विस्टन चर्चिल...

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in काथ्याकूट
6 May 2016 - 2:43 pm
गाभा: 

काल आंतरजालावर काहितरी शोधकार्य चालु असताना मला सर विस्टन चर्चिल यांच्या काही ओळी मिळाल्या,

"Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low caliber & men of straw. They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles. A day would come when even air & water... would be taxed in India."

जुन १९४७ साली जेव्हा क्लिमंट अ‍ॅटली ब्रिटनचे पंतप्रधान होते, त्यांनी the Indian Independence Act ब्रिटिश संसदेत ठरावासाठी मांडला होता. त्यावेळी विस्टन चर्चिल यांनी या ओळी उच्चारल्या होत्या.

आता प्रश्न असा उभा राहतो कि खरच अशा ओळी त्यांच्या आहेत ? आणि जर असतील तर चर्चिल एवढ्या ठामपणे कसे सांगु शकले?

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

6 May 2016 - 3:12 pm | श्रीगुरुजी

आणि जर असतील तर चर्चिल एवढ्या ठामपणे कसे सांगु शकले?

चर्चिल खांग्रेसींना पूर्ण ओळखून होता. म्हणूनच तो एवढ्या ठामपणे सांगू शकला.

अनिरुद्ध प्रभू's picture

6 May 2016 - 3:26 pm | अनिरुद्ध प्रभू

all Indian leaders हे महत्वाचं!

स्वामिनी's picture

6 May 2016 - 3:41 pm | स्वामिनी

चर्चिल एवढ्या ठामपणे अस म्हणू शकला कारण त्याने तमाम भारतियन्चि मानसिकता बरोबर ताडली होती. आणि म्हणूनच ब्रिटिशाना आपल्यावर राज्य करता आल.

मार्मिक गोडसे's picture

6 May 2016 - 3:58 pm | मार्मिक गोडसे

थोडं अवांतर तरीही महत्वाचे.

इकडे डावे पक्ष कामगारांच्या हितासाठी सरकारी उद्योगांच्या निर्गुंतवणुकीला कायम विरोध करत आले आहेत. आणि तिकडे चर्चिलच्या देशात कामगारांच्या हितासाठी टाटा स्टील ह्या तोट्यात गेलेल्या खाजगी कंपनीत तेथील सरकार २५% हिस्सेदारी करण्याचा विचार करत आहे.

नक्की कोण द्रष्टे ते लवकरच कळेल.

तुमच्या वाक्यावरून असे वाटते, की दोघांचाही दृष्टिकोन एकच आहे: उद्यागांमध्ये सरकारची गुंतवणूक असावी, मग ते उद्योग सरकारी मालकीचे असोत किंवा खाजगी मालकीचे.
चू.भू.दे.घे.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

6 May 2016 - 3:59 pm | ईश्वरसर्वसाक्षी

They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles.
A day would come when even air & water... would be taxed in India.

तंतोतंत लागु होतय.

नाईकांचा बहिर्जी's picture

6 May 2016 - 4:09 pm | नाईकांचा बहिर्जी

आपण भारतीय अजुन गुलाम आहोत काय?

उत्तर नाही असे असल्यास मग चर्चिलला आज महत्व द्यायचे प्रयोजन काय उरते ?

ज्याला अतिशय व्यवहार चतुर समजले जाणाऱ्या ब्रिटिश जनतेने युद्धकालीन गरज संपल्यावर खड्यासारखे बाजूला काढून टाकले. त्याचे राजकीय अस्तित्वच त्या नंतर संपले. त्याला किती किंमत द्यावी? दूरदृष्टी असलेला हा इतकाच मोठा तुर्रमखान होता तर ह्याला स्वतःचे डळमळीत होणारे राजकीय आसन दिसले नव्हते?

तरीही, हे साहेब जे काही बोलले आहेत त्यातले 5% जरी खरे मानले तर उरलेले 95% कोण पाहणार?? भारत नक्कीच उठून चालू लागला आहे देवादयेने एक दिवस धावत सुटेल अशी आशा एक मानसिक दृष्ट्या मुक्त अन स्वतंत्र भारतीय म्हणून मी तरी करतो

कानडाऊ योगेशु's picture

6 May 2016 - 4:19 pm | कानडाऊ योगेशु

+१
चर्चिल हा भले ब्रिटीशांसाठी भला माणुस असेल पण तो एक वंशद्वेशी व भारतद्वेषी माणुस होता. स्वातंत्र्यपूर्वकाळात आलेल्या बंगालचय दुष्काळामध्ये झालेल्या हानीला ह्या इसमाची भारद्वेषी भूमिकाच कारणीभूत होती.

damn's picture

7 May 2016 - 1:18 am | damn

हिटलरच्या वंश द्वेषाबद्दल आणि त्याने घडवलेल्या हत्याकांडाबद्दल, ब्रिटश लोकांना त्याला दुषणे देण्याचा हक्कच नाही.
त्यांनी सुद्धा भारतात, तेवढ्याच क्रूरतेने, त्याच्यापेक्षाही अधिक वारंवारतेने (frequently), हेच केले होते.
बंगालमध्ये वर्षानुवर्षे, पुन्हा पुन्हा लाखो लोक यांच्या नफा लालसेमुळे, भुकेला बळी पडत राहिले, मरत राहिले.

श्रीगुरुजी's picture

6 May 2016 - 8:23 pm | श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे / काकासाहेब केंजळे / ग्रेटथिंकर ?

नाईकांचा बहिर्जी's picture

14 May 2016 - 11:32 am | नाईकांचा बहिर्जी

एकच अक्षराने सुरु होणाऱ्या आयडी मुळे आपण मला कोणीतरी तिसरेच समजला होते श्रीगुरुजी, गोंधळ टाळायला म्हणून मी प्रशांतजी ह्यांना विनंती करुन आयडी बदलून घेतला आहे माझा असे जाहिरपणे सांगतो :)

बाकी माझा परिचय मी खरड़फळ्यावर लिहिला होता ते एकदम आठवले.चालायचेच. :)

"ब्रिटिश जनतेने युद्धकालीन गरज संपल्यावर खड्यासारखे बाजूला काढून टाकले. त्याचे राजकीय अस्तित्वच त्या नंतर संपले."
>>तपशीलात थोडीशी चूक आहे. युद्ध संपल्यावर सहा वर्षे चर्चिल विरोधी पक्ष नेता होता. प्रसिद्ध "पोलादी पडदा" हे द्रष्टे वक्तव्य ह्याच काळातले. त्यानंतर तो पुन्हा निवडून आला आणि जवळपास चार वर्षे (१९५१ - १९५५) पुन्हा पंतप्रधान होता (त्यापैकी काही काळ संरक्षण मंत्री सुद्धा). त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याने राजीनामा दिला आणि निवृत्त झाला.

"प्रोपागंडा"(प्रचारकी अशा अर्थी) होता तो. त्याचं महत्व तितकंच.

