ह्या बोल्ट आणि फेल्प्स चे करायचे तरी काय?

इल्यूमिनाटस's picture
इल्यूमिनाटस in काथ्याकूट
20 Aug 2016 - 10:47 am
गाभा: 

.
असा प्रश्न बोल्ट आणि फेल्प्स च्या सहखेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना पडत असेल. कारण कितीही आणि काहीही झालं तरी पदक हे हीच माणसं घेऊन जाणार असं सगळ्यांनीच गृहीत धरलेलं असतं. आता ह्या दोघांना माणसं म्हणावं कि नाही हाच मुळी प्रश्न! मानवीय बंधनांच्या पाशातून मुक्त झालेले महामानावच ते!
उसेन बोल्ट. या माणसाचं पळणं बघून, हा "माणूस" उलटा जरी पळाला तरी आरामात जिंकेल अशी माझी ठाम समजूत झालेली आहे!. आपल्या मिल्खा सिंगने म्हणे कुठल्या तरी ऑलिम्पिक मध्ये पळताना, मागे वळून पाहिलं आणि तो हरला. हारायचाच तो! कितीही झालं , तरी तो सामान्य मनुष्य. तो तरी त्याला काय करणार!?
पण बोल्ट या अवलिया ची बातच निराळी! हा पळताना डावीकडे पाहतो , उजवीकडे पाहून कॅमेऱ्याला पोझ देतो, ( झालच तर तो गोलंही फिरला असता, पण कशाला उगी रिस्क घ्या?!) असलं करण्याने याला काही फरक पडत नाही, आणि कामगिरी वर तर नाहीच नाही. तो आरामात दोन तीन हातभार अंतर ठेवून जिंकतो!
जी गोष्ट बोल्ट ची तीच फेल्प्स ची. तो ही सामान्य माणसाच्या यादीत घालताना शंका येईल असाच. आता सामान्य माणसं उगीच हा का आणि कसा जिंकला याचं विश्लेषण वगैरे करून वेळ वाया घालवतात.अहो महामानव ते! जिंकायचेच!
आता ह्या दोघांसोबत खेळणाऱ्या खेळाडुंबद्दल माझ्या दोन प्रकारच्या भावना आहेत. एक म्हणजे मला त्यांच्या आशावादाबद्दल फार कौतुक वाटतं. आणि दुसरी म्हणजे मला त्यांची फार दया येते. कौतुक आणि दयेसाठी कारण मात्र एकच आहे. आपल्यासोबत बोल्ट आणि फेल्प्स खेळणार आहेत हे माहित असून सुद्धा चार वर्षं प्रचंड मेहनत करायची हे काय साधं काम आहे!? एखादा कचखाऊ माणसाने ह्यांची नावं ऐकूनच नांगी टाकली असती. म्हणून त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच! पण एवढी मेहनत घेऊन ,कष्ट घेऊन त्या ऑलिम्पिक मध्ये जा आणि समोर हे महामानव सिंकदर च्या धैर्याने उभे! सिंकंदरच ना ओ तो? सगळं जग वगैरे जिंकलेला?! आता ह्या बाकीच्या सामान्य खेळाडूंना त्यांच्या भावना विचारल्या कि ते म्हणतात आमचं भाग्य थोर की आम्हाला या महामानवांसोबत खेळता आलं! मला मात्र हे मत अत्यन्त अप्रामाणिक वाटतं. बोल्ट आणि फेल्प्स च्या काळात जन्माला आलेले दुर्भागीच ते!
पण आता मात्र हा प्रश्न सुटणार आहे! कारण ह्या अवलियांनी रिटायरमेंट जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता बाकीच्या सामान्य खेळाडूंना "सुवर्ण" संधीच आहे असे म्हणावे लागेल. फक्त हे खेळाडू एवढीच अपेक्षा करत असतील कि ह्या महामानावांचा आफ्रिदी होऊ नये!( कितीही वेळा निवृत्ती जाहीर केली तरी आफ्रिदी पुढच्या सामन्यात दिसतोच)
असो , बोल्ट आणि फेल्प्स सारख्या खेळाडूंच्या खेळाचे आपल्याला साक्षीदार होता आले हेच आपले भाग्य!

प्रतिक्रिया

पुंबा's picture

20 Aug 2016 - 11:09 am | पुंबा

आवडलं.. बाकी फेल्प्स आणि बोल्ट दोघेही जी मेहनत करतात त्याला खरंच तोड नाही.

संजय पाटिल's picture

20 Aug 2016 - 11:18 am | संजय पाटिल

ह्या बोल्ट आणि फेल्प्स चे करायचे तरी काय?....
अभिनंदन!! दुसरं काय?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

20 Aug 2016 - 11:29 am | खालीमुंडी पाताळधुंडी

होम हवन,दुग्धाभिषेक करावे,
सेल्फ्या काढाव्यात,

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Aug 2016 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

ह्या बोल्ट आणि फेल्प्स चे करायचे तरी काय?

त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या खेळात त्यांनाच पराभूत करू दाखवावे !

फेल्प्स आणि बोल्ट हे आपापल्या क्षेत्रात अचाट प्रतीचे अतुलनीय खेळाडू आहेत यात संशय नाही ! त्यांनी डझनांने केलेल्या विक्रमांना तोड नाही. या जोडगोळीचे अनेक विक्रम अनेक दशके अबाधित राहतील यातही संशय नाही.

पण म्हणून इतर खेळाडूंच्या त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या मानसिकतेला कमी लेखण्याचे किंवा तिची कीव करण्याचे काम नाही. एखादा अननुभवी, अज्ञात डेविड केव्हा येईल आणि गोलियाथला केव्हा झोपवेल हे सांगता येत नाही. सिंगापूरच्या जोसेफ स्कूलिंगने नुकतेच रिओ२०१६ मध्ये हे सिद्ध केले आहे...

