६ वी क्रिकेट ट-२० विश्वचषक स्पर्धा - २०१६

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
13 Mar 2016 - 3:15 pm
गाभा: 

क्रिकेटच्या २० षटकांच्या सामन्यांची ६ वी विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेत एकूण २ गट आहेत.

गट १) इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान
गट २) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश किंवा ओमान (बहुतेक बांगलादेश पात्र ठरेल असे वाटते)

गट २ हा गट १ च्या तुलनेत जास्त चुरशीचा वाटतो.

२००७ मध्ये प्रथमच या स्पर्धेला सुरूवात झाली. त्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भारत विजेता ठरला. आतापर्यंत खालील देश विजेते व उपविजेते ठरले आहेत.

१) २००७ - भारत विजेता, पाकिस्तान उपविजेता
२) २००९- पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता
३) २०१० - इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता
४) २०१२ - वेस्ट इंडिज विजेता, श्रीलंक उपविजेता
५) २०१४ - श्रीलंका विजेता, भारत उपविजेता
६) २०१४ - ?

आतापर्यंत श्रीलंकेने १ विजेतेपद व २ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. भारत व पाकिस्तान या दोघांनीही एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळविले आहे. परंतु या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी भारताच्या तुलनेत जास्त चांगली आहे कारण पहिल्या ४ स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर भारत आजतगायत फक्त दोन वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आश्चर्य म्हणजे ५ वेळा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविणार्‍या ऑस्ट्रेलियाला ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांना आजवर कधीही अंतिम फेरीत प्रवेश मिळालेला नाही, मग विजेतेपद लांबच राहिले (एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत २०१५ मध्ये न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु तिथे त्यांचा पराभव झाला).

एकंदरीत या स्पर्धेवर आजतगायत भारत, श्रीलंका व पाकिस्तान या आशियायी संघांचेच वर्चस्व राहिलेले दिसते. तसेच प्रत्येक वेळी नवीन संघ विजेता होताना दिसतो, त्यामुळे आजतगायत कोणत्याही संघाला २ वेळा विजेतेपद जिंकता आलेले नाही.

एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान ६ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ६ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले. ट-२० सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतही भारत व पाकिस्तान ३ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ३ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले आहे. तसेच या स्पर्धेत आतापर्यंत भारताने न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेले नाही.

यावेळी श्रीलंकेचा संघ अगदीच नवखा आहे. पाकिस्तानचा संघ फारसा चांगला नाही व त्यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट आहे. वेस्ट इंडिज संघात अनेक तगडे खेळाडू असले तरी एकत्रित संघ असे ते खेळताना फारसे दिसत नाहीत. न्यूझीलंडकडे देखील तगडे खेळाडू असले तरी त्यांची गोलंदाजी फारशी चांगली नाही व विजिगीषू वृत्तीचा अभाव दिसतो. इंग्लंडकडे ट-२० प्रकारातले फारसे नावाजलेले खेळाडू नाहीत. याउलट दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया या ३ संघांकडे कसलेले खेळाडू आहेत.

माझ्या अंदाजानुसार यावेळी दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यापैकीच एखादा विजेता असेल.

स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.

१) मंगळवार १५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. न्यूझीलंड

२) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, पाकिस्तान वि. बांगलादेश/ओमान
३) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. वेस्ट इंडिज

४) गुरूवार १७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, अफगाणिस्तान वि. श्रीलंका

५) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड
६) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. द. आफ्रिका

७) शनिवार १९ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. पाकिस्तान

८) रविवार २० मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. आफ्रिका
९) रविवार २० मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, श्रीलंका वि. वेस्ट इंडिज

१०) सोमवार २१ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश/ओमान

११) मंगळवार २२ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यूझीलंड वि. पाकिस्तान

१२) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. इंग्लंड
१३) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. बांगलादेश/ओमान

१४) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान
१५) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज

१६) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, न्यूझीलंड वि. बांगलादेश/ओमान
१७) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. श्रीलंका

१८) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज
१९) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. ऑस्ट्रेलिया

२०) सोमवार २८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका

______________________________________________________________________
२१) बुधवार ३० मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, पहिला उपांत्य फेरीचा सामना
२२) गुरूवार ३१ मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, दुसरा उपांत्य फेरीचा सामना

______________________________________________________________________

२३) रविवार ३ एप्रिल, संध्याकाळी ७:०० वाजता, अंतिम फेरीचा सामना

______________________________________________________________________

प्रतिक्रिया

viraj thale's picture

13 Mar 2016 - 4:02 pm | viraj thale

चुकुन 2016 च्य ऐवजी 2014 टाईप झालें अहे ते बघा .

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2016 - 8:40 pm | श्रीगुरुजी

हो. ती चूक धागा प्रकाशित केल्यावर लक्षात आली. संमंला सांगून दुरूस्त करता येईल. परंतु किरकोळ चूक असल्याने तशीच राहिली तरी हरकत नाही.

तुषार काळभोर's picture

13 Mar 2016 - 4:31 pm | तुषार काळभोर

१) भारत (नियोजनबद्ध रितीने सरावासाठी श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरुद्धा ट२० मालिका खेळवल्या गेल्या. तसेच ट२० आशियाचषकाचे आयोजनः यामुळे भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय ट्२०चा चांगला सराव झालाय. विशेष म्हणजे या सर्व स्पर्धा जिंकल्या आहेत व संघ ब-यापैकी कायम ठेवलाय)
२) ऑस्ट्रेलिया: युवा व गुणवत्तापुर्ण संघ
३) न्युझीलंड/द आफ्रिका: कचखाऊ वृत्ती टाळली, तर स्फोटक कामगिरी करणारे खेळाडू
४) बांग्लादेशः आशियाचषकात नुकतेच उपविजेते ठरले आहेत. उपखंडातील वातावरणात ते उपांत्यफेरीत दाखल झाले तर आश्चर्य वाटणार नाही.
५) पाकिस्तानः उत्कृष्ट वेगवान गोलंदाजीची परंपरा कायम आहे. (ट२० आशिया चषकात मो आमिर ज्या प्रकारे गोलंदाजी करत होता- आपण फिदा झालो! मीरपूरला पाकिस्तानला ८३मध्ये गुंडाळल्यानंतर भारताविरुद्धा त्याने जे पहिले षटक टाकले होते...) फलंदाजांनी साथ दिली तर उपांत्य फेरी नक्की
६) वेस्टइंडीजः ट२० मध्ये दरारा असणारे स्फोटक फलंदाज व गोलंदाज. एकाहाती एका षटकात सामन्याला कलाटणी देऊ शकतील असे खेळाडू. सातत्यपुर्ण सांघिक खेळ केला तर अंतिम फेरी गाठण्याची शक्यता.
७) श्रीलंका: अनुभवाची कमतरता असली तरी उपखंडातील वातावरणात उपांत्य फेरी गाठू शकतात.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2016 - 9:09 pm | श्रीगुरुजी

वरील विश्लेषण बरेचसे बरोबर वाटले तरी श्रीलंका उपांत्य फेरी गाठू शकेल असे वाटत नाही. त्यांचा मुख्य गोलंदाज मलिंगा दुखापतीमुळे किती सामने खेळेल याविषयी साशंकता आहे. तो खेळला तरी त्याच्या गोलंदाजीत पूर्वीची धार राहिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे बहुतेक खेळाडू नवीन आहेत. त्यामुळे श्रीलंका उपांत्य फेरीत येईल असे वाटत नाही.

बांगलादेश आशिया चषकात उपविजेते ठरले होते. त्यांचे मुख्य फलंदाज तमीम इक्बाल, सौम्या सरकार, शब्बीर रहमान, महंमदुल्ला इ. सध्या प्रचंड फॉर्मात आहेत. हे फलंदाज सध्या जवळपास सर्व सामन्यात प्रचंड धावा करीत आहेत. परंतु बांगलादेशची कामगिरी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कळसाला पोहोचली असे वाटत आहे. प्रत्यक्ष स्पर्धेत दुय्यम संघ नसून भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान अशा तुलनेने तगड्या संघाबरोबर त्यांना खेळायचे आहे. त्यांची फलंदाजी चांगली असली तरी गोलंदाजी दुर्बल आहे. त्यामुळे तेही उपांत्य फेरीत येतील असे वाटत नाही.

भारत, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका नक्कीच उपांत्य फेरीत येतील असा अंदाज आहे. चौथा संघ वेस्ट इंडिज किंवा इंग्लंड असेल.

क्रिकेट पहिल्या सारखा खेळ राहिला नाही. जुन्या मॅचेसची सर नवीनला नाही..

काय बोलता ???

कपिलमुनी's picture

13 Mar 2016 - 9:58 pm | कपिलमुनी

तमिम इक्बालने या कपमधील पहिली सेंच्युरी काढली

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2016 - 1:47 pm | श्रीगुरुजी

तमीम इक्बाल गेल्या काही सामन्यात खोर्‍याने धावा करीत आहे. या स्पर्धेच्या पात्रता फेरीत तीनही सामन्यात तो चांगला खेळला. तो आणि बांगलादेशाचा संघ स्पर्धा सुरू होण्याआधीच peak झालेत असं वाटतंय.

बेकार तरुण's picture

14 Mar 2016 - 8:48 am | बेकार तरुण

काल हॉलंड वि. आयर्लॅड मॅच चांगली झाली (लुटुपुटुची ६ षटकांची होती तरि).
खासकरुन सीलार ह्या डच खेळाडूने केव्हिन ओ'ब्रायनचा घेतलेला झेल फारच अप्रतिम होता. बघीतला नसेल तर यु ट्युबवर जरूर बघा.

चेक आणि मेट's picture

14 Mar 2016 - 11:43 am | चेक आणि मेट

दक्षिण अफ्रिका किंवा भारत जिंकेल असा अंदाज आहे.

चेक आणि मेट's picture

27 Mar 2016 - 10:40 pm | चेक आणि मेट

द.अफ्रिकेचा तर गाशा गुंडाळलेलाच आहे,आता बघुया भारताचं काय होतय ते!
22 बाॅल 46 रन्स हवेत.
अंदाज चूकू नये अशी आशा आहे

चेक आणि मेट's picture

27 Mar 2016 - 10:55 pm | चेक आणि मेट

गोली से डर नही लगता,मगर कोहली से लगता है|

चेक आणि मेट's picture

31 Mar 2016 - 11:04 pm | चेक आणि मेट

अंदाज चुकला,भारतसुद्धा बाहेर

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2016 - 1:49 pm | श्रीगुरुजी

१५ मार्च ते ३ एप्रिल याच काळात महिला ट-२० विश्वचषक स्पर्धा देखील भारतात होत आहे. या स्पर्धेत देखील १० संघ आहेत. एकच फरक आहे. पुरूष स्पर्धेत १० संघ अफगाणिस्तान आहे तर महिला स्पर्धेत त्याऐवजी आयर्लँड आहे.

काल बांगलादेशाने ओमानला हरविल्यामुळे ओमान स्पर्धेतून बाहेर पडला असून बांगलादेश आत आलेला आहे. अर्थात हे अपेक्षितच होते.