नाईकांचा बहिर्जी's picture

6 May 2016 - 4:26 pm | नाईकांचा बहिर्जी

सहमत

पुंबा's picture

6 May 2016 - 4:52 pm | पुंबा

अगदी खरं

नाईकांचा बहिर्जी's picture

6 May 2016 - 4:26 pm | नाईकांचा बहिर्जी

भारत आज इंग्लंड मधे निवेश करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे! काय वज राहिली त्या चर्चिलची अन त्याच्या शब्दांची! :D

इंग्रजांनी सत्ता सोडताना अनेक पाचरि अशा मारून ठेवल्या होत्या की भारताला अनेक समस्या उदभवतील.
हिन्दू मुस्लिम वाद ही त्यातील सर्वात मोठी! पण विलिनिकरणात सरदार पटेलानि दाखवलेल्या ठामपणामुळे इंग्रजांचे मनसूबे उधळून गेले.
आता इंग्रजांनी अशी तयारी केल्यामुळे चर्चिलने भविष्य वर्तवुन काय मोठे तारे तोडले?
आता आम्हीपण बोलू की काही वर्षानी ब्रिटनमधे खान,कुरैशी,मोहम्मद अशी नावे असलेल्या व्यक्तिना अतिरेकी समजून वागणूक दिली जाईल. त्यात भविष्य ते कसले?

मराठी_माणूस's picture

6 May 2016 - 4:52 pm | मराठी_माणूस

त्याला एव्हढे महत्व द्यायची काही गरज नाही. तो महात्मा गांधीं बद्दल सुध्दा काय वाट्टेल ते बरळला होता. साध्या सभ्यतेचे निकष सुध्दा त्याने पाळले नव्हते

दुसऱ्या महायुद्ध काळात, ब्रिटिशां विरुद्ध नवीन आंदोलन पुकारले, तर ते ब्रिटिशांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखे होईल, असे म्हणणारं महात्मांचं कनवाळू हृदय; बंगालमध्ये ब्रिटिशांनी आपल्या नफेखोर, रक्तपिपासू धोरणांनी, लाखोंच्या संख्येने असलेल्या, गरीब रयतेला, अन्नान्न दशा करून मारले, तेंव्हा ब्रिटिशांना युद्धकाळात पाठिंबा देणे म्हणजे आपल्या लाखो गरीब लोकांच्या पाठीत खंजीर खुपसणे; असा विचार करताना बरे द्रवलं नाही??
कदाचित, अशा दुटप्पी नेत्याला कदाचित चर्चिलचे बरोब्बर ओळखले होतं.

हुप्प्या's picture

7 May 2016 - 6:51 am | हुप्प्या

गांधींनी ज्यू लोकांना हिटलरच्या वंशसंहाराला कसे तोंड द्यावे ह्याबद्दल जे "मार्गदर्शन" केले होते त्याला बरळणेच म्हणावे लागेल.

नाझी तुम्हाला मारायला येत आहेत. त्याला उत्तर म्हणून तुम्ही शांतपणे मरणाला स्वाधीन व्हा. बायका मुलांनाही त्याच्या हिंसेला बळी पडू द्या. कुठलाही हिंसक प्रतिकार करू नका. आपण स्थितप्रज्ञासारखे आपल्या कत्तलीला सामोरे जा.

एक पूर्ण वंश भयानक अत्याचार, कत्तलींना सामोरे जात असताना त्यांना असले जखमेवर मीठ चोळणारे सल्ले देणे कितपत सभ्यपणाचे होते?

गांधीना काही काळ अहिंसेची नशा चढल्यासारखी झाली होती. चर्चिलसारख्या रोखठोक माणसाला ते पटण्यासारखे नव्हते आणि त्याने त्यांच्याबद्दल अनेक अनुदार उद्गार
काढले होते. पण गांधींची भूमिका अनेक वेळेस तितकीशी तर्कसंगत नव्हती.

उगा काहितरीच's picture

7 May 2016 - 7:04 am | उगा काहितरीच

नाझी तुम्हाला मारायला येत आहेत. त्याला उत्तर म्हणून तुम्ही शांतपणे मरणाला स्वाधीन व्हा. बायका मुलांनाही त्याच्या हिंसेला बळी पडू द्या. कुठलाही हिंसक प्रतिकार करू नका. आपण स्थितप्रज्ञासारखे आपल्या कत्तलीला सामोरे जा

बापरे! प्लिज विदा देऊ शकता का ? गांधीभक्तांचे याबद्दलचे मत जाणून घेणे रोचक ठरेल.

अत्रन्गि पाउस's picture

7 May 2016 - 11:06 am | अत्रन्गि पाउस

जनतेला सांगितले होते हे निश्चित वाचलेले आठवते .

फारएन्ड's picture

8 May 2016 - 3:11 am | फारएन्ड

हे बरेचसे बरोबर आहे - म्हणजे गांधीजी साधारण असे (अगदी या शब्दांत नसेल) म्हंटले होते. लॉर्ड लिनलिथगो ला भेटून सुद्धा त्याला सांगितले होते.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 'इंडिया विन्स फ्रीडम' मधे पान ३६ वर याचा उल्लेख आहे.
https://hidf1.files.wordpress.com/2016/04/india-wins-freedom.pdf

याचा आणखी एक संदर्भ नरेन्द्र सिंग सरीला यांच्या पुस्तकातही आहे. ते माउण्टबॅटन चे सहकारी होते. या पुस्तकावर मी मिपावर लिहीले होते.
http://www.misalpav.com/node/19586

फारएन्ड's picture

6 May 2016 - 9:23 pm | फारएन्ड

अजूनही बरेच काही बोलला होता तो. तोच काय १९४७ मधे जगातील अनेक थोरांनी भाकिते केली होती की भारतात एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती नाही. एक देश म्हणून जास्त काळ तो टिकाव धरू शकणार नाही. ती चुकीची होती हे भारताने सिद्ध केले. अमेरिका सोडली तर इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकशाही व्यवस्था इतकी वर्षे राबवलेले दुसरे उदाहरण क्वचितच असेल. जगाच्या दृष्टीने खुद्द इंग्लंड पेक्षा जास्त 'रिलेव्हंट' भारत होउ शकेल काही वर्षात. कदाचित आत्ताच असेल.

तसेही चर्चिल बरेच काही लिहीत्/बोलत होता. त्यातला एखादाच भाग घेउन त्याला द्रष्टा वगैरे ठरवण्यात अर्थ नाही.

दुसरे म्हणजे त्याच्या काळात अमेरिका व रशिया च्या मदतीने दोस्त राष्ट्रांनी महायुद्ध जिंकले. पण त्याच्याच काळात दीड-दोनशे वर्षे सूर्य न मावळणारे ब्रिटिश साम्राज्य संपले, हे ही खरे आहे.

दुसरे म्हणजे त्याच्या काळात अमेरिका व रशिया च्या मदतीने दोस्त राष्ट्रांनी महायुद्ध जिंकले. पण त्याच्याच काळात दीड-दोनशे वर्षे सूर्य न मावळणारे ब्रिटिश साम्राज्य संपले, हे ही खरे आहे
.......................
हेही खरेच की!
नाण्याला दोन बाजू असतात, असे म्हणतात, ते हेच असावे.

