समाजामध्ये कमी माहिती जैन समाजाबद्दल ?

निओ१'s picture
निओ१ in काथ्याकूट
3 Sep 2016 - 10:24 pm
गाभा: 

आपल्या समाजामध्ये जैन समाजाबद्दल खूप कमी माहिती आहे का ?

दिगंबर जैन का आहेत?
त्याची गरज का आहे?
ते दिगंबर का आहेत ?

जर आपल्याला एका धर्माबद्दल माहिती नसेल तर आपण आपले मत व्यक्त करताना थोडी माहिती का शोधू नये?
काही लोकांनी "ते नागडे" इत्यादी प्रकारे उपहास केला आहे. त्याना धर्माची माहिती घेणे गरजेचे आहे असे का वाटत नाही?

जैन धर्म मधील प्रत्येक व्यक्ती हिंदू-जैन असे लिहितो, तुम्हीच जर असे लिहले किंवा विरोध केला तर त्याचा परिणाम काय होइल याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जैन हे आधी हिंदू आहेत मग ते जैन आहेत पण असे दिसू लागले आहे की हिंदू जैन समाजाला आपले समजत नाही आहे.

खूप वाईट वाटले म्हणून लिहिले.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

3 Sep 2016 - 10:38 pm | संदीप डांगे

नमस्कार निओ१साहेब,

माझे तुम्हाला दोन प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळतील काय?

१. भारतीय राज्यघटना कोणत्याही धर्माला मान्यता देत नाही. अशा राज्यघटनेने स्थापित विधानसभेत एक धर्मगुरु येऊन राज्यघटनेचा अपमान करुन जातात ह्याबद्दल कोणती केस त्या धर्मगुरुंवर करावी?

२. जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडल्याने कोणाचा व कसा अपमान होतो? जैन धर्माला सत्याची लाज वाटते का?

दोन उपप्रश्नः अ) जैन गुरु नागडे नाहीत? ब) त्यांनी विधानसभेत भाषण केले नाही? क) त्यांनी राजनीती ही धर्माची पत्नी असल्याचे म्हटले नाही?

वरिल मुख्य व उपप्रश्नांची उत्तरे द्यावीत,

बाकी धार्मिक भावना दुखावून घेण्याआधी कॄपया 'मुनिवर्य तरुण सागर' यांचेकडून जरुर मार्गदर्शन घ्यावे. मला विश्वास आहे की ते आपल्याला अगदी योग्य सल्ला देतील. कदाचित जैन धर्मियांनी त्यांचे 'कडवे वचन' समजून घेतले नसावे. ते आधी क्लिअर करुन घ्यावे.

भारतीय राज्यघटनेचा अपमान माझ्यासाठी कोणत्याही धर्मापेक्षा मोठा आहे व त्याबद्दल बोलण्याचा अधिकार मला राज्यघटनेनेच दिला आहे. आपण ह्या बाजूवर आधी विचार करावा आणि आपले मत कळवावे.

धन्यवाद!

१. भारतीय राज्यघटना कोणत्याही धर्माला मान्यता देत नाही.

याचा आधार द्याल का?

२. २. जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडल्याने कोणाचा व कसा अपमान होतो? जैन धर्माला सत्याची लाज वाटते का?

सत्य जर सर्ल वर स्पस्त असेल तर कोन का विरोध करेल. ?
जर असे असेल तर आपच्या त्या नेत्यावर केस कश्या रजिस्तर झाल्या ?

संदीप डांगे's picture

3 Sep 2016 - 10:43 pm | संदीप डांगे

बाकी तुमच्या धाग्यातले विचार बघून तुम्हाला तरी नक्की किती माहिती आहे जैनधर्माविषयी याबद्दल शंका आहे.

जैन धर्मिय व्यक्तिलाच माहिति नसेल असे तुम्हाला माहिति असेल तर शेअर करा प्लिज.

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 12:29 am | संदीप डांगे

तुम्ही धाग्यात जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे तुम्हीच द्या आधी. म्हणजे दिगंबर जैन का असतात, इत्यादी. तुमचे ज्ञान कोठवर आहे त्यापुढे मी बोलतो मग.

तुम्ही हिंदु-जैन ही काही संकल्पना मांडत आहात ती फारच मनोरंजक आहे. त्यासाठीच तुम्हाला कितपत माहिती आहे ह्याची शंका आली.

बाकी तुमच्या भावना दुखावू नयेत म्हणून तुमच्या धर्माची माहिती घ्यावी ही तुमची फारच कैच्याकै अपेक्षा झाली. आम्ही "अलम दुनियेतल्या धर्मांच्या, पंथांच्या भावना दुखावतील का" याची काळजी करत बसलो तर जगणे मुश्किल होईल. तुमच्या भावना दुखवतात हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. माझा नाही. बाकी माझ्या त्या विधानाने जैन धर्माचा अपमान कसा झाला हे काही तुम्ही अजून स्पष्ट केलेले नाही तेव्हा तेही करावे.

अजून एकः http://misalpav.com/node/29981 ह्या धाग्यावरची धार्मिक भावना दुखावण्याबद्दलची चर्चा वाचून घ्या. तुमच्या कामी येईल.

माझ्यातर्फे चर्चा खुली आहे. हेल्दी डिबेटसाठी तुमचे सदा स्वागत आहे.

काहि उत्तरे दिलि आहेत,
हिंदु-जैन चे नवल का वातले याचे मला देखिल नवल वातत आहे.
हे आज पासुन सुरु नाहि आहे, माझे आजोबा (स्व. आदिनाथजि जैन) हे त्याच्या शालेय जिवनापासुन लिहित आले आहेत व अनेक शालेय स्न्स्था असे लिहतात हे तुम्हला माहिति नसावे हेच दर्श्वत आहे कि अद्य्ना किति आहे.

हे तुम्हि आताच मला खरडवही मध्ये विचारल होते व मि तेथे उत्तर दिले आहे मग हेच प्रश्न येथे परत?

संदीप डांगे's picture

3 Sep 2016 - 10:46 pm | संदीप डांगे

तुम्हीच म्हटले ना? धाग्यावर लिहिले असते तर..? मग लिहिले की...!

१. भारतीय राज्यघटना कोणत्याही धर्माला मान्यता देत नाही. अशा राज्यघटनेने स्थापित विधानसभेत एक धर्मगुरु येऊन राज्यघटनेचा अपमान करुन जातात ह्याबद्दल कोणती केस त्या धर्मगुरुंवर करावी?

त्याना हरियाना विधानसभाने निमत्र्न दिले होते, तसेच दिल्लि ने पन दिले होते.

२. जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडल्याने कोणाचा व कसा अपमान होतो? जैन धर्माला सत्याची लाज वाटते का?

उत्तर आधिच दिले आहे, आम्चे मुनि बोलवल्या शिवाय कोथे हि जात नाहित.

दोन उपप्रश्नः अ) जैन गुरु नागडे नाहीत? ब) त्यांनी विधानसभेत भाषण केले नाही? क) त्यांनी राजनीती ही धर्माची पत्नी असल्याचे म्हटले नाही?

ते नागदे / दिग्न्बर आहेत, पन त्याचि कारने आहेत ते शोधा.
ब चे उत्तर दिले आहे
क हा प्रश्न उत्तर आनि वाद ह्या वेगल्या गोश्ति अहेत, मि हि त्याचा विरोध करतो आहे.

अभिजीत अवलिया's picture

4 Sep 2016 - 5:48 am | अभिजीत अवलिया

निओ१ साहेब,
भारतात शेकडो धर्म आणी हजारो जाती पंथ आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्माची/जातीची/ पंथाची प्रत्येकाने माहिती ठेवणे जरुरी नाही आणी ते शक्यही नाही. दुसरी गोष्ट धार्मिक ज्ञान असलेच पाहिजे असे कुणावरही भारतात बंधन नाही.

दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की त्याना हरियाना विधानसभाने निमत्र्न दिले होते, तसेच दिल्लि ने पन दिले होते. आम्चे मुनि बोलवल्या शिवाय कोथे हि जात नाहित.
-- भारतात अशा प्रकारे धार्मिक गुरूंना विधानसभेत बोलावणे हाच मोठा अपराध झालेला आहे असे मी मानतो. मग तो धार्मिक गुरु कुठल्याही धर्माचा का असेना. कारण हे आपल्या घटनेच्या विरुद्ध आहे. जरी त्यांना विधानसभेने निमंत्रण दिले असले तरी त्यांनी घटनेचा अवमान होऊ नये ह्यासाठी त्या ठिकाणी जाणे टाळायला हवे होते असे माझे मत आहे. कारण देशाची घटना आणी तिचे पावित्र्य ही कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे.

आता जैन मुनी दिगंबर अवस्थेत विधानसभेत गेले ह्या बद्दल
-- तुमच्या मते दिगंबर अवस्थेत फिरण्याची काही तरी कारणे आहेत आणी ती दुसऱ्यानी शोधून काढावीत. का बरे आम्ही शोधावी ? जर एखादी गोष्ट मला योग्य वाटत नाही तर त्याचा विरोध करण्याचा हक्क आम्हाला आहे. केवळ धर्मात किंवा अन्यत्र सांगितलेले आहे म्हणून एखादी गोष्ट सगळ्यांना मान्य झालीच पाहिजे असे नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Sep 2016 - 6:29 am | अत्रुप्त आत्मा

@तुमच्या मते दिगंबर अवस्थेत फिरण्याची काही तरी कारणे आहेत आणी ती दुसऱ्यानी शोधून काढावीत. का बरे आम्ही शोधावी ?››› +++१११
हेच तर टनाटनी लोकांचं वैशिष्ट्य असतं. ते टनाटनी पणा करणार. आणी कारणं आपण शोधायची.

चित्रगुप्त's picture

4 Sep 2016 - 6:46 am | चित्रगुप्त

दिगंबर अवस्थेत रहाण्याची जी काही कारणे असतील, ती धागाकर्त्याने ती विशद करावीतच, शिवाय त्यामुळे ती व्यक्ति इतर कपडे घालण्यार्‍या लोकांच्या आदरास पात्र का ठरते हेही विशद करावे ही विनंती.

चित्रगुप्त's picture

4 Sep 2016 - 6:59 am | चित्रगुप्त

जैन मुनींच्या नग्नतेविशयी ओशो रजनीशांनी केलेले सुंदर विवेचन फार पूर्वी वाचले आहे, परंतु त्यातले तपशील आता विसरलो. कुणाला ठाऊक आहे का ?

मुक्त's picture

4 Sep 2016 - 8:59 am | मुक्त

पराकोटीचा इंद्रिय संयम असल्याशिवाय शक्य नाही.

चित्रगुप्त's picture

4 Sep 2016 - 5:56 pm | चित्रगुप्त

दिगंबर अवस्था पराकोटीचा इंद्रिय संयम असल्याशिवाय शक्य नाही.

काहीही हं 'मु'
त्यांना कुठे सनी वगैरेंचे ठुमके, पिच्चर किंवा अन्य फाजील प्रकार वगैरे बघायचे असतात ?