बांगलादेश ला नजर अन्दाज करुन चालनार नाहि ...सध्या अप्रतिम कामगिरि करताय्त ते

सौंदाळा's picture

14 Mar 2016 - 4:23 pm | सौंदाळा

या स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआय चे राजकारण परत एकदा दिसले.
अनुराग ठाकुर आला की ठेवल्या धरमशाला ला मॅचेस, शशांक मनोहरमुळे नागपुरला ठेवल्या.
श्रीनिवासन यांची सद्दी संपली आता चेन्नईला, हैद्राबादला एक पण मॅच नाही.

काही राजकारण करायचे आहे ते तुमच्या तुमच्यात करा क्रिकेट रसिकांना त्याची शिक्षा कशाला?

viraj thale's picture

14 Mar 2016 - 4:47 pm | viraj thale

टी 20 विश्वचषक स्पर्धेचे पात्रता फेरीचे सलग दोन सामने जिंकल्यामुळे बंगलादेश संघाचा आत्मविश्वास वाढला असला तरी बांगला समर्थक मात्र मंगळावर पोहोचले आहेत ,भारताला आपल्याच भूमीमध्ये लोळवण्यची भाषा करत आहेत .भारतीय संघ लवकरच त्यांना जमिनीवर आणेल .

बाळ सप्रे's picture

14 Mar 2016 - 4:56 pm | बाळ सप्रे

आजच्या सराव सामन्यात इंग्लंड आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन एकादश यात लढत आहे. इंग्लंडचे ४ खेळाडू बटलर, विली ,विन्स आणि रशिद मुंबईकडून खेळतायत.

मित्र-मित्र टीम पाडून खेळतात तसं वाटतयं :-)

viraj thale's picture

14 Mar 2016 - 5:19 pm | viraj thale

अफ्रीदी पुन्हा डक वर बाद

आज न्युझीलंड कोहली आणि कं ला जमिनीवर आणेल काय ? ट२० मध्ये भारताने अजुन न्युझीलंडला हारवले नाही म्हणतात !

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2016 - 9:58 am | श्रीगुरुजी

आज ७:३० वाजता भारत वि. न्यूझीलंड हा उद्घाटनाचा सामना नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये पावसाचे सावट असल्याने सामन्यावर प्रश्नचिन्ह आहे. भारत व न्यूझीलंड एकमेकांविरूद्ध ४ ट-२० सामने खेळले आहेत व चारही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.

न्यूझीलंडची फलंदाजी ताकदवान आहे पण गोलंदाज फारसे चांगले नाहीत. फलंदाजीत त्यांच्याकडे केन विल्यम्सन, रॉस टेलर, कोरी अँडरसन, गप्टिल, मुन्रो, राँकी, अष्टपैलू ग्रँट इलियट व सॅंटनर असे तगडे फलंदाज आहेत. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, सौदी, मॅकलेनघॅन, मिलने हे मध्यम/जलदगती गोलंदाज व नेथन मॅकलम्, सँटनर हे फिरकी गोलंदाज आहेत. कोरी अँडरसन व इलियट देखील कामचलावू गोलंदाज आहेत. मॅकलेनघॅन आयपीएलमध्ये बर्‍यापैकी यशस्वी झाला होता. मुंबई इंडीयन्सकडून खेळताना अनेक सामन्यात तो १८ वे षटक व मलिंगा १९ वे षटक टाकायचे. दोघेही त्या दोन षटकात खूप कमी धावा देऊन किमान २-३ बळी मिळवून सामना मुंबईच्या बाजूला झुकवायचे.

दुपारी ३:३० वाजता भारत वि. बांगलादेश हा महिलांचा ट-२० सामना आहे.

श्रीगुरुजी's picture

16 Mar 2016 - 2:42 pm | श्रीगुरुजी

न्यूझीलंडविरूद्धची पराभवाची परंपरा खंडीत झाली नाही. अगदी वाईट पद्धतीने हरलो.

भारतीय संघ ठणठणीत खेळपट्ट्यांवरच वाघ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मागील महिन्यात गहुंजेच्या गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारत असाच हरला होता. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने खेळपट्टीचे स्वरूप अचूक ओळखून साउदी, बोल्ट, मॅकलेनघॅन असे मध्यमगती गोलंदाज बाहेर ठेवून तब्बल ३ फिरकी गोलंदाज खेळविले. तसे पाहिले तर हे दुय्यम गोलंदाज आहेत. परंतु त्यांची गोलंदाजी भारताला खेळताच आली नाही. केन विल्यमसन पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला नसता तर न्यूझीलंडने अजून जास्त धावा केल्या असत्या. रैना, जडेजा व युवराज ज्या पद्धतीने बाद झाले हे आश्चर्यकारक होते.

हवेने टम्म फुगलेला फुगा एक टाचणी लावताक्षणी फुटुन लोळागोळा होऊन पडतो, तसाच अपेक्षांच्या ओझ्याने टम्म फुगलेला भारतीय संघ केवळ एकाच सामन्यात पार लोळागोळा होऊन गेला.

आता उर्वरीत तीनही सामने जिंकावे लागतील. २०१४ ची ट-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात झाली होती. त्यात यजमान बांगलादेश सर्व ४ सामने हरला होता. अगदी अफगाणिस्तानने सुद्धा बांगलादेशाला हरविले होते. तसेच यावेळी होते की काय अशी पाल चुकचुकते आहे.

आज खालील सामने आहेत.

२) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, पाकिस्तान वि. बांगलादेश/ओमान
३) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. वेस्ट इंडिज

संध्याकाळी ७:३० वाजता महिला स्पर्धेत वेस्ट इंडीज वि. पाकिस्तान हा सामना आहे.

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2016 - 4:53 pm | श्रीगुरुजी

भारताचा दणदणीत पराभव केलेल्या किवीज् संघाने आज ऑसीज विरूद्ध निराशा केली. पहिल्या ६ षटकात नाबाद ५८ अशा भक्कम स्थितीतून ते शेवटी २० षटकात ८ बाद १४२ इतक्याच धावा करू शकले. ऑसीजने आतापर्यंत २ षटकात नाबाद १९ धावा केलेल्या आहेत. खेळपट्टी निर्जीव असल्याने ऑसीज आरामात जिंकतील असा अंदाज आहे.

सौंदाळा's picture

18 Mar 2016 - 6:24 pm | सौंदाळा

गुरुजी कांगारु हरले
याला भारतासाठी फायदेशीर निकाल म्हणावे का?

दुश्यन्त's picture

18 Mar 2016 - 6:32 pm | दुश्यन्त

२०-२० षटकांचे सामने असतात आणि १५-२० चेंडूत स्थिती इकडची तिकडे होते. निष्कर्ष काढून पोस्ट टाकण्यापेक्षा थोडा वेळ वाट पाहिलेली उत्तम. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पहिली इनिंग संपल्यावर सगळ्यांना असेच वाटले होते. प्रत्यक्षात आपण वाईट रीतीने हरलो.

एकनाथ जाधव's picture

18 Mar 2016 - 6:51 pm | एकनाथ जाधव

न्युझीलन्ड विजायी
चक्क अस्त्रोलीयाला हरवल

नया है वह's picture

18 Mar 2016 - 6:57 pm | नया है वह

न्युझीलन्ड,वेस्ट इंडिज,दक्षिण आफ्रिका नक्कीच उपांत्य फेरीत येतील असा अंदाज आहे. भारत, ऑस्ट्रेलिया मधे उपांत्य फेरी साठी चुरस राहील.

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 9:02 pm | गामा पैलवान

हा आकडा जरा (की बराच) जास्तंच आहे. दाफ्रिका पार सुटलीये.
-गा.पै.

तिमा's picture

18 Mar 2016 - 9:06 pm | तिमा

उद्या, पाकिस्तानविरुद्ध आपल्याला कठीण जाणार आहे. हरल्यास तिथेच सर्व संपेल. पण मॅचेस जर तिकीटबारीवर नजर ठेवून फिक्स असल्या, तर भारत नक्कीच अंतिम फेरीत पोचेल.
शमीला बाहेर ठेवून पंड्या आत, हे काही पटले नाही.

स्पार्टाकस's picture

18 Mar 2016 - 9:17 pm | स्पार्टाकस

Proteas gangbanged Poms!

स्पार्टाकस's picture

18 Mar 2016 - 10:20 pm | स्पार्टाकस

.... And now its payback time for Proteas!

चेक आणि मेट's picture

18 Mar 2016 - 9:43 pm | चेक आणि मेट

द.अफ्रिका vs इंग्लंड
230 चा पाठलाग जोरदार सुरू आहे.
कल्लूळाचं पाणी कशाला ढवळलं,पोरी जरा जपून दांडा धर ही गाणी मैदानावर लावत आहेत.
मज्जाच येतेय:'(

मजा आया बॉस! मस्त पाठलाग चाललाय. आवश्यक धावगती १२ च्या आत आहे. आजून ८ षटकं बाकी.

-गा.पै.

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 10:20 pm | गामा पैलवान

आ.धा. ११ च्या आत हवं होतं. क्षमस्व.
-गा.पै.

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 10:33 pm | गामा पैलवान

१५ षटकांत दाफ्रिका १६६/३ तर इंग्लंड १८३/४.
२३० चा पाठलाग जोरदार चाललाय.
-गा.पै.

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Mar 2016 - 10:39 pm | ब्रिटिश टिंग्या

भलताच अटीतटीचा सामना चालु आहे!
आतापर्यन्त इंग्लंड कोणाच्या खिजगणतीतही नव्हतं! :)

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 10:59 pm | गामा पैलवान

शेवटच्या षटकात १ धाव हवीये. गो इंग्लंड गो!
-गा.पै.

प्रदीप साळुंखे's picture

18 Mar 2016 - 10:59 pm | प्रदीप साळुंखे

अफ्रिकेचा धुव्वा

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 11:01 pm | गामा पैलवान

पहिल्याच चेंडूवर जॉर्डन बाद! ५ चेंडून १ धाव पाहिजे!
-गा.पै.

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 11:02 pm | गामा पैलवान

दुसऱ्या चेंडूवर मोईन आली बाद!
-गा.पै.

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 11:03 pm | गामा पैलवान

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 11:03 pm | गामा पैलवान

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 11:04 pm | गामा पैलवान

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Mar 2016 - 11:05 pm | ब्रिटिश टिंग्या

चोकर्स चोकले!

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2016 - 5:31 pm | श्रीगुरुजी

काल दोन्ही अंदाज चुकले. न्यूझीलंडने फक्त १४२ धावा केल्यावर व ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरूवात केल्यावर ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल असे वाटले होते. परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करून ठराविक अंतराने बळी मिळविले आणि अवघड वाटणारा सामना जिंकला.