Meet Joseph Schooling, the man who beat Michael Phelps

Joseph Schooling did not seem to believe what he’d just done Friday night— winning gold in the 100-meter butterfly in Olympic-record time and doing it against the man who inspired him to swim so fast in the first place.

इल्यूमिनाटस's picture

20 Aug 2016 - 12:32 pm | इल्यूमिनाटस

इतर खेळाडूंच्या मानसिकतेला कमी लेखण्याचें काम अजिबात नाही! उपरोधीकतेने बोल्ट आणि फेल्प्स च्या मेहनतीचे आणि त्यातून मिळालेल्या यशाचे वर्णन करण्याचा प्रयत्न!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Aug 2016 - 12:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा प्रतिसाद व्यक्तीगत तुम्हाला नव्हता, साहेब !

माणसाच्या ध्येयवेडाला गवसणी घालणे शक्य नाही इतकेच म्हणणे मी मांडले आहे. याचमुळे, "माणूस १० सेकंदांच्या आत १०० मीटर पार करू शकेल काय ?" असा ज्वलंत प्रश्न नव्वदीच्या दशकात विचारला जात होता, हे आज आपण पार विसरून गेलो आहे... कारण ते डझनापेक्षा जास्त धावपटूंनी साध्य केले आहे.

बाकी, त्या दोन बापमाणसांची प्रथम स्तुती करून मगच इतर काय ते लिहीले आहे. त्यामुळे "ही दोन माणसे कहर आहेत" या म्हणण्याशी १००% सहमत आहेच :)

इल्यूमिनाटस's picture

20 Aug 2016 - 1:01 pm | इल्यूमिनाटस

:)

ह्या बोल्ट आणि फेल्प्स चे करायचे तरी काय?

कि ड नॅ प.........

लेख भारीच आहे...पण आफ्रीदीचं नाव वाचून किडा वळवळला...

जरा बघा. इंटरेस्टींग वाटेल आपल्याला-

http://time.com/4452285/rio-2016-olympics-michael-phelps-retirement/

इल्यूमिनाटस's picture

20 Aug 2016 - 1:41 pm | इल्यूमिनाटस

धन्यवाद! आणि फेल्प्स चं म्हणाल तर लिहिनाच हि गोष्ट लक्षात आली होती माझ्या! पण तिसऱ्याचे उदाहरण द्यायचे म्हणून आफ्रिदी चे दिले.
पण का करत असतील बरं असं हे खेळाडू?मग मेस्सी सुद्धा तेच करेल की काय अशी शंका येते!

असंका's picture

20 Aug 2016 - 2:07 pm | असंका
इल्यूमिनाटस's picture

20 Aug 2016 - 2:33 pm | इल्यूमिनाटस

हे माहित नव्हते ;) म्हणजे मेस्सीचा सुद्धा आफ्रिदी झालाच तर!

स्वाती दिनेश's picture

20 Aug 2016 - 2:44 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला,
स्वाती

इल्यूमिनाटस's picture

20 Aug 2016 - 2:50 pm | इल्यूमिनाटस

आभार!

लीना कनाटा's picture

21 Aug 2016 - 7:53 am | लीना कनाटा

तो " BOLT " सतत इकडून तिकडे पळत असतो. त्याला एखाद्या " NUT " मध्ये पिळा म्हणजे एका जागी जखडून जाईल.

आणि तो " PHELPS " नेहेमी पाण्यातून सुळकन इकडून तिकडे करत असतो त्याच्या गळ्यात एखादी " घोडी - MARE " बांधा म्हणजे तो पाण्यातून बाहेर येईल.

उडन खटोला's picture

21 Aug 2016 - 9:16 am | उडन खटोला

आज सकाळ मध्ये फेल्पस आणि बोल्टबद्दल आलंय.

माणूस कशाप्रकारे पुन्हा उसळून वर येऊ शकतो हे वाचून विशेषतः फेल्प्स बद्दल चा आदर द्विगुणित झाला.

इल्यूमिनाटस's picture

21 Aug 2016 - 9:56 am | इल्यूमिनाटस

वाचला लेलेंचा लेख. या दोघांच्या मेहनतीला तोडच नाही.
लोकमतच्या मंथन मध्ये सुद्धा या दोघांबद्दल आलाय लेख.

सुचिकांत's picture

24 Aug 2016 - 5:49 pm | सुचिकांत

तुफान हसलो... लय भारी लिहिलं आहे.

इल्यूमिनाटस's picture

24 Aug 2016 - 6:36 pm | इल्यूमिनाटस

धन्यवाद:)

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2016 - 6:41 pm | नगरीनिरंजन

ह्या बोल्ट आणि फेल्प्स चे करायचे तरी काय?

जमल्यास अनुकरण.

रासपुतीन's picture

24 Aug 2016 - 6:50 pm | रासपुतीन

मस्त लेख!

खटपट्या's picture

24 Aug 2016 - 8:45 pm | खटपट्या

६ फूट ५ इंच उंची असलेला धावपटू १०० मीटरमधे विरळाच. या उंचीच्या शरीराची धावताना लयबद्ध हालचाल करुन वेग वाढवणे थोडे कठीण. पण सद्यातरी ही उंचीच उसेनसाठी वरदान ठरतेय. सुरवातीचे काही मीटर्स कधी कधी बोल्ट चक्क पाचवा सहावा असतो. पण नंतरचे अंतर तो गोळी सुटल्यासारखा सुटतो आणि बाकीच्यांना मागे टाकतो. जोपर्यंत पहीला येतोय तो पर्यंत बोल्टने धावत रहावे. त्या निमीत्ताने जमैकासारख्या छोट्या देशाला पदके मिळत राहतील.