गॅरी ट्रुमन's picture

7 May 2016 - 9:03 pm | गॅरी ट्रुमन

दुसरे म्हणजे त्याच्या काळात अमेरिका व रशिया च्या मदतीने दोस्त राष्ट्रांनी महायुद्ध जिंकले. पण त्याच्याच काळात दीड-दोनशे वर्षे सूर्य न मावळणारे ब्रिटिश साम्राज्य संपले, हे ही खरे आहे

बाकी चर्चिल कसाही असूदे पण त्याच्या काळात ब्रिटिश साम्राज्य संपले यासाठी त्याला दोष देणे हे तथ्याला धरून नाही. हिटलरची पावले नक्की कोणत्या दिशेने पडणार आहेत हे इंग्लंडमध्ये कोणी ओळखले असेल तर ते चर्चिलने. १९३९ पूर्वी कित्येक वर्षे ते ब्रिटिश पंतप्रधानांना ओरडून सांगत होते की हिटलर हा साप आहे त्याला ठेचा. पण अगदी १९३८ पर्यंत चेंबरलेन तीनतीनवेळा बर्खटेसगार्डनमध्ये जाऊन म्युनिक कराराविषयी बोलणी करत होते आणि करार झाल्यावर आपण शांततेचा फार मोठा पैगाम म्युनिकहून आणला आहे अशी स्वत:ची आणि ब्रिटिश जनतेची फसवणूक करत होते हे खालील व्हिडिओमध्ये कळेलच.

चर्चिल पंतप्रधान झाले त्यावेळी हिटलर खूप मोठा झाला होता. चर्चिलने मागणी केल्याप्रमाणे १९३३ नंतर लगेचच हिटलरला ठेचले असते आणि चेंबरलेनचे लांगूलचालनाचे धोरण ठेवले नसते तर कदाचित ब्रिटिश साम्राज्य त्यावेळी संपलेही नसते. अर्थातच इतिहासात जर-तरला काहीच अर्थ नसतो पण ब्रिटिश साम्राज्य चर्चिल पंतप्रधान असताना लयाला गेले म्हणून त्याचा दोष चर्चिलला देणे हे तथ्याला धरून नाही इतकेच.

(चर्चिलच्या वक्तृत्वाचा, नेतृत्वगुणांचा आणि अढळ आत्मविश्वासाचा प्रचंड मोठा फॅन आणि त्याच्या भारतद्वेषाचा आणि बंगाल दुष्काळाच्या वेळच्या भूमिकेचा प्रखर विरोधक) ट्रुमन

जेपी's picture

7 May 2016 - 9:12 pm | जेपी

सहमत आहे..

फारएन्ड's picture

8 May 2016 - 2:57 am | फारएन्ड

साम्राज्य लयाला गेल्याचा दोष चर्चिल ला मी देत नाहीये पण "ऑन हिज वॉच" ते लयाला गेले ही वस्तुस्थिती आहे. दुसरे म्हणजे हिटलर बद्दलच्या त्याच्या (तो आधीपासून ओळखत होता हे खरे आहे) मताचा साम्राज्य लयाला जाण्याशी तेवढा संबंध नाही. या युद्धात ब्रिटिशांची हानी झाली वगैरे खरे असले, तरी त्याचा भारतावर सत्ता ठेवण्याशी संबंध नव्हता. त्यात अगदी १९४५ च काय पण १९४७ पर्यंत तो स्वतः भारताला स्वातंत्र्य देण्याचा अगदी विरोधात होता. माउण्टबॅटनवर सुद्धा त्याने याबद्दल खूप प्रेशर आणले होते. पण ते तरीही द्यावे लागले.

याचा दोष चर्चिल कडे जात नाही, पण या जागतिक बदलाचे वारे तो बदलू शकला नाही. आपण जे होउ द्यायच्या विरोधात आहोत याच्या जाहीर वल्गना त्याने केल्या ते त्याला शेवटी स्वीकारावे लागले.

गॅरी ट्रुमन's picture

9 May 2016 - 6:27 pm | गॅरी ट्रुमन

तुमचा नक्की मुद्दा काय आहे हे लक्षात आले नाही.

साम्राज्य लयाला गेल्याचा दोष चर्चिल ला मी देत नाहीये पण "ऑन हिज वॉच" ते लयाला गेले ही वस्तुस्थिती आहे.

"ऑन हिज वॉच" साम्राज्य लयाला गेले ही वस्तुस्थिती आहेच. पण...

या जागतिक बदलाचे वारे तो बदलू शकला नाही. आपण जे होउ द्यायच्या विरोधात आहोत याच्या जाहीर वल्गना त्याने केल्या ते त्याला शेवटी स्वीकारावे लागले.

चर्चिल बदलाचे वारे बदलू शकला नाही याचे कारण म्हणजे तो पंतप्रधान झाला त्यावेळी हिटलर खूपच बलिष्ठ झाला होता. सत्तेत नसताना (१९४० पूर्वी) चर्चिल हे वारे बदलायला नक्की काय करू शकणार होता? एक समांतर उदाहरण द्यायचे झाले तर स्वातंत्र्यानंतर लष्करी सामर्थ्य वाढवा हे तात्याराव सावरकरही कानीकपाळी ओरडून सांगत होते. पण त्यांच्या हातात काहीही करायला सत्ता नव्हती. तात्यारावांकडे सरकारने दुर्लक्ष केले आणि मग पुढे १९६२ मध्ये जे व्हायचे ते झालेच. आता ही परिस्थिती रोखण्यात तात्यारावांना अपयश आले असे म्हणायचे का? त्याचप्रमाणे चर्चिल जे कानीकपाळी ओरडून सांगत होता त्याकडे दुर्लक्ष करून चेंबरलेन हिटलरचे लांगूलचालन करत राहिले आणि त्याचा परिणाम व्हायचा तो झालाच. तसेच १९४० मध्ये चर्चिल पंतप्रधान होईपर्यंत खूप उशीर झाला होता. मग भारतीय स्वातंत्र्याच्या आपण विरोधात आहोत हे जाहिरपणे चर्चिलने म्हटले असले आणि तसेच होताना त्याला बघावे लागले ही सत्य परिस्थिती असली तरी त्याचा दोष चर्चिलचा कसा काय? आणि तुम्ही दोष देत नसाल तर मग या मुद्द्याचा या चर्चेतील संदर्भ लक्षात आला नाही.

फारएन्ड's picture

9 May 2016 - 7:40 pm | फारएन्ड

हिटलर व साम्राज्य हे माझ्या दृष्टीने दोन स्वतंत्र मुद्दे आहेत.

हिटलर - चर्चिल सत्तेवर आला तेव्हा हिटलर व जर्मनी यांचे सामर्थ्य व आक्रमकता हा ब्रिटन च्या दृष्टीने प्रॉब्लेम होता. तो एक नेता म्हणून त्याने सोडवला. त्यासाठी लागेल त्यांची मदत घेतली वगैरे सगळे त्यात आले, पण त्याचे श्रेय त्याला जाते.

साम्राज्य - तो सत्तेवर आला तेव्हा ब्रिटिश साम्राज्य शाबूत होते. भारतीयांची स्वातंत्र्याची मागणी धुडकावून लावत तरीही त्याच भारतातूनच दुसर्‍या महायुद्धातील सर्वात मोठे सैन्य जमा करण्याएवढी प़कड होती. त्यात त्याचा स्वतःचा जाहीर उद्देश स्वातंत्र्य अजिबात द्यायचे नाही हा होता. तरीही ते साम्राज्य इंलंड ने गमावले, बरेचसे त्याच्या सत्तेच्या कारकीर्दीतच. हे त्याचे अपयश आहे. यातील बर्‍याच घडामोडी त्याच्या कारकीर्दीत झाल्या. अ‍ॅटली आला तोपर्यंत स्वातंत्र्य द्यायचे हे नक्की झालेले होते.

