देव म्हणजे प्राचीन परग्रहवासी होते का?

अमृता_जोशी's picture
अमृता_जोशी in काथ्याकूट
21 Mar 2016 - 11:54 pm
गाभा: 

सर्व मिपाकरांना नमस्कार.मी मिसळपावची गेल्या एक वर्षापासून नियमित वाचक आहे. आपणाला मी नवीन असेल, पण मी मात्र बऱ्याच जणांना ओळखते, काही दिवसांपूर्वीच खाते उघडले. आज धाडस करून धागा पाडते आहे.

सूरवंट यांच्या या धाग्यामध्ये त्यांनी पिरामिड आअनि क्रोप सर्कल संबंधी प्रश्न विचारले होते, उत्तरे मिळाली नाहीत. इंटरनेटवर यासाठी खूप उत्तरे सापडतात, पण ती कळायला अवघड आहेत. सरळ, कळायला सोप्या अशा भाषेत सांगता आले तर बघा.

१. पिरामिड प्राचीन एज्य्प्शिअन लोकांनी बांधलेच कसे? म्हणजे दहा-बारा हजार किलो वजनाचे वीस लाख दगड ५०० किलोमेतेर्वरून आणून भौमितिक दृष्ट्या शंभर टक्के बरोबर अशी ५०० फुट उंच इमारत त्यांनी बांधलीच कशी? पिरामिड बांधण्यात त्या लोकांची मदत देवांनी केली होती अशा अर्थाच्या कथा तिथल्या स्थानिक लोकात खुप आहेत म्हणे, हे देव म्हणजे त्या काळात प्रथ्वीवर आलेले परग्रहवासी असावेत काय?
https://en.wikipedia.org/wiki/Ancient_astronaut_hypothesis

२. पिरामिड म्हणजे फक्त एक थडगे आहे, त्याकाळच्या शेतीवर जगणाऱ्या लोकांना एवढे अफाट आणि अवाढव्य थडगे बांधायची गरज का भासली असावी? पिरामिड चा वापर रासायनिक पद्धतीने वीज तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. असे काही शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत सिद्ध केले आहे, यात काही तथ्य आहे का?
http://www.amazon.com/Giza-Power-Plant-Technologies-Ancient/dp/1879181509
http://gizapower.com

३. क्रोप सर्कलचे रहस्य काय आहे?

४. रामायण, महाभारत खरेच घडले असण्याची शक्यता किती आहे?

५. दि लाइन्स ऑफ नाझ्का कशासाठी बांधल्या गेल्या असाव्यात? फक्त आकाशातूनच काही कॆलोमेतेर्स वर गेल्यानंतर पाहिली जाऊ शकेल अशी एखादी लाखो चौरस फुटाची आकृती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी का काढली असेल?
image
https://en.wikipedia.org/wiki/Nazca_lines

६. माणूस हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच जास्त बुद्धिमान आहे, असे का? माकडाच्या (किंवा तस्तम प्राण्याच्या) डीएनए मध्ये या प्राचीन परग्रह वासियांनी काही जनुकीय बदल करून माणूस हा प्राणी निर्माण केला अश्या अर्थाचेही भरपूर काही वाचण्यात आले आहे. संपूर्ण सात अब्ज लोक वेगवेगळ्या धर्मातून आपल्याला ज्या देवाने बनवल्याची गोष्ट सांगतात, ते देव हेच का? असे काही झाले असल्याची काही शक्यता आहे?

आणखीनही खूप प्रश्न आहेत, तूर्तास एवढेच! धन्यवाद!

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

22 Mar 2016 - 12:02 am | सतिश गावडे

इतक्यात डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींचे पॄथ्वीवर माणूस उपराच हे पुस्तक वाचलेत काय?

तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची जाणकार उत्तरे देतीलच.

विकास's picture

22 Mar 2016 - 12:18 am | विकास

तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची जाणकार उत्तरे देतीलच.

सहमत... :)

"देवासी जीवे मारीले" नावाची मला वाटते लक्ष्मण लोंढे आणि अजून एक कोणीतरी (दोघांनी मिळून लिहीलेल्या) कादंबरीत देखील चांगली वर्णने आहेत.

अत्रन्गि पाउस's picture

22 Mar 2016 - 12:22 pm | अत्रन्गि पाउस

हेच म्हणायला आलो hoto

हे पुस्तक नव्हते वाचले. वाचावे लागेल!

