture

19 Sep 2016 - 5:40 pm | जव्हेरगंज

ओह, अस आहे तर ते.

धन्यवाद!

वाल्मिक's picture

23 Sep 2016 - 4:01 pm | वाल्मिक

:)