काश्मीर - वल्गना आणि वास्तव.

संदीप ताम्हनकर's picture
संदीप ताम्हनकर in काथ्याकूट
21 Jul 2016 - 1:40 pm
गाभा: 

काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

21 Jul 2016 - 2:10 pm | कपिलमुनी

टोळधाड येत आहे

गॅरी ट्रुमन's picture

21 Jul 2016 - 2:22 pm | गॅरी ट्रुमन

याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच....

हे वाक्य वाचले आणि पुढचे काही वाचायची इच्छाच राहिली नाही.

बाकी चालू द्या.

मूळ मुद्दा असा आहे की 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' हा कायदा काश्मिरात का आणि पुण्यात का नाही याचा जरा निरपेक्ष विचार करा उत्तर तुंम्हाला सापडेल आणि तुमचे मुद्दे किती योग्य ते तुम्ही ठरवू शकाल

सतिश पाटील's picture

21 Jul 2016 - 2:39 pm | सतिश पाटील

उचलली जीभ अणि लावली टाळ्याला

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2016 - 2:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे काय?

राष्ट्रवादात पण ३०-६०-९०-क्वार्टर-हाफ-फुल अशी सिस्टम असते काय? तुम्ही लिबरल असाल अन लिबरल तत्वातच देशाच्या १२५ कोटी जनतेचे हित समाविष्ट असल्याचे तुम्हाला ठामपणे वाटत असेल तर ते उघड मान्य करा, मोदी, डोवल वगैरे असू दे, आधी ताकाला जाऊन भांडी लपवणे सोडावेत हे सुचवतो.

अवांतर - डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.

गंम्बा's picture

22 Jul 2016 - 12:26 pm | गंम्बा

अवांतर - डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.

बाप्पु,

हे तुम्हीच लिहीलेत हे बरे झाले.

तसेच सैन्यावर जी पातळी सोडुन टिका आहे त्याचे पण तुम्ही खरमरीत उत्तर द्याच.

काश्मीर मधे सैन्याला कीती हात बांधुन आणि पॉलिटीकली करेक्ट भुमिका घेउन ( पटत नसली तरी ) काम करावे लागते ह्या बद्दल पण लिहाच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2016 - 1:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.

+१०००

काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल?

असे अवास्तव आणि प्रक्षोभक लिहिण्याऐवजी खालीलप्रमाणे लिहिणे वास्तवाला धरून होईल...

काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात जेथे,
(अ) लष्कराला दोषी ठरवून स्वार्थी हितसंबंध साधणारे राजकिय व अराजकीय (पन इंटेंडेड) नेते शेकड्याने आहेत,
(आ) सीमेपलिकडून येणारा पैशाच्या लालचीपायी काश्मीर घगघगत ठेवण्यासाठी प्रयत्नशील लोक आहेत,
(इ) पाकिस्तानाचे बाहेरून अतिरेकी पाठवणे आणि स्थानिक मुलकी नागरिकांना फूस देणे सतत चालू असते, व
(ई) संकुचित स्वार्थासाठी देशाला धोका पोचणारा कांगावाही करायला मागेपुढे न पाहणारे व नसलेले दोष हुडकून काढणारे तथाकथित लिबरल मोठमोठी बहिर्गोल भिंगे रोखून सतत तयार आहेत... ज्यांच्या लेखी अतिरेक्यांच्या मानवी हक्कांचा कळवळा सर्वोच्च आहे पण अतिरेक्यांच्या गोळांना बळी पडणार्‍या निरपराध सामान्य नागरिकांच्या व त्यांचे संरक्षण करणार्‍या सैनिक-पोलिसांच्या जीवाची किंमत शून्य आहे;
अशा ठिकाणी भारतिय लष्कराला किती संयमाने, धोकादायक व तणावपूर्ण परिस्थितीत काम करावे लागत असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे.

महासंग्राम's picture

23 Jul 2016 - 12:29 pm | महासंग्राम

https://www.youtube.com/watch?v=qLjZl0ay3oc

इंडियन आर्मी वरची documentry पाहून बहुदा यांचे डोळे उघडतील.

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2016 - 2:55 pm | एकुलता एक डॉन

हैदर चित्रपट बघा
उडत पंजाब ला कात्री आणि त्याला नाही

तिमा's picture

21 Jul 2016 - 3:05 pm | तिमा

काश्मीरातील वास्तव हे आहे की बहुसंख्य काश्मीरींना (पश्चिमी भागातल्या) स्वतंत्र होण्याची मनांतून इच्छा आहे. अगदी २५-३० वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो, तेंव्हाही हॉटेल मालकापासून अनेकांनी, 'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का' असे आम्हाला विचारले होते. ते स्वतःला अजूनही भारताचे मानायला तयार नाहीत. पण त्याचवेळी, पाकिस्तानात जावे लागले तर, या भीतिने, त्यातले मवाळ जास्त आग्रह धरत नाहीत. पण पाकिस्तानची फूस असल्यामुळे जहालवादी हिंसक आंदोलने करतात आणि अतिरेक्यांनाही मदत करतात.
सैन्यदलाकडून त्यांच्यावर काहीच अत्याचार झाले नाहीत असे कोणीच म्हणणार नाही. पण बहुसंख्य केसेसमधे भारतीय लष्कराने त्यांना शिक्षा दिली आहे. तिथल्या विचित्र परिस्थितीला बाकीच्या राज्यांसारखे नॉर्मल वातावरण करणे, हे अतिशय कठीण काम आहे.
याच काश्मीर राज्यात लेह, लडाख देखील आहे. तिथे अशी आंदोलने होत नाहीत. उलट तिथले लोक प्रत्यक्ष भेटीत खूपच शांत व चांगल्या स्वभावाचे वाटले. तिथे विकासावरही फारच अल्प खर्च केला जातो.तरीही तिथल्या लोकांना सैन्यदलाचा का बरे त्रास होत नाही, वेगळे व्हावेसे का वाटत नाही,हा प्रश्न स्वतःस विचारुन पहावा.

साल २०१० : सख्खे नातेवाईक जाऊन आले

'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का'+१ आणि आम्हाला तुम्ही पयर्टनाला या पण आमहाला स्वतंत्र व्हायचे आहे आणि भारताच्या कुठल्याही व्य्वस्थेवर प्रेम नाही पण रागच आहे

साल २०१३ : जुन्या कंपनीतील सहकारी काश्मीरला जाऊन आले त्याने थेट विचारले तुमचे उप्जीवीकेचे एक्मेव साधन काय तर पर्यटन (राहण्यास शिकार्यात होता तो कुटुंबासहीत).

'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का'+१ आणि आम्हाला तुम्ही पयर्टनाला या पण आमहाला स्वतंत्र व्हायचे आहे आणि भारताच्या कुठल्याही व्य्वस्थेवर प्रेम नाही पण रागच आहे

साल २०१५: नुकताच कंपनीतील एक सहकारी जाऊन आला त्यांनाही असाच अनुभव जर या शिल्लक राहिलेल्यांना (हिंदु पंडीत कधीच नेसत्या वस्त्रानिशी निर्वासीत झालेत तिथून) तर उर्वरीत भारताला का त्यांच्याबद्दल अनुकंपा/ममत्व वाटावे.

उलट मी म्हणेन अश्या क्रुतघ्न (खाल्ल्या थाळीत **णार्यांच्या उपजीवेकेला आधारभूत ठरण्यापेक्षा पूर्वांचल राज्यात पर्य्टन करावे ती जनता कष्टाळूही आहे आणि बहुअंशी मुख्य प्रवाहाशी फटकून नाही.

ता:कः खालच्या एका प्रतिसादातील उल्लेखाबद्दल धन्यवाद.

पेराल तेच उगवेल यावर विश्वास असलेला नाखु

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jul 2016 - 12:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

आपण नॉर्थ ईस्टला फिरले आहात काय? असल्यास आपण

उलट मी म्हणेन अश्या क्रुतघ्न (खाल्ल्या थाळीत **णार्यांच्या उपजीवेकेला आधारभूत ठरण्यापेक्षा पूर्वांचल राज्यात पर्य्टन करावे ती जनता कष्टाळूही आहे आणि बहुअंशी मुख्य प्रवाहाशी फटकून नाही.

हे बोलला नसतात असे म्हणू धजतो. शिलाँग (रॉक म्युझिक कॅपिटल ऑफ इंडिया) सोडून बऱ्याच ठिकाणी प्रचंड अवघड आहे सगळे, ब्लॉकेड लागले एक एक की 20 30 दिवस आयुष्य उभे राहते, बटाटे 400 रुपये किलो अन पेट्रोल 600 रुपये लिटर घ्यायला लागते, तिकडे फुटीरतावादाचा चेहरा शांत अन सटल दिसतो पण खूप भयानक असतो. अर्थात पहिल्या पेक्षा बरेच आहे तरी ते मेनस्ट्रीम मध्ये वगैरे अजिबात नसतात, इतके मी आत्मविश्वासपूर्वक सांगतो

शाम भागवत's picture

24 Jul 2016 - 2:15 pm | शाम भागवत

आजही नॉर्थ इस्ट वगळता उर्वरीत भारतातील रहिवासी असलेले असे केंद्र सरकार व आस्थापनातले अधिकारी यांना तिथे पोस्टिंग नको असते. त्यासाठी केंद्र सरकार व आस्थापनातील अधिकार्‍यांना बर्‍याच सवलती, जास्त पगार वगैरेचे आमिष दाखवावे लागते. रिझर्व्ह बँक, नाबार्ड मधे आजही हा भाग अशांत टापू म्हणूनच ओळखला जातो व त्यासाठी तेथे काम करायला तयार असणार्‍यांना विशेष पॅकेज असते.

नाखु's picture

25 Jul 2016 - 9:05 am | नाखु

कार्यरत असलेल्याकडून माहीती आलेली असल्याने (पुर्वांचलबाबत) आमची सपशेल माघार, तरी पण खाल्लाय घरचे वासे मोजणार्या कश्मीरीम्बाबतचे मत तेच राहिल.

पुर्वांचल निसर्गसौंदर्याने नटलेले आहे असे नेहमीच पेपेरात्/मिपावरहीही वाचतो पण तिथली सामाजीक आणि अशांत बाजूबद्दल फारसे लिखाण वाचनात आले नाही म्हणून असेल.

तरी सोन्याबापुंनी कळफलक धूळ झटकून एखादा प्रसंग जमल्यास मालीकाच लिहावी ही विनंती..

चू भू देणे घेणे

शाम भागवत's picture

25 Jul 2016 - 10:58 am | शाम भागवत

१) आजही गौहत्तीला फॅमीली न्यायला लोक तयार असतात पण मिझोराम, नागालँड, मणिपूर, मेघालय व त्रिपुरा येथे राजधानीच्या ठिकाणी जरी पोस्टिंग असेल तरी फॅमीली न नेता एकटेच जातात.
२) पण ही माणसे आपल्याकडे आली तर त्यांना कोणी भारतीय समजत नाही. नेपाळी समजतात. जर एखादी स्त्री गोरी व दिसायला चांगली व सुखवस्तू असेल तर जपानीही समजतात. काही काळा नंतर ही लोकं यालाही सरावतात पण आत मधे एक बोच राहातेच. पुण्या मुंबई सारख्या प्रगत भागात असे होत असेल तर महाराष्ट्राच्या इतर भागात काय होत असेल? असो.
३) भारत खूप खूप मोठा आहे. सगळ्याच बाबतीत खूपच विविधता आहे. नीट समजावून घेता आले पाहिजे. म्हणजे सगळे गुणदोष लक्षात येतात व उपाय ही सापडतात व मुख्य म्हणजे राग आवरून हे साधता येऊ शकते व जेव्हा राग आवरून उपाय योजना केली जाते तेव्हा उपायापेक्षा रोग बरा म्हणायची वेळ येत नाही. जाऊ दे. विषयांतर नको.

पैसा's picture

25 Jul 2016 - 2:06 pm | पैसा

http://www.misalpav.com/node/27810 हा चिगोचा लेख सहजच आठवला.

-------

काश्मिर आणि सैन्याबद्दलच्या या आताच्या लेखातील मते बुद्धिभेद करणारी आहेतच. त्याचा निषेध. त्याशिवाय लेखकाने काही मिपाकरांबद्दल जे वयक्तिक शेरे मारले आहेत त्याची संपादक मंडळाने दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी ही विनंती आणि अपेक्षा आहे.

सामान्य वाचक's picture

25 Jul 2016 - 5:32 pm | सामान्य वाचक

वैयक्तिक शेऱ्या पेक्षाही हा लेख जास्त आक्षेपार्ह आहे

टवाळ कार्टा's picture

25 Jul 2016 - 5:50 pm | टवाळ कार्टा

+१

..देउ नये, कारण हा विषय अत्यंत्य संवेदन्शील आहे, हा बुद्धीभेद करणारा लेख आहे हे तर सरळ सरळ दिसतेच आहे. लेखक वरकरणी लिखणस्वातंत्र्याचा आधार / गैरफायदा घेउन आपल्या शत्रुदेशाचा अजेंडा पुढे रेटीत आहे असेच दिसते. त्यांचा हेतु शुध्ध दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

गॅरी ट्रुमन's picture

25 Jul 2016 - 6:34 pm | गॅरी ट्रुमन

हा विषय अत्यंत्य संवेदन्शील आहे, हा बुद्धीभेद करणारा लेख आहे हे तर सरळ सरळ दिसतेच आहे. लेखक वरकरणी लिखणस्वातंत्र्याचा आधार / गैरफायदा घेउन आपल्या शत्रुदेशाचा अजेंडा पुढे रेटीत आहे असेच दिसते. त्यांचा हेतु शुध्ध दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

अहो असले काहीतरी बरळणार्‍यांना हल्ली विचारवंत म्हणायची फ्याशन आहे हे माहित नाही का तुम्हाला?

भंकस बाबा's picture

25 Jul 2016 - 8:17 pm | भंकस बाबा

पण यांचा बुरखा फाडणे पण जरूरी आहे,हया असल्या टीनपाट विचारवंतामुळे फुटिरतावाद्याना बळ मिळते.

शाम भागवत's picture

25 Jul 2016 - 7:21 pm | शाम भागवत

लिंक बद्दल धन्यवाद

शाम भागवत's picture

25 Jul 2016 - 7:27 pm | शाम भागवत

लिंक बद्दल धन्यवाद

चलत मुसाफिर's picture

21 Jul 2016 - 3:07 pm | चलत मुसाफिर

कलम 370 रद्दबातल करून जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेणे हा रामबाण उपाय आहे.

