टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
अतिलघुकथास्पर्धा
नमस्कार,
मिसळपावाचे दुसर्या वर्षात पदार्पण झाले आहे, त्यानिमित्त ह्या संकेतस्थळावर वैविध्यपूर्ण लेखन होऊन इतर संकेतस्थळांपेक्षा येथे काही तरी वेगळे घडावे, ह्या इच्छेने ह्या स्पर्धेची घोषणा करतो आहे.
स्पर्धा अत्यंत सोपी आहे.
आपल्याला "अतिलघु कथा लिहायची आहे".
स्पर्धेचे नियमः
१. कथा ह्या धाग्याच्या प्रतिसादातच यायला हवी. व्यनिने अथवा खरडीतून पाठवू नये.
२. कथेत जास्तीत जास्त सहा वाक्ये, आणि जास्तीत जास्त ६० शब्द हवेत.
३. कथेचे शीर्षक जास्तीत जास्त ४ शब्दांचे हवे.
४. कथा मराठीतच हवी.
५. आणि सर्वात महत्वाचे, म्हणजे कथेचे शेवटचे वाक्य "देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती." हे हवे.
शनिवार, २० सप्टेंबर ही शेवटची मुदत आहे कथा देण्यासाठी.
रामदास, मुक्तसुनीत आणि मी स्वतः, ह्यांना स्पर्धेत भाग घेण्याची अनुमती नाही. कारण हे तिघे स्पर्धेचे परीक्षक आहेत. सोमवार दिनांक २२ सप्टेंबरला स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात येतील.
स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस म्हणून, त्यांच्या खरडवहीत मोठ्या अक्षरांत, ते ह्या स्पर्धेचे विजेते आहेत, अशी खरड माझ्यातर्फे टाकण्यात येईल. तसेच ह्या धाग्यावरही पहिल्या तीन स्पर्धकांची नवे घोषित करण्यात येतील.
येऊ द्या तर मग.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

स्पर्धेकर
स्पर्धेकरता अनेक शुभेच्छा!
एक परिक्षक अंमळ भिकार** आहे, इतर दोघे मात्र गुणी आहेत!
बक्षिसाची कल्पना छानच आहे....
तात्या.
प्रत्येक ठिकाणी
प्रत्येक ठिकाणी घाण केलीच पाहिजे का तात्या ?
मग गप बस ना !
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
मला...
मला ही तात्यांची अतिलघूकथाच आधी वाटली, नंतर समजले पण तरी देखील मी ती कथा म्हणून वाचली
स्पर्धेकर (हे शिर्षक)
स्पर्धेकरता अनेक शुभेच्छा! ...एक परिक्षक अंमळ ** आहे, इतर दोघे मात्र गुणी आहेत! बक्षिसाची कल्पना छानच आहे!
तात्या. देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती."
अगायायाया
अगायायायाया....
भारीच गोष्ट
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
साठ
http://vipravani.wordpress.com/
तुम्ही लिहिलेली धरुन साठ का आम्ची साठ अधिक तुमची दहा.
आम्ही लिहिलेली धरून
आम्ही लिहिलेली धरून साठ.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
ऑप्रेशन
ऑप्रेशन करुन,
देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.
ही
आमची स्पर्धेसाठी दिलेली कथा आहे.
अवांतर
प्रतिसादाबद्दल क्षमस्व. हेमिंग्वेची प्रसिद्ध अतिलघुकथा येथे द्यावीशी वाटते -
For Sale: Baby shoes, never worn.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बापरे
अनेक कथा तयार झाल्या डोक्यात.
काही शंका...
(१) प्रत्येकजण किती कथा पाठ्वू शकतो?
(२) २० तारखेपर्यंत कथा लपविण्याची सोय आहे का? नाहितर "प्रेरणा" कुठली आणि मुळ कथा कुठली हे कसे कळणार?
सर्किटभौ
उत्तर द्या की!
उत्तरे
कितीही कथा पाठवा.
परीक्षकांवर विश्वास ठेवा, मूळ कथा कोणती आणि आधारित कोणती हे कळण्याइतके भान त्यांना नक्कीच आहे.
