हवामान खात्याचा अंदाज ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
14 Jun 2016 - 8:53 pm
गाभा: 

राम राम मंडळी. मंडळी, जगभरातल्या हवामान खात्याच्या तज्ञांनी या वर्षी भारतात भरपूर पाऊस पडेल असं म्हटलं होतं. आणि त्यांचा संदर्भ घेऊन आणि थोडाफार अभ्यास करुन आमच्या भारतीय तज्ञांनीही विविध तक्ते आणि अनुषांगिक अभ्यासाच्या संदर्भ देत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असं म्हटलं होतं. सात जून पर्यंत मान्सुन महाराष्ट्रात प्रवेश करेल असे अनुमान संबंधितांनी काढले होते. केरळात मान्सुन बरसला की तो पुढे महाराष्ट्रात चारपाच दिवसांनी पोहचतो असा अभ्यास जवळ जवळ सर्व महाराष्ट्रीयन माणसांचा वेधशाळेच्या माहितीकडे दुर्लक्ष करुन झाला आहे. कालांतराने दहा तारखेपर्यंत पाऊस पडेल असं म्हटल्या गेलं. पुढे बातम्या आल्या की मान्सुनचे आगमन लांबले आहे. आपल्या अभ्यास आणि संशोधनाच्याद्वारे भारतीय वेधशाळांनी या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारतात सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असे अंदाज वर्तवले होते. विविध आलेख आणि तक्त्यांच्या आधारे पाऊस किती असेल त्याची मांडणी केलेली होती. जून महिन्यात अमुक अमुक, जुलै महिन्यात धमुक धमुक पाऊस पडेल, अगदी ऑक्टोंबर, नोहेंबर पर्यंत धो धो पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने सांगितला होता. पुढील महिन्यात किती पाऊस पडेल ते माहिती नाही, पण आज जून मध्य ओलांडून पुढे जात आहे तरी पावसाचा पत्ता नाही. काही ठिकाणी पडला आहे, पण सर्वत्र पाऊस नाही असे दिसत आहे. लहानपणापासून रेडीयो केंद्रावर विविध कार्यक्रमाच्या ब्रेकमधे मी ऐकायचे की आज दिवसभर हवामान ढगाळ राहील, आकाश निरभ्र राहील, वारे वाहतील, पण या विभागाचा पावसाचा अंदाज हमखास चुकतो असे वाटले आहे. हवामान खात्याच्या विभागावर नेहमीच मी व्यंगचित्र पाहिली आहेत. मला हे हवामान खात्याचे तज्ञ आणि ज्योतिषी सारखेच वाटतात, लागला अंदाजे टोला तर लागला नाय तर कोणते तरी ग्रह आडवे आले होते म्हणून हे पळ काढतात. आमचा एक मित्र म्हणत होता की मटका खेळणार्‍यांना तरी हा विभाग चालवायला द्यावा. दहा आकड्यापैकी एखादा तरी आकडा बरोबर लागेल. मंडळी, तसा हा विभाग खूपच विनोदी झाला आहे. माझ्या काथ्याकुटातील विनोदाचा भाग सोडून द्या. पण मला खरच काही प्रश्नांची माहिती हवी आहे.

१) भारतात हवामान अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतील अशा वेधशाळा नाहीत का ?
२) हवामान खात्याचे अंदाज का चुकतात ?
३) भारतात वेधशाळा किती आणि त्यातील तज्ञ व्यक्ती कोणत्या ?
४) भारतात वेधशाळेतील अभ्यासकांची संख्या किती ?
५) भारतात सरासरी दर महिन्याला या तज्ञांवर किती खर्च होतो ?
६) वेधशाळांचा जर काही फायदाच होत नसेल तर या वेधशाळा बंद का केल्या जात नाहीत ?
७) इतकी मोठमोठी उपग्रह आपण आकाशात सोडतो त्यातील एकाही ग्रहाला पावसाचा पत्ता लागत नाही का ?

विनंती : हवामान खात्याच्या अंदाजाविषयी हा धागा आहे, उगं त्याला सरकारी विभाग, त्यांचे कार्य आणि तत्सम विषयांकडे वेधशाळेला घेऊन जाऊ नये, ही नम्र विनंती.

प्रतिक्रिया

विकास's picture

14 Jun 2016 - 8:59 pm | विकास

हवीत कशाला असली (हवामान खाती वगैरे) थेरं? आमचे पूर्वज जेंव्हा असली खाती नव्हती तेंव्हा देखील सुखाने शेती करत आणि नद्या दुथडी भरून वाहू शकत, कारण ...
Nandi

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2016 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास सर भारी हं. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय असं आम्ही आमच्या लहनपणी विचारलं आहे. भोलानाथही पाऊस पडेल असं म्हणायचा. अजून एक आठवण सांगायची राहीली. पाऊस यावा म्हणून महिला डोक्यावर शेनाची एक धोंडी करायच्या. आणि डोक्यावर त्या धोंडीला मिरवत मिरवत घेऊन जायचे. बाकी, महिलांनी पाण्याच्या कळश्या डोक्यावर घ्यायच्या आणि दारोदार जायच्या. ज्यांच्या घरी या महिला गेल्या की तेथील महिला यांच्या अंगावर, त्या धोंडीवर पाणी टाकायच्या. पाऊस यावा म्हणून मागणी करणार्‍या स्त्रीया घरोघर जात तेव्हा काही तरी असं गाणं म्हणायच्या त्याची आठवण झाली.

''धोंडीबाई धोंडी, धोंडी गेली हाटा
पाऊस आला मोठा.
आमच्या कन्या शिजल्या.
धोंडीच्या भाकरी भिजल्या''

असं घरोघर पावसाची विनवणी केली तरी खूप मोठा पाऊस यायचा. :)

-दिलीप बिरुटे

विकास's picture

14 Jun 2016 - 11:59 pm | विकास

धोंडीबाईचे गाणे मला नवीनच होते! इथे शेअरल्याबद्दल धन्यवाद!

विकास's picture

14 Jun 2016 - 9:06 pm | विकास

आपण केवळ ब्रिटीशकालीन कायदेच अजून वापरतो असे नाही तर त्यावेळच्या पध्दती देखील तशाच ठेवल्या आहेत. त्यातील एक म्हणजे हवामानाचा अंदाज.. आपण आजमितीस वापरत असलेली पद्धत ही १९२० सालापासूनची आहे.

मात्र आता मोदी-सरकारने ६० मिलियन्स $$ चा महासंगणक घेण्याचे ठरवले आहे. तो २०१७ मधे वापरात येईल. त्यात ३-डायमेन्शनल मॉडेलिंगचा वापर करून अमेरीकेत ज्या पद्धतीने हवामानाचे अंदाज वर्तवण्यात येतात तसे वर्तवले जातील. याचे अनेक फायदे आहेत. एक प्रमुख फायदा म्हणजे शेतकर्‍यांना रोपे कधि पेरावीत याबद्द्ल अचूक माहिती समजू शकेल.
$60 Million Supercomputer To Predict

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Jun 2016 - 1:47 pm | अनिरुद्ध.वैद्य

परम वगैरे करु नाही शकत का हे कामं?