सूक्ष्मजीव's picture

22 Mar 2016 - 10:44 am | सूक्ष्मजीव

१२ एक वर्षांपूर्वी हे पुस्तक वाचले होते.
तेंव्हा विकत घ्यायला शोधले तर आउट ऑफ प्रिंट होते.
आत्ता मिळते का?

सतिश गावडे's picture

22 Mar 2016 - 11:03 am | सतिश गावडे

पुण्यात सर्वत्र दिसते. बुकगंगावर ऑनलाइन आहे.

सविता००१'s picture

22 Mar 2016 - 11:47 am | सविता००१

आहे हे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Mar 2016 - 11:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तक ऑर्डर केलं. धन्यवाद. बुक गंगावर पुस्तक चाळत होतो त्यातल्या त्रिशूलाच्या कथेवर ताजमहाल नहीं भाई तेजोमहाल बोलीये वाल्या ओकांनी लिहिल्याची आठवण झाली. :)

-दिलीप बिरुटे

निशांत_खाडे's picture

22 Mar 2016 - 12:07 am | निशांत_खाडे

क्रोप सर्कलचे रहस्य ?
"Bored people with tools"

प्रफुल्ल पा's picture

22 Mar 2016 - 12:21 am | प्रफुल्ल पा

बकवास धागा

नाखु's picture

22 Mar 2016 - 11:18 am | नाखु

बकवास आहे का नाही ते विचारलं नाहीयं जितक विचारलय तितकेच सांगा !
(माहीत नाही तर इतकं का चिडायचं)

खत्रुड्ड ध्धा

अमृता ताई या साठी तुम्ही हिस्टरी टीवी १८ चा ancient aliens या मालिकेचे एपिसोड्स नक्की पाहावे. आपल्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील

अमृता_जोशी's picture

22 Mar 2016 - 1:55 am | अमृता_जोशी

धन्यवाद. सगळे एपिसोड तीन तीन वेळा पाहिले हो, पण उत्तरे मिळण्याएवजी आणखीनच प्रश्न पडतात!

मालोजीराव's picture

22 Mar 2016 - 10:58 am | मालोजीराव

erich von daniken याची सगळी पुस्तके वाचा, हा माणूस जगभर फिरलाय देव आणि एलियन या गोष्टींचा शोध घेण्यासाठी

अद्द्या's picture

22 Mar 2016 - 11:09 am | अद्द्या

+1
chariot of gods नावाचं पुस्तक आहे त्याचं . (मला एकाच माहितीये )

चाणक्य's picture

22 Mar 2016 - 10:50 pm | चाणक्य

यांचं 'देव? छे, अंतराळवीर' हे ही पुस्तक छान आहे. चॅरीयटस् आॅफ गाॅड मधील बरेच संदर्भ आहेत त्यात.

चाणक्य's picture

22 Mar 2016 - 11:01 pm | चाणक्य

यांचं 'देव? छे, परग्रहावरील अंतराळवीर' हे ही पुस्तक छान आहे. चॅरीयटस् आॅफ गाॅड मधील बरेच संदर्भ आहेत त्यात.

कपिलमुनी's picture

22 Mar 2016 - 11:07 am | कपिलमुनी

पाताळेश्वरचा कट्ट्यात या प्रश्नांची उत्तरे मिळतात असे ऐकून आहे. एकदा हजेरी लावून बघा

गरिब चिमणा's picture

22 Mar 2016 - 11:26 am | गरिब चिमणा

चायला हे परग्रहवासी परत पृथ्विवर का आले नाहीत म्हणायचे? साधं झाड. लावलं तरी रोज ते कीती वाढलं याचे आपण निरिक्षण करतो, इथे तर माणुस तयार करुन एलीयन गायब झाले ते झालेच.

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2016 - 11:58 am | मराठी कथालेखक

मिपाच्या नवीन लेखिकेचे स्वागत !!

अमृता तुम्ही राजेशजींची विश्वाचे आर्त लेखमाला वाचलीत का ?
मला वाटतय सध्यातरी ते आणि तितकेच ज्ञान मानवाला आहे.
बाकी अजूनही काही असू शकेल जे आपल्याला माहित नाही. काही कल्पना आपण रचू शकतो (माणूस पृथ्वीवर उपरा वगैरे) पण जोपर्यंत त्या गोष्टी सिध्द होत नाही वा त्यास काहीही आधार (सपोर्टिंग थिअरीज) मिळत नाही तोवर तरी आईनस्टाईन, डार्विन, स्टीफन हॉकिंग (आणि राघा ?) यांच्या थिअरीजच प्रमाण मानता येतील