तोपर्यंत मात्र अंतरिम उपाय म्हणून सरकार व सैन्य यांनी आपल्या प्रसिद्धीतंत्रात बदल करावा. "तुम्ही भारतीय आहात" असे म्हणण्याऐवजी "आम्हीही काश्मिरी आहोत" असे मुख्य सूत्र ठेवावे.

श्रीगुरुजी's picture

21 Jul 2016 - 3:20 pm | श्रीगुरुजी

प्रतिक्रिया देणार नव्हतो. परंतु खालील वाक्य वाचल्यानंतर,

आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल?

हेच लिहावेसे वाटते की वरील लेख म्हणजे पराकोटीचा मूर्खपणा आहे.

पी. के.'s picture

21 Jul 2016 - 5:08 pm | पी. के.

"शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात " ये बात कुछ हजम नहीं हुई

पीके's picture

21 Jul 2016 - 5:28 pm | पीके

आँ ???
आप कहांसे पैदा हुये भाई??

पी. के.'s picture

21 Jul 2016 - 5:49 pm | पी. के.

सुरेश ????

पीके's picture

21 Jul 2016 - 6:38 pm | पीके

रमेश ????

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 3:27 pm | महासंग्राम

ए शाम जरा चिज पॉपकॉर्न लाना रे बाबा, अब्बी ईदर भौत दंगा होणे वाला है !!

नाखु अण्णाचा शिष्य

कपिलमुनी's picture

21 Jul 2016 - 3:29 pm | कपिलमुनी

दंगा करण्याएवढे लॉजिकल मटेरीयल नाय धाग्यात !
५० पण होनार न्हाय

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 3:34 pm | महासंग्राम

मुनिवर्य विषय काश्मीर आहे ना, अजून मात्तबर लोकांची एंट्री व्हायची आहे. जस्ट वेट & वॉच

वाल्मिक's picture

21 Jul 2016 - 3:56 pm | वाल्मिक

लग्नाचा बाजार
http://www.misalpav.com/node/36586

ला करा दंगा

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 4:06 pm | महासंग्राम

छे हो तो जरा गंभीर अन जिव्हाळ्याचा विषय ए, उगाच लोकांचे शाप कशाला घ्या तिकडे

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 3:32 pm | महासंग्राम

काही प्रश्न/शंका आहेत तुम्ही योग्य समाधान कारक उत्तरे देऊन दूर कराल अशी अपेक्षा


कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल

हे विधान कोणत्या आधारावर केले आहे काही संदर्भ नक्कीच असेल तो द्यावा.

वरील परस्थिती आपण स्वतः अनुभवली आहे का की फक्त पेपर मधल्या बाटलंय/विश्लेषणे लेख लिहिला आहे ???

वरुण मोहिते's picture

21 Jul 2016 - 3:40 pm | वरुण मोहिते

पुण्याचा माहित नाही काय खरं काय खोटा ह्या लेखात तो मुद्दा नव्हता आणायला पाहिजे ..बाकी काश्मीर मध्ये सिमेन्स बरोबर काम केलं आहे पण उधमपूर सोडलं की पुढच्या लोकांची इच्छा नसते भारतासोबत राहण्याची असा वाटतं ..३-३ महिने तिकडे राहिलो आहे म्हणून वाटलं बाकी चूक बरोबर डॉक खरे आणि सोन्याबापू सांगतील

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 3:48 pm | संदीप डांगे

Pune and Kashmir???

Kahitarich kaay Sandeep sir. Aamche nav kharab Karu nakaa ho ;)

Lekh gandalay he ve saa na la

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 3:50 pm | महासंग्राम

अगदी बाडीस

बाळ सप्रे's picture

21 Jul 2016 - 4:06 pm | बाळ सप्रे

आता काश्मीर भारतात असल्याने नक्की प्रॉब्लेम काय आहे काश्मीरींचा??

भारतातील इतर राज्यांप्रमाणे एक राज्य म्हणून रहाण्यात नक्की काय तोटा आहे त्यांचा??

सैन्याचा त्रास वगैरे पाकिस्तानींची मदत घेतल्याने ओढवून घेतलेला आहे.

खालील लिंक वाचा आणि विचार करा

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=OA5SLE

अप्पा जोगळेकर's picture

21 Jul 2016 - 4:16 pm | अप्पा जोगळेकर

३१ जानेवारी २०१२ ला साडेचार वर्षे होउन गेली. इतक्या वेळात सीएमई ची एक अक्खी बॅच पास आउट झाली असेल.

अप्पा जोगळेकर's picture

21 Jul 2016 - 4:18 pm | अप्पा जोगळेकर

बाकी ते डोवाल साहेबांना कशाला मधे आणले उगाच ? जुनाच अजेंडा किती दिवस राबवणार ?

अनुप ढेरे's picture

21 Jul 2016 - 4:33 pm | अनुप ढेरे

इतकी वर्ष अ‍ॅफ्स्पा खाली कोणालाही रहायला लागू नये असं मत आहे. इंडेफिनेट अ‍ॅफ्स्पा आणि लोकशाही हे एकत्र असणं पटत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jul 2016 - 11:33 am | कैलासवासी सोन्याबापु

अनुपराव, तत्व म्हणून तुम्ही म्हणता ते मी मान्य करतोच, फक्त उत्तरपूर्वेतले अनुभव पाहता, आफस्पा तूर्तास तरी लेसर इव्हिल ऑफ द अव्हेलेबल इव्हिल्स वाटते मला तरी.

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2016 - 4:47 pm | एकुलता एक डॉन

श्रीनगर- बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलिस चौकीतच पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी आज (गुरुवार) दिली.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=E3642t

शंतनु _०३१'s picture

21 Jul 2016 - 5:59 pm | शंतनु _०३१

फुकाच्या कल्पना ( विस्तार ) आणि निर्बुद्धतेचे वास्तव

गामा पैलवान's picture

21 Jul 2016 - 11:03 pm | गामा पैलवान

संदीप ताम्हनकर,

तुमची दोन विधानं खासकरून पटलं नाहीत.

१.
>> याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील
>> अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत.

वल्गनायुक्त पोष्टींमुळे अजित दोभाल यांचं महत्त्व जराही कमी होत नाही. कारण नसतांना कृपया त्यांना या विषयात ओढू नये.

२.
>> .... तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित
>> असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल?

सैनिकांची बाजू घेणारा कुठलाही कायदा काश्मिरात अस्तित्वात नाही. उलट भारतीय सैन्य राष्ट्रीय मानवी हक्क आयोगास उत्तरदायी आहे. जगात कुठल्याही देशाचं सैन्य अशा प्रकारे बांधील नाही. त्यामुळे तुमचं हे विधान म्हणजे शुद्ध दिशाभूल आहे.

आ.न.,
-गा.पै.

कलंत्री's picture

22 Jul 2016 - 5:19 pm | कलंत्री

विकतचे दुखणे असेच मला वाट्ते.

काश्मिरला राजकिय तोडग्याची गरज आहे. कोणी चाणक्य / चंद्रगुप्त / शिवाजीच्या प्रमाणे विचार करणारा नेता जोपर्यंत भारतात होत नाही तो पर्यंत चांगला तोडगा निघणे अशक्यच आहे.

काश्मिरी आपले देशबांधव आहेत असा विचार जर मनात आला तर आपोआपच नेमके काय चुकत आहे हे समजणे सोपे होईल.

मोदीजी कधी मौन सोडतील आणि चांगला दूरद्रष्टी नेता शोधतील तो पर्यंत अल्ला मालिक आणि परमेश्वराची इच्छा असेच म्हणावे लागेल.

लालगरूड's picture

22 Jul 2016 - 5:35 pm | लालगरूड

चंपाबाई आयडीबदले

हमीद दलवाई यांचा अनुभव (भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉग वरून उचलला आहे)
http://bhautorsekar.in/काश्मिरची-समस्या-की-कांग/

‘भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये. मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’
मी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते.
‘आप कल कहॉ गये थे?’ मग त्याने विचारले.
मी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे.
‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले.
हाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत?’
‘लढाई चाललेली पाहिली.’
‘कुणाची जीत होत आहे?’
‘हिंदूस्तानी फ़ौजेची.’
कसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला.
मग तो बोलू लागला – अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते! पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे? यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले.
मी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते? येथे काय दु;ख आहे? कशाची कमतरता आहे?’
तो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’
श्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’

शाम भागवत's picture

23 Jul 2016 - 4:04 pm | शाम भागवत

मनोंचा प्रतिसाद येऊन २४ तास व्हायला आले आहेत तरीही ....

"भाऊ तोरसेकर? खी..खी..खी.."
असा एखादा प्रतिसाद आला नाही हे एक आश्चर्यच!!!
:))

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jul 2016 - 4:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब

बाकी ताम्हनकर साहेब विरोधी पक्षाचे तोरसेकर होऊ शकतील असे वाटते ;)

शाम भागवत's picture

23 Jul 2016 - 6:23 pm | शाम भागवत

:))

मृत्युन्जय's picture

25 Jul 2016 - 11:11 am | मृत्युन्जय

तो अनुभव हमीद दलवाई यांचा आहे बाप्पु. तोरसेकरांनी केवळ लिहिला. तरीही खीखीखी करायची असेल तर काय करणार. कदाचित दलवाई मुसलमानांचे भाऊ तोरसेकर आहेत असे ऐकायला मिळेल आता.

शाम भागवत's picture

25 Jul 2016 - 11:21 am | शाम भागवत

बापरे. आता काय होणार?

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jul 2016 - 11:53 am | कैलासवासी सोन्याबापु

एकतर भाऊ भाट आहेत, इतकी वर्ष मुंबई महापालिका हातात असताना सुद्धा रस्त्यावर असलेल्या खड्डयांची जबाबदारी सेनेची कशी नाही ह्यावर लेख पाडतात ते, त्यामुळे हो, भाऊंवर माझे खी खी खी मी बरबाद करणार नाही हे खरे, बाकी कोणीतरी कोणाचातरी कोणीतरी आहे असे समजा मी मागे कधी म्हणले असेल तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे अन तो माझ्या अल्पमतीनुसार मी बनवलेला आहे, त्याचा इथे अस्थानी उल्लेख करायचे अन भाऊंवर खी खी खी बरबाद करणार नाही असे म्हणल्याने तुम्हाला झोम्बायचे कारण मात्र कळले नाही मृत्युंजय भाऊ

मृत्युन्जय's picture

25 Jul 2016 - 1:32 pm | मृत्युन्जय

मिपावर लेख पाहुन नाही तर माणुस पाहुन प्रतिसाद पडतात असा एक आरोप नेहमी करण्यात येतो (थोडक्यात काय लिहिले आहे ते महत्वाचे नसुन कोणी लिहिले आहे ते महत्वाचे आहे असे दिसते). खरे खोटे देव जाणे. सद्यस्थितीत भाऊ तोरसेकरांबद्दलची कमेंट त्याच सदरात मोडते. पण केवळ एखादा अनुभव भाऊ तोरसेकरांनी लिहिलेला आहे म्हणून तो हास्यास्पद होत नाही. सद्य परिस्थितीत तर अनुभव पण तोरसेकरांचा नाही.

अनुभव तोरसेकरांचा असो किंवा दलवाईंचा, त्या अनुभवामागची दारुण वस्तुस्थिती काश्मिरमधली भयावह परिस्थिती विदीत करते. अश्या वेळेस त्या परिस्थितीवर हसण्यासारखे काय आहे हे मला नक्कीच उमजलेले नाही.

भागवतांचा प्रतिसाद वाचा:

"भाऊ तोरसेकर? खी..खी..खी.." असा एखादा प्रतिसाद आला नाही हे एक आश्चर्यच!!!

\

त्यावर तुमचा प्रतिसाद वाचा:

भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब

थोडक्यात म्हणजे वरचा संपुर्ण अनुभव (दलवाईंचा - तोरसेकरांनी लिहिलेला) हा हास्यास्पद आहे असे म्हणून त्या वस्तुस्थितीची कुचेष्टा करण्यामागचे कारण समजले नाही. काश्मीरमध्ये सामान्य माणसाच्या मनात काय पराकोटीचा भारतद्वेष आहे आणि तो केवळ धर्माच्या नावाखाली आहे हे त्या अनुभवातुन दिसते. ही अतिशय दारुण परिस्थिती आहे आणि त्याला अर्थातच तोरसेकर जबाबदार नाहित. असे असता त्यावर खीखीखी करुन हसण्यासारखे काही कारण मला दिसत नाही सोन्याबापु. त्यामुळेच हे अस्थायी विधान प्रचंड खटकले. इथे लेखक तोरसेकर नसुन हमीद दलवाई असले असते तरी हेच म्हणालो असतो किंबहुना अगदी राहुल गांधीने जरी हा अनुभव लिहिला असता आणी त्यावर तुम्ही हा प्रतिसाद दिला असता तरी तो तेवढाच खटकला असता.


बाकी कोणीतरी कोणाचातरी कोणीतरी आहे असे समजा मी मागे कधी म्हणले असेल तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे अन तो माझ्या अल्पमतीनुसार मी बनवलेला आहे,

या वाक्याचा संदर्भ, मतितार्थ, आशय आणि उपयोग नाही कळाला त्यामुळे यावर प्रतिसाद देत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jul 2016 - 1:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

सगळे उलगडतो, प्रथम एक विनंतीवजा मागणी पूर्ण करता आली तर पहा, ती म्हणजे, हमीद दलवाई ह्यांचा हा अनुभव त्यांच्याच फर्स्टहँड लेखनात मिळाला तर सांगा किंवा द्या (मला कल्पना नाही), मला वाचायला आवडेल, जर इतका महत्वाचा अनुभव खुद्द दलवाईंच्या लेखनात नसला तर पुढे काय? आजकाल कोणाचा भरवसा घेता? अनुभव एकाचा मांडतोय दुसरा..

मृत्युन्जय's picture

25 Jul 2016 - 2:10 pm | मृत्युन्जय

माहिती नाही. तोरसेकरांना हा अनुभव कसा माहिती झाला ते माहिती नाही. पण तोरसेकरांनी धादांत खोटे लिहिले आहे असे कोणी म्हणत नाही. त्यामुळे त्यावर शंका घ्यायचे काही कारण मला दिसत नाही. त्यांनी तद्दन भूलथापा मारल्या आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय सोन्याबापू?

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jul 2016 - 2:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

नाही, मला असेच म्हणायचे नाहीये, मला फक्त इतके म्हणायचे आहे की संवेदनशील विषयात पब्लिक फोरम पक्षी ब्लॉग वगैरे वर जर कोणी "हियरसे" प्रकारचे अनुभव मांडले तर त्यावर एकदम डोळे झाकून विश्वास ठेवू नये, ह्यात लेखक कोण आहे ह्यावर बायस असायचे कारण नाही, शिवाय भाऊंच्या विषयाला भागवतांनी आऊट ऑफ द ब्लु तोंड फोडले म्हणून मी त्या कॉमेंट संबंधित माझी मते त्याच्याखाली नोंदवली आहेत,

शाम भागवत's picture

25 Jul 2016 - 2:42 pm | शाम भागवत

सोन्याबापू तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल प्रथम सॉरी.

