'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
9 Dec 2015 - 3:58 am

आजकाल बर्‍याचदा हे असं व्हायला लागलंय ....एखादी खुप पुर्वी ऐकलेली कवित्या मनाच्या गाभार्‍यात कोणत्यातरी अंधार्‍या कोनाड्यात खोलवर दडुन बसावी वर्षोनवर्ष..... अन कधीतरी अचानकच जसे रणरणत्या उन्हाळ्यात अचानक वळीवाची सर कोसळुन जावी तशी काहीशी कविता मनाच्या अंगणात भरभरुन बसरावी अन सारेच कसे चिंब चिंब होवुन जावे !
आजकाल बर्‍याचदा हे असं व्हायला लागलंय
________________________________________________________________________________

चॅप्टर १ :" NOW "

साधारण रात्रीचे साडे नऊ वाजुन गेले होते. नुकतीच दिवाळी उलटुन गेली होती अन आता हवे मधे गारवा चांगलाच जाणवु लागला होता.पुर्वेकडील ब्लुरीजच्या टॉवर्स मागुन आता भुरकट तांबुस रंगाचा चंद्र उगवत होता...ऑफीसमधली लोकं एकएक करुन होमड्रॉप कॅब ने घरी निघाली होती. मी मात्र पार्किंगच्या अगदी टोकाला लावलेल्या माझ्या गाडीला टेकुन उभा होतो, गाडीत भीमसेनजींच्या आवाजातील राग शुध्द केदार चालु होता, आणि माझे जवळपास सारेच काम क्लायंटला डीलीव्हर केले असल्यान आता जवळपास महिनाभर निवांतच होतो. ही अशी थंड हवेची झुळुक , उद्याच्या कामाचे काहीच टेंशन नसणे आणि राग शुध्द केदार हे काहीतरी अप्रतिम रीलॅक्सिंग मिश्रण झाले होते की शब्दात वर्णन करता येणार नाही. मी नेहमीप्रमाणेच खिशातुन मार्लबोरो कढुन शिलगावली अन निवांतपणे झुरके घेत राहिलो.
दुरवरुन आमच्या ऑफीसचे हॉमड्रॉपची लोकं हळुहळु एकेक करुन लिफ्ट मधुन बाहेर पडत होती अन पार्किंग लॉट कडे येताना दिसत होती, सगळ्यांच्या मागुन मैत्रिणींशी निवांत गप्पा मारत हसत खिदळत येत असलेली मला चित्रांगदा दिसली !

ओह्ह्ह चित्रांगदा !!
___________________________________________

चॅप्टर २ : कॉफीमशीन

जवळपास एक वर्ष होवुन गेले ह्या गोष्टीला ... जास्तच , सव्वा वर्ष वगैरे ... नुकताच क्लायंट साईटचा प्रोजेक्ट संपवुन पुण्यात परतलो होतो, तेव्हा पहिल्यांदा चित्रांगदा भेटली होती कॅन्टीन मध्ये ... नुकत्याच जॉईन झालेल्या बॅचमधे तीही जॉईन झाली असावी . कॉफीव्हेंन्डिंग मशीनच्या समोर प्रश्नार्थक चेहरा करुन उभी होती, डाव्या हातात नोट बुक अन उजव्या हातातील पेन अलगद ओठांनी पकडुन .... तीने चेहर्‍यावर आलेले तिचे केस पेनानेच कानामागे सारले, मशीनची दोन तीन बटने दाबुन पाहिली पण कॉफीमशीन काही केल्या चालेना, नो वंडर , कॉफीमशीनही बहुतेक तिला पाहुन स्टन्ड झाले असावे ... त्याचे माहीत नाही पण मला तरी तिला पाहुन बघता क्षणी कालिदास आठवला होता -

"तन्‍वी श्‍यामा शिखरिदशना पक्‍वबिम्‍बाधरोष्‍ठी
मध्‍ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्‍ननाभि:।
श्रोणीभारादलसगमना स्‍तोकनम्रा स्तनाभ्‍यां
या तत्र स्‍याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातु:।। "

अगदी तंतोतंत ! नो बेटर वर्ड्स !

मी माझा कॉफी मग घेवुन कॉफी मशीनपाशी गेलो , तिने जरासे दचकुनच माझ्याकडे पाहिले . निळसर घारे टप्पोरे डोळे.

ओह्ह गॉड , हाऊ डिड यु डु धिस !