तो त्या काळातला महासंगणक झाला. आत्ताचे साधे संगणकही त्याच्यापेक्षा कित्येक पटीने भारी आहेत. इतके ते तंत्रज्ञान पुढे गेलाय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jun 2016 - 5:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

महासंगणक पुढे गेले नाहीत असे कोण म्हणाला बुआ!?? तूर्तास हवामान मॉडेलिंग साठी वापरला जाणार इंडियन इनस्टीटूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी पाषाण पुणे ह्यांचा 'आदित्य' हा महासंगणक जगातील सर्वोत्तम 500 महासंगणकांपैकी एक आहे तसेच ह्या सर्वोत्तम 500 लिस्ट मध्ये 11 भारतीय महासंगणक आहेत हे ही ह्या निमित्ताने नोंदवतो

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Jun 2016 - 5:33 pm | अनिरुद्ध.वैद्य

ते मान्यय हो. बाकी मग ते न वापरता अजुन बाहेरुन महासंगणक आणत आहेत म्हणुन विचारले.
असो. आदित्यबद्दल वाचतो.

धन्यवाद!

लेखातील प्रश्नाशी सहमत आहे.

प्रचेतस's picture

14 Jun 2016 - 9:10 pm | प्रचेतस

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2016 - 9:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालचा पाऊस तुमच्या गावात आलाच नाही,
म्हणून सदरहू पीक तुम्ही आसवांवर काढले का ?

हा माणुस असा का वागतोय, कोणास ठाऊक ?

बाय द वे वल्ली, मी डिस्कव्हरी फार पाहतो. परदेशात भवंडर भवंडर म्हणून ते क्यामेरेवाले त्या वादळाभोवतीच राहून हे वादळ कुठे येणार त्याची सूचना देतात, सालं आम्ही इतक्या पुढे गेलो आम्हाला पावसाचा अंदाज बरोबर वर्तवता येत नाही. अजूनही पावसाची शक्यता असेच म्हणतो.

भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे. आजच्या दिवशी काय काय अंदाजफेकतंय पाहा. (पीडीएफ फाईल लगेच उघडते, इंट्रेष्ट नसेल तर क्लिकु नये ही नम्र विनंती)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

14 Jun 2016 - 9:38 pm | प्रचेतस

कै नै.
पावसाची वाट बघतोय झालं. परवा मळवलीला थोडासा झिरपून गेला.

लेखातील भावनांशी सहमत असलो तरी भारतीय उपखंडात पडणार्‍या मोसमी वार्‍यांपासूनच्या पावसावर परिणाम करणारे असंख्य घटक असतात. ते कोणते व किती हे अजूनही पूर्णपणे समजलेले नाहीये.

ऊर्वरीत प्रतिसाद नंतर.....

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Jun 2016 - 10:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

स्वॅप्सभाऊ ह्यांच्याशी सहमत, अन त्यांच्या तपशीलवार प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत . बाकी नंतर बोलता येईल

संजय पाटिल's picture

18 Jun 2016 - 11:35 am | संजय पाटिल

चार महिन्यांचा पवसाळा हा फक्त भारतीय उपखंडातच असतो. इतरत्र वर्ष भर थोडा थोडा पाउस पडत असतो. यामध्ये मोसमि वारे, अरबी समुद्रातील व बगालच्या उपसागरातली परिस्तीथी, आणि अजून बरेच घटक समाविष्ठ आहेत.
त्यामुळे भारतिय मॉन्सून चा अंदाज बांधणे बरेच कठिण आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2016 - 9:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला महाराष्ट्र शासनाच्या विभाकाकडून एक एसएमस येतो आपल्यापैकी अनेकांना येत असेल. आजचा संदेश पाहा.

''या आठवड्यात मराठवाड्यात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून, दिनांक १९ जून २०१६ रोजी वादळी वार्‍यासह मध्यम ते भारी पावसाची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन लांबण्याअची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी मान्सूनचे आगमन झाल्याशिवाय पेरणी करु नये''

शेतकर्‍यांसाठी ही संदेशाची सोय चांगली आहे पण जर मान्सून लांबण्याची शक्यता आहे, पेरणी करु नये असंही म्हणत आहात तर १९ तारखेला पावसाची शक्यता कशावरुन व्यक्त केली आहे. दुसरं असं की शेतकर्‍यांनी रान तयार करुन ठेवलं आहे. चांगला पाऊस पडला १९ ला तर शेतकरी पेरणीच्या बाबतीत दम मारेल असं मला अजिबात वाटत नाही.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

14 Jun 2016 - 9:58 pm | प्रचेतस

१९ चा पाऊस पूर्वमौसमी असेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2016 - 10:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

पावसाच्या बाबतित इतके अगणित आणि आतापर्यंत कोणालाही पूर्णपणे न समजलेले चल घटक (व्हेरिएबल्स) आहेत की त्याचा काही तासांच्या अगोदपर्यंत नक्की अंदाज वर्तविणे जगभरच कठीण आहे. त्यातल्या त्यात उपग्रहांनी पाठविलेल्या चित्रांवरून व समुद्रात बसविलेल्या सेंसर्सवरून बर्‍यापैकी अंदाज बांधता येतो. पण तरीही (अ) समुद्रावरचा वारा कधी दिशा बदलेल, (आ) एखादे वादळ कधी सुरू होईल आणि (इ) त्यामुळे ढग कुठे वाहून नेले जातील, यांचे फार काळ अगोदर अंदाज बांधणे बरेच कठीण असते. हजारो व्हेरिएबल्स वापरून केवळ जागोजागचे सेंसर्स व उपग्रहांची मदत असलेला सुपरकाँप्युटरच बर्‍यापैकी (पण नेहमीच अचूक नव्हे) अंदाज बांधू शकतो. म्हणुनच, अगदी पाश्चिमात्य देशांतही, अगोदर ठरवलेली दिशा सोडून वादळ दुसरीकडे वळले आणि वेगळ्याच ठिकाणी किनारपट्टीवर उतरले अश्या बातम्या नेहमीच्याच आहेत. फक्त त्या आपण नेहमीच जवळून पाहत नाही, इतकेच.

नुकतेच अनुभवलेले उदाहरण म्हणजे ३० मे ला अमेरिकेत मेमोरियल डे साजरा झाला. त्यानिमित्त जागोजागी प्रेक्षणीय संचलने केली जातात. त्यावेळी न्यु हेवन येथिल हवामानाच्या अंदाजात पाऊस पडण्याच्या शक्यतेचे आडाखे असे होते : ६ वाजता ४०%, ८ वाजता ६०% आणि ११ वाजता १००%. ते पाहून शहराच्या मेयरने ११ वाजता होणारे संचलन रद्द केले. प्रत्यक्षात सकाळी थोडासा पाऊस पडला, पण ११ वाजता मस्त सूर्य तळपत होता ! :)

(तरी मी आमच्या नातेवाईकांना सांगत होतो की आम्हाला संचलन बघायचे असल्याने पाऊस पडणार नाही. पण त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. आता बोला ! ;) )

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Jun 2016 - 10:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

+1000 ई ए काकांना :)

विशेषतः सतत बदलणारे वेरिएबल्स संदर्भासाठी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2016 - 10:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या प्रतिसादात दोन गोष्टी दिसतात एक पावसाचा अंदाज वर्तविणे जगभरच कठीण काम आहे आणि दुसरं असं की पावसाच्या अंदाजावर परिणाम करणारा घटक म्हणजे समुद्रावरचा वारा.

डॉक्टरसाहेब, भारताच्या नैऋत्याकडून हा पावसाळा आपल्याकडे येतो आपण त्याला नैऋत्य मान्सुन असेही म्हणतो. आपल्याकडे जो वारा पाऊस घेऊन येतो तो वारा हिंदी महासागर आणि अरबी समूद्रावरुन वाहात येतो यात कोणतीही अनियमितता मला वाटत नाही. मला पहिल्यांदा यावेळेसच्या दैनिकामधे वाचायला मिळालं ते अल निनो चा परिणाम या वा-यांवर होतो आणि ते पावसाला अडवतात असे म्हणता येते कदाचित माझं चुकतही असेल. मग हे हवामान खातं फ़क्त अंदाज लावते असेच म्हणावे लागेल.