खरे सांगायचे तर कोणीतरी तोरसेकरांबद्दल खी.खी.खी. असे लिहिल्याचे आठवत होते. तुम्ही ते लिहिलेय हे गावीही नव्हते. तुमच्या उत्तरावरून माझी कॉमेंट तुम्हाला दुखवून गेल्याचे जाणवल्याने मी स्मायली देऊन थांबलोही होतो. असो.

मला तुमच्या बद्दल आदर आहे. तसेच तुम्हाला दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता हे इथे स्पष्ट करून मी परत एकदा सॉरी म्हणतो.

ओके?

शाम भागवत's picture

25 Jul 2016 - 2:32 pm | शाम भागवत

मी दलवाईंचा लेख खूप पूर्वीच वाचला होता. पण नक्की कुठे ते आठवत नव्हते.
आत्ता तोरसेकरांचा तो लेख वाचला त्यानुसार

१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे.

अवांतरः मलाही तोरसेकरांची सर्व मते पटत नाहीत. पण तरीही मला त्यांच्या अनेक पोस्ट मधून विचार करण्यासारखे बरेच मुद्दे मिळाले आहेत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jul 2016 - 2:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

हाच संदर्भ अगोदर मिळाला असता तर पुढले अवांतर टाळता आले असते असे वाटते भागवत साहेब मला.

असो झाल्यागेल्यावर मी माझ्यातर्फे पाणी टाकतो :)

कसे?

शाम भागवत's picture

25 Jul 2016 - 3:29 pm | शाम भागवत

_/\_

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jul 2016 - 2:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाकी , आमच्या "उप-प्रतिसादाची" पिसे काढायला हिरीरीने आलात, तेव्हा खुद्द अनुभवावर काहीही मत न देता ,नुसते भाऊंच्या विरोधकांवर श्लेष करणाऱ्या भागवतांच्या कॉमेंट वर काही बोलला नाहीत ते? एकदाही नाही सांगावे वाटले का भागवतांस की बोआ तुम्ही का अनुभव सोडून लेखक-सादरकर्त्यावर घसरताय, जरा विषण्ण परिस्थितीवर बोला, बोलायचे नाही ठरवले होते पण विषय वाढवलाच आहात तर बोलतो, हा मुदलातलाच डबल स्टॅण्डर्ड मलाही काही खास रुचला नाही बरंका मृत्युंजय भाऊ :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jul 2016 - 2:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

ह्यावर काही?

मृत्युन्जय's picture

25 Jul 2016 - 2:31 pm | मृत्युन्जय

भागवतांना समज द्यावीशी वाटली नाही त्याचे कारण असे की त्यांनी तोरसेकर विरोधकांवर कुत्स्तित टिप्पणी केली होती पण त्यामुळे काश्मीर मधल्या परिस्थितीची कुचेष्टा होत नाही. तुमच्या प्रतिसादातुन तसे होत आगे. त्या अनुभवावर खीखीखी करुन हसणे किंवा

"भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब"

(याचा अर्थ असा होतो की तोरसेकरांनी न लिहिता अजुन कोणी लिहिले असते तर तुम्ही खी खी खी करुन हसले असता) असे म्हणुन काश्मीर मधील भयाणा परिस्थितीची कुचेष्टा करणे हे मात्र मला खटकले.

जे आहे ते स्पष्तपणे त्या अनुभवात मांडले आहे. तुम्हाला तोरसेकर आवडत नाहित म्हणून तोरसेकरांनी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची कुचेष्टा करण्याचे काहिच कारण नाही. मिपावरील बर्‍याच आयडींचे विचार हे माझ्या प्रकृतीच्या विरोधात जाणारे आहेत पण म्हणुन त्यांच्या प्रत्येक प्रतिसादावर अथवा धाग्यावर फक्त हेटाळणीच करायची असे काही मी करत नाही विशेषतः तसे केल्याने जेव्हा एखाद्या व्यक्तिची, घटनेची अथवा वस्तुस्थितीची हेटाळणी होत असेल किंवा गांभीर्य कमी होत असेल तेव्हा. त्याउप्परही तोरसेकर म्हटल्यावर तुच्छतापुर्वक उल्लेखच करायचा असल्यास त्यासही माझा आक्षेप नाही कारण ते एखाद्याचे वैयक्तिक मत असु शकते मात्र तसे करण्याने विदित केलेल्या देशविघतक वस्तुस्थितीला नाकारले जात असेल, त्याची हेटाळणी होत असेल किंवा त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर माझा नक्कीच आक्षेप आहे. तोरसेकरांचा विरोध करुन अथवा तोरसेकरांना उचलुन धरुन. तोरसेकरांना शिव्या घालुन अथवा तोरसेकरांबद्दल गोग्गोड बोलुन, तोरसेकरांची निंदा नालस्ती करुन अथवा तोरसेकरांचा जयजयकार करुन , काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" Because the Union Must Persist.

थोडक्यात आक्षेप तोरसेकर विरोधाला नाहि.

हा मुदलातलाच डबल स्टॅण्डर्ड मलाही काही खास रुचला नाही बरंका मृत्युंजय भाऊ :)

डबल स्टेंडर्ड असण्याचा प्रश्नच नाही, कारण वरती विदित केलेच आहे. स्पष्टपणे बोलुन दाखवले. त्याबद्दल नाईलाज आहे. तुम्हाला रुचले नाही याचा खेद आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jul 2016 - 2:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

(याचा अर्थ असा होतो की तोरसेकरांनी न लिहिता अजुन कोणी लिहिले असते तर तुम्ही खी खी खी करुन हसले असता)

हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी स्पष्ट बोललोय की तोरसेकरांबद्दल माझे मत प्रतिकूल आहेच, त्यातून मी काश्मिरी परिस्थितीची कुचेष्टा करतोय हा जावईशोध आपण लावलाय भाऊ, माझे मत परत एकदा मांडतो

"तोरसेकर ह्यांच्यावर खर्च करण्याइतके माझे खी खी स्वस्त नाहीत"

ह्यात मी कश्मीर परिस्थितीची कुचेष्टा कशी केली ते सांगा? शिवाय तोरसेकर हा माझा एकमेव सोर्स नाही काश्मीर बद्दल अभ्यास करायला, का मी तोरसेकरांना मना करतोय म्हणून मी काश्मीरला कुचेष्टेने पाहतोय असे सोलॉजिझम लढवलेत आपण?

मृत्युन्जय's picture

25 Jul 2016 - 3:03 pm | मृत्युन्जय

हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी स्पष्ट बोललोय की तोरसेकरांबद्दल माझे मत प्रतिकूल आहेच, त्यातून मी काश्मिरी परिस्थितीची कुचेष्टा करतोय हा जावईशोध आपण लावलाय भाऊ, माझे मत परत एकदा मांडतो

तोरसेकरांबद्दलचे तुमचे मत काहिही असले तरीही त्यांनी लिहिलेल्या सत्य अनुभवावर खीखीखी करणे किंवा केवळ त्यांनी लिहिले आहे म्हणुन खीखीखी देखील करणार नाही असे लिहिणे यातुन त्या परिस्थितीची कुचेष्टाच होते सोन्याबापु. तो शोध नाही. जाव्ईशोध तर त्याहुन नाही. तुम्ही जुनेच मत परत व्यक्त केल्याने त्या परिस्थितीत काहिही बदल होत नाही. तुम्हाला तसे म्हणायचे नव्हते असे म्हणा वाटल्यास.

का मी तोरसेकरांना मना करतोय म्हणून मी काश्मीरला कुचेष्टेने पाहतोय असे सोलॉजिझम लढवलेत आपण?

परत एकदा लिहितो:

तोरसेकरांचा विरोध करुन अथवा तोरसेकरांना उचलुन धरुन. तोरसेकरांना शिव्या घालुन अथवा तोरसेकरांबद्दल गोग्गोड बोलुन, तोरसेकरांची निंदा नालस्ती करुन अथवा तोरसेकरांचा जयजयकार करुन , काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" Because the Union Must Persist.

आधी लिहिलेले अजुन एक वाक्य वाचा

इथे लेखक तोरसेकर नसुन हमीद दलवाई असले असते तरी हेच म्हणालो असतो किंबहुना अगदी राहुल गांधीने जरी हा अनुभव लिहिला असता आणी त्यावर तुम्ही हा प्रतिसाद दिला असता तरी तो तेवढाच खटकला असता.

वरची २ वाक्ये एवढी स्पष्ट असुनही तुम्ही तोरसेकरांना विरोध करताय म्हणुन मी हे सगळे लिहितोय असे घोडे तुम्हाला पुढे दामटायचे असेल तर तो तुमचा प्रश्न आहे सोन्याबापु. त्याबद्दल मी काहीच करु शकत नाही.

त्यामुळे तुम्ही जे लिहिले आहे त्यातुन जो अर्थ प्रतीत होतो आहे त्याला Theory of Deduction म्हणा अथवा syllogism म्हणा, परिस्थिती बदलणार नाही. फक्त बघण्याचे चष्मे बदलतील.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

25 Jul 2016 - 6:54 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

भाऊ तोरसेकर?????

>>>> खी खी खी

→ असे विधान मी केले होते,श्रीगुरूजींना उपप्रतिसाद दिला होता जाकिर नाईकांच्या धाग्यावर बहुतेक!!!
तुम्ही कृपया वाद घालत बसू नका.
.
.
.
.
आणखी एक राहिलचं

"खी खी खी खी"

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2016 - 1:59 pm | श्रीगुरुजी

हा 'ऐसी'वर शोभणारा लेख चुकुन इथे टाकलेला दिसतोय. 'ऐसी'वर या लेखात ओकलेल्या गरळीचे समर्थन करणारे आतापर्यंत किमान १००० प्रतिसाद आले असते.

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 2:25 pm | संदीप डांगे

Eka sansthalavar dusarya sansthalavar badnami..???

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jul 2016 - 2:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

आपापली वतनं असतात एकेकाची! चालायचेच!!

अनुप ढेरे's picture

23 Jul 2016 - 2:30 pm | अनुप ढेरे

लेख आवडला.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

25 Jul 2016 - 6:55 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

अनुपजी,
हे पटलं नाही.

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

23 Jul 2016 - 3:58 pm | अरवीन्द नरहर जोशि.

अत्यन्त चुक लेख लिहिलेल असुन पुर्न अविचरि अहे अशन तेह्तेच पथविले पहिजे.

पैसा's picture

23 Jul 2016 - 4:08 pm | पैसा

1

वटवट's picture

23 Jul 2016 - 4:33 pm | वटवट

सुरुवातीला वाटले रात्रीच्या नशेत लिहिलाय हा लेख.....
पण नंतर बघीतलं...चक्क दुपारी पोस्टलाय हा लेख??? ऑ ....
दुपारी दुपारीच असं कसं ब्वॉ???

संदीप ताम्हनकर's picture

23 Jul 2016 - 5:34 pm | संदीप ताम्हनकर

दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: -
'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल' - हे मी लिहिलेले नाही. अशा पोस्ट समाजमाध्यमातून जोरात फिरत आहेत. कोण पुढे पाठवतं ते सगळे जाणतातच.
प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का? आणि सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो ही जगभरातील वस्तुस्थिती आहे. भारतात अनेक राज्यात १९५८ पासून आफ्स्पा लागू आहे, त्या मणिपुरी मानवाधिकार कार्यकर्त्या आरोम चानू शर्मिला गेली अनेक वर्षे सत्याग्रह करतायत तो का आणि कसा ते जरा वाचा. काश्मिरी उपास करत नाहीत तर दगड फेकतात.
श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय. तोपर्यंत संघ परिवारातला माणूस म्हणून ज्यांना त्यांच्या आरत्या करायच्यात त्यांनी जरूर कराव्या.
काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. केवळ सैन्याच्या बळावर काश्मीर प्रश्न सोडवता येईल असे वाटणारे मुर्खांच्या नंदनवनात वावरतायत हे नक्की. याबाबत अतिराष्ट्रवाद्यांचा अभिनिवेश हास्यास्पद आहे. अश्याने खरे नंदनवन हातातून निसटून जाईल.
आर्मीने, अर्ध-सैन्यबलांनी केलेले अत्याचार आणि बळाचा अतिरिक्त वापर यावरही बरेच मटेरिअल आंतरजालावर उपलब्ध आहे.
मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय.
सध्याच्या अशांततेच्या, दंग्याच्या, गोळीबाराच्या, पॅलेट गनच्या कमरेच्या वर चालवण्याच्या अनेक स्टोरीज आंतरजालावर आहेत. बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच.
दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे.
बाकी टवाळखोरांचे सगळे मटेरिअल साभार परत.

वटवट's picture

23 Jul 2016 - 5:57 pm | वटवट

आयला... अजित डोवाल आणि आरएसेंस संबंध.... नवीनच ब्वॉ...
(दादा.. दुसर्या बाजूचेपण व्हिडीओ उपलब्ध आहेत... जमल्यास ते बघा...)
असो...
पण एक खरंय... तुमच्यासारखे विचारवंत असतील तर आर्मी काही फार चांगले करू शकेल असे वाटत नाही....
खेद ह्याच गोष्टीचा आहे कि तुमच्या काश्मीरमधल्या वास्तव्यात काश्मिरी पंडितांना कधी भेटू वाटलं? त्याबद्दल लिहायचा प्रयत्न करा.. आणि जमल्यास आर्मीमधल्या लोकांशी पण बोला जे तिथे आहेत...
साली ही देशातली कीड आधी संपली पाहिजे. बाहेरचे लोक मारणे खूप सोपे... पण हे असले साप.... अतिभयंकर...
(खरं तर मी एव्हढं भडक कधीच बोलत नाही... पण वस्तुस्तिथीचे योग्य आकलन नं करता जर कोणी अकलेचे तारे नां..... सटकते राव...)

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jul 2016 - 5:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे काय?