मी जरासा कॉफी मशीनचा ट्रे हलवला मशीन रीस्टार्ट केले, तेवढाने बहुतेक ते मशीन भानावर आले असावे, त्याने व्यवस्थित कॉफी द्यायला सुरुवात केली. तिने हलकेसे हसल्यासारखे करुन कप उचलला अन टेबलकडे निघाली . मी कॉफी मशीनवर माझा कप ठेवत ठेवत, तिला ऐकु जाईल इतक्या आवाजात म्हणालो
" थ्यँक यु गिरिजासर .... यु आर वेलकम मिस ___"
ती झटकन मागे वळाल्याचे मला जाणवले, मीही जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले . माझा कॉफीचा मग घेवुन मागे वळालो ...
" हॅल्लो " चित्रांगदा म्हणाली
" हाय " मी जमेल तितके दुर्लक्षपुर्वक म्हणालो .
"थ्यॅन्क यु . आय एम अ न्यु जॉईनी, हे मशीन कसे चालते मला काहीच माहीत नाही , थॅन्क्स फॉर युवर हेल्प "
"ह्म्म "
" माय सेल्फ चित्रांगदा " तिने हसत हसत हात पुढे केला
" मी गिरीजा "
"गिरिजा ?" तीने प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
"गिरिजा अ‍ॅज इन गिरिजाप्रसाद . नाईस टु मीट यु " मी हस्तांदोलन केले

तुम्ही कधी पारिजातकचे फुल हातात घेतले आहे का ? नसेल तर तिचा हात किती नाजुक होता हे मी तुम्हाला समजाऊन सांगु शकणार नाही !

_________________________________________________________________________

चॅप्टर ३ : लीप ऑफ फेथ

पुढे पुढे गप्पा वाढत गेल्या, सगळ्यांच्या सारखे तीही 'गिरिजासर' म्हणुनच बोलु लागली होती . मी मात्र वेगळ्याच दुनियेत होतो. माझे क्रश अ‍ॅट फर्स्ट साईटचे गणित हळुहळु अवघड होत चालले होते ... तिच्या एक एक सवयी लक्षात येत होत्या , तिचे हसणे, हसता हसता चेहर्‍यावर आलेली बट हातातील पेनानेच मागे सारणे, दररोज ४ वाजता कॉफी प्यायला येणे , यायच्या आधी अगदी न चुकता मला "कॉफी ? " असे पिन्ग करणे. किंव्वा दर शुक्रवारी कायम भारतीय फॉर्मल वेयर घालुन येणे , तेव्हा अगदी न चुकता बिन्दी लावणे , इरव्ही अगदी ड्रेसकोड असल्यासारखे वेस्टर्न वेयर घालणे, ते घातल्यावर चालताना जणु आपल्याला कालिदासाची व्याख्या पाळायची सक्ती केली आहे असे वागणे. केस कायम मोकळे सोडणे , काम करताना मात्र एखादा साधासा हेयरडु करणे अन त्यात पेन्सील खोचुन ठेवणे... उफ्फ. कधी कधी आमच्या ग्रुपच्या ट्रिपला, ट्रेकला येणे , तिथे अगदी धमाल मस्ती करणे , उगाचच नवशिक्याट्रेकर सारखे लिंबु सरबत पाहुन " ओह्ह लिमोनेड लिमोनेड " वगैरे न करणे , ऑफीसच्या कामाव्यतिरिक्तच्या इतर अ‍ॅक्टीव्हीटीज सोबत अगदी आवर्जुन माझ्या अ‍ॅक्तीव्हीटीज मधे पार्टिसिपेट करणे वगैरे वगैरे . ती अगदी जुने मित्र असल्यासारखे मिक्स होत गेली... मला खरे तर कलीग्सशी मैत्री करायला आवडत नाही , पण इथे तो नियम कधी सुटत गेला कळालेच नाही ...

आमच्या डोक्यात मात्र " कोई तो रोके कोई तो टोके , इस उम्र मे अब खाओगे धोके , डर लगता है तनहा रहने मे जीं ... दिल तो बच्चा है जी " ह्या गाण्याच्या ओळी रेंगाळत होत्या.

प्रेमात पडण्याचा एकच प्रॉब्लेम असतो तुम्ही नक्की कधी पडलात हेच तुमच्या लक्षात येत नाही !

अजुन आठवते ... सात डिसेंबरची रात्र होती, ऑफीसच्या पार्किंगमधे कॅबची उभा होतो काहीतरी कारणाने आज कॅबचे श्येडुल गंडले होते. आज बहुतेक चित्रांगदा माझ्या कॅब मधे होती, ती लिफ्ट मधुन बाहेर आली, अन माझ्या कडे पाहुन प्रसन्न हसली
" सम प्रॉब्लेम विथ द कॅब्स नो ?"
"ह्म्म " माझे लक्ष तिच्या केसात खोचलेल्या पेन्सिल कडे गेले, मी नुसते डोळ्यांनीच निर्देश केला .
"आह , स्टुपिड मी ! थ्यॅन्क्स ! " असे म्हणत तिने अलगद केसातुन पेन्सिल काढली , मानेने झटकुन केस मोकळे केले !