मौसमी वारे कसे वाहतील त्याची एक नियमितता आहे की नाही ते जर नियमित वाहात नसतील, असतील तर हवामान खात्याने त्याचा अंदाज पूर्वीच बांधायला हवा असेही वाटते.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2016 - 12:41 am | डॉ सुहास म्हात्रे

३१ मे नंतर १० दिवसांनी १० जून येणार हे एक नियमिततेचे उदाहरण झाले. अश्या बाबतीत अंदाज नाही तर खात्रीने सांगता येते. जर मोसमी हवामान आणि वारे हे जर तसेच नियमित असते तर त्यांचा अंदाज लावायची गरजच उरली नसती !

एखाद्या ठिकाणचे वातावरण दर वर्षी त्याच वेळेला "साधारण" तसेच राहते असा आपला गेल्या काही वर्षांच्या अनुभभवावरून बांधलेला "सरासरी आडाखा" असतो. कारण कोणत्याही सलग दहा-वीस वर्षांच्या श्रेणीचेही हवामान ताडून पाहिले तर कोणत्याच दोन वर्षी ते समान असलेले सापडणार नाही. त्यातच एखाद्या वर्षी काही चल घटक अचानक प्रमाणापेक्षा बदलले असले तर हवामानात फार मोठा फरक (दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ, इ) पडलेला असतो.

एखाद्या ठिकाणच्या हवामानावर तेथिल चल घटकांबरोबरच त्याठिकाणापासून शेकडो किमी दूर असणार्‍या ठिकाणांच्या चल घटकांचाही परिणाम पडतो. हिमालयातली थंडीची लाट महाराष्ट्रालाही हुडहुडी भरवते आणि राजस्तानमधील गरम हवा दिल्लीत लू आणते.

समुद्रातल्या पाण्याची वाफच मूलतः ढग निर्माण करते. समुद्रावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तापमान, आर्द्रता, वार्‍याचा वेग, ई तुलनेने जास्त सहजपणे होते आणि त्यात बदलही सहजतेने होतात. त्यामूळे वारे कसे वाहतील व त्यामुळे वाफ (ढग) कुठून कुठे वाहेल, हे वेळोवेळी बदलत राहते. खालील आकृतीत हे अत्यंत सोप्या प्रकारे विषद केले आहे (खर्‍या परिस्थितीत त्यात अनेक पटींनी जास्त चल घटक, किचकट प्रकारे, एकमेकाशी असंख्य प्रतिक्रिया करत असतात)...


(जालावरून साभार)

हेच अतीउंचीवरील व बर्फाळ प्रदेशांतही घडते. दोन्ही धृवांवर आणि हिमालय-आल्प्स, इत्यादी उंच पर्वतराजीत तासदोनतासांत अत्यंत उलटसुलट प्रकारचे हवामान ही नित्याची गोष्ट आहे. या सगळ्याची पहिली लक्षणे सुरु झाली की मगच त्याबद्दल सांगता येते... खूप वेळ अगोदपासून ते होईल असे सांगता येत नाही... आणि नक्की कोणत्या जागी त्याचे परिणाम नक्की कोणत्या तीव्रतेचे असतील हे सांगणे तर त्याहून कठीण असते. गेल्या वर्षीचेच उदाहरण घ्यायचे तर मान्सूनचा चांगला जोर (महासागरात ढग तयार होणे व ते भारताच्या दिशेने वहायला सुरुवात करणे) होता. पण अचानक आलेल्या वादळाने त्यांना भारताच्या किनार्‍यापासून दूरवर भरकटवले.

हवामान या विषयात खूप प्रगती केली गेली आहे. हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी अनेक आडखे, मॉडेल्स आणि सिद्धांत बनवले गेले आहेत. मात्र, जेव्हा नक्की उत्तर माहीत नसते तेव्हाच अनेक आडखे/मॉडेल्स/सिद्धांत तेव्हाच आस्तित्वात असतात ! :)

एकंदरीत, हवामान या विषयात माणुस अजुनही प्राथमिक शाळेतच आहे ! ;)

यशोधरा's picture

14 Jun 2016 - 10:32 pm | यशोधरा

वाचते आहे..

मंदार कात्रे's picture

14 Jun 2016 - 11:19 pm | मंदार कात्रे

आत्ताच साम टीव्हीवर अ‍ॅग्रोवन कार्यक्रमात एका हवामान शास्त्रज्ञाची मुलाखत झाली . त्यानी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष पाऊस पडणे अनेक घटकांवर अवलम्बून असते. त्यापैकी महत्त्वाचा घटक म्हणजे अरबी ,हिन्दी आणि बंगालच्या समुद्राचे तापमान व भारतीय उपखन्डातील जमिनीवरील हवेचा दाब . यावर्षी मोसमी वार्यावर विपरीत परिणाम करणारे घटक फारसे प्रभावशाली नाहीत त्यामुळे वारे मॉन्सूनला अनुकूल आहेत , भारतीय उपखंडा तील हवेचा दाब देखील योग्य आहे परन्तु समुद्राच्या पाण्याचे तापमान कमी असल्याने त्याचा विपरीत परिणाम पावसावर झालेला आहे. पाण्याच्या कमी तापमानामुळे पुरेसे बाष्प बनण्यात अडचणी येत आहेत. हे तापमान पुढच्या काही दिवसात वाढेल अशी अपेक्षा आहे .

एकूणच कोकणात २३-२४ तारखेनन्तर आणि इतरत्र जुलै महिन्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे

खटपट्या's picture

15 Jun 2016 - 12:33 am | खटपट्या

थोडे विषयांतर,

एकूणच कोकणात २३-२४ तारखेनन्तर आणि इतरत्र जुलै महिन्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे

मागील एक दोन वर्षात सरकारने आणि इतर माध्यामांनी पाणी साठवण्याबाबतीत केलेली जनजाग्रुती कामी येतेय. महाराष्ट्रातही ठीकठीकाणी नदीपात्रे, तलाव खोल करुन जनता वाट पहाते आहे. मंदार कात्रे म्हणतायत त्याप्रमाणे पाउस झाला तर यावर्षी पाणीसमस्या थोडीतरी सुटेल अशी आशा आहे. पाहूया काय होतेय.

ता.क. - राजापूरात चांगला पाउस पडतोय.

