जंजिऱ्या

अभिषेक पांचाळ's picture
अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी...
26 Mar 2016 - 8:24 am

जंगली तो सिद्दी , तुझा अधिपति होतो
मालक होऊन तुझा , सागरी स्वार होतो
माजलेला सिद्दी , जेव्हा किनार्यावर येतो
त्रास देऊन जनतेला , सारं लुटुन नेतो

याच त्रासातून सूटका व्हावी शिवाजी राजा इर्षा धरतो

तेव्हाच सिद्दीला साथ देऊन जंजिऱ्या , अजिंक्यतेचा गर्व तू करतो

राजा आमचा चालून येतो , सिद्दी तुझा आसरा घेतो
कुशीत तुझ्या शिरून जातो , आक्रमनाने बेजार होतो
माघार घेता घेता , मध्येच कुणी पुढे येतो ताब्यात घेऊन तुला , मालिक तुझा होतो

हतबल झालेला हां सिद्दी मग बादशहाकडे आर्जव करतो

बादशहाचा मांडलिक होऊन जंजिऱ्या , अजिंक्यतेचा गर्व तू करतो

शह देण्यासाठी , राजा पदमदुर्ग उभारी
राजपुरीच्या उरावर , दुसरी राजपुरी
देखता असा दरारा , तोफा तू डागतो
हार दिसता पुढे , तू भेकडपणे वागतो

म्हणून , राजांच्या ख्यातीपुढे , नेहमीच तू हरतो

तरी मान वर करून जंजिऱ्या ,
अजिंक्यतेचा गर्व तू करतो

- अभिषेक पांचाळ

इतिहास

प्रतिक्रिया

हकु's picture

27 Mar 2016 - 9:06 am | हकु

छान