' ओह्ह.. धिस इज इट . नाऊ ऑर नेव्हर .' मला उगाचच कोणीतरी आतुन काहीतरी सांगतय असे जाणवले, अन मी नकळत बोलुनही गेलो
" लेट्स सिट ऑन दोज बाईक्स, अजुन किती वेळ लागेल काय माहीत !"
काहीतरी फालतु गप्पा मारत आम्ही दुरवर पार्क केलेल्या बाईक्सवर जाऊन बसलो . ती काही ना काही ऑफीसातील विषय काढुन बोलत होती
"चित्रा , मला तु आवडतेस" मी अचानकच तिचे वाक्य तोडत तोडत म्हणालो.
"व्हॉट ? " तिने अगदी ठेचकाळल्यासारखे विचारले " व्हॉट ? आय मीन हाऊ ? "
" आय डोन्ट क्नो , मला माहीत नाही , बस्स मला तु आवडतेस इतकेच !"
"आय मीन ... आय मीन हाऊ इज इट पॉसिबल ? सिन्स व्हेन ?" ती अजुनही धक्का बसलेल्या स्टेटमधेच होती
"आय डोन्ट क्नो ... मे बी कॉफीमशीनपासुन. "
"दॅट लाँग ? कसं शक्य आहे ? हे काय गिरिजासर ? हे हे ह्याने सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील ? व्हाय आर यु कॉम्प्लिकेटेंग थिंग्स? धिस इज नॉट इव्हन पॉसिबल "
" मला तु आवडतेस ...बस्स ... इतकेच मला सांगायचे आहे बाकी काही नाही ." मी एकदम शांत आवाजात बोललो होतो.
"धिस इज नॉट गोईंग टू वर्काअऊट सर. धिस इज नॉट गोईंग टू वर्काअऊट "
मी काहीच बोललो नाही , फक्त तिच्या नजरेतुन नजर काढुन घेतली अन हलकेसे हसलो.
पार्किंग लॉट मधे आता कॅब्स येत होत्या, चित्रांगदा उठुन त्यांच्या कडे चालायला लागली , मी अजुनही बसुनच होतो, तिने चार पावले परत मागे येवुन म्हणाली "व्हाय आर यु डुईंग धिस ? व्हाय आर यु कॉम्प्लिकेटिंग माय लाईफ , व्हाय आर यु स्पॉईलिंग अवर फ्रेंन्डशिप ? धिस इज नॉट इव्हन पॉसिबल "
मी एकदम तिच्या नजेरेला नजर भिडवुन म्हणालो " हे बघ मी फक्त इतकेच म्हणालो आहे की मला तु आवडतेस बस्स, बाकी काहीच नाही "
तिचे डोळे ओलसर झाले होते ... मी नजर हटवली अन शुन्यात नजर लावुन बसलो . मला हलकेसे हसु आले , अशावेळी हसु यायचे काय कारण खरे तर... पण आले ... ती दोन मिनिट स्तब्ध राहिली ...
"आय नीड टाईम . मला वेळ पाहिजे विचार करायला " ती अगदी निश्चयाने बोलली...
" ह्म्म " बस्स इतकेच , बाकी मी काहीच बोललो नाही उगाचच शुन्यात पहात हलकेसे हसत राहिलो.
ती निघुन गेली . मी वळुन पाहिले तेव्हा ती कॅबच्या दाराशी उभी होती माझ्याकडे पहात ... आमची नजरा नजर झाली क्षणएकमात्र.... बस्स इतकेच !

पालखी काळाची थांबली एकदा,
बदलण्या खांदा भोईयांचा |

त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती,
पेटवून ज्योती, अंतरात |

पालखी काळाची गेली निघोनिया,
ज्योत ठेवोनिया तेवतीच |

आता वाट आहे पहायाची फक्त,
'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी |
(पालखी)

बारावीत असताना मित्राने जेव्हा ही कविता ऐकवलेली तेव्हा शष्प काही कळाले नव्हते तेव्हा मित्र म्हणालेला " कविता समजुन घ्यायची नसते .... कविता अनुभवायची असते .... कविता जगायची असते"

आज तब्बल ११ वर्षांनी ह्या वाक्याचा अर्थ उमगत होता!
______________________________________________

