राष्ट्रपाव

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in काथ्याकूट
2 Mar 2016 - 3:05 pm
गाभा: 

उ.ठाक्रे: माध्यमं कधी शिवसेनेची चांगली कामे दाखवत नाही.

खरे बोलले. शिवसेनेने किती चांगली कामे केली आहेत. मरगळलेल्या मराठी माणसाला बलशाली बनवलं. उद्द्यमशील बनवता बनवता उत्सवशील बनवलं. त्या उत्सवास सहृदयतेने निरपेक्ष मदत न करणार्‍यास योग्य ती मायेची समज देण्याइतकं कनवाळू बनवलं. आपल्या हक्कांसाठी जागरुक राहायला शिकवलं.

माध्यमं: शंभर वडापाव फुकट दिले नाहीत म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याने वडापाववाल्याला बांबूने मारहाण केली.

मला काथ्याकूट करायची हुक्की आली, उचकी आली. कारण का तर हा प्रश्न दारूच्या ग्लासात बर्फाच्या जागी पडला होता.

ही माध्यमं बेणी नेअमी चुकीच्या बातम्या का ब्रे देतात?

मंडली, हाय काय उत्तर?

(धागा राजकिय नाही. गैरसमज करुन घेऊ नये. भावना दुखावल्यास शिवसेनास्टाईल उत्तर दिले जाईल)

- (कुठलाही जोक न मारणारा) तर्राट जोकर

प्रतिक्रिया

जेपी's picture

2 Mar 2016 - 3:11 pm | जेपी

मला एक वडापाव आणा..

(पॉकॉला कंटाळलेला)जेपी

भंकस बाबा's picture

17 Mar 2016 - 9:08 am | भंकस बाबा

वड़ापाव काय पिज़्ज़ा पण खायला मिळेल जन्तेला!
छया लइच वंगाळ केलान सेनेने, इटालियन सरकार चांगले होते. हां आव्वाज कोणाचा? कोणचाच नाय बाबा, तेरी भी चुप आणि मेरी भी चुप!
आपण सगले भाऊ भाऊ, सगले मिलून 2जी चा प्रसाद खाऊ, आणि वर कोळश्याने तोंड काळे पण करून घेऊ.

नितीन पाठक's picture

2 Mar 2016 - 3:13 pm | नितीन पाठक

फक्त वडापावासाठी मारहाण ..................

लईच devaluation

काय राजा वडया चि भाजि बनवताना आलु चे छिलटे त काढत जा ;)

उगा काहितरीच's picture

2 Mar 2016 - 3:42 pm | उगा काहितरीच

सांबार म्हणा की कोथिंबीरीला.
-(अर्धा वैदर्भी) उका!

होबासराव's picture

2 Mar 2016 - 3:46 pm | होबासराव

मि ""ते हिरवि चटणि नका लाउ पावा ले निरा सांबारच असते त्यात"" असेच लिहिणार होतो...पण इथे समजले नसते कोणाला :)

अरे वा तुमच्या कडे चटणीत सांबार देतात का? आमच्याकडे सांबार वेग़ळं मागावं लागतं.

मेळघाटात, ताडोबा आणि पेंच मध्ये सुद्धा ;)

पैसा's picture

2 Mar 2016 - 4:02 pm | पैसा

१०० वडापाव विकत घ्यायला पैसे नाहीत? इतके गरीब कशामुळे झाले ते?

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 6:42 pm | तर्राट जोकर

गरीब नाहीत ते. दुसर्‍यांना दानाचं पुण्य मिळवून देण्यात पुढाकार घेतात.
महिन्याला लाखो वडापाव विकणार्‍याने दिले असते शंभर फुकट तर काय बिघडलं असतं?
शंभर वडापावसाठी लाखो शिवसैनिकांची मानहानी करुन टाकली. :(

कुणी ह्या शिवसैनिकांच्या शिवकालीन युटोपियाबद्दल का बोलत नाही?

हेच थे निष्पाप रमेश किणीला संपवणारे मेंदू। जाे एकच चारित्र्यवान शिवराय हाेऊन गेला त्याच्या जिवावर यांचं दुकान सुरू आहे ।

होबासराव's picture

2 Mar 2016 - 8:27 pm | होबासराव

काय मंग मांजरि चे जंत झाले का बरे..म्हणजे मांजर जंता पासुन झालि का मुक्त ?

चिकन सूप प्या.हेल्दि असतं.ते तेलकट वडापाव काय खाताय.

हे ४ वेळा का दिसतय? मदत करा

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2016 - 11:53 am | अत्रुप्त आत्मा

@

हे ४ वेळा का दिसतय? मदत करा

>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing016.gif तू खूप दिवसांनी आलीस ना किच्चु ताई, म्हणून तुला बोनस मिळाला असेल! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing010.gif

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Mar 2016 - 7:53 am | श्री गावसेना प्रमुख

त्यांना चिकन सूप चारदा प्यायची आवश्यकता आहे म्हणून देव प्रसन्न होऊन चारदा कंमेन्ट पब्लिश करीत आहे।

सतिश गावडे's picture

3 Mar 2016 - 9:30 am | सतिश गावडे

कोणता देव?

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Mar 2016 - 10:30 am | श्री गावसेना प्रमुख

त्यांच्या लेखी असुरांवर अन्याय करणारा सुरांचा देव।

सतिश गावडे's picture

3 Mar 2016 - 10:37 am | सतिश गावडे

असुर शब्दावरून आठवले, असुरांना(अहुरांना) इराणी(पर्शियन) लोक पुजतात. "हिंदू" हा शब्दही त्यांचीच देणगी आहे असे म्हणतात. त्यांच्या दृष्टीने सिंधू(हिंदू) नदीच्या पलिकडले ते हिंदू.

अभ्या..'s picture

3 Mar 2016 - 10:59 am | अभ्या..

कुठल्या देवाला तळलेल्या वड्याऐवजी चिकनसुप प्रेफर केले होते सांग बघू?

सतिश गावडे's picture

3 Mar 2016 - 11:02 am | सतिश गावडे

बडव्यांनी कोंडाळे केलेला विठ्ठल.

अहुर माझ्दा असा काहीतरी त्यांचा देव आणि त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे अहिरमन असे वाचल्याचे आठवते.

सतिश पाटील's picture

3 Mar 2016 - 9:57 am | सतिश पाटील

गोड चटणी मध्ये साखर असते का हो?
कारण ती तिखट कधीच लागत नाही, मग तिला चटणी का म्हणतात?

सुनील's picture

3 Mar 2016 - 10:05 am | सुनील

चटणी तिखटच असली पाहिजे असे काही नाही. दाक्षिणात्य उपाहारागृहात खोबर्‍याची पांढरी चटणी देतात, ती तिखट नसते.

असो, मला वडापाव हा लसणाची सुकी चटणी आणि तळलेल्या मिरच्यांसोबतच आवडतो.

+ १

कोलंबी घातलेला वडा+सुकटाची चटणी+तळलेला जवळा+लसणाची चटणी+तळलेल्या मिरच्या+कांदा ====> ताटात स्वर्ग

आमच्या स्वर्गाच्या कल्पना ताटातूनच येतात.

बटाटेवड्या बरोबर खजूराची किंवा चिंचेची चटणी खाणारे, श्रीखंडाचे पाणी पण पियूष म्हणून पितात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2016 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत !

या यादीत भाजलेल्या सुक्या बोंबलची चटणी, तळलेल्या सुक्या बोंबलची चटणी, या पण सामील करा !

पण चूलीत भाजलेल्या बोंबलाची चव कश्शा कश्शाला येत नाही.

फ्लॅट मध्ये रहात असल्याने, ह्या अशा साधारण आणि म्हणूनच अमुल्य गोष्टींना पारखे झालो.

मस्त पऊस कोसलत असावा, वातावरणात मातीचा (आणि जोडीला गोठ्यातील गुरांचा) सुगंध दरवळत असावा.एखादी दार बुलंद नमक कलाकारी नुकतीच संपवत आलेली असावी आणि चुलीत बोंबलाला सारले गेले असावे.

ताटात काळ्या वाटाण्यांची उसळ्+भाताचा ढिगारा आणि जोडीला चूलीत भाजलेला बोंबील.

आमच्या मित्राच्या घरी गेलो की, हे हमखास जेवायला मिळायचे. (ह्या एका कारणासाठीच शालेय कैद परत भोगीन.)

चाटून खायचा पदार्थ अशा अर्थी चटणी हे नाव पडले असावेसे वाटते. चटणी ओली असो वा सुक्की, फार चावून खाणे अपेक्षित नसते. बंगालातही 'चाटनि' (च चहाचा) नामक गोड चटणी असते.

बाळासाहेब ठाकर्‍यांनी केलेली उपयुक्त एक-दोन कामे कोणी सांगेल का? की ज्यानी महाराष्ट्राचा फायदा झाला? आणि शरद पवारांची देखील.

बाळासाहेब आणि पवारसाहेब यांनी आपापसात अनुक्रमे 'हिंदूह्रिदयसम्राट' व 'जाणता राजा' ह्या उपाधी वाटून घ्रेतल्या.
याहून मोठे असे कोणते विधायक कार्य आपल्याला अपेक्षित आहे ?

sagarpdy's picture

10 Mar 2016 - 10:15 am | sagarpdy

ओ, आमची पिशिएम्शि येउन बगा एकदा. साहेबांची कृपादृष्टी म्हणून यवड चकाचक शहर बनलय.
साहेब! __/\__

सतिश पाटील's picture

3 Mar 2016 - 10:52 am | सतिश पाटील

मला मात्र तळलेल्या मिरच्या अजिबात आवडत नाहीत.
खोबर्याची चटणी मात्र आवडते.
कोणाकडे आहे का खोबर्याच्या चटणीची रेसिपी.

