टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
बासरी

मिपा अभिरुची कट्ट्याला फोन केला असता विजुभाऊं च्या बासरीचे मधुर स्वर कानी पडले...आणि मला आठवला बासरीवाला,,, बासरीचा आवाज फारच मधुर असतो...
आमच्या कॉलनी मधे बर्याच वेळेला एखादा बासरीवाला बासरी विकण्यासाठी येतो..तो आला हे त्याच्या बासरीच्या आवाजावरुन लगेच कळते..
एशाच एका दिवशी मी एका बासरीवाल्याच्या बासरीतुन निघणारे मधुर स्वर ऐकले..घराच्या खिडकीतुन पाहिले असता एक लहान मुलगा अनेक बासर्या घेऊन चालला आहे व स्वतःएक बासरी वाजवत आहे असे मला दिसले..
मी विचार केला अशा किती बासर्या तो रोज विकत असेल्?बासरी ही काय रोज रोज विकत घ्यायची वस्तु नव्हे त्या मुळे त्याची रोजची कमाई किती असेल ? असा विचार माझ्या मनात आला..
मी त्या बासरीवाल्या मुलाशी बोलायचे ठरवले,,तो जिथे चालला होता तिथ मी त्याच्या मागो माग गेलो शेवठी एकदाचा गाठला त्याला,, मी त्या लहान मुलाला विचारले ये बासरी कितने का है? त्याने २०,२५,३० रु. वेगवेगळ्या बासर्या मला दाखवल्या,,माझ्या खिशात त्यावेळेला पैसे नव्हते मी त्याला म्हंटल आहेस तिथेच थांब कुठेही जाऊ नकोस मी पैसे घेऊन येतो,,,पैसे घेऊन मी परत आलो व त्याला २५रु.देऊन एक बासरी मागीतली,,तो स्वत :च सुमदर बासरी वाजवणारा असल्यामुळे मी त्याला म्हंटले तुच दोन तीन बासर्या वाजवुन बघ आणि ज्याचा सुर चांगला आहे ती बासरी मला दे..त्याने तसेच केले दोनचार वेगवेगळ्या बासर्या वाजवुन त्याने त्यातली एक बासरी मला दिली..मला स्वतःला बासरी अजिबात वाजवता येत नाही पण त्या मुलाल एक मदत म्हणुन मी ती बासरी विकत घेणार होतो..त्याला मी विचारले कुठुन आलास तो म्हणाला भिवंडी !!मला ते ऐकुन नवल वाटलं कारण भिवंडी ते ठाणे हे अंतर तो चालत चालत आला होता ,,कारण ज्याची दिवसाची कमाई ३० ते ४० रु. आहे ते सुध्दा कोणी बासरी विकत घेतली तर!! ज्याची दिवसाची कमाई एव्हढी कमी आहे त्याला बस मधुन येणे जाणे कसे परवडणार ??...
भिवंडी ते ठाणे हे अंतर तो लहान मुलगा चालत आला होता ज्या वयात इतर मुले स्वछंदपणे बागडतात त्या वयात तो मुलगा बासर्या विकत फिरतोय !!! त्यामुळे मला वाटले स्वातंत्र्य मिळुन इतकी वर्ष झाली पण लोकांची परिस्थीती मात्र खरचं बदललेली नाही !!
खरच मेरा भारत महान कधी होणार ???
(बासरीच्या सुरांचा प्रेमी)
मदनबाण.....
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

बांबुची बासरी
बांबुची बासरी हे वाद्य असे आहे की ते तयार करायला टेंप्लेट् किंवा कोणतीही यांत्रीक पद्धत अवलंबता येत नाही.
बासरीचा पोत . जाडी , उंची डायमीटर यावर येणारा आवाज ठरत असतो.
दोन छिद्रातील अंतर आणि बासरीचा आतील डायमीटर व फुंकर मारायच्या छिद्रापासुन असलेले छिद्राचे अंतर यावर त्याचे स्केल ( पट्टी ) ठरते.