ह्याचे उत्तर दिलेत तर उपकृत होईन ताम्हनकर साहेब,

दुसरे म्हणजे, माझा रास्वसंघ विरोध हा मिपावर बरेच जणांना माहिती आहे, त्याला माझी काही वैयक्तिक कारणे आहेत, अन ती बदलावीत असे सकारात्मक संघाने राजकीय आघाडीवर काही केलेले मला आजवर दिसलेले नाही, पण तो भाग वेगळा, ते तुमच्यासमोर मी सिद्ध करावे ही ऑथॉरिटी मी वैयक्तिकरित्या तुम्हाला देत नाहीये, अजून जर विषय संबंधित बोलायचे झाले तर डोवल हे रास्वसंघसंलग्न आहेत हे मला माहिती होते/आहे, पण फक्त ते संघ संबंधित होते म्हणुन त्यांची इंटेलिजन्स ब्युरो मधील कारकीर्द जर तुम्ही नाकारत असाल किंवा त्याची हुर्यो उडवत असाल तर संघडले अन तुमच्यात फरक तो काय उरणार न? की मग

१. तुम्ही स्वतः आयबी मध्ये नोकरी करत होतात म्हणून तुम्हाला डोवल ह्यांचे उदात्तीकरण माहिती आहे?

२. का ते फक्त संघाशी संबंधित होते म्हणून त्यांचे मीठ तुम्हाला अळणी आहे?

उरता उरला काश्मीरचा प्रश्न तर,

माझ्या नोकरीत (मला दरवेळी उल्लेख करायला आवडत नाही तरीही) अर्धसैनिकबल असलेल्या एका संघटनेचा एक अधिकारी म्हणून माझ्या पाहणीत आलेले अनुभव हे भयानक अन अतिशय सेन्सिटिव्ह श्रेणीतील असल्यामुळे मी ते इथे मांडू शकत नाहीये, फक्त टाळी एका हाताने कधीच वाजत नसते इतके सांगतो.

पटले तर घ्या नाहीतर आम्हालाही गाढवात काढा :)

मुक्त विहारि's picture

23 Jul 2016 - 6:05 pm | मुक्त विहारि

एक नंबर समतोल प्रतिसाद....

श्रीगुरुजी's picture

24 Jul 2016 - 2:36 pm | श्रीगुरुजी

'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल' - हे मी लिहिलेले नाही. अशा पोस्ट समाजमाध्यमातून जोरात फिरत आहेत. कोण पुढे पाठवतं ते सगळे जाणतातच.

यात काही सत्य आहे का नाही हे समजण्याएव्ढी तुम्हाला बुद्धी आहे का नाही? इथे ते टाकण्याआधी सारासार विचार केला होता का? कशाला इतरांच्या आड लपता? मी कायअप्पावर अनेक गटांचा सदस्य आहे. असली पोस्ट आजतगायत कोणत्याही ग्रुपवर आलेली नाही. या असल्या उपसाहात्मक पोस्ट्स तुमच्यासारख्या निधर्मांधांच्या डोक्यातून बाहेर पडत असतात.

प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का? आणि सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो ही जगभरातील वस्तुस्थिती आहे. भारतात अनेक राज्यात १९५८ पासून आफ्स्पा लागू आहे, त्या मणिपुरी मानवाधिकार कार्यकर्त्या आरोम चानू शर्मिला गेली अनेक वर्षे सत्याग्रह करतायत तो का आणि कसा ते जरा वाचा. काश्मिरी उपास करत नाहीत तर दगड फेकतात.

अत्यंत निर्बुद्ध वाक्य! अतिरेक्यांशी, दंगलखोरांशी लढायला सैन्य पाठवितात ते काय निर्बुद्ध सैनिक असतात का? भारतात फक्त काश्मिर, मणिपूर इ. मोजक्या ठिकाणीच सैन्य का आहे व सैन्याला विशेषाधिकार का द्यावा लागला आहे हे समजण्याइतकी बुद्धी आहे का? सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो म्हणे. सैन्याने काय आणि किती वेळा अतिरेक केला? काश्मिरमध्ये आणि देशात इतरत्र एके ४७ आणि ग्रेनेड्स घेऊन अतिरेकी हल्ले करतात, गोळ्या घालून व बॉम्बस्फोट करून निष्पापांना जीवानिशी मारतात, काही जणांना जन्माचे अपंग करतात, या क्रूर नरभक्षक जनावरांना काही स्थानिक लोक पाठिंबा देतात, लहान मुलांच्या आडून सैन्यावर दगडफेक होते, जमावात मागे उभे राहून सैनिकांच्या दिशेने ग्रेनेड फेकतात, त्यात सैनिक जखमी होतातच पण जमावात पुढे असलेली लहान मुलेही जखमी होतात, एका पोलिसाला जमावाने घेरून मारहाण करून त्याचे डोळे फोडले, अजून एका पोलिसाला जमावाने त्याच्या वाहनासकट नदीत फेकून दिले . . इ. क्रूर कृत्यांबद्दल चकार शब्द नाही. ही कृत्ये होत असताना सैन्याने काय गुलाबाची फुले वाटून शांततेचे आवाहन करायचे का? अशा कृत्यांना विरोध करून अतिरेक्यांशी लढताना सैन्याला जे जे करावे लागते ते क्षम्य आहे. त्यात कोणताही अतिरेक नाही. अतिरेक वाटत असला तर तो होणारच. संचारबंदी जाहीर झालेली असून रस्त्यावर अतिरेक्यांशी लढण्यासाठी सैन्य असताना अतिरेकी बुर्‍हान वाणीच्या मृत्युचा निषेध करण्यासाठी संचारबंदी मोडून रस्त्यावर उतरलेल्या व सैनिकांवर व पोलिसांवर हल्ले व दगडफेक करणार्‍या वाणीच्या समर्थकांना आपल्या दुष्कृत्यांची शिक्षा भोगावी लागणारच. बुर्‍हान वाणी हा काही साधुसंत नव्हता. तो अतिरेकी होता आणि त्याच्या समर्थनासाठी संचारबंदी असतानाही रस्त्यावर उतरलेले सुद्धा साधुसंत नव्हते. ते घराबाहेर पडले नसते तर बाकी प्रश्न उद्भवलेच नसते.

श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय. तोपर्यंत संघ परिवारातला माणूस म्हणून ज्यांना त्यांच्या आरत्या करायच्यात त्यांनी जरूर कराव्या.

अत्यंत बेताल वाक्य. डोवाल संघ परिवारातले कधीपासून झाले? ते १९८४ च्या आधीपासून कार्यरत आहेत. त्यांच्या कोणीही आरत्या ओवाळत नाही. ते आपके काम करताहेत. ते संघ परिवारातले आहेत म्हणून त्यांच्या आरत्या केल्या जाताहेत हे अत्यंत मूर्खपणाचा आरोप आहे.

काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. केवळ सैन्याच्या बळावर काश्मीर प्रश्न सोडवता येईल असे वाटणारे मुर्खांच्या नंदनवनात वावरतायत हे नक्की. याबाबत अतिराष्ट्रवाद्यांचा अभिनिवेश हास्यास्पद आहे. अश्याने खरे नंदनवन हातातून निसटून जाईल.
आर्मीने, अर्ध-सैन्यबलांनी केलेले अत्याचार आणि बळाचा अतिरिक्त वापर यावरही बरेच मटेरिअल आंतरजालावर उपलब्ध आहे.

सैन्याला व सरकारला एकवेळ नसेल कळत काश्मिर प्रश्न कसा हाताळायचा ते, पण तुम्हाला आहे का अक्कल काश्मिर प्रश्न हाताळायची? असली तर सैन्याला व सरकारला जाऊन सांगा. तुम्हाला इथे बसून समजतंय का काश्मिर प्रश्न कसा हाताळायचा ते. आंतरजालावर बरेच काही असते. ते काय सगळे खरे असते का? अतिरेक्यांनी केलेल्या निष्पापांच्या हत्या, सौरभ कालिया सारख्या पकडलेल्या सैनिकांचे लिंग कापून केलेले हालहाल, भारतीय सैनिकांची कापलेली मुंडकी इ. सुद्धा बरेच मटेरिअल आंतरजालावर आहे. ते वाचलंय का? बुर्‍हान वाणीसुद्द्धा आंतरजालाच्या माध्यमातून लोकांना भडकावत होता. इसिस आणि जाकीर नाईक सुद्धा आंतरजालाच्या माध्यमातून लोकांना भडकावतात.

मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय.

काश्मिरात सैन्य नसते तर पहिल्याच भेटीत पैगंबरवासी झाला असता हे लक्षात येतंय का? का स्वतःला जेम्स बाँड समजता? सैन्यामुळेच तिथे ३-३ वेळा निर्वेध फिरू शकलात आणि त्याचमुळे इथे येऊन मूर्खासारख्या पोस्ट्स टाकू शकलात याची जाणीव आहे का? ३ वेळा काश्मिरात फिरून सुखरूप परत आलात याचे श्रेय सैन्याला देऊन कृतज्ञ राहण्याऐवजी कृतघ्नपणे सैन्यावरच दुगाण्या झाडताना शरम कशी वाटत नाही?

सध्याच्या अशांततेच्या, दंग्याच्या, गोळीबाराच्या, पॅलेट गनच्या कमरेच्या वर चालवण्याच्या अनेक स्टोरीज आंतरजालावर आहेत. बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच.

सैन्यावर व पोलिसांवर हल्ले होत असताना जगातील कोणतेही सैन्य हात बांधून स्वस्थ बसणार नाही. गोळीबारात जे लोक जखमी झाले आहेत ते स्वतःच्या चुकीमुळे जखमी झालेले आहेत. संचारबंदी सुरू असताना त्यांनी घरात बसणे अपेक्षित आहे. ते न करता मेलेल्या अतिरेक्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर येऊन सैन्यावर हल्ले करण्याची ही किंमत द्यावी लागत आहे. सैन्याच्या गोळ्या खायच्या नसतील तर संचारबंदी सुरू असताना घरात बसा किंवा रस्त्यावर आलात तर शांततेने निदर्शने करा. पोलिसांवर व सैनिकांवर हल्ले केलेत तर प्रत्त्युत्तर मिळणारच.

दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे.

परत एकदा मूर्खपणा. पाकिस्तान हा सुरवातीपासून दहशतवादी निर्माण करणारा देश आहे. जगातल्या अनेक देशात, जिथे भारतीय सैन्याचा काहीही संबंध नाही, त्या देशात सुद्धा पाकिस्तानने दहशतवादी हल्ले केलेले आहेत. भारतात सुरू असलेल्या दहशतवादाचे खापर भारतीय सैन्यावर फोडणे हा पराकोटीचा मूर्खपणा आहे.

बाकी टवाळखोरांचे सगळे मटेरिअल साभार परत.

तुम्ही कोणाचेही मटेरिअल साभार परत करा. तो तुमचा प्रश्न आहे. पण अत्यंत बेताल व मूर्खपणाचे लेख लिहिणार्‍या तुमच्या सारख्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही.

संदीप डांगे's picture

24 Jul 2016 - 2:47 pm | संदीप डांगे

+१०००ⁿ

Shregurujinshi kitihi matbhed asale Tari ya vishayavar 'vayam panchadhik shatam'

Btw ti dowal-jamesBonnd post mi baghitali aahe aani ti circulate karnare bindok aahet he hi titakech khare

श्रीगुरुजी's picture

24 Jul 2016 - 3:07 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! मूळ लेख वाचल्यावर निधर्मांधांची नेहमीचीच मतलबी आरडाओरड अशी समजूत करून दुर्लक्ष केले होते. परंतु लेखकाचा नंतर आलेला प्रतिसाद वाचल्यावर संताप आला आणि म्हणून प्रतिसाद दिला.

संजय पाटिल's picture

24 Jul 2016 - 6:19 pm | संजय पाटिल

प्रचंड सहमत!!!

सामान्य वाचक's picture

24 Jul 2016 - 6:36 pm | सामान्य वाचक

100 टक्के सहमत

हा देश या देशावर प्रेम करणाऱ्या आणि देशाला आपले मानणाऱ्या सगळ्यांचा आहे
मग तो कुठल्याही जात, धर्म, वय, पंथ, विचारधारेचा असो

आणि त्याचे जर देशावर प्रेम नसेल, तर तो कुठल्याही जात धर्म पंथाचा असेल तरी तो देशद्रोही च आहे

गामा पैलवान's picture

25 Jul 2016 - 12:59 am | गामा पैलवान

श्रीगुरुजींशी अनंतवेळा सहमत.
-गा.पै.

शिद's picture

25 Jul 2016 - 3:14 pm | शिद

____/\____

मस्तच श्रीगुरूजी...उत्तम चिरफाड केलीय.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

25 Jul 2016 - 6:59 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

गुर्जींशी सहमत!!
.
.
.
भारत माता कि जय
जय हिंद

भंकस बाबा's picture

25 Jul 2016 - 1:10 pm | भंकस बाबा

तुम्ही अरुन्धती रॉयचा चश्मा वापरता काय?
काश्मिरी पण्डिताचा उल्लेख टाळून लेख पाडलाय म्हणुन विचारले.
काश्मिरी जनतेची फारच कीव आलेली दिसत आहे तुम्हाला, काय उद्योगधंदे आहेत हो यांचे.
आज सेनेच्या नियंत्रणामुळे कश्मीर दिल्ली आणि पाकिस्तानमधे बफर स्टेट बनून राहिलय , नाहीतर आज जसे अफगनिस्तानात हल्ले होत आहेत ते पार जम्मू , पंजाब , दिल्ली पर्यन्त पोचले असते.
आमचे राजनाथसिंग भले सर्टिफिकेट देत फिरतील की भारतीय मुस्लमान आईएससारख्या अतिरेकी संघटनेची कास नाही पकडणार, मग आता ही कनेक्शन निघत आहेत ती काय भारतीय गुप्तचर विभागाची कारस्थानं आहेत?
काश्मीरबाबत तुर्तास इतकेच बोलू शकतो की 'नजर हटी तो दुर्घटना घटी'
रच्याकने ते काश्मिर हिंसाचाराचे अगदी पब्लिकमधुन काढलेल्या क्लिप्स बघितल्या आहेत.

विनोद१८'s picture

25 Jul 2016 - 2:24 pm | विनोद१८

... प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का ?
असा प्रश्ण विचारुन तुम्ही आपल्याच देशाच्या सैन्याला कमी लेखताय व त्यांचा अपमान करताय याचे जरा भान ठेवा. भारतीय सैन्याचा इतिहास काय व कसा आहे याविषयीचा तुमचा अभ्यास शुन्य दिसतोय म्हणुन आपल्याला असलेल्या लिहिण्याच्या स्वातंत्र्याचा असा दुरुपयोग करताय. तुम्ही या दुव्यावर
( https://www.facebook.com/Presstitues/videos/1239597949407107/ ) जा म्हणजे तुमच्या प्रश्णांची उत्तरे तुम्हाला मिळतील. ह्या सैनिकाच्या प्रश्णावर उत्तर द्या किंवा स्वता गणवेश घालुन एक सैनिक म्हणुन एकदाच काश्मिरला जाउन या म्हणजे मग समजेल घरी बसुन मिपावर कळफलक बडवुन जिल्ब्या टाकणे व तिकडे काश्मिरात एक सैनिक म्हणुन रस्त्यावर ठामपणे उभे राहुन आन्दोलकांचे दगड खाणे यातला फरक.

... मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय.

म्हणजे काश्मीरचा प्रश्ण आपल्याला जितका समजला तितका तो इतर कुणालाच समजला नाही अस तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. 'मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने जाउन आलोय' म्हणजे तो केवळ मलाच समजला असा तुमचा समज झालेला दिसतोय. जे इतर तिकडे आपल्या गाड्या घेउन जात नाहीत त्यांना त्यातले काहीच कळत नाही, समजला तो केवल मला आणि मलाच असा तुमचा एकुण अभिनिवेश दिसतोय ह्या वाक्यातुन. आता भारत सरकारने काश्मिरचा तुमचे मार्गदर्शन घेउन सोडवावा असे तुम्हाला सुचवायचे आहे का ??

फक्त एकच सांगा ही जिलबी तुम्ही कोणत्या उद्देशाने / हेतुने इथे टाकलीत ?? ह्या लेखातुन तुम्हाला कोणाबद्दल नेमके काय सुचवायचे आहे ??

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jul 2016 - 7:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एवढा प्रचंड काळ कोणत्याही प्रदेशात 'आस्फा'सारखे कायदे लागू असणं अमानुष आणि असं‌वेदनशील वाटतं. हा तुमचा मुद्दा आधीच पटलेला आहे, पण लेख आवडला असं म्हणवत नाही; मतं काय हे नीट न समजल्यामुळे मतांशी सहमती असंही म्हणवत नाही.

अशासारख्या लेखनात जर उग्र भाषा वापरायची असेल तर त्यात विनोदी तिरकस-खवचटपणा असावा किंवा सरळ, साध्या भाषेत लिहावं. इतरांची उद्धृतं देताना तसा स्पष्ट उल्लेख हवा. अन्यथा अजित डोवालांना जेम्स बाँड म्हणण्याबद्दल जसे गैरसमज झालेले आहेत तसे होतात.

पुलेशु

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jul 2016 - 6:02 pm | कैलासवासी सोन्याबापु

अन हो, एक राहिलेले म्हणजे,

एखादा मनुष्य आर्मीची बाजू घेतोय म्हणजे तो संघिष्ट असला पाहिजे असा तुमचा ग्रह असल्यास तो तात्काळ डोक्यातून काढून टाकावा आपण, ही नम्र विनंती, आर्मी कोणाचीच नसते पण सगळ्यांसाठी असते, जमल्यास एखादी चक्कर एखाद्या बटालियनच्या एमएमजी स्थल उर्फ मंदिर मस्जिद गुरुद्वारा स्थलला नक्की द्या!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jul 2016 - 7:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सैन्य कोणाचंही (राजकीय विचारधारेचं) नसतं, नसावं हे मान्यच. तसे सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल हे लोकही संघाचे नव्हते, पण मरणोपरान्त त्यांचं संघीकरण झालेलं आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टीही संघ (आणि संघाच्या भावंडांनी) पळवायला आणि त्यावर जणू आपलाच अधिकार आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे.

संदीप डांगे's picture

25 Jul 2016 - 9:51 pm | संदीप डांगे

जसं की...?? म्हणजे सरदार पटेल, भगतसिंग, सावरकर हे संघाचेच झाले हे केव्हापासून मानायला लागलात आपण? तसेच राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टी संघाने कुठून पळवल्या तेही सांगावे.

काँग्रेसने गांधीघराण्याचा उदो उदो करण्यापासून थोडी सवड काढली असती तर उपरोल्लिखित किमान दोन महापुरुषांना असं ह्याचं त्याचं झाले म्हणायची सोय राहिली असती का? किमानपक्षी भारतीय जनता ह्यावेळी असे काही मानते का?

डाव्यांचे राष्ट्रप्रेम जगजाहिर आहे. डाव्यांकडून राष्ट्रवाद पळवला असे म्हणायचे असेल तर तो त्यांच्याकडे केव्हा होता हे ही कळावे?

मी बालक अज्ञानी आहे, माझी समज-आकलन अर्थातच तुमच्या सारख्या दिग्गजांपेक्षा फारच कमी आहे. त्यास्तव तुमच्या विधानांचे स्पष्टीकरण मागण्याची जुर्रत करत आहे. उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करतो. कारण तमाम भारतीयांचे आदराचे, श्रद्धेचे, राष्ट्राभिमानाचे प्रतिक जर 'ह्याचे झाले त्याचे झाले' असे आपण बोलत असाल तर मजसारख्या सामान्य भारतीयाचे मन विचलित होते. ते होऊ नये, बुद्धीभेदाचे डावपेच दोन्ही बाजूंकडून अजिबात सफल होऊ नयेत असे मजसारख्याला वाटते, तस्मात हा प्रतिसादप्रपंच...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Jul 2016 - 2:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी बालक अज्ञानी आहे, माझी समज-आकलन अर्थातच तुमच्या सारख्या दिग्गजांपेक्षा फारच कमी आहे.

अय्या, मी पण हेच लिहायला आले होते!

असो.
१. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टी संघाने कुठून तरी पळवल्या => म्हणजे त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत,
२. काँग्रेसने सरदार पटेल, भगतसिंग, सावरकर ह्यांच्यापैकी कोणीतरी दोन लोकांची व्यक्तीपूजा करायला हवी होती
३. संघिष्ठ नाहीत म्हणजे डावेच

असं काही तुम्ही समजता असं मला समजलं. असं समजत नसाल तर माझ्या आकलनातली चूक.

मी आळशी बाई आहे आणि रिअॅक्शनरी लिहिण्याचा हल्ली खूप कंटाळा येतो. तुमचे विचार समजले. उत्तराबद्दल आभार.

उडन खटोला's picture

26 Jul 2016 - 4:13 pm | उडन खटोला

सो च क्युट

संदीप डांगे's picture

26 Jul 2016 - 6:32 pm | संदीप डांगे

मला काय समजलं नाय समजलं किंवा तुम्ही आळशी आहात किंवा तुम्हाला कंटाळा येतो हा विषय तुर्तास बाजूला असू देत.

निम्नलिखित आपलीच विधाने आहेत.

सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल हे लोकही संघाचे नव्हते, पण मरणोपरान्त त्यांचं संघीकरण झालेलं आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टीही संघ (आणि संघाच्या भावंडांनी) पळवायला आणि त्यावर जणू आपलाच अधिकार आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे.

हे आपण कोणत्या आधारावर, संदर्भासहित लिहिले आहे तेवढं फक्त विचारलंय मी. तुमच्यासारख्या दिग्गजांनी असले विचार ठेवले म्हणजे नक्की काहीतरी आधार असेलच अशी मज भाबड्या पामराची समजूत होती. अन्यथा तत्सम पिंका टाकायला दोन रुपयाचा मावाही खायला लागत नाही असे निरिक्षण आहे.

बाकी 'संघिष्ठ नाहीत म्हणजे डावेच' असलं काहीही मी तरी म्हटलेलं नाही. तसं असतं तर तुमच्या प्रतिसादाला फाट्यावर मारुन पुढे गेलो असतो. पण डावेही नाही किंवा संघिष्ठही नाही म्हणून काहीही लिहायचे व त्यावर कोणी स्पष्टीकरण मागितले तर आळसाचे किंवा कंटाळ्याचे सोयिस्कर पळपुटेपणाचे कारण द्यायचे हे काही पटलं नाही, बघा आता कसं ते..?

जयंत कुलकर्णी's picture

26 Jul 2016 - 4:04 pm | जयंत कुलकर्णी

यातील खरी गंमत ही आहे -
सैन्य कुठल्याही विचारधारेच नसाव असे तुम्ही म्हणता पण त्याच वेळी सैनिकांना मतदानाचा हक्क असतो हे विसरता. सैनिक शेवटी माणूसच असतो आणि त्यालाही राजकीय विचारधारा असते. हे खरे मानले तर सैन्य कोणत्याही विचारधारेचे नसते असे म्हणणे जरा धाडसाचे होईल. हां सध्या बर्‍यापैकी समतोल आहे असे म्हणता येईल पण तो तसाच राहील असे मानणे भाबडेपणा होईल.... :-)

राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम या भावना कोणीही भारतीयांनी पळवाव्यात व त्यावर अधिकार सांगावा या मताचा मी आहे.... :-)

पैसा's picture

26 Jul 2016 - 6:22 pm | पैसा

:)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2016 - 6:39 pm | अत्रुप्त आत्मा

@आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? ››› लेखक महोदय, आपणास अकाली दीर्घजीवी मती-मंदत्व प्राप्त झालेले आहे...
असा निर्वाळा देऊन , मी माझे वाक्य संपवितो.

डँबिस००७'s picture

23 Jul 2016 - 10:12 pm | डँबिस००७

काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे.

अरे मग ६० वर्ष काय करत होते, सरकार आणी लोक ?

जम्मु आणी कश्मिर सरकारच्या जोरावर ३ लाख काश्मिरी पंडीतांना काश्मिर मधुन रातोरात हाकलले गेले , कित्येक पंडित त्यांच्या बायकांना आपला जीव हकनाक गमवावा लागला, कित्येक बायकांना शिकार केले गेले त्यावेळेला केंद्र सरकारने हा प्रश्न कसा काय हाताळला ? त्यावेळेला सैन्य नव्हत ?

का हिंदु पंडीत मरताहेत मग मरु दे, म्हणुन काँग्रेस सरकारला काहीच करावस वाटल नाही ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jul 2016 - 10:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे/राहणे हा आहे की, काश्मिरी पंडित?? काश्मिरी पंडित ह्या मुद्द्यावर आमचे मत आमचे अत्यंत लाडके नेतृत्व अन इलिनॉइस राज्यातले धडाडीचे लोकाभिमुख नेते, स्प्रिंगफिल्ड खुर्दचे अब्राहमदादा लिंकन म्हणत असत तसे आहे

"सगळे गुलाम मुक्त करून, सगळे गुलाम गुलाम ठेऊन, गुलामगिरी नष्ट करून, अबाधित ठेऊन, काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा"

ह्यात गुलाम शब्द काढून पंडित, सुन्नी, मुसलमान, दलित, ब्राह्मण, शीख, तामिळ काय वाटेल ते भरा!

For, the union must persist :)

तुषार काळभोर's picture

24 Jul 2016 - 9:11 am | तुषार काळभोर

बाप्पूसाहेब!

या प्रतिसादाची प्रिन्टऔट काढून रोज नजरेपुढे राहावी अशी व्यवस्था करावी म्हणतो.

बाकी, तुमच्या संतुलित प्रतिसादासाठी तुम्हाला एक काहवा, एक पटियाला लस्सी, एक बैदा पाऊच, एक प्लेट फरसाण, एक प्लेट सोँदेश,एक म्हैसूर डोसा, एक बिसिबेल्ली भात अन एक चेट्टीनाड चिकन!

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jul 2016 - 10:17 am | कैलासवासी सोन्याबापु

पुरणपोळी पण द्या!! :P

बापू, तुमचे सारे प्रतिसाद संतुलीत आणि अत्यंत प्रगल्भ आहेत. त्यांच्यामुळे अनेक प्रश्नांचा सांगोपांग विचार करता आला. धन्यवाद.
प्रस्तुत धागालेखकाने सांगितलेली पुण्याची घटना ठाऊक नाही परंतू अशाच प्रकारची घटना नाशीकला घडली होती. तिथे अ‍ॅकॅडमीत शिकणार्या आर्मी कॅडेटसच्या १००-१५० जनांच्या टोळक्याने सबंध पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केली होती त्यात बरेच पोलीस जखमीदेखील झाले होते आणि त्यंच्यावर कसलीही कारवाई झाल्याचे नंतर वाचले नाही(झालेली असू शकते, ठऊक नाही.). मला असे विचारायचे आहे की अश्या घटना घडल्यानंतर या विद्यार्थ्यांवर काही कारवाई होऊ शकते का? किंवा पोलीसांवर हात उचलला असे चार्जेस लावून खटला चालवला जातो का? सैन्यात जाण्याच्या आधीच विद्यार्थी ईतक्या मुजोरपणे कायद्याला न जुमानता मनमानी करु शकतात हे सैन्याचे(किंवा एकूनच आपल्या समाजाचे आणि कायद्यांचे) अपयश वाटते मला. इथे काश्मीरबद्दल आजीबातच भाष्य करायचे नाही तिथे अफस्पा सारख्या कायद्यांची गरज आहेच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jul 2016 - 10:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे/राहणे हा आहे की, काश्मिरी पंडित?? काश्मिरी पंडित ह्या मुद्द्यावर आमचे मत आमचे अत्यंत लाडके नेतृत्व अन इलिनॉइस राज्यातले धडाडीचे लोकाभिमुख नेते, स्प्रिंगफिल्ड खुर्दचे अब्राहमदादा लिंकन म्हणत असत तसे आहे

"सगळे गुलाम मुक्त करून, सगळे गुलाम गुलाम ठेऊन, गुलामगिरी नष्ट करून, अबाधित ठेऊन, काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा"

ह्यात गुलाम शब्द काढून पंडित, सुन्नी, मुसलमान, दलित, ब्राह्मण, शीख, तामिळ काय वाटेल ते भरा!

For, the union must persist :)

उडन खटोला's picture

23 Jul 2016 - 10:26 pm | उडन खटोला

आम्हाला 'फकस्त' युनियन दिसते. ;)

विटेकर's picture

25 Jul 2016 - 12:42 pm | विटेकर

टाळ्या आणि वंदन सुद्धा !
परवा श्री अजित डोवल पुण्यात बोलाताना नेमेके हेच म्हणाले.
राष्ट्र हे पिढ्या- पिढ्यांचे असते , सरकार येते आणि जाते देखील !

सुधीर काळे's picture

23 Jul 2016 - 11:08 pm | सुधीर काळे

असले लेख लिहायला आपल्याला आपल्या भारतदेशात मुभा आहे हीच आपल्या राष्ट्राच्या राज्यघटनेची थोरवी आहे असे मी समजतो.
आपल्या सरकारबद्दल, सैन्याबद्दल जर कांहीं चांगले लिहिता येत नसेल वा लिहायचे नसेल तर गप्प बसावे, विरोधात लिहून आणखी आग भडकवू नये! आपल्याला भाषण व लेखनस्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिले आहे ते वापरावे. फलिहिलेलीमी नुकतीच लिहिलेली माझी पोस्ट वाचावी हीच नम्र विनंती. तो लेख बराच लांब आहे व इंग्रजीमध्ये आहे म्हणून इथे पूर्ण देत नाहीं. पण तो वाचावा अशी मी ताम्हनकर-जींना विनंती करतो.

