इसिसमध्ये सामील होणारे युवक/युवती

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
3 Aug 2016 - 2:37 pm
गाभा: 

सिरिया व इराक मध्ये इसिसचा उदय झाल्यापासून विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशातील मुस्लिम तरूण, तरूणी इसिसमध्ये सामील होऊन इस्लामसाठी लढून हुतात्मा होण्यासाठी सिरीयामध्ये जात आहेत अशा बातम्या येत आहेत. भारतातील केरळमधील व महाराष्ट्रातील काही मुस्लिम युवक, युवती आधीच इसिसमध्ये भरती झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. गर्भवती मुस्लिम तरूणींनी सिरिया/इराकमधील इसिसच्या अधिपत्याखालील इस्लामच्या पवित्र प्रदेशात येऊन मुलांना जन्म द्यावा असे इसिसने आवाहन केल्याचे २-३ दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. इसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या काही मुस्लिम युवकांना संशयावरून विमानतळावरच अडवून परत घरी पाठविण्यात आल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत.

इसिस आपल्या प्रचारासाठी आंतरजालाचा प्रभावी वापर करते असे दिसते. आंतरजालाच्या माध्यमातून मुस्लिम युवक/युवतींवर प्रभाव टाकून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे प्रयत्न सुरू असतात असे माध्यमे सांगतात.

जे युवक/युवती इसिसच्या तत्वज्ञानाने भारून इराक/सिरियाला निघाले आहेत त्यांना बळजबरीने अडवून परत घरी पाठविणे चुकीचे आहे असे आमचे मत आहे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन न देता बळजबरीने भारतात डांबून ठेवले तरी ते आंतरजालाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात राहतीलच आणि इसिसमध्ये सामील होता न येता इथेच रहावे लागल्याच्या रागातून इथेच दहशतवादी कारवायात सामील होऊन जास्त उपद्रव देतील अशी शक्यता वाटते. त्यांना इसिसमध्ये जाऊन न देता अडविणे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.

त्यामुळे इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता त्यांना जाऊन द्यावे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन द्यावे. त्यांना धर्माकरिता युद्ध वगैरे करायचे असेल तर ते त्यांना इराक/सिरियाच्या भूमीवर करता येईल. भारताला त्याचा त्रास नाही. त्यातले बहुतेकजण तिथे युद्धात मारले जातीलच व मृत्युनंतर त्यांना स्वर्गात प्रवेश मिळून त्यांना ७२ कुमारी अप्सरांचा लाभ होईल. चुकूनमाकून त्यातले कोणी परत आलेच तर त्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवावे. एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे.

प्रतिक्रिया

एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे.

बर्र.. हे पत्र कुणाकुणाला पाठवले आहे?

तुम्ही पण गुरूजी.. कशाला असल्या धाग्यात वेळ वाया घालवत आहात...?

पेशवा भट's picture

3 Aug 2016 - 2:45 pm | पेशवा भट

त्यांना स्फोटक धागे काढल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही मोदक साहेब. धुरळा स्वतःच उडवायचा आणि म्हणायचं डोळ्यात माती गेली.

अनुप ढेरे's picture

3 Aug 2016 - 3:26 pm | अनुप ढेरे

हा हा हा!

विनायक प्रभू's picture

3 Aug 2016 - 2:57 pm | विनायक प्रभू

श्री गुरुजी अमर धागा कर्ते चे रेकॉर्ड करणार बहुतेक

संजय पाटिल's picture

3 Aug 2016 - 3:25 pm | संजय पाटिल

चुकूनमाकून त्यातले कोणी परत आलेच तर त्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवावे.

त्यापेक्षा परत पाठवावे..

"मृत्युनंतर त्यांना स्वर्गात प्रवेश मिळून त्यांना ७२ कुमारी अप्सरांचा लाभ होईल.".

1)वरील वाक्याचे संदर्भा सहित स्पष्टीकरण द्या?
2) ७२ च का?

भंकस बाबा's picture

3 Aug 2016 - 4:12 pm | भंकस बाबा

सैनिकाना ताबडतोब स्वर्गप्राप्ति होते, व् त्यांच्या सेवेला 72 हूर(पऱ्या) मिळतात हेच सांगून तरुणाना घातपाती कार्यासाठी उकसले जाते, त्यासाठी कुराणाचा संदर्भ देखिल दिला जातो.

चंपाबाई's picture

3 Aug 2016 - 10:39 pm | चंपाबाई

हतो वा प्राप्यसि स्वर्गम .... ?

गीता वाचून आजमितीस दहशतवाद करणारे कुणी असतील तर ठीके, नायतर हा फक्त चाटिझम आहे. कशाचा चाटिझम ते स्पष्ट दिसतंच आहे.

गणामास्तर's picture

24 Aug 2016 - 9:39 am | गणामास्तर

चाटिझम =)) =))
शब्द लै आवाल्डा आणि उचललेला आहे रे बॅट्या.

चंपाबाई's picture

24 Aug 2016 - 3:17 pm | चंपाबाई

पुस्तकात लिहिलेले आहे.

आता ते वाचून कुणी फॉलो नसतील करत तर तो एक वेगळा मुद्दा आहे.

आवडतं पुस्तक फॉलो करायलाही गट्स लागतात.

फाटिझम होउन शेपूट घालणार्‍यांचे ते काम नव्हे.

सुबोध खरे's picture

24 Aug 2016 - 3:46 pm | सुबोध खरे

ब्वॉर

गामा पैलवान's picture

24 Aug 2016 - 6:40 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

अगदी समर्पक बोललात. तुम्ही शरिया का अनुसरत नाही ते कळलं.

आ.न.,
-गा.पै.

Vishvnath Shelar's picture

3 Aug 2016 - 4:00 pm | Vishvnath Shelar

Ho barobar jyanna jychey tyanna jaaudya ki

भंकस बाबा's picture

3 Aug 2016 - 4:07 pm | भंकस बाबा

प्रतिसाद वाचून गंमत वाटली.
कदाचित् यांच्या बुडाखाली फटाके फुटले नाहीत अद्याप!
हा विषय विनोदाचा खचित नाही, जी मुले सामिल होण्यासाठी जात आहेत त्यांचे ब्रेनवॉश झालेले आहे.
त्याना आता त्यांचा जीव प्यारा नाही,त्यामुळे ही एक ज्वालाग्रही वस्तु बनली आहेत. जर ह्यांची ऊर्जा दाबायचा प्रयत्न केल्यास ते इथेच घातपात करून दाखवतील.
त्यांना रोखण्यात काय हशील आहे? उलट त्यांच्यावर नजर ठेवण्यास आपल्या गुप्तचर खात्याची दमछाकच् होईल.

कपिलमुनी's picture

3 Aug 2016 - 9:26 pm | कपिलमुनी

Tel- waat ghala.dhaga petavA

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

3 Aug 2016 - 10:27 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

जितकी वाटते तितकी मोठी समस्या नाहीये ही,
इसिसची ताकद नगण्य आहे पण त्याचे ओवरप्रेझेंटेशन मिडीयावाले करतात.
बादवे, यावर मागे तुडतुडींना धागा काढला होता,
तुम्ही आता स्वयंघोषित गोरक्षकांवर धागा काढा.
आणि गाय का मारू नये?
मग शेळी मारली तर का शिक्षा नाही? मग प्राण्यांमध्ये सुद्धा भेदभाव का? मग पूर्वी आर्य गोमांस खात होते का? ऋग्देवात तसे उल्लेख आहेत का?
याची डिट्टेल चर्चा करा.

टवाळ कार्टा's picture

3 Aug 2016 - 10:30 pm | टवाळ कार्टा

जितकी वाटते तितकी मोठी समस्या नाहीये ही,
इसिसची ताकद नगण्य आहे पण त्याचे ओवरप्रेझेंटेशन मिडीयावाले करतात.

=))

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

3 Aug 2016 - 10:34 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

माझं मत पटलं कि उपाहासाने हसताय?

चंपाबाई's picture

3 Aug 2016 - 10:37 pm | चंपाबाई

संघवाले वर्षानुवर्षे नुसत्या हवेत काठ्याच फिरवत बसलेत.... शिका काहीतरी

गामा पैलवान's picture

4 Aug 2016 - 12:00 am | गामा पैलवान

खालीमुंडी पाताळधुंडी,

>> जितकी वाटते तितकी मोठी समस्या नाहीये ही,

जगातले मोठे प्रश्न सोडवायची सर्वोत्तम वेळ म्हणजे ते छोटे असतांनाची. आयसिसची समस्या मोठी होण्यापूर्वीच सोडवलेली बरी, नाहीका?

आ.न.,
-गा.पै.

त्यामुळे इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता त्यांना जाऊन द्यावे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन द्यावे. त्यांना धर्माकरिता युद्ध वगैरे करायचे असेल तर ते त्यांना इराक/सिरियाच्या भूमीवर करता येईल. भारताला त्याचा त्रास नाही.

हे उपरोधीक असेल तर ठीक, अन्यथा माझ्या देशातल्या कुठल्याही व्यक्तीचं असं वाकडं पाऊल पडत असेल तर त्याला वेळीच थांबवणे माझ्यासाठी गरजेचे आहे. प्रतिबंध कसे लावायचे हा स्वतंत्र मुद्दा आहे, पण "मरु देत त्यांना, मला काय त्याचे" असं म्हणुन मला जबाबदारी झटकता येणार नाहि.

आजानुकर्ण's picture

4 Aug 2016 - 6:54 pm | आजानुकर्ण

ज्यांना मरायचं त्यांना मरुद्या पण जाणाऱ्यांना थांबवणं आवश्यक वाटतंय कारण ते तिथं जाऊन इथले आणखी लोकं रिक्रुट करतील त्याचं काय?

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2016 - 8:23 pm | श्रीगुरुजी

तथाकथित हौतात्म्याच्या आत्मघाती विचारांनी प्रेरीत झालेल्यांना बळजबरीने इथे थांबून ठेवले तर ते रागारागाने इथेच दहशतवादी कृत्ये करण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा त्यांना जाऊन द्यावे. इथे राहिले तरीही ते आणखी माणसे रिक्रूट करण्याचा प्रयत्न करणारच.

सतोश ताइतवाले's picture

7 Aug 2016 - 4:35 pm | सतोश ताइतवाले

खूप मोठी समस्या आहे
पण हे लोक का जातात इसिस माडे करणे शोधून काडली पाहिजे जास्त करून बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत
आणि इसिस चे आंतर्जालावरच्या सर्व माहिती विभाग ,जाहिराती पूर्ण पाने नाश्ता केल्या पहीजेत
आणि मुस्लिम विचारवंतांनी सुद्धा यात लक्ष घालून गरजवंताची मदत केली पाहिजे
तसं इसिस चे जास्त लक्ष यूरोप कडेच आहे

ईन्टरफेल's picture

12 Aug 2016 - 8:46 pm | ईन्टरफेल

>> बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत<<< च्यायला यांना नेट चा बैलन्स मारायला पैसे कुठुन मिळतात ?

ईन्टरफेल's picture

12 Aug 2016 - 8:49 pm | ईन्टरफेल

>> बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत<<< च्यायला यांना नेट चा बैलन्स मारायला पैसे कुठुन मिळतात ?

ईन्टरफेल's picture

12 Aug 2016 - 8:50 pm | ईन्टरफेल

>> बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत<<< च्यायला यांना नेट चा बैलन्स मारायला पैसे कुठुन मिळतात ?