एस's picture

22 Mar 2016 - 12:11 pm | एस

आमच्या सदाशिवपेठेत बरेच देव राहतात. तिथे चौकशी केली का? ;-)

नाखु's picture

22 Mar 2016 - 12:24 pm | नाखु

आहेत चिंचव्डातही ,कदाचीत माहिती मिळेल

सस्नेह's picture

22 Mar 2016 - 2:05 pm | सस्नेह

सदाशिवपेठेतले ना ? छे ! ते अव्वल पुण्यातलेच ! हजार पिढ्यांचा पुण्य-इतिहास सहज सांगतील !
परग्रहावरील देव म्हणे फार्फार पूर्वी एकदा पुण्यात आले होते, त्यांना यांनीच पिटाळून लावले म्हणतात !
खरे-खोटे देवच जाणे !!

नाखु's picture

22 Mar 2016 - 2:16 pm | नाखु

गेला बाजार काही पुरावा आहे काय? कारण

मुवी बाबा म्हणतात नसेल पुरावा तर मु(ड्)द्दा गाडावा !!!

आधीक माहीतीसाठी मुवींकडील "बाबा निरंतारी-वचने बिनतारी" हे हस्तलिखीत वाचावे(मुवींनी दिल्यास)

बाबा परात्पर भक्त नाखु

कविता१९७८'s picture

22 Mar 2016 - 1:38 pm | कविता१९७८

असा विचार कधी केलाच नव्हता पण काही सत्ये विचार करण्यासारखी आहे खरी

विजुभाऊ's picture

22 Mar 2016 - 2:12 pm | विजुभाऊ

एलीयन्स परत आले नाहीत कारण त्यानी पुण्यात "वाड्याबाहेर पार्किंग केल्यास हवा सोडणेत येईल व सोबत फ्री म्हणून अपमान करण्यात येईल " या पाटीची दहशत घेतलीय.

भाऊंचे भाऊ's picture

22 Mar 2016 - 2:12 pm | भाऊंचे भाऊ

आपले मानसिक वय काय ?

अमृता_जोशी's picture

22 Mar 2016 - 9:03 pm | अमृता_जोशी

अम्म्म... माहित नाही.

टवाळ कार्टा's picture

22 Mar 2016 - 9:57 pm | टवाळ कार्टा

खिक्क

निशांत_खाडे's picture

23 Mar 2016 - 12:09 am | निशांत_खाडे

साष्टांग __/\__
=)) =)) =))

मितभाषी's picture

22 Mar 2016 - 2:57 pm | मितभाषी

त्यावेळेस मानव अत्यंत प्रगत टप्पयात असेल. नंतर प्रलयात सगळे नष्ट होऊन परत बे एके बे सुरू झाले असेल.

सुनील's picture

22 Mar 2016 - 3:04 pm | सुनील

बे एके बे नव्हे, बेकंबे!!!

मराठी पाढ्यात 'दोन'ऐवजी हा गुजराथी 'बे'उठून आला, बे?

मितभाषी's picture

22 Mar 2016 - 3:20 pm | मितभाषी

आम्ही एके दुने त्रिक चोक पंचे सक साते आठे असे म्हणायचो :)

लहानपणी हे विचार खूप भारी वाटायचे। आताशा बरचसं वाचल्यावर कळतं कि बरीच फेकाफेक आहे यात, अजून काहीच वैज्ञानिकदृष्टया सिध्द झालेले नाही।

उगा काहितरीच's picture

22 Mar 2016 - 3:26 pm | उगा काहितरीच

कळेल कळेल निश्चित कळेल हं १० वर्षांनी कळेल का १०० का १००० की १००,०००,०००,००० वर्षांनी कळेल ते पहायचं रच्याकने विषय रोचक आहे. याविषयी "देव की अंतराळातील वैज्ञानिक " असे काहीसे नाव असलेले पुस्तक वाचलं होतं वाचताना मस्त वाटते.

मदनबाण's picture

22 Mar 2016 - 3:32 pm | मदनबाण

रच्याकने विषय रोचक आहे.
हा.हा.हा... उत्पती कशी होते { थेअरी पलिकडे काहीच नाही } पेक्षा उत्पत्ती का होते ? असा विचार करुन पहाणे जास्त रोचक आहे ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Habibi Ya Eini... :- Nourhanne

सस्नेह's picture

22 Mar 2016 - 4:01 pm | सस्नेह

'देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर !!'
ले. बाळ भागवत.