असले लेख लिहायला आपल्याला आपल्या भारतदेशात मुभा आहे हीच आपल्या राष्ट्राच्या राज्यघटनेची थोरवी आहे असे मी समजतो.
आपल्या सरकारबद्दल, सैन्याबद्दल जर कांहीं चांगले लिहिता येत नसेल वा लिहायचे नसेल तर गप्प बसावे, विरोधात लिहून आणखी आग भडकवू नये व आपल्या सेनादलाच्या मनोधैर्यावर घाव घालू नयेत! आपल्याला भाषणस्वातंत्र्य व लेखनस्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिले आहे ते जरूर वापरावे पण गैरवापर करू नये. फेसबुकवर मी नुकतीच लिहिलेली माझी पोस्ट वाचावी हीच नम्र विनंती. ही पोस्ट बरीच लांब आहे व इंग्रजीमध्ये आहे म्हणून इथे पूर्ण देत नाहीं. पण ती वाचावी अशी मी ताम्हनकर-जींना विनंती करतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jul 2016 - 7:10 am | कैलासवासी सोन्याबापु

ती घटना, हिंदुराष्ट्र म्हणून नाही तर

सोवरीन सोसिअलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इंडिया

म्हणून लिहिली गेली आहे, आता ह्या वर उल्लेखलेल्या भारताच्या अधिकारीक नावातील बहुतेक शब्द आपणाला खटकत असतील तर तो आपला प्रश्न आहे, त्याला उत्तर म्हणून प्राचीन शिल्पकलेचे अविष्कार असणारी मंदिरे आपण पेढे अन ऑइल पेंट फासून विकृत करतो तसे घटनेवर अमुक एक रंग मारून विकृत करणे मी वैयक्तिकरित्या निषेधार्ह मानतो :)

सुधीर काळे's picture

23 Jul 2016 - 11:17 pm | सुधीर काळे

माझी "Sun, 24/07/2016 - 00:38" ही पोस्ट काधून टाकावी कारण त्याची सुधारित आवृत्ती मी स्वतः त्या खालीच दिलेली आहे. (Sun, 24/07/2016 - 00:44) धन्यवाद

पिनाक's picture

24 Jul 2016 - 1:10 am | पिनाक

ताम्हनकर,
1. सैन्याला विशेषाधिकार दिल्यानं ते त्याचा अतिरेक करत असतील तरी सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.
2. काश्मीर ची जमीन आमचं सरकार कधीही सोडणार नाही. त्यासाठी कितीही काश्मिरी मुसलमानांना ठार मरावं लागलं तरी ते केलं जाईल.
3. सैन्य विरुद्ध बोलणाऱ्या इथल्या अस्तनीच्या निखाऱयांना एक तर एन्काउंटर करून संपवलं जाईल किंवा अगदीच शक्य नसेल तर "आत" घातलं जाईल.
4. सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल त्याची अर्थातच आम्हाला काही पर्वा नाहीये.
5. "अपरिपकव", "हास्यास्पद" वगैरे काहीही बोललं तरी जमिनीवरची परिस्थिती बदलत नाही. सरकार, सैन्य आणि भारताची जनता अचानक केलेल्या या कटानं गोंधळून गेली होती. पण आता सरकार सावरलं आहे, सैन्यानं पुन्हा परिस्थिती चा ताबा घेतला आहे आणि भारताची जनता भक्कम पणे सरकारच्या पाठीशी उभी आहे. आता काश्मिरी मुसलमानांचा बदला घेतला जाईल आणि जाईलच.
आता दहशत वादयांच्या नावे बांग दे किंवा सैन्याच्या नावानं शिमगा कर पण त्या पेलेट्स मध्ये जे जखमी झालेत त्यांना सैन्य शोधेल आणि मग ठोकेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jul 2016 - 7:16 am | कैलासवासी सोन्याबापु

ओ साहेब, उगाच कट्टरपणा इज द न्यू कुल सिद्ध करायला काय वाटेल ते बोलू नका हो, आपण आर्मी सारख्या एका इंस्टिट्यूशन वर शिंतोडे उडवत आहात ह्याचे भान असू द्या, अन काय मुसलमानांचा बदला वगैरे लावले आहे मालक? आपली विकृती सैन्याच्या आडून आडून नका प्रदर्शित करू, उगाच काहीही लिहू नका ही विनंती

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2016 - 8:09 am | डॉ सुहास म्हात्रे

ताम्हनकर साहेब,

आपला प्रतिसाद "भारतिय सैन्याला पाठिंबा देणे किंवा त्याच्या उत्तम कामाची भलावण करणे" हे तर करत नाहीच पण; सैन्याने काय करावे याबाबत लेखकाचा अतिरेकी अजेंडा सैन्याच्या नावावर खपवून "शिस्तबद्ध आणि संयमित भारतिय सैन्याच्या किर्तीला डाग लावण्याचा विनोदी प्रयत्न" करणारा आहे.

हे जर तुमचे खरोखरचे मत असेल तर... आपण या विषयावरचा आपला अभ्यास वाढवणे खूsssप जरूरीचे आहे !

नेहरूंनी शेख अब्दुलांना गजाआड ठेवले होते तोपर्यंतच काश्मिरमधे शांतता नांदत होती. इंदिरा गांधीनी त्यांना मुक्त केले नसते तर आजही तिथे शांतता नांदत राहिली असती. काश्मिर पंडीतांची समस्या उभीच राहीली नसती.

जिथे खूप सावध राहायला पाहिजे तिथेच नेमका विश्वास ठेऊन गाफील रहावयाची (पृथ्विराज चौहानापासून लागलेली) भारतीयांची खोड कधी जाणार आहे कोणास ठाऊक.

सुधीर काळे's picture

24 Jul 2016 - 3:48 am | सुधीर काळे

माझा काश्मीरवरील लेख
https://www.facebook.com/kbkale/posts/10210459950562979?notif_t=like&not...

साती's picture

24 Jul 2016 - 11:13 am | साती

तुम्हाला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत्येय.
दोन्ही बाजूंच्या अतिशयोक्त दावे आणि विधानांचा आपण अत्यंत संयमाने समाचार घेत आहात.
हे पाहून तुमच्याविषयी असलेला आदर दुणावला आहे.

तुमचे अनेकानेक आभार!

संदीप डांगे's picture

24 Jul 2016 - 11:20 am | संदीप डांगे

+१०००००००

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jul 2016 - 11:21 am | कैलासवासी सोन्याबापु

_________/\_________

राही's picture

24 Jul 2016 - 2:00 pm | राही

खरोखर.
सोन्याबापू नेहमीच अतिरेक टाळून वस्तुस्थितीनिदर्शक विधानं करीत असतात. आणि वस्तुस्थिती त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या तर्‍हेने इथे दुसरं कोण जाणणार?

पुंबा's picture

26 Jul 2016 - 2:24 pm | पुंबा

+११११

विनायक प्रभू's picture

24 Jul 2016 - 11:15 am | विनायक प्रभू

जय संता
आता बंता येउ द्या.

अनुप ढेरे's picture

24 Jul 2016 - 11:52 am | अनुप ढेरे

लवकरच बंदी येणारे अशा जोकवर. सुप्रीम कोडताने म्हटलय तसं.

विनायक प्रभू's picture

24 Jul 2016 - 1:13 pm | विनायक प्रभू

हा जोक नाहीये

तिमा's picture

24 Jul 2016 - 2:40 pm | तिमा

खरे वास्तव हे आहे की,
जनमतचाचणी घेतली तर काश्मीर दुसर्‍या दिवशी स्वतंत्र होईल आणि तिसरा दिवस उगवायच्या आंत, कायमचे पाकिस्तानच्या ताब्यात जाईल. शिवाय दहशतवाद थांबणार नाहीच तो अन्य भारताच्या आणखी जवळ येईल.

श्रीगुरुजी's picture

24 Jul 2016 - 3:42 pm | श्रीगुरुजी

हे खरे नाही. जम्मू-काश्मिरने भारतातच रहायचे का पाकिस्तानात जायचे का स्वतंत्र देश म्हणून रहायचे या तीनपैकी एकाही पर्यायाला स्थानिक जनतेचा पुरेसा निर्णायक पाठिंबा नाही असे २०१३ साली चॅथम हाऊस या इंग्लंडमधील प्रसिद्ध संस्थेने केलेल्या एका जनमत चाचणीत दिसून आले आहे. या सर्व तीन पर्यायांना ५०% पेक्षा कमी जनतेने पाठिंबा दिलेला आहे. यापैकी कोणत्याच पर्यायाला ५०% किंवा अधिक मते मिळू शकलेली नाहीत. तसेच यावरील जनमत वेगवेगळ्या विभागानुसार वेगळे होते हेही दिसून आले आहे.

काश्मिरमध्ये जनमत घेऊन निर्णय घेणे हे जवळपास अशक्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९४८ च्या ठरावानुसार भारतीय काश्मिर व पाकव्याप्त काश्मिर अशा दोन्ही भागातून दोन्ही देशांनी सैन्य काढून घेणे ही सार्वमताची पूर्वअट आहे. दोन्ही देश ही अट पाळणे अशक्य आहे. त्यामुळे सार्वमत घेता येणार नाही.

हा ठराव १९४८ चा होता. त्यानंतर ६८ वर्षे उलटून गेली आहेत. त्यावेळची परिस्थिती आता पूर्ण बदलली आहे. त्यामुळे १९४८ चा ठराव आता जसाच्या तसा अंमलात आणणे अशक्य आहे. यासाठीच काही वर्षांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने हा ठराव बॅकबर्नरवर टाकलेला आहे.

काश्मिर मध्ये श्रीनगर खोरे, जम्मू व लडाख हे तीन वेगवेगळे भाग आहेत. श्रीनगरमध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. जम्मूमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत व लडाखमध्ये बौद्ध मोठ्या प्रमाणात आहेत. फुटिरतावादाला पाठिंबा मुख्यत्वेकरून श्रीनगरच्या खोर्‍यातून मिळतो. जम्मू व लडाखमध्ये फुटिरतावादाला कमी पाठिंबा आहे. जनमत घेतल्यास जम्मू व लडाख भारतात राहण्याच्या बाजूने कौल देतील तर श्रीनगरमधील जनमत तीन पर्यार्यांमध्ये विभागलेले असेल. संपूर्ण काश्मिरचा एकत्रित विचार करता येणार नाही. त्यामुळे जनमत घेऊनही फायदा नाही.

भारत कधीही काश्मिरचा ताबा सोडणार नाही. काश्मिरमध्ये अनेक महत्त्वाची शिखरे आहेत. त्यांच्यावर पाकिस्तानला ताबा मिळाला तर पाकिस्तानी सैन्याला अ‍ॅडव्हांटेज मिळून उर्वरीत भारताची सुरक्षा धोक्यात येईल. त्यामुळे भारत कधीही काश्मिर हातचे जाऊन देणार नाही.

काश्मिरला स्वतंत्र देश होऊन देण्यास पाकिस्तानचा जोरदार विरोध असेल. पाकिस्तानला काश्मिर स्वतःच्या देशात हवे आहे. पाकिस्तान काश्मिरला स्वतंत्र राहू देणार नाही. समजा काश्मिर एक स्वतंत्र देश झाला तर पाकिस्तान व चीन एकत्र येऊन ते काश्मिर ताब्यात घेतील कारण दोन्ही देशांच्या सैन्याच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे.

समजा काश्मिर प्रश्न पाकिस्तानला हवा तसा सुटला तरीसुद्धा पाकिस्तान गप्प राहणार नाही. त्यानंतर पाकिस्तान पंजाब सारख्या इतर राज्यांकडे वळेल व तिथे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होईल. पाकिस्तानला काश्मिरींविषयी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त भारताला त्रास द्यायचा आहे. सध्या त्यासाठी काश्मिर हे एक निमित्त आहे. हे निमित्त संपले तर ते दुसरे निमित्त शोधतील.

वरील चाचणीतील काही परिच्छेद -

The first-ever survey on both sides of Kashmir by Robert W Bradnock, a senior fellow at Chatham House, UK's most influential think-tank, has shown that only two percent of people in Jammu and Kashmir want to join Pakistan while 43 percent prefer independence. The survey 'Kashmir: Paths to Peace' has been sponsored by Libyan president Muammar Gaddafi's son, Dr Saiful Islam.

It found preference for independence was fairly uniform across districts in PaK but it was uneven in J&K. In Kashmir valley division it was between 75 to 95 percent; none in Poonch, Rajauri, Udhampur and Kathua of Jammu division and in Jammu itself it was just one percent. In Ladakh division, it was 30 percent in Leh and 20 percent in Kargil”.

“This poll, in common with two preceding polls in J&K shows that setting aside all other political obstacles, it is difficult to see how plebiscite proposed in UN resolutions of 1948/49 could play any part today in the resolution of the dispute. There is no clear majority in the prospect for independence either. In J&K there is a majority in favour of outright independence for entire Kashmir in only four districts, all in Kashmir valley division and in five other districts the support for independence is one percent or less”, reports the survey.

http://www.milligazette.com/news/7376-survey-shows-preferences-across-ka...

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jul 2016 - 3:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

पुनश्च एकदा गुर्जींबर सहमती, आज गुर्जी पेटले आहेत! संदर्भ म्हणून चक्क 'मिल्लीगॅझेट'ची लिंक उचलून आणलीन!! =))

श्रीगुरुजींच्या सर्व मुद्याना सहमती.
देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपली सेना जे कर्तव्य बजावत आहे ते अतुलनीय आहे. काही छुटपूत घटनांचा उल्लेख करून बुद्धदीभेद करण्याचा मार्ग अश्लाघ्य असाच आहे

श्रीगुरुजी's picture

24 Jul 2016 - 3:03 pm | श्रीगुरुजी

आता मूळ लेखाबद्दल -

काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.

अत्यंत मूर्खासारखे विचार! कोण आहेत हे उथळ राष्ट्रवादी आणि त्यांना चेव चढला आहे म्हणजे नकी काय होतंय? काश्मिरमधल्या फुटिरतावाद्यांना पाकिस्तानचा उघड पाठिंबा आहे ही वस्तुस्थिती आहे आणि पाकिस्तानने अनेकवेळा याची जाहीर कबुली दिली आहे. हे काही या तथाकथित अतिराष्ट्रवाद्यांचे स्वत:चे मत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तिथे असलेले सैन्य काश्मिरच्या रक्षणासाठी व पर्यायाने उर्वरीत भारताच्या रक्षणासाठी आहे हे कळतंय का? काश्मिरसाठी पाकिस्तानने ४ वेळा युद्ध केले व अजूनही काश्मिर बळकावण्याचे प्रयत्न सुरू आहेतच. त्यामुळे तिथे सैन्य असणारच.

