आजची उच्चभ्रू पाककृती: जो जीता वही है बंदर (चित्रपट समीक्षा)

आजवरच्या पाककृतींपेक्षा ही पाककृती जरा वेगळी आहे. कारण ही पाककृती जरी चित्रपट परीक्षणाचही असली, तरी चित्रपट हे फक्त एक निमित्त आहे. कुठलीही भाजी करताना जसे, मोहरी, कांदा, लसूण, टोमॅटो, हळद, तिखट ह्याचे मिश्रण करून मग त्यात कुठल्याही फळभाजी अथवा पालेभाजीचे तुकडे टाकून ढवळले, तर भाजी चांगलीच होते, तसे. चित्रपट परीक्षण असो, कुणा साहित्यिकाला लिहिलेले पत्र असो, किंवा इतर कुणाविषयी काहीही लिहिलेले असो, ह्यात मूळ विषय हा गौण असतो. हे सर्व साहित्य लिहिण्यामागचा उद्देश म्हणजे आपली लेखनशैली कशी उच्च दर्जाची आहे, मनात आले असते, तर गेला बाजार ज्ञानपीठ नक्कीच मिळाले असते, असे इतरांच्या मनात ठसवत रहायचे. विशेषत: कुणालाही कधीच कळलेले नाहीत अशा लेखकांच्या, कुणीही विकत न घेतलेल्या पुस्तकांतील वाक्येच्या वाक्ये उद्धृत केली, की आपली "टेस्ट" कशी वेगळी आहे, हे लोकांना कळते.

एक लक्षात ठेवायचे, की जे साहित्य लोकांना कळते, त्यावर बऱ्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात. पण जे लोकांना कधीच कळलेले नसते, ते उच्च आहे, अशी त्यांची भावना असते. त्यामुळे ज्यांनी लिहिलेले कळत नाही, असे आबानाथ गुरुजी, किंवा मजेत झोकील अशा अनवट लेखकांची जी पुस्तके प्रकाशित झाल्यावर दोन दिवसांनी आपण जुन्या बाजारातून घेतली आहेत, त्यातील परिच्छेद खुशाल वापरावेत. मग आपण लिहितोय त्या विषयाशी त्याचा संबंध नसला तरी चालेल.

विशेषत: चित्रपट परीक्षण ह्या पाककृतीत जे चित्रपट खूप लोकांनी पाहिले आहेत, आणि सुपरहिट झालेले आहेत, त्यांची यथेच्छ निंदा करावी. आपण कसे चोखंदळ रसिक आहोत, हे पटवून दिल्याशी कारण. चोखंदळ नसतो, तर वपुंच्या लेखनाचे दाखले दिले नसते का ?

आपण ज्या पुस्तकांची पारायणे करतो, ती कुणीही वाचलेली नसतात, ह्याप्रमाणेच आपण ज्या चित्रपटांची तारीफ करतो, ते देखील कुणीही पाहिलेले नसतात, ह्याची खात्री बाळगावी. कदाचित कुणी ते पहायला तिकीट काढून गेले असतील, तरी टायटल्स संपता संपता ते अजाण बालक गाढ झोपी गेले असतील, आणि त्यामुळे आपण चित्रपटाविषयी खरे लिहिले आहे की खोटे, ह्याची शहानिशा कुणीही करणार नाही, हे नक्की.

एकंदरीत, चित्रपट कुठलाही असो, त्याचे परीक्षण लिहिताना, चित्रपटाऐवजी, आपण आणि आपली अभिरुची कशी उच्च, हेच लिहीत राहावे.

असो, अशी ही सोपी पाककृती.

आता, प्रात्यक्षिक. "जो जीता वही सिकंदर" हा एक सुपर डुपर हिट चित्रपट. ह्याचे परीक्षण लिहायचे, म्हणजे अत्यंत खडूसपणे लिहायला हवे. आबानाथ गुरुजींची पुस्तके माळ्यावरून काढा. त्यात सायकल विषयी कुठली वाक्ये आहेत, ती शोधून काढा. वाटल्यास गरीब विद्यार्थी आणि श्रीमंत विद्यार्थी ह्यांचा उल्लेख व्हायला हवा. डोळ्यासमोर आयेशा जुल्काचा "पहला नशा, पहला खुमार" असला, तरी तिला तद्दन भिकार ठरवण्यासाठी आबानाथांनी स्त्रीद्वेष्टी कुठली वाक्ये लिहिली आहेत, त्याचा शोध घ्या. झाली तयारी ? आता लिहा तर.