पहिले म्हणजे आपण भारतीय हवामान खाते कोणत्या प्रकारचे हवामान वर्तवीतअसते ते पाहुया :-भारतीय हवामान खाते हे ३ प्रकारचे हवामान अंदाज व्यक्त करीत असते.१) Now Casting Forecast - २४ तासांसाठी.२) Short Range Forecast - ७२ तासांसाठी.३) Mid Range Forecast - ४ ते १० दिवसांसाठी.४) Long Range Forecast - ३० दिवस ते पूर्ण हंगामासाठी.मान्सून कसा बनतो?मार्च, एप्रिल व मी महिन्यामध्ये उत्तरायण अगदी जोरात चालू असते तेव्हा उत्तर अटलांटिक सागर, हिंदी महासागर आणि मध्य पसिफिक महासागर या समुद्रांवर खूप गरम उन पडत असते त्यामुळे तिथली हवा खूप बाष्पमय झालेली असते. यालाच इंग्रजीत (Thermal Equator) असे म्हणतात. आणि अगदी याच वेळेस दक्षिण हिंदी महासागर आणि दक्षिण अरबी समुद्र यात कमी दाबाचे पट्टे साधारण मे महिन्याच्या मध्यावर तयार होऊ लागतात. हे कमी दाबाचे पट्टे हि बाष्पमय हवा स्वतःकडे खेचून घेतात. आणि त्यामुळे गरम हवा आणि थंड हवा याची सरमिसळ होऊन हा पट्टा अरबी समुद्रातून केरळ कडे सरकू लागतो आणि जोरदार वार्यांसह दक्षिण भारतात खूप पाउस पडतो. यालाच मान्सून असे म्हणतात.भारतीय हवामान खाते नेहेमी अंदाज वर्तविण्यात अपयशी का ठरते याची कारणे१) मान्सून चे अचूक वर्तमान करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर डेटा ची गरज असते. यामध्ये, उत्तर अटलांटिक सागर, हिंदी महासागर आणि मध्य पसिफिक महासागर यांच्या पाण्याचे तापमान, युरोप आणि आफ्रिकेचे जमिनीवरील तापमान, पसिफिक महासागराच्या उबदार प्रवाहांची घनता, आणि अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या जवळ असलेला समुद्रावरील हवेचा दाब या आणि अशाच प्रकारच्या आणखी डेटा ची गरज असते. भारताकडे असलेली कमी उपग्रहांची संख्या आणि कमी प्रमाणात उपलब्ध असलेली उपकरणे यामुळे एवढा खोलात जाउन प्रत्येक वेळी त्यांना डेटा मिळत नाही.२) दुसरे कारण म्हणजे हा डेटा प्रोसेस करण्याची अत्युच्च क्षमता भारतीय कॉम्पुटर सिस्टीम मध्ये नाही. कारण Accuweather , skymet , आणि बाकी देश हा डेटा सांख्यिकीय दृष्टीने प्रोसेस करण्यासाठी उच्च प्रकारचे सुपरकॉम्पुटर्स आणि आधुनिक अल्गोरिदम्स वापरतात याउलट भारतात अजूनही २००० च्या काळातले जुनाट अल्गोरिदम्स वापरात आहेत, यामुळे आपल्याला काही मर्यादा आहेत.३) तिसरे कारण म्हणजे भारतातील बर्याच वेधशाळांमधली खूप महत्वाची पदे रिक्त आहेत. अर्थात आता याला बरीच कारणे असू शकतात जसे कि, हवामान खात्याला सरकार दरबारी योग्य ते महत्व नसणे. किवा शासकीय निधीची कमतरता असणे.४) चौथे महत्वाचे कारण म्हणजे भारताची भौगोलिक संरचना व याचे भौगोलिक स्थान - भारत हा उष्ण आणि बाष्पीय कटीबंधातला देश आहे कारण विषुव वृत्तीय रेषा भारताच्या ठीक मध्यातून जाते. असे असूनसुद्धा भारताच्या उत्तरेला हिमालयामुळे शीत वातावरण, वायव्य दिशेला राजस्थानच्या वाळवंटमुळे कोरडे वातावरण, पश्चिमेला सह्याद्री आणि समुद्राच्या सान्निध्यामुळे दमट वातावरण, ईशान्येला आल्हाददायक वातावरण असे आहे. त्यामुळे वेधशाळा त्यांच्या कुवतीनुसार जो डेटा गोळा करीत असतात त्यात अचूकपणाची कमी असते.त्यामुळे सध्या तरी उपग्रहांची संख्या वाढवणे, उच्च दर्जाची उपकरणे वापरणे, सुपर कॉम्पुटर्स वापरणे, वेधशाळांचे मनुष्यबळ वाढवणे, आणि सगळ्यात महत्वाचे शासकीय अनास्था दूर करून या सगळ्या गोष्टींसाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देणे हेच उपाय होणे आवश्यक आहेत.

चतुरंग's picture

15 Jun 2016 - 12:10 am | चतुरंग

कारण विषुव वृत्तीय रेषा भारताच्या ठीक मध्यातून जाते.

मला वाटतं तुम्हाला कर्कवृत्त म्हणायचं असावं..

(कर्कसंगत)रंगा

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2016 - 12:50 am | डॉ सुहास म्हात्रे

"विषुव वृत्तीय रेषा" (इथे कर्क वृत्तीय रेषा असे पाहिजे) हा अनवधानाने झालेला टंकनदोष सोडला तर...

...उत्तम शास्त्रिय माहिती असलेला प्रतिसाद !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2016 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे, आवडला.

-दिलीप बिरुटे

लालगरूड's picture

15 Jun 2016 - 12:13 am | लालगरूड

मला हवामान खात्यातल्या नोकरीचं खुप अप्रुप वाटतं ...

कुठलं टारगेट नसतं,

अंदाज खोटे ठरले तरी कोणी राजीनामा मागत नाही,

कोणतीही कार्रवाई नहीं..

विशेष म्हणजे कोणी सिरियसली घेतच नाही ..

धनंजय माने's picture

15 Jun 2016 - 1:29 am | धनंजय माने

विश्वम्भर भट म्हणायचे- पाप वाढलेंय हो पाप!
कसा पडेल पाऊस??? कितीही प्रगत उपकरणं घेऊन या तुमची, काही म्हणजे काही फरक पडायचा नाही.

असो! आम्ही बनवाबनवि केलि ती आमची परिस्थिती नव्हती म्हणून, तुम्ही(म्हणजे हे सरकारी लोक) का लोकांना बनवतायत कोण जाणे...

सौन्दर्य's picture

15 Jun 2016 - 5:54 am | सौन्दर्य

आमच्याकडे म्हणजे ह्युस्टनमध्ये पावसाचे अंदाज बर्यापैकी अचूक असतात. सकाळी अगदी अंग भाजणारे उन असले आणि वेधशाळेने ५०% पावसाचे भाकीत केले तर पाउस पडतोच पडतो. कितीतरी वेळा, "वेधशाळेने भाकीत केले आहे ना म्हणजे आपल्याला पडलेच पाहिजे" अश्या विचाराने पाउस पडत असावा. ह्यातील विनोदाचा भाग सोडला तरी वेधशाळेचे अंदाज ७५% जास्त बरोबर ठरतात.

नाखु's picture

15 Jun 2016 - 9:23 am | नाखु

कसा मांडावा याचा वस्तुपाठ म्हणून या धाग्याकडे पाहता येईल. रेशमी चिमटे काढत माहीती देण्यास उद्युक्त करणे खरेच कौशल्याचे काम आहे.त्यामुळेच अश्या धाग्याकडे वल्लींनी हजेरी लावली असावी असे आम्चे अनुमान आहे.

प्रा डॉ.नी अत्यंत ज्वलंत विषयाला वाचा फोडली आहे.

जर जुनीच कार्यपद्धती,आणि अत्यंत जुनाट(ब्रिटीशकालीन) उपकरणे असतील तर हवामान खात्याला सर्वस्वी दोष देणे योग्य नाही.(औंध रुग्णालयात एक अतिप्रगत विदेशी व महागडे उप्करण निव्वळ ते चालवू शकेल असा कुशल वैद्यकीय तंत्रज्ञ नसल्याने किमान २-३ वर्षे धूळ खात पडून होते अशी बातमी सकाळमध्ये दोन वर्षांपुर्वी वाचली आहे)
त्यावरून सरकारी अनागोंदी आणि हडेलहप्पीचा अंदाज येऊ शकतो.

लाल गरूड यांचे त्या खात्याबद्दलचे मत सर्वच सरकारी खात्यांना कमीजास्त लागू पडते अगदी रेल्वेलाही.

सरसकटीकरणास विरोध असलेला नाखु

ता.क. लेखक मजकुरांकडून अश्याच माहीतीपुर्ण धाग्यांबरोबरच जाज्व्यल्य लिखाणाचीही अपेक्षा आहे.

