टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
शब्द माझे पडती अपूरे...
आठवता तुझे मोहक रूप, बोलणे ते हसुनी गालांत..
होई स्मृती त्या सुंदर क्षणांची, घालविले जे तुझ्या सोबती!!
कानांचीही ओंजळ व्हावी, आवाज तुझा मी मनी वाहावा,
शब्द फक्त ते ऐकत जावे, अर्थ तयांचा निसटुनी जावा!
तू बोलावे, मी ऐकावे, काय चालले कुणास ठावे..
तुझ्यासमवे बसुनही केवळ, अस्तित्व माझे (मी) विसरून जावे!!
काळेशार ते लोभस डोळे, अथांगात त्या बुडून जावे!
केसांच्या त्या मुक्त बटांतून चंद्राचेच जणु दर्शन व्हावे!!
निरागसतेचा कळस व्हावा असे तुझे ते नितळ हास्य!
मनांत उठती भावतरंग, पापण्या तुझ्या लवतांना!
शब्द माझे पडती अपूरे वर्णन कराया तुझे!
यत्न केले कितीही परंतू पडतात अंती खुजे!!
राघव
[टीप: सदर कविता मी जालावर अगोदरही प्रकाशित केलेली आहे.]
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

कविता आवडली.
काळेशार ते लोभस डोळे, अथांगात त्या बुडून जावे!

केसांच्या त्या मुक्त बटांतून चंद्राचेच जणु दर्शन व्हावे!!
निरागसतेचा कळस व्हावा असे तुझे ते नितळ हास्य!
मनांत उठती भावतरंग, पापण्या तुझ्या लवतांना!
हे तर मस्तच.
कविता..
...छान आहे .
तू बोलावे, मी ऐकावे, काय चालले कुणास ठावे..
तुझ्यासमवे बसुनही केवळ, अस्तित्व माझे (मी) विसरून जावे!!
सुंदर !
व्वा काय कल्पना आहे
मनांत उठती भावतरंग, पापण्या तुझ्या लवतांना!
- हे अप्रतिमच,
आणि अससुध्दा होत असेल, कि
तिच्या मनांतसुध्दा भावतरंग उमटत असल्यामुळे, तिच्या पापण्या लवत असतिल
. . . . क्लासिक
राघवजी
राघवजी मस्त प्रेमकाव्य..
कानांचीही ओंजळ व्हावी, आवाज तुझा मी मनी वाहावा,
शब्द फक्त ते ऐकत जावे, अर्थ तयांचा निसटुनी जावा!
तू बोलावे, मी ऐकावे, काय चालले कुणास ठावे..
तुझ्यासमवे बसुनही केवळ, अस्तित्व माझे (मी) विसरून जावे!!
हे फार आवडल..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
आभार
प्रतिक्रिया दिलेल्या व न देऊ शकलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार
राघव.