आणि जे लोक कॉपी करतील, त्यांना मी आजपासून "काका" असे संबोधणार आहे, तेव्हा काळजी नसावी.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
आणखी शंकासूर
प्रतिसादात जर कथा लिहीली, तर वीस सप्टेंबरच्या आधी ती जनतेत वाचल्या जाईल. मग त्या स्पर्धकाचा धागा उचलून जरा हटके लिहील्या जाईल. I think this is unfair for the competition.
कथा पाठवायचा दुसरा काही मार्ग नाही कां?
तो आणि ती
माझी ही एक अतिलघु कथा
त्याने तीला पाहीले. तीने त्याला पाहुन न पाहिल्या सारखे केले. त्याने तो इशारा ओळखला. दोघे वेगवेगळ्या वाटेने निघुन गेले. देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
ख्या ख्या ख्या
>>त्याने तीला पाहीले. तीने त्याला पाहुन न पाहिल्या सारखे केले. त्याने तो इशारा ओळखला. दोघे वेगवेगळ्या वाटेने निघुन गेले
मान गये मुघले आझम !!
-
(विसरभोळा) आंद्या वाटसरु
व्य.नि.
माझ्या मते व्य.नि. ने एकाच परीक्षकाला कथा पाठवल्यास बरे पडेल. एकाच दिवशी सर्व कथा प्रसिद्ध करता येतील. दुसर्या कथांचा 'वापर' केला जाणार नाही.
उपक्रम स्तुत्य ! स्पर्धकांना अनेक शुभेच्छा !
पार्टनर
दोघे बेडवर
दोघे बेडवर पडली, त्याने तीला मिठीत घेतले. त्याने ड्रावर मधुन पुडी काढली. देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.
सदर कथा: १५ ऑगस्ट ची आहे.
गटण्या... तु
गटण्या...
तुझा बोळा निघाला आहे असे सगळे म्हणताहेत... पण दादा, अगदी भळाभळा वाहतंय रे... थोडा राहू दे तो बोळा... अर्धवट असा...
बिपिन.
संकल्पना
संकल्पना उत्तम..
लै झकास..
आपण कथा देणार पण अर्थात शेवटच्या दिवशी...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
ब्रम्हानंद
http://vipravani.wordpress.com/
लग्नानंतर २६ महिन्यात दोन मुले आंणि दोन गर्भपाताच्या चक्रव्युहाची कथा. साधनांच्या अलर्जीने ब्रम्हकुमारी संप्रदायात सामिल होण्याशिवाय रसिक जोड्प्याकडे उपाय नव्हता.
प्रभुबाबांच्या मोफत समुपदेशनात प्रजोत्पादन आणि श्रुंगारातील फरक जोड्प्याला कळला.बाबांनी २३ पैकी इतर २२ इंद्रियांचे उपयोगावर सखोल चर्चा केली. आज जोड्पे कुठ्ल्याही त्रासात न अड्कता ब्रम्हानंदी लीन होते. देशाची नसली तरी स्वतःपुरती वाढ्त्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली.
ए टू झेड ब्रम्हानंद वि.प्र. बाबा
पहिला नंबर.. :)
परिक्षकांचं मत माहीत नाही, परंतु मी या कथेला पहिला नंबर देईन..!
आपला,
प्रजापिता तात्याकुमारी.
भरीची अक्षरे...
पहिली चोवीसएक अक्षरे भरीची वाटतात.
- (क्रिप्टिक) टग्या.
लीड
http://vipravani.wordpress.com/
दरदिवशी लीड मध्ये कोण आहे ते समज्ण्याची सोय करावी परिक्षकांनी.
वि.प्र.
ऑफबीट!
ठरवल्याप्रमाणे दोघींनी एकांतात भेटून देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.
- टिंग्या
निवेदन : सदर कथा संपादक मंडळास जास्तच ऑफबीट वाटल्यास उडवण्याची पुर्ण मुभा आहे!
सरळ्सोट
http://vipravani.wordpress.com/
अत्यंत सरळ्सोट कथेला ऑफबिट का म्ह्ण्ताय राव
विनायक प्रभु
कारण
'हा' विषय मिपावर कदाचित चर्चिला गेला नसल्याने
काकांची मदत!