आणि जेएनयू सारख्या संस्थातील देशद्रोह्यांना सरळ करण्यासाठी सैन्याची अजिबात गरज नाही व नव्हती. या देशातील न्यायालये त्यासाठी पुरेशी सक्षम आहेत. कन्हैयाकुमार २० दिवस तुरूंगार राहून आल्यावर लगेच टोन बदलून अफझल गुरूची आरती ओवाळण्याऐवजी दलित, मोदी इ. विषयांवर बरळायला लागला हे लक्षात आलं असेलच.

हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.

म्हणजे खरा राग मोदी समर्थकांवर दिसतोय. मोदी लोकशाही मार्गाने निवडून येऊन बहुमत मिळवून पंतप्रधान झाले हे अजूनही अनेकांना मान्य होत नाहीय्ये.

पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.

नेहरूंनी काश्मिरप्रश्नाचा कायमस्वरूपी विचका केला हे १९४८ पासून लिहिले जात आहे. ती वस्तुस्थिती आहे. त्यात काहीही असत्य नाही. हे आताच लिहिले गेलेले नवीन लेखन नाही.

ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.

सैन्याला हा अधिकार फक्त काश्मिर, मणीपूर इ. मोजक्याच ठिकाणी का दिला गेला याची कल्पना आहे का? जेव्हा अतिरेकी निष्पापांची हत्या करायला लागतात, सर्वसामान्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी सैन्याला पाचारण करावेच लागते. मुळात मी काही चुकीचे करीत नसेन, अतिरेक्यांना मदत करीत नसेन तर कशाला सैनिक मला अटक करतील? मी जर काही संशयास्पद कृत्ये करीत असेन, अतिरेक्यांना मदत करीत असेन हे दिसून आले तरच माझ्यामागे सैनिकांचा ससेमिरा लागेल.

पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.

३१ जानेवारी २०१२ पूर्वी व त्यानंतर असे किती प्रकार झाले? जरा माहिती देता का? इतक्या वर्षात हा एकच अपवादात्मक प्रकार काही मोजक्या सैनिकांना केला असेल तर या एका प्रकारावरून संपूर्ण सैन्याला कायमस्वरूपी दोषी ठरवायचे?

आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.

सैन्य धुमाकूळ घालत असेल? असे लिहायला जनाची नसली तरी निदान मनाची तरी लाज वाटायला हवी. सैन्याच्या जीवावरच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत. सैन्य नसते तर एका बाजूने चीनने व दुसर्‍या बाजूने पाकिस्तानने देशाचे लचके तोडले असते. कॅप्टन सौरभ कालिया व त्यांच्या ५ सहकार्‍यांना पाकड्यांनी किती हालहाल करून मारले हे माहिती आहे का? ३ वर्षांपूर्वी २ भारतीय सैनिकांना पकडून त्यांची मुंडकी कापलेली आठवतात का? रोज होणार्‍या गोळीबारात अनेक सैनिक प्राणांचे मोल देतात याची जाणीव आहे का? का उचलली जीभ आणि लावली टाळ्याला?

सामान्य वाचक's picture

24 Jul 2016 - 7:17 pm | सामान्य वाचक

हा देश या देशाला आपले मानणाऱ्या सगळ्यांचा आहे
जात धर्म वय पंथ doesnt matter

झेन's picture

24 Jul 2016 - 6:57 pm | झेन

- कलम ३७० असताना, पलिकडे पाकिस्तान असताना काश्मीरी लोक सर्वार्थाने भारताला आपला देश मानतिल का?

- पाकव्याप्त काश्मीरमधे आपल्या ३७० सारखे काही स्वतंत्र अधिकार देणारे काही आहे का ? जर तिथे काही नसेल तर इथे हे लाड का आणि कधिपर्यंत ?

- जर भारत सरकारच्याअधिक्रूत भूमिकेनुसार सार्वमत हा मुद्दा जर टाईमबार/आऊटडेटेड झाला असेल तर अजून कलम ३७० हा मुद्दा अजून जिवंत का ?

- जोपर्यंत संपूर्ण भारतीयांना समान न्याय/ अधिकार नसेल तोपर्यंत टीआरपी ची आवश्यकता असणारा मिडीया आणि "विद्वान" हे भारतीय लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्याचा दूरूपयोग करणारच.

संदीप डांगे's picture

24 Jul 2016 - 7:18 pm | संदीप डांगे

Mi kaay mhanato, udavatayat na bhangar lekh. Ase lekh shuddh deshdroh aahe.

Sanghavarach sandhan sadhayche tar armyla kale kaun dakhavane nalayakpana aahe. Asha nalayak lekhanchi ithech Kay bharatat kuthehi garaj nahi.

Please remove this thread.

Sanghavarach raag kadhaycha asel tar special lekh lihana Tamhankar...

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jul 2016 - 7:41 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाडीस , ताकाला जाऊन भांडी लपवू नयेत

गॅरी ट्रुमन's picture

24 Jul 2016 - 11:28 pm | गॅरी ट्रुमन

संदीपराव,

एक विनंती करतो. हे असे मिंग्लिशमध्ये लिहिणे शक्य झाले तर टाळा. मिपा हे मराठी संकेतस्थळ असल्यामुळे बरेचसे मराठीत देवनागरी लिपीमध्ये लिहिणे ओघाने आलेच.बहुतांश सदस्य तसे करतातही. पण हे मिंग्लिश म्हणजे जेवताना घासाघासाला खडा आल्याप्रमाणे वाटते. गेल्या काही दिवसात बऱ्याच प्रतिसादांमध्ये असे मिंग्लिश तुम्ही वापरले आहे म्हणून हे लिहित आहे.

अमितदादा's picture

25 Jul 2016 - 12:37 am | अमितदादा

लेख जरा एकांगी वाटला. लेखकाशी अंशतः सहमत. काश्मीर भारतामध्ये राखण्यास तसेच तेथील दहशदवाद मोडून काढण्यात भारतीय आर्मी चा मोलाचा वाटा आहे यात शंकाच नाही. भारतीय जवानांच्या बलिदानामुळे काश्मीर अजून भारतात आहे याचे कायम भान राहील, मात्र भारतीय जवानांच्या कडून या 3 दशकात नक्कीच काही चुका घडल्या आहेत याचे भान राखाय हवे. काश्मीर हा प्रश्न हा फक्त मिलिटरी सोडवू शकणार नाही तर बरोबर पोलिटिकल अँप्रोच सुद्धा जरुरी आहे. जर भारत सरकार नागा बंडखोर, उल्फा बंडखोर यांचाबर संवाद साधत असेल तर काश्मीर फुटीरवाद्याबर बोलण्यात कसला आलाय कमीपणा हे कळत नाही. जर काश्मीर प्रश्न लवकर सुटला नाही तर खालील भीती वाटते 1. आतापर्यंत भारतीय मुस्लिम हे भारतीय सरकार च्या भूमिकेबद्दल कायम बरोबरीनं राहिलेत.भारतीय मुस्लिम प्रश्न आणि काश्मीर मुस्लिम प्रश्न नेहमी वेगळे राहिले आहेत.जर दोनी ठिकाणच्या radical लोकांची युती जाली तर दाहशवाद हा वानव्यासारखा भारतभर पसरेल. 2. पोलिटिकल इंडिसिव्हनेस ला कंटाळून जर PDP ने राजीनामा दिला तर भारताची काश्मीर वरील moral grip कमी होईल. आता सध्या कश्मीर मध्ये फक्त political पार्टी आणि पोलीस भारतीय सरकार चा भूमिकेशी प्रामाणिक आहेत, बाकी सर्वसामान्य जनता विरोधी आहे.

टीप : google translate वापर्यामुळे भाषेत काही चुका राहतील. हि माझी भूमिका आहे एक्स्पर्ट ओपिनियन नव्हे.

माझ्यामते फुटीरतावाद्यांशी बोलायला भारताने नकार दिला असे नसावे. पण चर्चेत पाकिस्तानला सहभागी करून घेण्यास मात्र भारताचा कायमच नकार आहे, आणि तो योग्य देखील आहे.

अमितदादा's picture

25 Jul 2016 - 2:43 pm | अमितदादा

माझ्यामते फुटीरवादी च काय पण पाकिस्तान शी सुधा चर्चा केली पाहिजे. एकवेळ फुटीरवादी राहूदे पण पाकिस्तान ची चर्चा केलीच पाहिजे, कारण आपला तोटा झाला तरी चालेल पण भारतच पण नुकसान झाल पाहिजे हि पाकिस्तान ची भूमिका आहे, तशी भूमिका भारत ठेवू शकत नाही कारण आपला मार्ग वेगळा आहे. म्हणून मला वाटते कि पाकिस्तान शी पण वेळ येयील त्यावेळी चर्चा करा, वेळ येयील त्यवेळी चार फटके द्या, पण ताठर आणि एगोइस्तिक भूमिका घेवू नका.

श्रीगुरुजी's picture

25 Jul 2016 - 4:33 pm | श्रीगुरुजी

या चर्चेतून काय निष्पन्न होणार आहे? फुटिरतावाद्यांच्या व काश्मिरातील इतर काही जणांच्या मागण्या बघू या.

१) काही जणांना संपूर्ण काश्मिर पाकिस्तानात विलीन करायचे आहे.

भारत ही मागणी कधीही मान्य करणार नाही. तसेच जम्मू व लडाखमधील बहुतेकांना हे मान्य नाही. याबाबतीत भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही.

२) काही जणांना काश्मिर हा स्वतंत्र देश म्हणून हवा आहे.

भारत ही मागणी कधीही मान्य करणार नाही. तसेच जम्मू व लडाखमधील बहुतेकांना हे मान्य नाही. याबाबतीत भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. काश्मिर स्वतंत्र देश होणे पाकिस्तानलाही मान्य नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही.

३) काश्मिरला १९५३ पूर्वी जितकी स्वायत्तता होती तितकीच स्वायत्तता आता मिळावी अशी काही जणांची मागणी आहे. त्यामध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे इ. ३-४ गोष्टी वगळता उर्वरीत सर्व अधिकार राज्याकडे असावेत अशी मागणी आहे.

मुळात काश्मिरला आता जितके अधिकार आहेत तेच धोकादायक आहेत. त्यात अजून भर टाकली तर परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त बिघडेल. त्यामुळे उर्वरीत भारताला अजून धोका निर्माण होईल. १९९९-२००४ या काळात नॅकॉ रालोआचा भाग होता. सन २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी काश्मिरला १९५३ पूर्वीची स्वायत्तता मिळावी असा ठराव विधानसभेत बहुमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविल्यावर वाजपेयींनी त्यातील धोके ओळखून तो लगेच फेटाळून लावला. नंतरच्या संपुआ सरकारने सुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष केले. केंद्रात कोणतेही सरकार असले तरी ही मागणी मान्य होणार नाही.

त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही.

४) काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे अशी काही जणांची मागणी आहे.

याबाबतीत सुद्धा भारताची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही.

५) काश्मिरमधील बेरोजगारी कमी व्हावी, उद्योगधंदे वाढावेत, गुंतवणूक वाढावी अशी बर्‍याच जणांची मागणी आहे.

काश्मिरला लागू केलेले ३७० वे कलम हाच यातील मुख्य अडथळा आहे. या कलमामुळे काश्मिरमधील कोणालाही तिथे जमीन, घर विकत घेता येत नाही, तिथे स्थायिक होता येत नाही. त्यामुळे कोणताही उद्योगपती तिथे जाऊन उद्योग, कारखाने सुरु करू शकत नाही. तिथला मुख्य उद्योग पर्यटन हाच आहे. परंतु अशांत वातावरणामुळे पर्यटनावर परीणाम झालेला आहे. तिथली बेरोजगारी कमी करणे हे काश्मिरीच्याच हातात आहे. अतिरेक्यांना पाठिंबा देणे थांबविले, स्वतंत्रे देशाची किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची किंवा स्वायत्ततेची मागणी थांबविली, स्वत: शांततेने राहून इतरांना शांततेने राहून दिले आणि ३७० वे कलम रद्द केले तर तिथे समृद्धी नक्कीच येईल.

६) काश्मिरमधून सैन्य हटवावे व अ‍ॅफ्प्सा हटवावा अशी बर्‍याच जणांची मागणी आहे.

काश्मिर पाकिस्तानला लागून असल्याने तिथून सैन्य हटविणे शक्य नाही. तिथे अतिरेकी धुमाकूळ घालत असल्याने व त्यांनी काही स्थानिक पाठिंबा देत असल्याने सैन्याला विशेषाधिकार देणे आवश्यक आहे. याबाबतीत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट असल्याने या मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही.

म्हणजे जर काश्मिरींशी चर्चा करायची तर जवळपास सर्व मुद्द्यांवर ठाम भूमिका असल्याने चर्चेला अर्थ नाही.

काश्मिरची समस्या सोडविणे हे भारताच्या हातात नसून काश्मिरी व पाकिस्तानच्याच हातात आहे. पाकिस्तानने काश्मिरींना भडकाविणे थांबविले व काश्मिरींनी वरील मुद्दा क्रं. (५) मधील काही गोष्टी केल्या तर हा प्रश्न सुटु शकेल. भारत व केंद्र सरकार याबाबतीत फार काही करू शकणार नाही.

अमितदादा's picture

25 Jul 2016 - 6:42 pm | अमितदादा

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. परंतु तुमचा 5 नंबर चा मुद्दा मान्य नाही. आता सध्याचा वातावरणात राज्य सरकारच्या कर्मचारांची मुले सुद्धा दगडफेक करतायत. स्वतः बुर्हाण वाणी चे वडील हि सरकारी कर्मचारी आहेत. आजच The Hindu वर बातमी वाचली कि जमू आणि काश्मीर मधील 1 % लोकांवर केंद्र सरकार 10 % खर्च करते म्हणजे जोपर्यंत तुमी ह्या लोकांना पोलिटिकल सोल्युशन देणार नाही तोपर्यंत ते असंतुष्ट राहणार जरी तुमी तिथं सोन्याचे रस्ते करून दिले तरी. जर विकास हेच सोल्युशन असत तर स्कॉटलंड ने uk पासून कधीच स्वतंत्र मागितलं नसत। आणि त्या लोकांच्या मागण्या जरी अनाठायी असल्या तरी हि कॉमन टेक्निक आहे अगोदर अवास्तव मागण्या ठेवायचं आणि चर्चा जशी होईल तसे climb down करायचं. नागा बंडखोरांनी ग्रेटर नागालॅंड आणि स्वतंत्र ध्वज ह्या मागण्या लावून धरल्या आहे आणि भारत सरकार ते मान्य न करता चर्चा करतायच ना , तसेच तिथं शांतता आहेच ना. भारतीय राज्यघटनेच्या आधीन राहून आपण त्यांना मोकळीक देऊ शकतो ना, शेवटी india is not a state but union of states. त्यामुळं ठराविक राज्यांचे नियम वेगळे असले मानून काय फरक पडत नाही जशी प्रगती होईल तसे हे नियम आपोआप गळून पडतील.