उगा काहितरीच's picture

22 Mar 2016 - 4:55 pm | उगा काहितरीच

सही पकडे ।

रायनची आई's picture

22 Mar 2016 - 4:34 pm | रायनची आई

"क्रोप सर्कलचे रहस्य ?
"Bored people with tools"

मला नाही तस वाटत..काही दिवसापूर्वीच National Geopgraphic वर एक documnetry बघितली होती..प्रचन्ड आकारमानाची आणि अतिशय complex डिसाईन्स असलेली crop circles कोणी केवळ मजा किवा चाळा म्हणून काढेल अस वाटत नाही..ती काढण्यापूर्वी नीट मापे घेणे, पूर्ण Aria चा विचार करणे आवश्यक आहे..ते रातोरात होणार काम वाटत नाही..तुम्ही हवतर google वर जाउन crop circles images पाहु शकता..

राजेश घासकडवी's picture

22 Mar 2016 - 4:39 pm | राजेश घासकडवी

पिरॅमिड्स पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं खरं. एवढं प्रचंड काम त्याकाळच्या तंत्रज्ञानाने कसं केलं असेल असाही प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण त्यापोटी परग्रहवासीय वगैरेंना आणण्याची गरज नाही.

- पहिलं म्हणजे बहुतांश दगड जवळच्या खाणींमधूनच आणले होते. आतला अगदी थोडा भाग ५०० मैलांवरून आणला होता. ते नदीतून आणले जायचे, आणि रस्त्यांवरून बांधकामाच्या ठिकाणी आणले जात.
- दगडांची वाहतुक करण्यासाठी वापरलेले स्लेड्स मिळालेले आहेत. जवळच्या खाणीतून गुळगुळीत केलेल्या रस्त्यांवरून बैलांनी ओढून दहा टनी दगड नेणं अशक्य नाही.
- यासाठी हजारोंच्या संख्येने कामगार कामाला होते. पूर्वी ते सगळे गुलाम होते असं मानलं जायचं, पण आता ते पगारी कामगार होते असं मानलं जातं.
- हे काम वीसेक वर्षं चालू होतं.
- ते बांधण्यासाठी नक्की काय पद्धत वापरली याबद्दल वेगवेगळी मतं असली तरी अनेक इंजिनियर्सनी वेगवेगळ्या पद्धती सुचवलेल्या आहेत.
- विशिष्ट आकाराचे दगड एकमेकांवर विशिष्ट पद्धतीने रचले की त्यातून योग्य तो कोन साधणं फारसं कठीण नाही.

'पण हे सगळं कशासाठी?' असा प्रश्नही साहजिक आहे. तत्कालीन राजांचा विश्वास आणि अमरत्वासाठी धडपड यापोटी हजारो लोक कामाला जुंपवणं शक्य आहे. (कदाचित ती त्याकाळची मनरेगा योजना असेल :) )

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 12:48 am | तर्राट जोकर

(कदाचित ती त्याकाळची मनरेगा योजना असेल :) )

>> आता कळलं मनरेगा ला काही लोक थडगं का म्हणतात ;-) =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Mar 2016 - 11:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडता विषय. ह्यावर भरपुर वाचन केलयं. सवडीने टंकेन.

बोका-ए-आझम's picture

22 Mar 2016 - 11:17 pm | बोका-ए-आझम

अगदी जवळचा तारा Alpha Centauri हा ४.२ प्रकाशवर्षे दूर आहे. म्हणजे प्रकाशाच्या वेगानेही तिथे पोचायला ४ वर्षे लागणार. एखाद्या एलियन जमातीने प्रकाशाच्या किंवा किमान त्याच्या १/४ वेगाने जाणारं अवकाशयान शोधून जरी काढलं असेल तरी त्या यानाचं वस्तुमान केवढं असेल? गणितांनुसार (इथे चूभूद्याघ्या. हे वाचलेलं आहे.) प्रकाशाएवढा वेग हवा असेल तर विश्वाएवढं वस्तुमान लागेल. म्हणजे त्याच्या १/४ वेग हवा असेल तरी प्रचंडच वस्तुमान लागेल. नक्कीच पृथ्वीपेक्षा जास्त. पृथ्वीपेक्षा जास्त वस्तुमान पृथ्वीवर कसं येईल? पृथ्वीच त्याच्याकडे आकर्षिली जाईल. आणि असं झालं तर त्याचा काहीतरी पुरावा पृथ्वीच्या core मध्ये असायला हवा. तसा काहीही पुरावा आढळत नाही.
पिरॅमिड्स आणि इतर गोष्टी चमत्कार म्हणतो आपण पण प्राचीन इजिप्शियन संस्कृती तेवढी प्रगत असावी. अलेक्झांड्रियाचं ग्रंथालय जाळलं गेल्यामुळे कितीतरी ज्ञान नष्ट झालं. कदाचित त्यात त्यांनी त्याकाळी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा उल्लेख असेल.
रच्याकने पृथ्वीवरच माणूस (प्रगत संस्कृती या अर्थाने) आहे असं मला वाटत नाही. विश्वाच्या पसा-यात दुसरीकडे जीवन नक्कीच असणार. जशा विज्ञान कथांमधल्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात आल्या तसं हेही यावं अशी इच्छा आहे.