सतिश गावडे's picture

3 Mar 2016 - 10:55 am | सतिश गावडे
सतिश पाटील's picture

3 Mar 2016 - 10:59 am | सतिश पाटील

धन्यवाद साहेब.

प्रमोद देर्देकर's picture

3 Mar 2016 - 11:34 am | प्रमोद देर्देकर

अजुन एक बातमी या अगोदर २ दिवसांपुर्वी घडलेली.
ठाण्याच्या मुंबई आग्रा हमरस्त्याला सिग्नल सुटूनही सेना माजी शाखाप्रमुख गाडी थांबवून बोलत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. - म्हणुन महिला वाहतुक पोलीस हवालदार बाईंनी हटकले तर तिलाच मारहाण केली त्या महिला पोलीसाच्या नाकातुन रक्त आले.
झी बातम्यांमध्ये सतत ती चित्रफीत दाखवत होते. सदर इसम हा शिवसेना माजी शाखाप्रमुख होता. आणि अजुनही काही गुन्हे त्याच्या नावावर आहेत. पण सेनेने आपला हात वर केला. त्याचा आणि आमचा आता काही संबंध नाहीये म्हणे.

मुळ बातमी.

भाते's picture

7 Mar 2016 - 11:16 pm | भाते

टाईम्स नाऊवर त्या महिला वाहतुक पोलीस बाईची बाजू ऐकली.
पत्रकार तिला हिंदीत प्रश्न विचारत असला तरी ती स्पष्टपणे मराठीत ऊत्तर देत होती हे ऐकुन छान वाटले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Mar 2016 - 8:10 pm | निनाद मुक्काम प...

भाजपाचे समर्थक गालात गुलुगुलु हसत असतील
मुंबई महानगर पालिका निवडणूक बहुदा एकट्याने लढून मग प्रमुख पक्ष बनून सेनेच्या मदतीने वेळ पडल्यास
सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा सफल होईल
त्यांनी शाई फेकून जे साध्य केले नाही ते कनैह्या बोंबा मारून भाजपला साध्य करून देत आहे
रोहित ते उमर ते इशारत चे प्रकरण पाहता हिंदुच्या मताचे दृविकरण भाजपसाठी त्यांचे विरोधक आयते करून देत आहेत
व त्यात सेना सुशिक्षित मराठी आपले मतदार भाजपच्या ओंजळीत स्वहस्ते देत आहे.
उरलेले काम मुब्र्यांचा इशारत चा भाईजान करत आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Mar 2016 - 8:10 pm | निनाद मुक्काम प...

भाजपाचे समर्थक गालात गुलुगुलु हसत असतील
मुंबई महानगर पालिका निवडणूक बहुदा एकट्याने लढून मग प्रमुख पक्ष बनून सेनेच्या मदतीने वेळ पडल्यास
सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा सफल होईल
त्यांनी शाई फेकून जे साध्य केले नाही ते कनैह्या बोंबा मारून भाजपला साध्य करून देत आहे
रोहित ते उमर ते इशारत चे प्रकरण पाहता हिंदुच्या मताचे दृविकरण भाजपसाठी त्यांचे विरोधक आयते करून देत आहेत
व त्यात सेना सुशिक्षित मराठी आपले मतदार भाजपच्या ओंजळीत स्वहस्ते देत आहे.
उरलेले काम मुब्र्यांचा इशारत चा भाईजान करत आहे.

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 1:29 pm | तर्राट जोकर

काही धाग्यांवर जाऊन लिहावेसे वाटते, पण लोक अवांतर केल्याचा ठणाणा करतात. त्यावर काय क्रवे ब्रे असा विचार आला. म्हटले आपल्याच धाग्यावर करु अवांतर. वाचायचं तर वाचा, नै तो इग्नोरास्त्र अ‍ॅक्टीवेट करा.

धागा: क्रिकेट

>> प्रतिसादः तिकडे जवान सीमेवर लढतायत, रक्त वाहतायत आणि इकडे हे क्रिकेटवर चर्चा करतायत.

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 1:42 pm | तर्राट जोकर

धागा: #PledgeForParity शपथ समतेची (धागालेखिकेची क्षमा मागून)

>> प्रतिसाद: मोहनरावांसाठी भारतमाताकीजय असे शिकवणे हे स्त्री-पुरुष समता शिकवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही भारतमाता चा सन्मान करायला पोकळ बांबूंचे फटके देऊन शिकवू पण आमच्या संघटनेत महिलांचा प्रवेश निषिद्ध ठरवू.

विजुभाऊ's picture

7 Mar 2016 - 4:00 pm | विजुभाऊ

पोकळ बांबू आणि भरीव बांबू याचा कोणीतरी तूलनात्मक अभ्यास लिहावा ही विनंती.

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 5:17 pm | तर्राट जोकर

धागा: मराठीची गळचेपी किंवा मराठीची हत्या, आपणच करत आहोत का?
प्रतिसादः कॉस्मोपोलीटन शहरात राहणार्‍या जनतेला एवढ्या मोठ्या काळज्या का पडतात? चार लोक दुसर्‍या भाषेचे आजूबाजूला असले की कोंदटल्यासारखं वाटतं म्हणून असे प्रश्न पडतात काय? चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरा कार्पोरेटातून बाहेर पडून. कोणाचीच कसली गळचेपी, हत्या होत नाही आहे. देशभरातले अठरापगड लोक येऊन खिचडी झालेल्या मुंबईत मराठीच मुख्य भाषा असावी हा फक्त कल्पनाविलास आहे. मुंबईच्या बाहेर खूप मोठा महाराष्ट्र आहे. अजून तो ४२ च्या काय बोलींमधे मराठी रक्तात खेळवून आहे. मारवाड्यापासून पंजाबी, मुसलमान, बिहारी सगळे अमराठी इतकी सहज मराठी बोलतात जितकी मुंबईत जन्म घालवलेल्या मराठी माणसाला येणार नाही.

उगा काळजी करु र्‍हायले.

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 9:42 am | तर्राट जोकर

धागा: सेल्फी - एक विकार???
>>
१. सिलेक्टीव मोरल पोलिसिन्गचा आगावूपणा करणार्‍यांची तक्रार कुठे बरे करावी?

२. जब लोक आपके खिलाफ बोलने लगे तो आप तरक्की कर रहे हो असे मोदींबद्दल अभिमानाने म्हटले इथे.
च्यामारी लोक आता माझ्या खिलाफही बोलू लागलेत, मी पण तरक्की करु र्‍हायलो का? smile

तर्राट जोकर's picture

10 Mar 2016 - 12:16 am | तर्राट जोकर

काय मग राष्ट्रपाव? ऐकलं का? एखाद्याला डुक्कर म्हणणे पातळी सोडून असते पण कचरा म्हणणे नाही, बरं का? लक्षात असू दे नाहीतर पोर्क पोटात घालून कचर्‍यात फेकला जाशील.

अहो हल्ली सात्विक आंदोलन पण करतात ...काय ते " वरण भात " मोर्चा नेला होता म्हणे ...

sagarpdy's picture

10 Mar 2016 - 10:28 am | sagarpdy

होय होय! आणि तामस पण - मंदिरांसमोर चिकन पण केले होते.
राजस केले होते का ते आठवत नाही, पुढच्या वेळी बासुंदी आंदोलन बहुतेक.

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 12:33 am | तर्राट जोकर

ह्याला मणतात जबरदस्त गेम .

तुम्ही भारत माता की जय म्हटलं नै तर तुम्ही देशद्रोही.

तुम्ही म्हटलं तरी पंचायत, नै म्हटलं तरी पंचायत. म्हणणार नाही बोलले तरी पंचायत.

पण असं म्हणण्यावर देशभक्ती ठरवणारे तुम्ही कोण हे मात्र तुम्ही विचारलं नाय पायजे. फाउल होतो.

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 2:04 am | तर्राट जोकर

(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));

"Are Hafiz Saeed and Lakhvi on your radar", asks Owaisi ending...Owaisi says 'Jai Hind'Posted by Hzt Aurangzeb Alamgir - RA on Wednesday, March 16, 2016
पिलीयन रायडर's picture

17 Mar 2016 - 3:05 pm | पिलीयन रायडर

मला ओवेसीने विचारलेले प्रश्न आवडले. म्हणजे विचारण्याची पद्धत आवडली.

मी ओवेसीची वक्तव्ये फक्त पेपरात वाचली आहेत. कधी त्याचा व्हिडिओ पाहिला नव्हता. आज पहिल्यांदाच त्याला बोलताना ऐकले. केवळ आणि केवळ ह्याच क्लिपवरुन माझे मत थोडेसे बदलले आहे.

१. प्रश्न सुस्पष्ट आहेत. उत्तरे नक्की काय आहेत ते माहित नाहीत. पण नुसताच आवेश पण मुद्दा काही नाहीच. किंवा नुसतीच डायलॉगबाजी.. ह्याच प्रकारात आजकाल क्लिप्स पहायला मिळतात. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की मोदी सुद्धा फार महान भाषण करत नाहीत. थोडा ड्रामा जास्त असतो. म्हणुनच मला इराणी बाईंचे भाषणही नाट्यमय करायची गरज नव्हती असे वाटले होते. बीजेपी सोयीस्कर तेच दाखवतो.. त्याच क्लिप्स बरोब्बर व्हायरल होतात. मी मुख्यतः फेसबुकवर अशा राजकीय गोष्टी पहाते. माझ्या मित्रयादीतले लोक शक्यतो भाजप आणि संघवाले असल्याने माझ्यावरही त्याच पोस्टचा मारा होतो. भाजपच्या सोयीचेच मला वाचायला मिळते. इतर कुणाचे काही ऐकायला मिळत नाही. मी सुद्धा त्यासाठी काही विशेष प्रयत्न करत नाही.

अशा वेळेस, ओवेसी बद्दल केवळ वाईटच ऐकलेले असताना, त्याने फापटपसारा न मांडता धडाधड जे प्रश्न विचारलेत ते आवडले. उगाच शाब्दिक जंजाळ नसल्याने ऐकायला बरे वाटले. मागे चक्क काही गोंधळ नसल्याने ऐकु आलेही.