अमितदादा's picture

25 Jul 2016 - 6:46 pm | अमितदादा

आणि जम्मू आणि लडाख हे भाग पूर्ण पणे indianized झालेत। त्यामुळे त्यांचा काही issue नाहीये। त्यामुळं आपले प्रतिसाद काश्मीर पर्यंत सीमित ठेवले तर बरे होतील.

सुबोध खरे's picture

25 Jul 2016 - 9:59 pm | सुबोध खरे

अमित दादा साहेब
काश्मीर च काय जम्मू आणि लदाख मध्ये पण कलम ३७० मुळे आपण "काश्मिरी" नसाल तर आपल्याला जमीन विकत घेता येत नाही किंवा घर घेता येत नाही . यामुळे कोणतेच उद्योग तेथे आपले कारखाने काढू शकत नाहीत अशा परिस्थितीत कोण उद्योगपती तेथे दुसऱ्याच्या नावाने उद्योग सुरु करेल? आणि उद्योग धंदे नसल्यामुळे काश्मिरी लोकांना नोकऱ्या नाहीत. रिकामे डोके हे सैतानाचे घर असते त्यामुळे अशा तरुणांचे डोके भडकवण्याचे काम करणारे दहशतवादी आणि निधर्मांध काही कमी नाहीत. यामुळेच हा प्रश्न सहज सुटणार नाही.
गरिबी ही क्रांती आणि गुन्हेगारी यांची माता आहे असे म्हटले जाते. येथे तर फुटीरवाद्यांचे समर्थन करून आरामखुर्चीत विचारवंतांनी त्यातील फरकच धूसर केला आहे.

अमितदादा's picture

25 Jul 2016 - 10:22 pm | अमितदादा

खरे साहेब, तुमच्या प्रतिसादाशी अशांत: सहमत, पण फक्त रिकामी डोकी आणि बेरोजगारी हे अशांतते मगच कारण आहे का, मला नाही अस वाटत. तुमि जालावर नक्कीच काश्मीर मधील बातम्या वाचल्या असतील. कितीतरी आतंकवादी हे रोजगाराची संधी उपलब्द असताना हिंसक मार्गाकडे वाळलेत, 2 ते 4 पोलीस कॉन्स्टेबल फोर्स सोडून हिजबुल मुजाहिद्दीन ला जॉईन झालेत. काश्मीर चे सगळे politician दिल्ली मध्ये एक भाषा आणि काश्मीर मध्ये soft separatizm ची भाषा वापरतात. हे काय होतंय, त्यामुळं मला प्रश्न पडतो की आपण काही चुकत नाही आहोत का ? मी हि काही वर्षां पूर्वी काश्मीर मध्ये आर्मी ला फुल्ल पॉवर देऊन असंतोषी लोकांना चिरडा अशा मताचा होतो, पण हळूहळू त्यातील फोलपणा माजा लक्षात आला. मला प्रश्न पडतो की how will u defeat people who have already defeated their fear ? त्यामुळं मज आस मत बनलंय कि deploy military and political approach at same time, talk to everyone who are interested. लष्कर चा अनुभव तुमाला जास्त त्यामुळं तुमचा मताचा आदरच आहे, परंतु अनुभव नसल्याची मते आरामखुर्चीत विचारवंत मानून हेटाळून नाही चालणार. मग शेतकऱ्यांचा विषयवार शेतकरी, स्त्री यांचा विषयावर स्त्री ने आणि डॉक्टर च्या विषयावर डॉक्टर नेच बोलय हवे.

काश्मीरचा प्रश्न लष्करी बळावर सुटणार नाहीच याबद्दल दुमत नाहीच. पण काश्मीर आज लष्करामुळेच आपल्या ताब्यात आहे हीही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. तेंव्हा लष्कराचे मानसिक खच्ची कारण थांबवा एवढीच माझी विचारवंतांना विनंती आहे.
त्यावर राजकीय तोडगा काढणे हाच उपाय आहे हेही माझे मत आहे
पण तो तोडगा काय असेल हे मला सांगता येणार नाही कारण तेवढी माझ्या बुद्धीची झेप नाही.

संदीप ताम्हनकर's picture

25 Jul 2016 - 12:10 pm | संदीप ताम्हनकर

दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: -

कलम ३७० रद्द करा ही सुद्धा अतिराष्ट्रवाद्यांची आवडती पण अव्यवहार्य मागणी आहे. सध्याच्या भाजपा सरकारने तसे नुसते सूतोवाच करून पाहावे, मग काश्मीर मध्ये जो काही आगडोंब उसळेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. विरोधी पक्षात राहून अशी मागणी करणे वेगळे, शाखेतल्या बौद्धिकात (?) बरळणे वेगळे आणि प्रत्यक्षात सत्तेत असताना यासंबंधी कृती सोडा नुसते बोलणे वेगळे, हे आतातरी समजून घ्या.

गामा पैलवान या आयडीने आफ्स्पा कायदा पाहावा ही विनंती, या अंतर्गत सैन्यबलांना मिळालेले अधिकार पाहावे.

कलंत्री यांची प्रतिक्रिया संतुलित आणि विचारपूर्ण आहे, जबाबदार व्यक्तिमत्वाची द्योतक आहे.

अजित डोवाल (संघ प्रणित) विवेकानंद आंतरराष्ट्रीय केंद्राचे फाउंडर डायरेक्टर आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Ajit_Doval
After retirement (2005–2014)[edit]
Doval retired in January 2005[4] as Director, Intelligence Bureau. In December 2009, he was the founder Director of the Vivekananda International Foundation, a think tank set up by the Vivekananda Kendra, a Spiritually Oriented Organisation.[8][9]

सोन्या बापू या आयडीने स्वतः खूप हुशार असल्याचे गृहीत धरले असल्यामुळे साहजिकच बाकी सर्व जण त्यांच्या दृष्टीने निर्बुद्ध आहेत. ते खूपच 'मी मी' करतात. त्यामुळे खरेतर दखलपात्र नाहीच पण त्यांनी माझी पूर्ण पोस्ट रिपीट केल्याबद्दल एवढेतरी लिहिले पहिजे. सैनिक उच्च शिक्षित असतात हे त्यांचे मत करमणूक करणारे आहे. मूळ लेखातील मुद्दे समजून न घेता तिसऱ्याच गोष्टी लिहून भलतेच उलट आरोप करायचे ही वितंडवाद्यांची जुनी खोड आहे, ती सहजी जाणार नाही.
पॅलेट गन कमरेच्या वर मारून शेकडो तरुण आंधळे झाले आणि ५० जण गोळीबारात मेले. त्याबद्दल डझनभर जवान आणि अधिकारी निलंबित होऊन चौकशीला सामोरे जातायत हे लक्षात घ्या. गृहमंत्र्यांनी सैन्याला सबुरीचा सल्ला दिला, पॅलेट गन वापरावर बंदी आणली याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करायचे ही खोड आहे.
माझ्या विचार आणि (अल्प) बुद्धीनुसार सैन्यबळानी अतिरेक करू नये, सैन्याने स्वतःच्या डोक्याने वागू नये, धोरण ठरवणा-यानी दिलेल्या आदेशाची संयमित अंमलबजावणी करावी, अतिराष्ट्रयवाद्यांनी पाठवलेल्या देशप्रेमाने लडबडलेल्या पोस्ट सैनिकांच्या हातातील फोनवर सुद्धा जातात हे लक्षात ठेवावे, चेव येऊन कोणतीही कृती करू नये, इतिहासाचे दाखले हेत्वारोप करण्यासाठी न देता, चुका सुधारण्यासाठी द्यावे, हा भारतासाठी नुसता भूभागाचा (रिअल इस्टेटचा) प्रश्न नसून तेथील जनतेसकट त्यांच्या अशा आकांक्षांसकट भूभागाचा प्रश्न आहे हे कुठेतरी मान्य केले पाहिजे.

अदखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी: -
मूळ लेखावरील अनेक प्रतिक्रिया वैयक्तिक झाल्यामुळे मला नाईलाजाने वैयक्तिक व्हावे लागत आहे त्याबद्दल दिलगीर आहे.
येथील बहुतेक खोट्या नावांच्या शिखंडी आयडी असून लपून बाण मारायला बघतात.
मागितलेले नसताना फुकटचे सल्ले द्यायची घाणेरडी रोगट साथ बहुतेक प्रतिक्रिया देणा-यांच्यांत पसरलेली आहे.
सोन्याबापू नावाचे आयडी जगप्रसिद्ध सर्वद्न्य असल्याच्या थाटात व्यक्त होतायत. त्यांची गणना कशात करायची हेपण स्वतःच सांगतायत हे एक बरे.
मूळ लेख अतिराष्ट्रवाद्यांच्या भ्रामक कल्पना यांच्याविषयीच आहे यामुळे समाजमाध्यमांवर फिरणारे बाष्कळ फॉर्वर्डस यांचा उल्लेख करूनच लेख लिहिलंय. डोवाल विषयक मजकूरसुद्धा याच प्रकारचा आहे.
येथील काही लोकांना आपण पर्यटक म्हणून काश्मीरला जाऊन आलो आणि वेटर, ड्रायव्हर, लॉजवाले इत्यादींशी काही बोललो म्हणजे लगेच काश्मीर प्रश्नावर मत व्यक्त करायला क्वालिफाय झालो असेही वाटते आहे.
काश्मिरात मी फिरलो ते सैन्याच्या भरोशावर नाही. एका सैनिकाने स्थानिकांशी बोलतांना माझ्या छातीला स्टेन गन लावली होती. तेव्हा ती बाजूला करून त्यातील गोळ्या, गणवेश, बूट हे सगळे माझ्यासारख्या माणसांनी दिलेल्या टॅक्सेस मधून येते हे विसरू नको असे नाईलाजाने सांगावे लागले होते. काश्मिरात फिरताना हुर्रियत तसेच स्थानिक संस्थांची बरीच मदत झाली हे मात्र नक्की. सैन्याच्या उपस्थितीमुळे फिरतांना मदत झालीच.
वैचारिक विरोधकाला राष्ट्रद्रोही म्हणून घोषित करायचे आणि आम्ही म्हणतो तीच खर्रीखुर्री राष्ट्रवादाची व्याख्या आहे असे म्हणायचे ही अतिराष्ट्रवाद्यांची जुनीच पद्धत आहे. त्याच धर्तीवर येथे एकमेकांच्यात 'अहो रूपं! अहो ध्वनी!' चालू आहे.
श्रीगुरुजी या आयडीने त्यांच्या एका पोस्ट मध्ये या पोस्ट वर दखलपात्र मूल्यवर्धन (Value Addition) केले आहे. तरीही समाजमाध्यमात फिरणारी JNU वर धमक्या देणाऱ्या नाटकातील सैनिकांची क्लिप त्यांनी आवर्जून पाहावी ही विनंती. पटेल आंदोलन, जाट आंदोलन हाताळताना वापरलेले बळ आणि काश्मिरात वापरलेले उपाय याची तुलना करून पहा. ही सगळीच भारताची अविभाज्य राज्ये आहेत पण ट्रीटमेंट वेगळी दिली जाते. सैन्य धुमाकूळ घालत आहे असे मी न लिहिलेले वाक्य माझ्या तोंडी टाकू नका. सैन्य नक्की काय करते हे खऱ्या अर्थाने आपल्या पर्यंत कधीच येत नाही. स्थानिक लोकांचा उद्रेक झाला तरच थोडी वस्तुस्थिती समजते. काश्मिर खोऱ्यात प्रत्येक शंभर मीटरवर सैनिक एवढे सैन्य असताना सारखा स्थानीकांचा उद्रेक का होतो याचे उत्तर शोधावे ही विनंती.
PDP पहिल्यापासून फुटीरतावादी आहेच. आता BJP त्यांच्यासोबत सत्तेत आहेत. त्यामुळे अशी आता ५६ इंची छाती वाल्यांकडून अशी काय Break Through Strategy वापरली जाते हे पाहण्यासाठी देशातील जनता उत्सुक असताना जे चाललंय ते खेदजनक आहे आणि विशेष आशादायक नाही हे सत्य वारंवार समोर येतंय.
नॅशनल कॉन्फरन्स बजेट आणि निधी साठी भारताबरोबर, भावनिक ऍडव्हान्टेज करिता काश्मिरीयत बरोबर आणि आंतरराष्ट्रीयकरण करण्याकरिता पाकिस्तान बरोबर अशी सोयीस्कररित्या भूमिका घेते.

अनुप ढेरे's picture

25 Jul 2016 - 12:24 pm | अनुप ढेरे

पटेल आंदोलन, जाट आंदोलन हाताळताना वापरलेले बळ आणि काश्मिरात वापरलेले उपाय याची तुलना करून पहा.

कैच्याकै! जाट आंदोलन आणि पटेल आंदोलनात आंदोलक ग्रेनेड फेकत होते का? त्यांच्या मागे एके४७वाले उभे असायचे का?

हा भारतासाठी नुसता भूभागाचा (रिअल इस्टेटचा) प्रश्न नसून तेथील जनतेसकट त्यांच्या अशा आकांक्षांसकट भूभागाचा प्रश्न आहे हे कुठेतरी मान्य केले पाहिजे.

याच्याशी समहत. देश = जमीन एवढंच नसून देश = लोकं हे देखील आहे.

जतीन देसाई मित्र आहेत वाटत तुमचे

सोन्या बापू या आयडीने स्वतः खूप हुशार असल्याचे गृहीत धरले असल्यामुळे साहजिकच बाकी सर्व जण त्यांच्या दृष्टीने निर्बुद्ध आहेत. ते खूपच 'मी मी' करतात. त्यामुळे खरेतर दखलपात्र नाहीच पण त्यांनी माझी पूर्ण पोस्ट रिपीट केल्याबद्दल एवढेतरी लिहिले पहिजे. सैनिक उच्च शिक्षित असतात हे त्यांचे मत करमणूक करणारे आहे.

ओ साहेब, सोन्याबापूंच मत पटलं किंवा नाही पटलं तर त्यावर बोला ना की उचलला कळफलक आणि लागले बडवायला.

किमान त्यांच्या सैनिकी पेशाचा तरी जरा आदर ठेवा. अरे, विसरलोच...तुम्हाला तर सगळ्या सैनिंकाबद्दल अ‍ॅलर्जी आहे ते, म्हणजे लेख वाचून तरी तसेच वाटतंय.