ते वस्तुमानाचं काय झेपलं नाही

विकास's picture

23 Mar 2016 - 1:45 am | विकास

प्रकाशाएवढा वेग हवा असेल तर विश्वाएवढं वस्तुमान लागेल. म्हणजे त्याच्या १/४ वेग हवा असेल तरी प्रचंडच वस्तुमान लागेल.

आत्ताच्या स्थल-काल संदर्भातील गणिताप्रमाणे बरोबरच आहे. ते समिकरण तसेच राहील का कोण जाणे! विज्ञानकथांमध्ये हायपरस्पेसचा एक उल्लेख असतो. स्टारवॉर्स मधे देखील त्याचा वापर करून एका आकाशगंगेतून दुसरीकडे गेल्याचे प्रकार दाखवले आहेत जे विज्ञानापेक्षा आत्तातरी चमत्कारीक वाटू शकतात.

मात्र याच संदर्भात आता हायपरलूप हा भूतलावरील प्रयोग चालू झाला आहे. :)

बोका-ए-आझम's picture

23 Mar 2016 - 2:00 am | बोका-ए-आझम

(प्रकाशाच्या वेगाने जायचे असल्यास विश्वाएवढे वस्तुमान लागेल) लाॅरेन्स आणि फिट्झजेराल्ड यांनी केलेल्या गणितानुसार काढलेला आहे बहुतेक. बरोबर आहे का?

विकास's picture

23 Mar 2016 - 5:10 pm | विकास

आईन्स्टाईनच्या एका समिकरणात आहे...

Einstein

यात m म्हणजे गतीमधे असतानाचे मास (mass वजन?) आहे. m(0) हे मुळचे, v ही velocity आणि c speed of light आहे. त्यामुळे velocity जितकी लाईटच्या velocity च्या जवळ जाईल तितके गतीमधे असतानाचे mass वाढत जाईल...

ही अगदी पुस्तकी माहिती, मला वाटते ११वीत का १२ वीत असलेली आत्ता जालावर सापडली. बाकी जाणकार सांगतील!

काळा पहाड's picture

26 Mar 2016 - 12:36 am | काळा पहाड

ते बरोबर आहे. पण प्रकाशाच्या वेगाने जायचे बाकीचे मार्ग आहेत. सध्या ते सैद्धांतिक स्वरूपात आहेत.

निशांत_खाडे's picture

23 Mar 2016 - 12:28 am | निशांत_खाडे

जमेल तशी उत्तरे देतोय, थोडा वेळ परग्रहवासी किंवा देव हा विचार मनातून काढून टाका.

१. पिरामिड प्राचीन एज्य्प्शिअन लोकांनी बांधलेच कसे? म्हणजे दहा-बारा हजार किलो वजनाचे वीस लाख दगड ५०० किलोमेतेर्वरून आणून भौमितिक दृष्ट्या शंभर टक्के बरोबर अशी ५०० फुट उंच इमारत त्यांनी बांधलीच कशी?

प्राचीन एजिप्शिअन लोक हे तत्कालीन सर्वात प्रगत लोकांपैकी होते. हजारो मजूर, घोडे, बैल, हत्ती, इत्यादींनी वीस वर्षे काम केल्यास या दगडांची वाहतूक अश्यक नाही, भौमितिक दृष्ट्या बरोबर असण्यामागे त्या लोकांची बुद्धी व अनुभव कारणीभूत होता, म्हणजे गीझा च्या पिरामिड च्या आधीही शेकडो वर्षांपासून हे लोक पिरामिड बनवत आले आहेत, त्याने कदाचित त्यांचे ज्ञान परिपक्व झाले असावे. पण पिरामिड उभे करणे त्या लोकांसाठी अश्यक नव्हते.
पिरामिड म्हणजे फक्त एक थडगे आहे, त्याकाळच्या शेतीवर जगणाऱ्या लोकांना एवढे अफाट आणि अवाढव्य थडगे बांधायची गरज का भासली असावी? पिरामिड चा वापर रासायनिक पद्धतीने वीज तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. असे काही शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत सिद्ध केले आहे, यात काही तथ्य आहे का?
ताजमहालही थडगेच आहे. ती गरज त्या लोकांना नाही तर राजाला भासली होती. आणि बाकी हे रिकामटेकडे शास्त्रज्ञ काहीही सिद्ध करतील.

