मिपावरी कोनाडा असावा.....

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
9 Dec 2015 - 4:47 pm

मैत्रीण पहिली कशी मिळाली
लाइन कोठे कशी क्रॅास झाली
निसंकोच आम्हा इथे व्यक्त व्हाया
मिपावरी कोनाडा असावा.....

घरी सासू येणे कसे आवरावे
वाचाळ पत्नी, कसे शांतवावे
समस्येवरी यां चर्चा घडाया
मिपावरी कोनाडा असावा.....

कसा धीर गळतो, कसा त्रास होतो
बिछान्यावरी का वनवास होतो
उपाय त्यावर जाणून घ्याया
मिपावरी कोनाडा असावा.....

भविष्य मेनू आरोग्य ज्ञान,
उपयुक्त साहित्य प्रत्येक पान
पंचअंग भावे पुरुषस्वभावा
मिपावरी कोनाडा असावा.....

आरोग्यदायी पाककृतीबालगीत

प्रतिक्रिया

आदिजोशी's picture

9 Dec 2015 - 4:56 pm | आदिजोशी

+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

खटपट्या's picture

9 Dec 2015 - 4:56 pm | खटपट्या

वा!!
निलकांत यांनी मनावर घ्यावे ही नम्र विनंती !!

एस's picture

9 Dec 2015 - 4:59 pm | एस

'पेर्ना' पण लिहित जा की... "भिंतीवरी ..... असावे!"

स्वप्नांची राणी's picture

9 Dec 2015 - 5:12 pm | स्वप्नांची राणी

दोनच मिन्टे...की अर्धा तास..?
दो ईन्ची ससा की...असे अश्व खास...?
जल्लां..मोक्यालाच तिचा डोका का दुखावा...?
मिपावरी कोनाडा असावा.....

तुम्ही सिगरेटवरच चर्चा करणार नक्की....!!!
(वाईल्ड कार्ड येन्ट्री देणारे असं ऐकलं ब्वा....)

यांना घ्या रे कोनाड्यात!

स्वप्नांची राणी's picture

9 Dec 2015 - 5:58 pm | स्वप्नांची राणी

थैंक्यू...प्यारे नाहीतर टक्या....जबरदस्त वास्ताय आपल्याकडे..!!

वास्ताय बोले तो?
-पीआरए

स्वप्नांची राणी's picture

9 Dec 2015 - 6:23 pm | स्वप्नांची राणी

अरबी 'वशिला'...

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2015 - 10:05 am | टवाळ कार्टा

इद्दर प्यारे अस्ताना मेरेकू कायकू आवाज लगाई

वो काकी, कन्फ्यूज हो गई रे!

जव्हेरगंज's picture

9 Dec 2015 - 7:06 pm | जव्हेरगंज

_/\_

प्रमोद देर्देकर's picture

10 Dec 2015 - 8:47 am | प्रमोद देर्देकर

जल्ला किती ते टंकनसुख (तोंडसुख या धर्तीवर) घेताव.

वाईच हि जागा तरी सोडा की जरा.

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2015 - 10:05 am | टवाळ कार्टा

खि खि खि

उगा काहितरीच's picture

9 Dec 2015 - 6:05 pm | उगा काहितरीच

सदर कविता "दमामी" या कवीने रचलेली असून "मिसळपाव" इथे प्रकाशीत झाली आहे.
वरील कवितेत कवी कोनाडा मिळावा यासाठी आर्जवे करतांना दिसतो. याबरोबरच कोनाड्याची आवश्यकता का आहे याचेही सार्थ वर्णन करतो.सदरील कविता ही "भिंतीवरी कालनिर्णय असावे" या नितांतसुंदर जाहीरातीवरून बेतलेली आहे असा काही विद्वानांचा कयास आहे. पण काही विद्वान याकडे एक वेगळी कलाकृती म्हणून पाहण्यात यावे असा आग्रह करतात. तरी या कवितेचा व यापूर्वी विविध मान्यवरांनी केलेल्या विनंतीला मान देऊन मिसळपाव प्रशासन कोनाड्याला मान्यता देणार का ? हे पाहणे रोचक ठरेल.

कोनाडा हवाय कोणाला, लिहीतंय कोण!! मज्जाच मज्जा...

बॅटमॅन's picture

9 Dec 2015 - 6:49 pm | बॅटमॅन

अगदी अगदी! पण दोन्हीकडे वास्तव्य असणार्‍यांना हे जमणारच, नै का?

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2015 - 6:13 pm | अत्रुप्त आत्मा

कुणीतरी लागतच अस ,
मध्य स्थ
नाहीतर होऊन जात
स मस्त अस्ता-व्यस्त!

कवि:- मंदशेकर-भोकले!

कंजूस's picture

9 Dec 2015 - 6:36 pm | कंजूस

छान जमतं दमामि.
सूर मिले मेरा तुम्हारा फिर सूर बनोगा-------
यावरही जमवा एक फक्कड.

