याचे दुष्परिणाम किती खोल असतील??

अर्धवटराव's picture
अर्धवटराव in काथ्याकूट
25 Aug 2016 - 12:00 am
गाभा: 

पाणबुड्या पाण्याच्या वर आल्या

हि बातमी वाचली. अत्यंत सेन्सेटीव्ह माहितीवर डल्ला मारला गेला आहे.
१) आमरामाचे आधुनिकीकरण, शक्तीवर्धनाला जबर धक्का लागला आहे
२) भारताचे भविष्याकालीन समुद्री प्रभावाधारीत राजकरणाला धोका पोचला आहे
३) आता नवे शस्त्रनिर्माते शोधायचे म्हटले तर परत काळाचा अपव्यय
४) मोठ्या डील करणं वेळखाऊ काम असतं. आणि त्यात अशी माहिती फुटली तर क्षणात होत्याचं नव्हतं होतं काय? कि डॅमेज कंट्रोल करता येतो?
५) हि माहिती फोडण्याचं कारण काय असावं ? केवळ शत्रुला माहिती पुरवली असती तर भारताचं जास्त नुकसान झालं असतं ?
६) भारताचा आरमार प्रॉग्राम काहि काळापुरता तरी ठप्प व्हावा म्हणुन हि चाल असावी?
७) इतक्यात बरच काहि होतय. काश्मीरची घग, बलुच प्रकरण वगैरे. कुठेतरी लिंक असावी? नुकतच लोकसत्ताने एक 'कॉन्स्परसी थेअरी' छापली होती... २०१९च्या संभाव्य युद्धाच्या नांदीची. सगळ्या इंट्ररेस्टेड पार्टी आपापली तयारी करण्यात गुंतल्या आहेत म्हणे. कोण जाणे.
८) याविषयी खरच कोणि जाणकार असणार नाहि, असले तरी ते मिपावर कितपत अवतरेल शंकाच आहे. तरि सुद्धा... एक गंभीर विषय म्हणुन काथ्याकुटायला घेतला आहे.

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

25 Aug 2016 - 4:05 am | मराठमोळा

हम्म्म्म्म..
प्रश्न अवघड आहेत खरे.. आणि नुकसान देखील फार मोठे आणि दीर्घकाळ परिणाम करणारे आहे. पण ईथे चर्चा करुन काय साध्य होईल माहित नाही. बर्‍याचदा हॅकिंग करणारे कुणा देशा किंवा संस्थेसाठीच काम करतात असे नाही. गंमत/खेळ म्हणून पण हे केले जाते आणि त्याच प्रकारात माहिती सार्वजनिक रित्या ईंटरनेटवर पसरवली जाते. कॉम्स्पिरेसी बद्दल माहित नाही पण खरे युद्ध हे तंत्रज्ञान्/सायबर सिक्युरिटीचे आहे आणि ते आधीच सुरु झाले आहे असे माझे मत. त्यात शत्रूंना खरी मात देण्याची गरज आहे. सरकारी संस्थांचा अनागोंदी कारभार बघता भारताची त्यात लढण्याची क्षमता किती हे पहायला हवे. दरवर्षी चीन आणि पाकिस्तानी हॅकर्स हजारो भारतीय सरकारी संस्थळे हॅक करतात. त्यातली किती आपल्याला माहित पडतात हा भाग निराळा पण धोका फारच मोठा आहे हे नक्की. :(

अवांतरः सर्वांनाच ईंटरनेट वापरण्यातले धोके समजावून सांगायला हवेत. वैयक्तीक माहिती आजकाल ईतक्या सहजपणे लोक सार्वजनिक संस्थळांवर टाकत फिरत असतात की हॅकिंगची गरजच उरत नाही. तरूण पिढीला जागरूक करण्याची फार मोठी गरज आहे.

मुद्दामहुन चुकीची माहीती फोडली असेल अशी आशा करतो.

नितिन थत्ते's picture

25 Aug 2016 - 9:05 pm | नितिन थत्ते

पाणबुडीचे उत्पादक ग्राहकांना (खरेदीपूर्र्वी) काही ब्रोशर्स देत असतील ना? फीचर्स/युएसपी वगैरे.

तशा टाइपची माहिती तर पब्लिक असेल.

अर्धवटराव's picture

26 Aug 2016 - 12:23 am | अर्धवटराव

पाणबुडी वा इतर कुठल्याही सामुग्रीचे साधारण फिचर्स ओपन असतील. पण अशा उपकरणांत ग्राहकाला कस्टमाझेशन करायाच्या खुप प्रोव्हिजन्स असतील. ग्राहकाने मान्य केलेली कस्टमायझेशन्स जर लीक झाली तर बोंब.

अमितदादा's picture

25 Aug 2016 - 9:38 pm | अमितदादा

जे होतंय ते नक्कीच धक्कादायक आहे. अजून पूर्ण picture क्लिअर नाही आहे. आज रात्री आणखी काही कागदपत्रे उघड होणार आहेत. ह्या प्रकरण बाबतीत भारतीय मीडिया वेगळं सांगत आहे आणि "The Australian" हे वृत्तपत्र ज्यांनी हि माहिती उघड केली ते वेगळं सांगत आहेत. हे वृत्तपत्र ठाम पणे अस बोलताय कि भारतीय scorpene पाणबुडी च्या combat स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत, हे भारतीय सरकार अजून मान्य करत आहे. पुढील तीन चार दिवसात भारतीय विश्लेषक काय म्हणतायत हे बगायला हवं. अजून चार दिवसात सगळं picture क्लिअर होईल.

http://www.theaustralian.com.au/national-affairs/defence/our-french-subm...

पैसा's picture

25 Aug 2016 - 10:20 pm | पैसा

एकॉनॉमिक वॉर म्हणत कंपनी हात झटकत आहे का? भारताचे जे स्ट्रॅटेजिक नुकसान होईल त्याची नुकसान भरपाई कोण कशी करणार?

या प्रकाराने राफेल प्रकरणाला उशीर होऊ शकतो किवा ते दुसर्या कोणाला तरी दिले जाऊ शकते.

हल्ली क्लासेसची पॅमप्लेट वाटतात रस्त्यावर तसे सर्व सं सामग्रीचे वाटावे.काय दहशत बसायची ती एकदाच बसेल.नाहीतरी अमुक अस्त्राचा इतका पल्ला इतकं वजनक्षमता हे प्रसारित करतातच ना?आणखी काय बाकी राहिलं?