कंटाळा आल्यावर काय करावे ?

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
11 Mar 2016 - 2:31 pm
गाभा: 

कंटाळा आल्यावर काय करावे ?

ऑफीसात बसुन कंटाळा आल्यावर काय करावे हा एक गहन प्रश्न आहे. ऑफिसात इतर साईट उघडणे धोकादायक ठरु शकते . ( मिसळपाव आजवर कसे बॅन झाले नाही हेच आश्चर्य आहे. ) शिवाय सारखे सारखे काँपुटर पाहुन डोळ्यांना त्रास होतो. मग क्यॅन्टीन मधे गेलो तरी तिथे ही डोळ्यांना त्रास होतो शिवाय विनाकारण चहा कॉफी पिली जाते , तातुन एक्स्ट्रा सुगर कन्झुम केली जाते त्याने त्रास होतो तो निराळाच. क्यॅरम खेळत बसलो कि ज्युनियर वर राँग इम्प्रेशन पडते . मेन लॉबीत पेपर वाचत बसलो तर समोरची रिशेस्पशनिस्ट 'काय काम नाही का आज' ह्या अविर्भावात बघत रहाते. बरं ऑफीसातुन बाहेर पडुन चहा सिगरेट मारावी तर बाहेर उन्हाळा सुरु झाल्याने परत त्याचा त्रास होतो.

अशावेळी ऑफीसात कंटाळा आल्यावर काय करावे ?

----
अवांतरः जास्त लिव्हवत नाही , लिहायचा कंटाळा आला .

प्रतिक्रिया

सतिश पाटील's picture

11 Mar 2016 - 2:35 pm | सतिश पाटील

हापिसातल्या हिरवळीवर लक्ष ठुवा.डोळे गार हुतील.
त्यांना च्या कॉपीला इचारा.

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 2:52 pm | प्रसाद गोडबोले

ऑफीसात ज्युनियरशी फ्लर्ट करायचे नाही असा आमचा एक सोपा नियम आहे आणि ह्या नियमामुळे हा ऑप्शन कटाप होतो :(

बहुतेक सगळेच जण हा नियम पाळत असल्याने तुमचा टाइमपास होत नसावा. ;)

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 3:06 pm | प्रसाद गोडबोले

सगळेच नाहीत पाळत ... हळुच गुपचुप ऑफीसातुन बाहेर पडौन समोरच्या सी सी डी मध्ये जाणारी प्रेमपाखरे ( मराठीत लव्हबर्ड्स) पाहिली की आम्हाला आमच्या ह्या नियमाचा लय राग येतो , पण करणार काय , नियम तो नियम !

ल्ल्ल्लूऊऊऊऊउ

प्रसाद१९७१'s picture

11 Mar 2016 - 4:17 pm | प्रसाद१९७१

ऑफीसात ज्युनियरशी फ्लर्ट करायचे नाही असा आमचा एक सोपा नियम आहे

मग सिनियर्स शी फ्लर्ट करा.

मंग त्यांना शिनियर शी फ्लर्ट करायला उत्तेजित करा :P

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 5:38 pm | प्रसाद गोडबोले

ह्म्म ...

सस्नेह's picture

11 Mar 2016 - 2:38 pm | सस्नेह

या वरच्या कामांसाठी तुमाला हापिसात पगार मिळतो ???
ग्रेट !

मम्बाजी सर्वज्ञ's picture

11 Mar 2016 - 3:50 pm | मम्बाजी सर्वज्ञ

विषयांतर होतंय पण तरीसुद्धा - आय टी (किवा परकीय चलन आणणाऱ्या कुठल्याही व्यवसाय) तल्या नोकरीतला पगार हा तिथे केलेल्या कामाचा 'मोबदला' आहे असा तुमचा समाज असेल तर तो चुकीचा आहे. काम असेल तेवा पगाराच्या दसपट असते आणि नसेल तेवा 'उद्योगी' डोक्याला लगाम घालावा लागतो.

होबासराव's picture

11 Mar 2016 - 2:48 pm | होबासराव

निराकारता कशि साध्य होइल हे बघावे, एकदा का तुम्हाला स्व गवसला कि मग "आनंदाचे डोहि आनंद तरंग" चा प्रत्यय येइल आणि मग कसला कंटाळा अन कसल काय.