शाम भागवत's picture

15 Jun 2016 - 10:57 am | शाम भागवत

जर जुनीच कार्यपद्धती,आणि अत्यंत जुनाट(ब्रिटीशकालीन) उपकरणे असतील तर हवामान खात्याला सर्वस्वी दोष देणे योग्य नाही.

सहमत.

आपली Indian Regional Navigation Satellite System (IRNSS) अंतर्गत सात उपग्रहांची स्थापना झाली असून आता आपल्याला २४ तास मोठ्या प्रमाणात माहिती मिळावयास सुरवात होणार आहे. (या वाक्यातील २४ तास हे शब्द महत्वाचे आहेत.) ह्या माहितीच्या विश्लेषणासाठी महासंगणकाची आवश्यकता असते व तोही आपण घेत आहोत. हे सगळे डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजे पुढच्या पावसाळ्यात याचा उपयोग खर्‍या अर्थाने होणार असून तेव्हाच हवामान विभागावर काही लिहिणे जास्त संयुक्तिक होईल असे वाटते.

या अगोदर महासंगणक घेऊन काही उपयोग नव्हता कारण तेवढा डाटा आपल्याला २४ तास उपलब्ध होत नव्हता. असो.

मला वाटते की शास्त्रज्ञ सगळे योग्य वेळी व योग्य प्रकारे करत आहेत व सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे इतके सद्या पुरेसे आहे.

अवांतर:
स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण सर्वांनी ६५ वर्षे आपण धीर धरला आहे. तर आता काही महिन्यांचा धीर धरायला काय हरकत आहे?
:))

बिरुटेसर, तुमच्या बद्दल आदर ठेउन सुद्धा असहमत आहे असे म्हणावे लागते.

१. जगात सर्वत्रच लाँगटर्म हवामानाचा अंदाज चुकत असतो किंवा तो टेंटेटीव्ह असतो. पुढच्या १२ किंवा २४ तासाचा अंदाज बर्‍यापैकी जमतो. त्यात सुद्धा २४ तासाचा पुन्हा टेंटेटीव्ह असतो. युरोप आणि युके मधे सुद्धा हवामान अंदाजाची अशीच चेष्टा उडवली जात असते.

२. मान्सुन चा अंदाज हा खुपच भविष्यातला असल्यामुळे आणि मान्सुन साठी प्रचंड वेगवेगळे आणि काँफ्लिक्टींग पॅरॅमिटर असल्यामुळे ८-१० दिवस इकडे तिकडे होणे स्वाभाविक आहे.

३. गेल्या १०-२० वर्षात भारतात पण नविन तंत्रद्नान आणि पद्धती वापरल्या जातात. गोवारीकर आणि नंतर अनेक मॉडेल तयार झाली आहेत. १९२० सारखेच काम चालते असे म्हणणे पूर्ण चुक आहे.

मी म्ह्णीन गेल्या खाही वर्षात मान्सुन चा अंदाज बर्‍यापैकी जमला आहे. पुढच्या २-३ दिवसात पाउस पडेल की नाही सांगणे अवघड असते.

अभ्या..'s picture

15 Jun 2016 - 12:37 pm | अभ्या..

वेधशाळा कायबी म्हणू दे, 20 जून शिवाय खर्या पावसाला सुरवात नाही.

किसन शिंदे's picture

15 Jun 2016 - 12:43 pm | किसन शिंदे

हवामानखात्याच्या अगदी मे महिन्यापासून येणार्‍या बातम्यांवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी दिलेले सगळेच अंदाज चूकताहेत. बाकी धाग्यावरील माहितीपूर्ण प्रतिसाद वाचनीय. नवीन माहिती मिळतेय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jun 2016 - 2:44 pm | कैलासवासी सोन्याबापु

हि लिंक पाहता भारतात कायम जुनीच स्टॅटिस्टिकल मॉडेल्स वापरली जातात हा आरोप काही पटण्यासारखा नाही , डॉक्टर वसंत गोवरीकरांनी ह्याच्या आधीचे मॉडेल 1988 मधे विकसित केले होते असे ही समजते , म्हणजे ब्रिटिशकालीन मॉडेल्स वगैरे वापरली जातात ह्यात काही तितकेसे तथ्य नसावे, उरतो प्रश्न संगणक क्षमतेचा तर त्या बाबत खालील माहिती कळली


Aaditya
Indian Institute of Tropical Meteorology, Pune, has a machine with a theoretical peak of 790.7 teraflop/s, called Aaditya, which is used for climate research and operational forecasting. It ranked 96th among the world's top 500 supercomputers June 2013 list.

तस्मात संगणक क्षमतेत सुद्धा भारतीय हवामान खाते हे अगदी हे आहे असे म्हणवत नाही मला तरी

सॅटिस्टिकल मॉडेलिंग बद्दल बॅट्याची मते वाचायला आवर्जून आवडतील आम्हाला.

वाचतोय
चांगली माहीती मिळत आहे. धागा विषय आवडला.

तिसरे कारण म्हणजे भारतातील बर्याच वेधशाळांमधली खूप महत्वाची पदे रिक्त आहेत.

-हेच खरं कारण असावं आडाखे चुकण्याचं.
शिवाय सातव्या आयोगात पगारवाढ झालीच नाही ( धागा पाहा ).सरकारी अधिकारी रुसले की काहीही होत नाही.पाऊसही पडत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2016 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>शिवाय सातव्या आयोगात पगारवाढ झालीच नाही ( धागा पाहा सरकारी अधिकारी रुसले की काहीही होत नाही. पाऊसही पडत नाही.

फॉल, फॉल, फॉल. पगार वाढ होत नाही म्हणून पाऊस पड़त नाही हे चूक आहे. पापं वाढली हो दुसरं काही नाही. आणि देवाने तरी कोनाचं ऐकायचं हो ? एका माणसाच्या जूळ्या मुलींचं लग्न झालंय. एक कुंभाराच्या घरी दिली आहे आणि एक शेतक-याच्या घरी. कुंभाराच्या घरी दिलेली मूलगी देवाला नवस करते आत्ताच रांजन, माठ, चुली करुन ठेवल्या आहेत पाऊस नको येऊ देऊ. शेतक-याच्या घरी दिलेली मुलगी म्हणते पाऊस येऊ दे, पंढरपुरची पायी वारी करेन. अशा वेळी देव कन्फ्यूज होतो हो दुसरं काही नाही. :)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jun 2016 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवे निष्कर्ष, अजून काही माहिती ? की आभार मानू ?

-दिलीप बिरुटे

लिओ's picture

18 Jun 2016 - 11:20 pm | लिओ

@शाम भागवत

आपली Indian Regional Navigation Satellite System (IRNSS) अंतर्गत सात उपग्रहांची स्थापना झाली असून आता आपल्याला २४ तास मोठ्या प्रमाणात माहिती मिळावयास सुरवात होणार आहे.

अवांतर:
स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण सर्वांनी ६५ वर्षे आपण धीर धरला आहे. तर आता काही महिन्यांचा धीर धरायला काय हरकत आहे?
:))

यातील Indian Regional Navigation Satellite System (IRNSS) मालिकेतील उपग्रह ६५० वर्ष धीर धरला तरी हवामान अंदाजास उपयोगी पडणार नाहित. IRNSS उपग्रह हे Navigation ( दिशादर्शनास ) उपयोगी पडणार आहेत. याचा अर्थ भारतीय उपखन्डात आपण नेमके कोठे उभे आहोत हे जाणण्यास परदेशी उपग्रह वापरात न आणता स्वदेशी उपग्रहाद्वारे आपण जाणु शकु.