च्यॅप्टर ४ : अबोला

पुढे ऑफीसात काही दिवस आम्ही अबोला अबोला खेळत होतो . म्हणजे ती ऑफीसात अगदी जाणीवपुर्वक बोलणे टाळायची , येताजाता क्यँटीन मधे नजरानजर व्ह्यायचीच पण बोलणे मात्र प्रकर्षाने कामासंबंधीचेच . इतर कलीग्ज्स सोबत असताना तर अगदी जाणीवपुर्वक नजरानजरही टाळ्ली जात होती

" ये शिकस्त-ए-दीद की करवटें भी बड़ी लतीफ-ओ-जमील थी,
मैं नज़र झुका के तड़प गया , वो नज़र बचा के निकल गये..! "

एके दिवशी असेच आफ्टर ऑफीस अवर्स मध्ये कोणीच नसताना कॉफीमशीनच्या शेजारी ती दिसली, मी अगदी मनाचा निश्चय करुन तिच्या जवळ गेलो, तिने अगदी जाणीवपुर्वक अजिबात लक्ष दिले नाही .
"धिस नीड नॉट बी सो डिफिकल्ट . हे काही इतके अवघड नाहीये चित्रांगदा ! मी फक्त 'मला तु आवडतेस' इतकेच म्हणालो आहे बस्स . आय अ‍ॅम स्टिल युवर गुड फ्रेन्ड .... व्हु जस्ट लाईक्स यु ...मोअर दॅन अदर्स डु "
ती गंभीर होवुन म्हणाली " हे इतके सोप्पेही नाहीये , यु क्नो द कॉम्प्लिकेशन्स "
" हो ना . म्हणुन तर फक्त 'आवडतेस' इतकेच म्हणालो ना . "
आता मात्र ती हसत हसत म्हणाली " आय क्नो दॅट अन्ड यु अल्सो क्नो दॅट यु डोन्ट मीन दॅट , यु मीन समथिंग मोअर"
मी काहीच बोललो नाही . रादर मला जे बोलायचे होते ते तीच बोलली होती . आता काय बोलणार ह्याच्या पुढे ?
" आय अ‍ॅम स्टिल थिन्किंग, मला अजुन वेळ हवा आहे"
"तोवर काय हे असेच अबोला अबोला खेळत रहायचे का अन जो पहिल्यांदा बोलेल तो हरला ?? "
ती आता मात्र अगदी व्यवस्थित हसली " पेशन्स ...पेशन्स इज अ व्हर्च्यु गिरिजा "
मीही हसलो . त्यानंतर संवाद अगदी आधी सारखाच सुरु झाला .परत केबीन कडे जात असताना , जाता जाता मी नजरेने तिच्या केसातील पेन्सील कडे निर्देश केला , तिने मोठ्ठे डोळे करुन माझ्या कडे पाहिले , अन 'नाही' अशी मान डोलवली अन हसायला लागली ....

बाकी गिरिजा'सर' मधील 'सर' पडुन गेल्याच्या उगाचच आशावाद मला सुखावुन गेला.

_______________________________________________

च्यॅप्टर ५ : Back to NOW


साधारण रात्रीचे साडे नऊ वाजुन गेले होते. नुकतीच दिवाळी उलटुन गेली होती अन आता हवे मधे गारवा चांगलाच जाणवु लागला होता.पुर्वेकडील ब्लुरीजच्या टॉवर्स मागुन आता भ्रकट तांबुस रंगाचा चंद्र उगवत होता...ऑफीसमधली लोकं एकेक करुन पिकअप कॅब ने घरी निघाली होती. मी मात्र पार्किंगच्या अगदी टोकाला लावलेल्या माझ्या गाडीला टेकुन उभा होतो , गाडीत भीमसेनजींच्या आवाजातील राग शुध्द केदार चालु होता, आणि माझे जवळपास सारेच काम क्लायंटला डीलीव्हर केले असल्यान आता जवळपास महिनाभर निवांतच होतो. ही अशी थंड हवेची झुळुक , उद्याच्या कामाचे काहीच टेंशन नसणे आणि राग शुध्द केदार हे काहीतरी अप्रतिम रीलॅक्सिंग मिश्रण झाले होते की शब्दात वर्णन करता येणार नाही. मी नेहमीप्रमाणेच खिषातुन मार्लबोरो कढुन शिलगावली अन निवांतपणे झुरके घेत राहिलो.