मर्द बननेका इतना शौक है तो कुत्तोंका सहारा लेना छोड दे कात्या
.
.
.
.
.
असले १५-२० क्रियेटीव्ह डॉयलॉग एका कागदावर लिहून ते फाइल करावेत. छान वेळ जातो.
कुणाला उद्देशून लिव्हायचे याचा गंभीर विचार केल्यास जास्त टाइमपास होतो.
अजून ३५ हजार आयडीया आहेत. देईन वेळ मिळाल्यास. (आम्हाला बसून पगार मिळत नाही. जळजळ वगैरे म्हणनार्‍यांनी वाकड फाटा गाठावा)

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 2:57 pm | प्रसाद गोडबोले

लिहायचाही कंटाळा आलाय अभ्या राव नाहीतर आम्हीही चतु:शृंगीच्या मदीरात गुद्दे अन चिमकुटे वगैरे लिहित बसलो असतो कि !!

अभ्या..'s picture

11 Mar 2016 - 3:13 pm | अभ्या..

फोन अलाउड असेल तर टेलिमार्केटींगची कामे घ्यावीत.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Mar 2016 - 6:16 pm | अत्रुप्त आत्मा

कशाला ???
त्यापेक्षा 4/5 टनाटनी ग्रन्थ घेऊन त्याचे उपयुक्त अन्वयार्थ लावत बसा
तेव्हढाच होईल त्या निमित्तानि मुलातल्या घुबडाचा ससा! http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-023.gif

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले

म्हणजे गणु चा ससा होईल आणि सरु चे काय ? कासव???

अत्रुप्त आत्मा's picture

11 Mar 2016 - 6:31 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या! ते टुमचं कपटी हिन्दू औरँगजेबी मण काहिहि करु शकेल याची ग्यारेन्टी हायेच!

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 6:33 pm | प्रसाद गोडबोले

पण कासवच केलेले बरे म्हणजे त्यांच्यात शर्यत लावता येईल :

(गणु)ससा तो ससा की कापुस जसा, त्याने (सरु)कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धावु अन (चतु:शृंगी)डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली =))

हो रे गिर्जाकाका, स्वघोषित धर्मसुधारक होण्यापेक्षा हे असलं बरं!!

मन१'s picture

11 Mar 2016 - 2:55 pm | मन१

हे आमचं कंटाळ्याबद्दलचं काही :-
http://www.misalpav.com/node/26923

अनुप७१८१'s picture

11 Mar 2016 - 2:58 pm | अनुप७१८१

केन्डी क्रश खेळावे

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 2:58 pm | प्रसाद गोडबोले

क्यँन्डीक्रश खेळुन संपवले :(

वेल्लाभट's picture

11 Mar 2016 - 3:29 pm | वेल्लाभट

अवर्‍या क्यांड्या खाल्यात! बाब्बो

नीलमोहर's picture

11 Mar 2016 - 4:00 pm | नीलमोहर

मला पण आवडतं क्यांड्या खायला, पण आईसवाल्या..
त्यापेक्षा देऊळी धावायला जास्त आवडतं.

नाव आडनाव's picture

11 Mar 2016 - 2:58 pm | नाव आडनाव

मीटिंग. सगळे कंटाळलेले / झोपाळलेले / वैतागलेले तिथेच असतात :)

प्रचेतस's picture

11 Mar 2016 - 3:01 pm | प्रचेतस

उगाच इकडे तिकडे हिंडून लोकांना 'ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊउ' करून यावे.

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 3:07 pm | प्रसाद गोडबोले

तुमचे ऑफीस शेजारीच आहे , एकदा तुमच्या ऑफीसात घुसुन तुम्हालाच ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ करायचा मानस आहे !

नाखु's picture

11 Mar 2016 - 3:12 pm | नाखु

जाग्यावर आल्यावर काय करावे ब्रे.....

तुम्ही कंटाळा आल्यावर काय करता ? असा काकु टाकल्यास काही "हाती" गवसेल असे वाटते अन्यथा सगळ्या मनच्या बाता काय ?????.

रच्याकाने : एखादे कंटाळामुक्ती स्त्रोत्र, गेलाबाजार तुष्टीयज्ञ का करवून घेत नाहीस हाफीसात, तुझ्यासारखे समदु:ख्खी असतीलच की तेव्हढंच वाढीव पुण्य !!!!

वरील प्रतिसादात अनुक्रमे
काकु म्हणजे:काथ्याकुट
हाती म्हणजे :अंतीम सत्य
मन म्हणजे आयडी नव्हे
वाढीव म्हणजे अतिरिक्त्/जास्तीचा.

कुठलीही अस्मिता दुखावू नये म्हणून बाळबोध नाखु

उगाच इकडे तिकडे हिंडून लोकांना 'ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊउ' करून यावे.