शाम भागवत's picture

19 Jun 2016 - 12:41 pm | शाम भागवत

चांगलीच चूक झाली.
२०१४ ला कधीतरी ओशनसॅट बंद झाला असून त्याच्यापेक्षा चांगला उपग्रह आपण सोडणार आहोत पण तो IRNSS नंतर सोडणार आहोत असे वाचले होते.

@लिओ, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
हाच खरा मीपाचा फायदा.

मला वाटते ScatSat असे काहीतरी या उपग्रहाचे नाव असावे. जाणकार अधिक माहिती देतीलच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2016 - 3:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

याहू वेदर हे मोबाइल साठी चांगलं एप्लीकेशन वाटलं. आभाळ भरून असलेलं दिसणे, पावसाच्या शक्यतेची वेळ, तसं हवामान खात्याच्या विभाग सोडून डेस्कटॉप साठी सेटेलाइट व्ह्यु ने नकाशावरुन पावसाळी ढग कुठे दिसताहेत अशी उत्तम माहिती देणारी संकेतस्थळे माहिती आहेत का ☺

-दिलीप बिरुटे

प्रत्येक देश आपला उपग्रह या माहितीसाठी सोडेल असं होणार नाही दुसय्रांची माहिती घेण्यासाठी करार करतात बहुतेक.हेरगिरीसाठी मात्र आपलाच लागेल.

#अंदाज चुकण्याची बरीच कारणे आहेत ती खात्यालाही माहित असतात.
#मान्सुनचे तंत्र बिघडण्याचे मुख्य कारण :- पृथ्वीचे वेगवेगळे भाग असमतोल तापले की वारे वाहू लागतात आणि समुद्रावरून वारे इकडे जमिनीवर आले की ढगसुद्धा येऊन पाउस पाडतात.परंतू गेली काही वर्ष हा तापण्याचा असमतोलपणा नाहीसा होत चालला आहे.सर्व भाग सारखेच तापतात आणि वारे सुरू होत नाहीत.

आधी १९:४५ ही पाऊस सुरू होण्याची वेळ सांगितली होती. आता इथे पोस्ट करतोय तेवढ्यात त्यांनी २०:०० हे वेळ दिली .... पहा त्यांचासुद्धा केवळ 'अंदाज'च आहे

श्रीगुरुजी's picture

19 Jun 2016 - 2:37 pm | श्रीगुरुजी

हवामान खात्याच्या अंदाजांपेक्षा ज्योतिषांचे अंदाज बरोबर येण्याची शक्यता अनेक पटींनी जास्त आहे.

पण, हवामानाचे अंदाज वर्तविणे याला हवामानशास्त्र म्हणतात व ज्योतिष ही थापेबाजी असते.

कलंत्री's picture

21 Jun 2016 - 2:00 pm | कलंत्री

पाऊस पडण्यासाठी आवश्यक त्या वातावरण निर्मितीची गरज असते असे माझे मत आहे.

भरपूर वनश्री.

मातीची जागा सिमेंट / डांबरीकरणाने होत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांचा वापर.

शेतजमिनीचे अशेतजमीनिमध्ये होणारे रुपांतर.

जमीनीमधील बोअरवेल्स ( कूपनलिका) चा प्रचंड पाण्याचा उपसा.

यावर प्रयत्न झाला तर पाऊस आल्याशिवाय राहणार नाही.

उपग्रहांकडून मिळालेली माहिती, सुपरकॉम्प्युटर्सची मदत, आधूनिक संशोधन यांद्वारे हवामानाचा वेध घेण्याबाबत संशोधन होत रहाणे गरजेचेच आहे त्याबद्दल किंचितही आक्षेप नाही. पण त्याच वेळी निसर्गातील बदल (पक्षी, प्राणी, कीटक, झाडे इत्यादींमधील वर्तणूकीतील बदल) आणि त्यावरुन मिळणारे पावसाचे, हवामानबदलाचे संकेत यांचाही अभ्यास स्वतंत्रपणे चालू रहावा. सरकारने या अभ्यासाकरिता स्वतंत्र विभाग , निधी उभारावा असे मला वाटते.
काही वर्षांपुर्वी मारुती चितमपल्लींचा मेघा छाये हा लेख तसेच २०१४ च्या पावसाबद्दलचे संकेत देणारा हा लेख अत्यंत वाचनीय आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2016 - 2:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद वेगळा आणि विचार करायला लावणारा. व्यवस्था किती गंभीर या विषयाबाबत माहिती नाही.

-दिलीप बिरुटे

पाउस कमी का होतोय ..... खर सागुं ..... बेसुमार वृक्ष तोड व सर्वत्र झालेले पोल्युशन .. कार्,बाइक्स. बेसुमार संख्या वाढ्लेली . पुर्वी प्रदुशन फक्त मोठे कारखाने , स्टीम इंजिने हेच होते. आता पृथ्वी चा प्रतेक कोपरा प्रदुशन ने व्यापलाय. २०-२५ वर्षा आधी होणारा मुसळधार पाउस आता होत नाही.४ महिन्यात फक्११/२दिड महिनाच व तो ही झिम झिम .. . पन्नाशी-साठी तिल्यांना हा फरख जाणवत नक्किच असेल .

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jun 2016 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे

+१००

हे तर नक्कीच आहे.

आणि त्यामुळे अनेक चल घटकांत दर वर्षी जास्त जास्त बदल होत आहेत आणि हवामानाचा अंदाज लावणे अधिकच जिकिरीचे होत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2017 - 8:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हवामान खात्यावर गुन्हे नोंदवा, अंदाज चुकल्याने शेतकरी आक्रमक

पावसाचे चुकीचे अंदाज वर्तवणाऱ्या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी वर्ध्याच्या शेतकऱ्यांनी केली आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवूनही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचा पारा चढला आहे.

हवामान खात्याचे अंदाज पाहून आम्ही सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसानं सलग तीन आठवडे तोंड दाखवलं नाही. परिणामी अख्खं पीक जळून गेलं. त्यामुळे आता आम्हाला दुबार पेरणी करावी लागत असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षात हवामान खात्याचे अंदाज आणि पाऊस यांचा ताळमेळ लागत नाही, त्यामुळे खोटे अंदाज वर्तवून शेतकऱ्याचं नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ( वाट्सप फॉरवर्ड)

-दिलीप बिरुटे

प्रमोद देर्देकर's picture

24 Jun 2017 - 7:58 am | प्रमोद देर्देकर

हाच तो लेख *मारुती चितमपल्ली* यांचा

त्यातून पावसा अभावी वाघिणीने गर्भपात करवून घेणे हे निरीक्षण तर अफाट आहे.

मुद्दाम वाचा ! ह्या माणसाने निसर्ग वाचला आहे !!!!

*पावसाळ्यापूर्वी...*

तब्बल चार दशकांचा काळ मी जंगलात घालवला. त्यामुळे स्वाभाविकपणे निसर्गाच्या इतक्या निकटतम सान्निध्यात वातावरणातील बदलांचे निसर्गातील विविध घटकांवर होणारे परिणाम अत्यंत जवळून अनुभवले. या अवलोकनातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी उमगल्या.

जंगलातील मुक्कामात असंख्य वन्यजीव-पक्ष्यांच्या प्रजातींचे मी बारकाईने निरीक्षण केले. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील वास्तव्यात समुद्री पक्षी तसंच समुद्री जीवांच्या हालचालींचाही अभ्यास केला. त्यातूनही पावसाळ्यापूर्वीचे सृष्टीतील असंख्य आश्चर्यजनक बदल टिपता आले. शिवाय जंगलावरच ज्यांचे जीवन अवलंबून आहे अशा हजारो आदिवासी कुटुंबांना भेटलो, त्यांच्याबरोबर जंगलात राहिलो, त्यांचा विश्वास संपादन केला.