लिफ्टमधुन बाहेर पडलेल्या घोळक्याच्या किलबिलाटाने मला परत ह्या क्षणात खेचुन आणले ... चित्रांगदा हसतहसत कॅबपाशी जाऊन मैत्रिणींना काहीतरी ऑफीसचे कागदपत्रे वगैरे देत होती , नंतर मात्र तिने त्यांना काहीतरी सांगितले असावे बहुतेक, उगाचच त्यांचे खिदीखिदी हसणे चालु होते. बाकी नुकताच मित्राच्या लग्नाला जाऊन आलो होतो तेव्हा अगदी वाढवलेली मोठ्ठी दाढी काढुन टाकली होती , त्यामुळे आज ऑफीसात सगळेच हसत होते, सो मला काही जास्त खास वाटले नाही .
चित्रांगदा त्यांना बाय बाय करुन माझ्या कडे यायला लागली. दॅट वॉज सर्प्रायझिंग! मी पटकन मार्लबोरो टाकुन दिली .
" हे काय आहे हे ?" ती माझ्याकडे बघत बघत अगदी मनसोक्त हसत होती "यु लूक लाईक अ कॉलेज किड "
" का ? तुला काय माझ्यापेक्षा मोठ्ठे असल्यासारखे वाटायचा कॉम्प्लेक्स येत आहे का ?" मीही हसलो .
तिने माझ्या कडे पाहुन मान डोलावली "तु ठार वेडा आहेस , कसला एकदम बाळ दिसत आहेस दाढीतच छान दिसत होतास" ते हसत हस्तच म्हणाली .
"हो का ? आम्हाला कोनी सांगितले नाही तें " मी असे बोलत असतानाच अनपेक्षितपणे तिने गाडी जवळ येवुन काचेतुन तिचि पर्स गाडीत टाकली
" अं ?" मला हे सारे अनपेक्षितच होते .
तिने माझ्या गळ्याभोवती हातांनी अलगद मिठी मारली ... " यु आर क्रेझी . तु अजुनही कॉलेजात असल्यासारखेच वागतोस "

हे सगळेच अगदी स्वप्नवत होते , मला हे सारेच अनपेक्षित होते, तिचे केस आता माझ्या चेहर्‍यावर पसरले होते , मी त्यांच्या आडुन पाहिले तर तिच्या मैत्रीणी अगदी आश्चर्यचकित होवुन आमच्याकडे पहात होत्या ,

" हॅप्पी अ‍ॅनिव्हर्सरी " ती अगदी हळु आवाजात माझ्या कानात म्हणाली अन हलकेच तिने माझ्या गालावर ओठ टेकवले...

:)

आता माझ्या लक्षात आले, एक वर्षापुर्वी ह्या इथेच आसपास झालेला आमचा संवाद मला आठवला ... अन कॅबच्या दाराशी उभेराहुन माझ्या कडे पहाणारी चित्रांगदा आठवली ...

मी हलकेसे हसत हसत डोळे मिटुन घेतली अन तिला घट्ट मिठी मारली...

इतके दिवस वाटायचे की क्षण साठवुन ठेवता आले तर किती छान होईन नै , पण आता लक्षात येत होते , की क्षणच मला गुंतवुन ठेवत होते , साठवुन ठेवत होते

आता परत ....

आता वाट आहे पहायाची फक्त,
'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी |

_______________________________________________________________________________________
(काही पात्रे, प्रसंग आणि संवाद काल्पनिक )

जीवनमानप्रतिभा

प्रतिक्रिया

लेखन आवडले! अगदी ओघवते आणि फ्रेश !!!

किसन शिंदे's picture

9 Dec 2015 - 7:19 am | किसन शिंदे

लेखन आवडलं गिरिजा सर.

दमामि's picture

9 Dec 2015 - 8:23 am | दमामि

वा! क्या बात!!

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2015 - 8:35 am | अत्रुप्त आत्मा

गिरिजा का?

.
.
.
.
का?
.
.
.
.
.
.
.
.
;)

राही's picture

9 Dec 2015 - 8:51 am | राही

छानच की.
पण 'काही पात्रे काल्पनिक'? दोनच तर पात्रे. त्यातले एक लेखकराव. म्हणजे दुसरे चक्क काल्पनिक? अरेरे.

पैसा's picture

9 Dec 2015 - 11:44 am | पैसा

लेखकराव सुद्धा काल्पनिक पात्र असू शकते की! बहुतेक आत्मचरित्रे या छानशा कादंबर्‍याच असतात ना!

नाखु's picture

9 Dec 2015 - 8:59 am | नाखु

भेटल्यावर एकदा फटकवणार आहे चांगला.... असलं काही शुभ्र तरी जीवघेणे लिहितो आणि मग....बाकी काय???

अवांतर : इतकं चांगलं (दृष्ट लागण्याजोगं)ललीत लिहितो मग का फुका वाद्विवादाची (पंगावाल्या) कास धरतो !!