=))ख्याक

यसवायजी's picture

11 Mar 2016 - 4:48 pm | यसवायजी

लोल. रोफ्ल. :))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Mar 2016 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) खपलो.

नीलमोहर's picture

11 Mar 2016 - 3:01 pm | नीलमोहर

तुम्हाला हापिसात खालील आणि इतरही सोयी उपलब्ध आहेत, तरीही म्हणता कंटाळा घालवायची सोय नाही.

१. तुम्ही कॅन्टीनमध्ये जाऊ शकता
२. कॅरम खेळू शकता
३. पेपर वाचू शकता
४. ऑफिसच्या वेळेत बाहेर चक्कर मारून येऊ शकता.

ज्या लोकांना आपली खुर्ची आणि पीसी सोडून इतर काही करण्याची सोय नाही त्यांनी काय म्हणावे.
बादवे बाकी सर्व आहे तुमच्याकडे मग आरामात ताणून देण्याचीही सोय असेल, लोळायचं मस्त..

अशावेळेस मी तंद्री लावून डे-ड्रिमींग मध्ये हरवून जाते.. physically present mentally absent..
मज्जा येते :)

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 3:04 pm | प्रसाद गोडबोले

डे-ड्रिमींग >>>

अरेरे ,

आता काय सांगु नीमो , ऑफीसात चांगली स्वप्ने पडत नाहीत , केवळ शोकांतिकाच दिसतात स्वप्नात :(

नीलमोहर's picture

11 Mar 2016 - 3:45 pm | नीलमोहर

तुमचा तुमच्या मनावर ताबा नाही, तुम्हास 'स्व' गवसलेला नाही.
स्व गवसलेल्या माणसाचे विचार असे यत्र तत्र भरकटत नाहीत, तो भरकटलेलं मन आणि विचार एकसंध करून, ठाम निश्चय आणि ध्यान प्रक्रियेद्वारे आपल्याला पहिजे तशी 'गो ड गो ड' स्वप्नं अंतः चक्षूंद्वारे थेट प्रक्षेपण करून पाहू शकतो ;)

नाखु's picture

11 Mar 2016 - 3:47 pm | नाखु

ऑफीसात चांगली स्वप्ने पडत नाहीत , केवळ शोकांतिकाच दिसतात स्वप्नात :(
म्हणून लगेच हाफीस बदलू नका जरा धीर धरा अच्छे दिन येतील तुमचेही लवकरच !!!

एस's picture

11 Mar 2016 - 3:12 pm | एस

धागे काढायचे.

गणामास्तर's picture

11 Mar 2016 - 3:13 pm | गणामास्तर

खिडकीतून दिसणाऱ्या ब्लुरीज मधल्या इमारतींचे मजले मोजा. चांगला टाईमपास होतो :)

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 5:41 pm | प्रसाद गोडबोले

झाले मोजुन :( २२ की २४ मजले आहेत . त्यातल्या एकेका घराची किंमत ९० लाख ते २-३ कोटीच्या घरात आहे आणि तरीही लोकं ते विकत घेवु शकतात , आपण कधी घेवु शकणार ह्या विचाराने आम्हाला फार गहिवरुन येते ...

सुंदर चेहरे नाहीत का आसपास?

असल्यास त्राटक आणि नसल्यास भश्रिका आणि कपालभाती करावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Mar 2016 - 7:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुन्दर चेहरे आपपाल्या मित्रांना फोन करून 'अरे ऑफिसात लै कंटाळा आला रे, नोकरी सोडून दूर कुठेतरी जावं असं वाटतं रे, अगदी तुझ्यासोबत सुद्धा बोलावं वाटत नाही रे, जग सोडून दुस-या ग्रहावर जावं, निर्जन बेटावर जावं, मी थोड़ा वेळ शांत बसते असं म्हणून फोन ठेवतात. म्हणजे मित्राने यांना लगेच फोन करावा म्हणून ते सुन्दर चेहरे नाटकं रचत असतात. :)

-दिलीप बिरुटे

होबासराव's picture

11 Mar 2016 - 7:34 pm | होबासराव

आमच्या हापिसातले काहि सुन्दर चेहरे कॉल करुन बोलायचि एव्हढि तसदि घेत नाहित्...ते फक्त मिस कॉल देतात आपपाल्या मित्रांना....बास मग २ तास काहि घोर नाहि ;)

बेकार तरुण's picture

11 Mar 2016 - 3:20 pm | बेकार तरुण

मिपा ओपन होतं म्हणता आणी तरी कंटाळा येतो हेही म्हणता !
ऐकावं ते नवलच !!

