टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
..कोणती संवेदना.
एक जीवन
जसा सागर,
सागरात तो एकटा..
एकाकी मनांस त्याच्या कोणती संवेदना?
आकाशी दशदिशांतून चंद्र तोही एकटा..
जीव येई - जन्म घेई,
जाई तेव्हा एकटा...
पण,
जगतांना भाव मात्र एकटा न सोडती.
गुंतवून स्वत:त ते स्वप्न त्याला दावती.
अन् स्वप्न जेव्हा स्वप्न ठरते
भावही ते मिथ्य दिसती...
अथांग या विश्वात उरतो, तोच त्याला सोबती...
एक जीवन
जसा सागर,
सागरात तो एकटा..
थिजलेल्या मनांस त्याच्या न कोणती संवेदना..
राघव
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

अन् स्वप्न
अन् स्वप्न जेव्हा स्वप्न ठरते
भावही ते मिथ्य दिसती...
अथांग या विश्वात उरतो, तोच त्याला सोबती...
मस्त!.....
जीवना चं १ कटु सत्य ...
"टची" आहे.
कीप ईट अप.....

जीव येई - जन्म घेई, जाई तेव्हा एकटा...
पण,
जगतांना भाव मात्र एकटा न सोडती.
गुंतवून स्वत:त ते स्वप्न त्याला दावती.
अन् स्वप्न जेव्हा स्वप्न ठरते
भावही ते मिथ्य दिसती...
अथांग या विश्वात उरतो, तोच त्याला सोबती...
छानच आहे ..
आभार
प्रतिसाद दिलेल्या व न देऊ शकलेल्या सर्वांचे मनापासून आभार
राघव