त्यामुळे बासरी बनविल्यानन्तर ती कोणत्या पट्टीची आहे हे ठरते. काही ठोकताळे असतात पण ते ठोकताळेच आहेत. नियम असे नाहीत.
बासरी साधारणतः सहा छिद्रांची असते. सात किंवा आठ छिद्रे असु शकतात.
राजस्थान /पंजाब येथे चार स्वरांच्या उभ्या बासर्या ( पावा/अलगूज) एकाच वेळेस दोन एकदम वाजवण्याची प्रथा आहे. यात एक बासरी सूर देते ( सूर पेटी सारखी)व दूसरी धून वाजवते.
बाजारात पितळी बॅकेलाईटची प्लॅस्टीकच्या बासर्या मिळतात. पण बांबुची बासरी ही जिवंत वाटते.
चांगली ट्यून केलेली बांबुची बासरी रू. १०,०००/- पर्यन्त सुद्धा असू शकते.
पाश्च्चात्य देशात स्टीलची बटाणांची बासरी वापरली जाते. याची किंमत साधारणतः ६००० डॉलर च्यावरच असते. या बासरीत तीन भाग वेगळे असतात वाजवण्याच्या वेळेस ते भाग एकमेकाना जोडले जातात. ही बासरी बनवण्याची पद्धत पूर्ण मेकॅनिकल आहे . बरीचशी क्लीष्ट आहे
या बासरीबद्दल इथे http://www.youtube.com/watch?v=DHSu0trGkRg अधीक महिती मिळेल
चीन वगैरे देशात काचेची बासरीही वाजवली जाते.
जपानी बासरीत प्रत्येक स्वरासाठी वेगवेगळी बाम्बुची नळी वापरली जाते
इथे पाहता येईल http://en.wikipedia.org/wiki/Image:Zampo%C3%B1a.jpg
फुंकर मारणार्याचा चेहेरा( त्यात हवा किती मावते) फुफ्फुस व श्वास नलीका यावरही येणारा सूर अवलंबुन असतो.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
.
.
वाईट..
भिवंडी ते ठाणे हे अंतर तो लहान मुलगा चालत आला होता ज्या वयात इतर मुले स्वछंदपणे बागडतात त्या वयात तो मुलगा बासर्या विकत फिरतोय !!!
हे वाचून वाईट वाटले.
स्वाती
भिवंडी ते
भिवंडी ते ठाणे हे अंतर तो लहान मुलगा चालत आला होता ज्या वयात इतर मुले स्वछंदपणे बागडतात त्या वयात तो मुलगा बासर्या विकत फिरतोय !!!
स्वातीसारखेच म्हणतो.. लहान मुलांचे हाल पाहवत नाहीत!
वास्तव
विकासाची फळे समाजाच्या सर्व थरांपर्यंत अद्याप पोचली नाहीत, हे खरेच. हा बासरी विक्रेता काय, शिवकाशीला फटाक्यांच्या कारखान्यात कामे करणारे बालमजूर काय किंवा अगदी हॉटेलातून फडकी मारणारे पोरे काय, कुटुंबाच्या तुटपुंज्या कमाईला हातभार लावण्यातच त्यांचे शैशव निघून जाते.
विकासदर असाच वाढता राहिला (किमान ९-१०%) तर ही परिस्थिती लवकरच पालटेल अशी आशा आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
>> विकासदर
>> विकासदर असाच वाढता राहिला (किमान ९-१०%) तर ही परिस्थिती लवकरच पालटेल अशी आशा आहे.
लवकर पालटायलाच हवी ही दयनीय स्थिती. पण या ९-१० टक्क्यांच्या विकासाची फळं त्या बासरीवाल्या आणि त्याच्यासारख्या मुलापर्यंत पोहोचतीलच याची काय खात्री?
शक्यता
खात्री नाही पण शक्यता आहे.
वाढत्या विकासदरामुळेच भारतातील कित्येक लाख लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत.
अर्थात, विषमतेची दरीदेखिल वाढली आहे पण सर्वच विकसीत देश कधी ना कधी तरी यातून गेले आहेत (आणि नंतर त्यातून बाहेर आले आहेत).
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.