क्रोप सर्कलचे रहस्य काय आहे?

याचे उत्तर मी अगोदरच दिले आहे. अधिक माहिती इथे मिळेल
http://www.colinandrews.net/David_Chorley-Family-Statement-Colin_Andrews....हटमल

४ पास,

लाइन्स ऑफ नाझ्का कशासाठी बांधल्या गेल्या असाव्यात? फक्त आकाशातूनच काही कॆलोमेतेर्स वर गेल्यानंतर पाहिली जाऊ शकेल अशी एखादी लाखो चौरस फुटाची आकृती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी का काढली असेल?

त्या लोकांचा समाज होता की देव आकाशात राहतो, म्हणून त्याला इम्प्रेस करण्यासाठी हा उपद्व्याप.

माणूस हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच जास्त बुद्धिमान आहे, असे का? माकडाच्या (किंवा तस्तम प्राण्याच्या) डीएनए मध्ये या प्राचीन परग्रह वासियांनी काही जनुकीय बदल करून माणूस हा प्राणी निर्माण केला अश्या अर्थाचेही भरपूर काही वाचण्यात आले आहे.

चित्ता सर्वात जास्त वेगाने का धावतो? जिराफाची मान सर्वात लांब का असते? तसाच हा प्रश्न आहे, माणूस जास्त बुद्धिमान का आहे?

अर्धवटराव's picture

23 Mar 2016 - 1:29 am | अर्धवटराव

+१००

उडन खटोला's picture

23 Mar 2016 - 9:08 am | उडन खटोला

पदार्पणातच शतकी धागा होण्याचे प्रचंड पोटेन्शियल असेलेला धागा काढल्याबद्दल लेखिकेचे हार्दिक हबिणन्दण!

बाकी धागाविषया बाबत बोलायचे तर स्वाती नक्षत्रातील ग्रहांवर राहणार्‍या परग्रहवासी एलियन्स Arcturians याबद्दल नेटवर भरपूर माहिती आहे , खूप पुस्तके ही आहेत ...

हे स्वाती नक्षत्र वासी एलियन्स म्हणजे जवळपास देवच आहेत व मानवाना विविध प्रकारे मदत करतात , याबद्दल स्वानुभवजन्य पुरावे अनेकांनी दिलेले आहेत ....

We The Arcturians हे पुस्तक मिळाल्यास वाचून पहावे... पीडीएफ उपलब्ध नाही ... अमेझोन वर सुमारे १२५०/- रूपायास उपलब्ध आहे

धन्यवाद

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2016 - 12:58 pm | टवाळ कार्टा

"ancient astronauts australia cave" असे गुगलून पहा :)

इरसाल's picture

23 Mar 2016 - 4:22 pm | इरसाल

एपिक किंवा डिस्कव्हरी चॅनेल वर पिरॅमिड बांधकामाबद्द्ल एक कार्यक्रम होता. त्यात त्यांनी पिरॅमिड, कालवे, त्यात वाहते पाणी आणी त्या दगडांना बांधलेल्या मोठाल्या हवेच्या पिशव्या असला प्रकार करुन ते दगड वर वर पोह्चवले होते.

हेमंत लाटकर's picture

23 Mar 2016 - 7:47 pm | हेमंत लाटकर

डायनाॅसाॅर जसे नष्ट झाले तसे अतिप्रगत मानवजात नष्ट झाली असेल. त्यांनी हे सर्व तयार केले असावे.

बाजीगर's picture

23 Mar 2016 - 8:51 pm | बाजीगर

अमृता जोशी मिपा वर स्वागत.
मागच्याच आठवड्यात Quora वर एक उत्तर वाचलं ,amazing वाटलं,engineering च्या तत्वात न बसणारं म्हणून पटलं नाहि.पण interesting आहे

u tube links मी अजून पाहील्या नाहीत

Who died withholding the biggest secret? - Quora

Ans by Kirk Copple
Real Estate Investor, Realtor, and General Contractor

Edward Leedskalnin

He was a Latvian emigrant to the United States who, from 1923 until his death in 1951, built Coral Castle in Florida.  He was about 5' tall and 100lbs.  The story goes he searched all over the area looking for land with the right combination of features.  He found the right land and started cutting blocks of oolite limestone out of the ground.  Some of these blocks weighed up to 30 tons.  He worked alone and would never let anyone see him working.