अत्यंत रोम्यांटीक मूड्मधे तो तिच्या शेजारी बेडवर बसला.
ती: माझ्याकडच्या गोळ्या संपल्यात...
तो: माझ्याकडचा स्टॉकपण संपलाय....
ती डोक्यावर पांघरूण घेउन तिकडे तोंड करुन झोपली. त्याने चडफडतच ल्यापटॉपवर मिपा उघडले आणि राग काढायला शिव्या देण्यासाठी तो एखाद्या काकाला शोधू लागला.देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.
आंबोळी
हा हा हा :)
अंबोळ्या,
कथा सुरेख आहे.
:)
ती डोक्यावर पांघरूण घेउन तिकडे तोंड करुन झोपली. त्याने चडफडतच ल्यापटॉपवर मिपा उघडले आणि राग काढायला शिव्या देण्यासाठी तो एखाद्या काकाला शोधू लागला.
हम्म! काकांसारखाच काही काही वेळेला लोकं माझ्यावरही राग का काढतात त्याचं कारण आत्ता समजलं!
आपला,
(अविवाहीत!) तात्या.
परिक्षकांचं मत मला माहीत नाही परंतु माझ्या मते हीदेखील प्रथम क्रमांकाची कथा आहे!
विप्र आणि आंबोळीचं माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन...
तात्या.
सही आहे!
सही आहे!
च्यामारी
च्यामारी !!!
भन्नाट ट्रेलर आहे ........
मग ख-या अर्थाने कथा कशा असतील ....
जियो..................
मिपाकर्स & फॅमिली ~~~~~
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
दोघांनी
दोघांनी मस्त पैकी फ्रेंच चुंबन घेउन सुरवात केली. तीने पुन्हा तीची अट सांगितले 'भारतात जेव्हा बॉम्बस्फोट थांबतील तेव्हा सगळे', त्याने नशीबाला शिव्या घालत लैपटॉपवर सिमुलेशन ची साईट उघडली. त्यांनी देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.
आळस
तीही आळशी आणि तोही! दोघांनी चौदा वर्ष, तीन महिने वयाची दोन मुलं दत्तक घेतली. आणि अशाप्रकारे त्यांनी देशाची नसली (?), तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.
क्रिप्टिक
चौदा वर्ष, तीन महिने? सिग्निफिकन्स कळला नाही.
कदाचित
कदाचित तीला असे म्हणायचे असेल.. त्यांनी, सलग चौदा वर्षे, तीन महीन्यांची दोन-दोन मुलं विकत घेतली ..!
) (चौदाच वर्षे का, तीन महीन्यांचीच का माहीत नाही!! )
हे गणित घालायला बरंय!.. त्यांच्याकडे टोटल मुलं किती!?
विकत??
>> कदाचित तीला असे म्हणायचे असेल.. त्यांनी, सलग चौदा वर्षे, तीन महीन्यांची दोन-दोन मुलं विकत घेतली ..!
मुलं "विकत" घेतली? अहो कायतरीच काय?
ओह सॉरी...
ओह सॉरी... दुपारच्या झोपेत लिहीलं काल.. दत्तकचं विकत झालं!
:(
बहुतेक
३.१४ हा आकडा घुसवायला??
संदर्भ - यमेचे डोके
>> ३.१४ हा
>> ३.१४ हा आकडा घुसवायला??
अर्थात! सहजराव, तुम्हाला १३ पैकी १३ मार्क!
आणि दुसरा संदर्भ होता भारतातल्या कायद्याचा, पंधरा वर्षांच्या वरची मुलं दत्तक घेता येत नाहीत.
आणि जरा मोठी मुलं दत्तक घेतली की त्यांचा शिशू वर्ग आधीच संपलेला असतो, कष्ट कमी!
काही शॉर्ट स्टोर्या
लघु भयकथा:
: त्याच्या अंतयात्रेहून परत आलो आणि दार उघडण्यासाठी किल्ली शोधत होतो. आतून दार उघडल्याचा आवाज आला. दारात तो उभा होता.