चित्रगुप्त साहेब. तुम्ही एक्स्ट्रीम बाजूला गेलात.
जैनमुनी दिगंबर अवस्थेत समाजात वावरत असतात. इंद्रिय निग्रहाशिवाय हे कसे शक्य आहे.

सनी वगैरेंचे ठुमके, पिच्चर किंवा अन्य फाजील प्रकार वगैरे बघायचे असतात ?

ह्याच गोश्ति तुमचि मास्निकता व्यक्त करतात.

चित्रगुप्त's picture

4 Sep 2016 - 9:51 pm | चित्रगुप्त

माझ्या मानसिकतेचे सोडा हो, मी चित्रकार असल्याने विवस्त्र मॉडेलवरून एकाग्र चित्ताने तासन तास रेखाटन, पेंटिंग करण्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे नग्नतेबद्दल माझी मानसिकता फार वेगळी आहे. माझ्या लेखी मुनि, साधू, लहान मुले, नग्न मॉडेल्स, चित्रा - सिनेमातील नग्नता यात काही फरक नाही.

विवेकपटाईत's picture

4 Sep 2016 - 11:15 am | विवेकपटाईत

सनातन धर्मापासून थोडा वेगळा झालेला जैन धर्म हा बहुतेक एका निश्चित पूजा पद्धतीवर आधारित जगातील पहिला धर्म असावा. इसाई धर्मापूर्वीचा. आपल्या सारखे जैन हि त्यांच्या देवतांची पूजा करतात. सनातनी परमपरांना आपल्यापेक्षा जास्ती निष्ठेने पाळतात. जैन देवालयांमध्ये स्वच्छता आपल्या मंदिरांपेक्षा जास्त असते. बाकी माझ्या मोठ्या भावाची एक सून जैन (गुजराती) आहे. लग्न सनातन रिती प्रमाणे सुरळीत पार पडले. कुठलाही कडवा विरोध झाला नाही. कसलीही समस्या आली नाही. लग्नाच्या जेवणात कांदे, लसूण, जमिनी खाली उगविणारे कंद असे पदार्थ नव्हते, तरी जेवण स्वादिष्ट होते. लग्नाला ३-४ वर्ष झाली तरी कसलीही समस्या उद्भवली नाही.

जव्हेरगंज's picture

4 Sep 2016 - 11:40 am | जव्हेरगंज

हेच म्हणतो!
जेवण चांगलं झालं की सगळा आनंदीआनंद असतो!

असंका's picture

5 Sep 2016 - 10:05 am | असंका

लैच भारी!!!!!

=))

पुन्हा एकदा धर्मचर्चा होणार तर!
देव ,कर्म आणि स्वर्ग आहे या तीन समजूती वजा केल्या तर बय्राच धर्मांचा फक्त भुस्सा उरतो.

मारवा's picture

4 Sep 2016 - 11:56 am | मारवा

जैन समाजाचे अवलोकन करतांना काही बाबी विशेष वाटतात
१- पंच महाव्रतांपैकी केवळ अहिंसा या एकच एक व्रताचा पुरस्कार प्रचार आचार करण्यात सध्याच्या सर्वसाधारण जैन समाजाला रस दिसतो. अतीव आश्चर्याची बाब म्हणजे ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरीग्रह, सत्य आदी व्रतांचा उल्लेख प्रचार आग्रह फारच कमी असा जैनांमध्ये सध्याच्या काळात आढळतो. म्हणजे अनेक जैन वक्ते लेखक मांसाहार कसा घातक आहे शाकाहार कसा श्रेष्ठ आहे वगैरे तारस्वरात आक्रमकतेने मांडणी करतांना दिसतात. कोणी काय खावे कोणी काय नाही. व मांसाहार करणारी व्यक्ती किती पतित झालेली आहे माणुस म्हणवण्याच्याही लायकीची नाही इ.इ..
पण एक की अपरीग्रह संचय नको पैशाचा धनाचा संचय नको असे कोणी आग्रह करतांना दिसत नाही. किंवा ब्रह्मचर्य किंवा अस्तेय यावर कोणीच काहीच बोलतांना सहसा दिसत नाही. म्हणजे एकुण ५ व्रत मिळुन १०० % धरले तर केवळ २० % वरच समाधान मानलेले दिसुन येते.
अब साध्य करा हमने अहिंसा का व्रत
अब बारी है ब्रह्मचर्य की
अब पा ली हमने हिंसा पर विजय
अब बारी है अपरीग्रह की
चलो आगे बढे अब अहिंसा से
अब बात करे अस्तेय की
हर घर का कमसे कम एक बच्चा अब करेगा पालन ब्रह्मचर्य का
हर घर का कमसे कम एक बच्चा अब दिखा देगा पालन अपरीग्रह का
हम नही रहेंगे अब अधुरे अधुरे हम करेंगे पांच महाव्रत पुरे पुरे
आगे बढो अहिंसा के अब तो बहोत सफर बाकी है.
अशा काही घोषणा ऐकावयास मिळत नाही. अहिंसा या एकमेव तत्वाशिवाय इतर ४ जणु पंच महाव्रतांपैकीच नाहीत की काय असा भास होतो.
यामागे उघड कारण सोय हे आहे. अहिंसा हे सर्वात सोयिस्कर सुरक्षित आटोपशीर कमीत कमी मिनिमम त्रासाचे व्रत आहे.
यामध्ये थोड्याश्या सोप्या सुटसुटीत दोन-चार गोष्टी खाणे कंट्रोल करुन ( कंट्रोलही नाही अनेकांना कधी खाल्लेलेच नसेल तर ते न खाण्याचा निर्णय घेणे अती सोपे मी आजपासुन लिची या फळाचा त्याग करत आहे असे एखाद्या मराठवाड्यातील व्यक्तीने ठरवल्यासारखे ) झाल्यावर इतरांवर हल्ला करण्यास एक अनकंट्रोलेबल सुट मिळते.
ब्रह्मचर्य नुसता विचार करा, अपरीग्रह कुठलाच संचय करायचा नाही म्हटल्यावर तर सर्व धंदे व्यवसाय बंद करण्याचा दुर्धर प्रसंग ओढवेल धनसंचय कसे होणार ? त्यामानाने अहिंसा फारच इझी टु हॅन्डल.
शिवाय हिंसे चा संदर्भ केवळ खाणे पिणे संदर्भात इतकाच मर्यादीत संकुचित केल्यावर मग बाकी हिंसेची सुक्ष्म रुपे आचरली तरी हरकत नाहीच.

२- सार्वजनिक स्थळांवरील नग्नता
काही निसर्गवादी मंडळे असतात. त्यांच्या थेअरीनुसार नग्न राहणे नग्न विहार हाच उत्तम कपडे घालणे त्याचे बंधन बाळगणे चुक इ.इ. त्यातला एखादा जर भारताच्या एखाद्या रस्त्यावर ही माझी थेअरी आहे यात मी विश्वास करतो यात माझी आस्था आहे असे म्हणत फिरु लागला तर
अगोदर त्याला चार फटके मारुन जेल मध्ये टाकतील सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन इ. कलमाखाली असा कायदाही आहे.
मात्र असेच जर एका दुसर्‍या थेअरीच्या नावाने जर.........
शिवाय जी लहान मुले ज्यांना इतर काहीही कळत नाही धर्म नाही थेअरी नाही ती रस्त्याने शाळेत जात असतांना त्यांना जर असे काही दृश्य दिसले तर म्हणजे समाज एरवी या बाबीला जी मान्यता देत नाही त्या संदर्भात हा प्रश्न आहे.
कि लहान मुलांना असे दृश्य एका किमान वयापर्यंत न बघु देण्याची काळजी घेणे ही एक अपेक्षा मागणी आहे
मात्र ती या रीतीने अडचणीत आली
म्हणजे एक निसर्गवादी मंडळाचा पुरुष समोर आला
किंवा तर कसे करायला हवे ?

परिंदा's picture

4 Sep 2016 - 12:01 pm | परिंदा

एक नंबर प्रतिसाद!!

चंपाबाई's picture

4 Sep 2016 - 12:39 pm | चंपाबाई

यम नियम ( अहिंसा स अ ब्र अ ) वगैरे हिंदु धर्मातील अष्टांगयोगाचेही भाग आहेत.. योगदिन पालन करणारे लोक त्याचे पालन करतात का? मग जैनांबद्दलच २० % वगैरे विष्लेषण कशाला?

http://hindi.awgp.org/gayatri/sanskritik_dharohar/bharat_ajastra_anudan/...

( बाकी, ते २० % , ८०% वगैरे अध्यात्मिक आकडेवारी सनातनवाले वापरतात)

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 12:45 pm | संदीप डांगे

योगदिन पालन करणारे आमच्या धर्माच्या भावना दुखावल्या अशी छाती पिटतांना दिसतात का?

आनंदी गोपाळ's picture

4 Sep 2016 - 12:01 pm | आनंदी गोपाळ

जैन लोकांच्या असंख्य संस्थांना, मुस्लिम संस्थांसारखाच, 'अल्पसंख्यांक धार्मिक दर्जा' असतो.

अभ्या..'s picture

4 Sep 2016 - 12:55 pm | अभ्या..

मला जैनांची एक घोषणा फार आवडते. आमच्या इकडे बर्‍याच ठिकाणी दिसते. "जैनं जयति शासनम"

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2016 - 2:27 pm | श्रीगुरुजी

निओ१,

तुम्ही जैन असावात असे वाटते. जैनांबद्दल फारशी माहिती नाही हे माझ्याबाबतीत तरी खरे आहे. कृपया खालील माहिती द्याल का?

१) जैनांमध्ये श्वेतांबर, दिगंबर व स्थानकवासी हे ३ उपपंथ/उपजाती (दुसरा योग्य शब्द सुचला नाही) आहेत असे ऐकून आहे. हे खरे आहे का? या व्यतिरिक्त अजून उपपंथ/उपजाती आहेत का?

२) फक्त दिगंबर साधूच दिगंबरावस्थेत राहतात पण इतर उपपंथाचे/उपजातीचे साधू तसे राहत नाहीत हे खरे आहे का?

३) साधूंनी दिगंबरावस्थेत राहण्यामागची नक्की कारणे काय आहेत? संन्यास धारण केल्यावर दिगंबरावस्थेत राहणे सक्तीचे आहे का? एखादा संन्यास घेतलेला साधू स्वतःच्या मर्जीने वस्त्रे वापरू शकतो का? का तसे करण्याची धर्माने परवानगी दिलेली नाही? दिगंबरावस्थेत राहिल्यास काही पारमार्थिक किंवा सामाजिक लाभ मिळतो का? दिगंबरावस्थेत न राहिल्यास काही पारमार्थिक किंवा सामाजिक तोटा होईल का?

४) दिगंबर साधू भारताव्यतिरिक्त इतर देशांना भेटी देतात का? तसे असल्यास जाताना विमानात व नंतर त्या देशात दिगंबरावस्थेत असण्याची परवानगी असते का?

हे प्रश्न जैन धर्माची बदनामी करण्यासाठी विचारलेले नसून माहितीत भर पडावी या उद्देशाने विचारले आहेत.