अति अवांतर :जुन्या राहिलेल्या लेखांची पूर्ती करणेचे मनावर घेणे

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2015 - 10:00 am | अत्रुप्त आत्मा

टनाटनी मूळ...त्याचे वादावादि कुळ!
अशी एक म्हण आहे. ;)
असो! http://freesmileyface.net/smiley/happy/happy-wink-001.gif

यशोधरा's picture

9 Dec 2015 - 9:31 am | यशोधरा

छान लिहिलेय. आवडले.

गणामास्तर's picture

9 Dec 2015 - 9:41 am | गणामास्तर

मस्त एकदम..पेंगुळलेली सकाळ आता एकदम प्रसन्न वाटायला लागली.

अनुप ढेरे's picture

9 Dec 2015 - 9:56 am | अनुप ढेरे

आवडले!

पैसा's picture

9 Dec 2015 - 11:07 am | पैसा

पूर्वी आश्वासन दिल्याप्रमाणे भावनाबंबाळ, गोग्गोड, दवणीय, सेंटी लिखाणाचा नमुना क्र.२ का? पण लोकांना एकदाच फसवता येते बरं का!

बॅटमॅन's picture

10 Dec 2015 - 1:44 pm | बॅटमॅन

लेखन आणि लेखक यांची गल्लत झाली की काय होते हे दर्शवणारा प्रतिसाद, बघा रे सगळ्यांनी.

लॉरी टांगटूंगकर's picture

9 Dec 2015 - 10:15 am | लॉरी टांगटूंगकर

मधूनच काही तरी अतिभारी लिहीण्याची सवय बहुदा मिपावर आल्यावरच लागत असावी ...

प्रचेतस's picture

9 Dec 2015 - 10:31 am | प्रचेतस

अप्रतिम लेखन गिर्जाकाका.

मनमेघ's picture

9 Dec 2015 - 10:37 am | मनमेघ

माझ्या कवितेच्या त्या शेवटावर इतकं छान लिखाण होऊ शकेल याची कल्पना नव्ह्ती.
लिहीत रहा मित्रा.
-चैतन्य दीक्षित

pacificready's picture

9 Dec 2015 - 10:45 am | pacificready

___/\___

पशा भेट लेका. भेटच!

अभ्या..'s picture

9 Dec 2015 - 10:50 am | अभ्या..

अरे वा. मस्त मस्त लेखन.
हे गिरिजा नावाचे कॅरेक्टरच भारी आहे. ;)

सतिश गावडे's picture

9 Dec 2015 - 10:52 am | सतिश गावडे

आवडले. असे काही लिहित जा मित्रा. ते अध्यात्म वगैरे त्या क्षेत्रातील दांभिकांवर सोड.

इनिगोय's picture

9 Dec 2015 - 11:03 am | इनिगोय

क्नो, व्हू चे किरकोळ खडे वगळता गुलाबी रंग, तोही चित्रांगदा या नावासकट छान जमलाय. इच्छुकांसाठी हा व्हॅलंटाईन्स डेच्या तयारीचा रिमाइंडर म्हणावा का?

सस्नेह's picture

10 Dec 2015 - 12:42 pm | सस्नेह

क्नो, व्हू ला मीपण ठेचकाळले.

अमृत's picture

9 Dec 2015 - 11:22 am | अमृत

सिमटी हुई ये घडीया फिर से ना बिखर जाये,
इस रात मे जी ले हम, इस रात मे मर जाये.... हे गाणं आठवलं...

लिखाण खूप आवडलं प्रगो.

जातवेद's picture

9 Dec 2015 - 11:36 am | जातवेद

वा वा मस्तच.

बॅटमॅन's picture

9 Dec 2015 - 11:41 am | बॅटमॅन

हाण्ण तेजायला, मस्तच ओ गिरिजासर. लयच भारी. शेवट सुखान्त असल्याने अजून अवडले हेवेसांनल.

आपण बुवा फॅन तुमचे. डोळ्यातून पाणी काढलेत. कल्पना तर फारच छान.

पद्मावति's picture

9 Dec 2015 - 11:59 am | पद्मावति

अप्रतिम लेखनशैली. फारच मस्तं लिहिलंय.

प्रमोद देर्देकर's picture

9 Dec 2015 - 12:34 pm | प्रमोद देर्देकर

मस्तच

बोका-ए-आझम's picture

9 Dec 2015 - 12:40 pm | बोका-ए-आझम

बाकी चित्रांगदा म्हटल्यावर चित्रांगदा सिंग आलीच डोळ्यांसमोर! तिलाही हे नाव शोभून दिसतं!

भीडस्त's picture

9 Dec 2015 - 3:14 pm | भीडस्त

आवडलं

इन कम's picture

9 Dec 2015 - 7:52 pm | इन कम

खूप मस्त कथा…मला तर पार्श्वसंगीत पण ऐकू आले

आदूबाळ's picture

9 Dec 2015 - 10:08 pm | आदूबाळ

का बात! का बात!