दुसस्या सामन्यात आफ्रिकेने २२९ धावांचा डोंगर रचल्यावर इतर कोणताही संघ २३० धावा करू शकेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु पहिल्या षटकापासूनच इंग्लंडच्या रॉय आणि हेल्सने पहिल्या ४.३ षटकातच तब्बल ७१ धावांची जोरदार सलामी दिली. अक्षरशः पहिल्या चेंडूपासूनच दोघांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची पिटाई सुरू केली. पहिल्या षटकात २१, दुसर्‍यात २३ अशी सुरूवात करून आफ्रिकेच्या गोलंदाजांची पिसे काढली. डेल स्टेन ट-२० या प्रकारात फारसा यशस्वी ठरत नाही हे दिसून आले. आफ्रिकेने मॉर्नी मॉर्केलला बाहेर ठेवण्याची मोठी चूक केली. गोलंदाजांनी तब्बल २२९ धावा हातात असूनसुद्धा अत्यंत खराब गोलंदाजी केली. ३ वेळा वाईड चेंडू यष्टीरक्षकाला चकवून सीमापार झाल्याने फुकट १५ धावा दिल्या. पहिल्या ६ षटकात इम्रान ताहिरला आणायला हवे होते.

आज महालढत आहे. पावसामुळे सामन्यावर कितपत परीणाम होईल ते कळेलच. पावसामुळे सामना रद्द झाला भारताची अडचण होईल.

आज भारत वि. पाकिस्तान हा महिलांचा सामना सुरू आहे. या सामन्यातही भारताची वाट लागलेली आहे. भारतीय महिलांनी २० षटकात फक्त ७ बाद ९६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानची स्थिती आता ५.२ षटकात १ बाद ३३ अशी आहे. असेच सुरू राहिले तर पाकिस्तानी महिला सहज विजय मिळवतील.

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2016 - 6:25 pm | श्रीगुरुजी

महिलांचा भारत वि. पाकिस्तान हा सामना रंगतदार अवस्थेत आहे. भारताच्या ७ बाद ९६ चा पाठलाग करताना पाकिस्तान एकवेळ १४.१ षटकात ३ बाद ७१ अशा चांगल्या स्थितीत होते. विजयासाठी ३५ चेंडूत फक्त २६ धावा हव्या होत्या. नंतर १५ व्या षटकात भारताने १ बळी मिळविला व नंतर १६ व्या षटकाच्या ४ थ्या व ५ व्या चेंडूवर लागोपाठ २ खेळाडू धावबाद झाल्याने १६ षटकात पाकिस्तानची अवस्था ६ बाद ७७ अशी झाली.

पण अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने सामना थांबविला आहे. डकवर्थ-लुईस नियमानुसार १६ षटकात पाकिस्तानने ७५ धावा करणे आवश्यक आहे. म्हणजे पाकिस्तान २ धावांनी पुढे आहे. सामना पुढे खेळला गेला नाही तर पाकिस्तान विजयी घोषित होईल.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2016 - 12:48 pm | श्रीगुरुजी

काल या धाग्यावर कोणीच फिरकलेलं दिसत नाही. भारताने विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा पाकड्यांना धूळ चारली. पुन्हा एकदा कोहली पाकड्यांना नडला. रोहीत शर्मा, धवन आणि रैना पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. पुढील सामन्यात या तिघांपैकी एकाला बाहेर ठेवून रहाणेला आत आणावे. कदाचित पंड्याऐवजी सुद्धा रहाणेला घेता येईल.

दुसरीकडे भारतीय महिला केवळ पावसाच्या अवकृपेने हरल्या. फक्त ४ षटके शिल्लक असताना पाऊस आला. त्यावेळी दोन्ही संघांना समान संधी होती. परंतु पावसाने पाणी फिरविले.

आज दुपारी द. आफ्रिका वि. अफगाणिस्तान आणि नंतर श्रीलंका वि. वेस्ट इंडीज हे सामने आहेत.

पुढील सामन्यात या तिघांपैकी एकाला बाहेर ठेवून रहाणेला आत आणावे

अगदी सहमत...

कधी नव्हे ते इंडिया batting department मधे कमजोर वाटत आहे.

१. रोहित आणि धवल अगदीच बेभरवश्याचे आहेत (धवल च्या जागी अजिंक्य राहणे ला घ्यावे)
२. गेल्या २ सामन्यात batting lineup च्या मर्यादा समजल्या, फ़क़्त धोनी पर्यंत फलंदाजी आहे.(जडेंजा वाटत नाही फलंदाजीत काही करू शकतो)
३. कोहली वर फारच निर्भर आहोत, कालच्या सामन्यात कोहली खेळला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असता. (We don't have plan B, i.e. What to do if kohli gets out early)
४. फलंदाजीत हार्ड हिटर्स ची कमतरता(हो, धोनी, युवी आणि रैना आहेत पण .....)

जव्हेरगंज's picture

20 Mar 2016 - 5:08 pm | जव्हेरगंज

तो धवन लय बोअर कराय लागलाय आजकाल !
बाहेर काढलेला बरा !

जव्हेरगंज's picture

20 Mar 2016 - 5:11 pm | जव्हेरगंज

बाकी कालचा विजय भारताचा नसून कोहलीचा झालाय असं वाटायला लागलयं.

तो सोडून सगळेच ढेपाळलेले!

कोहली, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ हे या घडीचे क्लासी बॅट्समन आहेत . पहिले दोघे ऑर्थोडॉक्स , तर तिसरा काहीसा अनऑर्थोडॉक्स . पण हे तिघेही त्यांच्या करियरमधे ग्रेट अचिवमेंट करतील . कारकिर्द संपेल तेव्हा वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेअर्स असतील टेस्ट , वन डे आणि ट२० अशा सर्व प्रकारात .

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2016 - 6:09 pm | श्रीगुरुजी

आफ्रिकेची इंग्लंडकडून झालेली धुलाई अफगाणिस्तानविरूद्ध देखील सुरू राहिली. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करून २०९ धावा केल्यावर अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक शाहजाद याने रबाडाच्या पहिल्या षटकात १ चौकार व १ षटकार मारून ११ धावा केल्या. नंतर डावाच्या दुसर्‍या व अ‍ॅबॉटच्या पहिल्या षटकात ३ षटकार व १ चौकार मारून २२ धावा केल्या. नंतर डावाच्या तिसर्‍या षटकात रबाडाला १ चौकार व १ षटकार मारून १४ धावा केल्या. पहिल्या ३ षटकानंतर अफगाणिस्तान नाबाद ४७ अशा भक्कम अवस्थेत होते. परंतु नंतर ४ थ्या षटकात मॉरिसने शाहजादचा त्रिफळा उडविल्यावर वेग कमी झाला. शाहजादने ५ षटकार व ३ चौकार मारून केवळ १९ चेंडूत ४४ धावा करून आफ्रिकेला हादरा दिला. आता अफगाणिस्तानला उर्वरीत २० चेंडूत ५४ धावा हव्या असून ५ गडी बाद झाले आहेत. आफ्रिका विजयाच्या मार्गावर आहे.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2016 - 11:30 pm | श्रीगुरुजी

आफ्रिका व विंडीजने आपापले सामने जिंकले. आता गटात विंडीज पहिल्या क्रमांकावर व आफ्रिका दुसर्‍या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान बाहेर गेल्यातच जमा आहे.

उद्या संध्याकाळी ७:३० वाजता ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश हा सामना आहे. दोघेही आपला पहिला सामना हरलेले असल्यामुळे उद्या दोघांपैकी जो हरेल त्याचे आव्हान बहुतेक संपुष्टात येईल.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2016 - 12:55 pm | श्रीगुरुजी

पाकडे न्यूझीलंडकडून सुद्धा हरले. शेवटी आफ्रिदीचा पडलेला चेहरा बघवत नव्हता.

आता ब गटात प्रचंड चुरस आहे. न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आहेत. उर्वरीत चारही संघांना अजूनही संधी आहे. भारताने निव्वळ धावगतीत खूप मार खाल्ला आहे. भारताला कोणत्याही परिस्थिती उर्वरीत २ सामने जिंकावेच लागतील. दोनपैकी एकही सामना हरला तर भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात येईल.

अ गटात अफगाणिस्तान आधीच बाहेर पडला आहे. उर्वरीत ४ संघात चुरस आहे.

आज दुपारी ३ वाजता अफगाणिस्तान वि. इंग्लंड हा सामना आहे. हा सामना इंग्लंड हरले तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.

संध्याकाळी ७:३० वाजता भारत वि. बांगलादेश हा सामना आहे. हा सामना बांगलादेश हरला तर त्यांचे आव्हान पूर्ण संपेल. भारत हरला तर उर्वरीत सामन्यांवर भारताचे आव्हान अवलंबून राहील.

मला एक कळत नाही..पाकिस्तान च आव्हान अजूनही शाबूत आहे. हे कसं शक्य आहे ?

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2016 - 2:38 pm | श्रीगुरुजी

न्यूझीलंड ३ सामने जिंकून प्रथम क्रमांकावर आहे. भारत व ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी २ सामने खेळले असून १ विजय व १ हार अशी स्थिती आहे. पाकडे ३ सामने खेळले असून १ विजय व २ पराभव अशी स्थिती आहे. बांगलादेश २ सामने खेळला असून दोन्ही हरले आहेत.

पाकड्यांची निव्वळ धावगती (+०.२५४) ऑस्ट्रेलिया (+०.१०८) व भारतापेक्षा (-०.८९५) चांगली असल्याने सध्या ते दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

पाकड्यांचा ऑस्ट्रेलियाशी सामना शिल्लक आहे. भारताचे ऑस्ट्रेलिया व बांगला असे दोन सामने शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाचे भारत व पाकिस्तान हे दोन सामने शिल्लक आहेत. बांगलाचे भारत व न्यूझीलंड हे दोन सामने शिल्लक आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, बांगला व पाकडे या चारपैकी कोणत्याही २ देशांनी प्रत्येकी २ विजय मिळविले तर उपांत्य फेरीसाठी दुसरा संघ निव्वळ धावगतीवर ठरेल. त्यामुळे पाकड्यांना अजूनही संधी आहे.

viraj thale's picture

23 Mar 2016 - 2:10 pm | viraj thale

भारताला बंगलादेशला मोठ्या फरकाने हरवावे लागेल .

रहाणे ला का बाहेर ठेवलय अजूनही कळत नाहीये, कोहली नंतरचा टेक्निकली साउंड प्लेयर म्हणून त्याचाच नंबर लागेल. धवन, रोहीत, हार्दिक, रॆना उगाचच आहेत, यांच्या पेक्षा ही अनेक टॅलेंटेड खेळाडु बाहेर वाट पहात बसलेत, शिखर धवन सारखे नशिब कोणाचेही नसेल, तो का टिम मध्ये आहे हे अजूनही न सुटलेले कोडे आहे

धोनी चा रहाणे वर वैयक्तिक राग आहे त्यामुळे काहींना काही कारण सांगून रहाणे ला संघाबाहेर ठेवत आहे त्यामुळे तो सारखा पंड्या ला प्रमोट करत असतो .