१) जैनांमध्ये श्वेतांबर, दिगंबर व स्थानकवासी हे ३ उपपंथ/उपजाती (दुसरा योग्य शब्द सुचला नाही) आहेत असे ऐकून आहे. हे खरे आहे का? या व्यतिरिक्त अजून उपपंथ/उपजाती आहेत का?
होय. माझ्या माहितीप्रमाणे १५ उपजाती आहेत. श्वेतांबर, दिगंबर व स्थानकवासी या जास्त करुन दिसुन येतात.

२) फक्त दिगंबर साधूच दिगंबरावस्थेत राहतात पण इतर उपपंथाचे/उपजातीचे साधू तसे राहत नाहीत हे खरे आहे का?
होय. श्वेतांबर साधू श्वेत वस्त्रे परिधान करतात.

३) साधूंनी दिगंबरावस्थेत राहण्यामागची नक्की कारणे काय आहेत? संन्यास धारण केल्यावर दिगंबरावस्थेत राहणे सक्तीचे आहे का? एखादा संन्यास घेतलेला साधू स्वतःच्या मर्जीने वस्त्रे वापरू शकतो का? का तसे करण्याची धर्माने परवानगी दिलेली नाही? दिगंबरावस्थेत राहिल्यास काही पारमार्थिक किंवा सामाजिक लाभ मिळतो का? दिगंबरावस्थेत न राहिल्यास काही पारमार्थिक किंवा सामाजिक तोटा होईल का?
माहित नाही.

४) दिगंबर साधू भारताव्यतिरिक्त इतर देशांना भेटी देतात का? तसे असल्यास जाताना विमानात व नंतर त्या देशात दिगंबरावस्थेत असण्याची परवानगी असते का?
माहित नाही.

(मी स्वतः जैन श्वेतांबर आहे, पण फार धार्मिक नसल्यामुळे फार माहिती नाही.)

गणामास्तर's picture

4 Sep 2016 - 7:03 pm | गणामास्तर

श्वेतांबर आणि माहेश्वरी एकचं की वेगळे याबाबत काही सांगू शकाल काय?

वप्याला माह्यतीय. कुठे खपलंय ते हुडक न विचार.

रिम झिम's picture

4 Sep 2016 - 8:03 pm | रिम झिम

श्वेतांबर हा पंथ आहे.माहेश्वरी वेगळे

बॅटमॅन's picture

5 Sep 2016 - 11:44 am | बॅटमॅन

पण माहेश्वरी हे शंकराचे भक्त, (नावच बघा-माहेश्वरी म्ह. महेश्वराचे भक्त, जैनांच्या कुठल्या तीर्थंकरांना असे नाव दिलेले ऐकले नाही.) ते जैन असणे संभवत नाही असे वाटते. ते हिंदूच असतात, माझा एक मित्र आहे त्यांपैकी.

अभ्या..'s picture

5 Sep 2016 - 11:52 am | अभ्या..

आदिनाथ, ऋषभनाथ हे तीर्थंकरांचे नाव जवळपास शंकराचेच वाटते ना?
नेमिनाथ हे नाथपंथी नांव सुध्दा एका तीर्थंकराचे आहे.

हम्म ते बाकी खरे आहे म्हणा.

अभ्या..'s picture

5 Sep 2016 - 12:00 pm | अभ्या..

माझे बरेच मित्र आहेत माहेश्वरी. ते जैनच असतात. बहुतेक ते राजस्थानी मूळ सांगत असावेत. मारवाडी ह्या नावाने जास्त करुन तेच ओळखले जातात. व्यापारात बहुतांशी असलेले धर्मासाठी सढळ हस्ते धन देणारे पण हेच लोक मला तरी पाहण्यात आहेत.

ओह अच्छा, धन्यवाद. माझी गफलत झाली असावी.

माझी पण माहिती अशीच होती की माहेश्वरी लोक जैन नसतात...

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Sep 2016 - 2:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझ्यामाहिती प्रमाणे,

माहेश्वरी हे जैन धर्मीय नसून हिंदू मारवाडी असतात खास करून हिंदू मारवाडी कायस्थ, ज्यांना आपण "मारवाडी" ह्या नावाने ओळखतो, महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत धंद्यानिमित्त पसरलेल्या मारवाडी समाजात अग्रवाल, माहेश्वरी ह्या दोन पोटजाती प्रचंड पुढे आहेत उदा लक्ष्मी मित्तल (अग्रवाल), बजाज, धूत इत्यादी

हि एक अतिशय बेसिक लिंक कामी यावी

बॅटमॅन's picture

5 Sep 2016 - 2:29 pm | बॅटमॅन

धन्यवाद सरजी,

माझा मित्र हिंदू मारवाडीच आहे हे कन्फर्म केले परत एकदा.

प्रचेतस's picture

5 Sep 2016 - 12:00 pm | प्रचेतस

संस्कृती एकच आहे ना.

डिपेंड्स, अगदी सुपरफिशिअली एक आहे असे म्हणता येईल.

अरे संस्कृतीची मज्जा (डुबली नाहीये बरका अजून) जैनांच्या तीर्थंकर कथामध्ये एका तीर्थंकरांना वनवासातील रामलक्षमणसीता भेटल्याची कथा आहे. नंतर अयोध्या राज्याभिषेकात उपस्थित राजात पण एक तीर्थंकर राजा म्हणून उपस्थित असल्याचे वाचल्याचे स्मरते. बरेचसे रामायण आणि महाभारतातील पण सन्दर्भ येतात. गोम्मटेश्वर बाहुबलीची भरताची गोष्ट तशीच. आणि नवल म्हणजे गणेशाला राक्षस म्हणून गणले जाते. देव नाही. (हे ऐकलेले आहे)

भगवान नेमीनाथ तर कृष्णाचा भाउ म्हणून समजले जातात.

लोल हे बाकी भारीच. अर्थात जैन रामायणांची व्हर्जन वेगळी आहे हे माहितीये पण डीटेल्स माहिती नाहीत. वाचले पाहिजे.

चित्रगुप्त's picture

5 Sep 2016 - 5:11 pm | चित्रगुप्त

'जैन धर्म' हा महावीरांपासून वेगळा गणला जाऊ लागला ना?
ज्याप्रमाणे ख्रिस्ती आणि मुसलमान यांचा प्राचीन इतिहास एकच असल्यामुळे (ओल्ड टेस्टामेंट, बुक ऑफ जेनेसिस इ) जशी या दोन्ही धर्मात प्राचीन व्यक्ती त्याच त्या आहेत (अब्राहम्=इब्राहिम, मोझेस्= मूसा, आयझॅक्=इसाक, डेव्हिड्=दाऊद, जॅकब्=याकूब, जीजस्=ईसा, जोसेफ्=युसुफ, अ‍ॅबेल्=हबीब,सोलोमन्=सुलेमान, अ‍ॅडम-ईव्ह्=आदम-हव्वा वगैरे) तसेच महावीरांपूर्वीचे तीर्थंकरांचे बाबतीत झाले असावे.
म्हणजे मोझेस वा इब्राहीम हे खिस्ती वा मुसलमान होते असे म्हणणे चूक, तसेच आदिनाथ, मल्लिनाथ, नेमिनाथ वगैरे जैन होते असे म्हणणे हे चूक.
(अर्थात माझी ही माहिती चूक असल्यास जाणकारांनी नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे अवश्य सांगावे)

अर्थात क्रिश्चनिटी = कृष्णनीति, चर्च = चर्चा करण्याची जागा, ट्रिनिटी = त्रिनीती, वॅटिकन = वाटिका, जीजस क्राईस्ट = ईशस कृस्त(कृष्ण), महंमद पैगंबर = महा-मद पग-अम्बर वगैरे मानणारांसाठी सर्व प्रश्नच निकालात निघतो.
.

बॅटमॅन's picture

6 Sep 2016 - 7:51 am | बॅटमॅन

सहमत, तसेच आहे हे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Sep 2016 - 10:39 pm | अनिरुद्ध.वैद्य

ह्यांची कथा वाचली होती. रामायणातही जैन तीर्थांकरांचे उल्लेख आहेत?

प्रचेतस's picture

5 Sep 2016 - 10:57 pm | प्रचेतस

रामायणात जैन तीर्थंकरांचे उल्लेख नाहित मात्र तथागत गौतम बुद्धाचे उल्लेख एक दोन ठिकाणी आहेत.

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Sep 2016 - 7:32 am | अनिरुद्ध.वैद्य

:)

पैसा's picture

6 Sep 2016 - 11:21 am | पैसा

अगदी राक्षस मानतात का याबद्दल शंका वाटते. गणपती हा शिवगण, गणांचा अधिपती म्हणजे तत्सम दुय्यम देवतांपैकी होता. त्याला देवस्वरूप गुप्तकाळात किंवा त्यानंतर आले. त्यामुळे जैनांच्या जुन्या साहित्यात त्याचे तसे वर्णन असेल.

मात्र माझ्या माहितीतली काही जैन कुटुंबे घरी पार्थिव गणपती इतरांप्रमाणेच आणून बसवतात. एक हुबळीचे जैन कलीग गणपतीच्या देवळातही जात असत.

राक्षस नाही पण अनार्य मानतात.

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Sep 2016 - 11:36 am | अनिरुद्ध.वैद्य

मुळ वैदीक देवतांमध्ये शंकर गणपती आदी देवता नाहीत, पण त्यांचे गुण विशेष असलेल्या इतर देवता आहेत, जसे की रुद्र अथवा बृहस्प्ती अथ्वा ब्राहम्ण्स्पती.

गुप्तकाळ हिंदुंचा सुवर्णकाळ. ह्यात बर्‍याच अनार्य देवतांचे उन्नयन होउन त्या मुख्य हिंदु पंचायतानात आणल्या गेल्या.

गणपतीवर विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता असा प्रवास झाला ह्याचे व॑र्णन असणारा लेख वाचला होता बहुधा किस्त्रीम मध्ये. त्यात बरेच लिहिले होते. पण आता नेमके संदर्भ आठवत नाहीत :(

पैसा's picture

6 Sep 2016 - 11:41 am | पैसा

रा.चिं.ढेरे यांनी यावर भरपूर संशोधन करून लिहिले आहे.

गणामास्तर's picture

6 Sep 2016 - 11:43 am | गणामास्तर

यांवरून सहज एक किस्सा आठवला. आमच्या येथे जैन लोकं सर्रास गणपती,लक्ष्मी वगैरे पूजतात आणि दुकानात,हापिसात
गणपतीची मूर्ती वा तसबीर लावलेली दिसते. काही वर्षांपूर्वी जैन समाजानी एका साधवींचा कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रवचनात त्यांनी यांबद्दल नाराजी प्रकट केली आणि जैन धर्माला मूर्ती पूजा कशी निषिद्ध आहे यांवर भाष्य करून हे सर्व थांबवावे असे सांगितले. त्यानंतर बऱ्याचं लोकांनी आपापल्या गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्ती फोटोचे विसर्जन करून टाकले.
काही दिवसां नंतर ज्या लोकांनी हे केले त्यांना अचानक आपला व्यापार मंदावलाय असे वाटू लागले आणि ज्या लोकांनी
केले नव्हते त्यांची भरभराट चालूचं आहे असा प्रचार चालू झाला. मग काय , वाजत गाजत गणपती आणि लक्ष्मी परत
स्थानापन्न झाले.