बाबा योगिराज's picture

8 Aug 2016 - 8:30 pm | बाबा योगिराज

नै मला एक शंका आहे.
जर बाबा युद्धात मेला तर त्याला 72 हूर मिळणार, अन बाई युद्धात मेली तर तिला पण 72 हुरच मिळणार का? मग ती बाई त्या 72 हूर घेऊन करणार काय?

(अवांतर:-श्रीगुरूजी हघ्या.)

कानाचे फ्यूज उडालेला
बाबा योगीराज.

अमितदादा's picture

8 Aug 2016 - 9:50 pm | अमितदादा

+11
बाई ला कुठलं एवढ भाग्य, ती मेली कि त्या 72 मध्ये सामील होणार. तिथं भी शोषणच. ( हलके घ्यावे.)

भारतात नव्याने पेरण्यात आलेल्या मुस्लिमद्वेषाच्या चष्म्यापलिकडे, मध्यपूर्व व युरोप यांत जिहाद अन क्रुसेड्स हे ख्रिश्चन वि. मुस्लिम असे प्रकरण फार पूर्वीपासून सुरू आहे हे आपण विसरतो. आपल्याकडे बेसिकली भारत-पाकिस्तान भांडण आहे, अन भारत वपाकिस्तानातल्या बहुतेक मुसलमानांना 'खरे' मुसलमान अर्धे काफीरच समजतात. सूफी वगैरे तर टोटल कचराच जणू.

जागतिक, व मुख्यत्वे इसिसला क्रूसेड/जिहाद पार्श्वभूमी आहेच, प्लस, मधेच उपटलेली व जगाला शहाणपण शिकवायला जाणारी अमेरिका, हे ↓ करीतच असते.

अफगाणीस्तान, इराक, इतिहास आठवा. कशाला बोटं घालतात कुणास ठाऊक :-s

अधिकाधिक युवक इसिसमधे सामिल होण्याचे हे एक मोठे कारण आहे, असे मला वाटते.

गामा पैलवान's picture

10 Aug 2016 - 2:37 am | गामा पैलवान

आगो,

>> भारतात नव्याने पेरण्यात आलेल्या मुस्लिमद्वेषाच्या चष्म्यापलिकडे, ...

मुस्लिमद्वेष हा काय प्रकार आहे? भारतात कोण करतो मुस्लिमांचा द्वेष? नव्याने पेरणी म्हणजे काय? जरा इस्कटून सांगा बरं.

आ.न.,
-गा.पै.

आनंदी गोपाळ's picture

11 Aug 2016 - 1:53 pm | आनंदी गोपाळ

आन्गापै,

कित्ती तो निरागसपणा!

ब्रायटनात असलं काय नस्तं ना? मग खुष र्‍हावा. ;)

गामा पैलवान's picture

11 Aug 2016 - 8:15 pm | गामा पैलवान

आगो,

आहेच मी निरागस. त्याबद्दल प्रश्नंच नाही.

आता तुम्हाला 'मुस्लिमद्वेषाची नव्याने पेरणी' म्हणजे काय हे सांगता येत नसेल तर नका सांगू. काय सांगू, अहो, माझीही थोडीफार अशीच अवस्था आहे. स्वत:ला मुस्लिम म्हणवणारे आपापसांत इतका पराकोटीचा द्वेष बाळगून आहेत की भारतात मुस्लिमद्ववेषाचा जास्तीचा रतीब घालायची आजिबात गरज पडू नये.

आ.न.,
-गा.पै.

अनुप ढेरे's picture

11 Aug 2016 - 10:57 am | अनुप ढेरे

अन भारत वपाकिस्तानातल्या बहुतेक मुसलमानांना 'खरे' मुसलमान अर्धे काफीरच समजतात.

भारतातल्या रिक्रूट्सना स्वच्छतेच्या कामगिरीवर (बोले तो लट्रीन डुटीवर) लावतात आयसीसवाले असं वाचलं होतं कुठेशी. किंवा म क्यानन फॉडर म्हणून.

गामा पैलवान's picture

10 Aug 2016 - 2:45 am | गामा पैलवान

लोकहो,

आयसिस आपल्या दाराशी येऊन ठेपली आहे. परभणीत मुस्लीम दहशतवाद्याने आयसिसच्या संपर्कात येऊन चक्क बॉम्ब तयार केला आहे. आधी माहिती : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=MA5ZFE

ज्यांना ही आजूनही छोटी समस्या वाटते त्यांनी आपल्या मताचा कृपया नव्याने विचार करावा.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

11 Aug 2016 - 11:24 pm | श्रीगुरुजी

आयसिसच्या जन्माच्या आधीपासून भारतातील इस्लामी अतिरेकी भारतात बॉम्ब तयार करून वापरत होतेत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Aug 2016 - 10:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 9:27 am | संदीप डांगे

इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या बद्दल ममत्व चालत नाही पण इकडच्या हिंदूंनी तिकडच्या हिंदूंबद्दल उमाळे काढले तर ते चालतं, तिथे राष्ट्रप्रेम विसरून मुस्लिमांसारखे आपणही फक्त धर्मप्रेमी आहोत हे सोयीस्कर विसरायचे,

असो, ह्या धाग्यावर पहिला नि शेवटचा प्रतिसाद

इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या बद्दल ममत्व चालत नाही पण इकडच्या हिंदूंनी तिकडच्या हिंदूंबद्दल उमाळे काढले तर ते चालतं

डांगे साहेब.. तिकडचे किती हिंदू इकडे येवून २६/११, मुंबई स्फोट, कोईंबतूर किंवा संसदेवर हल्ला सारखे प्रकार प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे करतात..?

..आणि असल्या प्रकारात इथल्यांचेच जनाजे उठत असतील तर इथल्यांनी तिकडच्यांबद्दल का ममत्व बाळगावे..?

आता प्लीज दहशतवादाला धर्म नसतो असे शोभाडे, बरखा दत्त टाईप सोयीस्कर विचार सांगू नका.

बोलबोलेरो's picture

12 Aug 2016 - 2:16 pm | बोलबोलेरो

+1

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 2:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही मुख्य मुद्दाच मिस केलात, असो!!

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 2:38 pm | संदीप डांगे

हेच म्हंतू!

मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे!

तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात,

बाकी दांभिक भूमिका मला पटत नाहीत ते वेगळं!

असो!

मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे!

बर्र..

तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात,

याला सपशेल असहमत.

हिंदू मुस्लीम दंगलींचा खरा इतिहास, मदरशांमध्ये चालणारे ब्रेनवॉशिंग, दहशतवादी हल्ल्यात नेहमीच आढळणारी मुस्लिम नावे, अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक असा कांगावा करत उपटलेले फायदे आणि सर्वसाधारणपणे राष्ट्रनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठा मोठी अशी अनेक कारणे असताना "तिकडच्या भाईजानवर अत्याचार होत असल्यामुळे हिंदूत्व खतरेंमें" अशा आरोळ्या देण्याची आवश्यकता भासेल असे वाटत नाही.

तिथे राष्ट्रप्रेम विसरून मुस्लिमांसारखे आपणही फक्त धर्मप्रेमी आहोत हे सोयीस्कर विसरायचे

कोणीही स्वधर्मप्रेमी असण्याला कोणाचाच आक्षेप नसावा. "तुमचा धर्म माझ्या धर्माप्रमाणे चालत नाही म्हणून तुम्ही काफिर" ही थिअरी कशी मान्य करणार..?

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 7:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक असा कांगावा करत उपटलेले फायदे आणि सर्वसाधारणपणे राष्ट्रनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठा मोठी

म्हणजे नेमके काय काय फायदे लुटले आहेत??

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2016 - 3:08 pm | श्रीगुरुजी

पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे!

पाकिस्तानातील सर्व मुस्लिमेतरांविषयी मला सहानुभूती वाटते.

तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात,

भारताप्रमाने जगभर सर्वत्र मुस्लिमांचा द्वेष केला जातो. त्याची कारणे अगदी उघड आहेत. तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात या एकाच कारणासाठी भारतात मुस्लिमांचा द्वेष होत नसून त्यासाठी इतर असंख्य कारणे आहेत. मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांचे वर्तन त्यासाठी पुरेसे आहे.

प्रसाद_१९८२'s picture

12 Aug 2016 - 3:10 pm | प्रसाद_१९८२

त्यांचे वर्तन त्यासाठी पुरेसे आहे.

<<

सहमत !

अ‍ॅज अ ब्लॅकेट स्टेटमेण्ट या वाक्याशी तीव्र असहमत.

ढोबळ मानाने मुस्लीम शब्दाचे आध्यात्मीक, सांस्कृतीक आणि राजकारणी असे तीन पदर आहेत. त्यातले आध्यात्म आणि संस्कृती अत्यंत गोड आणि श्रीमंत आहे. मुस्लीम राजकारणात काहि कालबाह्य तत्वे रुजल्यामुळे हा एक पदर इतर पदरांना खायला उठलाय. पण म्हणुन असा सरसकट मुस्लीम द्वेष तर अधीक घातक आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2016 - 2:30 pm | श्रीगुरुजी

त्यातले आध्यात्म आणि संस्कृती अत्यंत गोड आणि श्रीमंत आहे.

मुस्लीम अध्यात्म जे दिसते ते म्हणजे पूर्णपणे बाह्य अवडंबर आहे. पुरूषांनी दाढी ठेवायची, आखूड पायजमा वापरायचा, महिलांनी बुरखा वापरायचा, निष्पाप प्राण्यांना एका विशिष्ट पद्धतीने कापायचे, वेगळ्या पद्धतीने कापले तर ते हराम, . . . यात काय गोड व श्रीमंत आहे ते समजले नाही.

मुस्लिम संस्कृती म्हणजे नक्की कोणती संस्कृती? सौदी अरेबियातील संस्कृती का अफगाणिस्तानातील संस्कृती का पाकिस्तानातील संस्कृती का भारतातील संस्कृती का सुदानमधील संस्कृती का मलेशिया/इंडोनेशियातील संस्कृती का अजून कोणत्या तरी प्रदेशातील संस्कृती? मुस्लिमांमध्ये सर्वत्र पुरूषप्रधान संस्कृती आहे. मुख्य म्हणजे इतर धर्मियांच्या संस्कृतीबद्दल अजिबात आदर न ठेवता जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे इतरधर्मियांची संस्कृती उद्ध्वस्त करणे हेच आजतगायत दिसून आले आहे.

अर्धवटराव's picture

13 Aug 2016 - 3:43 pm | अर्धवटराव

मुस्लीम अध्यात्म जे दिसते ते म्हणजे पूर्णपणे बाह्य अवडंबर आहे. पुरूषांनी दाढी ठेवायची, आखूड पायजमा वापरायचा, महिलांनी बुरखा वापरायचा, निष्पाप प्राण्यांना एका विशिष्ट पद्धतीने कापायचे, वेगळ्या पद्धतीने कापले तर ते हराम, . . . यात काय गोड व श्रीमंत आहे ते समजले नाही.

ड्रेस कोड, चालिरीती, सणवार साजरा करण्याच्या पद्धतीत अध्यात्म शोधतो म्हटलं तर मग कठीण आहे गुर्जी. असु द्या. जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य या सगळ्यांचा ज्ञानदेव सांगितलेल्या सच्चिदानंद चिद्विलासाशी संबंध लावणं म्हणजे... असो.

मुस्लिम संस्कृती म्हणजे नक्की कोणती संस्कृती?

अगदी सुरुवात करायची म्हटलं तर जयंतरावांची इब्न बतूत सिरीज चाळण्याचा सल्ला देतो. ते ही असो.