The only eyewitness sighting of him working include two teenagers who said the blocks seemed to float like helium balloons.  Others saw the equipment he used which included a tripod of logs and rope to lift the blocks.  It was said they didn't think the logs or rope would be anywhere close to strong enough to lift the blocks.  One thing was unusual about his setup.  At the top of the tripod was a small black box which Leedskalnin claimed was a "perpetual motion holder".

In 1936, he decided to move everything to a new property.  The story goes that he hired a truck to transport the blocks.  They would leave the truck and return later.  A short time later the blocks would be loaded, without any heavy equipment that they would normally require.

Leedskalnin claimed to have figured out the secret of how the Great Pyramids were built and he used that technique.  He died in 1951 without ever revealing how he did it.

A final related story.  He built a 9-ton revolving door that was so perfectly balanced that a small child could move it easily.  In 1986 it stopped working because the bearings had rusted.  It took 8 workers and a 50-ton crane to remove and reinstall it.  It needed further work a decade later.  They have never been able to get the door to move as easily as Leedskalnin did.

How did he move all those big blocks by himself and with such precision?  Knowing these secrets could save billions on construction and logistics.


https://m.youtube.com/watch?v=g9Pux2qllT8

​_____________________________________________________

EDIT:  Many of the comments are asking for sources, so here are a few.

1.  Coral Castle.  It’s a real place in Homestead, FL and you can go visit.  Coral Castle Museum

2.  Edward Leedskalnin actually wrote a book with experiments and his attempt at explaining an effect with which he had some experience.  He was very interested in electricity and magnetism.  He ran experiments that included making what could best be described as a homemade Tesla coil capacitor (its configuration is not an A/C generator like some claim).  This may have been able to make a magnetic field between two pieces of metal, in a small area, or across a larger area of hundreds of feet.  This is still not clear.

MAGNETIC CURRENT

3.  Leonard Nimoy discussing Leedskalnin.

4.  One man’s study of Leedskalnin and his conclusions

http://www.coralcastleexplained....

https://m.youtube.com/watch?v=HbC6yn3r9Pk

https://m.youtube.com/watch?v=--Y3tgtZwps

Some further info – Researching this subject is difficult at best.  There are skeptics who have filled the internet with claims which are incomplete, inconsistent, and illogical.  Some of these claims are just some random person who offers no evidence, except for their explanation and skepticism.

There are many claims by people who think Ed simply used hard work and leverage to do all of this.  1100 tons of limestone cut, shaped, moved, and set in place over 30 years is not that much.  While some of the pieces would be difficult to move, it would be possible with the right equipment of that time period.  But he didn’t actually do it over 30 years.  Best evidence is that 900 tons of it was done in just a few years after moving to the Homestead, Florida location.  Considering the time to cut and shape the stones he probably had a few hours to move and erect each one.

Orval Irwin’s claim in his 1996 book that he was a friend of Ed’s and helped him move all of his tools to the new location.  This was when Orval was in his 80s, 45 years after the death of Leedskalnin.  I can’t find any evidence, other than Orval’s claim that he was any particular friend of Ed’s or that he even knew him.  But if his claim of being hired to help Ed move all of his tools is true, then there is a problem.  After Orval helped Ed move all of his tools, he had to hire Bob Biggers, with a bigger truck, to move the blocks.  Bob would leave his trailer and return after Ed loaded the blocks.  Bob never saw how he did this.  The closest he got was one time when he forgot something, returned after only 30 minutes and most of the blocks for that trip were loaded.  Bob didn’t see any equipment that would be needed to load the blocks.  That would make sense, since according to Orval all the tools had already been moved.