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Sep 2016 - 12:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

ही त्या मुर्त्यांच्या व्यापार्‍याने उठवलेली अफवा असावी !!

टर्मीनेटर's picture

9 Sep 2016 - 9:33 am | टर्मीनेटर

जैन धर्मात पण अनेक पंथ आहेत उदा. श्वेतांबर , दिगंबर वगैरे वगैरे. त्यापैकी काही पंथ हे मूर्ती पूजक आहेत ज्यांना मंदिरवासी म्हणतात तर काहींमध्ये मूर्ती पूजा निषिद्ध मानली जाते.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 12:10 pm | संदीप डांगे

मोक्ष संकल्पनेच्या मुळाशी शंकर आहे. मोक्ष मिळवणारा पहिला व्यक्ती म्हणून शंकर समजला जातो. त्यानेच वेगवेगळ्या ध्यानपद्धती, योगपद्धती शोधून काढल्यात व त्याचा प्रसार केला. शंकर हा त्यामुळेच आदिगुरु आहे. काळाच्या ओघात मुळं हरवली असल्यामुळे अनेक पंथांना उगम माहित नसतो.

जैनांमधे शंकराच्या नामसाधर्म्यामागे हे एक कारण असू शकते.

मोक्ष संकल्पनेच्या मुळाशी शंकर आहे.

नक्की? याचा उल्लेख वाचायला आवडेल.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 1:22 pm | संदीप डांगे

उल्लेख कुठे झाला त्याचे ऐतिहासिक संदर्भ देऊ शकत नाही - तसे ते आहेत का याबद्दल मला तरी माहिती नाही. पण वेगवेगळ्या ठिकाणी वाचलेले की शंकर हा सर्व मोक्ष इच्छुकांचा आद्यगुरु आहे म्हणून. कदाचित माझी वाक्यमांडणी चुकली असावी. शंकराने योगसाधनेसहित मोक्षाकडे जाणार्‍या अनेक मार्गांचा शोध लावला व गुरु-शिष्य परंपरेने त्याचा प्रसार झाला आहे असे अध्यात्मात समजले जाते. ह्यात शंकराला सर्वोच्च समजले जावे असा हेतु नसून मूळ कुठे आहे हे लक्षात यावे असा अर्थ अभिप्रेत आहे. तसेच शंकर हा रुढार्थाने देव समजला जात नसून गुरु समजला जातो. त्याची कृपा (गुरुशिष्यांच्या साखळीमधून आपल्यापर्यंत ते ज्ञान पोचेल ही व्यवस्था) झाली तर मोक्षाकडे जाणार्‍या पायर्‍या भराभर चढल्या जातात.

अर्थात ह्या सर्व मान्यता-समज-बीलिफ आहेत. ह्याचे वैज्ञानिकरित्या-ऐतिहासिकरित्या विश्लेषण होईलच असे नाही.

बॅटमॅन's picture

5 Sep 2016 - 2:31 pm | बॅटमॅन

वैज्ञानिक वगैरे सोडा ओ, ऐतिहासिक संदर्भच हवे होते. पाहतो.

सतिश गावडे's picture

5 Sep 2016 - 3:02 pm | सतिश गावडे

यावरुन ज्ञानदेवांचा आपल्या गुरु परंपरेचा (नाथ संप्रदाय) अभंग आठवला:

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
मच्छिन्द्र तयाचा मुख्य शिष्य
मच्छिन्द्राने बोध गोरक्षासी केला
गोरक्ष वदला गहिनीप्रती
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार
ज्ञानदेवा सार चोजविले

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 3:25 pm | संदीप डांगे

धन्यवाद!

१) जैनांमध्ये श्वेतांबर, दिगंबर व स्थानकवासी हे ३ उपपंथ/उपजाती (दुसरा योग्य शब्द सुचला नाही) आहेत असे ऐकून आहे. हे खरे आहे का? या व्यतिरिक्त अजून उपपंथ/उपजाती आहेत का?

पन म्न्दिरामध्ये जान्यास बन्दि नाहि. तत्वात फर्क आहे म्हनुन वेगले प्न्थ आहेत.

२) फक्त दिगंबर साधूच दिगंबरावस्थेत राहतात पण इतर उपपंथाचे/उपजातीचे साधू तसे राहत नाहीत हे खरे आहे का?

हो

३) साधूंनी दिगंबरावस्थेत राहण्यामागची नक्की कारणे काय आहेत?

खालि लिहले आहे

दिगंबर साधू भारताव्यतिरिक्त इतर देशांना भेटी देतात का?

माझ्या माहितित नाहि.

अविनाशकुलकर्णी's picture

4 Sep 2016 - 6:57 pm | अविनाशकुलकर्णी

नागा साधु पण दिगंबरच असतात

चित्रगुप्त's picture

4 Sep 2016 - 7:13 pm | चित्रगुप्त

दिगंबर असणे हेच खरेतर नैसर्गिक आहे. आपण उगीच्च्या उगिचच एवढे कपटेलत्ते चढवत असतो.
खालील सुप्रसिद्ध कलाकृती बघा. यातील निर्वस्त्र स्त्रीच्या रूपात पवित्रतेचे, तर सवस्त्र स्त्रीत लोलुपतेचे चित्रण केले गेलेले आहे.

.
Sacred and profane love – Titian c. 1514 (Borghese Gallery, Rome)

दिगंबर मुनि आणि नागा साधूंना शिरसाष्टांग नमस्कार.

संदीप डांगे,

तुमचे इथले प्रश्न वाचले. रोचक आहेत. जमेल तशी उत्तरं देतो.

प्र. १. : .... एक धर्मगुरु येऊन राज्यघटनेचा अपमान करुन जातात ह्याबद्दल कोणती केस त्या धर्मगुरुंवर करावी?

उ. १ : कोणाचा आणि कसला अपमान मुनीश्रींनी केलाय?

प्र. २. : जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडल्याने कोणाचा व कसा अपमान होतो? जैन धर्माला सत्याची लाज वाटते का?

उ. २. : तुम्ही थोर पुरूष आहात. म्हणून तुमच्या जन्माचं सत्य उघड्यानागड्या भाषेत मांडावं का? म्हणजे तुमचे जन्मदाते तुमच्या जन्माआधी काही महिने कोणत्या अवस्थेत होते, नंतर प्रत्यक्ष जन्माच्या वेळेस कोणत्या अवस्थेत होते, मधला प्रवास तुम्ही यशस्वीरीत्या कसा पार पाडलात, इत्यादि, इत्यादि?

आता उपप्रश्न पाहूया.

अ) जैन गुरु नागडे नाहीत?

उ) आहेत. बरं मग?

ब) त्यांनी विधानसभेत भाषण केले नाही?

उ) केलं. त्यासाठीच तर आमंत्रण होतं.

क) त्यांनी राजनीती ही धर्माची पत्नी असल्याचे म्हटले नाही?

उ) हो, म्हंटलं. मग काय आकाश कोसळून पडलं? आजच्या समानतेच्या युगात धर्म आणि राजनीती पतीपत्नींप्रमाणे हातात हात घालून गेले पाहिजेत. यात काय चुकीचं आहे?

आ.न.,
-गा.पै.

आता मुसल्मान यानि ३ तलाक वर कोर्तात भाश्य केले आहे, त्यावर त्यान्चे मत काय अस्ले?

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 8:59 pm | संदीप डांगे

महाशय, माझ्या वक्तव्याने जैन धर्माचा अपमान कसा झाला याबाबद्ल उत्तर हवंय, आहे का तुमच्याकडे? बाकीचा फाफट पसारा नन्तर बघू!

बाकी माझ्या जन्माचं रहस्य वगैरे काही नाही हो, जसा तुमचा झाला तसाच माझाही झाला, तुमचा काही वेगळ्या पद्धतीने झाला असल्यास ऐकायला आवडेल!

निओ१'s picture

4 Sep 2016 - 8:03 pm | निओ१

णमो अरिहंताणं
णमो सिद्धाणं
णमो आयरियाणं
णमो उवज्झायाणं
णमो लोए सव्व साहूणं

ही जैन धर्माचि शिकवन आहे.
वादाला वाद करने नाहि. विरोधि मताचे स्वागत आहे पन आम्च्या मताला विरोध म्हनुन विरोध करु नका.
काहि बाबिबद्दल मि सविस्तर उत्तर देइन पन आता उत्तर देत नाहि याचा अर्थ असानाहि कि उत्तर देनार नाहि.

जैन धर्मामध्ये दिग्न्बर जैन हे नग्न राहतात, त्याबद्दल सविस्तर् लिह्तो आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2016 - 9:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> जैन धर्मामध्ये दिग्न्बर जैन हे नग्न राहतात, त्याबद्दल सविस्तर् लिह्तो आहे.

सविस्तर लिहा. मला खूप विचित्र वाटतं तो सर्व प्रकार . "नागड़ेपण" आजच्या काळात धर्मोपयोगी कसं आहे, तेवढे नक्की पटवून द्या.

-दिलीप बिरुटे

अप्पा जोगळेकर's picture

5 Sep 2016 - 10:29 am | अप्पा जोगळेकर

"नागड़ेपण" आजच्या काळात धर्मोपयोगी कसं आहे, तेवढे नक्की पटवून द्या.
जगातल्या सर्व धर्म, पंथांचे साधक आपापली संख्या वाढवत राहतात. त्या दृष्टीने नग्नता उपयोगी आहेच.

आदूबाळ's picture

5 Sep 2016 - 9:14 pm | आदूबाळ

एक अवांतर प्रश्न: हे "णमो" असं का लिहितात?

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2016 - 9:16 pm | प्रभाकर पेठकर

'नमो' लिहील्यास ते 'नरेंद्र मोदीं'चे भक्त आहेत असा गैरसमज पसरेल, म्हणून असेल.

पेठकर काकांनी षट्कारच मारलाय. चेंडू स्टेडियमच्या बाहेर.

अभ्या..'s picture

5 Sep 2016 - 9:26 pm | अभ्या..

बहुधा ते पाली, अर्धमागधी किंवा ब्राह्मी (ह्यापैकी असेल ते) असावेत. त्यात न एवजी ण असेल.
मिच्छामि दुक्कडम, पर्युषण आले वाटते. कार्डांची ऑर्डर येईल बहुधा. ;)

आबा: अभ्या इज़ रैट्ट. जैनांची धर्मभाषा अर्धमागधी, त्यात असे लिहितात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Sep 2016 - 8:10 am | कैलासवासी सोन्याबापु

"गाथा सप्तशती"ला "गाहा सत्तसई" लिहिणारी भाषा अन ही जैन पद्धतीची अर्धमागधी सेम का बॅटमॅन भाई? का ती पाली/ब्राह्मी अन ही अर्धमागधी? ब्राह्मी स्क्रिप्ट असते की भाषा?