आपल्यासारख्या अनेक महाभागांशी संवाद साधायचं भाग्य लाभलय मला. त्यामुळे आपल्या विचारांचं आश्चर्य नाहि वाटलं, खेद जरुर वाटतो.
असो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2016 - 4:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

+1000

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2016 - 6:08 pm | श्रीगुरुजी

ड्रेस कोड, चालिरीती, सणवार साजरा करण्याच्या पद्धतीत अध्यात्म शोधतो म्हटलं तर मग कठीण आहे गुर्जी. असु द्या. जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य या सगळ्यांचा ज्ञानदेव सांगितलेल्या सच्चिदानंद चिद्विलासाशी संबंध लावणं म्हणजे... असो.

मुस्लिम अध्यात्म कसं गोड आणि श्रीमंत आहे हे सांगण्याऐवजी तुम्ही थेट हिंदू धर्मावरच घसरलात. मुस्लिम अध्यात्माच्या गोडव्याची व श्रीमंतीची काही उदाहरणं द्याल असं वाटलं होतं.

आता जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य इ. चा हिंदू धर्माच्या अध्यात्माशी संबंध आहे असं तुम्हाला म्हणायचं असावं. मुळात जानवं, शेंडी इ. बाह्य अवडंबरं हिंदूंमधील एका अत्यंत अल्पसंख्या असलेल्या जातीशी संबंधित होती. ही बाह्य चिन्हे बहुसंख्य हिंदू वापरत नव्हते. जे वापरत होते त्यातील अनेकांनी या बाह्य चिन्हांचा त्याग केला आहे. हिंदू अध्यात्म हे या बाह्य चिन्हांवर कधीच अवलंबून नसते. एका विशिष्ट दिशेला तोंड करून, विशिष्ट वेष परीधान करून, विशिष्ट प्रकारे उपासना केली तरच ते अध्यात्म आणि तसं नसेल तर ते अध्यात्म नाही असं बंधन हिंदूंवर कधीच नव्हतं. हिंदू धर्मात परमेश्वरप्राप्तीचे असंख्य मार्ग सांगितले आहेत. कोणताही मार्ग अवलंबताना बाह्य अवडंबर असलेच पाहि़जे असे बंधन नाही. अगदी शूचिर्भूत असावे हे सुद्धा बंधन नाही. आता हीच तुलना मुस्लिम पद्धतीशी करा आणि फरक बघा. त्यात काही गोड आणि श्रीमंत असेल तर सांगा.

अगदी सुरुवात करायची म्हटलं तर जयंतरावांची इब्न बतूत सिरीज चाळण्याचा सल्ला देतो. ते ही असो.

सिरीजची लिंक असेल तर द्या. नक्की वाचेन.

आपल्यासारख्या अनेक महाभागांशी संवाद साधायचं भाग्य लाभलय मला. त्यामुळे आपल्या विचारांचं आश्चर्य नाहि वाटलं, खेद जरुर वाटतो.

चालायचंच. काही जणांचे जे गैरसमज आहेत त्याबद्दल मला सुद्धा खेद वाटतो.

हो का ? सनातनची पुस्तके वाचा. तिथेही हे मिळेल.

आर्यानीही द्रविडांच्या मुंड्या मुरगाळूनच आपले बस्तान बसवले.

मार ही त्राटिका .... आठवते का ?

अर्धवटराव's picture

14 Aug 2016 - 1:24 am | अर्धवटराव

या. स्वागत आहे.
सध्या एरंडेल तेलाचा भाव काय आहे हो?

गामा पैलवान's picture

14 Aug 2016 - 2:42 am | गामा पैलवान

काहीही हं चंपाबाई! म्हणे आर्यांनी द्रविडांच्या मुंड्या मुरगळल्या!! एकतरी युद्ध दाखवा ज्यात एक आर्य आणि एक द्रविड अशा दोन पार्ट्या एकमेकांशी लढताहेत.

आ.न.,
-गा.पै.

मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!

बापूसाब.. याच न्यायाने तुम्ही अप्रत्यक्षपणे "एक धर्म एक राष्ट्र" या थिअरीला किंवा "हिंदूराष्ट्र" या संकल्पनेला पाठिंबा देत आहात असे वाटत आहे.

तरीपण मेन मुद्दा मिस झाला असेल तर तो काय ते प्लीज सांगा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 6:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

मेन मुद्दा क्र.१

जसे आयसीसेतच्छूक भारतीय मुसलमानांस देशाशी घेणे देणे नाही, तसेच पाकिस्तानात राहिलेल्या हिंदूंना सुद्धा नाही, का नाही? तर साक्षात फाळणीच्यावेळीही हिंदूंचे शिरकाण पाहून देखील ज्यांना धर्म, नवा हक्काचा लोकशाही देश ह्यांच्याप्रती ममत्व न राहता जन्मस्थानाशी (भौगोलिक) घट्ट इमानदार राहायची इच्छा होती, त्यांच्यावर आज भरोसा ठेवायचे कारण नाही असे वाटते, आज पाकिस्तान मध्ये हिंदू कापत आहेत म्हणून ही माणसे गळा काढणार, मग आपल्याकडली काही धर्मप्रेमी गाढवे त्यांची उष्टी खरकटी काढायची बात करणार, हे झाले, ते सगळे भारतात आले, अन उद्या जर पाकिस्तान ने त्यांना इन्सेंटिव्ह किंवा किमान सुरक्षा देऊन परत बोलावले तर ?? ती किती मोठी रिस्क असेल हे आपण इमॅजिन करू शकता का? बरं ते ही जाऊ द्या, इस्लामचं तत्व हे "दार उल हरब" ला "दार उल इस्लाम" मध्ये कन्व्हर्ट करणे आहे, हे तरी आपण मानाल न? इतके असूनही, पाक बघा, भारतात मुसलमान असुरक्षित आहेत हे कोकलतो कायम पण भागलपुर ते 2002 गुजरात किती भारतीय मुसलमानांस त्यांनी सन्मानाने बोलवून नागरिकत्व दिले आहे?? असल्यास मला जरूर सांगाल, मूहाजीर संकल्पनेबद्दल मी तुम्हाला सांगु नये!

बापूसाब.. याच न्यायाने तुम्ही अप्रत्यक्षपणे "एक धर्म एक राष्ट्र" या थिअरीला किंवा "हिंदूराष्ट्र" या संकल्पनेला पाठिंबा देत आहात असे वाटत आहे.

अजिबात नाही, मी अतिशय अग्रेसीव अश्या "भारतीयत्व" आधारित देशाची भलामण करतोय, जो भारतीय तो आमचा, जो भारतात राहून भारताला सुरुंग लावायच्या गप्पा करतोय तो "आमचा" गुन्हेगार, त्याला त्याच्या सीरियन मित्रांकडे जाण्यापासून रोखुन तसेच जायची इच्छा असलेल्या त्याच्या मित्रांसमोर त्याचे एक "उदाहरण" बनवणे हे ही "आमचेच कार्य" त्यांना outsource करायचे काम नाही, अमेरिका इस्राएल बघा, त्यांच्या माणसाने बाहेर जाऊन 1000 खून केले तरी आटापिटा करून त्याला परत मायदेशात आणतील मग वाटल्यास फासावरही देतील, पण जे आहे ते घरात, असे बाहेर जाऊ द्या रोकु नका करून नाही.

रच्याकने, आता हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व वगैरे म्हणू नका, कारण हिंदुत्ववादी गाढवे तीच आहेत ज्यांनी दलितांना मारू नका मला गोळ्या घाला म्हणणाऱ्या मोदींचा निषेध केला कोर्टात जायची भाषा केली अन मोदीसारख्या एका सच्च्या भारतीयाला घरचा आहेर देऊन मान खाली घालायला लावली आहे.

Hope I am clear.

जो भारतीय तो आमचा, जो भारतात राहून भारताला सुरुंग लावायच्या गप्पा करतोय तो "आमचा" गुन्हेगार

इथेच मुद्दा क्लीयर झाला आणि आपण एकाच पानावर आहोत ते कळाले.

तरीपण आणखी शंका असल्यास सवडीने प्रतिसादेन.

लोभ आहेच.. तो वाढवत ठेवावा. :)

आनन्दिता's picture

24 Aug 2016 - 8:32 am | आनन्दिता

प्रतिसाद प्रचंड आवडला !!

प्रसाद_१९८२'s picture

12 Aug 2016 - 2:35 pm | प्रसाद_१९८२

सहमत!
उगाच कुठल्याही गोष्टीचे समर्थन करत बसतात आजकालचे विचारवंत(?)

कुठले उमाळे ?! हे वाचा : http://indianexpress.com/article/india/india-news-india/perception-about...

अगदी हिंन्दू येतात त्यांना सुद्धा "पाकिस्तानी" म्हणून नोकऱ्या मिळत नाहीत. हिंदूंची तेव्हाची आणि आत्ताची टक्केवारी हि फक्त "इथे आम्ही तुम्हाला छळत नाही, तिकडल्या लोकांसारखे नाही आम्ही" हे दाखवण्याचा दाखला आहे. तिकडली टक्केवारी राहावी / वाढावी तसेच त्यांना त्रास होऊ नये हा उद्देश फार छोटा आहे.

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 5:09 pm | संदीप डांगे

इथे आम्ही तुम्हाला छळत नाही, तिकडल्या लोकांसारखे नाही आम्ही" हे दाखवण्याचा दाखला आहे

<<< खरेतर ती एक गर्भित धमकी आहे असं म्हणू शकतो,

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी

जर का गुर्जी म्हणतात तसे मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!

स्वातंत्र्यानंतर जवळपास ६९ वर्षे उलटली. गेल्या ६९ वर्षात पाकिस्तानचा हिंदूद्वेषी, रक्तपिपासू व क्रूर चेहरा अनेक वेळा दिसूनसुद्धा इथल्या निर्धमांधांना पाकिस्तान हा लाडाने थोडासा बिघडलेला धाकटा खोडकर भाऊ वाटतो. भारत-पाकिस्तान मधील जनतेमध्ये वैर नसून त्यांच्यात अत्यंत प्रेमळ भाव आहेत व काश्मिर, दहशतवाद इ. प्रश्न हे दोन्ही देशातील राजकारण्यांनी निर्माण केले असून सामान्य जनतेचा त्याला पाठिंबा नाही असे उच्चरवाने सांगून स्वतःची व सर्वांचीच फसवणूक करण्यात हे निधर्मांध आघाडीवर आहेत. आपण चुकून पाकिस्तानी जनतेबद्दल वाईट बोललो तर आपली धर्मनिरपेक्षतेची, उदारमतवादीपणाची, मानवतावादाची पदवी रद्द होऊन आपल्याला जातीयवादी, बुरसटलेल्या, फॅसिस्ट विचारांचे समजले जाईल अशी भीति त्यांना वाटत असते.

जर ६९ वर्षानंतर सुद्धा इथल्या काही जणांचे डोळे उघडले नसतील तर १९४७ मध्ये फाळणी झाल्यानंतरसुद्धा आपण पाकिस्तानी भागात सुखाने राहू, देश सोडून भारतात जायची गरज नाही, स्थानिक मुस्लिम आपले शेजारी आहेत व आपली काळजी घेतील या भ्रमात तत्कालीन बांगलादेशातील व पाकिस्तानमधील हिंदू राहिले असतील यात नवल वाटायचे कारण नाही. भारतात न येता तिथले काही हिंदू पाकिस्तानमध्येच राहिले याला कारण त्यांना भारताशी काही घेणेदेणे नव्हते हे कारण नसून जरी पाकिस्तान निर्माण झाला तरी आपल्याला त्रास होणार नाही या गैरसमजूतीतून ते तिथे राहिले असावेत.