दोष व अपयशाची जबाबदारी यात मी येथे फरक करतोय.

तुमच्या उदाहरणात सावरकरांवर त्याची जबाबदारी नाही, कारण ते सत्तेवर नव्हते.

अस्वस्थामा's picture

9 May 2016 - 5:23 pm | अस्वस्थामा

(चर्चिलच्या वक्तृत्वाचा, नेतृत्वगुणांचा आणि अढळ आत्मविश्वासाचा प्रचंड मोठा फॅन आणि त्याच्या भारतद्वेषाचा आणि बंगाल दुष्काळाच्या वेळच्या भूमिकेचा प्रखर विरोधक)

हे अंशतः मान्य. :)

तरीही चेंबरलेन , चर्चिल आणि हिटलर संदर्भातल्या गोष्टी अजिबात मान्य नाहीत.

चर्चिलने मागणी केल्याप्रमाणे १९३३ नंतर लगेचच हिटलरला ठेचले असते आणि चेंबरलेनचे लांगूलचालनाचे धोरण ठेवले नसते तर कदाचित ब्रिटिश साम्राज्य त्यावेळी संपलेही नसते.

अहो, हिटलर आज जसा दिसतोय तुम्हाला तसा तेव्हा त्याला कोण पाहात असेल का ? नक्कीच नाही. त्याच्या आधी नंतर त्याचबरोबर अगदी बरोबरीने अनेक नेते जगात उभे रहात होते. त्यातला कोण चांगला आणि कोण वाईट हे आधीच सांगू शकत नाही आणि ठेचायच्या भाषा नक्कीच "I told you so" म्हणून आता ग्राह्य धरल्या जाऊ शकत नाहीत कारण ठेचण्याची जी कारणे दिली गेली असतील ती वेगळीच असू शकतीलही.

१९३९ पूर्वी कित्येक वर्षे ते ब्रिटिश पंतप्रधानांना ओरडून सांगत होते की हिटलर हा साप आहे त्याला ठेचा.

असं समजा, (उदाहरणार्थ फक्त समजाच) 'मोदी उद्या हिटलर सारखे कोणी आहेत' असे समोर आले तर जे आज (आणि गेली १५ वर्षे) त्यांच्या नावाने कंठशोष करत आहेत ते सगळे चर्चिलप्रमाणे दृष्टे होते आणि "वेळीच ठेचले असते तर" अशा भाषा वापरणारे अगदी चर्चिलसारखे ग्रेट म्हणवले जाऊ शकतील काय ? नक्कीच नाही. आजचा त्यांचा विरोध हा त्यांच्या आजच्या, आत्ताच्या राजकारणाचा भाग आहे आणि तेवढेच सत्य आहे.
चेंबरलेनसारखे शांतीसाठी प्रयत्न करणारे लोक त्या काळात तरी या जगासाठी "unfit to rule" असेच होते असं विषादानं म्हणावं लागेल.

होप, मला काय म्हणायचंय ते स्पष्ट झालेलं असावं.

(बादवे, जेवढे पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाबद्दल वाचावे तितका या सगळ्या कालखंडातल्या लोकांचा विस्मय वाटतो आणि तितकाच चर्चिल, स्टॅलिन, हिटलर, चार्ल्स द गॉल अशा नेत्यांबद्दलचा आदर(द्वेष)देखील कमी कमी होऊ लागतो. सगळी सारीपाटावरची प्यादी.. )

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 5:46 pm | तर्राट जोकर

पटलं.

गॅरी ट्रुमन's picture

9 May 2016 - 6:00 pm | गॅरी ट्रुमन

१. चर्चिल यांनी १९३४ मध्ये केलेल्या भाषणाचा ऑडीओ इथे देत आहे:

या भाषणात १९३४ मध्येच चर्चिल यांनी जर्मनीची पावले कुठच्या दिशेने पडणार आहेत याचे भाकित केले होते आणि आपले नौदल जर्मन विमानांना पुरे पडणार नाही असे म्हणत एका अर्थी आपल्याच देशाच्या सरकारवर संरक्षणसिध्दतेत अपूर्णता असल्याबद्दल टिकाही केली होती. या भाषणात चर्चिल यांनी जर्मनीचे नाव घेतलेले नाही तर "दॅट नेशन" असा उल्लेख केला आहे. पण त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे हे समजतेच.

२. १९३५ मध्ये चर्चिल यांनी स्ट्रॅन्ड नावाच्या मासिकात हिटलरवर "द ट्रूथ अबाऊट हिटलर" हा एक लेख लिहिला होता. Hitler

त्यावेळी हिटलर १९३९-४५ मधला हिटलर नक्की कसा असेल याचे भाकित करता येणे अर्थातच शक्य नव्हते. चर्चिलने त्या लेखात तसे म्हटलेही आहे-- हिटलर भविष्यात जर्मनीला वैभवाच्या शिखरावर नेणारा नेता होईल की जगाला संकटात टाकेल हे आता सांगता येत नाही. तरीही चर्चिलने पुढे जे काही म्हटले आहे त्यावरून हिटलरची पावले नक्की कुठे चालली होती याची कल्पना इतर सर्वांपेक्षा चर्चिलनाच जास्त होती असेच म्हणायला लागेल. चर्चिलने लिहिले आहे :

"His methods are now apparent. Germany was to recover her place in Europe by rearming, and the Germans were to be largely freed from the curse of unemployment by being set to work on making the armaments and other military prepara­tions. Thus from the year 1933 onwards the whole available energies of Germany were directed to preparations for war, not only in the factories, in the barracks, and on the aviation grounds, but in the schools, the colleges, and almost in the nursery, by every resource of State power and modem propaganda ; and the preparation and education of the whole people for war-readiness was undertaken.

It was not till 1935 that the full terror of this revelation broke upon the careless and imprudent world, and Hitler, casting aside concealment, sprang forward armed to the teeth, with his munition factories roaring night and day, his aeroplane squadrons forming in ceaseless suc­cession, his submarine crews exer­cising in the Baltic, and his armed hosts tramping the barrack squares from one end of the broad Reich to the other. hat is where we are to-day, and the achievement by which the tables, have been completely turned upon the complacent, feckless, and purblind victors de­serves to be reckoned a prodigy in the history of the world, and a prodigy which is inseparable from the personal exertions and lifethrust of a single man.

It is certainly not strange that everyone should want to know „the truth about Hitler.” What will he do with the tremendous powers already in his grasp and perfecting themselves week by week ? If, as I have said, we look only at the past, which is all we have to judge by, we must indeed feel anxious. Hitherto, Hitler’s Triumphant Career has been borne onwards, not only by a passionate love of Germany, but by currents of hatred so intense as to sear the souls of those who swim upon them."

अजून तुम्हाला नक्की कुठला पुरावा हवा आहे? अजूनही आहेत. वेळ मिळेल त्याप्रमाणे आणि ही चर्चा रंगल्यास पोस्ट करतोच.