२. तो भाषणाच्या शेवटी "जय हिंद" म्हणाला. "भारतमाता की जय" चा फंडा काय आहे त्याचा माहित नाही. मुसलमान लोक देशाला आई मानत नाहीत म्हणुन वंदे मातरमही म्हणणार नाही असे मध्ये वाचले होते. त्याचेच हे पुढचे पाऊल वाटले. पण शब्द काही का असेनात, तो जय हिंद म्हणतोय ना, मग का वाद होतोय अशी शंका आली. मग ज्या प्रमाणे मला भाजपाच्ला सोयीस्कर मजकुरच कळतो, त्याच प्रमाणे ही बातमी सुद्धा अर्धवट संदर्भाशिवाय कळाली असेल का असेही वाटले.

* माझा कोणत्याच राजकीय पक्षावर फारसा विश्वास नाही. त्यातल्या त्यात भाजप बराय एवढेच माझे मत आहे. सरसकट मुसलमान वाईट आहेत असेही मला वाटत नाही. पण मुसलमान धर्मिय डोईजड आहेत आणि भलेही त्यांच्यातले मुठभर उपद्रवी असले तरी ते जगाला पुरुन उरणार असे मला वाटते.

पिलीयन रायडर's picture

17 Mar 2016 - 3:06 pm | पिलीयन रायडर

* नुसताच आवेश, मुद्दा काही नाहीच. किंवा नुसतीच डायलॉगबाजी.. ह्याच प्रकारात आजकाल क्लिप्स पहायला मिळतात.. ओवेसीची क्लिप त्याप्रकारातली वाटली नाही.

असे वाचावे.

माहितगार's picture

17 Mar 2016 - 4:20 pm | माहितगार

उर्वरीत पक्षिय अभ्यासपुर्ण आणि तर्कसुसंगत पणे मुद्दे खोडत नाहीत त्यामुळे कट्टरवादी सुद्धा उजवा दिसतो. ओवेसींनी टागोरांचा नॅशनलीझम आदर्श असल्याची दुहाई दिली आहे, पण टागोरांचे जे वाक्य वापरले आहे त्याचा ज्याला जसा वापर करावयाचा तसा करता येतो मग औरंगजेब, निझाम, रझाकार हे सुद्धा हिरो बनवता येऊ शकतील का अशी शंका वाटते.

टागोरांचा त्यांनी दाखला दिलाच आहे तर तो विचार तपासला जावा म्हणून
टागोर आणि सावरकर तत्वज्ञानातील साम्य आणि फरक
हा वेगळा धागा टाकला पण मिपा पब्लिक देखनोको तय्यारीच नइ !

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 3:15 pm | नाना स्कॉच

जबरदस्त प्रश्न!!!

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2016 - 9:15 am | श्री गावसेना प्रमुख

अख्तर साहेब पण ह्याच धर्माचे पाईक आहेत ना, त्यांनी जे भाषण दिले त्याबद्दल पण लिहा।

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 10:29 am | तर्राट जोकर

अख्तर साहेबांच्या नावावर जाऊ नका. ते नास्तिक आहेत. त्यांनी मुस्लिम धर्म केव्हाच सोडून दिलाय. प्रस्तुत भाषणातले मुद्दे आणि प्रश्न बघा, कोणी दिलंय ते बघू नका. कोणी काय म्हणायला पाहिजे ह्यापेक्षा ओवेसीने विचारलेले हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत.

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2016 - 1:25 pm | श्री गावसेना प्रमुख

बरं...ते नास्तिक आहेत म्हणून भारत माता कि जय बोलले कि काय,मुस्लिम राहिले असते तर बोलले नसते?

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 1:38 pm | तर्राट जोकर

धर्माचे पाईक हा धार्मिक आधारावर त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा शब्द आपण वापरला. मुस्लिम नाव असले की तो पार आयसिस प्रेमीच असतो ह्या गृहितकावर आधारित तुमचा प्रतिसाद होता. म्हणजे ओवेसीच्या ज्या धर्माचा आहे त्याच धर्माचा अख्तर असुन त्याल काय प्रोब्लेम नाय तर ह्याला काय असावा असा तुमचा प्रश्न आहे. आता अख्तर मुस्लिम नाही म्ह्टल्यावर तुम्ही म्हणताय तो मुस्लिम असता तर काय बोलला नसता काय? अहो लाखो-करोडो मुस्लिम आहेत जे वंदेमातरम पासुन भारतमाता की जय सगळं म्हणतात. बरं ते नाही म्ह्टलं तर ते देशभक्त नाहीत हा जावई शोध लावणारे संघवाले कोण लागून गेलेत?

हा फुकटचा आगावू उपयोगशून्य जिंगोइजम देशाला अजिबात गरजेचा नाही. भारतमाताकीजय म्हनुन मल्ल्या गेला पळून, त्याच्या देशभक्तीवर आपण शंका घेणार की नाही घेणार?

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2016 - 2:32 pm | श्री गावसेना प्रमुख

माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं मला;

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 2:42 pm | तर्राट जोकर

अहो लाखो-करोडो मुस्लिम आहेत जे वंदेमातरम पासुन भारतमाता की जय सगळं म्हणतात. >>> ह्यात तुम्हाला उत्तर नाही मिळालं काय?

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2016 - 3:09 pm | श्री गावसेना प्रमुख

मी अख्तरांबद्दल विचारतोय साहेब लाखो करोडो मुस्लिमांबद्दल नाही।

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 3:21 pm | तर्राट जोकर

अख्तर साहेब पण ह्याच धर्माचे पाईक आहेत ना,

>> ह्याचा काय अर्थ आहे ते जरा विस्ताराने सांगा मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. संदिग्ध प्रश्न मांडणे ही मिपावर फॅशन होत चालली आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2016 - 4:21 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्हाला कुठे संदीग्ध वाटले हो माझा प्रश्न सरळ आहे
मुस्लिम राहिले असते तर बोलले नसते?

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 5:15 pm | तर्राट जोकर

हे मी कसे सांगणार? हा प्रश्न जावेद अखतरांसाठी आहे. त्याचे उत्तर तेच देऊ शकतील. ;-)

जावेद अख्तर ह्याच धर्माचे पाईक ना ह्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी दिले. खरे तर ते उत्तर नसून माहिती होती. मत तर अजिबात नव्हते.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

17 Mar 2016 - 9:30 am | खालीमुंडी पाताळधुंडी
खालीमुंडी पाताळधुंडी's picture

17 Mar 2016 - 9:36 am | खालीमुंडी पाताळधुंडी
प्रदीप साळुंखे's picture

17 Mar 2016 - 10:20 am | प्रदीप साळुंखे

"भारत माता कि जय" या घोषणेवर कोणाचेही पेटंट नाही.संघाचेही नाही.
मग ही घोषणा देताना औवेसीच्या गळ्यात काय हाड अडकतयं कोणास ठाऊक?
केवळ भागवत म्हणाले कि "भारत माता कि जय" म्हणायला सर्वांना शिकवलं म्हणजे,म्हणून औवेसीला पिसाळायचं काहीच कारण नव्हतं.ती घोषणा संघाची असल्याचा त्याचा कडू गैरसमज झाला असावा.
सगळं कसं अंगावर ओढून घ्यायचं,वातावरण तापवायचं अन् भुंकत सुटायचं हा त्याचा छंदच आहे.
निवळ्ळ चमकोगिरी करण्यापलिकडे त्याच्या राजकारणाला कवडीचीही किंमत नसावी.
वारिस पठाणला निलंबित केलं आहे,हे सर्वपक्षीय ठरावाने झालं आहे.त्यामध्ये काँग्रेस,राष्ट्रवादीही येतात.
पण त्याची देशभक्ती ठरवणारे हे काँग्रेस+राष्ट्रवादीवाले कोण?

याॅर्कर's picture

17 Mar 2016 - 10:29 am | याॅर्कर

प्रदीपभाऊ,
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ओ.

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 12:12 pm | तर्राट जोकर

खालील सर्व म्हणायला कोणाच्या गळ्यात हाड अडकू नये म्हणजे झालं...

Hail Mother India

કરા મધર ઇન્ડિયા
Karā madhara inḍiyā

শিলাবৃষ্টি মাদার ইন্ডিয়া
Śilābr̥ṣṭi mādāra inḍiẏā

அன்னை வாழ்க இந்தியா
Aṉṉai vāḻka intiyā

వడగళ్ళు తల్లి భారతదేశం
Vaḍagaḷḷu talli bhāratadēśaṁ

جی ماں بھارت

भारतमम्मी की जय

भारतअम्मी की जय

भारतअम्मा की जय

भारतमॉम की जय.

जय हिंद

हिंदुस्तान जिंदाबाद

sagarpdy's picture

17 Mar 2016 - 12:17 pm | sagarpdy

आमी बाबा शाकाहारी

बॅटमॅन's picture

31 Mar 2016 - 12:30 am | बॅटमॅन

Hail Mother India

चे

শিলাবৃষ্টি মাদার ইন্ডিয়া

ज्याने केले त्या स्युडोटागोरास माझा नोमोश्कार. ( कहानीमध्ये बॉब बिस्वास (खरा उच्चार 'बिश्शाश') 'नोमोश्कार. अ‍ॅक मिनिट.' म्हणतो त्यातला.)

