तुमच्या घरच्या देवघरातील मुर्ती, टाक, देवक, तांदळा इत्यादींची माहिती हवी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
9 Feb 2016 - 5:10 pm
गाभा: 

आत्ता दुसर्‍या एका मिपा धाग्यावर प्रतिमा पुजना वरुन विषय निघाला म्हणुन हा धागा काढण्याची आठवण झाली. या धाग्याचा उद्देश प्रतिमा(मुर्ती) पुजन करावे अथवा नाही असा नाही, केवळ परंपरांची नोंद/ धांडोळा घेणे एवढाच मर्यादीत उद्देश असल्यामुळे तुमचा व्यक्तिगत विश्वास असला-नसला तरीही तुमच्या घरच्या परंपरागत घरगुती देवघरांची माहिती या धाग्यात हवी आहे. या धाग्याच्या निमीत्ताने भारतातील/अथवा महाराष्ट्रातील जुन्यात जुने घरगुती देवघर आणि/अथवा मुर्ति कुठे असतील ?

१) तुमच्या घरच्या देवघराचे स्वरुप कसे आहे ? म्हणजे स्वतंत्र खोली आहे. लाकडी, दगडी अथवा संगमरवरी देवघर आहे ? माहिती असल्यास देवघर किती जुने आहे.

२) तुमच्या घरच्या पुज्य प्रतिमा/मुर्ती कशा प्रकारच्या आसनावर बसवलेल्या आहेत ?

३) तुमच्या घरी कोण कोणत्या मुर्ती/प्रतिमा/टाक/तांदळा/शिवलिंग/रुद्राक्ष/शंख (आणखी काही असेलतर) देवघरात आहेत ? जिथे जिथे माहिती असेल त्या मुर्ती इत्यादी बाबत ती केव्हा पासून आहे.

सोबतच छायाचित्रे मुर्तींची नुसती छायाचित्रे -एक उद्देश अभ्यासकांना मुर्ती अभ्यास सोपा जावा चर्चा करता यावी- तसेच वस्त्र पुजा इत्यादी सहीत (परंपरेचे निटसे आकलन होण्याच्या दृष्टीने) प्रतिसादां सोबत छायाचित्रे जोडल्यास छानच, आणि त्याही पुढे जाउन आपण स्वतः काढलेली छायाचित्रे या दुव्यावरून विकिप्रकल्पांसाठी कॉपीराईट मुक्त स्वरुपात अपलोड करणे शक्य झाल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल. (अर्थात विकिमिडीयावर चढवलेली कॉपीराइट मुक्त छायाचित्रे कुणालाही वापरण्यास आणि छायाचित्रात बदलही करण्यास मुक्त होतात याची नोंद घ्यावी)

४) तुमच्या घरी देवक आहेत का ? कोणते त्यांचे स्वरूप (इथे लक्षात घ्या देवक म्हणजे देव नव्हे देवक संकल्पनेची आ.ह.साळुंखेकृत व्याख्या "इश्वर नाहीत अशा पण इश्वर समकक्ष पूजनीय अथवा पवित्र परंतु प्रतीकांना देवक संबोधले जाते" अशी आहे. ) वर प्रमाणेच जमल्यास छायाचित्रे देवक केव्हापासून महत्व, विश्वास, परंपरा इत्यादी.

५) देवघर, देवक, टाक, तांदळा इत्यादींच्या उपासने साठी वापरली जाणारी इतर साधने जसे समया, निरांजने, घंट्या, आसने वर नमुद केल्या प्रमाणे जेथे शक्य आहे तेथे

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार

प्रतिक्रिया

चांगला शोध आहे.वाडे पाडून नवीन इमारती बांधल्या जाण्याच्या अगोदरच यांचे फोटो वगैरे काढून नोंदी करायला हव्यात.प्रसिद्ध देवघरांपैकी सज्जनगडावरचे एक आहे साडेतीनशे वर्षांचे.नेवाशात सापडतील तेराव्या शतकातील पुरावे.