प्रचेतस's picture

6 Sep 2016 - 8:57 am | प्रचेतस

गाहा सत्तसईची भाषा महाराष्ट्री प्राकृत.
पालीचीच ही विविध व्हर्जन्स. सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी हे पाली भाषेचे मोठे विद्वान होते हे खूप कमी जणांना माहित आहे.

ब्राह्मी ही लिपी आहे.

महाराष्ट्री प्राकृत म्हणजे "दिण्णले, दिधल्ले असे बोलणारे" असा उल्लेख आहे तीच का?
चिं. वि. जोशींची माहिती रोचक आहे राव. पूर्वी पाली अन अर्धमागधी ह्या भाषा दहावीच्या/बारावीच्या अभ्यासक्रमात होत्या असे ऐकिवात आहे. मुले स्कोअरिंगसाठी त्या घ्यायचे.

प्रचेतस's picture

6 Sep 2016 - 9:25 am | प्रचेतस

हो. तीच.

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Sep 2016 - 11:37 am | अनिरुद्ध.वैद्य

देवी सप्तशती कोणती?

बॅटमॅन's picture

8 Sep 2016 - 2:08 am | बॅटमॅन

तो दिण्हले, गहिल्ले, इ. उल्लेख असलेला श्लोक/आर्या सुमारे इ.स. ७००-८०० च्या सुमारास आहे, उद्योतनसूरी नामक एका जैन मुनींच्या कुवलयमाला नामक ग्रंथातला. त्या काळात महाराष्ट्रात जी भाषा बोलत तिला अपभ्रंश अशी संज्ञा आहे. महाराष्ट्री प्राकृत ही सातवाहन(वल्ली)कालीन, अदमासे दोनेक हजार वर्षांपूर्वीची. अर्थात याचा अर्थ त्या दोहोंत काही साम्यच नव्हते असा आजिबात घेऊ नये. पण यांच्यातले फरक मला नक्की माहीत नाहीत. नीट अभ्यासले पाहिजे.

वल्ली सरांनी उत्तर दिलेलेच आहे. त्यात भर घालायची म्हणजे महाराष्ट्री प्राकृत ही भारताच्या पश्चिम भागातली, तर अर्धमागधी ही पूर्व भागातली भाषा आहे. पाली हे अनेक बोलींचे कडबोळे मुद्दाम तयार केले गेलेले आहे.

गिन्बर जैन हे दिशा हे आमचे वस्त्र आहे असे मानते, वस्त्र त्यागाने मोक्श प्राप्तिमध्ये मदत होते.

जैन धर्म्चाचि ५ तत्वे आहेत.
१. अहिंसा
२. सत्य
३. अस्तेय
४. ब्रह्मचर्य
५. अपरिग्रह

या मध्ये जो अपरिग्रह आहे त्याचा अर्थ सरल आहे, कि कुथल्याहि ताज्य वस्तुबद्दल ममत्व न थेवने. त्यामध्य भोजन, वस्तु, वास्तु व परिधान याचा त्याग अभिप्रेत आहे व त्याचेच पालन मुनि करत असतात.

इल्यूमिनाटस's picture

4 Sep 2016 - 8:23 pm | इल्यूमिनाटस

पण तेवढं शुद्धलेखनाचं बघा कि जरा
वाचायला सोपं पडेल

तुम्हालापन हे ताइपिन्ग शिकताना वेल लागल असेल ना ? मला थोदा त्रास होतो आहे पन शिकेन.

इल्यूमिनाटस's picture

4 Sep 2016 - 8:28 pm | इल्यूमिनाटस

शिकाऊ अवस्थेत आहात होय
शिका हो शिका

निओ१'s picture

4 Sep 2016 - 8:30 pm | निओ१

तुम्हि शिकुन आलात का?
येथे येउनच शिकला असाल ना?

आनंदी गोपाळ's picture

5 Sep 2016 - 8:23 am | आनंदी गोपाळ

तुमची मराठी शुद्ध दिसते. टायपिंग मुद्दाम अशुद्ध केल्यासारखे दिसते आहे.
शिवाय शाब्दिक हिंसाही भरपूर करीत आहात ;)

इल्यूमिनाटस's picture

5 Sep 2016 - 8:26 am | इल्यूमिनाटस

;)

भम्पक's picture

11 Sep 2016 - 7:38 pm | भम्पक

हा हा हा ह्ह्पुवा

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2016 - 10:13 pm | श्रीगुरुजी

>>> गिन्बर जैन हे दिशा हे आमचे वस्त्र आहे असे मानते, वस्त्र त्यागाने मोक्श प्राप्तिमध्ये मदत होते.

दिगंबरावस्थेत राहिल्याने मोक्षप्राप्तीसाठी कशी मदत होते हे जरा उलगडून सांगता का?

नागा साधू नंगे का रहातात. धर्म मार्तंडांकडून उत्तर मिळेल हि अपेक्षा. ;)

चंपाबाई's picture

4 Sep 2016 - 11:05 pm | चंपाबाई

कपडे घातल्याने तरी मोक्ष मिळतो का ?

.....

अपरिग्रह १०० % पाळायचे म्हणजे नागडेच रहायला लागेल ना ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2016 - 8:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> दिगंबरावस्थेत राहिल्याने मोक्षप्राप्तीसाठी कशी मदत होते हे जरा उलगडून सांगता का?

हो,हो, मोक्षप्राप्तीचा मार्ग जरा उलगडून सांगा.
मोक्षप्राप्ती मिळत असेल तर मलाही असल्या अवस्थेत राहायला आवडेल. ;)
(फक्त आजूबाजूला लोक नसले पाहिजेत, म्हणजे कुठे जंगलात वगैरे बरं पडेल)

-दिलीप बिरुटे
(लाजाळू)

आपल्याला माहिति नाहि म्ह्नजे त्याचा विरोधच केला पाहिजे का?

इल्यूमिनाटस's picture

4 Sep 2016 - 8:46 pm | इल्यूमिनाटस

नाय शिकून आलुय
क्लास लावला होता

शिकवणी लावण्यापूर्वी :तुम्हालापन हे ताइपिन्ग शिकताना वेल लागल असेल ना ? मला थोदा त्रास होतो आहे पन शिकेन.

शिकवणी लावल्यानंतर: तुम्हाला पण हे टायपिंग शिकताना वेळ लागला असेल ना? मला थोडा त्रास होतो आहे, पण शिकेन.

खात्रीलायक बदल फक्त एका आठवड्यात!

पत्ता तुम्हाला व्यनि करतो

पण तुमच्या शिकाऊ वृत्तीला सलाम

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 9:02 pm | संदीप डांगे

निओ साहेब, तुम्ही आहे तसं लिहा, शुद्धलेखन आता तरी महत्वाचे नाही, माझ्या वक्तव्याने अपमान कसा झाला तेवढ्या पुरतं बोललात तरी पुरे, म्हणजे नेमक्या मुद्द्यावर बोलता येईल, बाकी भडकाऊ प्रतिसादांकडे इग्नोर मारा,

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

4 Sep 2016 - 9:03 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

मुनीवर कि जय!!
नागासाधु कि जय!!
गौमाता कि जय!!
भारत माता कि जय!!

अभिजीत अवलिया's picture

4 Sep 2016 - 10:03 pm | अभिजीत अवलिया

देशाची घटना, तिचे पावित्र्य ह्यापेक्षा जर धर्म मोठा होऊ लागला तर ही फार चिंताजनक गोष्ट आहे.

गामा पैलवान's picture

4 Sep 2016 - 10:49 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

>> महाशय, माझ्या वक्तव्याने जैन धर्माचा अपमान कसा झाला याबाबद्ल उत्तर हवंय, आहे का तुमच्याकडे?
>> बाकीचा फाफट पसारा नन्तर बघू!

अगा जे घडलेचि नोहे त्याची वार्ता काय पुसताहे?

बरं, पण जैन धर्मावर आगपाखड कशासाठी? जैन धर्माला सत्याची लाज वगैरे वाटते का म्हणून?

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 11:35 pm | संदीप डांगे

अगा जे घडलेचि नोहे त्याची वार्ता काय पुसताहे?
>> झालं तर मग.. विषय संपला.

जैन धर्मावर आगपाखड कशासाठी?
>> असे का वाटले बुवा तुम्हाला? माझे जैन धर्म किंवा जगातल्या कोणत्याच धर्माशी कसलेही वैर नाही. धार्मिक कारणांवरुन भावना दुखावून घेणार्‍या जमातीबद्दल मात्र वेगळे विचार आहे.

मी एक हिंदू आहे पण नागासाधूंबद्दल कोणी भलतंसलतं बोलत असेल तर मला काही फरक पडत नाही. कारण त्याने नागासाधूंना काही फरक पडत ना हिंदूधर्माला काही फरक पडत. मला नागासाधूंबद्दल योग्य ती माहिती आहे आणि ती माझ्यापुरती पुरेशी आहे. इतर कोणी अजाणतेपणी-जाणूनबूजून नागासाधूंबद्दल खिल्ली उडवणारं बोलत असेल तर मला हिंदूधर्माचा अपमान झाल्याचे वाटत नाही. जो स्वतःला हिंदू समजतो त्या कोणालाही वाटू नये.

माझा आक्षेप जैनमुनिंवर नव्हताच, तो होता त्यांना विधानसभेत बोलवणार्‍या महान लोकप्रतिनिधींबद्दल आणि ते पाडत असलेल्या चुकीच्या पायंड्याबद्दल. उद्या कोणी झाकिर नाईकला बोलावले तरी असाच आक्षेप असणार आहे. तसेच त्यांच्या दांभिक भूमिकेवर. एकिकडे स्त्रियांनी उचित कपडे घालावे असे आग्रह धरणारेच नग्न साधुंबद्दल मात्र उलट भूमिका घेतात. त्यावर हा आक्षेप होता.

निओ१ साहेबांना तो समजला नाही, म्हणून मी चर्चेला तयार आहे असे सांगितले.

अप्पा जोगळेकर's picture

5 Sep 2016 - 10:24 am | अप्पा जोगळेकर

दिगंबर साध्वी पण असतात का ? की फक्त दिगंबर साधूच असतात.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 10:33 am | संदीप डांगे

दिगंबर जैनांच्या मते, मोक्षाचा मार्ग हा फक्त पुरुषालाच साध्य आहे. त्यामुळे स्त्रियांना दिगंबर साध्वी होण्याची परवानगी नाही.

ओशोंनी ह्या विषयावर बरीच बेधडक वक्तव्ये केली आहेत, त्यांच्यावर जैनधर्मिय कधी उखडलेले दिसले नाहीत.

अप्पा जोगळेकर's picture

5 Sep 2016 - 10:38 am | अप्पा जोगळेकर

अरेरे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Sep 2016 - 10:43 pm | अनिरुद्ध.वैद्य

फारच वाईट.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 10:41 am | संदीप डांगे

दिगंबर जैनांच्या मते, मोक्ष फक्त पुरुषालाच साध्य आहे. त्यामुळे स्त्रियांना दिगंबर साध्वी होण्याची परवानगी नाही.

ओशोंनी ह्या विषयावर बरीच बेधडक वक्तव्ये केली आहेत, त्यांच्यावर जैनधर्मिय कधी उखडलेले दिसले नाहीत.

