मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून नववर्षाच्या शुभेच्छा ! (अजून येणे बाकी !!)

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
23 Dec 2015 - 10:51 am

तुर्तासतरी क्षमा असावी, (उघडल्या उघडल्या एक कविता दिसावी अशी अपेक्षा असेल तर, किमान ह्या धाग्यातून स्फुर्ती घेऊन कुणी कविता बनवून प्रकाशित करत नाही तो पर्यंत) खरे म्हणजे इतिहासातल्या मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांना भारतात त्यांच्यावर एक चित्रपट रिलीज झाल्याचे कळले आणि मस्तानीला कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्या वाटल्या अशी एक कविता/ काव्य कल्पना सुचता सुचता माझ्या मनातल्या मनात राहीली, -कविता सुचताना लगेच लिहिणेबल माहोल नाही मिळाला का कोण जाणे उगाचच जरासे अस्वस्थ वाटते - हि कवि मनाची अस्वस्थता स्वतःपाशीच न ठेवता इतरांशीही शेअर करून, 'मस्तानी कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देते आहे' ह्या रुपक कल्पनेवर इतर कुणाला काही कविता सुचतात का पहावे असा उद्देश ठेऊन धागा काढला आहे. सध्या मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांबद्दल बरीच चर्चा चालू आहेच तर मिपाकर कवि/कवियत्री मंडळी कवितेतून जरासे अभिव्यक्त होऊ शकतील का ?मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून नववर्षाच्या शुभेच्छा ! (अजून येणे बाकी आहेत बरें !!) :)

मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून नववर्षाच्या शुभेच्छा येई पर्यंत मिपाकर कवि/कवियत्रींपुढे हे एक आव्हान आणि शुभेच्छा.

mango curryकॉकटेल रेसिपीकविता

प्रतिक्रिया

अरे ओ सांभा कितना इनाम रक्खे है रे सरकार हमपर?

पैजारबुवा

माहितगार's picture

23 Dec 2015 - 3:07 pm | माहितगार

ठहरीए श्रीमंत को पुछकर बताते है.

रातराणी's picture

23 Dec 2015 - 6:44 pm | रातराणी

गुढीपाडव्यास असते हो मराठी नवीन वर्ष. इतिहास संस्कृती कशाशी मेला संबंध नाही. थांब तुला कडुनिंबाची डहाळीचं लावते खायला. हॅपी न्यू इयर म्हणा म्हणे. ;)

प्रचेतस's picture

23 Dec 2015 - 7:05 pm | प्रचेतस

गुढिपाडव्यासच कशावरून हो मराठी नववर्ष? काही विदा आहे का? उगाचच आपलं अगलतगल.

अभ्या..'s picture

23 Dec 2015 - 7:14 pm | अभ्या..

अपण २ जानेवारीपासून वर्ष मोजणारेत असे ठरलेय ना वल्ली. ;)

प्रचेतस's picture

23 Dec 2015 - 7:21 pm | प्रचेतस

जानेवारी पण परक्यांचंच, गुढीपाडव्याचंही परक्यांचच आणि विक्रम संवतही परक्यांचंच.

अता राज्याभिषेक संवत मानणे आले.

रातराणी's picture

23 Dec 2015 - 9:06 pm | रातराणी

हो का? खरंच विचारतीये. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष नाही?

प्रचेतस's picture

23 Dec 2015 - 9:40 pm | प्रचेतस

हो आणि नाहिही. म्हणजे आपल्यासाठी नाही असे मानता यावे.
बहुतेक संशोधक शालिवाहन शक हा कनिष्काने सुरु केला असे मानतात. इस. ७८ साली. त्याचे प्रांताधिपती असलेल्या शक क्षत्रपांनी ह्या कालगणनेचे निष्ठेने पालन केले. म्हणून हा शक प्रचलित राहिला. गौतमीपुत्राशी ह्याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही.