अस्वस्थामा's picture

9 May 2016 - 8:59 pm | अस्वस्थामा

अहो, तुम्हाला पुरावे नाही मागितले. चर्चिल असे म्हणाला होता हे खरंय पण त्या काळाच्या परिप्रेक्ष्यातून त्याकडे पहायला हवंय हे मी सांगतोय. उदा. म्हणून मोदींबद्दल गेल्या १० वर्षातले लेख आणि मोदींच्या हाती सत्ता आली तर काय होईल याचे विद्वद्जनांनी केलेले विवेचन याबद्दल बोललो होतो.
तात्पर्य, ज्या त्या काळात अशा "fear mongering" सारख्या लेखांचे, मतांचे अस्तित्व असतेच (हा लेख तसाच्च आहे असे लगेच म्हणू शकत नाही पण भावार्थ घ्यावा). त्यातले कोणते खरे ठरतील आणि कोणते खोटे हे आधीच ठरवून कोणाला "चेचता" येत नाही (हे आजही तितकेच लागू होते हे लक्षात घ्यावं).

चर्चिलला त्याच्या गुण आणि दोषांसकट पाहिले पाहिजे. मग तेव्हा त्याला त्याच्या काळात त्याचे समकालिन कसे पहात होते ते लक्षात घेतले पाहिजे (not so great, to be honest). युद्धकाळातदेखील त्याच्या अनेक चुका अमेरिकेच्या साथीमुळे झाकल्या गेल्या अथवा कमी चर्चिल्या गेल्या आहेत हे ही तितकेच खरे आहे (तो वेगळा मुद्दा).

शेवटी दुसरे महायुद्ध होते म्हणून चर्चिल " द चर्चिल" म्हणून जगाला परिचित झाला. दुसरे महायुद्ध नसते झाले तर चर्चिल नसता, अगर असता तरी आपल्यासाठी बहुतेक विलनिश असा ब्रिटिश म्हणूनच माहिती असता.

पुरावे न मागताही देऊन नक्की सांगायचेय ते कळाले नाही (त्यात मुद्दे शोधा असे म्हणणे असेल तरीही ते माझ्या म्हणण्याशी संबंधित नाहीत). त्यापेक्षा आक्षेपांच्या अनुशंगाने आपल्याला काय म्हणायचंय त्याबद्दल बोलला असता तर जास्त संयुक्तिक झालं असतं. असो.

गॅरी ट्रुमन's picture

10 May 2016 - 10:42 am | गॅरी ट्रुमन

त्याच काळच्या परिस्थितीला अनुसरून मी हे लिहिले आहे. त्या काळात हिटलर जागतिक शांततेस धोका निर्माण करू शकतो हे लक्षात आलेल्या थोड्याथोडक्या लोकांमध्ये चर्चिल होते.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अनेक लोक डूम्स डे चे भाकित करत असतात. रघुराम राजन यांनी त्यांच्या एका पुस्तकात अशा लोकांविषयी लिहिले आहे की बंद पडलेले घड्याळही दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवते. त्यामुळे घड्याळ बंद पडले आणि नेमक्या त्याचवेळी ते बरोबर वेळ दाखवत असेल तर "बघा हे घड्याळ बरोबर वेळ दाखवत आहे" असा 'जितं मया' दृष्टीकोन दर्शवू शकतात. अशा लोकांमध्ये आणि ज्यांना द्रष्टे म्हणता येईल त्यांच्यात फरक काय? एक समांतर उदाहरण द्यायचे झाले तर रघुराम राजन यांनी २००६ मध्येच भाकित वर्तवले होते की लवकरच आर्थिक संकट येणार आहे. त्यावेळी त्यांना फारसे कोणी गांभीर्याने घेतले नव्हते.पण राजन अशी उठल्यासुटल्या भिती घालत नव्हते आणि ते जे बोलत होते त्यामागे काहीतरी लॉजिक होते. आणि महत्वाचे म्हणजे असे बोलणारे लोक फार नव्हते. समजा ५०-१०० लोकांना असे संकट येणार हे जाणवले असते तर त्याचे भाकित आधी करणार्‍याचे वेगळेपण फार नाही. आणि इतर सगळे जग आपल्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाही उलट टरच उडवत आहे हे जाणवूनही आपल्या मतावर ठाम राहण्याचे धैर्य राजन यांच्याकडे होते.

आता वळू चर्चिलकडे. त्याकाळात हिटलर धोकादायक बनेल हे सांगणारे किती लोक होते? ब्रिटिश पंतप्रधान अगदी म्युनिक करार होईपर्यंत हिटलरला शांतता हवी आहे या भ्रमात होते. म्युनिक करार झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅन्कलीन रूझवेल्ट यांनी ब्रिटिश पंतप्रधान चेंबरलेन यांना "गुड मॅन" अशी तार केली होती. म्हणजे हिटलर धोकादाय्क बनू शकेल हे सर्व जगाला समजलेले नव्हते तर ते समजलेल्या थोड्याथोडक्यांमध्ये चर्चिल होता. सगळ्या जगाने दुर्लक्ष केले तरी आपले मत बरोबर आहे यावरचा चर्चिलचा विश्वास कायम होता. आणि चर्चिल सुध्दा उठल्यासुटल्या सगळ्यांविषयी असे इशारे जारी करत सुटला नव्हता. त्यामुळे इतर डूम्सडेवाल्यांपेक्षा चर्चिल (आणि रघुराम राजन) नक्कीच वेगळे आहेत.

शेवटी दुसरे महायुद्ध होते म्हणून चर्चिल " द चर्चिल" म्हणून जगाला परिचित झाला. दुसरे महायुद्ध नसते झाले तर चर्चिल नसता, अगर असता तरी आपल्यासाठी बहुतेक विलनिश असा ब्रिटिश म्हणूनच माहिती असता.

हे इतिहासातल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीरेखेविषयी लिहिता येईल. चाणक्याला चंद्रगुप्त भेटला नसता तर चंद्रगुप्त एक सामान्य माणूस म्हणून तर चाणक्य एक सामान्य शिक्षक म्हणून राहिला असता इत्यादी इत्यादी.

अर्धवटराव's picture

7 May 2016 - 6:32 am | अर्धवटराव

एक स्कॉटलंडशी एकात्मता साधता आली नाहि त्यांच्या देशाला. भारतासारख्या अवाढव्य आणि वैविध्य असलेल्या देशाबद्दल त्यांची बुद्धी फार काहि आकलन करु शकणार नव्हतीच.

भारतातली लोकशाही लोकांच्या आवडीनुसार एस्टॅब्लीश होत आहे, होत राहिल. २-४ नेते मंडळी काळे गोरे निपजतीलच, पण जनता जनार्दन लोकशाहीला अत्यंत अनुकूल असल्यामुळे चिंता नाहि.

हुप्प्या's picture

7 May 2016 - 6:42 am | हुप्प्या

१. ज्याला भारत मानले जायचे त्याचे आधी दोन आणि नंतर तीन तुकडे झालेच. काश्मीरचा तुकडा न पडून पडल्यासारखाच आहे त्यामुळे धर्मावर आधारित फाळणी ही भारताची वस्तुस्थिती आहे. ती झाली हे कुणी नाकारू नये.