भाउबंदकीवर महाभारतात बरेच लिहून झाल्यानंतर, अजूनही लोक तशाच कथा का लिहितात, हे कळणे अवघड आहे. हे कळायला ब्रह्मदेवाचे क्लासेस लावावे लागतील, आणि तरीही उत्तर मिळेलच असे सांगता येत नाही. केन आणि अबेल ही बायबलातील कथा, उटीच्या एका रामलाल (खरबंदा) नावाच्या गुणी माणसाच्या चहाच्या टपरीत आजही घडते, ही बॉलीवूडस्वामी परमेश्वराची कृपा आपल्यावर "जो जीता वही है बंदर" मधून होते.

"ऍम आय माय ब्रदर्स कीपर" असा प्रश्न अबेल सारखा विचारतो आणि केनचा सायकल स्पर्धेत जिंकायचा निर्धार स्वत: अतर्क्यपणे पार पाडतो, ह्या एका वाक्यात ह्या चित्रपटाचे कथानक सांगता येईल. पण हे बॉलीवूड असल्याने य़ेथील बायबलातही दर दोन सामांनतर गाणी असणारच. गाणी तशी बरी आहेत. पण नुस्त्या गाण्यांनी कथानक रंगते थोडेच ? त्यातून, संधी मिळाल्यावर काखा वर करून अंगडाई देणारी आयेशा जुल्का, गोरे रंगपे ना इतना गुमान कर, ह्या गाण्याची आठवण सतत करून देत असते.

जीवनाच्या काळोखी पायवाटेवरचे काटे मधुमेह्यांना रुतत नाहीत, तसेच ह्या चित्रपटातील भावना प्रेक्षकांपर्यंत न पोहोचवण्याची काळजी आयेशाने घेतली आहे. (इतक्या वेळी अंगडाई घेते, पण काखेत कधीही ओले वर्तुळ दिसत नाही. काळजाच्या पाण्यात भावनेचे मीठच नसेल, तर अभिनयाचा घाम कसा येणार? त्यामानाने कबीर बेदीच्या मुलीला खूप घाम येतो.)

आमीर खानने शाळकरी मुलाची भूमिका त्याच्या खुरट्या शारीरिक आणि मानसिक उंचीमुळे सुंदर निभावली आहे. पण अश्वत्थाम्याच्या भाळीचा मणी त्याला मिळाला तो "कयामत से कयामत" ह्या एका टुकार सिनेमातून, आणि तो हिरावून घेतला "जो जीता" तून. ह्या चित्रपटात त्यावर मात करतो तो, बाबूल. बाबूलचे केस, त्याचे दंड, त्याचे ते सायकल चालवणे, ह्यावर आमिर खान कधीच मात करू शकत नाही. अबेल जिंकतो शेवटी, पण केनचा पराभव होणे शक्य नाही.

वंगण नसलेल्या दुचाकीतून येणारे आवाज वापरून गाणी बनवली, म्हणजे स्वत: संगीतकार झालो, अशी जाणीव करू देणारे "बंदर" चे संगीत आहे.

ह्या चित्रपटाची एकच जमेची बाजू, म्हणजे किरण वैराळेची छोटीशी हलकी फुलकी भूमिका. ती मोहवून जाते.

(बस, इथेच संपवा. जास्त लिहिले, तर तुम्ही खरेच चित्रपट परीक्षण लिहिता आहात, आणि अनवट साहित्याकडे दुर्लक्ष होते आहे, हे वाचकांना कळेल.)

पाककृती..

मस्त आहे... करुन बघायला हवी... (तयार झालेल्या पदार्थाची स्वतः चव घेणे जरुरी नाही ना?)

खमंग..

दिवसेंनदिवस बल्लवाचार्यांच्या पाककृती स्वादिष्ट होत चालल्या आहेत,Smile
स्वाती

उत्तम

उत्तम पाकृ! Smile

आपला,
आबानाथ तात्या.

