बिलिंदर राणी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
24 Feb 2016 - 1:27 pm

लेक लेकीची
बिलिंदर राणी
पंधरा दिवसाची छकुली
शोभते सर्वांची नानी.

मोठे-मोठे डोळे तिचे
पोपटासारखे नाक
हिमाचली चेहरा तिचा
गोरे गोरे गाल.

सकाळी सकाळी
गोड-गोड झोपते
आपल्या नानाला
किसी किसी देते.

आत्या म्हणते
गुडीया प्यारी
मावशी म्हणते
बाळ गुणी.

शेजारी म्हणती
किती-किती शांत
लोभस गोंडस
पटाईतांची नात.

डिप्लोमेट
राणी गालात हसते
सर्वांना अशी
मूर्ख बनविते .

रात्र झाली कि
खरे दात दाखविते
आईला आपल्या
रातभर जागविते .

कुशीत नानीच्या
घरभर फिरते
जरा थांबता
टाहो फोडते.

मला पाहून ती
डोळा मारते
माय लेकींची
कशी जिरवली.

लबाड आमची
बिलिंदर राणी
नानांची तिची
गट्टी जमली.

बालगीत

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Feb 2016 - 3:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

मन:पूर्वक अभिनंदन

पैजारबुवा,

खेडूत's picture

24 Feb 2016 - 3:36 pm | खेडूत

क्यूट कविता..!
बाळाला शुभेच्छा...

चांदणे संदीप's picture

24 Feb 2016 - 3:53 pm | चांदणे संदीप

अभिनंदन पटाईत काका!

Sandy

पैसा's picture

24 Feb 2016 - 5:15 pm | पैसा

आवडली तुमची राणी! आजोबा झाल्याबद्दल अभिनंदन!

यशोधरा's picture

24 Feb 2016 - 5:19 pm | यशोधरा

:)

भिंगरी's picture

24 Feb 2016 - 5:29 pm | भिंगरी

'पटाईत'आजोबा, अभिनंदन!

एस's picture

24 Feb 2016 - 5:59 pm | एस

:-)

राणीची मज्जाय !पंधरा दिवसाची होत नाही तर नाना कविता करतात तिच्यावर:)
अभिनंदन नाना झाल्याबद्दल!

रातराणी's picture

25 Feb 2016 - 12:13 am | रातराणी

अरे वा! किती गोड! वेगळ्याच जगात असाल आता तुम्ही! अभिनंदन!

बहुगुणी's picture

25 Feb 2016 - 1:19 am | बहुगुणी

राणीगीत आवडलंच.

राघवेंद्र's picture

25 Feb 2016 - 1:28 am | राघवेंद्र

:)