पशुपक्ष्यांप्रमाणेच आदिवासींनाही उपजतच निसर्गचक्रातील बदलांचे ज्ञान असते आणि ते ज्ञान ते सहसा कोणाला देत नाहीत, हे देखील पाहिले. परंतु अशी असंख्य निरीक्षणे मी स्वत:ही अनुभवली. टिपली. माझ्या पुस्तकांमध्ये त्यांचा सविस्तर उल्लेख आढळतो.

पावसाळ्यापूर्वी जंगलातील वातावरणातले अनोखे बदल मला देखील सूक्ष्म निरीक्षणानंतरच जाणवले... आकळले. पशुपक्ष्यांची अस्वस्थता, त्यांच्या हालचालींवरून येणाऱ्या पावसाच्या अंदाजाचे, तसंच दुष्काळाचे मिळणारे संकेत हे अत्यंत गूढ रहस्य आहे.

*या निरीक्षणांना आधुनिक संगणकयुगात अंधश्रद्धा म्हणून हिणवले जाऊ शकेल; परंतु निबीड अरण्यातील तसेच समुद्रकाठानजीकचे माझे अनुभव फार वेगळे आहेत. हवामान खात्यानेही या निरीक्षणांची नोंद घ्यावी एवढे ते महत्त्वाचे आहेत. पाऊस केव्हा येतो आणि केव्हा संपतो, हे आम्हाला सांगता येत नाही, असे हवामानतज्ज्ञ म्हणतात. परंतु अरण्यातल्या पशुपक्ष्यांना त्याचे पूर्वसंकेत खूप आधीच मिळतात, हेही तेवढेच खरे.*

साधारण दीड- दोन महिने आधीच पावसाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी वन्यजीव आणि पक्ष्यांच्या पावसाळी संकेतांना सुरुवात होते. पक्ष्यांना सर्वप्रथम पावसाच्या संकेतांची चाहूल लागते. हे कालबद्ध नैसर्गिक चक्र आहे. पक्ष्यांना संभाव्य हवामानाचे, दुष्काळाचे, वातावरणातील बदलांचे अगदी अचूक संकेत मिळत असतात आणि त्यानुसार त्यांच्या दिनक्रमात बदल होत असतात.

पक्षी प्रजाती ही अत्यंत संवेदनशील आणि बदलत्या हवामानाशी स्वत:ला जुळवून घेणारी निसर्गाची आश्चर्यकारक निर्मिती आहे. अशा हजारो पक्ष्यांची निरीक्षणे, टिपणे माझ्या संग्रही आहेत. वर्षांनुवर्षे त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली तेव्हा कुठे त्यांच्या दिनक्रमातील बदलांचे हे रहस्य उलगडले.

अशी रहस्ये एका दिवसात समजत नाहीत. नोकरीनिमित्ताने वर्षांनुवर्षे जंगलात राहिल्यामुळे मला त्यांचे आश्चर्यकारक विश्व समजून घेण्याची संधी मिळू शकली.

पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. जंगलातील वृक्षांची सळसळ सुरू होते. हवेचा जोर वाढतो. आकाशात ढग येण्याची चाहूल या पक्ष्यांना पूर्वीच मिळालेली असते. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही.

चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.

चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

आज विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी आजही तुम्ही ग्रामीण भागात जा, पावशाने दिलेल्या संकेतावरच शेतकऱ्यांकडून शेतीची नांगरणीची कामे सुरू केली जातात. हा पक्षी ‘पेरणी करा’ असे शेतकऱ्याला सुचवण्यासाठीच येत असतो.

माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

कावळ्यांची निरीक्षणे ही तर यापेक्षाही आश्चर्यकारक आहेत. संस्कृत ग्रंथांमध्ये उल्लेख केलेली स्निग्ध झाडे- आंबा, करंज तसेच काटेरी झाडे यांचा व कावळ्यांचा पूर्वापार संबंध आहे. हवामानातील बदल, पावसाचे संकेत आणि दुष्काळाची नांदी देणारे हे नैसर्गिक चक्र आहे. पण त्याचा अभ्यास या नव्या युगात कुणीही करीत नाही.

कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे.

कावळा आणि कावळीण दोघेही घरटे तयार करण्यासाठी एकत्र झटतात. कावळा घराला लागणाऱ्या काटक्या, कापूस, गवत कावळिणीला आणून देतो, तर कावळीण घराची सुरेख अशी रचना करते. यावेळी त्यांची गडबड मोठी पाहण्यासारखी असते. कारण त्यांना पावसापूर्वी पिल्लांसाठी छानसा निवारा तयार करण्याची घाई झालेली असते.

*कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय.*

सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.

यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.

मी कोकणात असताना समुद्रकिनाऱ्यावर अनेक वर्षे घालवली. समुद्राचे अथांग विश्व आणि त्यात राहणारे लाखो जीव म्हणजे मानवाला न उलगडणारे निसर्गचक्र आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी अगदी बारीकसारीक घटनांवर नजर ठेवली तेव्हा काही पूर्वसंकेतांची चाहूल मला मिळू शकली.

पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. समुद्रातील माशांमध्ये एकदम खळबळ माजते. त्यांच्या हालचाली अत्यंत गतिमान होऊन ते समुद्रात उंच उडय़ा मारू लागतात. हे चित्र नवीन पिढीने समुद्रकिनाऱ्याशेजारी मुक्काम ठोकून अवश्य निरखावे.

समुद्रातील प्राण्यांनी अस्वस्थ हालचाली सुरू केल्यानंतर समुद्रातून प्रचंड असे आवाज येऊ लागतात. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.

आणखी एक गंमत म्हणजे पहिल्या पावसानंतर नदी-नाले, ओढे, तलावांचे पाणी समुद्राला येऊन मिळू लागते तसे मासे त्या पाण्यात उडय़ा मारून प्रवेश करतात आणि प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊ लागतात. डोंगर, पहाडी भागातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यात ते अंडी घालतात आणि पुन्हा सरळ दिशेने समुद्रात परततात. हे नैसर्गिक जीवनचक्र आहे.

याबाबतीत अत्यंत बारकाईने निरीक्षण केले असता पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा... उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

जंगल आणि डोंगरांच्याही अभ्यासातून काही निरीक्षण समोर आली आहेत. तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.

पाऊस केव्हा आणि किती पडणार, हे सांगणारी पशुपक्ष्यांच्या प्रजाती आज धोक्यात आल्या आहेत. समुद्राचे पाणी दूषित होऊ लागले आहे. जंगलांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. वाघांच्या शिकारी केल्या जात आहेत. ही परिस्थिती अत्यंत वाईट आणि भविष्यासाठी धोकादायक आहे. निसर्गचक्राचे घटक असलेले पशुपक्षी आपल्या दिनक्रमात पावसाळ्यापूर्वी कसकसे बदल करतात, हे कुणीही लक्षात घेत नाही याची खूप खंत वाटते.

कीटकांचे जीवनचक्र तर हवामानतज्ज्ञांच्या सर्वतोपरी उपयोगाचे असतानाही या सांकेतिक बदलांकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. खरं तर हा निसर्गविज्ञानाचा एक चकित करणारा भाग आहे.

हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.