२. भारतातील लोकशाहीचा डंका पिटण्याआधी हे विचारून पहा की ही लोकशाही कितपत प्रगल्भ आहे? जरा विद्यमान नेत्यांकडे पाहिले तर असे दिसते की कुण्या बड्या नेत्याचा मुलगा, मुलगी, बायको, प्रेयसी, भाचा, पुतण्या, नात किंवा नातू नसणारे नेते हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत, अपवादापुरते. ५० वर्षापूर्वीचे चित्र आणि आजचे चित्र पाहिले तर हा फरक अधिकच जाणवतो. भारत (आणि पाकिस्तान) सोडल्यास इतकी वंशपरंपरागत चालणारी लोकशाही कुठल्या प्रगत देशात आहे? ही गोष्ट अभिमान बाळगण्याजोगी आहे असे मला वाटत नाही.

३. ब्रिटिश साम्राज्य कधी ना कधी संपणार आहे हे त्यांच्या नेत्यांनाही माहित होते. दुसरे महायुद्ध ही लढाई हे इंग्लंडकरता जिवावरचे संकट होते. जेव्हा जीव धोक्यात असतो तेव्हा साम्राज्याचा विचार न करता जीव बचावण्याचा विचार करायचा असतो. चर्चिलने ते यशस्वी रित्या केले. दुसर्‍या महायुद्धामुळे तमाम वसाहतवादी सत्तांचे कंबरडे मोडले त्यामुळे वसाहतवाद संपला. पण इंग्लंडमधे लोक आजही इंग्रजी बोलत आहेत जर्मन नाही ह्याचे श्रेय चर्चिलला दिलेच पाहिजे. शिवाय कॉमनवेल्थ, इंग्रजीचा भाषेचा, संस्कृतीचा प्रभाव पाहिला, इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व असणार्‍या देशी साहेबांचा अहंगंड पाहिला तर खरोखरच इंग्रजी साम्राज्याचा सूर्य मावळला आहे का? अशी शंका येते!

चर्चिलने बंगालच्या दुष्काळाबद्दल जो दृष्टीकोन बाळगला तो पहाता एक भारतीय म्हणून मला त्याच्याबद्दल तिरस्कार आहे पण काही बाबतीत त्याचे बोलणे खरे ठरले आहे.

भंकस बाबा's picture

7 May 2016 - 7:57 am | भंकस बाबा

काश्मीरचा तुकडा पडायला आला असला तरी पाकव्याप्त काश्मीरमधील जनता जी बहुसंख्य मुस्लिम आहे ,ते भारतात परतण्याची भाषा करत आहेत. काश्मीरमधे 1947पासून तिढा आहे पण अगदी 2016 पर्यन्त भारताने काश्मीरला सापत्न भाव दिलेला नाही, जो पाकिस्तान बलूचस्तानमधे देत आहे. काश्मिर प्रश्न हां कॉंग्रेसची भारतीय जनतेला सप्रेम भेट आहे. मतांच्या राजकारणासाठी त्यांनी काश्मिरची वाट लावली.
राहिली चर्चीलचि बाब, हॉउस ऑफ़ कॉमन्समधे त्याने दर्पोक्ति केलि होती की भारताला स्वातंत्र द्यायला मी पंतप्रधान झालेलो नाही. भाकित करणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. आजकाल स्टॉकमार्केटमधे देखिल असे भाकित करणारे पैशाला पासरी मिळतात. जे भाकित करतात व् त्याबरोबर स्टॉपलॉस देखिल सांगतात. म्हणजे बरोबर निघाले तर आपली पाठ थोपटुन घेणार व् चूक झाले तर इशारा दिला होता हे सांगणार. राकेश झुनझुनवाला हे अगदी चांगले उदाहरण आहे. चर्चीलचे भाकित याच प्रकारचे आहे.

फारएन्ड's picture

7 May 2016 - 8:41 am | फारएन्ड

१. मी जी वक्तव्ये म्हंटली आहेत ती हे तुकडे (निदान भारत-पाक) झाल्यानंतरच्या भारताबद्दल होती बरीचशी. भारत रिपब्लिक म्हणून आस्तित्वात आला, निवडणुका झाल्या तरी ही मते चालूच होती. त्यानंतर भारताच्या आकाराचा आणि इतकी विविधता असलेला देश बहुतांश तितकाच राहिला - किंबहुना सिक्कीम, गोवा वगैरे धरले तर आकाराने वाढलाच (आता यात गमावलेले पाकव्याप्त काश्मीर व कमावलेले सिक्कीम्/गोवा यांचे क्षेत्रफळ घेउन मी तुलना वगैरे केलेली नाही), यातून मला या थोर दिग्गचांचा अंदाज चुकला असेच वाटते.
२. भारतीय लोकशाहीबद्दल तुम्ही म्हणता ते सगळे आरोप खरे आहेत. पण ते तसे असूनही चांगले भाग इतके आहेत की मला अभिमानास्पद वाटते. रशिया, चीन, मध्यपूर्व, दक्षिण अमेरिका इथल्या लोकांवर असलेली बंधने, तेथील राज्यकर्ते वगैरे पाहिले की भारताला लोकशाहीची चौकट व निदान सुरूवातीला ती बर्‍यापैकी पाळणारे नेते मिळाले हे चांगले झाले. आता गावातल्या पाटलालाच काँग्रेस ने उमेदवारी दिली, पब्लिकने ही त्यालाच मते देऊन आमदार केले, मग त्याच्या पोराला केले हे प्रकार शतकानुशतके रक्तात भिनलेल्या राजेशाही/सरंजामशाही मानसिकतेतून आपण अजून बाहेर पडलो नाही हे दाखवतात. पण यावर अधिकार गाजवणारे स्ट्रक्चर हे लोकशाहीचे आहे - व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, मूलभूत हक्क, कोर्टाचे स्वातंत्र्य, अशा बाबतीत इतर असंख्य देशांच्या आपण कितीतरी पुढे आहोत हे सगळे लोकशाहीमुळे झाले असे मला वाटते.
३. एक ब्रिटिश नेता, एक "लीडर" म्हणून मी चर्चिल चा प्रचंड फॅन आहे. तो अपयशी वगैरे आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. पण त्याच्याही भारताच्या बाबतीत खूप चुका झाल्या आहेत एवढेच मी दाखवून दिले. ब्रिटिश साम्राज्य दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस मोडकळीस आले होते हे खरे आहे, पण चर्चिल सुद्धा त्याची दिशा फिरवू शकला नाही. तसेच इंग्लंड च्या मदतीला अमेरिका धावली नसती तर केवळ स्वतःच्या बळावर नक्की किती तगले असते माहीत नाही, हे ब्रिटिश लोकांनी तेव्हा दाखवलेले धैर्य वगैरेचा आदर करूनही केवळ प्रॅक्टिकल विचाराने म्हणतो.

हुप्प्या's picture

7 May 2016 - 9:47 pm | हुप्प्या

>>१. मी जी वक्तव्ये म्हंटली आहेत ती हे तुकडे (निदान भारत-पाक) झाल्यानंतरच्या भारताबद्दल होती बरीचशी. भारत रिपब्लिक म्हणून आस्तित्वात आला, निवडणुका झाल्या तरी ही मते चालूच होती.
<<
पण ही एक पळवाट आहे. इंग्रजांनी ज्या देशावर राज्य केले तो देश तसाच्या तसा एकसंध ठेवण्यात भारतीय अयशस्वी ठरले हे खरे आहे. दोन तीन तुकडे झाल्यावर पुन्हा आणखी पडले नाहीत हे कितपत आनंददायक मानायचे ते सापेक्ष आहे. पण चर्चिलने जे भाकित केले होते ते आजच्या भारत देशाबद्दल नसून त्यांनी ज्या भूभागाला स्वातंत्र्य दिले त्याबद्दल होते.

