श्रीगणेशउत्सवाबद्दल एक बाळबोध शंका

श्रीगणेशाची मिरवणुक ही विसर्जनाच्या दिवशी छान वाजत-गाजत होते. पण प्रतिष्ठापनेच्या दिवशी बर्‍याच मूर्ती केव्हा आणल्यात तेही समजत नाही. खरेतर हे उलट असायला हवे नाही? आनंदोत्सव हा श्रीगणेश येताना साजरा व्हायला हवा..अन् ते जातात तेव्हा आपण डोळ्यांत पाणी आणून त्यांना "..चैन पडेना आम्हाला" असे म्हणावयास हवे. काही समजत नाही. कुणी सांगू शकेल काय?

अवांतर:
हल्ली गणेशउत्सवात गणरायासमोर जे काही चालते ते बघता त्यांच्यासाठी तरी हा आनंदाचाच दिवस असायला हवा म्हणा!! Wink

नाही

प्रतिष्ठापनेच्या दिवशी बर्‍याच मूर्ती केव्हा आणल्यात तेही समजत नाही

निदान कोकणात तरी मुर्ती वाजत-गाजत घरी आणण्याची प्रथा आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सर्वत्रच

सर्वत्रच गणपती वाजत गाजत आणला जातो. पण विसर्जनाची मिरवणूक मात्र जास्त धडाक्यात असते. राघवरावांची शंका बरोबर आहे. हे उलट असायला हवे.

आमच्या

आमच्या कॉलनीत तरी कायम वाजत गाजतच यायचे बाप्पा.. परत जाताना मिरवणूक असायची, पण त्यात काही दम नसायचा..
तुम्ही जर मुंबई,किंवा पुण्यात निघणारी विसर्जनाची मिरवणूक म्हणत असाल, तर पटलं.. (अजुनही ठीकाणी मिरवणूकी जात असतील..मला पुण्यात गणेशोत्सव सुरू झाला, व मुंबईतही मोठी मिरवणूक निघते इतकंच माहीत. म्हणून ही दोन नावं.. उर्वरीत महाराष्ट्राला वाळीत टाकण्याचा आईशप्पथ काही विचार नाही!) .. अगदी वाजत गाजत जाते मिरवणूक.. रादर मीही त्या बँड पथकामधे सहभाग घेतला होता शाळेत असताना.. पण तेव्हाही हे विचार नाही आले.. गंमतच आहे! Smile

गणपती

गणपती येताना वाजत-गाजत येत नाहीत असे नव्हते मला म्हणायचे.
फक्त दाजिबा म्हणतात तसे ते येण्याच्या वेळेसचा जल्लोष जाण्याच्या वेळेच्या मानाने कमी असतो असेच म्हणायचेय.
बाकी गणेश विसर्जनाला मिरवणुका जवळपास सर्वत्रच निघत असाव्यात असे वाटते.

विसर्जनाच्या दिवशी खरेतर ते जाताना काही सुचेनासे झाले पाहीजे. नाही?

राघव

हल्ली

हल्ली गणेशउत्सवात गणरायासमोर जे काही चालते ते बघता त्यांच्यासाठी तरी हा आनंदाचाच दिवस असायला हवा म्हणा!!

सहमत आहे!

या विषयावरचा १ विनोद

तु तिथं मी

एका नावेमध्ये(होडी) बसुन अनेक माणसे चालली असतात. अचानक होडी ला छिद्र पडत आणि माणसं बुडु लागतात ते देवाचा धावा करतात कुणी विष्णुचा धावा करत कुणी महादेवाचा ते सर्व येवुन आपल्या भक्तांना वाचवतात. एक माणुस गणपतीचा धावा करतो . गणपति लगेच प्रगट होतो आणि नाचायला लागतो .
%% ढांगचींग ढीचांग $$ ढांगचींग ढीचांग %%
तो गणपतिला विचारतो मला वाचवायच सोडुन नाचतो काय?
गणपति म्हणतो माझ्या विसर्जनाच्या दिवशी तुम्ही नाचता ते? आता$$ माझी पाळी नाचायची
%% ढांगचींग ढीचांग $$ ढांगचींग ढीचांग %%

visit

www.devbappa.com

हॅ हॅ हॅ...

हॅ हॅ हॅ... Big Grin

राघव