दुसरे म्हणजे बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

नवेगावबांध पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांची निरीक्षणे पावसाबद्दल खूप काही सांगणारी आहेत. मोरनाची म्हणून नवेगावला अनेक जागा आहेत. मोरनाची म्हणजे निसर्गाचे एक अवघड कोडे आहे. पावसाळ्यापूर्वी शेकडोंच्या संख्येने मोर अशा जागांवर रिंगणात जमतात आणि एक सुंदर मोर अगदी मधोमध येऊन आपला सुंदर पिसारा फुलवून नाचू लागतो. त्याचे हे नाचणे म्हणजे एक लयबद्ध नृत्यच असते. कधी दोन्ही पायांवर, तर कधी एका पायावर. तर कधी गिरक्या घेत नाचणाऱ्या या देखण्या नरावर लांडोर/ मोरणी भाळतात. त्यांचा समागम होतो. त्या नराशी समागम केल्यावर लांडोर दूर निघून जाते आणि कालांतराने अंडी घालते. *हा पावसाचा पूर्वसंकेत आहे.*

या भागातील आदिवासी मोरनाचींच्या जागांवर मोर जमू लागल्यानंतर चांगला पाऊस पडणार असल्याचे ठोकताळे बांधतात आणि ते अचूक ठरतात. पक्षी-अभ्यासकांनीही या बदलाचा विस्तृत अभ्यास केल्यास याचे रहस्य कदाचित उलगडू शकेल. कारण या मुक्या जिवांना कोणीही पाऊस येईल म्हणून हवामानाचा अंदाज सांगत नाही; तो त्यांना आपोआपच कळत असतो.

पक्ष्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास करताना मी स्वत: मोरांच्या हालचालींवर नजर ठेवून ही निरीक्षणे टिपली आहेत. निसर्गाचे हे चक्र माणसाला कधीही न आकळणारे असते. परंतु त्यामागे पृथ्वीच्या व्युत्पत्तीपासून चालत आलेले निसर्गविज्ञान आहे, हे निश्चित.

वृक्षांमधील बदलांतूनही पावसाळ्यापूर्वीचे काही संकेत स्पष्टपणे मिळतात. यासंबंधीचा अभ्यास मी स्वत: केलेला आहे.

मराठवाडय़ात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत. खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो. कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो. बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.

आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे. अर्थात याकरता आपली नजर तरबेज असली पाहिजे. हवामानतज्ज्ञांची तर अशा बदलांवर बारीक नजर असायला हवी. जंगलाचे नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अशा बदलांचा अवश्य अभ्यास करावा. कारण ही सूक्ष्म निरीक्षणे हवामानाचा अंदाज वर्तवताना अत्यंत मोलाची ठरू शकतात.

*भविष्यवेधी हरिणी आणि वाघ!*

हरितपर्णी वृक्षांची आणि पानगळीची जंगले वातावरणातील बदलांचे पूर्वसंकेत देतात. अशा जंगलांमध्ये राहणाऱ्या वन्यजीवांच्या दिनक्रमातील आश्चर्यकारक बदलांचा अभ्यास केल्यावर पावसाबद्दलचे अचूक आडाखे बांधता येतात.

पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत. आणि हे अत्यंत खरे आहे. हा बदल मी स्वत: अभ्यासलेला आहे. हरीण आणि वाघ यांचा एरवी ३६ चा आकडा असला तरी पावसाळ्याचे दोन्ही प्राण्यांचे आडाखे मात्र एकदम तंतोतंत जुळणारे असतात, हा सृष्टीतील चमत्कार होय. आणि याला निसर्ग-विज्ञानाची जोड आहे.

वाघिणीचे ठोकताळे तर अत्यंत अचूक असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मेळघाटच्या जंगलात असताना आम्ही एका गर्भवती वाघिणीचे अनेक महिने अत्यंत जवळून निरीक्षण केले. तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. तेव्हा वाघांनासुद्धा पावसाच्या अंदाजाचे आणि भविष्यातील वातावरणाचे पूर्वज्ञान असल्याचे आमच्या लक्षात आले.

आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल... याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता.

आम्ही जंगलात तिच्या मागावर राहून हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवला आहे. ते वर्ष मला आता नीटसे आठवत नाही. पण माझ्या उमेदीच्या काळातील जंगलभ्रमणाच्या दिवसांत मी अनुभवलेली ही एक आश्चर्यकारक घटना आहे. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.

~ *मारुती चितमपल्ली*

***

_वनअभ्यासक, साहित्यिक व पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी आयुष्याची तब्बल ४० वर्षे महाराष्ट्रातील निरनिराळ्या जंगलांमध्ये व्यतीत केली. वन खात्यातील नोकरीच्या निमित्ताने त्यांना जंगल आणि निसर्ग अत्यंत जवळून जाणून घेण्याची संधी लाभली. जंगलामधील या वास्तव्यातील सूक्ष्म निरीक्षणांतून वृक्षवल्ली आणि वन्यप्राणी तसेच पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा अभ्यास करून त्यांनी अनुभवसिद्ध ग्रंथसंपदा प्रसवली आहे._

*******

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2022 - 9:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आकाशवाणी पुणे केंद्रावर शेवटी पावसाचे अंदाज कायम ऐकले. मुख्यत: हवामान कोरडे राहील आणि आकाश निरभ्र राहील त्याचबरोबर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कड्कटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, हे कायमच ऐकत आलो.

आज दि. ९ जुन २०२२. भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे. ब-याच ठिकाणी पाऊस पड्ण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेच्या कडकडाट्सह, सासाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. बाकी हवामान खात्याचा अंदाज पीडीएफ़ फ़ाईल दुव्यावर पाहता येईल. धन्यवाद.

पावसाच्या अपडेटबद्दल मोबाईल अ‍ॅप्लीकेशन्स परफ़ेक्ट असतील तर इथे लिंकवले तरी चालेल. सध्या पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाचे मेसेजेस वाट्सॅपवर फिरत असतात. त्यांचे बहुतांश अंदाज परफेक्ट असतात.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

10 Jun 2022 - 12:11 pm | तुषार काळभोर

Windy.com या संस्थळावर लाईव्ह हवा, ढग, तापमान यांची माहिती मिळते. पुढील सात दिवसांचा बऱ्यापैकी अचूक अंदाज दिसतो.
त्याशिवाय गुगल वर २०१० पासून weather सर्च केलं तर स्थानिक हवामान विभागापेक्षा कैक पट अधिक अचूक माहिती मिळते.
Windy आणि Google यांवर विसंबून कामे नियोजित करता येतील, इतकी अचूकता आहे.
बाकी थोडेफार इकडे तिकडे मान्सूनच्या मूळ स्वभावामुळे होतेच. मान्सूनसाठी इतके व्हेरीएबल्स आहेत की १०-२०% इकडे तिकडे सामान्य असावे.

sunil kachure's picture

10 Jun 2022 - 9:59 am | sunil kachure

पाच सहा दिवसापूर्वी ची घटना
भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळ मध्ये दाखल झाला अशी बातमी दिली होती.
Skymat नी त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज साफ चुकीचा आहे असे त्यांचे मत होते.
मान्सून दाखल झाला असे जेव्हा समजले जाते तेव्हा काही अनेक घटकांची स्थिती योग्य ती असावी लागते.
आणि मान्सून दाखल झाल्याची कोणतीच चिन्ह नाहीत.
असे स्काय mat चे मत होते.
अधिकारी पण पाट्या टाकायचे काम करत आहेत असा एकंदरीत अर्थ होता.

सस्नेह's picture

13 Jun 2022 - 6:14 pm | सस्नेह

IMD
सचित्र हवामान अंदाज मिळेल तोपण लाईव्ह.