आमच्या घरात पूजेचे देव नाहीत. पण महेश्वरला अहिल्याबाई होळकरांचे देवघर फार छान जपलेले आहे.शंकराच्या पिंडी,टाक शाळीग्राम,बाण इ, स्वच्छ पितळी पूजेची भांडी.खूप प्रसन्न वाटते बघून.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Feb 2016 - 7:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमच्या घरी पुजेत असलेला दत्तगुरूंचा फोटो बहुतेक ७८ का ८० वर्षे जुना आहे बहुतेक ! बाबांना विचारून कन्फर्म करायला हवे

पैसा's picture

15 Feb 2016 - 6:32 pm | पैसा

गावाला गेले की तिथून माझ्या पणजोबांनी काढलेल्या तसबिरीचे फोटो आणि सासरच्या घरातील जुन्या परंपरेने चालत आलेल्या मूर्ती, शाळिग्राम इत्यादीचे फोटो काढून देते.

माहितगार's picture

16 Feb 2016 - 3:14 am | माहितगार

अवश्य, खूप छान होईल.

माहितगार असुन तुम्हालाच नेहमी कशी हो सारखी माहिती हवी असते, हे भले मोठाले नावांचे धागे वर प्रचंड बिनकामाच्या लिंका.

माहितगार असुन तुम्हालाच नेहमी कशी हो सारखी माहिती हवी असते,

माहितगारचं इंद्रपद राखण्यासाठी माहितीगोळाकरण्याची तपश्चर्या सातत्याने चालू ठेवावी लागते म्हणून :) पण या वेळी सुचणारा मी होतो धागा विशेषतः आपल्या प्रचेतसजींच्या उपयोगाचा आहे (त्यांचा प्रतिसाद तुमच्या मागोमाग खाली जमा झालाच आहे बघा)

हे भले मोठाले नावांचे धागे

धागा लेख उघडण्याच्या आधीच वाचकांना धागा उघडावा की नाही याचा निर्णय घेणे सोपे जावे त्यांचा बहुमोल वेळ वाचावा

प्रचंड बिनकामाच्या लिंका.

कामाच्या लोकांसाठी असतात त्या :) (ह.घ्या.)

प्रचेतस's picture

15 Feb 2016 - 7:04 pm | प्रचेतस

मूर्तींची छायाचित्रे आणि त्यांच्या आयकोनोग्राफ़ीमध्ये कालानुरूप झालेले बदल पाहण्यास आवडतील.

माहितगार's picture

31 Mar 2016 - 10:16 pm | माहितगार

एका देवघरातील जुन्या मुर्तींचे एक छायाचित्र प्राप्त झाले आहे. या मुर्ती देवघरात परंपरेने आहेत कोणत्या देवतेच्या आहेत ते नविन पिढीस माहित नाही.

devagharaatIl murti

या मुर्ती कोणत्या देवतेच्या असू शकतील याचा काही कयास बांधता येऊ शकेल का ?

मधली मूर्ती बहुधा विष्णू. शंख आणि गदा (शतघ्नी) कदाचित.

ही मुर्ती विष्णुची असुन त्याच्या सोबत श्रीदेवी व भुदेवी आहेत.त्या अनुक्रमे लक्ष्मी व पृथ्वी आहेत.विष्णु राजाचं प्रतीक मानला गेल्यान संपत्ती व जमीन त्याच्या पत्नी मानल्या जातात.मुर्तीशास्त्रातील आयुध क्रमानुसार ही मुर्ती केशवाची आहे.विष्णुमुर्ती ओळखायची सोपी रीत म्हणजे, उंच कीरिट, मकर कु डंल व चक्र,गदा शंख आयुधं.