नाखु's picture

23 Mar 2016 - 3:12 pm | नाखु

जाणुन बुजून त्याचा फलंदाजी क्रमांकही अस्थिर ठेवलाय "मानाचा (चेसुकीचा) जडेजा आणि पंड्या याला हक्काची जागा दिलीय पण युवीला बळीच बकरा बन्वून रहाणेला घेण्याचा डाव दिसतोय.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2016 - 7:20 pm | श्रीगुरुजी

इंग्लंडने अफगाणिस्तानला हरवून गटात दुसरे स्थान मिळविले आहे. त्या गटातून विंडीज, इंग्लंड व द. आफ्रिका यांपैकीच दोन संघ उपांत्य फेरीत येण्याची शक्यता आहे. श्रीलंकेची निव्वळ धावगती खूप कमी असल्याने त्यांना खूपच कमी संधी आहे.

भारत वि. बांगला सामन्यात बांगलाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली आहे. आजही रहाणेला घेतलेले नाही. मागील संघच कायम आहे.

चांदणे संदीप's picture

23 Mar 2016 - 11:36 pm | चांदणे संदीप

Memorable ओने!

लौ यू टीम इंडिया! लौ यू धोनी!

हुर्रेर्रेर्रेद्फ्गह्ज्फद्स्सघ्नन्ह्दर्त्ग्येस्झ्बन्न्कक्ज्क्कुद (हे परत बोलताच काय लिहिता पण येणार नै)

आनंदाने वेडा झालेला!
Sandy

हुर्रेर्रेर्रेद्फ्गह्ज्फद्स्सघ्नन्ह्दर्त्ग्येस्झ्बन्न्कक्ज्क्कुद
हे बघा मी लीवल!

बेकार तरुण's picture

24 Mar 2016 - 8:51 am | बेकार तरुण

काल जोरदार (नशीबाने??) जिंकली मॅच
रहाणेला आता खरच खेळवला पाहिजे. आणी युवराजला अजिबात गोलंदाजी का मिळत नाही हे कळत नाही.

तिमा's picture

24 Mar 2016 - 9:13 am | तिमा

बांगलादेशाच्या विजयात धोनी हाच मोठा अडसर ठरला. धोनीसारखा कप्तान अफगाणिस्तानला मिळाला असता तर काल ते इंग्लंड विरुद्ध आरामात जिंकले असते.

बेकार तरुण's picture

24 Mar 2016 - 10:38 am | बेकार तरुण

हम्म
एक मात्र आहे, टेस्ट मधुन रिटायर झाल्यापासुन धोनीने कीपींगवर अफाट मेहनत घेतली असावी.
आधीपासुन तो चांगलाच कीपर आहे, पण आता तो फारच उत्तम कीपींग करतो आहे. खासकरुन स्पिनर्सच्या बॉलिंगला स्टम्पिंग, अफलातुन !!

तुषार काळभोर's picture

24 Mar 2016 - 12:58 pm | तुषार काळभोर

हार्दिक पंड्याच्या शेवटच्या षटकात मॅच गेलीच होती. तीनमध्ये दोन रन लईच किरकोळ होतं. ती मॅच केवळ धोनीच्या नशीबाने जिंकली असं म्हणावं लागेल.
आज सकाळी 'माझा'वर पंड्याच्या घरी कसं उत्सवी वातावरण होतं, वगैरे दाखवत होते. तर तो 'पत्रकार' पंड्याच्या भावाला भारतीय संघाविषयी तुला काय वाटतं हे विचारत होता.
मॅच पंड्यामुळेच गमावल्यात जमा होती, आणि तिला परत खेचून आणण्यात त्याचा वाटा (२ विकेट असल्या तरी) 'नोबॉल टाकला नाही' इतपतच होता. कारण चौथ्या व पाचव्या बॉलवर उडालेले झेल पंड्याच्या गोलंदाजी कौशल्यामुळे नाही तर त्या दोघा बॅट्समननी मुर्खपणा केल्यामुळे होते. तर शेवटच्या बॉलवर झालेला रनआउट हा धोनीचा होता.

इरसाल's picture

28 Mar 2016 - 10:45 am | इरसाल

घरापासुन पायी ५ मि.च्या अंतरावर रहातात. त्यादिवशीच्या त्याच्या ओव्हरनंतर काय फटाके फुटले विचारुच नका.
आता आला बडोद्यात की जावुन भेटावे म्हणतो.

सुमीत भातखंडे's picture

24 Mar 2016 - 1:26 pm | सुमीत भातखंडे

आहे. फलंदाजांनी मारलेले ढिसाळ शॉट्स आणि धोनीचं अप्रतिम यष्टीरक्षण यामुळेच ही मॅच जिंकलो.
शेवटच्या ओवरमध्ये पंड्याचं श्रेय नो-बॉल न टाकण्यापुरतच.

श्रीगुरुजी's picture

24 Mar 2016 - 2:53 pm | श्रीगुरुजी

काय जबरदस्त सामना झाला. फारा दिवसांनी असा रोमांचक शेवट पहायला मिळाला. धोनीच्या नेतृत्वगुणांचा कस लागला व तो त्यात पुरेपूर उतरला.

सुरूवात चुकीच्या संघनिवडीने झाली. सलामीचे रोहीत व धवन हे दोघेही आधीचे दोन्ही सामने अपयशी ठरले होते. ४ थ्या क्रमांकावर खेळणारा रैना सुद्धा अपयशी होता. तरीसुद्धा तोच संघ खेळविला गेला. आधीच्या सामन्यातील अपयशाने दोन्ही सलामीवीर दबावाखाली होते व त्यामुळे बाद न होता खेळत राहण्याचे धोरण स्वीकारून ते खेळत बसले. त्यामुळे धावगती कमालीची संथ झाली. बांगलादेशची मजबूत फलंदाजी लक्षात घेता भारताने १८० चे लक्ष्य ठेवायला हवे होते. ६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहीत फक्त १८ धावा (१६ चेंडूत) काढून बाद झाला तेव्हा भारत १ बाद ४२ होता. पॉवरप्लेच्या ६ षटकात फक्त ४२ धावा निघाल्या. पाठोपाठ धवन २३ धावा (२२ चेंडूत) काढून बाद झाला. सलामीवीरांनी ३८ चेंडू खेळून फक्त ४१ धावा केल्या. आश्चर्य म्हणजे कोहली सुद्धा अत्यंत संथ खेळत होता. कोहली २४ चेंडूत २४, रैना २३ चेंडूत ३०, धोनी १२ चेंडूत नाबाद १३ व युवराज ६ चेंडूत ३ यांनी निराशा केली. पंड्या, जडेजा व अश्विन यांनी एकत्रित १७ चेंडूत ३२ धावा केल्याने धावसंख्या १४० च्या पुढे पोहोचली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करून फक्त १ वाईड चेंडू टाकला.

१४६ धावांचे आव्हान पुरेसे नव्हते. अश्विनने चांगली गोलंदाजी केली. बांगलाचा प्रमुख फलंदाज तमीमचा अत्यंत सोपा झेल बुमराहने सोडल्यावर संताप अनावर झाला. त्याआधी पहिल्या षटकात तमीमचा एक सोपा फटका बुमराहला न अडवता आल्याने १ धावेऐवजी ४ धावा गेल्या होत्या. जेमतेम १४६ धावा हातात असताना प्रत्येक धाव महत्त्वाची असते. इथे तर बुमराहने ३ धावा सोडल्या. तमीमचा सोपा झेल सोडल्यावर अश्विनने जोरदार शिवी हासडली. बुमराहला मैदानावर शिव्या मिळाल्या असणार. सोपा झेल सुटल्याने तो नर्व्हस झाला होता व आत्मविश्वासही डळमळीत झाला असावा. अशा परिस्थितीत धोनीने लगेच त्याला गोलंदाजीस आणायला नको होते. त्याला सावरायला थोडा वेळ द्यायला हवा होता. नर्व्हस अवस्थेत बुमराह ने जे षटक टाकले त्यात तमीम तब्बल ४ चौकार मारून त्याचा आत्मविश्वास अजून डळमळीत करून टाकला. भारत सामना हरला असता तर खापर बुमराहच्या डोक्यावर फुटले असते हे नक्की.

सुदैवाने जडेजा व अश्विनने चांगली गोलंदाजी केली. धोनीने अप्रतिम यष्टीरक्षण करून २ यष्टीचित केले. शब्बीर रहमानला ज्या तर्‍हेने धोनीने यष्टीचित केले ते केवळ अफलातून होते. फक्त धोनीच ते करू शकत होता. जगातला इतर कोणताही यष्टीरक्षक ते करू शकणार नाही.

नंतर २ षटकात १७ धावा हव्या असताना परत आलेल्या बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करून फक्त ६ धावा दिल्या. शेवटच्या षटकात सामना गेलेलाच होता. परंतु फाजिल उत्साहामुळे मुशफकीर व महंदुल्लाने विकेट फेकल्या व शेवटच्या चेंडूवर नीट योजना आखून धोनीने मुस्तफिजूरला अप्रतिमरित्या धावबाद केले व सामना जिंकला.

निदान पुढच्या सामन्यात तरी युवराजच्या जागी रहाणेला आणावे.

आता बांगलादेश बाहेर पडला आहे. भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. परंतु भारताची निव्वळ धावगती अजूनही पाकडे व ऑसीजपेक्षा कमी आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला ऑसीजला हरवावेच लागेल.

गामा पैलवान's picture

24 Mar 2016 - 7:01 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

>> नंतर २ षटकात १७ धावा हव्या असताना परत आलेल्या बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करून फक्त ६ धावा दिल्या.

बुमराहची ही कामगिरी देखील प्रशंसनीय आहे. जर आधी झेल पकडला असता तर त्याच्या या कामगिरीचीही चर्चा झाली असती असं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

असहमत!
रहाणेला खेळवलंच पाहिजे. पण युवराजच्या जागेवर नको.
युवराज जिगरबाज खेळाडू आहे. त्याची डावखुरी गोलंदाजीसुद्धा उपयुक्त आहे. (धोनी ती का वापरत नाहीये कुणास ठाऊक?)
ते तीन आयतोबा बसलेत ना जागा अडवून, त्यातले दोन तरी हाकलले पाहिजेत. धवन, रोहित व रैना. (रोहितने अजून चार द्विशतके केली, तरी तो मला आवडणार नाही. द्विशतके करणारे इतर: सचिन, सेहवाग, गेल यांच्याविषयी एक भरोसा असायचा/असतो, की अजून काहीतरी होईल, पण या रोहित दगडाविषयी कणभरही विश्वास नाही. अन् आशासुद्धा नाही!)

तिमा's picture

24 Mar 2016 - 5:14 pm | तिमा

ऑसीज विरुद्ध मॅच मोहालीला आहे का ? तसे असल्यास भारत हरण्याची शक्यता जास्त. हीच टीम ठेवली तर नक्कीच.

श्रीगुरुजी's picture

24 Mar 2016 - 8:17 pm | श्रीगुरुजी

आता ब गटात उपांत्य फेरीचा दुसरा संघ ठरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया वि. भारत हे दोनच महत्त्वाचे सामने आहेत. या तीनही संघांना उपांत्य फेरीत जाण्याची संधी आहे.