>>
ब्रिटिश साम्राज्य दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस मोडकळीस आले होते हे खरे आहे, पण चर्चिल सुद्धा त्याची दिशा फिरवू शकला नाही. तसेच इंग्लंड च्या मदतीला अमेरिका धावली नसती तर केवळ स्वतःच्या बळावर नक्की किती तगले असते माहीत नाही, हे ब्रिटिश लोकांनी तेव्हा दाखवलेले धैर्य वगैरेचा आदर करूनही केवळ प्रॅक्टिकल विचाराने म्हणतो.
<<

संकटसमयी योग्य त्या शक्तीशाली देशाची मदत घेणे हा राजकारणी धूर्ततेचा भाग आहे. परंतू अनेक वर्षे अमेरिका युरोपातील युद्धात उतरायला तयारच नव्हती. अमेरिकेची मनधरणी करण्यात चर्चिलचा मोठा सहभाग होता. साम, दाम, भेद आणि दंड जे काही उपाय लागतील ते वापरण्यात चर्चिलने कच खाल्ली नाही. इंग्रजांनी जे साम्राज्य उभे केले होते ते संख्याबळावर केले नव्हते. धूर्तपणा, परिस्थिती पाहून धोरणे ठरवण्याचे चातुर्य ह्या जोरावर त्यांनी ते केले होते. त्यामुळे ते लयाला गेले ह्यात आश्चर्य नव्हते ते जाणारच होते. इंग्रजी नेत्यांचे लेखन वाचले तर त्यांनीही असे भविष्य लिहून ठेवलेले आढळेल.

फारएन्ड's picture

8 May 2016 - 3:04 am | फारएन्ड

चर्चिल चे व इतर नेत्यांचे मत हे जेव्हा व्यक्त झाले तेव्हा भारताची फाळणी करणार हे जाहीर झालेले होते. मग जेव्हा घटना आली, सरकार स्थापन झाले तेव्हा विशेषतः लोक 'शकले होतील' हे म्हणत. कारण त्यांच्यासमोर तेव्हा इतर लोकशाही देश होते ते बरेचसे एकसंध, एक धर्म किंवा भाषा असलेले होते. भारताचे उदाहरण नवीन होते.

बाकी
संकटसमयी योग्य त्या शक्तीशाली देशाची मदत घेणे हा राजकारणी धूर्ततेचा भाग आहे. परंतू अनेक वर्षे अमेरिका युरोपातील युद्धात उतरायला तयारच नव्हती. अमेरिकेची मनधरणी करण्यात चर्चिलचा मोठा सहभाग होता. साम, दाम, भेद आणि दंड जे काही उपाय लागतील ते वापरण्यात चर्चिलने कच खाल्ली नाही. >>> याच्याशी सहमत आहे.

अत्रन्गि पाउस's picture

7 May 2016 - 11:10 am | अत्रन्गि पाउस

थोडेसे आणखीन ठासून ...

वैभव जाधव's picture

7 May 2016 - 12:33 am | वैभव जाधव

आपल्याला जे लागू होत आहे तेवढं विचारात घ्यायला हरकत नाही. साडेसत्याण्णव टक्के बरोबर वाटतंय म्हणणं (साडेतीन ला एक कमी म्हणून अडीच टक्के वेगळा विचार असू शकेल)

अनिरुद्ध प्रभू's picture

7 May 2016 - 11:35 am | अनिरुद्ध प्रभू

या वकत्व्याला अजुन एक किनार आहे.....जर महयुद्धानंतर जर ब्रिटन आर्थिक द्रुश्ट्या खिळखिळित झाल नसत तर भारताल स्वातंत्र्य मिळाल असत का? कदचित नाही.

बॅटमॅन's picture

7 May 2016 - 11:50 am | बॅटमॅन

कोण चर्चिल? १९४२-४३ ला बंगालमध्ये २०-३० लाख लोकांना भुकेने तडफडवून मारणारा तोच का तो? मेल्यावरही पुन्हा जिवंत करून ठार मारावे ही त्याची लायकी. त्याच्यावर चर्चा कसली करताय?

नाखु's picture

7 May 2016 - 12:25 pm | नाखु

र्चीलच्या र्चेला चोपणारा लाख चॅटमण....

धन्य्वाद आणि स्वागत कार नाखु

तर्राट जोकर's picture

7 May 2016 - 1:54 pm | तर्राट जोकर

तंतोतंत भावना.

अनिरुद्ध प्रभू's picture

7 May 2016 - 2:44 pm | अनिरुद्ध प्रभू

गांधी सुद्धा काही कमी होते का? पण तरिही त्यांच्याविषयी आपण बोलतोच ना! तसच आहे.....चर्चिल कसा होता त्यापेक्षा त्याच्या वरच्या निरिक्षणाची हि चर्चा आहे एवढचं.

भंकस बाबा's picture

7 May 2016 - 3:39 pm | भंकस बाबा

चर्चिलला शिव्या घालण्याची अहमहिका चालु आहे, मी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत. आपल्या दुर्दैवाने आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला जातो.
रच्याकने तुमच्याकडे काही चर्चीलच्या क्रूर कारनाम्याचे दुवे असतील तर टाका , कमीत कमी मिपाकर तरी चर्चीलचि असलियत जाणतील.

नवी दिल्ली बांधणारा ल्युटीन भारतीयांना माकड आणी आदिमानव म्हणायचा!.

(डार्वीनप्रेमी)

अनिरुद्ध प्रभू's picture

9 May 2016 - 3:43 pm | अनिरुद्ध प्रभू

प्रत्येकाचं मत त्या त्या जागी बरोबर आहे. परंतु तरिही चर्चिल किति क्रुर नालायक होता हे सगळ बाजुला ठेवुन त्याचं हे मत सध्या आपल्या स्वातंत्र्यानंतर लागु पडतय का नाही हे पहाणं गरजेच नाही का?

माफी असावी पण ज्या प्रकारे आपण त्याच्या इतर गोष्टींवरुन या मताचा विरोध करतो किंवा त्यावर दुर्लक्ष करतो त्याच पद्धतीनं गांधींच्या कामगिरींकडे पाहिलं तर राष्ट्रपिताच काय पण अजुन कुठलिच पदवी देउ शकनार नाही....

भंकस बाबा's picture

9 May 2016 - 5:34 pm | भंकस बाबा

गांधीजी बद्दल हेच म्हणायचे आहे, पण इथे काही मिपाकराना गांधीवर टिका केलि की जबरदस्त पोटशूल उठतो, मग त्यावर उतारा म्हणुन संघ, सावरकर , मोदी यांच्या सात पिढ्याचा उद्धार केला जातो.

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 5:47 pm | तर्राट जोकर

हा धागा शेवटी गांधीद्वेष ह्या हेतुवर आणायचा विचार आहे का?

भंकस बाबा's picture

9 May 2016 - 9:16 pm | भंकस बाबा

सैन्यभरतीला गांधीनी विरोध केला असता तर चर्चिल अर्धा तिथेच खल्लास झाला असता.