वाघमारेरोहिनी's picture

13 Dec 2018 - 11:56 am | वाघमारेरोहिनी

he Dev Balaji Ani tyachya donhi patni ahet.
Hyachya payakhali Jo unchavata ahe to prabhavaluchya khachanmadhye pakka adkvta yeto. Mi lavkarch mazya maheri aslelya ashach murti check photo takin

विजय पुरोहित's picture

31 Mar 2016 - 10:26 pm | विजय पुरोहित

१) तुमच्या घरच्या देवघराचे स्वरुप कसे आहे ? म्हणजे स्वतंत्र खोली आहे. लाकडी, दगडी अथवा संगमरवरी देवघर आहे ? माहिती असल्यास देवघर किती जुने आहे.
देवघर लाकडी चौरंग आहे. स्वतंत्र खोली आहे. लाकडी चौरंग आहे. देवघर 20 वर्षे जुने आहे.

२) तुमच्या घरच्या पुज्य प्रतिमा/मुर्ती कशा प्रकारच्या आसनावर बसवलेल्या आहेत ?
लाकडी चौरंग आणि वर लाल वस्त्र आहे.

३) तुमच्या घरी कोण कोणत्या मुर्ती/प्रतिमा/टाक/तांदळा/शिवलिंग/रुद्राक्ष/शंख (आणखी काही असेलतर) देवघरात आहेत ? जिथे जिथे माहिती असेल त्या मुर्ती इत्यादी बाबत ती केव्हा पासून आहे.
सोबतच छायाचित्रे मुर्तींची नुसती छायाचित्रे -एक उद्देश अभ्यासकांना मुर्ती अभ्यास सोपा जावा चर्चा करता यावी- तसेच वस्त्र पुजा इत्यादी सहीत (परंपरेचे निटसे आकलन होण्याच्या दृष्टीने) प्रतिसादां सोबत छायाचित्रे जोडल्यास छानच, आणि त्याही पुढे जाउन आपण स्वतः काढलेली छायाचित्रे या दुव्यावरून विकिप्रकल्पांसाठी कॉपीराईट मुक्त स्वरुपात अपलोड करणे शक्य झाल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल. (अर्थात विकिमिडीयावर चढवलेली कॉपीराइट मुक्त छायाचित्रे कुणालाही वापरण्यास आणि छायाचित्रात बदलही करण्यास मुक्त होतात याची नोंद घ्यावी)
मूर्ती: तुळजाभवानी, गणपती, गायत्री, नाग, शिवपिंड, बाळकृष्ण, पंचमुखी रूद्राक्ष एका अघोरी साधूने दिलेला, अन्नपूर्णा, कुलस्वामी नाईकबाची मूर्ती, लक्ष्मीदेवीचा अन्य कुठेही न मिळणारा गूढ फोटो आहेत.

४) तुमच्या घरी देवक आहेत का ? कोणते त्यांचे स्वरूप (इथे लक्षात घ्या देवक म्हणजे देव नव्हे देवक संकल्पनेची आ.ह.साळुंखेकृत व्याख्या "इश्वर नाहीत अशा पण इश्वर समकक्ष पूजनीय अथवा पवित्र परंतु प्रतीकांना देवक संबोधले जाते" अशी आहे. ) वर प्रमाणेच जमल्यास छायाचित्रे देवक केव्हापासून महत्व, विश्वास, परंपरा इत्यादी.
देवक फक्त नागदेवता आहे....

५) देवघर, देवक, टाक, तांदळा इत्यादींच्या उपासने साठी वापरली जाणारी इतर साधने जसे समया, निरांजने, घंट्या, आसने वर नमुद केल्या प्रमाणे जेथे शक्य आहे तेथे
बिडाची समई, चांदीचे निरांजन, पितळी घंटा आणि खास लोकरीचे आसन आहे...

विजय पुरोहित's picture

31 Mar 2016 - 10:32 pm | विजय पुरोहित

एक मोती 150 वर्षांपूर्वीचा आहे. बसरा मोती. सुंदर गोल आणि निळसर झांकेचा.

एका अघोरी साधूने दिलेला 5मुखी रूद्राक्ष आहे...