- भारताने ३ सामन्यात २ विजयांसह ४ गुण मिळविले असून निव्वळ धावगती -०.५४६ आहे.
- पाकड्यांनी ३ सामन्यात १ विजयासह २ गुण मिळविले असून निव्वळ धावगती +०.२५४ आहे.
- ऑसीजने २ सामन्यात १ विजयासह २ गुण मिळविले असून निव्वळ धावगती +०.१०८ आहे.

ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामन्यात ३ शक्यता आहेत आणि नंतर भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यात देखील ३ शक्यता आहेत. एकूण ९ शक्यता आहेत.

१) ऑस्ट्रेलिया वि. पाकडे सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळून पाकड्यांचे एकूण गुण ३ होऊन त्यांचे आव्हान संपेल व ऑस्ट्रेलियाचे देखील ३ गुण होतील.

अशा परिस्थितीत भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर अशी परिस्थिती असेल.

अ) सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास भारताचे ५ व ऑस्टेलियाचे ४ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल.
ब) ऑस्ट्रेलिया विजयी - ऑस्ट्रेलियाचे ५ गुण व भारताचे ४ गुण होऊन ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल.
क) भारत विजयी - भारताचे ६ गुण व ऑस्ट्रेलियाचे ३ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल.

म्हणजे ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामना अनिर्णित राहिल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता ६६.६६% आहे.
परंतु (१) आणि (अ) होण्याची शक्यता ११.११% आहे. तसेच (१) आणि (क) होण्याची शक्यता देखील ११.११% आहे. म्हणजे या दोनपैकी कोणतेही एक होण्याची शक्यता २२.२२% आहे.

२) ऑस्ट्रेलिया वि. पाकडे सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी - असे झाल्यास पाकड्यांचे एकूण गुण २ होऊन त्यांचे आव्हान संपेल व ऑस्ट्रेलियाचे ४ गुण होतील. ऑस्ट्रेलियाची निव्वळ धावगती देखील वाढेल.

अशा परिस्थितीत भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर अशी परिस्थिती असेल.

अ) सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास भारताचे ५ व ऑस्टेलियाचे ५ गुण होऊन सरस धावगतीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल.
ब) ऑस्ट्रेलिया विजयी - ऑस्ट्रेलियाचे ६ गुण व भारताचे ४ गुण होऊन ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल.
क) भारत विजयी - भारताचे ६ गुण व ऑस्ट्रेलियाचे ४ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल.

म्हणजे ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता ३३.३३% आहे.

परंतु (१) आणि (क) होण्याची शक्यता फक्त ११.११% आहे.

३) ऑस्ट्रेलिया वि. पाकडे सामन्यात पाकडे विजयी - असे झाल्यास पाकड्यांचे एकूण गुण ४ होऊन त्यांचे आव्हान टिकून राहील व ऑस्ट्रेलियाचे २ गुण होतील. पाकड्यांची निव्वळ धावगती देखील वाढेल.

अशा परिस्थितीत भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर अशी परिस्थिती असेल.

अ) सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास भारताचे ५ व ऑस्टेलियाचे ३ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल.
ब) ऑस्ट्रेलिया विजयी - ऑस्ट्रेलियाचे ४ गुण व भारताचे ४ गुण होऊन कमी धावगतीमुळे भारताचे आव्हान संपुष्टात येईल व ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यापैकी ज्याची धावगती सरस असेल तो उपांत्य फेरीत जाईल.
क) भारत विजयी - भारताचे ६ गुण व ऑस्ट्रेलियाचे ४ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल.

म्हणजे ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामना पाकड्यांनी जिंकल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता ६६.६६% आहे.

परंतु (१) आणि (अ) होण्याची शक्यता ११.११% आहे. तसेच (१) आणि (क) होण्याची शक्यता देखील ११.११% आहे. म्हणजे असे होण्याची शक्यता २२.२२% आहे.

म्हणजे पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया हा सामना ऑस्ट्रेलिया हरल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता जास्त आहे.

अर्थात पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया या सामन्याचा तीनपैकी कोणताही निकाल लागला तरी जर भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकला तर भारत १००% उपांत्य फेरीत जाणार.

त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकावेच लागेल व हा सामना भारत हरला तर भारताचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता १००% आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2016 - 2:43 pm | श्रीगुरुजी

आज ३ वाजता ऑसीज वि. पाकडे हा भारत, ऑस्ट्रेलिया व पाकड्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना आहे. यात पाकडे जिंकले तर त्यांचे आव्हान कायम राहील. ते हरले किंवा सामना अनिर्णित राहिला तर पाकड्यांना बॅगा भराव्या लागतील.

दुसरा सामना विंडीज वि. द. आफ्रिका ७:३० वाजता आहे.

चेक आणि मेट's picture

25 Mar 2016 - 3:04 pm | चेक आणि मेट

युवराजला बाहेर करून उपयोग नाही,कारण त्याची वादळी बॅटींग कधीही बरसू शकते.
रोहितला देखील बाहेर करून उपयोग नाही,धवनला बाहेर बसवलं तरी चालेल.
रैना,जडेजा यांनासुद्धा बाहेर बसवून उपयोग नाही कारण यांच्याइतके अफलातून क्षेत्ररक्षक टीममध्ये नाहीत.शिवाय जडेज्याची गोलंदाजीही उत्तम आहे.
पंड्याला बाहेर करण्यात हरकत नसावी,पण तो बॅटींग चांगली करतो म्हणे!
so धवन बाहेर अन् रहाणे आत ही एकच रिप्लेसमेंट योग्य वाटते.

तिमा's picture

25 Mar 2016 - 6:26 pm | तिमा

पाकडे आणि बांगडे स्पर्धेतून बाहेर फेकले गेल्याचा अतीव आनंद आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2016 - 9:10 pm | श्रीगुरुजी

आता रविवारी ऑसीज व भारतातला सामना हा नॉकआऊट उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल. जो जिंकेल तो उपांत्य फेरीत जाईल. सामना पावसामुळे झालाच नाही तर भारत बाहेर.

विंडीजविरूद्ध आफ्रिकेची वाट लागली आहे. आफ्रिकेला २० षटकात फक्त ८ बाद १२२ धावा करता आल्या. याच खेळपट्टीवर भारत वि. न्यूझीलंड हा अत्यंत कमी धावसंख्येचा सामना झाला होता. त्यामुळे अचूक गोलंदाजी केल्यास आफ्रिकेला संधी आहे. मात्र आफ्रिका हरल्यास विंडीजची जागा नक्की होईल व आफ्रिकेसाठी उपांत्य फेरी गाठणे अत्यंत अवघड होईल.

तिमा's picture

26 Mar 2016 - 7:02 pm | तिमा

बांगलादेशविरुद्ध आजचा न्यूझीलंडचा खेळ पाहिल्यावर, आपल्याला फायनलला पोचलो तरी काही चान्स नाही असे वाटते. स्पिन, फास्ट बोलिंग, बॅटिंग, फिल्डिंग.... सगळ्याच बाबतीत , ती एक परिपूर्ण टीम वाटते.

श्रीगुरुजी's picture

26 Mar 2016 - 8:08 pm | श्रीगुरुजी

बांगला २०१४ च्या स्पर्धेप्रमाणे याही स्पर्धेत सर्व ४ सामने हरले. उपांत्य फेरीसाठी विंडीज व न्यूझीलंड हे दोन संघ नक्की झालेत. 'ब' गटातून दुसरा संघ उद्याच्या ऑस्ट्रेलिया वि. भारत या सामन्यातील विजेता असेल. 'अ' गटात अजून चुरस आहे. आज इंग्लंड लंकेविरूद्ध जिंकले तर इंग्लंड उपांत्य फेरीत जाईल. पण श्रीलंका जिंकले तर इंग्लंड, आफ्रिका व श्रीलंका या तीनही संघांना अजूनही संधी असेल.

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2016 - 6:57 pm | श्रीगुरुजी

'अ' गटात आज चक्क विंडीज अफगाणिस्तानकडून हरले. पण तरीसुद्धा सरस निव्वळ धावगतीमुळे विंडीज प्रथम क्रमांकावर व इंग्लंड दुसर्‍या क्रमांकावर राहून दोघेही उपांत्य फेरीत आले. आता एक उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड वि. इंग्लंड असा होईल. दुसरा सामना आजच्या भारत वि. ऑस्ट्रेलिया या सामन्यातील विजेता विरूद्ध विंडीज असा होईल.

भारतीय महिला मात्र स्पर्धेतून बाहेर पडल्या. आज विंडीजविरूद्ध फक्त ३ धावांनी पराभव झाल्याने उपांत्य फेरीचा प्रवेश बंद झाला.

viraj thale's picture

27 Mar 2016 - 9:59 pm | viraj thale

सलामी जोड़ी पुन्हा अपयशी

4 गोलंदाज आणि कोहली इतकीच भारतीय टिम उरलेली आहे असे खेदाने वाटते, आज जिंकलो तरी अजिबात आनंद झालेला नाही. शर्मा, धवन आणि रॆना ची पुण्याई अजुन किती बाकी आहे? युवराज ची दयनीय अवस्था बघवत नाही. जडेजा ची अवस्था झाकली मुठ सव्वा लाखाची आहे.

शेम आॅन सिलेक्शन कमीटी

चांदणे संदीप's picture

27 Mar 2016 - 11:42 pm | चांदणे संदीप

लक्ष्याचा पाठलाग करताना आणि दबावाखाली कस खेळाव याच उत्तम उदाहरण कोहलीने पुन्हा एकदा सादर केल आहे! त्याचबरोबर, या वर्ल्ड कपमध्ये, सुरूवातीला विकेट कवडीमोल भावात फेकून मधल्या फळीवर दबाव कसा आणायचा ह्या कामी रोहित, धवन, रैना यांनी यात सातत्य राखण्यात आजही यश मिळवलं!

धोनी परत एकदा विनींग शॉट मारण्यासाठी नशिबवान ठरला, त्यात तो आजिबात चुकला नाही, जरी थोडा मिसहीट वाटत होता शॉट, बाऊंड्रीपार आरामात गेलाच!

युवराजकडून आज अनपेक्षितरित्या धोनीने बॉलिंग करवून घेतली. ज्यात, भाऊने आजिबात निराश नाही केले. पहिल्याच बॉलवर धोकादायक ऑसि कॅप्टन स्मीथला बाद केले तसेच मॅक्सवेलला नोबॉलनंतरच्या फ्रीहीट साठी टाकलेला बॉल निव्वळ अफलातून!