श्रीगुरुजी's picture

5 Sep 2016 - 12:21 pm | श्रीगुरुजी

संन्यास धारण केलेल्या साधूंबद्दल काही वाचनात आले आहे. संन्यास धारण केल्यावर चैनीच्या वस्तू वापरायला त्यांना मनाई आहे. त्यामुळे केस कापण्यासाठी, दाढी करण्यासाठी ते कात्री, ब्लेड इ. चैनीच्या गोष्टी वापरत नाहीत. ते डोक्याचे व दाढीचे केस कोणतेही साधन न वापरता हाताने उपटून काढतात. माणसाच्या डोक्यावर अंदाजे १ लाख केस असतात म्हणे. इतके केस उपटून काढणे खूप वेदनादायक असणार.

पण मग ते शिजविलेले अन्न ग्रहण करतात का? शिजविलेले अन्न ग्रहण करत नसतील तर पश्नच नाही. पण शिजविलेले अन्न ग्रहण करीत असतील तर अन्न शिजविण्यासाठी गॅस, स्टॉव्ह इ. चैनीची साधने वापरावी लागतील. कदाचित ही साधने न वापरता चुलीवर अन्न शिजविता येईल. पण त्यासाठी तोडलेली लाकडे लागतील व लाकडे तोडण्यासाठी कुर्‍हाड, करवत इ. साधने वापरावी लागतील. तसेच चूल पेटविण्यासाठी काड्यापेटी या साधनाचा वापर करावा लागला असता. तसेच अन्न शिजविण्यासाठी पातेली वगैरे कारखान्यात तयार झालेल्या वस्तू वापराव्या लागल्या असत्या. म्हणजे अशा चैनीच्या वस्तू संपूर्णपणे टाळता येणे अशक्य आहे.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 12:25 pm | संदीप डांगे

सन्यासी भिक्षा मागून उदरभरण करतात. भिक्षेत मिळालेल्या वस्तू ह्या चैनीच्या समजल्या जात नाहीत.

अभ्या..'s picture

5 Sep 2016 - 12:33 pm | अभ्या..

केशलोचनाचा(लुंचन) विधी त्रासदायक असतोच पण त्याचा समारंभ केला जातो. मी पाहिलेले नाही पण काहीतरी टेक्निक असते ते. बर्‍याच विधींचे लिलावही बोललेले असतात धनाढ्य लोकांनी. कोणी श्रमणदिक्षा घेत असेल तर ते त्याच्या पूर्ण घराला सन्मानाचे गौरवाचे मानले जाते.
मी माझ्या डिझाइनच्या कामानिमित्त एका स्थानकवासी जैनांच्या स्थानकात गेलेलो होतो. साध्वी पूर्ण पांढर्‍या पोशाखात होत्या. वय अंदाजे २० ते २२ वाटत होते. अत्यंत अलौकिक सुंदर अन शांत चेहरा असलेल्या त्या साध्वीजी फक्त सूर्याची किरणे जेथे येतात तेवढ्याच उजेडात(दिवे वापरत नाहीत) डिझाइन पाहून अत्यंत मृदू भाषेत करेक्शन्स सांगत होत्या. सुरुवातीला मी तसे होत नसते, जमत नाही वगैरेची टेप वाजवल्यावर त्यांनी शांतपणे माझ्या सॉफ्टवेअरमधीलच कन्सेप्ट मला सांगितल्या. ते सुध्दा फर्ड्या इंग्रजीतून. बाहेर आल्यावर माझ्या जैन प्रेस वाल्या मित्राने (त्याने मला तेथे नेले होते) सांगितले की साध्वीजी बीई कम्प्युटर आहेत. हा प्रकार पाहून हात जोडायचेच बाकी राह्यले फक्त.

श्रीगुरुजी's picture

5 Sep 2016 - 12:51 pm | श्रीगुरुजी

शरीराला वेदना देऊन, दिगंबरावस्थेत राहून, भिक्षा मागून, दिवे/कात्री/पादत्राणे इ. सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू चैनीच्या समजून त्या न वापरणे इ. मुळे परमार्थात प्रगती होण्यास व मोक्ष मिळण्यास कशी मदत होते हे समजून घेण्याची उत्सुकता आहे.

गामा पैलवान's picture

5 Sep 2016 - 12:48 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

>> माझा आक्षेप जैनमुनिंवर नव्हताच, तो होता त्यांना विधानसभेत बोलवणार्‍या महान लोकप्रतिनिधींबद्दल

आक्षेप पूर्णपणे मान्य. खरंतर मुनीश्रींना असं बोलावणं धाडणं मलाही खटकलं.

फक्त एक विनंती आहे. जो आक्षेप आहे तो कृपया स्वच्छ शब्दांत मांडावा. लेकी बोले सुने लागे असं नको. जैन धर्माला सत्याची लाज वाटते का वगैरे प्रश्न कृपया नकोत.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 2:24 pm | संदीप डांगे

तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी आहे. तिथे कोणताही धर्म-पंथ टाका, अर्थ बदलत नाही. धार्मिक कारणाने दुखावले जाणे हा एक वेगळाच प्रकार आहे. ती 'घेट्टो मेन्टॅलिटी' आहे. कोणताही धर्म हा मनुष्यास मुक्त करणारा प्रकार आहे. बांधले जाणे हे आचरण 'धर्म' ह्या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध आहे. सगळ्या धर्मसंस्थापकांचे संदेश बघितले तर त्यांनी मुक्त व्हायला सांगितले आहे. लोक अगदी उलट करतात. आपल्या विचारांशी साम्य ठेवणार्‍या लोकांचा संघ हा धर्माचरणासाठी उपयुक्त आहे. पण धर्माशी असलेल्या बांधिलकीपेक्षा अशा संघाशी होणारी मोठी बांधिलकी ही समस्येचे मूळ आहे. कितीही म्हटले तरी मनुष्याचा कळप करुन सुरक्षित राहण्याचा अंगभूत नैसर्गिक गुण सुटत नाही आणि महात्म्यांनी दिलेल्या संदेशाच्या अगदी उलट आचरण सुरु होते.

सर्व साधु, संत, महंत, योगी, सन्यासी, फकिर, अवधुत हे खरंतर मुक्त असतात. त्यांच्यावर विशिष्ट गटाने मालकी सांगणे हे त्यांच्या शिकवणुकीच्या उलट वागणे ठरते. ते मुक्त असल्याने, मान-अपमान इत्यादींच्या वर असल्याने अपमान हा त्यांचा होतच नाही. मग कोणाचा होतो? त्यांच्यावर मालकीहक्क सांगणार्‍या मनोवृत्तीचा. मालकीहक्क सोडा, अपमान झालेला वाटणार नाही.

जैनांना मुनिंचे नग्न असणे खुपते का? नाही. मग इतर कुणाच्याही कोणत्याही प्रतिक्रियेने त्रास का होतो हा मुद्दा आहे. धार्मिक भावना दुखावल्या जाणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यात जैनधर्मियांसारख्या मोजक्या शांतिप्रिय समाजानेही उतरावे हे आश्चर्यजनक आहे. अपमान करणार्‍याला 'इग्नोर मारणे' हा सर्वात मोठा उपाय आहे. अन्यथा मल्टिप्लिकेशन होत जातं.

समजूतींमधे विसंगती आली की दुखावले जाण्याचे चान्सेस वाढतात. तुम्ही मला वर एका प्रतिसादात विचारले की माझ्या जन्माचं रहस्य चारचौघात उघड करुन सांगितलं तर कसं वाटेल? त्यावर मी चिडलो नाही. कारण मला सत्याची लाज वाटत नाही. कारण असे केल्याने माझा किंवा माझ्या जन्मदात्यांचा नव्हे तर जाहिर उघड करणार्‍याचा अपमान होतो. संभोग करणे पाप आहे असे मी समजत असेल तर मी नक्कीच दु:खी होईल. "संभोग व त्यातून अपत्यप्राप्ती हे काही पाप आहे, चुकीचे आहे, वाईट आहे, गुन्हा आहे" असे कुठेतरी तुम्हाला वाटत असेल म्हणून तुम्हीही हेच उदाहरण दिले असावे.

कोणत्याही धर्मातल्या नग्न साधुंचे वर्तन मला अयोग्य वाटत नाही. ते सत्य आहे तसेच स्विकारले पाहिजे, ते कुणी नाकारत असेल तर त्याला लाज वाटते का हा प्रश्न येईलच.

माझे मूळ विधान हे डबलस्टॅण्डर्ड ठेवणार्‍या लोकनिर्वाचित नेत्यांसाठी होते. त्यात जैन समाजाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नक्कीच नव्हता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Sep 2016 - 9:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

डांगे बुआ, हा प्रतिसाद आपल्या हातून कोणीतरी लिहून घेतला आहे! उत्तम पटलेला आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Sep 2016 - 10:51 pm | अनिरुद्ध.वैद्य

सहमत. खासकरून, समजूतींमधे विसंगती आली की दुखावले जाण्याचे चान्सेस वाढतात.

आजकाल धार्मिक अस्मिता प्रचंड टोकदार होत चालल्यात. त्यामुळे कोण केव्हा कुठ कसा दुखावेल काहीच सांगता येत नाही.

बॅटमॅन's picture

6 Sep 2016 - 8:12 am | बॅटमॅन

एक नंबर मस्त प्रतिसाद डांगेसरकार.

मास्टरमाईन्ड's picture

6 Sep 2016 - 11:58 am | मास्टरमाईन्ड

ती 'घेट्टो मेन्टॅलिटी' आहे.

+११११

धार्मिक भावना दुखावल्या जाणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे.

+११११

कारण असे केल्याने माझा किंवा माझ्या जन्मदात्यांचा नव्हे तर जाहिर उघड करणार्‍याचा अपमान होतो.

पटलं

भम्पक's picture

11 Sep 2016 - 7:55 pm | भम्पक

एकदमच मुद्देसूद आणि समर्पक प्रतिसाद ......जिओ संदिपशेठ ....

चित्रगुप्त's picture

5 Sep 2016 - 4:36 pm | चित्रगुप्त

संदीप डांगे यांचा दुखावले जाणे वगैरेबद्दलचा समंजस प्रतिसाद या सर्व लोच्यावर नेमके बोट ठेवणारा आहे. त्याचेशी १००% सहमत.

कपिलमुनी's picture

5 Sep 2016 - 5:52 pm | कपिलमुनी

लेखकाने घेतलेला अ‍ॅप्रोच चुकीचा वाटतो आहे , त्या ऐवजी त्यांनी जैन धर्माच्या स्थापने पासून आतापर्यंतची स्थित्यंतरे , प्रथा , परंपरा अशी लेखमाला लिहिली असती तर या समाजाबद्दल अधिक माहिती मिळाली असती ( काहीतरी कंस्ट्रक्टीव लिहायला हवे होते )

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 5:58 pm | संदीप डांगे

हेच म्हणतो,

अभिजीत अवलिया's picture

5 Sep 2016 - 6:01 pm | अभिजीत अवलिया

सहमत. हे ऊठसूट काही झालं की लोक 'आमच्या भावना दुखावल्या' अशी जी ओरड मारतात त्याचा अक्षरश: वैताग आलेला आहे.

