फ़ासले आणि अंतरे

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
30 Mar 2016 - 1:19 pm

या पोस्ट चा ब्लॉग दुवा हा

ग म्हटलं की गाणं, ग म्हटलं की ग़ज़ल आणि ग म्हटलं की ग़ुलाम अली ही साधी समीकरणं आहेत. माझी ग़ज़ल या संगीतप्रकाराशी, काव्यप्रकाराशी ओळख झाली ती ग़ुलाम अलींच्या चुपके चुपके आणि मेहदी हसन च्या रंजिश ही सही पासून. ग़ुलाम अलींचा सूर अन सूर, शब्द अन शब्द अगदी जवळचा वाटला. मेहदी हसनही नेहमीच आवडत राहिले पण एका अंतरावरूनच.

अंतर; फ़ासला. हे म्हटलं की तत्क्षणी आठवते ती ही ग़ज़ल,

फ़ासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
सामने बैठा था मेरे, और वो मेरा न था

ग़ुलाम अलींच्या आवडणा-या अनेक ग़ज़लांपैकी ही एक. अतिशय सुंदर प्रकारे संगीतबद्ध केलेले अदीम हाशमी यांचे शब्द यामुळे ही ग़ज़ल फार अप्रतिम झालेली आहे. या ग़ज़लचे एकाहून एक सरस असे बरेच शेर जालावर मिळतात, पण सामान्यपणे गायले जाणारे शेर हे आहेत;

फ़ासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा भी न था
सामने बैठा था मेरे और वो मेरा न था

वो के ख़ुश-बू की तरह फैला था चार सू
मैं उसे महसूस कर सकता था छू सकता न था
(चार सू = चहुकडे)

रात भर पिछली ही आहट कान में आती रही
झाँक कर देखा गली में कोई भी आया न था

याद कर के और भी तकलीफ़ होती थी 'अदीम'
भूल जाने के सिवा अब कोई भी चारा न था

हीच ग़ज़ल गुणगुणताना मराठीत काही ओळी स्फुरल्या. अनुवाद नाही, भाषांतर नाही तसं काही करण्याची पात्रताही नाही पण याच सुरावर, याच चालीवर आणि याच आशयाकडे जाणारी मराठीतली ग़ज़ल जी सुचली, ती अशी.

वाटले नव्हते कधी की अंतरे असतीलही
की जरी दिसले समोरी, ते तिथे नसतीलही

गंध येतो आजही ती उब तेथे जाणवे
कोण जाणे रंग सारे, कालचे दिसतीलही

पावलांचे नाद कानी, येत तेंव्हा राहिले
भास ते होते तरीही, वाटले नसतीलही

आपले राहून परके, वागलो आम्ही खुळे
कल्पना नव्हती की गोष्टी, त्या ख-या ठरतीलही

याच वेड्या भावनेने हासलो खोटाच मी
एकदा मागे वळूनि ते पुन्हा बघतीलही

आजही आहेत जपली अक्षरे पत्रातली
आसवे नुरतील तेंव्हा शब्द ते कळतीलही

आठवूनि काय होणे, व्हायचे झालेच ते
विसरुनीही काय माझे घाव ते भरतीलही

शब्द माझे ना अपूर्व, सावरू शकलेत रे
सांगणे अवघड की आता नेमके सुचतीलही

- अपूर्व ओक २९/०३/२०१६

ऊर्दू ग़ज़लविश्व अमर्याद आहे. अथांग आहे. त्या विश्वात रममाण होण्यासारखी अनुभूती दुसरी नाही. मला तर एखादा शेर आणि एखादा मनाचा श्लोक यात फार अंतर वाटतच नाही. एक मनाचे श्लोक असतात तर एक मनामनाचे श्लोक असतात. उद्देश एकच, परिणाम एकच; स्वतःचा शोध घेणे. असो, प्ले-लिस्ट चालूच आहे... अविरत.

--------------------------------
--------------------------------
फ़ासले.... चे आणखीन काही शेरः

अक्स तो मौजूद था पर अक्स तनहाई का था
आईना तो था मगर उसमें तेरा चेहरा न था
(अक्स = प्रतिबिंब)

आज उसने दर्द भी अपने अलहदा कर दिए
आज मैं रोया तो मेरे साथ वो रोया न था
(अलहदा = वेगळे/जुदा)

मैं तेरी सूरत लिए सारे ज़माने में फिरा
सारी दुनिया में मगर कोई तेरे जैसा न था

आज मिलने की ख़ुशी में सिर्फ़ मैं जागा नहीं
तेरी आँखों से भी लगता है कि तू सोया न था

ये भी सब वीरानियाँ उस के जुदा होने से थीं
आँख धुँधलाई हुई थी शहर धुँधलाया न था

सैंकड़ों तूफ़ान लफ़्ज़ों में दबे थे ज़ेर-ए-लब
एक पत्थर था ख़ामोशी का के जो हटता न था
(ज़ेर-ए-लब = ओठांवर/ओठांमधे)