तर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाळले जाणारे विक्रम संवत हे इंडो सिथियन राज एझेस १ ह्याच्या राज्यारोहणाने (ख्रिस्तपूर्व ५८) सुरु झाले असे मानले जाते. हे संवत नंतर माळवा, राजस्थान ह्या प्रांती प्रचलित राहिले नंतर पाचव्या शतकात चंद्रगुप्त (दुसरा) अर्थात विक्रमादित्याने वाकाटकांची मदत घेऊन भडोच आणि माळवा प्रांत जिंकून शकांचा नायनाट केला तेव्हापासून ह्या संवत्सराला विक्रम संवत हे नाव मिळाले.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2015 - 9:24 am | llपुण्याचे पेशवेll

गौतमीपुत्राशी ह्याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही.
ही माहीती कुठून मिळाली?

प्रचेतस's picture

24 Dec 2015 - 9:33 am | प्रचेतस

Satavahana and Western satraps- history and Inscriptions : V. V. Mirashi
Ancient and Medieavl India: Upinder Singh

बोका-ए-आझम's picture

24 Dec 2015 - 11:29 am | बोका-ए-आझम

म्हणजे मनमोहन सिंग यांच्या सुकन्या?

प्रचेतस's picture

24 Dec 2015 - 11:42 am | प्रचेतस

हो.
पण प्रचंड विद्वान बै.

बोका-ए-आझम's picture

24 Dec 2015 - 9:23 pm | बोका-ए-आझम

;) मनमोहन सिंगही विद्वान आहेत. म्हणून तर जास्त वाईट वाटतं.

सुनील's picture

24 Dec 2015 - 11:03 am | सुनील

हैला. म्हणजे शलिवाहन शक म्हणा वा विक्रम संवत, दोन्ही शकांनी (पक्षी विदेशींनी) सुरू केले. आणि आम्ही इथे फुकाच्याच शोभायात्रा वैग्रे काढत बसतो!

नपेक्षा ३१ डिसेंबरची रात्र जागवायला कै हर्कत आहे म्हणतो मी!!

अवांतर - ते शक, हूण, कुशाण इत्यादी आता भारतीय समाजात मिसळून गेले असले तरी, सांप्रतच्या कुठल्या समाज घटकात त्यांची वैशिष्ठ्ये (शारीरिक, भाषिक इ.) जास्त प्रमाणात दिसून येतात? म्हणजे उदाहरणार्थ - आज राजपूत म्हणवणारे पूर्वाश्रमीचे शक (सरमिसळ धरून), असे म्हणता येईल काय?

प्रचेतस's picture

24 Dec 2015 - 11:24 am | प्रचेतस

राजपूतांचे मूळ श्वेत हूणांमध्ये जाते असे बहुतेक जण मानतात. कुशाण/शकांचे सांगता येत नाही.

सुनील's picture

24 Dec 2015 - 11:30 am | सुनील

धन्यवाद.

राही's picture

25 Dec 2015 - 6:57 pm | राही

आजकाल विद्यापीठांच्या इतिहासविषयक अभ्यासक्रमांतही अशीच दुरुस्ती शिकवली जाते.

प्रचेतस's picture

23 Dec 2015 - 9:40 pm | प्रचेतस

हो आणि नाहिही. म्हणजे आपल्यासाठी नाही असे मानता यावे.
बहुतेक संशोधक शालिवाहन शक हा कनिष्काने सुरु केला असे मानतात. इस. ७८ साली. त्याचे प्रांताधिपती असलेल्या शक क्षत्रपांनी ह्या कालगणनेचे निष्ठेने पालन केले. म्हणून हा शक प्रचलित राहिला. गौतमीपुत्राशी ह्याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही.