Hail = शिलावृष्टी? लैच तर्राट, नव्हे लिटरर्राट धावली ट्रान्सलेटरची बुद्धी. =)) गेलाबाजार कण्टेक्स्ट तरी बघायचा म्हण्टो मी. =))

तर्राट जोकर's picture

31 Mar 2016 - 1:24 am | तर्राट जोकर

हे हे. वो गुगल ट्रान्सलेटकी बुद्धी है. तुमच्यासारख्या म्होट्या माणसाने वळीकने म्होटी गोट नाय. =))

तुम्ही रजेवर हुते नैतो तुम्हालाच सगळे भाषांतर विचारणार हुतो. पण त्या सगळ्या प्रकारात वेळ गेला असता आणि लोहा थंड झाला असता, मग काय मिळेल तो हातोडा मारला. ;-)

बाकी आम्ही भाता हलवत बसणारे लोहार. लोक आगीकडे बघतात, हत्यारांकडं नाही. तुमच्यासारखा पारखी आणी बेरकी येकांदाच. =))

चेक आणि मेट's picture

17 Mar 2016 - 1:23 pm | चेक आणि मेट

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही

ओवेशी??
शेपूट वाकडचं असतय,सरळ होत नाही.

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 1:29 pm | नाना स्कॉच

कोणाचं ? :D ;)

चेक आणि मेट's picture

17 Mar 2016 - 1:34 pm | चेक आणि मेट

कोण अंगावर ओडून त्याचं ओ

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 1:39 pm | तर्राट जोकर

खाजवून खरुज काढणार्‍यांचं शेपुट वाकडं होतं आणि राहणार.

चेक आणि मेट's picture

17 Mar 2016 - 1:48 pm | चेक आणि मेट

अगदी अगदी हे मात्र लाखात एक बोललात,
सहमत आहे.

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 1:53 pm | नाना स्कॉच

ह्या प्रसंगा अगोदर एकंदरित थोरले ओवैसी उर्फ़ असदउद्दीन ओवैसी ह्यांच्या बद्दल एक कुतूहल असे. त्यांना मिळालेली संसदरत्न पुरस्कार. अभ्यासु प्रश्न. त्यांनी एका जाहिर टीवी चर्चेत उडवलेल्या पाकिस्तानी प्रवक्ते अन एजेंडाच्या चिंध्या (ह्यावेळी त्यांच्यासोबत किर्ती आझाद सुद्धा होते) , त्यांचा घटना अन कायद्याचा अभ्यास ह्यामुळे त्यांच्याबद्दल नितांत जरी नाही तरी माफक आदर निर्माण झाला होता हे मान्य केलेच पाहिजे मला. एकंदरित तर्क कायदेशीर भाषेत बसवुन बोलणारा किंवा हिंदुस्तानी मुसलमान आपले प्रॉब्लम स्वतः हाताळु शकतात असे म्हणणारा म्हणूनही आदर होता.

पण

ह्या प्रकारात मात्र ओवैसी हे कायदा अन घटनेच्या आडून आपला उजवा एजेंडा राबवत आहेत असे वाटते. कुरआन मधे अल्लाह सोडुन कोणाच्या पूजनाची परवानगी नाही (ऐकिव माहीती) हा तो एजेंडा होय, ह्याला कायदेशीर अन घटनात्मक मुलामा चढ़वायला त्यांनी "घटनेत कुठेही 'भारत माता की जय' म्हणायला सांगितलेले नाही, तसेच आपला 'हिंदुस्तानी मुसलमान' हा एसेंस अबाधित ठेवायला भाषणाची सांगता 'जय हिंद' केली आहे हे इथे ठळकपणे जाणवले तरी, त्यांचा मुळ मुद्दा हा नसुन हल्लीच रा स्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ह्यांनी केलेल्या 'तरुण मुलांना जय हिंद म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधानाचा विरोध हा आहे. हिंदुस्तानी मुसलमान भारताला(च) आपला देश मानतात अन इमान राखतात हा त्यांचा मुद्दा इतरवेळी योग्य वाटत असला तरी ह्या विशिष्ट प्रसंगी त्यांचा एजेंडा हा फ़क्त संघाच्या सर्वेसर्वा ने दिलेल्या विधानात कुसपटे काढणे होय असे जाणवते,

थोड़े 'भारत माता की जय म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधाना बद्दल

भागवत जे म्हणाले आहेत ते मुळात चुक नाही , पण त्याचे डिटेल्स सुद्धा आले पाहिजेत, भारत मटैक्स की जय म्हणायला मी सुद्धा माझ्या संतती ला नक्कीच शिकवेल, पण लोकसमुच्चयाचा विचार करता, सगळ्यांना मुळात मनःपूर्वक भारत माता की जय म्हणावे वाटले पाहिजे तसे प्रेरणादायी अन निकोप वातावरण पाहिजे हे ही ह्या निमित्ताने अधोरेखित करतो, त्याच्यात जबरदस्ती नको,

भारत माता की जय विधानाच्या समर्थनार्थ जर *तमाम राष्ट्रप्रेमी लोकं आक्रस्ताळे अन साचेबद्ध नारे देऊ लागले तर तोंडघशी पडतील अशी भीती ह्या निमित्ताने वाटते, इथे जिंगोइसम उपयोगी नाही कारण गाठ एका कायदा पुढे करणाऱ्या अन ह्या विशिष्ट प्रसंगी लुच्चेपणा करणाऱ्याशी आहे हे भावनवेगात विसरून चालण्यासारखे नाही असे फील होते.

*संदर्भ :- उत्तरेकडल्या कुठल्यातरी एका भाजयुमो नेत्याने 'ओवैसीची जीभ कापून आणून देणाऱ्यास एक कोट रूपये देऊ' अशी घोषणा करून एका राष्ट्रिय वृत्तवाहिनी वर तो आकड़ा टाकलेला चेक फड़कवला आहे, असे करून उपयोग नाही असे म्हणायचे आहे

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 1:57 pm | नाना स्कॉच

भारत मटैक्स की जय

असे टंकन अनवधानाने झाले असुन ते

भारत माता की जय असे वाचले जावे ही विनंती

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 1:54 pm | नाना स्कॉच

ह्या प्रसंगा अगोदर एकंदरित थोरले ओवैसी उर्फ़ असदउद्दीन ओवैसी ह्यांच्या बद्दल एक कुतूहल असे. त्यांना मिळालेली संसदरत्न पुरस्कार. अभ्यासु प्रश्न. त्यांनी एका जाहिर टीवी चर्चेत उडवलेल्या पाकिस्तानी प्रवक्ते अन एजेंडाच्या चिंध्या (ह्यावेळी त्यांच्यासोबत किर्ती आझाद सुद्धा होते) , त्यांचा घटना अन कायद्याचा अभ्यास ह्यामुळे त्यांच्याबद्दल नितांत जरी नाही तरी माफक आदर निर्माण झाला होता हे मान्य केलेच पाहिजे मला. एकंदरित तर्क कायदेशीर भाषेत बसवुन बोलणारा किंवा हिंदुस्तानी मुसलमान आपले प्रॉब्लम स्वतः हाताळु शकतात असे म्हणणारा म्हणूनही आदर होता.

पण

ह्या प्रकारात मात्र ओवैसी हे कायदा अन घटनेच्या आडून आपला उजवा एजेंडा राबवत आहेत असे वाटते. कुरआन मधे अल्लाह सोडुन कोणाच्या पूजनाची परवानगी नाही (ऐकिव माहीती) हा तो एजेंडा होय, ह्याला कायदेशीर अन घटनात्मक मुलामा चढ़वायला त्यांनी "घटनेत कुठेही 'भारत माता की जय' म्हणायला सांगितलेले नाही, तसेच आपला 'हिंदुस्तानी मुसलमान' हा एसेंस अबाधित ठेवायला भाषणाची सांगता 'जय हिंद' केली आहे हे इथे ठळकपणे जाणवले तरी, त्यांचा मुळ मुद्दा हा नसुन हल्लीच रा स्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ह्यांनी केलेल्या 'तरुण मुलांना जय हिंद म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधानाचा विरोध हा आहे. हिंदुस्तानी मुसलमान भारताला(च) आपला देश मानतात अन इमान राखतात हा त्यांचा मुद्दा इतरवेळी योग्य वाटत असला तरी ह्या विशिष्ट प्रसंगी त्यांचा एजेंडा हा फ़क्त संघाच्या सर्वेसर्वा ने दिलेल्या विधानात कुसपटे काढणे होय असे जाणवते,

थोड़े 'भारत माता की जय म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधाना बद्दल

भागवत जे म्हणाले आहेत ते मुळात चुक नाही , पण त्याचे डिटेल्स सुद्धा आले पाहिजेत, भारत मटैक्स की जय म्हणायला मी सुद्धा माझ्या संतती ला नक्कीच शिकवेल, पण लोकसमुच्चयाचा विचार करता, सगळ्यांना मुळात मनःपूर्वक भारत माता की जय म्हणावे वाटले पाहिजे तसे प्रेरणादायी अन निकोप वातावरण पाहिजे हे ही ह्या निमित्ताने अधोरेखित करतो, त्याच्यात जबरदस्ती नको,

भारत माता की जय विधानाच्या समर्थनार्थ जर *तमाम राष्ट्रप्रेमी लोकं आक्रस्ताळे अन साचेबद्ध नारे देऊ लागले तर तोंडघशी पडतील अशी भीती ह्या निमित्ताने वाटते, इथे जिंगोइसम उपयोगी नाही कारण गाठ एका कायदा पुढे करणाऱ्या अन ह्या विशिष्ट प्रसंगी लुच्चेपणा करणाऱ्याशी आहे हे भावनवेगात विसरून चालण्यासारखे नाही असे फील होते.

*संदर्भ :- उत्तरेकडल्या कुठल्यातरी एका भाजयुमो नेत्याने 'ओवैसीची जीभ कापून आणून देणाऱ्यास एक कोट रूपये देऊ' अशी घोषणा करून एका राष्ट्रिय वृत्तवाहिनी वर तो आकड़ा टाकलेला चेक फड़कवला आहे, असे करून उपयोग नाही असे म्हणायचे आहे

साहना's picture

17 Mar 2016 - 3:09 pm | साहना

शिवसेनेने केली अंध विद्यार्थ्याला मदत - हि बातमी आम्ही शेर करणार नाही. शिवसेना आमदाराची महिला कर्मचार्याला मारहाण हा विदिओ मात्र १०० वेळा शेर होणार. ह्यांत आश्चर्य काहीच नाही. कुत्रा माणसाला चावला हि बातमी होत नाही, माणसाने कुत्र्याचा चावा घेतला हि बातमी बनते.