The flywheel contraption in his workshop some claim was just a hand-cranked A/C generator.  This may be even more interesting than the castle.  He claimed to have made 10 of them, but the one at Coral Castle is the only one known of, isn’t complete, and there are no drawings of the complete design.  First, if you look at the probable complete design of this machine, it is nothing like an A/C generator and could not be used for that purpose.  The skeptics claim that he used it for lighting two light bulbs outside so he could work at night.  Which doesn’t make any sense, since a hand-cranked generator stops making power when a person stops cranking.  There supposedly is an old production A/C motor there which could have been used with a gas motor and belt to power the lights and other electrical equipment, which was common at that time.  What Ed built is something else.  Add in the metal pipe next to it which goes deep into the ground, the same type of pipes sunk deep into the ground around the property, the high water table in that area, the high mineral content of that water, and the metal soled shoes he had.  Sounds to me like he was experimenting with magnetic fields.

He wrote some books on the subject of magnetism and electricity.  He was experimenting.  He had a visit from the Air Force because he was disturbing their communications.  I don’t believe the Air Force would actually believe that all the wire he had strung around was for a radio antenna.  Radios are receivers, not transmitters and couldn’t disrupt communications.  It would seem that Coral Castle was not an end to itself.  It was part of the experiments he was running.

He was a very intelligent man, even though he was not classically educated.  He was an avid reader.  He claimed he used the same visualization techniques as Einstein used to develop his greatest works.  He may have applied for a patent at one time, but the patent office won’t even consider something that resembles a perpetual motion machine.  Looking at some of the features of the Coral Castle, he was into astronomical alignments and ancient geometries.  He had a theory of the structure of the atom which is closer to what most scientists now believe is the structure of the atom than what Neils Bohr came up with.  The star in the middle of the fountain (he wasn’t Jewish) is a 2D-view of two tetrahedrons, one inverted.

The videos of Ed moving blocks with a chain hoist and jack with rollers.  Of course he used these traditional tools.  He came from a family of stone masons.  That doesn’t mean those were his only tools and techniques.  The few videos and pictures are ones that seem to be preplanned and for which he posed.  The video of the jack and rollers is of a very small stone and would probably be easiest to move that way.  Not so for the largest stones.  And if you look at the condition of those stones, he would have had a significant amount of cutting once the block was to the location he wanted it.  The chains are cutting into the corners of the blocks badly.  None of the placed stones show these marks.

Conclusion – So did Edward Leedskalnin just use hard work and leverage to build Rock Gate Park (Coral Castle) or is there some evidence that he was experimenting with something more advanced?  He does not appear to be just another stone sculptor, but someone who study some advanced subjects.  He could have figured out a form of mag-lev technology or something we still may not fathom.  Or he could have just used leverage and hard work.  That would still be a lost technology.

But I’m still waiting to see a skeptic using only a chain hoist, some logs, a jack, and rollers move and erect a 30-ton, 40 feet long obelisk of delicate limestone, without chain marks, then take it down, load/unload it on a truck and erect it again without chain marks.  I’ll still remain undecided until then

टवाळ कार्टा's picture

24 Mar 2016 - 11:01 am | टवाळ कार्टा

भारी...हे नवीनच समजले...टेस्लासारखाच हा पण

सही रे सई's picture

23 Mar 2016 - 8:54 pm | सही रे सई

खूपच रोचक विषय आहे हा. बरीच नवीन माहिती मिळते आहे.

नितिन थत्ते's picture

24 Mar 2016 - 8:06 pm | नितिन थत्ते

माणूस परग्रहावरचा असेल तर सर्व पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असलेले) प्राणी परग्रहावरचे असायला हवेत.

टवाळ कार्टा's picture

24 Mar 2016 - 9:01 pm | टवाळ कार्टा

पॄथ्वीला एखादी प्रगत जीवसृष्टी "प्रयोगशाळा" म्हणून वापरत असतील...

गरजू पाटिल.'s picture

25 Mar 2016 - 6:38 pm | गरजू पाटिल.

'Prometheus' नावाच्या मुव्हीचा असाच काहितरी विषय होता. वर्षभरापुर्वी पाहिलेला.

गरजू पाटिल.'s picture

25 Mar 2016 - 7:25 pm | गरजू पाटिल.

'Prometheus' नावाच्या मुव्हीचा असाच काहितरी विषय होता. वर्षभरापुर्वी पाहिलेला.

गरजू पाटिल.'s picture

25 Mar 2016 - 7:25 pm | गरजू पाटिल.

'Prometheus' नावाच्या मुव्हीचा असाच काहितरी विषय होता. वर्षभरापुर्वी पाहिलेला.

आनन्दा's picture

26 Mar 2016 - 11:45 pm | आनन्दा

तीनदा पाहिलात का हो?

मितभाषी's picture

26 Mar 2016 - 11:57 pm | मितभाषी

ते १ ,२ ,३ सिक्वेल आहेत. =))