यह याद आया:

प्रसाद गोडबोले's picture

13 Dec 2015 - 1:14 am | प्रसाद गोडबोले

निव्वळ अप्रतिम गीत आदुबाळ !

( पण गुरुदत्त म्हणाले की आम्हाला अजुनही प्यासाच आठवतो .... मग ... जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला , किंव्वा येह दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है , किंव्वा जिन्हे नाझ है हिंद पर वो कहां है ... नको राव त्या आठवणी ! हळव्या माणसाने खरंच प्यासा बघु नये राव , आठवेल तेव्हा तेव्हा सलत रहाणारी जखम करुन जातो राव हा गुरुदत्त !)

बाकी ह्या कथेची आमच्या सर्वच कंपुत जोरदार चर्चा झाल्याने आम्हाला सध्या हे गाणे आठवत आहे ... बघु पुढे मागे ह्यावरही काही तरी लिहु :)

कल चौदहवी की रात थी शब भर रहा चर्चा तेरा कुछ ने कहा ये चांद है कुछ ने कहा ये चेहरा तेरा !!
https://www.youtube.com/watch?v=ZUyn3H1xy1I

इस शहर मे किससे मिले हमसे तो छुटी महफिले
हर शख्स तेरा नाम ले हर शख्स दिवाना तेरा

:)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2015 - 8:57 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/smile/happy-nodding-smiley-face-emoticon.gif

ह्यालाच टोटली जोड़ली जाईल अशी जगजितचि अजुन एक गजल आहे..आणि तो live करेक्रमात याच वरच्यआ गजलला जोड़ूनच पेश करायचा.. सांगा ब्रे कोणती!?
बग्गु कोन्ला कोन्ला कलती!?

रातराणी's picture

15 Dec 2015 - 2:48 am | रातराणी

है परदेसमैं का गुर्जी?

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2015 - 3:10 pm | अत्रुप्त आत्मा

नाही.

कल चौदहवी की रात थी शब भर रहा चर्चा तेरा कुछ ने कहा ये चांद है कुछ ने कहा ये चेहरा तेरा !!
चेहेरा तेराsss तेरा चेहेरा..तेरा चेहेरा तेरा चेहेरा कितना सुहाना लागता है,तेरे आगे चाँद पुराना लगता है तेरा चेहेरा कितना सुहाना लगता है....

अतिशय हळूवार प्रेमकथा. शेवटी "काल्पनिक" चे डिस्क्लेमर नसते टाकले तरी चालले असते.

उगा काहितरीच's picture

10 Dec 2015 - 12:26 am | उगा काहितरीच

अगदी मस्त ... लिखाण प्रचंड आवडले.

सस्नेह's picture

10 Dec 2015 - 12:41 pm | सस्नेह

छान कथा. जराशी सुशि स्टाईल.
पण शेवट गोड हे बरे झाले.

कथानायकाच्या कुटुंबियांच्या मताबाबत उत्सुकता आहे.

कुटुंबियांचे मत घेऊनच कथा लिहिली नसेल कशावरून ?
अन्यथा शेवट 'गोड' होणे असंभवनीय !!

शक्यता नाकारता येत नाही

नाखु's picture

10 Dec 2015 - 2:58 pm | नाखु

"गोड" आहे असे बरेच जण काय आम्हीही "बोल्लो" आहेच हे आपणाचे निदर्शनास (नम्रपणे) आणू ईच्छीतो.. पाहिजे तर बंधनातील आत्म्यांस पुसणे !!!!

वि.सू: लेखक महाशय हा बदल सध्या बस्तान असलेल्या स्थाना मुळे आहे काय @@@@ पार्क.

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2015 - 1:57 pm | टवाळ कार्टा

ए क्काय आहे हे...अशक्य हल्कट प्रगो

वेल्लाभट's picture

10 Dec 2015 - 2:10 pm | वेल्लाभट

कड्डक लिवलंय राव ! सहीच्च्च !
जबरदस्त आणि एक विलक्षण तजेला असलेलं.

सौंदाळा's picture

10 Dec 2015 - 2:43 pm | सौंदाळा

+१
भटोबांशी सहमत

अद्द्या's picture

10 Dec 2015 - 3:20 pm | अद्द्या

सुं द र

दुसरे शब्द नाहीत . .

:)

हर्मायनी's picture

10 Dec 2015 - 5:43 pm | हर्मायनी

आवड्या!!! शेवट गोड केल्याबद्दल धन्यवाद! :)

अप्रतिम... अशक्य भारी लिहिलंय _/\_

तेही गालावर…
मजा ऐ ब्वौ…

अत्रुप्त आत्मा's picture

11 Dec 2015 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा

कोन आपून!? कुट तरी बगितल्या सारक वाटतंय!!!