ज्या गोष्टीत "Information gain" जास्त आहे ती बातमी बनते. नरेंद्र मोदिनी ढोकळा खाल्ला हि बातमी नाही पण नरेंद्र मोदिनी खाल्ला बीफ पकोडा हि फार मोठी बातमी आहे करण ह्या दुसर्या बातमीत पहिल्या बातमी पेक्शा जास्त माहिती दडलेली आहे.

मिडीयाला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवसेनेला किंवा इतर कुणाला कितीही वायीत तर्हेने दाखवले तरी शेवटी मत देताना लोक इतर अनेक विषयांचा विचार करून देतात. मिडीयाला लोक भाव देत असते तर आज राहुल पंतप्रधान आणि मोदी जेल मध्ये असते.

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 3:38 pm | तर्राट जोकर

तुम्ही त्या महिला कर्मचार्‍याला कुत्रा म्हणत आहात काय?

बाकी शिवसेना राडेबाजी, मारहाणीशिवाय अजुन कशासाठी प्रसिद्ध आहे?

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 3:18 pm | तर्राट जोकर

ओवेसीचे पाकिस्तान्यांना सडेतोड उत्तरः

हे विडियो इथे शेअर करण्याचे कारण फक्त एवढेच की माध्यमात नेहमीच ह्या बातम्या येत नाहीत. ओवेसीची ही पण बाजू मांडली गेली पाहिजे असे वाटते. मला कुणाचाही पुळका नाही, बस कोणाबद्दल जजमेंटल होऊ नये असे वाटते. बाकी ज्याच्या त्याच्या राजकारणाप्रमाणे भ्डकाऊ भाषणे करणे ह्या देशात कोणत्याच धार्मिक-जातीय नेत्याला वर्ज्य आहे असे वाटत नाही.

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 3:31 pm | नाना स्कॉच

हाच हाच ह्याच्याचबद्दल बोलत होतो मी!

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 3:27 pm | तर्राट जोकर

अजुन एक.

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 3:46 pm | नाना स्कॉच

हाउ रे हौले! उने हैदराबादी हिंदी बोलरे यारो! क्या की किरकिरी! ऐसे आदमी कु जज करनेवालो कु मई घफला बोलेला जैसे यारो! पैराडाइस के बिरयानी की कसम!!.

बोका-ए-आझम's picture

28 Mar 2016 - 12:19 pm | बोका-ए-आझम

बावर्ची मध्ये जास्त चांगली बिर्याणी मिळते असे सांगू इच्छितो.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

17 Mar 2016 - 4:00 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

व्वा वा मस्त चर्चा
ओवेसींची दुसरी बाजू पण तपासली पाहिजे,हे यानिमित्ताने सांगू इच्छितो.
बाकि स्काॅचराव आणि जोकरराव यांच्या मुद्दे मांडण्याच्या पद्धतीमध्ये,विचारांमध्ये बरीच समानता आढळते.

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 4:11 pm | नाना स्कॉच

दोघं दारुडे!! ग्लासातल्या मैत्री अन एकमते पक्की असतात म्हणे मी :D :D

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2016 - 4:23 pm | श्री गावसेना प्रमुख

हा हा हा स्कॉच राव फक्त उतरे पर्यंतच ना?

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 5:16 pm | तर्राट जोकर

बिल कुणी द्यायचं हे ठरेपर्यंत...

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 5:49 pm | तर्राट जोकर

कन्हया खतम, अब ओवेसी शुरु.

गौमातासे आगाज हुवा, अब अंजाम-ए-सफर क्या होगा.
पांच साल जब खत्म होंगे, वजह-ए-फकर क्या होगा

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2016 - 6:05 pm | श्री गावसेना प्रमुख

बघा ना तुमचा हिरो पडद्याआड गेला कि राव'

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 7:02 pm | तर्राट जोकर

आमचे हिरो आम्हीच. आम्हाला कुणा हिरोची गरज नाही

तर्राट जोकर's picture

18 Mar 2016 - 4:49 pm | तर्राट जोकर

राष्ट्रशॉपः

फोटोशॉप वापरुन राष्ट्रीय नेत्यांची यथेच्छ खिल्ली उडवायची मुभा आहे.
फक्त संघ व भाजप यांचे सोडून. अन्यथा अटक होऊन जेलमधे जाल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Mar 2016 - 6:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाशिकला एक फरशीवाले बाबा म्हणुन कोणी आहेत. ते काविळीवर औषधोपचार करतात. (अजुन कृष्णजन्मभुमीमधे गेले नसतील तर) जवळ पडेल तुम्हाला. लवकर बरे व्हा बरं. आपल्या पिवळ्या डोळ्यांचा रंग लवकर उतरो, आपल्या प्रकृतीस लवकर उतारा पडो ह्यासाठी त्र्यंबकेश्वर समर्थ आहेचं. =))

चेक आणि मेट's picture

28 Mar 2016 - 9:19 am | चेक आणि मेट

चालायचचं आज रंगपंचमी हाय,
पिवळा रंग थोडा जास्तच वापरलाय:'(

तर्राट जोकर's picture

28 Mar 2016 - 3:56 pm | तर्राट जोकर

तुम्हाला का मिरच्या झोंबल्यात कॅप्टन? वैयक्तिक हल्ले करत आहात म्हणून म्हटलं. असे कुजकट हल्ले करण्याची मुभा आणि आयडी तरीही शाबूत राहण्याची तुम्हाला इमुनिटी प्राप्त असावी.

बाकी मुद्दे नसले की लोक वैयक्तिक विखार दाखवतात हे आता सवयीचं झालंय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Mar 2016 - 5:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठाय बॉ वैयक्तिक हल्ला? वैयक्तीक हल्ला पहायचा असेल तर आपण तुडतुडी तैंची खरडवही बघु कसं? तब्बेतीची काळजी वाटली म्हणुन आपला सल्ला दिला. आता तुम्ही त्याला जर हल्ला समजणार असाल तर मी काय करणार बॉ? आपणही एकांगी भुमिका घेउन एकाचं विशिष्ट विचारधारेला विनाकारण टारगेट करुन इथे गाळ खरवडताय. आधी एका धाग्यावर बोललो त्याप्रमाणे चांगल लिहायची क्षमता असुनही आपण ***दारी करता त्याला लोकं कंटाळलित. बाकी चालु द्या.

इम्युनिटी नाही बॉ आपल्याला.

चेक आणि मेट's picture

28 Mar 2016 - 5:11 pm | चेक आणि मेट

बादवे त्या तुडतुडी दिसत नाहीत हल्ली?

तर्राट जोकर's picture

28 Mar 2016 - 5:14 pm | तर्राट जोकर

बघा ना. जशास तसे उत्तर होते ते. तुम्हाला तुडतुडींचे बोबडे बोल मात्र खटकले नाहीत हे विशेष.

एवढीच काळजी आपण दुसर्‍या एका विशिष्ट विचारधारेच्या एकांगी आयडींबद्दल दाखवतांना दिसत नाही. मग आपल्याला मलाच सल्ला द्यायची काय हुक्की येते ब्वा? सहन होत नै का आपल्या आवडत्या विचारधारेची पिसं काढली तर?

***दारी म्हणाल तर ते करुन नंतर स्वतःच लेख मिटवून टाकणार्‍यांतला मी नाही. तुमचं काय ते बघा. 'पहले अपने गिरेबान में झांको' का काय म्हणतात ते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Apr 2016 - 10:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एवढीच काळजी आपण दुसर्‍या एका विशिष्ट विचारधारेच्या एकांगी आयडींबद्दल दाखवतांना दिसत नाही. मग आपल्याला मलाच सल्ला द्यायची काय हुक्की येते ब्वा? सहन होत नै का आपल्या आवडत्या विचारधारेची पिसं काढली तर?

नाही आवडत आवडत्या विचारधारेची पिसं काढलेली. कारण लैचं स्पष्टं आहे. आपण आधी त्या पिसांची उधळण विचारसरणीवर करता. नंतर मग पिसं काढायचा प्रयत्नं करता. तस्मात नाही आवडत. जे आहे ते दाखवा मग बोलु कसं? पण मग तुम्हाला तुमचं नेटवरचं सुलभ आणि मोफत **लय बंद करायला लागेल नै का? पोटापाण्याचा धंदा सोडवणार नाही एकदम काय?

***दारी म्हणाल तर ते करुन नंतर स्वतःच लेख मिटवून टाकणार्‍यांतला मी नाही. तुमचं काय ते बघा. 'पहले अपने गिरेबान में झांको' का काय म्हणतात ते.

तो धागा परत येणार. वेळ लागेल जरा. पण नक्की येणार. मग त्यावर मैत्रीच्या मुखवट्याआडुन वार करणारे लोक्स येउंदे नैतर कोणीपण. तुम्हाला काय वाटलं ट्रॉलिंग ला घाबरुन बंद केला धागा? गैरसमज. तुमची जी काय मतं असतील ती तुमच्या जवळ ठेवा. You are not important. Your existence is not important. Your way of thinking is not important.

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 10:51 pm | तर्राट जोकर

तुमची जी काय मतं असतील ती तुमच्या जवळ ठेवा. You are not important. Your existence is not important. Your way of thinking is not important.

>> exactly my feeling.

जॅक भौ कशाला नादी लागतायेत?
आपल्याला एवढी घाण भाषा वापरायला जमणार नाही हो!

तर्राट जोकर's picture

28 Mar 2016 - 3:30 am | तर्राट जोकर

धागा: चोरी

..>>.. भरल्या पोटावरुन एक हात फिरवता दुसर्‍या हाताने धरलेल्या टॅबवर ही कथा वाचतांना छान वाटतं.