ऑस्ट्रेलियन प्लेयर्स सुरूवतीच्या सहा ओव्हर्स सोडल्या तर लौकिकाला साजेसा खेळ नाही दाखवू शकले. कोहली पुढे तर निव्वळ हात टेकलेले त्यांनी. एकोणिसाव्या ओव्हरमध्ये तर फिल्डर्सच नव्हते जणू मैदानात. फक्त बॉलर आणि विकेटकीपर एवढीच ऑस्ट्रेलियन टीम दिसत होती! बाकीचे कुठे गेलेले कुणास ठावूक? ;)

आज जे बोलेन ते खरे असं होत होत माझ..... त्यामुळे, आजच, भारत वर्ल्ड कप जिंकणार अस बोलून ठेवलयं!! ;)

Sandy

viraj thale's picture

27 Mar 2016 - 11:45 pm | viraj thale

स्टीव स्मिथ: भावांनो आज आमचा ईस्टर संडे
आहे त्यामुळ मॅच आम्हीच जिंकणार.
एम्.एस.धोनी: भावा आमची पण संकष्टी आहे
आज विसरु नको

चांदणे संदीप's picture

27 Mar 2016 - 11:50 pm | चांदणे संदीप

लक्ष्याचा पाठलाग करताना आणि दबावाखाली कस खेळाव याच उत्तम उदाहरण कोहलीने पुन्हा एकदा सादर केल आहे! त्याचबरोबर, या वर्ल्ड कपमध्ये, सुरूवातीला विकेट कवडीमोल भावात फेकून मधल्या फळीवर दबाव कसा आणायचा ह्या कामी रोहित, धवन, रैना यांनी यात सातत्य राखण्यात आजही यश मिळवलं!

धोनी परत एकदा विनींग शॉट मारण्यासाठी नशिबवान ठरला, त्यात तो आजिबात चुकला नाही, जरी थोडा मिसहीट वाटत होता शॉट, बाऊंड्रीपार आरामात गेलाच!

युवराजकडून आज अनपेक्षितरित्या धोनीने बॉलिंग करवून घेतली. ज्यात, भाऊने आजिबात निराश नाही केले. पहिल्याच बॉलवर धोकादायक ऑसि कॅप्टन स्मीथला बाद केले तसेच मॅक्सवेलला नोबॉलनंतरच्या फ्रीहीट साठी टाकलेला बॉल निव्वळ अफलातून!

ऑस्ट्रेलियन प्लेयर्स सुरूवतीच्या सहा ओव्हर्स सोडल्या तर लौकिकाला साजेसा खेळ नाही दाखवू शकले. कोहली पुढे तर निव्वळ हात टेकलेले त्यांनी. एकोणिसाव्या ओव्हरमध्ये तर फिल्डर्सच नव्हते जणू मैदानात. फक्त बॉलर आणि विकेटकीपर एवढीच ऑस्ट्रेलियन टीम दिसत होती! बाकीचे कुठे गेलेले कुणास ठावूक? ;)

आज जे बोलेन ते खरे असं होत होत माझ..... त्यामुळे, आजच, भारत वर्ल्ड कप जिंकणार अस बोलून ठेवलयं!! ;)

Sandy

नन्द्या's picture

28 Mar 2016 - 3:09 am | नन्द्या

आज कोहली, युवराज, धोनी यांच्या फलंदाजीचे जेव्हढे कौतुक करावे तेव्हढे थोडेच. बिचारा युवराज, लंगडा होऊन सुद्धा धडाडीने खेळला. स्ट्राईक रेट १०० च्या वर ठेवला. एकूणच तिघेहि जण सामना जिंकायचा या जिद्दीने खेळले. विशेषतः कोहली. नंतर पण त्याने युवराज ची स्तुति केली, प्रेक्षकांचे परत परत आभार्‍ मानले.

व्वा!

बेकार तरुण's picture

28 Mar 2016 - 8:55 am | बेकार तरुण

कोहली ची इन्निंग्स कमाल होती !! अजिबात स्लॉग न करता त्याने २ ओव्हर्स मधे सामना संपवला !!
मजा आली !!!
ऑसी आणि पाकला हारवल्यावर काही वेगळाच आनंद होतो :)

रहाणे ला घेतला पाहिजे आता, धवनच्या जागी तरी, धवन आणि शर्मा फक्त भूमिपूजनासाठी आहेत टीममधे
रैना पहिला शॉर्ट बॉल येईस्तोवर कर्तो बॅटिंग, शॉर्ट टाकला की मात्र ईमाने ईतबारे वि़केट देउन परत येतो
पण धोनी आता टीम बदलणं शक्य नाही, जर युवीच अनफीट ठरला तर बदलावी लागेल.

तुषार काळभोर's picture

28 Mar 2016 - 9:10 am | तुषार काळभोर

रहाणेवर एकतर धोनीचा वैयक्तिक आकस असावा, किंवा तो रवी शास्त्रीचा नावडता असावा. नाहीतर त्या तीन आयतोबांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ सुरू असताना रहाणेला बाहेर बसवून त्यांना आग्रहाने खेळवण्यामागचे प्रयोजन कळत नाही.

विराट या पिढीचा तेंडूलकर आहे. (स्वभाव सोडला तर) तो असेपर्यंत आशा शिल्लक असतात.

एक सामान्य मानव's picture

28 Mar 2016 - 11:22 am | एक सामान्य मानव

आपली टीम उपांत्य फेरीत खेळायला मुळीच लायक नाही. नशीब, विराट, धोनी व काही प्रमाणात नेहरा बस्स...याची मला वाटणारी कारणे ..
१. वरील तिघांशिवाय इतर कोणीही खेळाडु कसोटी दर्जाच्या इतर कोणत्याही संघात जागा मिळवु शकेल असे वाटत नाही. माझ्या मते चांगल्या संघात असे किमान ५-६ खेळाडु हवेत. उदा. आपलाच जुना ५०-५० चा २००३ किंवा २०११ चा संघ आठवा.
२. ३७ वर्षाचा नेहरा सोडता बाकी एकही गोलंदाज नाही जो ४ षटके टाकु शकेल याची खात्री देता येइल. बरेचदा कामचलाऊ फिरकी गोलंदाज अश्विनपेक्षा बरे वाटतात.
३. विराट, धोनी व काही प्रमाणात युवराज सोडला तर कोणीही फलंदाज माफक आव्हानात्मक खेळपट्टी वा गोलंदाजीसमोर उभाही राहु शकत नाही. (पुण्यातली श्रीलंकेची व २०-२० चषकातील सर्वच सामने)
अवांतरः बांगलादेशविरुद्ध्च्या सामन्यात पंड्याच्या षटकाची सर्व तारीफ करत आहेत पण माझ्यामते त्याने सामना घालवला होता. दोन विकेट्तर फलंदाजांच्या मुर्खपणामुळे मिळाल्या. कालसुद्धा त्याने शेवटच्या षटकात १५ धावा दिल्या त्याही ८ नं. फलंदाजाला..
बाकी काय लिहणे?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

28 Mar 2016 - 11:56 am | खालीमुंडी पाताळधुंडी

अवांतरः बांगलादेशविरुद्ध्च्या सामन्यात पंड्याच्या षटकाची सर्व तारीफ करत आहेत पण माझ्यामते त्याने सामना घालवला होता. दोन विकेट्तर फलंदाजांच्या मुर्खपणामुळे मिळाल्या. कालसुद्धा त्याने शेवटच्या षटकात १५ धावा दिल्या त्याही ८ नं. फलंदाजाला..
बाकी काय लिहणे?

+++111

मॅच संपल्यावर कोहली मैदानावरच बसला ते दृष्य आयुष्यात विसरणार नाही.... भावना अनावर झाल्या बहुतेक त्याला!!

बेकार तरुण's picture

28 Mar 2016 - 12:16 pm | बेकार तरुण

येस ! मला ते पाहुन २०११ वर्ल्ड कपला युवीनेहि सेम पोज दिलेली ते आठवलं !!

श्रीगुरुजी's picture

28 Mar 2016 - 12:55 pm | श्रीगुरुजी

निव्वळ कोहलीमुळे जिंकलो. पहिल्या ४ मधील ३ फलंदाज सातत्याने अपयशी ठरत आहेत. आणि प्रत्येकवेळी कोहलीलाच खेळावे लागते. युवराज येऊन पडझड थांबवितो व कोहलीला साथ देतो. फारश्या धावा करत नसल्या तरी निदान मोठी भागिदारी तरी करतो. त्यानंतर धोनी व पंड्या थोड्याच पण वेगवान धावा करून जातात. म्हणजे फक्त ४ फलंदाज धावा करताहेत. गोलंदाजीत नेहरा व अश्विन सोडला तर बाकी आनंदच आहे.

रोहीतची ४ सामन्यातील कामगिरी - ५,१०, १८, १२
धवनची ४ सामन्यातील कामगिरी - १,६,२३,१३, २ झेल, १ धावबाद
रैनाची ४ सामन्यातील कामगिरी - १,०, ३०, १०, ३ बळी, १ झेल,१ धावबाद
युवराजची ४ सामन्यातील कामगिरी - ४, २४, ३, २१, १ बळी
जडेजाची ४ सामन्यातील कामगिरी - ०, १२, ४ बळी, १ झेल

रोहीतने ४ सामन्यात एकूण ४५ धावा, धवनने ४३ व रैनाने ४१ धावा केल्या आहेत. या तिघांना भरपूर संधी दिलेली आहे. निदान उर्वरीत सामन्यासाठी तरी रहाणे, नेगी व हरभजनला संधी मिळावी. रोहितऐवजी रहाणे नक्कीच हवा. विंडीज फिरकीसमोर नीट खेळत नसल्याने रैनाऐवजी पवन नेगी येऊ शकतो. तो फलंदाजीही बर्‍यापैकी करू शकतो.

रोहितऐवजी रहाणे नक्कीच हवा.

हे बोलल्यावर आता कसं बरं बरं वाटलं असेल नाही? (निदान मला तरी जुने श्रीगुरुजी परत आल्यामुळे बरं वाटलंच.)

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2016 - 12:43 pm | श्रीगुरुजी

हहपुवा

असं बरं वाटण्याची संधी रोहीत कायम देत असतो.

भाऊंचे भाऊ's picture

28 Mar 2016 - 6:03 pm | भाऊंचे भाऊ

जवळपास दिड दशकांपूर्वीच्या तेंडुलकरची आठवण झाली

श्रीगुरुजी's picture

28 Mar 2016 - 8:20 pm | श्रीगुरुजी

२००७ च्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारत पहिला सामना न्यूझीलंडकडून हरला होता. नंतर पाकड्यांना हरविले होते व नंतर उपांत्य फेरीत ऑसीजना हरविले होते.

यावेळी साधारण तशीच परिस्थिती आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2016 - 11:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल खुप दिवसानंतर सचिनची फटकेबाजी विसरता आली.
धन्स विराट. जबरा म्याच ओढलास.

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

28 Mar 2016 - 11:27 pm | बोका-ए-आझम

अशी फायनल व्हावी आणि आपण न्यूझीलंडकडून हरण्याचा सपाटा तिथेच थांबवावा अशी लई इच्छा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2016 - 11:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला आत्ताच तो विंडीजचा गेल स्वप्नात यायला लागला आहे. नेहराला लै बेक्कार धुनार आहे तो. सध्या नेहरा तर असं ग्राउंडवर वावरतोय जसा याने पाच पन्नास म्याच जिंकून दिल्या आहेत. धोनीला चक्क मार्गदर्शन करतांना दिसतो. बॉलरला मार्गदर्शन करतो, आणि सर्वात कळस म्हणजे क्षेत्ररक्षणही बॉलींग करतांना तो बदलू लागला आहे. तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी पहिल्याच ओव्हरीत धु धु धुतला. बॉलचा टप्पा कुठे टाकू हे त्याला समजत नव्हतं. च्यायला, आपल्याकडेहीकुठे लपवावं असं वाटणार्‍या खेळाडुला भले दिवस आले आहेत. तीच गत युवराजची. अजिबात काँफिडन्स नै, उगं बॉल खात राहतो. काल तो कधी एकदा बाद होतो असं मला झालं होतं. काल चक्क जिंकलो, यावर माझा विश्वास बसत नै ये अजून.