अवांतर - बाकी 'जो जिता..' हा चित्रपट आम्हाला आवडला होता. त्यातलं 'रुठके हमसे कही....' हे आमचं अतिशय आवडतं गाणं. फारच सुंदर गाणं आहे हे! Smile

आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.

ज ह ब ह र्‍या

Rolling On The Floor Rolling On The Floor Rolling On The Floor
परिक्षकांच परिक्षण अगदी मापात बसलय .. मजा आला

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

खत्रा

खत्रा परिक्षण.. ब्येस!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

ऋषिकेशशी

ऋषिकेशशी अंमळ सहमत.

अदिती

माझे एक मत

मी 'जो जीता' पाहिला आहे. मला तो खुप खुप आवडला.

तुम्हाला आवडला नसेल तर त्याची इतकी टिंगल करणे मला तरी ठीक वाटले नाही. जिंकण्याची तीव्र मनिषा आणि जिद्दीने परिस्थितीवर केलेली मात आपल्याला अयुष्यात एक मोलाचा संदेश देउन जाते. 'पहला नशा' ऐकताना कुठेतरी कॉलेजचे भारावलेले दिवस आठवून जातात. कसे ते न कळे. डोळ्याच्या कडा हलकेच ओलावतात. असो. प्रत्येकाची एक स्वतंत्र आवड असते आणि मी तुमच्या मताचा आदरच करतो.

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचे साहित्य फार काही वाचले नहिये..पण जितके वाचले वाचले आहे त्यावरुन तरी मला ते एक उच्च दर्जाचे साहित्यिक असावेत असे वाटले. तसेच सायकलचे उल्लेख त्या पुस्तकात तरी नव्ह्ते.

अमीरखानच्या 'कयामत से' मध्ये त्याच्या कपाळावरच्या मण्याचा उल्लेख केला आहेत ते कुठेतरी काळजाला भिडले मात्र. पण तो चित्रपट टुकार आहे असे म्हण्णे कुठेतरी खटकलेच.

>>अबेल जिंकतो शेवटी, पण केनचा पराभव होणे शक्य नाही.<<
हे वाक्य कुठेतरी तत्वज्ञानाला स्पर्श करुन जाते. हे फार फार आवडले.

-- (प्रतिसादांचे विडंबन करणारा) लिखाळ. Wink

:)

वा!

प्रतिसादांच्या विडंबनाची कल्पना फार फार आवडली...Smile

लिखाळा, धन्य आहे रे बाबा तुझी! Smile

तात्या आबाजी.

कळले नाही बुवा

जो जीता वर इतकी टिका????? वाचून वाईट वाटले Sad
कयामत टुकार होता???

हाहाहाहाहा

टीका 'जो जीता...' वर नाहीच मुळी; हे समीक्षण/परीक्षण चित्रपटावर नाही तर समीक्षकावर/परीक्षकावर आहे,असे दिसते.
(सूचक)बेसनलाडू

जमले नाही

चांगले विडंबन होण्यासाठी ज्याचे विडंबन करायचे ते मूळ म्याटर*सुद्धा चांगले असावे लागते असे म्हणतात.

त्यामुळे टिपिकल* सर्किटी मसाला उत्कृष्ट असूनसुद्धा चव जमली नाही. सर्किट कॅन सर्टनली डू बेटर दॅन धिस* असे वाटले.

वाचकाची विषयासक्ती टिकवून ठेवण्यासाठी विषयाची निवड योग्य ठेवावी; अन्यथा त्याची वाचनावरची वासना उडू शकते, एवढेच जाताजाता श्री. सर्किट यांना नम्रपणे सुचवावेसे वाटते.

*च्याxx जित्याची खोड आहे, इंग्रजी शब्द आणि वाक्ये आमच्या तोंडी/लेखी कडमडायचीच. मराठीभाषिक मिसळपावकरांनी आम्हाला क्षमा करावी.

भाषिक का भाषक

मराठी भाषिक का भाषक?

(अमराठी)प्रियाली Wink

आवडला

आपला लेख फारच आवडला,पटला,भावला.

मस्त

पाककृती चविष्ट.