गेल्या ६९ वर्षात तिथल्या स्थानिक मुस्लिमांचा क्रूर चेहरा अनेकदा पूर्ण उघड झाला आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानमध्ये २४% हिंदू होते. २०१६ मध्ये त्यांची संख्या २% पेक्षाही कमी आहे. बांगलादेशाची थोडीफार अशीच परिस्थिती आहे. स्थानिक मुस्लिमांच्या भरवशावर राहून तेथील हिंदूंचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. स

अशा परिस्थितीत भारत हे त्यांचे एकमेव आशास्थान आहे. त्यामुळे तिथल्या हिंदूंबद्दल सहानुभूती असायलाच हवी. त्यांना भारतात स्थलांतर करून नागरिकत्व हवे असल्यास ते लगेच देण्यात यावे. इस्राईल मध्ये जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही वर्णाच्या ज्यू जनतेला नागरिकत्व मिळते कारण इस्राईल ही ज्यूंची एकमेव भूमी आहे. तसेच भारत ही जगभरातील हिंदूंसाठी एकमेव आशास्थान आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 6:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

भारतात न येता तिथले काही हिंदू पाकिस्तानमध्येच राहिले याला कारण त्यांना भारताशी काही घेणेदेणे नव्हते हे कारण नसून जरी पाकिस्तान निर्माण झाला तरी आपल्याला त्रास होणार नाही या गैरसमजूतीतून ते तिथे राहिले असावेत.

अहो, फाळणी पासून कैक कोस दूर असलेल्या तुमच्या आमच्यासारख्या मराठी जनतेला जर आज इतक्या वर्षानंतरही जेव्हा फाळणीचा भेसूर चेहरा दिसतो, जाणवतो, तो त्याकाळी स्वतःच्या घराच्या मागल्या बोळात साक्षात घडताना पाहूनही लोकांना "गोड गैरसमज" झाला असेल, हे आपण कसे म्हणु शकता?? इतके पाहूनही तिथेच राहिलेत देवा ते, माझ्यालेखी त्यांचा धर्म कुठलाही असो, ते भरवश्याचे नाहीत, तुम्ही वरतीच भारतात असलेल्या निधर्मांध लोकांबद्दल माहिती दिली आहेत, आधीच दुथडीभरून वाहत असलेल्या गाढव गोठ्यात दूरदृष्टी नसलेली अन ते सिद्ध केलेली अजून गाढवे आणून बांधणे तुम्हाला रुचत असेल, आम्हाला नाही.

अमितदादा's picture

12 Aug 2016 - 3:13 pm | अमितदादा

मोदी म्हणतात त्याप्रमाणे संविधन ला भारताचं धर्मग्रंथ मानलं तर बाहेरील हिंदू ना भारतात प्रवेश देता नाही येणार, पण ही झाली थियरी। आता आपण प्रॅक्टिकल जगात येवूया, जगात कोणत्याही धर्मातील लोकांवर अन्याय होत असेल तर अश्या लोकांना स्वीकारायला अनेक देश तयार असतात, मुस्लिम निर्वासितांना मुस्लिम देश आश्रय देतात, ख्रिश्चन लोकांना युरोप मध्ये आश्रय मिळतो, ज्यू लोकांना इस्राईल मध्ये आश्रय मिळतो, मग अन्याय ग्रस्त हिंदू , शीख, बुद्ध, मुस्लिम अहमादी लोकांनी जायचं कूट? बरं त्यांच्या पूर्वजांनी भारतात न येण्याचा निर्णय घेतला त्यांना थोडाच माहित होत कि आजचा पाकिस्तान उद्या नापाक होईल। म्हणजे हे आस म्हणण्यासारखं झालं की मुलीने प्रेमविवाह करून सासरी गेल्यानंतर, सासरी छल झाला तर तिच्या बापानं आस म्हनाय हवं कि त्यावेळी तू निर्णय घेतला आता भोग माज्या घरी येऊ नको। भारत हा पूर्वीपासून हिंदू आणि बुद्ध धर्मियांना आश्रय देतो आहे। नाहीतर बांगलादेश च्या सीमेवर कुंपण आणि लेसर भिंती बांधणारा भारताने हिंदू नेपाळ शी मोकळ्या सीमा ठेवल्या नसत्या। तिबेट मधील बुद्ध धर्मियांना आश्रय दिला नसता। थोडक्यात काय भारताने अन्याय ग्रस्त हिंदू, बुद्ध, शीख, मुस्लिम अहमादी,मुस्लिम दाऊद बोहरा यासारख्य लोकाना आश्रय देण्यासाठी योग्य पोलिसी बनावाय हवी।

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 3:17 pm | संदीप डांगे

निर्वासितांचे धर्म बघून आश्रय दिला जात नाही, आंतराष्ट्रीय संकेतानुसार, तसेच भारत काही अधिकृतपणे हिंदू देश नाही

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2016 - 3:24 pm | श्रीगुरुजी

निर्वासितांना आश्रय देणे बंधनकारक नाही. २-३ वर्षांपूर्वी सिरिया व इराकमधील बरेचसे नागरिक युरोपमध्ये कायदेशीर्/बेकायदेशीर आश्रय घेण्याच्या प्रयत्नात होते. जर्मनी, फ्रान्स इ. देशांनी त्यांना अधिकृत आश्रय दिला परंतु आम्ही एकही निर्वासित घेणार नाही असे सांगून हंगेरीने आपल्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवून एकाही निर्वासिताला देशात घुसून दिले नव्हते. इस्राईल धर्म बघूनच आश्रय देतो. भारत अधिकृतरित्या हिंदू असो वा नसो, जगात भारत हा हिंदूंचाच देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भारताने पाकिस्तान/बांगलातील फक्त हिंदूंनाच आश्रय देण्याचे ठरविले तर कोणीही आरडाओरडा करू शकणार नाही.

गणामास्तर's picture

12 Aug 2016 - 3:29 pm | गणामास्तर

कशाला द्यायचा पण मी म्हणतो भारताने पाकिस्तान/बांगलातील हिंदूंना आश्रय?
सोन्याबापू म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा संधी होती तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला नसत्या उचापत्या वाढवत बसाव्या.
इथं घरचं झालं थोडं अन व्याह्यानं धाडलं घोडं अशी गत व्हायची.

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2016 - 3:34 pm | श्रीगुरुजी

आपली इथे वाट लागेल हे दुर्दैवाने त्यांच्या त्यावेळी लक्षात आले नव्हते. स्थानिक मुस्लिमांवर भोळसटासारखा त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वासघात झाला. इथल्या निर्धमांधांचे २०१६ मध्ये सुद्धा डोळे उघडलेले नाहीत. मग ६९ वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना तिथे राहण्यात असलेले धोके लक्षात आले नसावेत यात आश्चर्य ते काय? त्यांच्यावर तिथे ते हिंदू असल्याने अन्याय होत आहे. म्हणजे धर्म मुस्लिम नसल्यानेच त्यांना अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत भारताने त्यांच्या पाठीशी उभे रहायलाचा पाहिजे. १९४७ मध्ये फाळणी होताना लोकसंख्येची संपूर्ण अदलाबदल केली असती तर हे प्रश्न निर्माण झाले नसते. त्यावेळी केलेल्या चुकांची भरपाई भारताने करायलाच हवी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 7:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

बरं, भरपाई एकट्या भारतानेच करावी काय? मुस्लिम तेतुका मेळवावा वर पाकिस्तान स्थापन झालाय न? द्या मग एक ऑफर पाकला, तुमच्याकडले सगळे हिंदु द्या अन आमच्याकडली सगळी मुसलमानं घ्या, जमतंय का बघा प्रकरण जमतंय का! जमले तर आमच्याइतके आनंदी कोणी नसेल! भेंडी नोकरी धरली सीमसुरक्षेकरता अन दंगली झाल्या का आवरत फिरायला लागतंय तिच्यायला घरातल्याच!

अमितदादा's picture

12 Aug 2016 - 3:41 pm | अमितदादा

तुम्ही फक्त हिंदू म्हणू नका म्हणजे गैरसमज दूर होतील। अन्यायग्रस्त हिंदू, शीख, बुद्ध, मुस्लिम धर्मतील लहान सेक्टर याना प्रवेश। जगातील सर्वच देश हे मानवतेच्या दृष्टिकोनातून दारवरशी लाख निर्वासित घेतात। बरं हिंदू लोकांना नको मग तिबेटी बुद्ध, श्रीलंकन तामिळ, नेपाळी हिंदू याना आतापर्यंत का आश्रय दिला? भारताची हि पोलिसी जुनीच आहे ती फक्त पाकिस्थान आणि या
बांगलादेश ह्यांना apply नव्हती।

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 7:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

तिबेटी लोकांना आश्रय देणे ही उघड दृष्ट्या एक घोडचूक होती, अन गुप्तचर विभागाकरता ब्लेसिंग इन दिसगाईस, पाकिस्तानी हिंदू काय ऑफर करत आहेत ??

अमितदादा's picture

12 Aug 2016 - 8:54 pm | अमितदादा

बापू तुमचे मत समजत आहे, परंतु भारत बाहेरच जग हे भारताला जगातील हिंदू शीख लोकांचा रक्षणकर्ता म्हणून बगतो। हिंदू शीख बुद्ध धर्मीय वर होणाऱ्या अत्याचारांना भारताने रेस्पॉंड नाही केलं तर त्यांचं नाश झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच माझं मत आहे की सगळ्यांना सरसकट घेऊ नका एक चांगली policy बनवा। भारत सरकार ला सुद्ध बहुदा हेच वाटतंय

http://www.dawn.com/news/1252665
बाकी प्रश्न फक्त तिबेटी बौद्ध चा नाही, नेपाळी हिंदू आणि श्रीलंकन तामिळ याना सुद्धा भारताने आश्रय दिला आहे त्याच काय?

अमितदादा's picture

12 Aug 2016 - 3:27 pm | अमितदादा

याची मला पूर्ण कल्पना आहे, म्हणूनच पोलिसी मध्ये सगळं धर्म समाविष्ट करा, मात्र मुस्लिम सुन्नी ना आश्रम नको कारण त्यांच्यावर धार्मिक अन्याय होणार नाही। मुस्लिम शिया हि एकवेळ चालतील। बाकी ह्या जगात कोणताही देश साळसूद नाही, भविष्य आणि स्वार्थ बगूनच पोलिसी बनवाव्या लागतील। जर्मनी मध्ये सीरिया तुन येणारे निर्वासित ख्रिश्चन धर्म स्विकारातयात कारण निर्वासित व्हिसा मिळण्याची श्यक्यता वाढतेय, ईशान्य भारतातील ज्यू इसराईल मध्ये निघून गेले। दोनी घटना आत्ताच्या आहेत। भारताने योग्य पोलिसी बनवायला हवीच, भारत हा पुस्तकी secular आणि प्रॅक्टिकाली हिंदू dominated राष्ट्र आहे हे वास्तव आहे।

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 7:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुस्लिम निर्वासितांना मुस्लिम देश आश्रय देतात,

उदाहरण देता येईल का?? सीरिया मध्ये यळकोट झाला तेव्हा सौदी ने निर्वासित आत घेतले का इराण नं?