बाय द वे, वाट्सपवर मुंबैच्या कोणत्या ज्योतिष मंडळाचा अगदी परफेक्ट कोणकोणत्या सामन्यात विजयी होऊ त्याचं भविष्य फिरत आहे. सालं माझं खेळाडुवर नै पण त्या ज्योतिषांवर लै विश्वास बसला आहे. :)

-दिलीप बिरुटे

तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी पहिल्याच ओव्हरीत धु धु धुतला. बॉलचा टप्पा कुठे टाकू हे त्याला समजत नव्हतं. च्यायला, आपल्याकडेहीकुठे लपवावं असं वाटणार्‍या खेळाडुला भले दिवस आले आहेत.

नेहराने प्रत्येक ओवरला सरासरी पाच रन दिल्या. भारतीय आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही कडच्या बोलरमध्ये सर्वोत्तम. स्फोटक उस्मान खवाजाचा बळी त्यानेच मिळवला.

त्याला लपवा आणि कल्पना करा ऑस्ट्रेलियाने मग किती रन केले असते...

नाखु's picture

29 Mar 2016 - 9:13 am | नाखु

तूर्तास वासरात लंगडी गाय या न्यायापुरताच मेहरा आहे आणि बर्याचदा त्याच्या नावातला मे टंकन दोष होऊन मै असा होतो.

पंड्या त्या षटकाची पुण्याई आणि कैफ अजून विसरायला तयार नाही आणि त्याचा र्हास त्यानेच होऊ घातला आहे.

जडेजा नक्की कश्यासाठी संघात आहे याची पाहणी करायला सार्क परिषदच बोलवावी लागेल असे दिसते.

बाकी नंतर. सौंदाळा भाऊ या निमित्ताने मिपावर लिहू लागलेत हे पाहून बरे वाटले. श्री गुरुजी सध्या तरी या धाग्यावरून धगीकडे जाऊ नका.

क्यू आमच्या धाग्यावर येनेसे रोकतात हय?

नाखु's picture

29 Mar 2016 - 4:52 pm | नाखु

तिकडेच अडकून पडतात आणि या धाग्यावर धावफलक मंदावतो.

जाहीराती मार खातात ते वेगळेच.

DEADPOOL's picture

29 Mar 2016 - 4:55 pm | DEADPOOL

ओके

खाली धावफलक बघणारा नाखु अशी सही करा ;)

आणि कधीमधी चक्कर टाकायला परवानगी द्या, नाहीतर आमचा धावफलक अडकून पडतो ;)

नाखु's picture

30 Mar 2016 - 8:33 am | नाखु

पण जरा जाहीराती मोठ्या आणि या प्रकारच्या असतील तर धाग्या धाग्यानुसार जाहीरातींचे एक पॅकेज तयार करा.

तो धागा :सर्फ एक्सेल्,निरमा,घडी डिटर्जंट,पाटणकर काढा,कायमचूर्ण.
हा धागा : मौका मौका,डर के आगे जीत,मेन विल बी मेन,कच्चा आम.

जाहीराती पंखा नाखु

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2016 - 12:54 pm | श्रीगुरुजी

तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी पहिल्याच ओव्हरीत धु धु धुतला. बॉलचा टप्पा कुठे टाकू हे त्याला समजत नव्हतं. च्यायला, आपल्याकडेहीकुठे लपवावं असं वाटणार्‍या खेळाडुला भले दिवस आले आहेत.

काहीतरी गैरसमज झालेला दिसतो.

नेहराची एकूण कामगिरी ४-०-२०-१ इतकी उत्तम होती. त्याने डावाचे पहिले षटक टाकले व त्यात फक्त ४ धावा दिल्या. दुसरे षटक बुमराहने टाकले व त्यात त्याने १७ धावा दिल्या. तिसरे षटक परत नेहराने टाकले व त्यात त्याने १० धावा दिल्या. पॉवरप्लेमध्ये एका षटकात १० धावा म्हणजे खूप जास्त नाही. ४ थे षटक अश्विनने टाकले व त्यात त्याने २२ धावा दिल्या. ऑसीजने पहिल्या ४ षटकात ५३ धावा केल्या होत्या. त्यात नेहरूच्या २ षटकात फक्त १४ धावा होत्या. ५ वे षटक पुन्हा नेहरूने टाकले व त्यात फक्त २ धावा दिल्या. म्हणजे पॉवरप्लेच्या ६ पैकी ३ षटके नेहरूने टाकली व त्यात त्याने फक्त १६ धावा दिल्या. नंतर परत आल्यावर ४ थ्या षटकातही त्याने फक्त ४ धावा देऊन १ बळी मिळविला.

नेहरूने एकूण ४ षटकात फक्त २० धावा देऊन एक बळी घेतला. त्या सामन्यात एकूण ६ गोलंदाजांपैकी नेहरू सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज होता. त्याखालोखाल युवराज होता (३-०-१९-१).

बेकार तरुण's picture

29 Mar 2016 - 1:59 pm | बेकार तरुण

बरोबर आहे गुरुजी
ह्या सीरीज मधे नेहरा चांगली गोलंदाजी करत आहे, वादच नाही.
तरीही ३५ - ३६ व्या वर्षी कमबॅक करणं नक्कीच सोपं नाह/, तेही मधले काही वर्ष ईंटरनॅशनल क्रिकेटसाठी विचार पण न केला गेलेला खेळाडु असताना !
पण का कोणजाणे, तो कधीच भरवश्याचा वाटत नाही!!

युवी च्या जागी मनिष पांडे हे लॉजिक काही कळत नाही. पण बहुधा १५ च्या संघात म्हणुन बोलवला असावा. आणि रहाणेलाच खेळायला संधी मिळावी ही एक क्रिकेटप्रेमी म्हणुन अधिक आणि एक मराठी माणुस म्हणुन थोडीशी ईच्छा :)
गेल च काही सांगता येत नाही, त्याचा दिवस असेल तर तो कोणालाही फोडुन काढतो, आणि नसेल तर कोणालाही फार त्रास न देता तंबुत परत येतो (डावखुरा विरु???). गुरुवारी त्याचा दिवस नसावा अशी अपेक्षा :)

त्यातून तो आता १४० च्या आसपास वेगाने टाकतोय ,

"तरुण " असताना कसाबसा १३० पार करायचा .

रिवैटल चा डोस जास्ती झालाय बहुदा . पण तरीही. तो वासरात लंगडी गाय शहाणी सारखा प्रकार वाटतोय.
बुमरा योर्कर टाकू शकतो चांगले. पण ते तो फक्त शेवटच्या षटकातच का वापरतो हे त्यालाच माहित , पंड्या कैच्याकाय टाकतो. काहीच अर्थ नाही त्याच्या गोलंदाजीला , क्षेत्ररक्षण जबराट आहे त्याचं खरं.

राहिला अश्विन. हि सिरीज भारतात चालले म्हणून हा हि चाललाय.

राहणे सारखा फलंदाज बाहेर बसवून काय मिळतंय देव जाणे

नाही सर, अस काही होणार नाही ....
गेल जरी चांगला hitter असला तरी त्याच्या काही मर्यादा आहेत, ज्या धोनी exploit करेल.
गेल खूपच clumsy आहे, मागचा पाय जमिनीत गाडून batting करतो. त्याचा "wait n watch" game असतो. त्याच्या comfort zone मधले गोलंदाज(फिरकी) शोधतो आणि धुलाई करतो.
माझ्या अंदाज नुसार बुमरा/अश्विन/नेहरा हे गेल ला रोखू शकतील.
गेल जडेजा आणि युवी ची धुलाई करू शकतो, ह्यांना गेल समोर आणणे म्हणजे वाघा समोर शेळी सोडण्या सारखं आहे.

viraj thale's picture

29 Mar 2016 - 1:30 pm | viraj thale

जखमी युवराज च्या जागी पांडे येणार म्हणजे रहाणे ला चान्स नाहीच .

राहूल.'s picture

29 Mar 2016 - 3:57 pm | राहूल.

सगळ्यांनीच कशाला चांगल खेळायला हव या विचाराने संघ चालला आहे . बाकीचे येणा-या सामन्यांमधे चांगले खेळतील . आणि तेही नाही जमल तर IPL आहेच की , तिथ बघा कसा सगळ्यांना सूर सापडतो आहे .

रेदिफ वर सारखे सांगतायत की कायद्यानुसार अपडेट्स थोडे उशिरा दिले जात आहेत. हे थोडे म्हणजे किती उशिरा असतं?

अद्द्या's picture

30 Mar 2016 - 10:02 pm | अद्द्या

2-5 minit

भाते's picture

31 Mar 2016 - 9:33 am | भाते

स्पॉट फिक्सिंग / बेटिंग रोखण्यासाठी कायद्यानुसार अपडेट १ बॉल उशिरा दिल्या जातात असे मागे इएसपीएन क्रिक इन्फोवर वाचल्याचे आठवते.

बीसीसीआयने बंदी घातली आहे. 'लाईव्ह' अपडेट्स्/क्षणचित्रे फक्त त्यांनी परवाना दिलेल्या वाहिन्यांवर मिळावेत म्हणून. टीव्हीवरील बातम्यांमध्ये सुद्धा फक्त फोटो दाखवले जातात.

मोहनराव's picture

30 Mar 2016 - 8:41 pm | मोहनराव

New Zealand 153/8
१० ओव्हरपर्यत चांगले खेळ्त होते.

जव्हेरगंज's picture

30 Mar 2016 - 9:33 pm | जव्हेरगंज

तो रॉय धू धू धूतोय.
फायनलात इंग्लंडच गाठ हाय म्हणायचं आपल्याशी !

शाम भागवत's picture

30 Mar 2016 - 9:49 pm | शाम भागवत

फिरकी चालू झाली नी.... चक्क हॅट ट्रिक

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2016 - 10:19 pm | श्रीगुरुजी

शेवटी इंग्लंड सहज जिंकले. किवीजची १० षटकात १ बाद ८९ अशी मजबूत स्थिती होती. परंतु त्यांची मधली फळी पूर्ण अपयशी ठरल्याने उर्वरीत १० षटकात तब्बल ७ गडी गमावून जेमतेम ६४ धावा झाल्या. या खेळपट्टीवर १५३ धावा पुरेश्या नव्हत्या. खरं तर १८० धावा सुद्धा पुरेश्या ठरल्या नसत्या. इंग्लंडला रॉय आणि हेल्स ही सलामीची चांगली जोडी मिळाली आहे. नंतर जो रूट व बटलर आहेतच. त्याव्यतिरिक्त मोईन अली व बेन स्टोक्स हे देखील चांगले फलंदाज आहेत. कप्तान मॉर्गन अपयशी आहे. परंतु इतर १० जण चांगले खेळत आहेत.