मी-सौरभ's picture

11 Dec 2015 - 5:50 pm | मी-सौरभ

बायको जाता माहेरि
नवरा येतो मिपावरी असे तर नाहि ना??

अत्रुप्त आत्मा's picture

11 Dec 2015 - 7:02 pm | अत्रुप्त आत्मा

+१ अगदी अगदी.. असच असणारे या मेल्याचं! ;)

अभ्या..'s picture

11 Dec 2015 - 7:20 pm | अभ्या..

अव्वा बुवा. आता तुम्ही पण असेच करणार??

नीलमोहर's picture

11 Dec 2015 - 2:56 pm | नीलमोहर

अप्रतिम वातावरण निर्मिती, मनाला भिडणारे अनुभव, शायरी आणि काव्याचा सुंदर वापर, सर्व गोष्टींचा
उत्कृष्ट मिलाफ लेखात दिसून येतो.

बर्‍याचदा लेख, काही तपशील वाचतांना 'वन नाईट अ‍ॅट द कॉल सेंटर' आठवत राहिले. चेतनजी भगत यांनी आपल्याकडे शिकवणी लावली होती का कधीकाळी ?
मात्र आपल्या हृदयंगम लेखनातील सखोलता, सौंदर्य, काव्यात्मक छटा, तरलता इ. गुण त्यांच्याकडे येणे कठिणच.

वपाडाव's picture

11 Dec 2015 - 4:26 pm | वपाडाव

चेतन भगत बरोबर तुलना केल्यामुळे...
जरी शिकवण लावली होती तरीही त्यांच्याकडे अजुन ५% परावर्तित झालेले नाही...

या लेखनावर चेतन भगत चा प्रभाव जाणवतो. आवडले !!!

मज्जाय ब्वॉ गिर्जाकाकाची!!

सतिश गावडे's picture

11 Dec 2015 - 8:09 pm | सतिश गावडे

(काही पात्रे, प्रसंग आणि संवाद काल्पनिक )

हे नाही वाचले का? अर्थात मी "गालावरची ह्याप्पी आनिवर्सरी" हा भाग काल्पनिक असावा असे गृहीत धरतोय. :)

सूड's picture

15 Dec 2015 - 2:25 pm | सूड

हे नाही वाचले का?

कधी कधी असंं बोलायचंं असतं. आमच्या ग्रूपात पूर्वी एक होता, तोही मुलींच्या बाबतीत मोठ्या मोठ्या बाता करायचा मग आम्ही ढील देऊन त्याचा पतंग हवेत वर ....वर जाऊ देत मजा घेत असू. =))

अजया's picture

11 Dec 2015 - 4:23 pm | अजया

:)

स्वच्छंदी_मनोज's picture

11 Dec 2015 - 4:38 pm | स्वच्छंदी_मनोज

अप्रतीम प्रगो.

मी-सौरभ's picture

11 Dec 2015 - 5:50 pm | मी-सौरभ

मस्त ललित लेखन

प्रभाकर पेठकर's picture

13 Dec 2015 - 1:55 am | प्रभाकर पेठकर

सुंदर, खिळवून ठेवणारे लिखाण पण कथानायिकेने विचार करण्यासाठी आख्खे वर्ष खर्च करावे हे लेखकावर अन्यायकारक आहे.

रातराणी's picture

15 Dec 2015 - 2:46 am | रातराणी

सो स्वीट!

विशाल कुलकर्णी's picture

15 Dec 2015 - 2:33 pm | विशाल कुलकर्णी

बोळा निघाला तर एकदाचा ....
सुरेखच लिहीलायस यार , जियो !

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2015 - 2:44 pm | अत्रुप्त आत्मा

बोळा नै हो..., लॉक!

लई भारी's picture

21 Mar 2016 - 10:38 am | लई भारी

एकदम फ्रेश, खिळवून ठेवणारे.
सुखांत असल्यामुळे अजूनच आवडले.

भरत्_पलुसकर's picture

21 Mar 2016 - 12:25 pm | भरत्_पलुसकर

हाण! कूट फेड्शीला असं गोड गोड लिहायचं पाप?

आरवी's picture

18 Mar 2019 - 3:22 pm | आरवी
आरवी's picture

18 Mar 2019 - 3:22 pm | आरवी
आरवी's picture

18 Mar 2019 - 3:24 pm | आरवी
आरवी's picture

18 Mar 2019 - 3:24 pm | आरवी

वाह! मस्त लिहिलंय. हे वाचायचं राहून गेलं होतं.
धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद! :-)