अमितदादा's picture

12 Aug 2016 - 8:32 pm | अमितदादा

उदाहरण लिबिया येथील पाळून जाणारे निर्वासितांना इजिप्त आणि tunisia आश्रय देत आहे (आकडा 2 तो 4 लाख)। सीरिया मधून पाळू आलेल्या लोकांना तुर्कस्तान आश्रय देत आहे (आकडा 2.7 मिलियन). म्यानमार मधून पाळणाऱ्या rohingya मुस्लिम ना मलेशिया आणि इंडोनेशिया आश्रय देत आहेत।

अनुप ढेरे's picture

12 Aug 2016 - 3:47 pm | अनुप ढेरे

जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!

नाही पटलं. जेव्हा मौका होता, १९४७ साली तेव्हा आत्ता ४०-५०-६० वर्षाचे लोक किती वयाचे असतील. जन्मले देखील नसतील हे लोक तेव्हा. त्यांच्या बापजाद्यांनी घेतलेल्या निर्णयाची शिक्षा त्यांना का द्यायची?
आणि दुसरा मुद्दा. पाकिस्तानचं पद्धतशीरपणे रिग्रेशन घडवून आणलेलं आहे. तिथल्या हुकूमशहांनी असो वा धर्मगुरुंनी. १९४७ चा पाकिस्तान आत्ताच्या पाकिस्तान इतका वाईट नसेलही. सो चूक आता लक्षात आली किंवा आता परिस्थिती बदलली तरी ती दुरुस्तं करू द्यायची नाही?

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 7:34 pm | कैलासवासी सोन्याबापु

हे सगळे वन वे होईल का? ह्यावरही विचार करा साहेब :)

अनुप ढेरे's picture

13 Aug 2016 - 9:07 am | अनुप ढेरे

होऊ दे की टू वे. जो न्याय तिथल्या हिंदूंना लागू तोच इथल्या मुस्लिमांना लागू आहे की. पण मला वाटत नाही की कोणी मुस्लीम तिकडे जाईल.

syrian kid

हा फोटू पाहून रडला असाल तर त्याच कारणासाठी.

मौका होता तेव्हा आले नाहीत

विमान पडत असताना स्वतःच्या सामानाची पर्वा करतात लोक, घरदार सोडून निघणं सोपं आहे का?

जर का गुर्जी म्हणतात तसे मान्य केले तर

हे लॉजिक काय झेपलं नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 7:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

विमान पडत असताना स्वतःच्या सामानाची पर्वा करतात लोक, घरदार सोडून निघणं सोपं आहे का?

हे ही लॉजिक झेपले नाही!

असो.

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2016 - 3:15 pm | श्रीगुरुजी

+१

थोडक्यात काय भारताने अन्याय ग्रस्त हिंदू, बुद्ध, शीख, मुस्लिम अहमादी,मुस्लिम दाऊद बोहरा यासारख्य लोकाना आश्रय देण्यासाठी योग्य पोलिसी बनावाय हवी।

अहमदी व बोहरा अजिबात नको. तेही तितकेच कट्टर असतात. बोहरांमधील बालवयात केला जाणारा मुलींची सुंता हा क्रूर प्रकार माहित असेलच.

बाकी सगळे चालतील.

देशपातळीवर असे सिलेक्टीव्ह वागता येत नाही हो गुरूजी..

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2016 - 3:29 pm | श्रीगुरुजी

नक्कीच वागता येतं. इस्राईल फक्त ज्यूंनाच आत घेतात. अमेरिकेत नागरिकत्व मिळविण्यासाठी वेगवेगळ्या खंडांसाठी वेगवेगळे नियम आहेत. अरब देशांचे नागरिकत्वाचे स्वतःचे वेगळे नियम आहेत. नजीकच्या भविष्यकाळात विशेषतः युरोपिअन देश मुस्लिम नागरिकांना नागरिकत्व देण्याचे नियम अधिक कडक करतील अशी शक्यता आहे.

हे बघा.. आता माझा अभ्यास नाही म्हणून खरोखरी विचारत आहे.

एकाच धर्मातला एक पार्ट हवा आणि एक नको असे कसे चालेल..? का तुम्ही नोंदवलेली मंडळी मुस्लीम छत्रीखाली येत नाहीत..?

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2016 - 3:36 pm | श्रीगुरुजी

मी कोठे असं म्हटलंय? मी म्हणतोय की मुस्लिमांचा कोणताच उपपंथ नको. मग ते अहमदी असोत वा बोहरी वा शिया वा सुन्नी.

ओके.. आत्ता मुद्दा समजला.

धन्यवाद..!

चंपाबाई's picture

12 Aug 2016 - 3:45 pm | चंपाबाई

सावरकर तर बोलायचे , अखंड हिंदुस्तानचे सगळे हिंदु मुसलमान एकाच हिंदुत्वाचे प्रवाह. कारण पितृभू एकच. .. मग पाकिस्तानी मुसल्मानाना त्यांची पितृभू नाकारणे , हा सावरकरांचा अपमान नव्हे काय?

अमितदादा's picture

12 Aug 2016 - 3:49 pm | अमितदादा

भारतीय मुस्लिम अजून भारतीय संस्कृती मानणारे आहेत, पाकिस्तान चे मुस्लिम आत अरबस्तान चे जाले आहेत। भारत बद्दल त्यांना एव्हडा द्वेष कि ते भारतीय आणि आपण हे एकाच बापाचे पोट्टे आहोत हे विसारलेत। त्याऐवजी त्यांनी अरबी बाप लाऊन किंवा मानुन घेतलाय

सुबोध खरे's picture

12 Aug 2016 - 7:01 pm | सुबोध खरे

मग पाकिस्तानी मुसल्मानाना त्यांची पितृभू नाकारणे
चंपाबाई
त्यांना मुळात "मातृभूमी किंवा पितृभूमी " हा विचारच अमान्य आहे. जे काही आहे ते सर्व "अल्लाच्या मर्जी" बद्दल आहे
आपण जन्मतः डॉक्टर नव्हता. "प्रशिक्षणाने" झाला आहात.
सत्तर वर्षे "भारत तेथील मुसलमानांवर अन्याय करीत आले आहेत" असेच प्रशिक्षण पाकिस्तानच्या मुलांना शाळांत इतिहासात शिकवले गेल्याने ते भारत द्वेष्टे झालेले आहेत. त्यातून त्या राष्ट्राची निर्मिती धर्माधारित आहे.
आपला धर्म( सुन्नी मुसलमान) सोडला तर दुसरे सर्व लोक "जगण्याच्या लायकीचेच" नाहीत हे बाळकडू मदरश्यामध्ये बालकांना दिले गेल्यामुळे तेथील इतर मुसलमानांचे शिरकाण करणे हि अल्लाची सेवा आहे हे समजणाऱ्या लोकांना इथे कशासाठी आश्रय द्यायचा?
पाकिस्तानच्या चारही प्रांतांमध्ये केवळ धर्म सोडला तर एकात्मता अजिबात नाही. त्यांच्यात एकच समान धागा आहे तो म्हणजे भारत द्वेष. तेंव्हा तेथील पूर्वग्रहदूषित मुसलमानांना आपण आपल्याकडे "सामावून" घेण्याचा प्रश्नच नाही.
बाकी आपल्याला "सावरकरांचे विचार" आठवल्याचे( चुकीच्या कारणासाठी का असेना) पाहून डोळे पाणावले.

नगरीनिरंजन's picture

13 Aug 2016 - 8:48 am | नगरीनिरंजन

मुसलमानांना काय मान्य-अमान्य असेल ते असेल; सावरकरभक्तांना सावरकरांचे विचार मान्य आहेत की नाही? अखंड भारतवर्षाचं स्वप्न काय त्या त्या प्रदेशातले लोक "साफ" करुन साध्य करणार काय? सावरकर महान होते; पण सावरकरभक्त हा एक महाविनोदी प्रकार आहे आजच्या काळातला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2016 - 9:05 am | कैलासवासी सोन्याबापु

१००००% सहमती नागरीनिरंजन भाऊ!

गामा पैलवान's picture

13 Aug 2016 - 3:40 pm | गामा पैलवान

नगरीनिरंजन,

वडाची साल पिंपळाला लावताय? पाकिस्तानातल्या जनतेने पाकिस्तान कधीच मागितला नव्हता. त्यामुळे तिथली साफसफाई करायचा प्रश्नंच उद्भवत नाही.

कोणाची साफसफाई करायला हवीये ते सावरकरभक्तांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे चिंता नसावी. :-)

आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 7:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

5 बाय 5 च्या लॉनला पाणी घालणे अन 5000 किमी बाय 5000 किमी अंतराच्या लॉनला पाणी घालणे ह्यातले अंतर तुम्हाला झेपत नाही हे स्पष्ट झाले गुर्जी, कारण तुम्ही फक्त लॉनची हिरवाई किंवा झूळवाहतं पाणी बघताय, कुठला कोण तो इस्राएल, अमेरिकेच्या जोरावर अन फक्त तेटरपणा करताच बातम्यात असलेल्या कोकणच्याही पावशेर असलेल्या देशाच्या पॉलिसी अन खंडप्राय प्रिय भारताच्या पॉलिसी ह्यात अंतर समजावे म्हणून आपणाला शुभेच्छा!

प्रदीप's picture

12 Aug 2016 - 8:22 pm | प्रदीप

"कुठला कोण तो इस्राएल, अमेरिकेच्या जोरावर अन फक्त तेटरपणा करताच बातम्यात असलेल्या कोकणच्याही पावशेर असलेल्या देशाच्या पॉलिसी..." इतक्या पटकन तुम्ही इस्राएलला झटकून टाकलंत.

१९९९ साली 'ई. तिमोर' ह्या अगदी चतकोर प्रांताला इंडोनेशियापासून 'मुक्त' करून त्याचे बस्तान बसवण्याचा प्रयत्न करण्याचे महत्कार्य पश्चिमी राष्ट्रांनी उत्साहाने केले. ह्यात ख्रिश्चन धर्माच्या आस्थापनाचाही हात होता. अगदी सर्व प्रकारे (फायनॅन्शियल, अ‍ॅडमिन, इत्यादी) मदत मिळूनही नंतर त्या 'देशा'चे काय झाले? आपापसातील मारामार्‍या, राष्ट्रप्रमुखाच्या खुनाचा प्रयत्न, लाथाळ्या वगैरे सगळे तिथे सुरू झाले आहे. दोनेक वर्षांपूर्वी सुदानमधून फुटून निघालेल्या द. सुदानची काय परिस्थिती आहे?

तेव्हा, नुसता एक प्रदेश टीचभर आहे, आणि त्याला महासत्तेचा पाठिंबा आहे, ह्याव्यतिरीक्तही त्या देशांतील जनतेची प्रगति करण्याची मानसिकता असणे जरूरी आहे.

भंकस बाबा's picture

14 Aug 2016 - 10:54 pm | भंकस बाबा

धन्य जाहलो तुमचे विचार वाचून,
कोण कुठला इस्राईल,
हा तोच इस्राईल आहे ज्याने अमेरिकन बैंकिंग व्यवस्था पोखरून ठेवली आहे,
शत्रुशी लढण्याचे बळ मनगटात नाही तर मनात असावे लागते,
इस्राइलने काय गांधी तत्वज्ञान वापरून आपली मान अरबांच्या हातात द्यावी काय?

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 3:18 pm | संदीप डांगे

गौरक्षक च्या नावाखाली मनुष्यभक्षक चालतील?

मोदक's picture

12 Aug 2016 - 3:21 pm | मोदक

तुम्हाला "गुजरात २००२" म्हटल्यावर दंगल आठवते की साबरमती एक्सप्रेस..?