अगदी अगदी

मान्य की बरेचसे पिक्चर भुक्कड असतात पण बरेचसे समिक्षक हे स्व:ताच्या लेखनात जास्त बुडलेले असतात Smile

बहुतांश समिक्षकांच्या यशस्वी समिक्षेचे रहस्य उलगडणारी पाकृ.

लई भारी ....राव....

यकदा try करुन बघाया पायजेल.....

आयन रँड

http://vipravani.wordpress.com/
सर्किट राव आयन रँड ची पुस्तके वाचता का तुम्ही?
वि.प्र.

पाकृ..

छान आहे. जो जीता हा मला आवडलेला सिनेमा आहे.
पण नुकत्यात मनिष ने लिहिलेल्या एका चित्रपटाचे परिक्षण ही पाकृ न वापरताही जास्ती प्रभावी होते असे वाटून गेले. कदाचित त्यामध्ये ओला नारळ आणि थोडाफार मिरचीचा ठेचा घातला असावा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विशेषत:

विशेषत: चित्रपट परीक्षण ह्या पाककृतीत जे चित्रपट खूप लोकांनी पाहिले आहेत, आणि सुपरहिट झालेले आहेत, त्यांची यथेच्छ निंदा करावी. आपण कसे चोखंदळ रसिक आहोत, हे पटवून दिल्याशी कारण. चोखंदळ नसतो, तर वपुंच्या लेखनाचे दाखले दिले नसते का ?

Smile :)

आबानाथ गुरुजी????? Smile Smile
चालू दे!!

- मनिष
(स्वगत : इथे माझीच खेचली आहे का? काही कळेना की वो!!!!!!!!)

सर्किटी चरक ( धमुचा शब्द)

(स्वगत : इथे माझीच खेचली आहे का? काही कळेना की वो!!!!!!!!)

सर्किटच्या अशा लेखानंतर परीक्षण लिहिणार्‍या प्रत्येकाला वाक्यावाक्याला वाटणारच , हा मीच की काय ??
स्वगत : अपेक्षा फार ठेवून आलो अस्ल्यमुळे असेल कदाचित पण..ग्यासुद्दिनची मज्जा आली नाही...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

(बस, इथेच

(बस, इथेच संपवा. जास्त लिहिले, तर तुम्ही खरेच चित्रपट परीक्षण लिहिता आहात, आणि अनवट साहित्याकडे दुर्लक्ष होते आहे, हे वाचकांना कळेल.)

Rolling On The Floor
(ओ सर्किट, इतकं खरं नाय लिहायचं हो. आमच्या पोटावर पाय आणता काय? Sad)

लेख जमला नाहि.

सर्किटशेठ,
आपला हा लेख फारच गुळमुळीत झाल्यासारखा वाटला.
आपला खास सर्किट टच आला नाहि असे वाटते.
पाकृतील डाळिला फोडणी फारच कमी पडलि आहे. तस्मात ये पाकृ बिलकुल जम्या नहि.

अभिज्ञ.

हेच म्हणतो

अतिशय पांचट आणि गुळगुळीत लेख झाला आहे असे वाटते. विशिष्ट समीक्षकांवर टीका करण्यात अतिरेक केल्याने अनेक ठिकाणी तोल गेला आहे असेही नमूद करावेसे वाटते. गुरुनाथ आबाजी यासारखे संदर्भहीन उल्लेखही सर्किटरावांकडून अपेक्षित नाहीत. सर्किटराव यापेक्षा अधिक चांगले लिहू शकतात. त्यांनी अनेक गोटीबंद आणि चपखल लेख लिहिले आहेत. ग्यासुद्दीन शमसुद्दीन सारखी एखादी पाककृती येऊद्या.

आपला,
(भुकेला) आजानुकर्ण

नाट्यपरीक्षणाचे वर्ग

हा हा हा!

नाट्यपरीक्षणाचे क्लासेस झाले असताना लोक असले परीक्षणांच्या कृती का लिहितात, हे कळणे अवघड आहे. इ. इ.

हा हा हा!

चांगली आहे पाकॄ!
(पण ह्यावेळी टीकेची फोडणी किंचित करपली आहे हो सर्किटराव, नाहीतर अजून चविष्ट झाली असती असे वाटते! Wink )

चतुरंग