तर्राट जोकर's picture

30 Mar 2016 - 4:25 pm | तर्राट जोकर

स्वतःच्या इभ्रतीपेक्षा पक्ष मोठा, त्याची इभ्रत मोठी असे मानणार्‍यांच्या त्याग, बलिदान अशा हुच्च विचारांना माझा राष्ट्रसलाम. टिंबटिंबटिंबदारी करणार्‍यांची विचारधारा महान आहे. जय हो!

letter

रच्याकने, वेलेंटाइनडेला प्रेमीयुगुलांना मारहाण करणार्‍यांच्या ट्रेनिंगसेशनमधे मुलेमुली एकत्र राहतात, नाचगाणे करतात. लै भारी. करोत बापडे, हम्कू क्या? हमारा तो नजरही गंदा है. छोडो.

तर्राट जोकर's picture

30 Mar 2016 - 4:31 pm | तर्राट जोकर

माननीय संपादक मंडळ,

कॄपया ह्या प्रतिसादातील पत्राचा फोटो त्वरित काढून टाकावा, त्यात सदर मुलीचे नाव असल्याचे नंतर लक्षात आले. तसदीसाठी क्षमस्व.

abp माझा ला आत्ताच बातमी आली आहे, नावासकट.

तर्राट जोकर's picture

30 Mar 2016 - 6:16 pm | तर्राट जोकर

धन्यवाद!

महिलांसोबत कथित आक्षेपार्ह वागण्याबद्दल कन्हयाला तोंड दुखेपर्यंत शिव्या घालणारे, हिरिरीने पुरावे देणारे पांडेच्या बाबतीत काय भूमिका घेतात बघूया.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2016 - 3:21 pm | श्रीगुरुजी

महिलांसोबत कथित आक्षेपार्ह वागण्याबद्दल कन्हयाला तोंड दुखेपर्यंत शिव्या घालणारे, हिरिरीने पुरावे देणारे पांडेच्या बाबतीत काय भूमिका घेतात बघूया.

कथित???? कन्हैय्याचे वागणे कथित नसून प्रत्यक्षात घडले होते. ते चौकशीत सिद्ध झालेले आहे व त्याला त्याबद्दल दंड भरावा लागला होता. तेव्हा कथित असा शब्द वापरून त्यावर पांघरूण घालू नका.

कन्हैय्याने केलेल्या व सिद्ध झालेल्या किळसवाण्या प्रकाराची आणि या गणेश पांडेच्या प्रकरणाची तुलना निदान अजूनतरी होऊ शकत नाही. कन्हैय्याने विद्यापीठात भर रस्त्यात चारचौघात विजारीची चेन उघडून लघवी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर एका मुलीने हटकल्यावर त्याने तिलाच धमक्या दिल्या. त्या मुलीने विद्यापीठात तक्रार केल्यावर चौकशी होऊन कन्हैय्याने हा घाणेरडा प्रकार केल्याचे सिद्ध होऊन त्याला ३००० रूपये दंड भरायला लागला होता.

गणेश पांडेची केस निदान सध्यातरी वेगळी आहे. त्यातले सत्य अजून बाहेर आलेले नाही. दोन्ही बाजूने आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. गणेश पांडेने ४ मार्चला आपला विनयभंग करायचा प्रयत्न केला अशी तक्रार मैथिली जावकरने तब्बल १८ दिवसांनी केली. ती तक्रार पोलिसात न करता आशिष शेलारांकडे केली. खरं तर ४ मार्चलाच तिने पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती. ती पोलिसांकडे न जाता शेलारांकडे का गेली हे समजत नाही. दोघेही राजकारणात आहेत. राजकारणातील वैयक्तिक महत्वाकांक्षा, प्रतिस्पर्धी, एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसर्‍यावर गोळी झाडणे असे अनेक अँगल आरोप करताना असू शकतात. तिथे नक्की काय झाले हे अजून पूर्णपणे बाहेर आलेले नाही. ४ मार्चला कथित विनयभंगाचा प्रकार झाल्यावर, ५ व ६ मार्चला ती आमच्याबरोबरच होती व ७ मार्चला तिने व्हॉट्सअ‍ॅपवर पांडेचे कौतुक करणारे संदेश पाठविले होते असे पांडेचे म्हणणे आहे. त्याने ते मेसेजही पत्रकारांना दाखविले. त्यामुळे यात कोण खरेखोटे बोलत आहे याविषयी अजूनतरी गोंधळ आहे. दोन्ही बाजूने वेगवेगळे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. प्रकरण अजून पोलिसांकडे गेलेले नाही.

आआपच्या जसलीन कौरने प्रसिद्धीसाठी सरबजित सिंग वर केलेला विनयभंगाचा आरोप शेवटी खोटा निघाला होता. रोहतकच्या दोन भगिनींनी बसमधील आसनावरील जागेवरून भांडण झाल्यावर विनयभंगाचे आरोप करून ३ मुलांना पट्ट्याने मारहाण केली होती. शेवटी त्या दोघी भगिनी खोटे बोलत आहेत हे सिद्ध झाले होते. जोपर्यंत या पांडे प्रकरणातील सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत दोघांपै़की कोणा एकाची बाजू घेणे टाळायला हवे.

या प्रकरणातील ही पांडेची बाजू - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ganesh-pa...

या प्रकरणातील ही मैथिली जावकरची बाजू - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ganesh-pa...

प्रसाद गोडबोले's picture

30 Mar 2016 - 5:03 pm | प्रसाद गोडबोले

१००

तर्राट जोकर's picture

2 Apr 2016 - 3:05 pm | तर्राट जोकर

जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे.

1

2

3

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2016 - 9:29 pm | श्रीगुरुजी

अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे.

म्हणे !!!!!!!!!!!!!!!!!!!!! यातच सर्व काही आलं.

बादवे, ती चित्रफीत मी संपूर्ण पाहिली. त्यातले एक वाक्य वगळता ("हा आमचा माणूस नाही ..." असं एक बो घातलेला माणूस सांगताना दिसतो) इतर काहीही ऐकू येत नाही.

तर्राट जोकर's picture

2 Apr 2016 - 11:09 pm | तर्राट जोकर

लोल्झ =)))))) चित्रफित पाहण्यसाठीच टाकली होती. बाकी सुजात आम्बेडकर (तोच तो बो घातलेला माणूस - बाबासाहेब आंबेडकरांचा पणतू आहे) ह्यांना जाऊन विचारू शकता, काय घडले ते. पुण्यातच आहेत. फर्गुसनमधे. त्यांच्या गृपमधे हा काय करत होता एकटाच ते. आणि का पकडला ते.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2016 - 2:45 pm | श्रीगुरुजी

त्या चित्रफीतीत एकसुद्धा घोषणा ऐकू येत नाही. प्रचंड गोंधळ सुरू आहे. एक मोठा घोळका आहे. कॅमेरा सतत एकडेतिकडे हलत आहे. त्यादिवशी अनेक विद्यार्थी संघटनांचे अनेक कार्यकर्ते फर्ग्युसनमध्ये आले होते. जोरदार गोंधळ सुरू होता. गोंधळात कार्यकर्ते इ़कडेतिकडे जाणे सहज शक्य आहे. या आरोपाच्या समर्थनार्थ जी चित्रफीत टाकली आहे. त्यात कोणीही एकही घोषणा देताना ऐकू येत नाही. त्यामुळे अभाविपचा कार्यकर्ता घोषणा देताना पकडला हा शुद्ध खोडसाळ आरोप आहे.

फर्ग्युसनमधील या चित्रफितीत तर एकही घोषणा ऐकू येत नाही. त्यामुळे मूळ प्रतिसादातील "जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे." हा खोडसाळ आरोप नेहमीप्रमाणे ऐकीव माहितीवर केलेला दिसतोय.

तर्राट जोकर's picture

3 Apr 2016 - 3:24 pm | तर्राट जोकर

ओ महाराज, चित्रफित पकडल्याचे दाखवते. घोषना चित्रफितित ऐकु आली पाहिजेच ह्या तुमच्या हट्टाचे काय करावे बरे? त्या घोळक्यात हजर असलेल्यांनी त्याला घोषणा देतांना पकडले. तो पकडला गेला हे दाखवण्यासाठी चित्रफित आहे. त्याने काय घोषणा दिल्यात ह्या ऐकवण्यासाठी नाही. बाकी त्याला का पकडला आणि तो तिथे काय करत होता ह्याबद्दल तुम्ही सांगा. पकडणारा आणी पकडला गेलेला दोघांचेही नाव दिले आहे. तुम्ही खात्री करुन घ्या.

अगदी महत्त्वाचा नसलेला मुद्दा कुठुनतरी काढायचा आणी मग विजयाचे ढोल पिटायचे. तुमच्या ढोलाच्या आवाजात सत्य दबत नाही.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2016 - 3:36 pm | श्रीगुरुजी

कोणी पकडला? पोलिसांनी? मग पुढे काय झाले? नक्की कोणत्या घोषणा दिल्या? कोणत्या घोषणांमुळे पकडले? नक्की कोणत्या कारणासाठी पकडले? इ.इ. गोष्टींची माहिती आहे का?

अगदी महत्त्वाचा नसलेला मुद्दा कुठुनतरी काढायचा आणी मग विजयाचे ढोल पिटायचे. तुमच्या ढोलाच्या आवाजात सत्य दबत नाही.

मी विजयाचे ढोल पिटत नाही. मी जिथे जिथे ऐकीव माहितीवर खोटे आरोप केले जातात, तिथे जाऊन सत्य समोर आणून त्या आरोपांचा खोटेपणा उघडकीला आणतो. १५ लाख परत न आणल्यास मला फासावर चढवा असे मोदी म्हणाले, हुसेनने जीवाच्या भीतिने देश सोडला, शिवसेनेच्या भगवान गोयलने हुसेनचे हात कापण्याची धमकी दिली होती या तुमच्याच पूर्वी केलेल्या आरोपांचा असत्यपणा मी सप्रमाण सिद्ध केलेला आहे व सिद्ध केल्यानंतर कोठेही ढोल पिटलेले नाहीत.