मस्लहत ने अजनबी हम को बनाया था 'अदीम'
वरना कब इक दूसरे को हम ने पहचाना न था
(मस्लहत = समजुतदारपणा, हित, भलाई)
याची पहिली ओळ 'खु़द चढा रखे है तनपर अजनबीयत के गिलाफ़' अशीही वाचायला मिळते
(गिलाफ़ = आवरण)

मराठी गझलगझल

प्रतिक्रिया

विवेक ठाकूर's picture

30 Mar 2016 - 3:17 pm | विवेक ठाकूर

दुरावे असे असतील, कधी वाटले नाही,
बैसलेली ती समीप, आणि माझी नाही |

गंध तिच्या देहाचा, असा सभोवताली,
भिनला रोमरोमात, तरीही स्पर्श नाही |

रात्रभर चाहूल जागवते तिच्या येण्याची,
पाहता सुनसान सारे, इथे कुणीही येत नाही |

आठवांचे पूर हे सहतांना क्लेष होती
विसरण्यावाचून तुजला, दुसरा मला पर्याय नाही |

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2016 - 3:27 pm | पिलीयन रायडर

अजिबातच जमली नाही..

अगदी पाट्या टाकुन शब्द शब्द अनुवादित केलाय असं वाटतय. लय हरवलेली आहे.

वेल्लाभटांची मस्तच झालीये!

विवेक ठाकूर's picture

30 Mar 2016 - 3:19 pm | विवेक ठाकूर

आठवांचे पूर हे साहतांना क्लेष होती,
विसरण्यावाचून तुजला, दुसरा मला पर्याय नाही |

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2016 - 3:25 pm | पिलीयन रायडर

मला तुमची मराठीतली गझल फारच आवडली. मी मुळ रचनेशी तुलना अजिबात केलेली नाही. कारण भाव तुम्ही पर्फेक्ट पकडला आहे.

मस्तच!

स्रुजा's picture

31 Mar 2016 - 12:31 am | स्रुजा

अगदी अगदी !! वेल्लाभट.. हॅट्स ऑफ !

दमामि's picture

30 Mar 2016 - 6:15 pm | दमामि

वा!!!!

एस's picture

30 Mar 2016 - 6:53 pm | एस

गझ़ल आवडली.

मिसाले अब्रो हवा दिल-बा-हम रहे लेकिन
मुहब्बतों में जरा फासला जरुरी है ..

भटकते रहेनेका भी सिलसिला जरुरी है..

वाह वेल्लाभट..मस्त गजलची आठवण काढलीत..

पैसा's picture

30 Mar 2016 - 7:43 pm | पैसा

सुरेख भावानुवाद!

क्या बात है !मराठी गझल जमलीय.

क्या बात है !मराठी गझल जमलीय.

आजही आहेत जपली अक्षरे पत्रातली
आसवे नुरतील तेंव्हा शब्द ते कळतीलही

क्या बात!

तर्राट जोकर's picture

31 Mar 2016 - 1:49 am | तर्राट जोकर

दंडवत मालक. व्वा!!!

जो भाव चिमटीत पकडलाय, अर्थ पकडलाय मिठी मारुन.
त्या दिलाची गजल या दिलात आली भाषेचे पडदे सारुन.

शब्दबम्बाळ's picture

31 Mar 2016 - 9:09 am | शब्दबम्बाळ

मराठी भावानुवाद ही छानच!

फ़ासला तो है मगर, कोई फ़ासला नहीं
मुझ से तुम जुदा सही, दिल से तो जुदा नहीं...
-शमीम करहानी

कमाल! भावानुवाद अप्रतिम जमलाय!

वेल्लाभट's picture

31 Mar 2016 - 4:08 pm | वेल्लाभट

रातराणी, तजो, शबं, एच्टूओ, पैसा, गवि, एस, दमामि, स्रुजा, पिरा, विठा
मनापासून धन्यवाद :) !

सूड's picture

31 Mar 2016 - 5:12 pm | सूड

कसे हे दुरावे अकल्पित सारे
सवे बैसले, आज माझे नसे

उरे गंध त्याचा भरोनि सभोति
परी शक्य त्या स्पर्शणे ही नसे

पुन्हा येई चाहूल ती ओळखीची
तरी पाहता दारी कोणी नसे

उगा आठवांनी उरे शल्य मागे
विसरण्याविना अर्थ काही नसे

वेल्लाभट's picture

31 Mar 2016 - 5:32 pm | वेल्लाभट

सुसा....ट जमलंय सूड !
लव्हली!

बॅटमॅन's picture

31 Mar 2016 - 11:54 pm | बॅटमॅन

सुमंदारमालाचि साता यकारी
लगा एक त्याच्याहि अंती वसे
कसे बैसवीले अहो साचियाते
मनी भाव अल्लाद कैसे असे!

सूड's picture

1 Apr 2016 - 12:37 am | सूड

बरोबर!! =))

विवेक ठाकूर's picture

31 Mar 2016 - 11:15 pm | विवेक ठाकूर

सुरेख !