मोदक's picture

5 Sep 2016 - 6:22 pm | मोदक

अशी जी ओरड मारतात

असुद्द भाश्येमुले माज्या भाव्ना दुखाव्ल्या अहेत

नाखु's picture

6 Sep 2016 - 9:30 am | नाखु

(भावनाप्रधान) लोकांसाठी मिपा एक फिरता "दवाखाना" सुरू करणार आहेत तो पर्यंत कळ काढा (आम्ची सोडून कुणाचीही)

अखिल मिपा साधक-बाधक चर्चा महाम्डळाकडून गणपती बाप्पा चरणी विनवणी.

शलभ's picture

5 Sep 2016 - 6:49 pm | शलभ

हजार वेळा सहमत..

अकिलिज's picture

5 Sep 2016 - 9:06 pm | अकिलिज

एखादा लेख कसा लिहावा, सुरुवात कशी करावी आणि कुठून वाचकाला वाहवत न्यावे आणि आपल्याला नक्की काय सांगायचे आहे ते दुसर्‍याच्या गळी कसे उतरावे यावर लेख लिहायला पाहीजे.

मला कळतंय की जैन धर्माच्या काही चार गोष्टी तुम्हाला सांगयच्या आहेत. पण उगीचच चार प्रश्न विचारून वाचकाला जिज्ञासा उत्पन्न होईल ही जरा अती अपेक्षा झाली.

झेन's picture

5 Sep 2016 - 10:17 pm | झेन

"अपमान करणार्‍याला 'इग्नोर मारणे' हा सर्वात मोठा उपाय आहे. अन्यथा मल्टिप्लिकेशन होत जातं"
हे थेराँटीकली ओके वाटतं पण प्रत्यक्षात... ?
असो नव्याने प्रयत्न करून बघेन म्हणतो.

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 12:28 am | संदीप डांगे

उपदेश करणे सोप्प, आचरण महाकठिण. पण आपल्या अपमानाचा-रागाचा-दुखावल्या जाण्याचा ट्रिगर कोणा दुसर्‍याच्या हातात असणे हे जास्त भयावह आहे. प्रयत्न करुन पाहण्याची तयारी दाखवणे ही सुद्धा एक उत्तम सुरुवात आहे. आपण साधी माणसं आहोत, रागावणे-दुखावल्या जाणे साहजिक आहे, त्यावर उपाय केला गेला पाहिजे, फक्त तो वर कपिलमुनि यांनी म्हटल्याप्रमाणे कन्स्ट्रक्टिव असावा, डिस्ट्रक्टिव नको.

गामा पैलवान's picture

6 Sep 2016 - 3:37 am | गामा पैलवान

संदीप डांगे,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. काही प्रश्न उभे राहिले.

१.
>> तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी आहे. तिथे कोणताही धर्म-पंथ टाका, अर्थ बदलत नाही. धार्मिक कारणाने दुखावले जाणे
>> हा एक वेगळाच प्रकार आहे. ती 'घेट्टो मेन्टॅलिटी' आहे.

खालच्या चित्रात विधानसभेचा काहीही अपमान झालेला दिसंत नाही. उलट मुनीश्रींच्या भाषणाची अॅब्सर्ड आणि नॉनसेन्स म्हणून हेटाळणी करण्यात आली आहे.

http://images.indianexpress.com/2016/08/vishal-tweet_759.jpg

तरीपण तुम्ही विधानसभेचा आणि घटनेचा अपमान झाला म्हणून ओरडा करता आहात. तुमच्यांत आणि घेट्टोवाल्यांत फरक तो काय उरला मग?

२.
>> कोणताही धर्म हा मनुष्यास मुक्त करणारा प्रकार आहे. बांधले जाणे हे आचरण 'धर्म' ह्या संकल्पनेच्या
>> अगदी विरुद्ध आहे.

कोण्या बावळटानं हे सांगितलं तुम्हाला? उलट धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम आहे. कर्तव्ये कशी पार पाडावीत याची चिकित्सा म्हणजे धर्म. जिवंतपणी देह धारण केलेला असतांना जरी सायुज्य मुक्ती मिळाली तरी देहबंधन असतंच.

३.
>> सगळ्या धर्मसंस्थापकांचे संदेश बघितले तर त्यांनी मुक्त व्हायला सांगितले आहे.

जरा उदाहरण देणार का? मुक्ती वा मोक्ष देणं ईश्वराचे हाती आहे. मुक्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजे मुक्त होणे नव्हे.

४.
>> कितीही म्हटले तरी मनुष्याचा कळप करुन सुरक्षित राहण्याचा अंगभूत नैसर्गिक गुण सुटत नाही आणि
>> महात्म्यांनी दिलेल्या संदेशाच्या अगदी उलट आचरण सुरु होते.

प्रस्तुत प्रसंगात असं काही दिसून येत नाही.

५.
>> सर्व साधु, संत, महंत, योगी, सन्यासी, फकिर, अवधुत हे खरंतर मुक्त असतात.
>> त्यांच्यावर विशिष्ट गटाने मालकी सांगणे हे त्यांच्या शिकवणुकीच्या उलट वागणे ठरते.

दोन वाक्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. वाट्टेल ते ठोकून देताय होय? शिवाय प्रस्तुत प्रसंगात असं काहीही झालेलं नाहीये ते वेगळंच!

६.
>> मालकीहक्क सोडा, अपमान झालेला वाटणार नाही.

उपरिनिर्दिष्ट चित्रात दाखवलेले absurd nonsense हे शब्द मुनीश्रींचा अपमान सोडून दुसरं काय दर्शवतात?

७.
>> मग इतर कुणाच्याही कोणत्याही प्रतिक्रियेने त्रास का होतो हा मुद्दा आहे.

भारतीय राज्यघटनेचा अपमान झाला म्हणून तुम्ही नाय का थयथयाट केलात? कोणी केला होता घटनेचा अपमान? मुनीश्रींनी? की खट्टरांनी? आणि त्यामुळे तुम्हाला कसाकाय त्रास होत होता?

स्वत:च्या पायाखाली काय जळतंय ते कधी दिसणार तुम्हाला !

८.
>> धार्मिक भावना दुखावल्या जाणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यात जैनधर्मियांसारख्या मोजक्या
>> शांतिप्रिय समाजानेही उतरावे हे आश्चर्यजनक आहे.

घटनेचा अपमान झाल्याची हाकाटी करणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यात संदीप डांग्यांसारख्या मोजक्या विवेकप्रिय मनुष्यानेही उतरावे हे आश्चर्यजनक आहे.

९.
>> अपमान करणार्‍याला 'इग्नोर मारणे' हा सर्वात मोठा उपाय आहे.

माझ्या मते आजिबात नाही. अर्थात तुमचं मत बाळगण्याची तुम्हाला पूर्ण मुभा आहे.

१०.
>> तुम्ही मला वर एका प्रतिसादात विचारले की माझ्या जन्माचं रहस्य चारचौघात उघड करुन सांगितलं तर
>> कसं वाटेल? त्यावर मी चिडलो नाही. कारण मला सत्याची लाज वाटत नाही.

नेमकी हीच परिस्थिती आम्हा हिंदुत्ववाद्यांना बदलायची आहे. विनाकारण आईबाप काढले की चिडायचं असतं. आणि साधूंची नग्नता विनाकारण काढली की देखील चिडायचं असतं.

अर्थात, तुम्हाला तुमचा थंडपणा बाळगण्याचा पूर्ण अधिकार आहे.

११.
>> "संभोग व त्यातून अपत्यप्राप्ती हे काही पाप आहे, चुकीचे आहे, वाईट आहे, गुन्हा आहे" असे कुठेतरी तुम्हाला
>> वाटत असेल म्हणून तुम्हीही हेच उदाहरण दिले असावे.

छे छे ! काहीतरीच काय !! अहो, तुमच्यासारखा दिव्य जीव पैदा होण्यामागची कथा किती विलक्षण असेल, हाच विचार माझ्या मनी होता.

१२.
>> माझे मूळ विधान हे डबलस्टॅण्डर्ड ठेवणार्‍या लोकनिर्वाचित नेत्यांसाठी होते. त्यात जैन समाजाचा अपमान
>> करण्याचा कोणताही हेतू नक्कीच नव्हता.

हे विधानाच्या ठिकाणीच स्पष्ट व्हायला हवं. अन्यथा तुमचे प्रतिसाद आणि स्वगत एकमेकांत गुंतत गेलेले वाटू शकतात. मग हे विधान याच्यासाठी अन ते विधान त्याच्यासाठी अशी मांडणी ( की बतावणी? ) करंत बसावं लागतं.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 9:15 am | संदीप डांगे

गा मा साहेब, तुम्हाला फ्रेंच कार्टुनिस्ट ची हत्या आणि काही महिन्यांपूर्वी महंमद पैगंबरचा अपमान केल्याबद्दल एका हिंदू नेत्याची फाशीची मागणी करणारा लाखोंचा समुदाय ह्या दोन्ही घटना मान्य व उचित असल्याचे तुमच्या प्रतिसादावरून लक्षात येते,

बाकी विशाल दादलानी काय बोलला त्याचे बिल माझ्यावर फाडू नका,

माझे विचार मांडून झाले, ह्यापेक्षा अधिक चर्चेत फार काही तथ्य नाही, तुमचे विचार तुम्ही बाळगा, माझे माझ्यापाशी,

धन्यवाद!

गामा पैलवान's picture

6 Sep 2016 - 5:34 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

१.
>> तुम्हाला फ्रेंच कार्टुनिस्ट ची हत्या आणि काही महिन्यांपूर्वी महंमद पैगंबरचा अपमान केल्याबद्दल एका हिंदू
>> नेत्याची फाशीची मागणी करणारा लाखोंचा समुदाय ह्या दोन्ही घटना मान्य व उचित असल्याचे तुमच्या
>> प्रतिसादावरून लक्षात येते,

विषयांतर.

एवीतेवी तुम्ही विषयांतराची गाय मारलीच आहे, तर मी आता वासरू मारून घेतो. तुम्ही भारतीय राज्यघटनेचा अपमान झाल्याचे ढोल बडवता आहात. ठीके. बडवा खुशाल. पण एके ठिकाणी तुम्ही भारतीय राज्यघटनेत नसलेली तरतूद घुसडली होतीत. कलमं १६ (४) आणि २९ (२) आठवताहेत का? तो राज्यघटनेचा अवमान म्हणून धरायचा का हो?

तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?

२.
>> बाकी विशाल दादलानी काय बोलला त्याचे बिल माझ्यावर फाडू नका,

जैन धर्माला सत्याची लाज वाटते का वगैरे अक्कल युष्मादिक कोणास शिकवीत होते?

३.
>> माझे विचार मांडून झाले, ह्यापेक्षा अधिक चर्चेत फार काही तथ्य नाही, तुमचे विचार तुम्ही बाळगा,
>> माझे माझ्यापाशी,

बरोबर आहे. तुमचे विचार तुम्हाला लागू केल्यावर तुमचा चर्चेतला रस संपुष्टात आला. चालायचंच!

