ऑलम्पिक पदक विजेत्यान्ना केन्द्र शासन सोडून अन्य राज्य/पालिका इत्यादी प्रशासनान्नी जनतेच्या पैशातून बक्षिसे वाटणे कितपत योग्य हे

हा जनतेचा कररुपी पैसा वापरुन केलेला राजकीय स्टण्ट वा प्रचार हे
18% (4 votes)
असे बक्षिस देण्यात काहीच हरकत नाही, तुमच्या पोटात का दुखावे? त्यामुळे विजेत्यास प्रोत्साहन मिळते
41% (9 votes)
दिल तर दिल, मला काय त्याचे?
0% (0 votes)
सगळेच देतात, मग त्यान्नी मागे का रहावे?
0% (0 votes)
बक्षिसाऐवजी खरोखर खेळाकरता काही भरीव खर्च व्हावा, जिन्कण्याआधी "प्रोत्साहन" मिळाले तर बरे!
41% (9 votes)
एकुण मतं : 22

हा पोल

हा पोल उघडण्यामागे http://www.maayboli.com/node/3027 येथिल चर्चेचा सन्दर्भ हे!
अर्थात इथे पोल घेताना "पुणे" हा शब्द कटाक्षाने "टाळला आहे" हे व याचे कारण सुज्ञान्च्या लक्षात आलेच असेल! Tongue
अर्थातच, असले प्रश्ण, प्रथमतः पुणेरी लोकान्नाच पडतात, त्यावर चर्चा झडतात, मग बाकीची लोक हळू हळू जागी होऊ लागतात Big Grin
पुणेरी लोकान्ना प्रश्ण पडून त्यावर काय काय "उद्बोधक" चर्चा होते ते कळण्यासाठी वरील एक दुवा सन्दर्भाकरीता दिला हे! Smile
होप सो, की असा दुवा देण्यास मिपावाल्या ऍडमिनची (हेडमास्तर म्हणा हव तर) हरकत नसावी! Smile

मतदान करण्या आधी, जमल्यास, कृपया हे देखिल वाचून घ्यावे ही नम्र विनन्ती! Smile
*************
Submitted by limbutimbu on 13 August, 2008 - 11:43.
बिन्द्राबद्दल मला आदर हे! त्याला काही एक बक्षीसे मिळाली तर माझ्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही!
प्रश्ण हे की हे जे देणारे हेत, त्यान्ची बक्षिस देण्यामागचे "हिडन" हेतू/उद्दिष्टे काय हेत, बक्षीस देण्याची त्यान्ची लायकी हे का याचा विचार मात्र केलाच पाहिजे असे वाटते!
अनेक राज्यान्चे/प्रान्ताचे मिळून बनलेल्या भारत नामक देशास नेमके पुस्तकी शब्दात काय म्हणावे ते माहीत नाही (सन्घराज्य की काय..!) पण, जेव्हा अमुक एखादी व्यक्ती "भारत देशाचे" प्रतिनिधित्व करीत काहि एक यश मिळवते तेव्हा त्या व्यक्तीचा यथोचित सन्मान करण्याचे सर्वप्रथम उत्तरदायित्व हे या "भारत देशाच्या" केन्द्र सरकारचे आहे हे कोणासही अमान्य नसावे!
मग बाकी राज्ये व स्थानिक प्रशासने केन्द्राच्या प्रथम अधिकारास डावलून, वा त्या अधिकारास मागे टाकत "जनतेच्या" पैशातून खिरापतीसारखी बक्षिसे वेगवेगळ्या हिडन हेतून्नी जाहीर करत सुटतात (खरोखर पोचतात की नाही शन्काच हे! ) तेव्हा त्यास आक्षेप घेणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्यच हे! आता "अस्ले सुजाण नागरीक" त्या 'विशिष्ट' "पुणे" नामक शहरातच जास्त सन्ख्येने हेत, त्याला कोण काय करणार! Big Grin
.
हे जी खिरापत वाटतात ना, ते बघुन मला एका गोष्टीची आठवण झाली....... बघा हं!
रस्त्यावरच्या डोम्बार्‍याचा खेळ कुणी बघितला हे का? अगदी गेला बाजार रस्त्याकडेला समोर चिरगुट पसरुन बसलेला भिकारी?
तर; डोम्बार्‍याचा खेळ झाला की तो पैशाकरता थाळी पसरुन लोकान्पुढे जातो, थाळीत जर बरेच पैसे आधीच अस्तिल, वा पैसे "टाकणारे" त्या डोम्बार्‍याने नेमलेलेच कुणी असेल, तर इतर बरेच जण बहुदा इर्ष्ये पोटी, वा नेमेलेल्या लोकान्नी टाकलेल्या पैशाकडे बघून लाजेकाजेस्तव थाळीत कितीची नाणी वा नोटा हेत हे बघत बघत आपलेही दान त्या डोम्बार्‍याच्या पदरात टाकतात.
हीच बाब भिकार्‍याची..... मी स्वतः प्रत्यक्ष अनेक वेळेस बघितले आहे कि भिकारी चिरगुटावर थोडी नाणी आधीच पसरुन टाकतो, अगदी सिग्नलला भेटणारे "प्रोफेशनल" भिकारी सहसा हाताचा रिकामा पन्जा पुढे करीत नाहीत, तर त्यात एखाददोन तरी नाणी, सहसा जास्त रकमेची, ठेवतातच! (रिकाम्या हाती कुणाकडे जाऊ नये असे म्हणतात, तसच "रिकाम्या हाती भिक मागू नये" असा रिवाज असेल त्यान्च्यात )
तर, इतरान्नी केलेला "दानधर्म" बघुन आपणही मागे नाही, कमी नाही हे दाखविण्याकरता सामान्य जन्तेचा हात आपसुक स्वतःच्या खिशात जातो व डोम्बारी वा भिकार्‍याची कमाई होते!
मी हे उदाहरण केवळ यातील एका "भावनेचा" प्रकर्षाने उल्लेख करण्याकरता दिले आहे...... आक्षेप हे तो इतरान्नी केलेला "दानधर्म" बघुन आपणही मागे नाही, कमी नाही हे दाखविण्याकरता व अन्धानुकरणातून, दुसर्‍याच्या खिशातून अर्थात जनतेच्या पैशातून वाटलेल्या खिरापतीकरता.....!