तर्राट जोकर's picture

3 Apr 2016 - 3:43 pm | तर्राट जोकर

कोणी पकडला? पोलिसांनी? मग पुढे काय झाले? नक्की कोणत्या घोषणा दिल्या? कोणत्या घोषणांमुळे पकडले? नक्की कोणत्या कारणासाठी पकडले? इ.इ. गोष्टींची माहिती आहे का?

>> तुम्हाला आहे काय?

. मी जिथे जिथे ऐकीव माहितीवर खोटे आरोप केले जातात, तिथे जाऊन सत्य समोर आणून त्या आरोपांचा खोटेपणा उघडकीला आणतो.

>> हा हा. तुम्ही राहु द्याहो. तुम्हीच वकील आणि तुम्हीच जज, तुमच्या न्यायालयात तुम्ही म्हणाल ते विश्वासार्ह आणि तुम्हाला नाय रुचलं ते खोटं असतं.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2016 - 3:47 pm | श्रीगुरुजी

>> तुम्हाला आहे काय?

तुम्हीच लिहिलंय ना देशद्रोही घोषणा देताना अभाविपचा कार्यकर्ता पकडला गेला म्हणे आणि पुरावा म्हणून एक चित्रफितही टाकलीत. आणि आता मलाच पुरावे मागताय? तुम्ही जे आरोप करताय त्याचे पुरावे मी द्यायचे का तुम्ही द्यायचे?

>> हा हा. तुम्ही राहु द्याहो. तुम्हीच वकील आणि तुम्हीच जज, तुमच्या न्यायालयात तुम्ही म्हणाल ते विश्वासार्ह आणि तुम्हाला नाय रुचलं ते खोटं असतं.

मी वकीलही नाही आणि जजही नाही. न्यायालय देखील माझे नाही. तुम्ही केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करणारे अनेक संदर्भ मी दिले आहेत. ते संदर्भ वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे आहेत. ते संदर्भ मी तयार केलेले नाहीत. आपले आरोप सिद्ध करणारा एकही संदर्भ तुम्हाला देता आलेला नाही.

तर्राट जोकर's picture

3 Apr 2016 - 3:56 pm | तर्राट जोकर

मी कुठे आरोप करतोय की त्याने घोषणा दिल्यात. 'त्याने घोषणा दिल्या म्हणून त्याला पकडले' असा हा विडियो सांगतोय. तेवढं इथं टाकलंय. आता खरं मानायचंच नसेल तर त्याला कोण काय करणार? त्याला घोषणा देण्यासाठी पकडले नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर तुम्हाला पुरावे द्यावे लागतील ना?

बाकी, मी दिलेले संदर्भ अमुकतमुकचा आहे म्हणुन तुम्ही शिक्के मारत नाकारले. ह्यात मी काय करु शकत नाही.

दिग्विजय भोसले's picture

3 Apr 2016 - 4:07 pm | दिग्विजय भोसले

माफ करा मध्येच बोलतोय

अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे

अशी अजूनतरी खात्रीलायक बातमी नाहीये.असेल तर ती स्वीकारली जाईल.
मात्र तुम्ही हा विडियो पाहिला आणि घाईने शाहनिशा न करता इथे डकवून मोकळे झालात.

तर्राट जोकर's picture

3 Apr 2016 - 4:39 pm | तर्राट जोकर

https://www.facebook.com/sujat.ambedkar?fref=ts

ह्या टाइमलाईनवर आपल्याला ह्या प्रकरनाचे अधिक डिटेल्स मिळतील.

तसे म्हटले तर जे एन यु प्रकरनाचे सत्यही अजुन पुर्ण बाहेर आले नाही. तरीही बरीच काथ्याकूटं झालीच चिंधीभर माहिती आणि टोपलंभर अंदाजांवरुन. इथे भाजपविरोधी लोकांनी खुट्ट जरी केलं तरी साद्यंत मेगाबायटी टाकणारे बघितले मग ह्याच प्रकरनाला का झाकून ठेवायचे?

दिग्विजय भोसले's picture

3 Apr 2016 - 5:25 pm | दिग्विजय भोसले

तुम्हाला तिथे हे मिळाले नाही काय?
अभाविपच्या राम सातपुतेने सुजात आंबेडकरांना लिहलेली कमेंट
सुजात नमस्कार,
आताच तुझी फेसबुक वरची चन्नवीर बंकुर या आमच्या कार्यक्रत्याबद्दलचि पोस्ट वाचली मला एक समजत तू आणि तुझ्यासोबत च्या डाव्या लोकांनी त्याला आक्षेपार्ह आणि देशद्रोही ठरवायचा जो केविलवाना प्रयत्न चालवला आहे यावरून तुमची मानसिकता लक्षात येते .मुळात तो आमचा कार्यकर्ता आहे तो भारत माता की जय ,जय भीम आशा घोषणा देत होता त्या कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह नाहीत .त्याला एवढ घाबरन्यासारख काय आहे ?
एकाबाजूला तुम्ही मान्य करत आहात की तेथे देशद्रोही घोषणा दिल्या नाहीत अस म्हणता आणि दुसऱया बाजूला त्या कार्यकर्त्याला Socail media च्या माध्यमातून बदनाम करण्याचा केविलवाना प्रकार का करत आहात ?
पराभूत मानसिकतेच तर हे लक्षण नाही ना ?

त्यावर सुजातची कमेंट पहा:-
Priya Ramji, Jai Bheem!

Ek manus aplya gatala sodun dusrya gatat jato ani tyanchat ghoshna baji karto, tyachya manasikte var tumhala prashna kase padat nahi ho?

Mi tumchya bajula basun, he manya kele ki amhi kinvha ABVP ni kontya hi Deshdrohi ghoshna dilya nahit.
Pan, tyala jar pakadle naste tar ani tyane tasech continue kela asta tar pudhe kay

देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत असे सुजात आंबेडकरच सांगत आहेत.
मग तुम्ही इतकी घाई का केलीत?

तसे म्हटले तर जे एन यु प्रकरनाचे सत्यही अजुन पुर्ण बाहेर आले नाही.

भारतातच राहता ना?
झापड ओढली असेल तर काढून टाका.

तर्राट जोकर's picture

3 Apr 2016 - 5:31 pm | तर्राट जोकर

tyala jar pakadle naste tar ani tyane tasech continue kela asta tar pudhe kay

हे टाळले काय? अभाविप किंवा सुजातच्या गृपनी घोषणा दिल्या नाहीत असे म्हटले आहे. त्या मुलाने दिल्या का कसे ह्याबद्दल नाही ते. असो. हे प्रकरण अजून संपलेले नाही. सुजात आंबेडकरला मेल धाडला आहे खुलाशाबद्दल. आला की टाकेन इथे. जे ही उत्तर येईल ते.

दिग्विजय भोसले's picture

3 Apr 2016 - 5:40 pm | दिग्विजय भोसले

जर आणि तर मध्ये काथ्याकूट होत नसतो.
त्याला जर पकडले नसते आणि त्याने तसेच कंटीन्यु केले असते तर?
म्हणजे तो त्या गृपमध्ये जाऊन जय भीम,भारत माता कि जय,या घोषणा देत होतो,पण त्याने जर आमच्या गृपमध्ये राहून देशविरोधी घोषणा दिल्या तर?
असे आहे ते साहेब.

तर्राट जोकर's picture

3 Apr 2016 - 5:56 pm | तर्राट जोकर

तो त्यांच्या गृपमधे कशाला गेला होता हे तर गुलदस्त्यातच आहे ना?

दिग्विजय भोसले's picture

3 Apr 2016 - 6:21 pm | दिग्विजय भोसले

1)जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे.
2)तो त्यांच्या गृपमधे कशाला गेला होता हे तर गुलदस्त्यातच आहे ना?
वरील दोन प्रतिसांदांमध्ये बराच फरक आहे,त्याबद्दल आभारी आहे.

मुद्दा इतकाच आहे कि तुम्ही पूर्ण माहिती नसताना तो विडीयो इथे डकवला होतात.

तर्राट जोकर's picture

3 Apr 2016 - 6:42 pm | तर्राट जोकर

पूर्ण माहिती नसतांना जे एन युत डॉक्टर्ड विडियो वर घमासान सुरु होते तेव्हा कुठे होतात साहेब?

साहेब, तो त्या गृपमधे जाण्याचे आणि पकडले जाण्याचे तर सत्य आहे ना? त्याने घोषणा दिल्या किंवा नाही हा माझा मुद्दा नाहीच, ते तर विडियो तल्या लोकांचे म्हणणे आहे, म्हणुनच म्हणे हा शब्द वापरला आहे. म्हणे म्हणजे ज्यांनी विडियो बनवला युटुब वर टाकला त्यांचे. माझा मुद्दा आहे तो त्या गृपमधे जाऊन काही घाणेरडे प्रकार करण्याच्या प्रयत्नात होता का किंवा केले का? अभाविप आणि विडियोतले लोक ह्यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य आहे हे फर्गुसनमधे सर्वांना माहिती आहे. त्यांच्यात हा ऑडमॅन आउट काय करत होता हा प्रकार दुर्लक्षिला काय हे विचारणे होते. आता तुम्ही मूळ कारनामा बाजूला ढकलून 'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार तुमच्या सोयीचा वाटतोय तेवढ्यावरच बोलत आहात. बाकी ह्या प्रकरणाचे पूर्ण सत्य दहा वर्षांनी बाहेर येईल तोपर्यंत थांबावे काय?