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 7:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

काय संबंध?? गोरक्षक मुद्दा मांडलाय त्यांनी अन तो समसामयिक मुद्दा (करंट अफेयर) आहे भाऊ, तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण करताय का? का मुद्दाम तिसरेच वळण देताय ??

डांगेबुआ किंवा आम्ही, आमचे लफडे एकच आहे, आम्हाला बाबू बजरंगी सुद्धा राष्ट्रद्रोही वाटतो अन तिस्ता सेटलवाड सुद्धा, आम्ही माया कोडणानीला सुद्धा शिव्या घालतो अन कविता कृष्णनला सुद्धा, फक्त बदल्यात आम्हालाही शिव्याच मिळतात (अर्थात आम्ही तो डबल बोनस समजतो, विकटीम नाही समजत स्वतःला),

आपलं आयुष्याचं तत्व आहे "भारत....भारत अन फक्त भारतच" जो माणुस जी बाजु माजणार त्यांना मी शिव्याच घालणार.

तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण करताय का? का मुद्दाम तिसरेच वळण देताय ??

त्यांना पण आजादी हवी असेल असे वाटले.. किंवा किमान भारताचे तुकडे बिकडे व्हावे असे वाटत असेल तर स्टँड क्लियर असावा म्हणून विचारले.

बादवे.. काड्या टाकल्यावर पण त्याला प्रत्युत्तर देवू नये असे काही अपेक्षित आहे का..?

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2016 - 10:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

त्यांना पण आजादी हवी असेल असे वाटले.. किंवा किमान भारताचे तुकडे बिकडे व्हावे असे वाटत असेल तर स्टँड क्लियर असावा म्हणून विचारले.

ओके ठीक आहे, तुम्ही शिक्के मारलेच आहेत तर आता समजवणे वगैरे उपयोगाचे नाही, हॅपी पूर्वग्रह टू यु बॉस! डांगेंना कम्युनिस्ट समजणे किंवा त्यांना असले प्रतिसाद देणे ह्यातून तुमचे काही वैयक्तिक असले तर मला माहिती नाही किंवा डांगेंची वकिली ही मी करत नाही, फक्त जवळच्या मित्रमंडळीत कोणी जर stereotype करत असले तर मात्र ते मी बोलून दाखवतो

बादवे.. काड्या टाकल्यावर पण त्याला प्रत्युत्तर देवू नये असे काही अपेक्षित आहे का..?

बाय द वे, तुम्हाला गोरक्षक मुद्दा काडी का वाटावा म्हणे इथे??

बाय द वे, तुम्हाला गोरक्षक मुद्दा काडी का वाटावा म्हणे इथे??

अहो त्यांनीच खाली लिहिले आहे की.. गोमूत्र वगैरे..

संदीप डांगे's picture

21 Aug 2016 - 10:47 pm | संदीप डांगे

मोदकराव, मला आझादी हवी किंवा भारताचे तुकडे हवेत असे माझ्या कोणत्या प्रतिसादातून दुरान्वयेही ध्वनित होते आहे ते सिद्ध करावे, तुम्हाला वाट्टेल ते बोलण्याची मुभा उगाच मिळू शकत नाही.

मला काय हवंय या बाबतीत तुम्ही तुमचा पूर्वग्रह माझ्यावर लादत आहात हे वरच्या प्रतिसादात स्पष्ट आहे, स्वतःच मेलेल्या गायीचे चामडे सोलायला बोलवायचे आणि मग कांगावा करत गावासमोर गोहत्येचा बोभाटा करायचा ह्या पद्धतीत आणि तुम्ही वर करत असलेल्या पद्धतीत तिळमात्र फरक नाही,

कायम संतुलीतपणाचं तुणतुणे वाजवणाऱ्यांकडून हि अपेक्षा नव्हती,

बादवे, काडी टाकली तर योग्य उत्तर द्याना, गोध्राचा काय संबंध? गौरक्षकांचा त्रास सर्वानाच (सर्वधर्मीय)होतोय, तुमच्या रोजच्या जीवनात बघत नसाल पण गौरक्षक मोदीसरकार आल्यापासून माजलेत हे मी तरी बघतोय, त्यांची बाजू घेऊ नका,

जसे आईसीस वाले बिनडोक तसे हे हिंदुत्ववाले बिनडोक, आम्हाला हे दोन्ही बिनडोक आमच्या भारतात नकोत, मला मशिदीचे भोंगे नकोत कि गणपतीचे डीजे नकोत,आझादी हवीच आहे पण सर्वच धर्मातल्या धर्मांधांकडून...

माझा स्टॅन्ड क्लिअर झाला असावा अशी अपेक्षा आहे, तसेच यापुढे कुणाला काय वाटत असेल याचे स्वतःच्या पूर्वग्रहानुसार आडाखे बांधू नका, त्यालाच सरसकटीकरण म्हणतात, जे तुम्हाला अजिबात आवडत नाही, नाहीतर पोटात एक ओठात एक असं दिसून हसं होऊ शकतं, ते टाळलं तर उत्तम,

बाकी, शुभेच्छा!

हैला.. इतके काय चवताळताय..? धागा मागे पडत होता म्हणून मी पण थोडे गोमूत्र शिंपडायचा प्रयत्न केला हो.
हलके घ्या की.

बाकी या साद-प्रतिसादा मध्ये वेगळे काही अपेक्षित नव्हते. दहशतावाद्यांचे मानवाधिकार जिवापाड जपणारे दहशतवादाला बळी पडणार्‍यांचे मानवाधिकार सोयीस्करपणे विसरतात तसे तुम्ही काडी टाकल्यानंतर दुसराही तशीच काडी टाकू शकतो हे तुम्हाला पचवायला जड का गेले याची उत्सुकता आहेच.

मी वैयक्तीक झालो असे म्हणणे असेल तर मी प्रतिसाद मागे घेतो. आपले बाकी मुद्द्यांवर कितीही मतभेद असले तरी तुम्हाला (किंवा आणखी कोणालाही) स्टिरीओटाईप करण्याची मला आवश्यकता भासणार नाही.

तुम्हालाही शुभेच्छा..!!

संदीप डांगे's picture

22 Aug 2016 - 12:28 am | संदीप डांगे

शिक्क्यांचा राग आहे, इतकेच कारण पुरेसे आहे चवताळायला, जसा तुम्हाला सरसकटीकरनाचा आहे तसाच!

मोदक's picture

22 Aug 2016 - 12:42 am | मोदक

कळाले हो..

तुम्ही, डॉक्टर खरे, बोका, बापू ही सगळी शिनेर मंडळी.. तुमच्यावर शिक्के मारायची आगळीक आमच्याकडून होणे नाही.

गणामास्तर's picture

12 Aug 2016 - 3:24 pm | गणामास्तर

मनुष्यभक्षक ऐवजी दलितभक्षक शब्द अधिक योग्य आहे असे मला वाटतंय.

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2016 - 3:25 pm | श्रीगुरुजी

त्यांना आश्रय देण्याचा प्रश्नच गैरलागू आहे. ते काही बाहेरून इथे येत नाहीत. ते इथलेच आहेत.

सुबोध खरे's picture

12 Aug 2016 - 7:22 pm | सुबोध खरे

डांगे अण्णा / मास्तर
गोरक्षक आणि दलित हा मुद्दा येथे कसा आला?
धागा आयसिसचा आहे ना?
का तुम्हालाहि चंपाबाई( कि बुवा) चा गुण लागला

संदीप डांगे's picture

13 Aug 2016 - 12:22 am | संदीप डांगे

काय करणार?
धागा चालत नव्हता. थोडे गोमूत्र शिंपडले तर बघा कसा धावायला लागला. =))

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2016 - 2:41 pm | श्रीगुरुजी

हाहाहा!

गामा पैलवान's picture

12 Aug 2016 - 9:25 pm | गामा पैलवान

सोन्याबापू,

हे काय लिहिलंय तुम्ही? भयंकर गैरसमज झालेले दिसताहेत तुमचे. कृपया हे विधान पहा :

१.
>> तर साक्षात फाळणीच्यावेळीही हिंदूंचे शिरकाण पाहून देखील ज्यांना धर्म, नवा हक्काचा लोकशाही देश ह्यांच्याप्रती
>> ममत्व न राहता जन्मस्थानाशी (भौगोलिक) घट्ट इमानदार राहायची इच्छा होती, त्यांच्यावर आज भरोसा ठेवायचे
>> कारण नाही असे वाटते,

हे तुम्हीच म्हणताय की इतर कोणी? बहुतेक तुम्हीच असं गृहीत धरतो.

अ.
पहिली गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान आधी स्वतंत्र झाले आणि नंतर सीमारेषा ठरली. त्यामुळे आजच्या पाकिस्तानातल्या (विशेषत: लाहोरातल्या) हिंदूंना सगळं सोडून पळून जावं लागेल अशी शंकाही आली नाही. जेव्हा दंगली सुरू झाल्या तेव्हा पळून जाणं धोक्याचं होतं. जे हिंदू भारतात पळून आले ते नाईलाजाने आले आहेत.

आ.
पाकिस्तान हे सेक्युलर राष्ट्र राहावे अशी जिनांची इच्छा होती. त्यांनी असेंब्लीमधल्या पहिल्या भाषणात नि:संदिग्ध शब्दांत अशी ग्वाही दिली होती. (असं होतं तर पाकिस्तान वेगळा काढलाच कशाला हा प्रश्न उपस्थित होतो. पण त्यासाठी वेगळा धागा काढूया.)

त्यामुळे दंगली संपल्यावर हिंदूंना पाकिस्तान सोडून जायचं कारण नव्हतं.

इ.
हिंदू जन्मस्थानाशी घट्ट इमानदार राहतात कारण अथर्ववेदात 'माता भूमि पुत्रोऽहं पृथिव्या' असं सूत्र आहे. केवळ राजवट बदलली म्हणून हिंदू भारताचा शत्रू होत नाही.

ई.
नेहरूंनी अंगिकारलेलं तत्कालीन धोरण शरणार्थींना सोयीचं नव्हतं. कन्हैय्यालाल तलरेजा सिंधमधून रातोरात भारतात पळून आले तेव्हा नेहरूंनी त्यांना परत पाठवायचं ठरवलं. शेवटी कित्येकांनी विरोध केल्यावर तलरेजांना भारतात राहायची कशीबशी अनुमती मिळाली.

नेमकं हेच धोरण मोदी येईस्तोवर चालू होतं. अगदी तस्लिमा नसरीनला सुद्धा भारतात राहू दिलं गेलं नाही. कल्पना करा कोणी गरीब हिंदू शरणार्थी म्हणून भारतात आला आहे आणि भारत सरकार मोठ्या प्रेमपूर्वक रीतीने त्यास परत पाकिस्तानी सरकारच्या तावडीत सोपवत आहे.

२.
>> आज पाकिस्तान मध्ये हिंदू कापत आहेत म्हणून ही माणसे गळा काढणार, मग आपल्याकडली काही धर्मप्रेमी
>> गाढवे त्यांची उष्टी खरकटी काढायची बात करणार, ...

धर्मप्रेमी गाढवे? कुणाच्याही अध्यातमध्यात नसलेल्या हिंदूंना कापून काढण्याविरुद्ध निषेध करणारे गाढव आहेत? पाकिस्तानात २४% हिंदूंचं शिरकाण होऊन ते अवघ्या २% वर उतरलेत. तुम्ही त्या अभाग्यांना भारतात येऊ देऊ नका म्हणताय आणि वर त्यांच्या हालअपेष्टांचा निषेधही करायचा नाही म्हणून सांगताय? काय हे!