कुलस्वामिनी तुळजाभवानीची पूर्ण चांदीची मूर्ती आहे दीड किलो वजनाची.
8 वर्षांपूर्वी घरात दरोडा पडला सातार्यात. देवघरातील चांदीची घंटी व निरांजन पण चोरली चोरट्यांनी. पण देवीची मूर्ती चोरू शकले नाहीत. आश्चर्यच होते ते.

माहितगार's picture

2 Apr 2016 - 4:38 pm | माहितगार

पुरोहितजी माहितीपुर्ण प्रतिसदासाठी आभार, जुन्या मुर्तींची छायाचित्रे सवडीनुसार टाकल्यास प्रचेतस सारख्या अभ्यासकांना बरे पडेल.

कवितानागेश's picture

2 Apr 2016 - 4:11 pm | कवितानागेश

आमच्याकडे घरातली बाळकृष्णाची मूर्ती निदान १५० वर्ष जुनी असेल. बाकी सगळ्या गोष्टी नवीनच आहेत.

आमच्याकडे घरातली बाळकृष्णाची मूर्ती निदान १५० वर्ष जुनी असेल.

कशापासून बनवलेली आहे, सवडीने छायाचित्र अवश्य टाकावे.

माहितगार आपला आता धाग्यावेताळ झालाय!
एकापाठोपाठ एक जिलेब्या येतच आहेत!

माहितगार's picture

2 Apr 2016 - 4:31 pm | माहितगार

:) साहेब धागालेख फेब्रुवारीतला आहे. प्रतिसाद आत्ता येत आहेत.

पण मार्च एंडचा प्रतिसाद आपलाच आहे.
आणि बाकीही जिलब्या आहेतच!

माहितगार's picture

3 Apr 2016 - 1:12 pm | माहितगार

रचनात्मक कामाला वायफळ म्हणणारे असतात. टिकाकारांचे घर शेजारी असावे अशी म्हण आहे तेव्हा मी आपल्या मनमोकळ्या टिकेची नोंद घेतली पण हे एक रचनात्मक काम असल्यामुळे मी आपल्या भावनांचा आदर करुन दुर्लक्ष करण्या पलिकडे काही करु शकत नाही आहे. आपणास काही मदत करता येत नसल्या बद्दल क्षमस्व.

नम्रता जोशी's picture

3 Apr 2016 - 12:16 am | नम्रता जोशी

Mahitgar.. Hya murti Tirupati Balaji ani tyanchya Patni Padmavati ani Mahalakshmi hyanchya ahet.

खूप खूप धन्यवाद, अर्थात यातील महाल़क्ष्मी आणि पद्मावती वेगवेगळ्या ओळखणे शक्य आहे का / म्हणजे वेगवेगळ्या कशा ओळखावयाच्या ?

पौराणीक कथांनुसार श्रीलक्ष्मी, पद्मावती व महालक्ष्मी ह्या पुर्ण वेगळ्या देवता आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी ही विष्णुपत्नी श्रीलक्ष्मीहुन वेगळी देवता आहे.

१. श्रीलक्ष्मी ही संपत्ती व वैभवाची देवता आहे. ही समुद्र मन्थनातुन वर आली अशी कथा आहे. ही विष्णुपत्नी आहे. ही कमलवाहीनी आहे.

२. पद्मावती ही राजकुमारी बालाजीची पत्नी आहे, तिला श्रीलक्ष्मीचा अवतार मानला गेले आहे.

३. कोल्हापुरची महालक्ष्मी ही सम्पुर्ण वेगळी देवता आहे. ही पार्वतीचा अवतार अस्ल्याची चिन्हे आहेत.तिच्या मस्तकावर शिवलिंग आहे. तिच्या हातातील आयुध देखील वैष्णव परंपरेला धरुन नाहीत. तिची वाहन सुद्धा सिंह आहे जे वैष्णव परंपरेला धरुन नाही व विष्णुपत्नी ही कधीही महालक्ष्मीच्या कथांप्रमाणे असुर संहारीणी दिसुन येत नाही.