बरेच उपाय आहेत करण्यासारखे
रिकाम्या वेळात एकादष्ण्या सांगत जाणे
नवीन आलेल्या पात्रांना हात बघून भविष्य सांगणे(जास्त वेळ धरु नये अवलक्षण कॅटेगरीत जाल)
उगाच राग येतो अशा लोकांना खडू मारून हैराण करणे
घरची भाजी हापिसात नेऊन निवडणे
लोकरीचे बूट मोजे विणणे आणि लोकांना घालून दाखवणे
कलिंगड कापण्याचे सुशोभित नमुने तयार करणे
ब्रेक अप झालेल्यांना होलसेलमध्ये टिशु पेपर पुरवणे
डु आय डी घेऊन हापिसातल्या लोकांना मयतरी करणार का मेल करणे
नमाजसाठी टोप्या विणून विकून औरंगजेबपणा करणे

वेल्लाभट's picture

11 Mar 2016 - 3:30 pm | वेल्लाभट

धागे काढा...
साहित्याचे किंवा मग रुमालाचे, मोज्याचे वगैरे.

नीलमोहर's picture

11 Mar 2016 - 3:49 pm | नीलमोहर

ते बसून मोज्याचा एकेक धागा काढताहेत असे इमॅजिन केले ना मी ;)

ते बसून मोज्याचा एकेक धागा काढताहेत असे इमॅजिन केले ना मी ;)

एक राँबर्ट, एक काळी मावशी, एक मेरी, एक लॅब्ररी अजून काय काय असे ना?

राजो's picture

11 Mar 2016 - 4:06 pm | राजो

राँर्बट आहे ते

बरोबर लिहिले तर मोजी माझा डूआयडी आहे म्हणायला कमी करणार नाहीत. ;)

किंवा मग धागे विणायला शिका...क्रोशा, दोन सुयांवरचं, तीन सुयांवरचं विणकाम =))

वेल्लाभट's picture

11 Mar 2016 - 6:21 pm | वेल्लाभट

एक उलट दोन सुलट
मग दोन सुलट तीन उलट
फुल कन्फ्हूज्झ

करियर ला सपोर्ट करतील असा काही अभ्यास करावा , तुतोरीअल्स बघाव्यात.
एरवी वेळ मिळत नाही, पण हा वेळ उगाच वाया घालवू नये

अभ्या..'s picture

11 Mar 2016 - 3:54 pm | अभ्या..

तुतोरीअल्स

अगागागागागागा
एक पितळी तुतारी घ्यावी.
त्याची दोन्ही तोंडे धुवून घ्यावी.
वाळल्यावर मावळ्याचा ड्रेस चढवावा.
छाती श्वासाने गच्च भरुन घ्यावी
एक पाऊल पुढे
दुसरे थोडे वक्र
तुतारी उंचवावी.
.
.
.
.
हे डोळ्यासमोर दिसायले ना भौ. :)

स्पा's picture

11 Mar 2016 - 3:55 pm | स्पा

लोउल

मन१'s picture

11 Mar 2016 - 3:54 pm | मन१

नेमकं!

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 5:43 pm | प्रसाद गोडबोले

हे खरे आहे, कोर्सेरावर काही कोर्स केले , अत्ता कंटाळा म्हणजे निव्वळ लेथार्जी आलेली असल्यावर तेही नको वाटते.

मराठी कथालेखक's picture

11 Mar 2016 - 4:19 pm | मराठी कथालेखक

स्केचेस काढा
गणिताची आवड असेल तर कागद पेन घेवून कोडी सोडवा (हवं तर कोड्यांकरिता एक धागा काढा मिपावर, मजा येईल)
मग पुन्हा असली टाइमपास कोडी सोडवायसाठी तुमच्या आवडत्या लँग्वेजमध्ये कोड लिहा.
शेअर मार्केट बघत रहा
पार्किंगमध्ये जावून आपली गाडी पुसून काढा (घरातून निघताना घाईगडबडीत पुसलेली नसेलच !!)
आवडीची पुस्तकं आणून वाचा : म्हणजे कथा कादंबर्‍या नव्हेत पण एखाद्या विषयाची , उदा: फिजिक्स, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स ई. शिक्षण घेत असताना एखादा तरी विषय खूप आवडीचा असेलच ना, पुन्हा त्याच विषयाची पुस्तक वाचा मजा येईल. अशा पुस्तकांबद्दल कुणी काही बोलूही शकणार नाही.

