बसते बिचारी एकटी आजी -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
1 Mar 2016 - 11:20 am

बसते बिचारी एकटी आजी
देवापुढती वाती वळत
असते मुखात नामस्मरण
कधी तिचे ना कंटाळत..

गत आयुष्याचा पाढा
असते स्वत:शीच उगाळत
गालावर एखादा अश्रू
नकळत येई ओघळत..

सोसले जे आयुष्यभरात
जाईे डोळ्यासमोर तरळत
वेग वाती वळण्याचाही
जाई वाढत तसाच नकळत..

सखा जीवनातुन का गेला
सोडून अर्ध्यावरुनी पळत
आसवात का भिजती वाती
जिणे रोजचे राहीे छळत..
.

करुणकविता

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Mar 2016 - 11:23 am | मुक्त विहारि

आमच्या वडिलांची आई अशीच वाती वळत बसत असे.

असो,

आजचा दिवस तिच्याच आठवणीत जाणार...

नीलमोहर's picture

1 Mar 2016 - 11:40 am | नीलमोहर

डोळ्यांसमोर आज्जी आली, अशीच वाती वळत बसलेली,
त्या वातींसारखेच तिचेही आयुष्य..

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 12:57 pm | एक एकटा एकटाच

फार मस्त

भरत्_पलुसकर's picture

1 Mar 2016 - 1:14 pm | भरत्_पलुसकर

हे असं मागं राह्य्लेल्यांच लय अवघड आसतय जिण.

विदेश's picture

1 Mar 2016 - 2:29 pm | विदेश

मुक्त विहारि, नील मोहर, एक एकटा एकटाच, भरत_पलुसकर ...

प्रतिसादासाठी धन्यवाद !

पद्मावति's picture

1 Mar 2016 - 2:39 pm | पद्मावति

सुरेख कविता.

स्पा's picture

1 Mar 2016 - 2:42 pm | स्पा

आजीची आठवण आली
:(

एस's picture

1 Mar 2016 - 2:49 pm | एस

कविता आवडली.

बोका-ए-आझम's picture

1 Mar 2016 - 2:57 pm | बोका-ए-आझम

सुदैवाने माझ्या आज्यांवर ही वेळ आली नाही पण एखादा एकाकी वृद्ध माणूस पाहिला की उदास वाटतं.

सुमीत भातखंडे's picture

1 Mar 2016 - 8:46 pm | सुमीत भातखंडे

.

पद्मावति, स्पा, एस, बोका-ए-आझम, सुमीत भातखंडे .....

मन:पूर्वक धन्यवाद .

कविता भुतकाळात घेवुन जाते .. आवडली

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 4:12 pm | तर्राट जोकर

आमच्या समोरचे आजोबा परवाच गेले. खूप मनमिळावू, चांगले होते स्वभावाने. आजीही तशाच. दोघे कधीही कुठे जायचे असेल तर सोबतच जायचे. नेमके परवा कधी नव्हे ते आजोबा एकटेच कुठल्या तरी गावाला वर्षश्राद्धानिमित्त गेले, तिकडेच हार्टअ‍टॅक येउन गेले. घरच्यांना कुणालाही भेटायला चान्स मिळाला नाही. त्या आजींची अवस्था शब्दांपलिकडली आहे. :(

अस काही वाचल.. पाहिल की खुप वाईट वाटते ..
----

कविता पुन्हा वाचली आणि ह्या ओळी आता हेलावून गेल्या

सखा जीवनातुन का गेला
सोडून अर्ध्यावरुनी पळत
आसवात का भिजती वाती
जिणे रोजचे राहीे छळत..
.

निशांत_खाडे's picture

5 Mar 2016 - 4:12 pm | निशांत_खाडे

सोसले जे आयुष्यभरात
जाईे डोळ्यासमोर तरळत
वेग वाती वळण्याचाही
जाई वाढत तसाच नकळत..

एक नंबर..

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2016 - 9:03 pm | अत्रुप्त आत्मा

सगळी अवस्था जशीच्या तशी पकडलित की हो! :(

जव्हेरगंज's picture

6 Mar 2016 - 10:20 am | जव्हेरगंज

अप्रतिम !

नूतन सावंत's picture

6 Mar 2016 - 7:02 pm | नूतन सावंत

अप्रतिम.

विदेश's picture

22 Mar 2016 - 6:08 am | विदेश

गणेशा, तर्राट जोकर , निशांत_खाडे , आत्मबंध , जव्हेरगंज , सुरन्गी -

सर्वांचे मनापासून आभार !

सुदैवाने आज्ज्यांवर ही वेळ आली नाही पण दोन्ही आजोबा नंतर एकटेपणात हरवून गेले. ही कविता वाचून चौघेही डोळ्यासमोर आले. कविता आवडली. एकदम मनात सय दाटून आली.

विदेश's picture

23 Mar 2016 - 4:13 pm | विदेश

रेवती -
प्रतिसादासाठी धन्यवाद !

पैसा's picture

23 Mar 2016 - 5:09 pm | पैसा

सुंदर कविता.

विदेश's picture

26 Mar 2016 - 3:30 pm | विदेश

पैसा -

आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद !

पाषाणभेद's picture

27 Mar 2016 - 8:40 am | पाषाणभेद

भावलेली कविता