आ.न.,
-गा.पै.

गणामास्तर's picture

6 Sep 2016 - 11:07 am | गणामास्तर

वर काही प्रतिसादात उल्लेख आल्याप्रमाणे हिंदू-मारवाडी कधी बघण्यात आलेले नाहीत.
माझे काही मित्र आहेत ते धर्म जैन आणि जात मारवाडी लावतात. ते स्वतःला हिंदू म्हणवत नाहीत.
उद्योग धंद्यात बराचं पुढारलेला समाज आहे हा.
तसेचं कोल्हापूर जिल्ह्या च्या आसपासचे बरेचं जैन लोकं धर्म हिंदू आणि जात जैन लावतात.
ते दिगंबर जैन म्हणवतात स्वतःला. पाटील ,चौगुले, खोत अशी आडनावं आहेत त्यांची.
लहानपणापासून जैन-मारवाडी (स्थानकवासी) बहुल भागात राहिल्यामुळे दीक्षा समारंभ, भिक्षा मागण्याच्या पद्धती हे प्रकार जवळून बघितले आहेत. भरीस भर म्हणून शालेय शिक्षण सुद्धा जैन विद्या प्रसारक मंडळाच्या मराठी माध्यम शाळेतून झाल्यामुळे जैन-मारवाडी लोकांशी संपर्क पहिल्यापासून आला आणि त्यांच्या बऱ्याचं प्रथा अगदी जवळून पाहायला मिळाल्या.

सचु कुळकर्णी's picture

6 Sep 2016 - 12:51 pm | सचु कुळकर्णी

"छे छे ! काहीतरीच काय !! अहो, तुमच्यासारखा दिव्य जीव पैदा होण्यामागची कथा किती विलक्षण असेल, हाच विचार माझ्या मनी होता" it is irrelevant and not required at all.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Sep 2016 - 12:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

नका लोड घेऊ! त्यांच्यावर काहीही आक्षेप घेतले तरी ते त्यांना मंजूर असतात कारण ते हिंदुहिताचे असतात! ;)

गामा पैलवान's picture

6 Sep 2016 - 4:57 pm | गामा पैलवान

सचु कुळकर्णी,

अगदी बरोबर बोललात पहा. वाद उद्भवल्यावर काही लोकांनी (मिपाकर नव्हे) जैन साधूंचा 'नागडे' म्हणून उपहास केला आहे. जो अनावश्यक आहे. नेमकी हीच खंत निओ१ (=धागालेखक) यांनी व्यक्त केली आहे. यावर आपले डांगेबुवा बोधामृत पाजताहेत की जैन धर्माला सत्याची लाज वाटते का! डांगेबुवांचं तर्कट लावू पाहता, जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडायला काहीच हरकत नसावी, नाहीका?

जो न्याय मला लावाल तोच संदीप डांग्यांनाही लावावा एव्हढीच विनंती. :-)

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 5:35 pm | संदीप डांगे

जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडायला काहीच हरकत नसावी, नाहीका?

>> अहो मांडा की मग, मी नाही म्हटलंय का? सत्याची लाज बाळगू नयेच. ;)

कपिलमुनी's picture

6 Sep 2016 - 1:01 pm | कपिलमुनी

सदर मुनींचा आणि आमच्या आयडीचा काहीही संबंध नाही.
आमची कोठेही शाखा नाही : कपिलमुनी

सचु कुळकर्णी's picture

6 Sep 2016 - 1:34 pm | सचु कुळकर्णी

Aa. Na. GA. Pai. Every human being come to this world thru the same natural process. Nobody exist here because of his or her parents consume "payas"

श्रीगुरुजी's picture

6 Sep 2016 - 2:11 pm | श्रीगुरुजी

जैनांबद्दल अजून एक वाचलेले आढळले. हे फक्त जैन साधूंसाठी आहे का सर्व जैनांसाठी आहे हे माहित नाही.

जैन तत्वज्ञानानुसार एखादा पुरूष एखाद्या स्थानी बसला असेल तर त्याचे गुणदोष त्या जागेला चिकटतात व तो तिथून उठल्यानंतर सुद्धा पुढील १४४ मिनिटे ते गुणदोष त्या स्थानावर असतात. त्यामुळे एखादा पुरूष एखाद्या स्थानावर काही काळ बसून तिथून उठला तर पुढील १४४ मिनिटे त्या स्थानावर बसू नये. अन्यथा त्याचे गुणदोष आपल्यात यायची शक्यता असते. पुरूषाच्या ऐवजी एखादी स्त्री एखाद्या स्थानावर बसली असेल तर तिचे गुणदोष त्या स्थानावर एक त्रूतीयांश काळ म्हणजेच फक्त ४८ मिनिटे त्या स्थानावर असतात. त्यामुळे तिथून स्त्री उठल्यावर ४८ मिनिटे त्या ठिकाणी बसू नये.

पुण्यात अनेक ठिकाणी आदिनाथ, पार्श्वनाथ, सुपार्श्वनाथ, नेमीनाथ, नवकार अशी नावे असलेल्या सोसायट्या आहेत. या सोसायट्यात फक्त जैन कुटुंबेच राहतात. जैन नसलेल्यांना या सोसायटीतील घरे/सदनिका विकल्या जात नाहीत किंवा भाड्यानेही दिल्या जात नाहीत. जैनांनी अनेक ठिकाणी स्वतःचे असे घेटो तयार केले आहेत. असे करणे चांगले की वाईट हा एक वेगळा मुद्दा आहे.

दिगंबर राहिल्याने मोक्ष मिळण्यास व पारमार्थिक प्रगती होण्यास कशी मदत होते या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाही. धागाकर्ता बहुतेक बेपत्ता झाले आहेत. धागाकर्त्यापेक्षा इतरांनीच जैनांविषयी जास्त माहिती दिली आहे.

रॉजरमूर's picture

16 Oct 2016 - 7:50 pm | रॉजरमूर

कारवाई होत नाही का ह्या लोकांवर ?

पुण्यात अनेक ठिकाणी आदिनाथ, पार्श्वनाथ, सुपार्श्वनाथ, नेमीनाथ, नवकार अशी नावे असलेल्या सोसायट्या आहेत. या सोसायट्यात फक्त जैन कुटुंबेच राहतात. जैन नसलेल्यांना या सोसायटीतील घरे/सदनिका विकल्या जात नाहीत किंवा भाड्यानेही दिल्या जात नाहीत.

इथे मुंबईत पश्चिम उपनगरात तर मुस्लिम लोकांना घर विकत अथवा भाड्याने देता येणार नाही असा ठराव सोसायटीने पास केला तर सोसायटीच्या सगळ्या लोकांना
तुरुंगात टाकलं . ही ती बातमी
काँग्रेस तर काँग्रेस पण भाजप सुद्धा अल्प संख्यांकांचे तुष्टीकरण करतंय असं नाही वाटत ?
आजाद मैदानात जेव्हा या लोकांकडून कुत्र्या सारखे बडवले गेले तेव्हा कुठे गेली होती मर्दुमकी ?
इथे मात्र शांतताप्रिय नागरिकांना अटक करायला निर्लज्जासारखे धावून गेले .
या घटनेतही आग लावायला शेटजींचे वृत्तपत्र पुढे होते.
स्वतःच्या बुडाखालचा अंधार दिसला नाही कधी .......

श्रीगुरुजी's picture

16 Oct 2016 - 8:02 pm | श्रीगुरुजी

इथे मुंबईत पश्चिम उपनगरात तर मुस्लिम लोकांना घर विकत अथवा भाड्याने देता येणार नाही असा ठराव सोसायटीने पास केला तर सोसायटीच्या सगळ्या लोकांना तुरुंगात टाकलं .

सोसायटीने मूर्खासारखे ऑन पेपर ठराव केला ज्याचा तुरूंगात टाकण्यासाठी उपयोग झाला. जैनांच्या सोसायट्यामध्ये इतरांना घरे द्यायची असे तोंडी अंडरस्टँडिंग असते. कागदोपत्री कोठेही अशी बंदी घातलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे शक्य नाही.

सतीश कुडतरकर's picture

6 Sep 2016 - 3:23 pm | सतीश कुडतरकर

Borivli purvela maajhi ek office maitrin rahate. Tichya building madhye kahi Jain Saadhu/ Saadhvi rahayala aahet.

Te jain sadhu Kagdavar shuachas basatat aani to kagad DUSTBIN madhyech taktat. Society ne yavar akshep ghetlyavar jorache bhandan kele. Aapla mal dusryas uchalnyas bhaag paadne hi suddha ahinsa naahi ka?

Tyanantar tya jain sadhu ni veglich shakkal kaahdli. Kagdavarach shauchala bastat aani to kagad building chya baher neun taktat.

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 3:26 pm | संदीप डांगे

रोचक आहे! जैन। मित्र ह्याबद्दल अधिक माहिती देतील अशी आशा बाळगूया!

रिम झिम's picture

6 Sep 2016 - 4:32 pm | रिम झिम

जैन साधू बिल्डींग मध्ये राहतात? माझ्या माहितीनुसार त्यांची मंदिरात राहण्याची सोय असते.
नविन प्रथा पडली असल्यास माहिती नाही.
पण असो.....

उद्या जैन साधू गाडीतून फिरतात पण टोल भरत नाहीत असे ऐकल्यास आश्चर्य वाटणार नाही.

सतीश कुडतरकर's picture

6 Sep 2016 - 4:58 pm | सतीश कुडतरकर

अहो, खरंच सांगतोय! बोरिवली, कार्टर रोड वरील सोसायटीतील घटना आहे. एका भक्तानेच आपल्या घरात त्या साधूना राहण्याची व्यवस्था केली आहे.
एका जैन मित्राला विचारलं तर तो म्हणतो आधुनिक गोष्टी वापरण्यास अर्धेअधिक लोक काकू करतात.

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 5:02 pm | संदीप डांगे

अ‍ॅक्चुअली हाच प्रश्न मलाही पडला होता, कारण जैन साधु एका ठिकाणी फार काळ वास्तव्य करत नाहीत, सतत फिरतीवर असतात, मंदिरात राहतात, फक्त पावसाळ्याचे चार महिने काय तर एका ठिकाणी वास्तव्य असतं. त्यामुळे हे काही नवीनच ऐकले म्हणून कन्फर्म करावे असे बोललो.

तसेच हे कागद वापरण्याची प्रथाही प्रथमच ऐकली. सतीशजी खोटं बोलत आहेत असे म्हणत नाही पण काहीतरी गोंधळ झाला असावा अशी शंका आहे.

सतीश कुडतरकर's picture

6 Sep 2016 - 5:23 pm | सतीश कुडतरकर

फक्त पावसाळ्याचे चार महिने काय तर एका ठिकाणी वास्तव्य असतं.>>>>>> gelya mahinyatlich ghatnaa.

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 5:38 pm | संदीप डांगे

ओके, पण ते वास्तव्य मंदिरात असतं नॉर्मली. हे काही नवीनच ऐकले. असूही शकेल,
बाहेर प्रचलित असलेली माहिती आणि खास आतलं सत्य काहीवेळा वेगवेगळं असतं.