दिग्विजय भोसले's picture

3 Apr 2016 - 7:33 pm | दिग्विजय भोसले

'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार तुमच्या सोयीचा वाटतोय तेवढ्यावरच बोलत आहात.
आणि 'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार सोडून तुम्ही बाकिचं सगळं बोलत आहात.कारण बाकि सगळं तुमच्या सोयीचं आहे.
'भारत विरोधी घोषणा' हा तुमच्यासाठी अडचणीचा विषय आहे,हा एक असा विषय आहे कि ज्यामध्ये प्रतिवाद करायला फारसं काही शिल्लक राहत नाही.

पूर्ण माहिती नसतांना जे एन युत डॉक्टर्ड विडियो वर घमासान सुरु होते तेव्हा कुठे होतात साहेब?

म्हणजे त्यांनी केलं म्हणून यांनीही करावं,असा तुमचा आशय आहे का? डाॅक्टर्ड विडियो अभाविपने केले होते का?
ढीगभर विडियोमधले दोन विडियो डाॅक्टर्ड आढळले आहेत.बाकि तुम्ही कन्हैय्याची कितीही बाजू मांडली तरी सत्य आज उघड आहे.
डाॅक्टर्ड विडियोचे मी समर्थन करीत नाही.बाकि घमासान सुरू होते तेव्हा मी मिपावर नव्हतो.

साहेब, तो त्या गृपमधे जाण्याचे आणि पकडले जाण्याचे तर सत्य आहे ना? त्याने घोषणा दिल्या किंवा नाही हा माझा मुद्दा नाहीच, ते तर विडियो तल्या लोकांचे म्हणणे आहे,

बापरे!खरचं कि काय? मग हा प्रतिसाद काय म्हणतोय?
"जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे."
"म्हणे" हा शब्द वापरला म्हणून तुम्ही निसटू शकत नाही.ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखा प्रकार झाला हा.तुम्हाला जे हायलाईट करायचं होतं तेच तुम्ही केलं आहे.

त्यांच्यात हा ऑडमॅन आउट काय करत होता हा प्रकार दुर्लक्षिला काय हे विचारणे होते. आता तुम्ही मूळ कारनामा बाजूला ढकलून 'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार तुमच्या सोयीचा वाटतोय तेवढ्यावरच बोलत आहात. बाकी ह्या प्रकरणाचे पूर्ण सत्य दहा वर्षांनी बाहेर येईल तोपर्यंत थांबावे काय?

मुळ कारनामा देशविरोधी घोषणाबाजी हा आहे साहेब.
तो तिथे काय करत होता?हा दुय्यम कारनामा आहे.जरी त्याच्या मनात काही खोडसाळपणा असला तरी पुढे त्याला पकडल्यावर स्वतःच्या आणि संघटनेच्या बदनामीची काळजी त्याला असेल कि नाही?
मुळ कारनाम्यातला मुळ मुद्दा हा आहे कि त्याने देशविरोधी घोषणाबाजी केली नाही,आणि हे सजेत आंबेडकरच सांगतोय.बाकि त्याला तुम्ही मेल केला आहेच तर त्याचं काय म्हणणं आहे तेही सांगा.

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2016 - 2:46 pm | श्रीगुरुजी

मुळ कारनामा देशविरोधी घोषणाबाजी हा आहे साहेब.
तो तिथे काय करत होता?हा दुय्यम कारनामा आहे.जरी त्याच्या मनात काही खोडसाळपणा असला तरी पुढे त्याला पकडल्यावर स्वतःच्या आणि संघटनेच्या बदनामीची काळजी त्याला असेल कि नाही?
मुळ कारनाम्यातला मुळ मुद्दा हा आहे कि त्याने देशविरोधी घोषणाबाजी केली नाही,आणि हे सजेत आंबेडकरच सांगतोय.बाकि त्याला तुम्ही मेल केला आहेच तर त्याचं काय म्हणणं आहे तेही सांगा.

विद्यापीठात भर रस्त्यात चारचौघांसमोर लघवी करताना कन्हैय्या पकडला गेला. ते करताना एका मुलीने हटकल्यावर त्याने त्या मुलीशी गैरवर्तन केले. हे आक्षेपार्ह वर्तन त्याने केल्याचे सिद्ध होऊन त्याला तीन हजार रूपये दंड झाला. तरी यांना वाटते की ते कन्हैय्याचे ते वर्तन "कथित" आक्षेपार्ह वर्तन होते.

आणि "मी १५ लाख रूपये प्रत्येकाला न दिल्यास मला फाशी द्या, असे मोदी म्हणाले", "हुसेनने जीवाच्या भीतिने देश सोडला", "शिवसेनेच्या गोयलने हुसेनचे हात तोडल्यास ५० लाखाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते" इ. खोडसाळ अफवा १०० टक्के खर्‍या आहेत यावर मात्र यांचा ठाम विश्वास आहे.

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2016 - 2:35 pm | श्रीगुरुजी

मी कुठे आरोप करतोय की त्याने घोषणा दिल्यात. 'त्याने घोषणा दिल्या म्हणून त्याला पकडले' असा हा विडियो सांगतोय. तेवढं इथं टाकलंय. आता खरं मानायचंच नसेल तर त्याला कोण काय करणार? त्याला घोषणा देण्यासाठी पकडले नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर तुम्हाला पुरावे द्यावे लागतील ना?

त्याला पकडलं म्हणजे नक्की कोणी पकडलं? पोलिसांनी? सीबीआयने? सीआयडीने? एफबीआयने? सीआयएने? रॉने? केजीबीने? मोसादने? .... आणि पकडलं म्हणजे नक्की काय केलं? नक्की कोणत्या कारणासाठी पकडलं? या सर्व गोष्टी अजिबात माहिती नसतील तर "अभाविपचा एक कार्यकर्ता पकडला गेला. त्याने देशद्रोही घोषणा दिल्या म्हणे." असली दिशाभूल करणारी वाक्ये टाकून ज्यात एकही घोषणा ऐकू येत नाही अशी चित्रफीत इथे टाकण्याचे कारणच काय?

बाकी, मी दिलेले संदर्भ अमुकतमुकचा आहे म्हणुन तुम्ही शिक्के मारत नाकारले. ह्यात मी काय करु शकत नाही.

तुमचा एक संदर्भ म्हणजे समाजवाद्यांच्या एका संकेतस्थळावर केला गेलेला एक निराधार दावा आणि दुसरा संदर्भ म्हणजे एका ट्रॅव्हल कंपनीचे संकेतस्थळ जिथे त्यांनी आधीच लिहून ठेवले आहे की "इथे प्रसिद्ध झालेल्या राजकीय मजकूराच्या अचूकतेची खात्री नाही व त्याची सत्यासत्यता आम्ही पडताळून पाहिलेली नाही.". मुळात ट्रॅव्हल कंपनीला आपल्या संकेतस्थळावर कोणत्याही तर्‍हेने व्हेरिफाय न केलेला सिलेक्टिव्ह राजकीय मजकूर टाकण्याचे कारणच काय? असले दोन हास्यास्पद संदर्भ हा तुम्हाला आपण केलेल्या असत्य आरोपांचा पुरावा वाटतो! गंमत म्हणजे टाइम्स ऑफ ईंडिया, इंडियन एक्स्प्रेस, द हिंदू, हिंदुस्तान टाईम्स, डीएनए अशांसारख्या कोणत्याही वृत्तपत्रात हा उल्लेख नाही. एनडीटीव्ही, एबीपी न्यूज, आजतक, झी न्यूज, आयबीएन, टाईम्स नाऊ, इंडिया टीव्ही अशांसारख्या कोणत्याही वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर याचा उल्लेख नाही. वरील दोन हास्यास्पद संकेतस्थळे वगळता भारतातील कोणत्याही वृत्तसंस्थेकडे हे वृत्त नाही.

आरोह's picture

2 Apr 2016 - 10:20 pm | आरोह

जोकर भाऊ,
तुम्ही नक्की काय करता,म्हणजे मला अस विचारायचे आहे तुम्ही पोटापाण्यासाठी काय करता?
सरकारी नोकरीत आहात काय कि व्यवसाय आहे तुमचा?

कुतुहल हो दुसरं काही नाही

म्हणजे अस बघा, तुमचा संचार सर्व धाग्यांवर....बरे प्रतिसाद पण लांबलचक....आपले मत पटवण्यासाठी दिलेले लिंक्स....म्हणजे कायम इंटरनेट च्या समोर....
तुमचे एका दिवसात जेव्हढे टंकटाय ते पाहून कोणीही अवाक होईल ..

जर नोकरीत असाल तर कुठल्या नोकरीत? जिथे नेट आणि वेळ भरपूर आहे कि कुठल्या पक्षासाठी मार्केटिंग चे काम घेतलाय?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

2 Apr 2016 - 10:46 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

जोकरसाहेब एकतर आयटीवाले नोकरदार असावेत,
कारण आयटीवालेच हाफीसातलं फुक्कटचं नेट वापरून मिपावर पडीक असतात:'(::-(
किंवा स्वतःचा बिझनेस असावा,इतरांना कामाला लावून मिपावर वावरायला नामानिराळे.(ह.घ्या)

तर्राट जोकर's picture

2 Apr 2016 - 11:11 pm | तर्राट जोकर

चांगले प्रश्न. =))

आरोह's picture

3 Apr 2016 - 3:53 pm | आरोह

प्रश्न चांगले आहेत हो...पण तुम्हाला अडचणीचे आहेत असे दिसते
तुम्हाला नेट adiction झालेय का?
काही काही धाग्यांवर तर तुमचे प्रतिसाद तर दिवसभर सुरु...जसे ऑनलाइन chatting...

असो...

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 3:53 pm | तर्राट जोकर

तुम्हाला खुपतंय ते कळतंय हो,
पण काय करणार सौदीचा पैसा आहे, इसिसची नोकरी, डोक्यावर गन लावून लिहायला बसवतात दिवस दिवस.

=))