आपण अंतिम फेरीत आलो तर इंग्लंड आपल्याला नक्कीच जड जाईल. मी सुरवातीला इंग्लंडला खिजगणतीतही धरत नव्हतो. परंतु उत्तम सांघिक खेळामुळे ते अंतिम फेरीत पोहोचले आहेत.

किवीज हरल्यामुळे वाईट वाटले. परंतु सर्वोत्तम खेळ करणारा संघच जिंकतो व आज इंग्लडने सर्व आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ केला.

abpnews.abplive.in/sports/rahane-and-pandey-will-play-semi-final-for-team-india-351118/

बेकार तरुण's picture

31 Mar 2016 - 7:35 am | बेकार तरुण

कचराच केला काल किवीजचा !!!
रॉस टेलर एके काळी उत्तर फलंदाजांच्या यादीत यायचा, पण आता त्याचा अगदीच शिखर धवन झाला आहे असं वाटतं आहे !! भरवश्याचा असा अजिबात राहिलेला नाही ! २०११ वर्ल्ड कप (नक्की ना?) मधे पाकींना धुवुन काढलेलं शेवटच आठवत आहे त्यानी, नंतर बहुतेक तरि काहीच खेळलेला नाही उल्लेखनीय

आज होप सो आपण विंडीजना हरवु, रच्याकने - पोलार्ड का खेळत नाहिये? (जखमी आहे का नेहमीचीच भांडणे??)

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2016 - 11:19 am | श्रीगुरुजी

रॉस टेलरला काही वर्षांपूर्वी कप्तानपदावरून हटविल्यापासून तो रुसलेलाच आहे. त्या रूसव्याचा त्याच्या खेळावर परीणाम झाला आहे. त्याच्याकडे कसोटीचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले होते. परंतु एकदिवसीय सामन्यांसाठी मॅकलमला कर्णधार केल्यावर तो रागारागाने विंडीजच्या दौर्‍यावर गेलाच नाही व त्याने कसोटी कर्णधारपद देखील नाकारले.

डिसेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात त्याने २९० धावांची जबरदस्त खेळी खेळली होती. त्यानंतर तो बहुतेक सर्व सामन्यात अपयशी आहे. तो अत्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. पण सध्या मैदानावर तो अत्यंत निरूत्साही दिसतो. त्याचा खेळ एकेकाळी मला खूप आवडायचा. आता त्याची अवस्था बघवत नाही.

२००१ च्या विश्वचषकात पाकड्यांविरूद्ध न्यूझीलंडची अवस्था ४६ षटकात २१० अशी फारशी चांगली नव्हती. पण शेवटच्या ४ षटकात त्याने साऊदीला हाताशी घेऊन तब्बल ९५ धावा चोपल्या होत्या. त्यात उमर गुलची प्रचंड धुलाई झाली होती. असा डाव तो नंतर क्वचितच खेळताना दिसला.

तो बहुतेक लवकरच निवृत्त होईल असे वाटते.

>>> आज होप सो आपण विंडीजना हरवु, रच्याकने - पोलार्ड का खेळत नाहिये? (जखमी आहे का नेहमीचीच भांडणे??)

पोलार्ड, मलिंगा इ. मंडळी आयपीएल साठी स्वतःला तंदुरूस्त ठेवत आहेत. म्हणूनच ते या स्पर्धेत खेळत नाहीत. चुकुनमाकुन या स्पर्धेत खेळताना जखमी झाले तर आयपीएल बुडायचे. म्हणून आजारी असल्याचा बहाणा करून ते स्पर्धेच्या बाहेर आहेत.

बेकार तरुण's picture

31 Mar 2016 - 11:27 am | बेकार तरुण

ओह ओके
हापुसचे आंबे आहेत म्हणजे पोलार्ड आणि मलिंगा. एप्रिल आणि मे मधे फक्त फळणार, बाकी दहा महिने नाही!!

असल्या लोकांचा रागहि येतो, पण एवढा पैसा मिळत असेल तर आपण स्वतः कसे वागलो असतो हे ठरवणेहि मुश्कीलच आहे !!!
कारण माझ्या माहितीनुसार लंकेच्या खेळाडुंना मागील काही वर्षापासुनचे वेतन मिळाले नव्हते आणि विंडीज बद्दल तर बोलायलाच नको !

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2016 - 11:36 am | श्रीगुरुजी

तेही बरोबर आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते खूप काही चुकीचे करीत आहेत असे म्हणता येणार नाही. कायदेशीर मार्गाने पैसा मिळत असेल तर तो का नाकारावा? भारताचा मुष्टीयोद्धा विजेंद्रकुमारही आता व्यावसायिक खेळाडू बनला आहे. त्यामुळे तो २०१६ च्या ऑलिम्पिक मध्ये नसेल. तसाच विचार पोलार्ड व मलिंगाही करत असणार.

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2016 - 11:21 am | श्रीगुरुजी

ट-२० विश्वचषक स्पर्धेत प्रथमच कोणत्यातरी एका संघाला दुसर्‍यांदा विश्वकरंडक उचाविण्याची संधी आहे. इंग्लंडचा कालचा खेळ बघून यावेळी बहुतेक इंग्लंड विजयी होतील असं वाटत आहे.

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2016 - 6:52 pm | श्रीगुरुजी

विंडीजविरूद्ध आपली प्रथम फलंदाजी आहे. विंडीज पाठलाग करणार असल्याने किमान २०० धावा तरी हव्यात. धवनच्या जागी रहाणे व युवराजच्या जागी मनीष पांडे आत आलाय. मला सारखं असं फीलिंग येतंय की अंतिम सामना विंडीज व इंग्लंड यांच्यात होऊन इंग्लंड जिंकेल.

बघूया काय होतंय ते.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

31 Mar 2016 - 7:00 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

. मला सारखं असं फीलिंग येतंय की अंतिम सामना विंडीज व इंग्लंड यांच्यात होऊन इंग्लंड जिंकेल.

तुमच्या तोंडात शेपूचा रस

प्रदीप साळुंखे's picture

31 Mar 2016 - 9:55 pm | प्रदीप साळुंखे

काय राव गुर्जी!!
धागाकर्तेच नकारात्मक बोलत असतील तर आम्ही काय करावे ब्रे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2016 - 7:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

३५-० पाच ओव्हर्स. धवन आणि युवी ला बसवलं मला खुप आनन्द झाला. १९० होतीलच. फ्री हिट वर सिक्स काय अफलातून मारलाय रोहितने . क्लास.

दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2016 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेली विकेट.७६/१. जम बसलेला खेळाडू lbw व्हावा हे मला पटत नाही. चेंडूवर नजर बसलेली असते तसाही चेंडू टप्पा पडल्यावर लेगला जात होता फेव्हर मध्ये द्यायला पाहिजे होतं डिसिजन. .

नाऊ विराट :) वाचला रन आऊट होता होता. दोन्हीकडून वाचला. अरे फोकलच्या हो तुमच्यावर भरवसा आहे. भाऊ जास्त आक्रमक पणा नको दाखवू.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2016 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेली विकेट.७६/१. जम बसलेला खेळाडू lbw व्हावा हे मला पटत नाही. चेंडूवर नजर बसलेली असते तसाही चेंडू टप्पा पडल्यावर लेगला जात होता फेव्हर मध्ये द्यायला पाहिजे होतं डिसिजन. .

नाऊ विराट :) वाचला रन आऊट होता होता. दोन्हीकडून वाचला. अरे फोकलच्या हो तुमच्यावर भरवसा आहे. भाऊ जास्त आक्रमक पणा नको दाखवू.

शेवटच्या १० ओव्हर्स राहिल्या १०० अपेक्षित.

-दिलीप बिरुटे

viraj thale's picture

31 Mar 2016 - 7:36 pm | viraj thale

भारत -205 वेस्ट इंडीज-178 all out

दिग्विजय भोसले's picture

31 Mar 2016 - 7:49 pm | दिग्विजय भोसले

हे काय???????

viraj thale's picture

31 Mar 2016 - 8:09 pm | viraj thale

prediction

राघवेंद्र's picture

31 Mar 2016 - 8:42 pm | राघवेंद्र

थोडक्यात चुकले.

viraj thale's picture

31 Mar 2016 - 9:28 pm | viraj thale

माझे prediction चूकले असले तरी ट्विटर वर असलेल्य @aslamkhantanoli या माणसाने भारताचा स्कोर 192 परफेक्ट सांगितला होता तोही सामना सुरू होण्याच्या चार तास आधी .

दिग्विजय भोसले's picture

31 Mar 2016 - 7:52 pm | दिग्विजय भोसले

बॅटिंग पिच आहे,त्यामुळे थोडी चिंता वाटत आहे,त्यांचे 9 जण बॅटिंग करतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2016 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेल आणि स्यामुल गेले लवकर बाद झाले पाहिजे तर सामना आपला. सुरुवात ते हानामारीने करतील आणि भारतीय तंबूत घबराट उडवतील असे वाटते.

-दिलीप बिरुटे

दिग्विजय भोसले's picture

31 Mar 2016 - 9:03 pm | दिग्विजय भोसले

हे धतडततडधतडततड
बुमराहनं गेलला केलं गुमराह!!!!

राघवेंद्र's picture

31 Mar 2016 - 9:14 pm | राघवेंद्र

धतडततडधतडततड

जव्हेरगंज's picture

31 Mar 2016 - 9:23 pm | जव्हेरगंज

ते गेलं आलं
आन आल्या आल्या गेलं

जिकलीच कि रे!

विंढीज १००च्या आत गाश्या गुंढाळणार !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2016 - 9:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो आता जिंकलो असं म्हणू या. लेकिन क्रिकेट मे भविष्यवानी करना.....

हा फोकलीचा सिमन्स किती झुंजनार आहे ?

-दिलीप बिरुटे

प्रदीप साळुंखे's picture

31 Mar 2016 - 9:53 pm | प्रदीप साळुंखे

घाई करू नये!
104/2 --- 12 ओवर्स
जोडी चांगली जमलीये,विकेटांची आवश्यकता आहे,नायतर काय खरं नाय,धागा आजच गुंडाळावा लागेल:'(

पक्षी's picture

1 Apr 2016 - 11:41 am | पक्षी

धागा आजच गुंडाळावा लागेल:'(

गुंडाळा धागा आता -:(

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

31 Mar 2016 - 9:59 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

अरे व्वा कोहलीने विकेट घेतली,
पण धोका अजून नाॅट टळींग!
ऑलआऊट करणं गरजेचं!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2016 - 10:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोपा म्याच अवघड होत चालला आहे. गेल लवकर बाद झाला पण चार्ल्स आणि सिमन्स यांनी भारतीयाचे तोंडचे पाणी पळवले होते बदली विराट ने चार्ल्स ची विकेट घेतली आणि म्याच परत आणला असे वाटते

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

31 Mar 2016 - 10:07 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

हे आवाज वाढव नो बाॅल तुज्या आईची!!!

viraj thale's picture

31 Mar 2016 - 10:08 pm | viraj thale

तुझ्या ...