दरवाजा (रामसेचा नाही)
अतिलघुअतिभयकथा:
लेखक आणि प्रतिसादी हवेतः मिसळप्रेमी ब्लॉगकरता
:)
लेखक आणि प्रतिसादी हवेतः मिसळप्रेमी ब्लॉगकरता
क्लास! ह्यालाही आपला पयला नंबर...
भयालीदेवींचा विजय असो....
तात्या.
हा हा
थंडीचे दिवस असले की जोडीदार हा हवाच. त्याशिवाय ऊब कशी येणार? गावाकडे म्हण आहे, 'एक तंगडी आणि शंभर घोंगडी'. मात्र मुलाबाळांचे काय करायचे? शेवटी असे ठरले की त्याने त्याच्याशी जुळवायचे आणि तिने तिच्याशी. स्वतःला जोडीदार शोधण्याबरोबरच देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.
आपला,
(तात्पुरता अमेरिकन) आजानुकर्ण
वन मोर
साल २०५० लव्ह स्टोरी : ते दोघे ब्रुकबॅक माउंटन्स वर रहायला गेले .... नदितले मासे मारून खाणे आणि आनिक काही मारून त्यांनी देशाची नसली (?), तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती. ऐसा करेंगे तो ही जियोंगे ... ये काळ की गरज असेगे
सरळ)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
नसबंदी
'उल्लुखानच्या' मोजता न येणा-या कुटूंबात, शंभर विवाहित पोरांपैकी फक्त 'बसकर खान' याने नसबंदी केल्याने देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.
लब्बाडा
ती त्याला म्हणाली " ए सांग ना नवव्या मुलाला कुठे ठेवायचे? " . तो म्हणाला " सोप्पय..त्यात काय अगोदरच्या आठाना आपण जसे तुझ्या मामांकडे ठेवलय तसे याला माझ्या काकांकडे ठेऊयात"
ती खुदकन हसुन म्हणाली "लब्बाडा....ऑ!"
देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.
तुमची प्यान्ट ढीली होत असेल तर हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरली आहे
एकेकाचं जग
तो कधीच संयमी नव्हता.त्या दिवशी मात्र प्रेयसीबरोबरच्या प्रामाणिकपणाचे किस्से पेपरात आले.
आपल्यावरच संतापलेला तो मित्राकडे जाऊन केलेल्या नशेत, सगळं विसरून गेलेला.रात्री उशीरा लॅंड् कृजर निघाली.
पथारीवरती नूर आपल्या मालकीच्या घराची स्वप्नं रंगवीत झोपला होता.
देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.
-पार्टनर
एकदम व.पु.
एकदम व.पु. स्टाईल....
मित्रांनो
या क्षणापावेतो मला या स्पर्धेची काहीच कल्पना नव्हती. सर्कीट यांचे खरोखर कौतुक वाटते. काय काय अभिनव कल्पना सुचतील त्यांना , सांगता यायचे नाही ! असो. अनेक कथा वाचतोय आणि खूप आवडाताहेत ! खरे तर , या उत्तम कथांना जज्ज करणारा मी कोण आलो आहे टिक्कोजीराव. पण सर्कीट यांना होईल ते सहकार्य मी देणार आहे. अशा चांगल्या उपक्रमात सामील व्हायची संधी क्वचित मिळते.
अजून कथा येऊ देत. असे पुष्कळ उत्तमोत्तम लोक लिहायचे बाकी आहेत ! सर्वाना बेष्ट ऑफ लक !
क्षमस्व
देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती हे वाक्य वापरायचे म्हणजे कुठेतरी कामशास्त्राचा संबंध वा शरीरसंबंधाचे भाष्य येते. आम्ही या विषयावर काही लिहीले तर नातवंडे पतवंडे असलेल्या मंडळींचे ब्रह्मचर्य भंग होते असे आम्हास समजले आहे.
त्यामुळे ईच्छा असुनही आम्ही यात भाग घेत नाही. हो उगाच कुणी म्हणायला नको आमचे ब्रह्मचर्य अद्वैतवादी नानाने बुडविले.
क्षमस्व
नाना