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 5:54 pm | प्रसाद गोडबोले

पार्किंगमध्ये जावून आपली गाडी पुसून काढा (घरातून निघताना घाईगडबडीत पुसलेली नसेलच !!)

ह्म्म , गुड आयडीया ! लगेच जाऊन गाडी पुसुन येतो !

नीलमोहर's picture

11 Mar 2016 - 4:31 pm | नीलमोहर

रिकामा वेळ असतो तेव्हा मी हापिसात खूप वाचन करते, लेखन करते, संगीत ऐकते, अगदी चिंतन मनन ही करते,
(आता तुम्ही म्हणाल कामाशी रिलेटेड काहीच करत नाही का तर ते कायम सुरू असतेच, हे त्याशिवायचे इतर :)
यामुळे मेंदूला चालना मिळते आणि मरगळलेलं मन फ्रेश, रिचार्ज होतं. शिक्षणात वाया घालवलेल्या अनेक वर्षांनी ते नाही शिकवलं जे मी गेल्या काही वर्षांत निव्वळ वाचन करून, ते आचरणात आणून शिकले, अगदी जगण्यासकट.

मिपावर आल्यापासून हापिसात वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडत नाही, लिहायची हौसही भागवली जाते, अल्प बुध्दित, ज्ञानात भर पडते ती वेगळीच, इथल्या अवली लोकांशी गप्पा मारता येतात.
मिपा वाळवंटातील ओअ‍ॅसिस सारखं आहे :)

मिपा, मायबोली आणि उपक्रम अशा संस्थळांवरच्या तुमच्या आवडीच्या लेखमाला वर्डमध्ये एकाखाली एक अशा पेस्ट करा. नंतर त्याच्या फॉरमॅटिंग किंवा रिअलाईनमेंटमध्ये भरपूर वेळ जातो. हवे तेंव्हा हवे ते वाचू शकता. अगदीच एखादी भन्नाट लेखमाला असेल तर PDF मध्ये कन्व्हर्ट करा आणि मोबाईलमध्ये साठवा. बसमध्ये, विमानात, कुठेही बसल्याबसल्या उघडून वाचता येते. (इंद्राज पवारांनी लिहिलेले माणेकशॉ, सोन्याबापूंची अकादमी, मनरावची लेहवारी, एक्का काकांचा पृथ्वीतलावरचा प्रवास अशा अनेक लेखमाला मी साठवलेल्या आहेत. "मोकलाया" साठवू नका कुठेही अचानक जोरात हसाल आणि अडचणीत याल.)

आणखी वेळ शिल्लक राहणार असेल तर गूगल इमेज वर जावून "चिंटू" सर्च करा आणि मिळतील ते सगळे चिंटू वर्डवर पेस्ट करून व त्याची सजावट करून पुस्तक तयार करा आणि भाचे / पुतणे कंपनीला खुश करा.

अशा कामात मजा येत असेल तर "happiness is.." अशीही एक सिरीज आहे, अमूलच्या अ‍ॅड आहेत, कॉपी करा, एकाखाली एक पेस्टवा, प्रिंट काढा. (तयार पुस्तके विकत मिळतात पण असे काहीतरी करण्याची मजा वेगळीच असते.)

मी-सौरभ's picture

11 Mar 2016 - 5:15 pm | मी-सौरभ

तुझ्या जवळच्या पीडीएफ पाठव की मला.

आळशी क्र. ६४४०
सौरभ

यशोधरा's picture

11 Mar 2016 - 4:42 pm | यशोधरा

तुमच्या ऑफिसात काम नसते? मज्जाच की!

स्पा's picture

11 Mar 2016 - 4:43 pm | स्पा

मध्ये आहेत ते असेच असते तिथे

हे आले, आयटीद्वेष्टे!!

यशोधरा's picture

11 Mar 2016 - 5:07 pm | यशोधरा

अच्चं झालं तर!

सूड's picture

11 Mar 2016 - 5:14 pm | सूड

=)) =))

बाळ सप्रे's picture

11 Mar 2016 - 4:43 pm | बाळ सप्रे

तुमच्या मॅनेजरला विचारा काय करु ते.. त्यालापण कंटाळा आला असल्यास त्याच्या मॅनेजरला विचारा.. त्यालापण कंटाळा आला असल्यास त्याच्या ............