मेनबोर्डावर लेख प्रतिसादांस "संपादन" बटण लावा मग होऊ द्या कोनाड्याचे भूमिपुजन.कोनाड्यातलं तेल बाहेर सांडलं तर पुसता येईल आपल्यालाच.

प्रसाद गोडबोले's picture

9 Dec 2015 - 6:54 pm | प्रसाद गोडबोले

खरं सांगु का .... लैच अगलतगल कविता आहे ही ;) =))))

दमामि's picture

9 Dec 2015 - 6:56 pm | दमामि

शब्दार्थ सांगा की.=)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2015 - 7:01 pm | अत्रुप्त आत्मा

कोपेश्वर... कोपेश्वर...!

बॅटमॅन's picture

9 Dec 2015 - 7:16 pm | बॅटमॅन

अगलतगल एक सोच है.

नाखु's picture

10 Dec 2015 - 8:36 am | नाखु

अगलतगल एक सोचने वाली सोच है.

लैच अगलतगल कविता आहे ही

सहमत!!

निनाव's picture

9 Dec 2015 - 8:32 pm | निनाव

सुन्दरच कविता. ह्य विषयास एक छान स्पर्श दिले आहे.

दमामि's picture

10 Dec 2015 - 6:50 am | दमामि

धन्यवाद!!

बाबा योगिराज's picture

10 Dec 2015 - 9:04 am | बाबा योगिराज

पैल्याच् बॉल पासून छक्के चौके हानलेत.
आवड्यास.

कोनाड़ेवाले बाबा.

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2015 - 10:04 am | टवाळ कार्टा

हैला...हे अत्ता वाच्लं...
भन्नाट जमेश :)

दमामि's picture

10 Dec 2015 - 7:26 pm | दमामि

मी कविता लिहिली Wed, 09/12/2015 - 16:47
आणि तुमचा प्रतिसाद - Thu, 10/12/2015 - 10:04
या उशिराचे कारण काय असावे ब्रे!;))

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2015 - 7:33 pm | टवाळ कार्टा

कारण मला तू व्यनी नै केल्ता म्ह्णून :)

तू माझ्या व्यनिला उत्तर देत नाहीस काब्ले?

सूड's picture

10 Dec 2015 - 8:57 pm | सूड

आपुलाच वाद आपणासि!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2015 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोनाड़ा पुरुषांचा आणि कळा कोणाला :)

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

10 Dec 2015 - 10:18 am | बोका-ए-आझम

तुमचा एक-एक कोनाडा देऊन सत्कार का करण्यात येऊ नये अशी शो काॅज नोटीस! देखते रहिये कोनाडेतक!

दमामि's picture

10 Dec 2015 - 10:48 am | दमामि

=))

नीलमोहर's picture

10 Dec 2015 - 7:51 pm | नीलमोहर

तुम्ही आधीच एका कोनाडयात आहात न, अजून दुसरा कशाला ?
कोनाडे शोधायचा भारी सोस बाई तुम्हाला !!
तिथे अंधारात कोळी बिळी लपलेले असतात हो सांभाळून र्हावा !!

अन उद्या ते एल जी बी टी क्यू वाले समजा म्हणतील,
आम्हालाबी मिपावर शेप्रेट कोनाडा हवा, तेव्हा त्यांच्या मागे मागे जाणार का तुम्ही..
कोनाडा शोधत..
बोलो बोलो टेल टेल ;)

निमो ताई आणि कोळी यांच्यात निमो ताईंच्या अथक प्रयत्नांमुळे सौहार्दपूर्ण संबंध स्थापन झाल्याचे कळते, तेव्हा कोनाड्यात तुमची वट लावेन म्हणतो.

नीलमोहर's picture

10 Dec 2015 - 9:08 pm | नीलमोहर

बरीच माहिती ठेवता/काढता हो,
बाकी तुमच्या "वट" ची गरज नाही पडायची, मिळेल मला एंट्री (हवी असेल तर.)

अय्यो, स्वखुशीने कोळी होणार तू?

नीलमोहर's picture

10 Dec 2015 - 11:11 pm | नीलमोहर

द गर्ल विथ द ड्रैगन टैटू च्या पुढील लेटेस्ट भागाचे शीर्षक माहीत आहे ना ?

- द गर्ल इन द स्पाइडर'स वेब ;)

सगळ्या 'गर्ल्स' साठी :p

दमामि's picture

10 Dec 2015 - 9:10 pm | दमामि

अहो तुम्हाला नाही, मला तुमच्या वटची गरज आहे.

नीलमोहर's picture

10 Dec 2015 - 9:29 pm | नीलमोहर

ती पण तुम्हाला ?
काहीही हं द-मामि,

'कोनाड्यात तुमची वट लावेन म्हणतो.'
- हे कोनाड्यात तुमची 'वाट' लावतो असं वाचलं,
:p