३.
>> हे झाले, ते सगळे भारतात आले, अन उद्या जर पाकिस्तान ने त्यांना इन्सेंटिव्ह किंवा किमान सुरक्षा देऊन
>> परत बोलावले तर ?? ती किती मोठी रिस्क असेल हे आपण इमॅजिन करू शकता का?

गेल्या तेराशे वर्षात उलटी गंगा किती वेळा वाहिली आहे? काहीतरीच युक्तिवाद नका करू.

असो.

एकंदरीत सांगायचं झालं तर तुम्ही ज्याला भारतीय म्हणता त्यातलं भारतीयत्व हिंदूंमुळे जिवंत आहे.

आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 9:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

काय बोलणार असो! तुम्हाला तुमची मते लखलाभ मला माझी, भारतीयत्व अन हिंदुत्व कधीच एक नव्हते नाही अन नसेल, ही मात्र काळ्या दगडावरली रेघ आहे :)

गामा पैलवान's picture

13 Aug 2016 - 2:31 am | गामा पैलवान

सोन्याबापू,

मला तुमची मतं पटली नाही तरी तुमच्यावर माझी मतं लादणार नाही. केवळ वस्तुस्थिती सांगून तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडून देईन म्हणतो.

हिंदूंमुळे भारतात सेक्युलारिझम टिकून आहे हे दिल्लीच्या जामा मशीदीचे इमाम बुखारी यांचं मत आहे. भाऊ तोरसेकरांच्या या लेखात याचा उल्लेख आहे :

>> ‘राजकीय पक्षांना फ़क्त अल्पसंख्यांक आणि दुर्बळ समाज घट्काची मते मिळवणे तेवढे माहित आहे, पण त्या पक्षांनी
>> अशा वर्गाच्या कल्याणासाठी काहीच केलेले नाही. देशामध्ये धर्मनिरपेक्षता टिकून राहिली असेल तर ती कुठल्या
>> राजकीय पक्षामुळे नव्हेतर हिंदूंमुळे शिल्लक उरली आहे.’

मूळ इंग्रजी लेख इथ आहे : http://www.rediff.com/news/2006/oct/28bukhari.htm

भारतात जिकडे हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले. हेच भाग स्वत:ला भारत म्हणवून घेत नाहीत आणि नेमके तेच भाग आज दहशतवाद्यांच्या तावडीत सापडले आहेत. काश्मीरही त्याच मार्गाने चाललाय. तेव्हा माझ्या मते हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे.

मी इथे थांबतो. :-)

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

13 Aug 2016 - 12:15 pm | सुबोध खरे

हिंदूंमुळे भारतात सेक्युलारिझम टिकून आहे.
यात दुमत नाहीच
इस्लामला लोकशाही "मान्यच" नाही. तेथे फक्त "धर्माधिष्ठित खलिफा"चेच राज्य असू शकते. त्यामुळे कोणत्याच इस्लामी राष्ट्रात लोकशाही नीट नांदू शकत नाही. मग धर्मनिरपेक्षता तर दूरच राहिली.

चंपाबाई's picture

13 Aug 2016 - 6:01 pm | चंपाबाई

इस्लाम येण्यापुर्वी भारतात चारशे की कितीसे राज्ये की संस्थाने होती ... ते इक्ष्वाकु , यादव , भरतकुळ ..... जनतेला वतनदारी दिली की जनता माजते ! वतनदारी बंद ! पण छत्री मात्र माझ्याच घराण्यात राहील ... जी म्हाराज !

हे सगळं लोकशाहीचंच चित्रण का ?

बायदवे , एका मुसुलमानाने बांधलेल्या लाल किल्ल्यावर परवा लोकशाही देशाचा झेंडा सालाबादप्रमाणे फडकणार आहे ... तुम्ही लेफ्फ्फ राइट्ट करत सलाम ठोकायला जाणार नै का ?

सुबोध खरे's picture

13 Aug 2016 - 6:26 pm | सुबोध खरे

मग आपलं म्हणणं काय? बामियान बुद्धाची मूर्ती तोफा डागून नष्ट केली तशी करावी काय?
मी तर उलट म्हणेन एका मुसलमानाने बांधलेल्या किल्ल्यावर तिरंगा फडकतो आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. जगभरात कुठेही कुठल्याही वास्तूवर(इस्लामाबादच्या संसदेवर असेल तर नक्किच) तिरंगा फडकणार असेल तर तिचा मला जरुर अभिमान आहे आणी वाटेल.

चंपाबाई's picture

13 Aug 2016 - 7:07 pm | चंपाबाई

इस्लामाबादचं नंतर बघा .. नागपूरला तिरंगा फडकवला काय?

अर्धवटराव's picture

14 Aug 2016 - 1:26 am | अर्धवटराव

तुम्हाला नाहि दिसला? शक्यता कमिच आहे म्हणा. ज्याच्याशी काहि घेणंदेणंच नाहि त्याच्याकडे बघावं तरी का... नाहि का?

चंपाबाई's picture

14 Aug 2016 - 1:41 am | चंपाबाई

देश स्वतंत्र झाल्यावर ४० की ५० वर्षानी नागपूरकर संघाने तिरंगा लावला ना ?

वा काय हे राष्ट्रप्रेम !

http://www.indiasamvad.co.in/viewpoint/when-rss-denigrated-the-choice-of...

अर्धवटराव's picture

14 Aug 2016 - 1:57 am | अर्धवटराव

देशप्रेम?? हि काय भानगड म्हणायची? बद्धकोष्ठमुक्तीसोबत नशापाणि सुद्ध पुरवतं का एरंडेल ?

विनायक प्रभू's picture

13 Aug 2016 - 6:00 pm | विनायक प्रभू

गुर्जी, आता "मिपासिस" होउ घातलेय त्यावर पण एक अमर धागा येउ द्यात.शिंपण करायला संडां आहेतच.

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2016 - 10:24 pm | श्रीगुरुजी

मिपासिस?

चंपाबाई's picture

14 Aug 2016 - 8:38 am | चंपाबाई

आयसिस वाले कितीका मेंबर गोळा करेनात.

आमच्या भाजपाने मोदींच्या व शहांच्या मार्गदर्शनाखाली , मिस कॉल द्या अन मेंबर व्हा, असा मेंब (ढ) रं गोळा करायचा जागतिक विक्रम केलेला आहे.

त्यामुळे आमि नै बै कुनाला घाबरत !

गामा पैलवान's picture

14 Aug 2016 - 11:56 am | गामा पैलवान

बरोबर आहे बाईसाहेब ! तुमचं शौर्य बघून दस्तुरखुद्द आम्हीच तुम्हांस वचकून आहोत ! मग बाकी जगाची काय कथा !!
आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2016 - 8:38 pm | श्रीगुरुजी

मुंबईतील ५ जणांनी आयसिसमध्ये जाण्यासाठी देश सोडला.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/mumbai-5-people-left-india-to-j...

त्यांना तिकडेच मरून द्यावे व तिथूनच स्वर्गात जाऊ द्यावे. त्यांच्या स्वर्गप्राप्तीच्या आड येऊ नये.

Good riddance!