मी-सौरभ's picture

11 Mar 2016 - 5:15 pm | मी-सौरभ

एच आर ला भेटा ;)

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 5:44 pm | प्रसाद गोडबोले

एच आर ने नुकताच आमचा के.एल.पी.डी केला असल्यानेच काम करण्यावरुन मण उडाले आहे ... दुत्त दुत्त एच आर .... ल्ल्ल्लूऊऊऊऊउ

आयला तुम्ही एचारसोबत काय करत होता म्हणे? =))

- आंजा वर भरपूर कोडी मिळतात. मध्यंतरी काही काम नव्हते तेव्हा मी आणि माझा मेंटर यांत स्पर्धा चालू होती जास्तीत जास्त कोडी सोडवायची.
- टायपिंग ट्युटर चा गेम खेळत बसायचं. टायपिंग चा वेगही वाढतो.
- स्टार वॉर्स बघा.
- आपल्या प्रणालीच्या महत्त्वाच्या फाइल्स उडवून द्याव्या. मग संगणक बंद पडतो. टेक सपोर्ट ला डोकं फोडताना बघायला मजा येते. तसेच सिस्टीम चे रिजोल्युशन फुल करून देखील सिस्टीम बंद पडता येईल.
- लोकांच्या संगणकाच्या माउस ला लेजर वर स्टीकर लाऊन ठेवा. १०-१५ मिनिटे वैतागलेले लोक आणि मग वैतागलेले टेक सपोर्ट पाहायला मजा येते. अधिक चांगला प्रकार म्हणजे माउस च्या लेजर वर मार्कर ने रंगवा.

जव्हेरगंज's picture

11 Mar 2016 - 7:22 pm | जव्हेरगंज

य क नं ब र !

ヾ(。>﹏<。)ノ゙✧*。

चांदणे संदीप's picture

11 Mar 2016 - 9:00 pm | चांदणे संदीप

बेक्कार हस्लो या आयडियांना!
"प्रतेक्ष अन्भव हीच खातरी" या धर्तीवर ऑफिसात गेल्या गेल्या हे क्रून पाहिल्या जाईल!
=))

Sandy

चौकटराजा's picture

11 Mar 2016 - 5:41 pm | चौकटराजा

अत्यंत स्लो प्रोसेस आहे ही पण वेळ मस्त जाईल. स्वतः च्या आत डोकावून पहा ... अहंकारावर विजय मिळवा.

देवाला बोर झालं म्हणून त्याने माणुस बनिवला अन त्यों अन माणूस पुन्हा बोर होउ लागले तवा त्याने इस्त्री बनीवली पण हायला ते तिघेबी ब्वारच होउ र्हाय्ले अन बाइमान्साने मुलं जन्माला घातली तर तिबी ब्वार होउन आख्खा संसार जन्माला आला तुमि आम्ही जन्मलो अन तेव्हांपासुन तुम्ही आम्ही अन देव अजुनही ब्वार होतच आहोत यावर कोणताही उपाय नाय :(:(

मचाक वाचावे आणि जमल्यास 'माझे मचाकविश्व' नामक मालिका लिहिण्यास हाती घ्यावी.

मचाककथा लिहील्यास आम्हाला मेल करावी, आमचे अकाँट नाही तिथे..

मराठी कथालेखक's picture

11 Mar 2016 - 6:28 pm | मराठी कथालेखक

खूप मिपाकर हिंजवडीतले (म्हणजे हिंजवडीतील कार्यालयांत काम्/टीपी करणारे) दिसतात. एक धावता हिंजवडी कट्टा होवू शकतो...काय म्हणता ?

मी-सौरभ's picture

11 Mar 2016 - 7:23 pm | मी-सौरभ

नको
बैठा कटटा चालेल

बाबा योगिराज's picture

11 Mar 2016 - 7:48 pm | बाबा योगिराज

प्रश्न :-ऑफीसात कंटाळा आल्यावर काय करावे ?

उत्तर:- सोप्पये, टाईम पास करावा.

चित्रगुप्त's picture

25 Apr 2018 - 5:40 am | चित्रगुप्त

.

प्रसाद गोडबोले's picture

25 Apr 2018 - 7:14 am | प्रसाद गोडबोले

बेस्ट !

arunjoshi123's picture

25 Apr 2018 - 1:30 pm | arunjoshi123

ज्या ज्या गोष्टींचा कंटाळा आला आहे त्या त्या गोष्टींचे पहिल्या १० सेकंदांचे काम करावे. म्हणजे पेपर वाचायचा कंटाळा आला असेल तर १० सेकंद पेपर वाचावा.