तर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाळले जाणारे विक्रम संवत हे इंडो सिथियन राज एझेस १ ह्याच्या राज्यारोहणाने (ख्रिस्तपूर्व ५८) सुरु झाले असे मानले जाते. हे संवत नंतर माळवा, राजस्थान ह्या प्रांती प्रचलित राहिले नंतर पाचव्या शतकात चंद्रगुप्त (दुसरा) अर्थात विक्रमादित्याने वाकाटकांची मदत घेऊन भडोच आणि माळवा प्रांत जिंकून शकांचा नायनाट केला तेव्हापासून ह्या संवत्सराला विक्रम संवत हे नाव मिळाले.

रातराणी's picture

24 Dec 2015 - 1:11 am | रातराणी

हायला! मग नक्की कधी करायच सेलेब्रेशन ? =))

नाखु's picture

24 Dec 2015 - 10:14 am | नाखु
  • हा दिवस नव वर्षाचा आरंभ दीन म्हणून साजरा करावा काय?

उनक चा खडा सवाल

  • दि १४ नोव्हेंबर पासून नवे वर्ष चालू करणेत यावे..

बाळ (बुद्धी) युवराजांची मागणी.

  • हुताशनी पौर्णीमेपासून नवीन संवस्तर किंवा साल चालू करावे.(आणि त्याचा विशेष भत्ता देणेत यावा)

दोन्ही सभागृहातील बोलके पोपट आणि (संधी) डोमकावळे

बाकी कल्प्ना विस्तार इतरेजनांसाठी खुला ठेवला आहे.

प्र.मात्र नाखु

प्रचेतस's picture

24 Dec 2015 - 10:19 am | प्रचेतस

=))

माहितगार's picture

24 Dec 2015 - 12:12 pm | माहितगार

=))

स्त्रीप्रधान संस्कृतीत चक्क बैलपोळ्याला नवीन वर्ष करायचा प्रस्ताव? भारीच धाडसी नाखूकाका तुम्ही.
=))

माहितगार's picture

24 Dec 2015 - 10:38 am | माहितगार

गुढीपाडव्यास असते हो मराठी नवीन वर्ष. इतिहास संस्कृती कशाशी मेला संबंध नाही. थांब तुला कडुनिंबाची डहाळीचं लावते खायला. हॅपी न्यू इयर म्हणा म्हणे. ;)

हि काव्यरचना काशीबाईंची का काय? ;)

देशपांडे विनायक's picture

24 Dec 2015 - 9:39 am | देशपांडे विनायक

पण मग आम्ही कोण म्हणायचे ?
बालक /तरुण /वृद्ध /जेष्ठ वृद्ध

माहितगार's picture

24 Dec 2015 - 12:10 pm | माहितगार

तरुण-बालक :)

माहितगार's picture

24 Dec 2015 - 12:08 pm | माहितगार

@ रातराणी आणि प्रचेतस

धाग्यात अवांतर झालच आहे तर त्यात आणखी एक, आपण सध्या साप्ताहीक सुट्टी सहसा रविवारी घेतो पण हि रविवारी सुट्टी घेण्याची पद्धत भारतीय आहे का परकीय आहे ? रविवारची साप्ताहीक सुट्टी मुळची भारतीय नसेल तर भारतीय पारंपारीक साप्ताहीक सुट्टीचा दिवस कोणता ?

मला ह्या शंका निटशा विचारता आल्या आहेत का माहित नाही पण या माझ्या मनातल्या लै जुन्या शंका आहेत त्या या निमीत्ताने विचारुन घेतो.

सुनील's picture

24 Dec 2015 - 12:13 pm | सुनील

भारतीय पारंपारीक साप्ताहीक सुट्टीचा दिवस कोणता

रैवारच काय घेऊन बसलात. मुदलात 'वार' हे संकल्पनाच परकीय आहे.