सोन्याबापू ,
तुमचा मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.
फाळनीच्या काळात , १९४० च्या दशकात काय परिस्थिती होती, त्याचा विचार करुयात.
आजचा भारत, आजचा पाक- बांग्लादेश असे दोन भूभाग होते. ह्या भूभागात चार लोक हहिंदू
१. आजच्या भारतातले हिंदू/ गैरमुस्लिम
२. आजच्या भारतातले मुस्लिम
३. आजच्या पाक-बांग्लादेशातले मुस्लिम
४. आजच्या पाक-बांग्लादेशातले हिंदू/ गैरमुस्लिम
.
.
.
ह्यातल्या हरेकापुढे काय पर्याय होते पाहू.
१. आजच्या भारतातले हिंदू/ गैरमुस्लिम :-
ह्यांनी पाकिस्तानात जायचा प्रश्नच नाही. पाकिस्तान धर्माधिष्ठित देश आहे. मुस्लिमांसाठी आहे. तेव्हा ह्यांनी आहे तिथेच रहायचं ठरवलं असावं. तसं न ठरवता, पाक- बाम्ग्ला देशात जातो असं जरी कुणी म्हटलं; तरी त्या म्हण्ण्याला अर्थ नाही. ते शक्य नव्हतं. ह्यांच्या मर्जीचा, हानीचा थेट प्रश्न तितकासा तीव्र नसावा ( तुलनेने)
.
.
२. आजच्या भारतातले मुस्लिम
भारत सरकारने हा देश फक्त हिंदूंचा असनार नाही. उपासना पद्धतीवर भेदभाव केले जाणार नाहित; जो इथलाच आहे, ज्याला इथेच रहायचय; त्यानं इथे रहावं. आमचे नागरिक म्हणून तुमची सुरक्षा आम्ही करु; असं आश्वस्त केलं होतं. दंगे झाले, तरी सरकारचं अधिकृत धोरण मुस्लिमांना दुय्यम नागरिक करुन सोडणं हलाखीचं जगायला लावणं हे नव्हतं. होता होइल तोवर सरदार पटेल व त्यांच्या गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था राखायचा प्रयत्न केला. इथल्या मुस्लिमांची इथे राहयची इच्छा असेल तर ती पूर्ण झाली.
जर एखाद्या भारतातल्या मुस्लिमाला वाटलं की भारतापेक्षा माझं, माझ्या कुटुंबाचं भलं पाकिस्तानात होणार आहे; तर त्याच्या स्वागताची भूमिका पाकिस्तान सरकारची होती. " मुस्लिमहो, या, इकडे या. एक नवा देश घडवू इथल्या मुस्लिमांसाठी. तुमची रहाय-खायची वय्वस्था आम्ही करु. न्निश्चिंत होउन या." असं जणू आवाहन होतं.
( नंतर 'मुहाजिर' आणि त्या प्रश्नाचं काय झालं; ते तूर्तास बाजूला ठेवू.)
म्हंजे इथल्या मुस्लिमाला ऑप्शन होता की उद्योगधंदा इथे असेल तर इथेच रहावे. गरज पडल्यास सरकारकडे गार्‍हाणे मांडावे सुरक्षेचे. सरकार कटिबद्ध आहे. नैतर शेजारी देश आहेत.
म्हणजे खरे ऑप्शन ह्यांना उपलब्ध होते.
.
.
३. आजच्या पाक-बांग्लादेशातले मुस्लिम :-
ह्यांना आहे तिथेच राहिल्यास ...म्हणजेच पाकमध्ये राहिल्यास "अधिक प्राधान्याची वागणूक मिळण्याची शक्यता" दिसत होती. किम्वा निदान आहे तिथेच राहिल्यास दुय्यम न ठरण्याची ग्यारंटी होती. शिवाय जर त्यांनी भारतात यायचच ठरवलं काही कारणानं; तर त्यालाही तत्वतः भारत सरकारची ना नव्हती. संख्येने थोडे का असेनात, असेही काही मुस्लिम आलेत.
काही चटकन आथवणारी उदाहरणं --
शाहरुख खानचे एक नातेवाइक ( काका की आजोबा ) आझाद हिंद फौजेत होते. त्यांना पाकिस्तान ही कल्पनाच पटेना. ( 'जमात -ए- इस्लामी हिंद' ह्या धार्मिक , मुस्लिम संघटनेने देखील फाळणीला विरोध केला होता. कारण ? देशाचा आधार समान धर्म नव्हे तर समान संस्कृती असावी; अशी त्यांची निदान अधिकृत भूमिका होती/आहे.)
दिलीपकुअमार ऊर्फ युसुफ खान ह्यांचे जन्मगाव पेशावर. पण त्यांनीही फाळणीनंतर भारतात राहणे पसंत केले.
.
.
४. आजच्या पाकिस्तानातले गैरमुस्लिम्/हिंदू --
तुम्ही आजवर जिथे रहात आलेले आहात; तो भूभाग आता धर्माधिश्ठित मुस्लिम राष्ट्र म्हणून गणला जाणार आहे; हे त्यांना सांगण्यात आलं. आख्ख्या सरकारी यंत्रणेनं ह्यांचं अस्तित्व नाकारलं. "तुम्ही आता आमच्या पाकिस्तानात रहायचं नाही; असा प्रस्ताव आता फायनल झालेला आहे" असा चमत्कारिक संदेश जणू ह्यांना गेला.
हे न्याय्य होतं काय ? आजपासून तुम्ही इथले नाहितच. असा थेट संदेश.
वरील गटांकडे बघा. त्यांनी कुठे रहायचं ह्याचं त्यांना स्वतंत्र्य आहे. (गट क्र २ व गट क्र ३)
गट क्र१ ला तसे स्वातंत्र्य नसले ; तरी तसे थेट फारसे काही नाही. ( गट क्र १. चे उदाहरण मह्णजे कर्नाटकातला हिंदू. त्या कर्नाटकातल्या हिंदूला जर सांगितलं की तुझा आजपासून पश्चिम पंजाब ,सिंध , पूर्व बंगाल प्रांताशी संब्म्ध नाही. तू तिथला फर्स्ट क्लास सिटिझन होउ शकत नाहिस. तर त्याची प्रतिक्रिया किती तीव्र असनार आहे ? त्यात भावनात्मक मूल्य जरुर असेल. अस्मितेचा प्रश्नही असेल. आपल्या देशाचे तुकडे पडताना पाह्णं हाच क्लेशदायक अनुभव.मान्य. पण थेट व्यावहारिक असं धर्मसंकट असण्याचे चान्सेस कमीच. तो फार तर खांदे उडवत किंचित नाराजीनं "ओके" म्हणेल.)
गट क्र २ व गट ३ ला स्वातंत्र्य आहे. गट क्र १ ला स्वातंत्र्य नाही; पण त्रासही नाही.
गट क्र ४ चे काय ? त्याने कुठे राहायचय हे बाकीच्या तीन गटातल्यांनी मिळून फायनल करुन टाकलेलं आहे.
"तू आजवर कुठे राहत होतस, तुझे वाडवडिल काय करत होते, कशाचा काहीही संब्म्ध नाही. आम्ही ठरवलय. तुझं अस्तित्व शून्य. तुझं जे काही तिथे असेल, उद्योग धंदा, शेती वाडी, घर दार सगळं बर्‍या बोलानं सोड. आणि धावत सूट. जीव घेउन पळत सूट दिल्लीकडे. तिकडे आश्रय मिळेल. तिकडे निर्वासित म्हणून रांगेत उभा रहा आणि भिक्षा म्हणून जे मिळेल ते खा. हात पसरुन उभा रहा."
हा संदेश त्याच्याकडे गेलाय. त्यानं कुठे रहायचं हा निर्णय आधीच केला गेला होता. फार फार मोठ्या प्रमाणावर ठेचला, चिरडला, भरडला गेलेला ,मुस्क्टफ्दाबी झालेला वर्ग हा आहे.
जे दंगे झाले; त्यात उरलेल्या तीन गटांनीही बरच सोसलं. हिंसेत अनेकानेक जीव गेले. दहा वीस लाख )दोनेक मिलियन जीव गेले) असावेत. पण व्यवस्थेनं भक्कम पाठिंबा त्यांच्या शिरकाणास दिला नव्हता.
.
.
बॉस, एकदा शांत डोक्यानं विचार करा. चौथ्या गटाकडे काय ऑप्शन होतं. घर दार सोडून येणं भाग होतं. )विकायची सोय नाही. विकायसाठी भागात स्थैर्य लागतं साहेब. जर सर्व पब्लिकला माहितित्ये की तुम्ही सगळं चंबु गबाळं आवरुन पळणारच आहात; तर तुमच्याकडून घर खरेदी करायची कोणालाच गरज नाही.)
पाकिस्तान जेव्हा म्हणत होतं " या मुस्लिमहो इकडे या रहायला आम्ही तुमच्या रहायची खायची प्यायची वय्वस्था करु. बडदास्त ठेवू." तेव्हा ते अचानक हे सगळे " व्यवस्था " कशी अक्रणार होते ? " बडदास्त " कशी ठेवणार होते ? एक प्लान होता, अशा पळून गेलेल्या हिंदूंची घरं तिकडून करुन ; आलेल्या मुस्लिमांत वाटून टाकायचा!
असो. अवांतर होतय.
सिंधमधल्या हिंदू माणसानं काय करावं ? कुटुंबाचं काय करावं? लेकि बाळींची काळजी कशी घ्यावी? खाणार काय?
.
.
ह्याचवेळी जिन्नांनी चमत्कारिक वाटेल अशी भूमिका मांडली " हे मुस्लिम राष्ट्र असले तरी प्रोग्रेविश असनार आहे. निधर्मी मुस्लिम राष्ट्र राहणार आहे." ( नंतर पाकिस्ताननं जिन्नांच्या ह्या इच्छेचं किती पालन केलं ; तो भाग वेगळा.) ह्या अशा वेळेला चौथ्या गटातल्या लोकांचा संभ्रम वाढला असू शकतो.
बाहेर जाउन खायचे काय, ते माहित नाही, सध्या कसे बसे तगून राहूत. स्थानिकांच्या मदतीने काही दिवस दबून , लपत छपत काढून; परिस्थिती निवळल्यावर पुन्हा आपापला कामधंदा सांभाळूत ; असा विचार केला सणं अशक्य आहे का ?
असा विचार करा. देव न करो पण उद्या पुन्हा माझ्या मायदेशावर असच संकट आलं तर ? आणी घोषित झालं की दक्षिणेतल्या चार राज्यांत काय ते तुम्ही हिंदू राहू शकता. बाकीच्यांनी इथून सटकावं. कल्पना करा. महाराष्ट्रात शेती करनारा माणूस केरळात समुद्र किनार्‍यावर जाइल ? त्यानं का जावं ? त्याच्या वतीनं परस्पर कुणी कसा काय निर्णय घेउ शकतं ? जिवंत राहन्याच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होते आहे.
.
.
फाळणी ही अशी झाली त्यावेळीच चमत्कारिक परिस्थिती घेउन झालेली आहे. त्यावर लागलिच तार्किक वाटेल अशी भूमिका घेउन "ते शत्रू देशाचे नागरिक आहेत" असं त्यांना ट्रीट केलं जावं का ? मुळात हे दोन वेगळे देश नव्हतेच. त्यांनी तुमच्या शत्रू राष्ट्रात राहून तिथले टॅक्स पेयर हॉण्याचा निर्णयही स्वतःहून घेतलेला नाही.
तो प्रश्न अजूनही अर्धवट आहे. "तो प्रश्न संपलाय. तिथले नागरिक तिथलेच." असं प्लीझ म्हणू नका; ही कळकळिची विनंती. त्यांना तिथलं सरकार disown करतय. आणि ते तसं केलं जाण्याला इतर तीन गटांतले लोक जिम्मेदार आहेत. त्यांनी परस्पर केलेल्या वाटणीत धिंडवडे चौथ्या गटातल्या लोकांचे निघालेत.
ही गुंत आहे; हे समजते आहे. प्रत्येक गटातल्या लोकांची आपली दु:खं , कन्सर्न असणार हे ठाउक आहे.
पण तुमच्याविषयी संपूर्ण आदर ठेवूनही ही विनंती करतो ही भूमिका काहिशी निष्ठूरपणाची आहे त्यांच्याप्रती.
हा प्रश्न एकरेषीय नाही. गुंतागुम्तीचा आहे. विचार करुन बघा.
.
.
मुस्लिम हे शत्रू आहेत; किम्वा पाकडे कायमचे शत्रूच आहेत; किंवा भारत हिंदूंचाच आहे;
ह्यातली एकही भूमिका मी मांडत नाहिये. इतिहासाच्या चाकच्या विचित्र कात्रीत अडकललेल्या समजाप्रती जरा कणव असू द्या; इतकच म्हणतोय.

मन१'s picture

21 Aug 2016 - 10:34 pm | मन१

सांगायचा मुद्दा --
जमेल तितपत आहे तिथेच ह्यांनी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. एखाद दोन पिढ्यांपर्यंत हे जमलं. नंतर तिथली परिस्थिती अधिकाधिक भीषण होत चालली. म्हणून मग जीवाच्या भीतीनं शेवटी त्यांनी आपल्याकडे आश्रय मागितलाय.
आश्रिताकडे आपण कसं पाहणार आहोत ? बाम्धवाकडे आपण कसं पाहणार आहोत?
.
.
१९७१ ला भारतानं अनेकानेक रेफ्युजी कॅम्प्स उघडून पूर्व पाकिस्तानातल्या म्हंजेच बांग्लादेशातल्या लोकांना मानवी दृष्टीकोनातनं मदत केली. शरनार्थ्यांची होइल तित्पत काऴजी घेतली. अगदि हिंदू- मुस्लिम सर्वच शरणार्‍थ्यांकडे लक्ष दिलं. तेव्हा तर फाळणी होउन केवळ पंचवीस वर्ष झालं होती. जखमा ताज्या होत्या. तरी भारत माणुसकी विसरला नाही. बंधुभाव विसरला नाही.
आज आपण शरणार्थ्याकडे काय म्हणून पाहणार आहोत ? सहिष्णुतेचा गौरव करणारा व परंपरा आंतरराष्ट्रिय व्यासपीठावर अभिमानानं सांगणारा हा देश आज एका अर्थानं आपल्याच नागरिकांकडे कसा पाहणार आहे?

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2016 - 10:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

शांतपणे विचार केला, तुम्ही लिहिलेला प्रतिसाद नीट वाचला, काही भाग अदमासे आहेत पण ते चालण्यासारखे आहेत, कारण माझे ही काही मुद्दे अंदाजे किंवा अझ्युम्ड होतेच की, हेल्दी डिबेट मध्ये ते बेनेफिट समसमान हवेच

तर, तुमचा मुद्दा पूर्ण जरी नाही तरी बव्हंशी पटला आहे, मी माझा मुद्दा मागे घेतो, अर्थात माझी मानसिकता अशी व्हायला काही करणे आहेतच, अर्थात ती कायमच जस्टिफाईड असावीत असा माझा दावा नाही,

शुभेच्छा :)

-बाप्या

मन१'s picture

22 Aug 2016 - 8:26 am | मन१

इन जनरल भावना समजून घेतल्याबद्दल आभार. काही भाग अदमासे आहे (शिवाय मी आकडेवारी दिलेलीच नाही ) हे ही मान्य. पुनश्च आभार.

अर्धवटराव's picture

24 Aug 2016 - 3:47 am | अर्धवटराव

इतक्यात मिपावर इतकं समंजसपणाने प्रतिसाद देण्याचं प्रमाण थोडं वाढलय असं जाणवतय.

बरं आहे.

नाखु's picture

25 Aug 2016 - 11:52 am | नाखु

विशेषतः "नितएरंडेल प्राशन स्वमुख सुर्य पिचकारी सहित मानभावी मानवतावाद्प्रेमी, एककल्मी कारेक्रमप्रवीण मसीह्यांचा सक्रीय धुळवड सहभाग असूनही"

वाचकांचीच पत्रेवाला नाखु