फारएन्ड's picture

9 May 2016 - 9:19 pm | फारएन्ड

गांधींनीच काय, सर्व कॉंग्रेसने केला होता.

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 9:25 pm | तर्राट जोकर

गांधीद्वेष करायचा तर वेगळा धागा काढा ना? शिवाय इतिहासात जर तर ला महत्त्व नसते हेही लक्षात असू देत.

चांगल्या चर्चेला नको ते वळण द्यायचे आणि मग धुराळा झाला की आहेच कानफाट्या....

भंकस बाबा's picture

11 May 2016 - 12:49 pm | भंकस बाबा

उद्या तुम्ही बोलाल, शिवाजी महाराजांची पराक्रमाचि गाथा सांगताना अफझलखान वधाची माहिती सांगू नका, त्याने अल्पसंख्यक दुखावतात.
चर्चिलचे चरित्र घडण्यात ज्यांचा हातभार लागला त्यांचा उल्लेख होणारच!
बाकी अफझलखानाबरोबर कृष्णाजी भास्करचा उल्लेख केला तर अनेक सर्वधर्मसम्भाववाल्यांची तळी शांत होते असे ऐकून आहे

भंकस बाबा's picture

11 May 2016 - 12:49 pm | भंकस बाबा

उद्या तुम्ही बोलाल, शिवाजी महाराजांची पराक्रमाचि गाथा सांगताना अफझलखान वधाची माहिती सांगू नका, त्याने अल्पसंख्यक दुखावतात.
चर्चिलचे चरित्र घडण्यात ज्यांचा हातभार लागला त्यांचा उल्लेख होणारच!
बाकी अफझलखानाबरोबर कृष्णाजी भास्करचा उल्लेख केला तर अनेक सर्वधर्मसम्भाववाल्यांची तळी शांत होते असे ऐकून आहे

तर्राट जोकर's picture

11 May 2016 - 1:19 pm | तर्राट जोकर

आम्ही काही बोलत नाही. माझ्यावर अवांतर करुन धाग्याची वाट लावतो असे म्हणणारे तुमच्या ह्या प्रतिसादांना काय म्हणतील ह्यावर विचार करत आहे. लगे रहो. ;)

असंबंद्ध बडबडीला व्हॅल्यू नसते. हा शेवटचा प्रतिसाद. धन्यवाद!

विवेकपटाईत's picture

9 May 2016 - 9:08 pm | विवेकपटाईत

चर्चिलचे म्हणणे पूर्णपणे खोटे ठरले आहे. ७० वर्षानंतर हि आपल्या इथे लोकतंत्र अधिक परिपक्व झाले आहे. मिळून राज्य करणे हि आपण शिकलो आहे. शिवाय आपण १२५ कोटीहून जास्त लोकांचे पोट भरतो आहे.

मार्मिक गोडसे's picture

9 May 2016 - 11:36 pm | मार्मिक गोडसे

मिळून राज्य करणे हि आपण शिकलो आहे. शिवाय आपण १२५ कोटीहून जास्त लोकांचे पोट भरतो आहे.

हे महत्वाचे आहे.

अर्धवटराव's picture

10 May 2016 - 12:39 am | अर्धवटराव

भारताला केवळ एक रिसोर्स प्रोव्हायडर म्हणुन बघणार्‍या चर्चीलला भारतातलं राजकीय पोटेन्शीअल कळलं नाहि हेच खरं.

हुप्प्या's picture

10 May 2016 - 10:08 am | हुप्प्या

लोकतंंत्र परिपक्व कसे? नेहरू मेल्यावर इंदिरा गांधीला वारसदार म्हणून लगेचच नेमले गेले नाही. इंदिरा बाईंना विरोध करणारे लोक अनेक होते. उलट इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर राजकारणातील र ही कळत नसणार्‍या राजीव गांधीला नेता बनवले आणि पंतप्रधानही. राजीवजींचे निधन झाल्यावर लगेच राजकारणापासून अलिप्त असणार्‍या सोनियादेवींना साकडे घातले गेले. राहुलजींना पायघड्या घातलेल्या आहेतच शिवाय प्रियांकाच्या मागेही तगादा आहे. हे सगळे लोकतंत्र परिपक्व होण्याचे लक्षण म्हणायचे का?
नेहरु गांधी घराणे एकमेव वगैरे काही नाही. कश्मीरमधे अब्दुल्ला खानदान आहे, मुफ्ती महंमद सैदचे खानदान आहे, उत्तर प्रदेशात मुलायम, अखिलेश आणि डिंपल यादव आहे, लालू राबडी आणि अन्य यादवी लोक आहेत, शिंद्यांचे घराणे आहे (मध्य प्रदेशात, राजस्थानात आणि महाराष्ट्रातही!), ठाकरे घराणे आहे, मुंडे, महाजन, पवार, भुजबळ आहेत, राणे, नाईक, देशमुख वगैरे घराणी आहेतच.
आर आर पाटील गेले तेव्हा त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पत्नीची बिनविरोध निवड!

दक्षिणेतही हेच. एम जी आर, जानकी, जयललिता, करुणानिधी आणि त्यांची पिलावळ आहे. चंद्राबाबू नायडू, एन टी आर, ही केवळ काही उदाहरणे. पूर्ण यादी करायची म्हटली तर अनेक पाने भरतील.

मला वाटते लोकशाही म्हणून परिपक्व होण्याऐवजी राजेशाही लोकशाहीच्या झिरझिरीत पडद्याआड वावरण्यात परिपक्व होऊ लागली आहे.

बंगालच्या दुष्काळाच्या काळापासून आपण खूपच सुधारलेलो आहेत हे नक्की. पण ह्या राजघराण्यांच्या अंदाधुंदीमुळे जितकी होऊ शकली असती त्यापेक्षा प्रगती खूपच मंद आहे. पाण्याची परिस्थिती बिकट होत आहे आणि त्यामुळे अन्नधान्याचीही.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 12:14 pm | तर्राट जोकर

आपल्याकडे 'राजघराणा लोकशाही' आहे आणि ती राहणारच. पण ह्याचे खापर जनतेवर फोडले पाहिजे, कोणत्याही विशिष्ट राजकिय पक्षावर नव्हे.

हुप्प्या's picture

10 May 2016 - 1:01 pm | हुप्प्या

चर्चिलचे मत हे भारतीय लोकांबद्दलच होते कुठल्या विशिष्ट राजकीय पक्षाबद्दल नव्हे.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 1:05 pm | तर्राट जोकर

हो. ते खरे आहेच. पण घराणेशाही म्हटलं की फक्त गांधी घराण्यावर टिका होतांना दिसते म्हणून आपलं..

अनिरुद्ध प्रभू's picture

10 May 2016 - 10:17 am | अनिरुद्ध प्रभू

चर्चिलचे म्हणणे पूर्णपणे खोटे ठरले आहे

मग सद्ध्याच्या भारतातल्या राजकारणाचि नक्की दिशा काय?

७० वर्षानंतर हि आपल्या इथे लोकतंत्र अधिक परिपक्व झाले आहे.

जोक ओफ डे

हेमंत लाटकर's picture

10 Jun 2017 - 7:31 am | हेमंत लाटकर

विस्टन चर्चिल चे वाक्य, "इतिहासाचा अभ्यास जितका खोल कराल, तितका भविष्यकाळ लांबवर पाहू शकाल"