माहितगार's picture

24 Dec 2015 - 12:23 pm | माहितगार

खरंच की काय, असे काही बाही सांगू नका विवीध वारी विवीध व्रत-वैकल्य-उपासतापास करणार्‍यांना रातराणी तैंना बर्‍याच कडूनिंबाच्या डहाळ्या खाऊ खाव्या लागतील, पर्यावरणवादी आमचं कुडूनिंबाच झाड हरवलं म्हणून रातराणी तैंच्या धाग्यांवर मोर्चा काढतील :)

हय आपुन लय कमी धागे उसवतो. ते मोर्चा घेऊन येण्र्य्ना म्हणा बसा वाट बघत. अजून टैंब हाय.

प्रचेतस's picture

24 Dec 2015 - 12:38 pm | प्रचेतस

सहमत.
मला वाटते रोमन सम्राट constantine ह्याने रविवार हा सुट्टीचा वार म्हणून घोषित केला. देवाने जग सहा दिवसात निर्मिले आणि उरलेल्या शेवटच्या दिवशी त्याने सुट्टी घेतली. रविवारी काम केले तर शिक्षा दिली जात असे हल्लीच कुठेतरी वाचले होते.

भारतीयांना बहुधा साप्ताहिक सुट्टी नव्हती. ब्रिटिश मात्र रविवारी सुट्टी घेत. बहुधा कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे ह्यांनी आंदोलन करून ब्रिटिशांना भारतीयांसाठी साप्ताहिक सुट्टी द्यायला लावली होती असे मध्यंतरी वाचल्याचे आठवते.

राही's picture

25 Dec 2015 - 7:04 pm | राही

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या एका स्मरणलेखात पाठशाळेला अमावास्या, पौर्णिमा आणि अष्टमी या दिवशी सुट्टी असे, अशी एक आठवण वाचल्याचे आठवते. 'अष्टम्यां अनध्यायः' असे वचन त्यात होते. शिवाय अमावास्या-पौर्णिमा हे पर्वकाळ. तेव्हा याही दिवशीं शाळेला सुट्टी असे. सार्वजनिक सुट्टीविषयी मात्र माहिती नाही. दक्षिण भारतात अष्टमी ही तिथी आपल्या शनिवारासारखी 'न कर्त्याची तिथी' मानतात आणि सहसा कोणते शुभकर्म या दिवशी करीत नाहीत.

प्रचेतस's picture

28 Dec 2015 - 9:36 am | प्रचेतस

हे रोचक आहे.

माहितगार's picture

24 Dec 2015 - 4:57 pm | माहितगार

@ रातराणी तै

तर सर्वशी सुनील आणि प्रचेतस भाऊंनी या धागा लेखात माहिती दिली त्यावरून परकीय दिवस-वार त्यांच्या नावांचे भारतीयकरण करून करता येतात एवढेच नव्हे तर तसेच करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे तेव्हा ३१ डिसेंला संपून १ जानेला चालू होणार्‍या संवत्सर वर्षाचे आवडीनुसार त्यासंवत्सराच्या महिन्यांच्या नावांचेही भारतीयकरण करून धागा लेखास अभिप्रेत कविता करण्यात पुढाकार घ्यावा, तेही नाही जमले तर गुढी पाढवा आहे असे समजून कविता लिहावी.

महाराष्ट्रीय परंपरनुसार गुढी कोणत्याही चांगल्या प्रसंगी उभारली तरीही चालते-आपल्या कवितांचे वाचन हा चांगला प्रसंग आहे या बद्दल आजतरी मिपाकरात दुमत नाही- गुढी परंपरे बद्दलचा आमचा संशोधन धागा लेख आपण वाचला असेलच तेव्हा आपण आपली कविता एखाद्या गुढीच्या छायाचित्रासोबत सादर करण्याचे आवाहन आहे.

माहितगार's picture

24 Dec 2015 - 4:59 pm | माहितगार

कृपया सर्वश्री वाचावे संपादकांनी दुरुस्तीस मदत करावी.

रातराणी's picture

24 Dec 2015 - 6:36 pm | रातराणी

पास. बिजी हाय सध्या. म्होरल्या वर्षी बगु दादा.