जर काही द्यायचेच असेल तर ते केन्द्रसरकारच्या ताब्यात देऊन सर्वान्चे मिळून एक असे का दिले जात नाही??
पुण्यासारख्या कोपर्‍यातील महापालीकेने असे द्यायची खरोखरच गरज हे का जेव्हा पुणे मनपा असलेल्या बालभवन्/क्रिडाग्रामची वाट लावत आहे/अस्ते?
.
बर यान्नी वाटलेल्या खिरापतीला "प्रतिष्ठा" तरी काय हे?
या देशात अनेक सन्मान दिले जातात, त्यातिल काहीन्ना पैशात काही मुल्य फारसे नसले तरी ते अत्यन्त मानाचे समजले जातात!
काही पुरस्कारान्ना मान व मुल्य, दोन्ही अस्ते
पण कावळ्याच्या उगवणार्‍या छत्रीप्रमाणे प्रसन्गोपात, अचानक, केवळ आणि केवळ (जनतेच्या) पैशाचे मूल्य असणार्‍या या तथाकथित "सन्मानान्ची" खरोखरच त्या विजेत्याला तरी काही "किम्मत" असेल का?
.
देण्याबद्दल काहीच हरकत नाही, पण पुन्हा तेच, स्वतःच्या जीवावर शिका, लढा व जिन्का! जिन्कलात तर(च) तुमची थोडीफार दखल, बाकी सगळीकडे आनन्द! ही आमची सर्वदूर प्रथा........ कशाला वाटेल त्या "बक्षीसान्चे" तरी कौतुक?
.
आजही अनेक खेळाडू, विजेते वा तसेच, असेही हेत की ज्यान्ना खरोखरच आर्थिक सहाय्याची आवश्यकता हे! पण तिकडे त्याबाबतीत लालफितीचा कारभार करणार्‍यान्च्या अन्गात शिरलेल्या या अचानक बक्षिसवाटपाच्या "बर्ड फिवर" चा मात्र काही एक इलाज करावासा वाटतो!
.
बिन्द्रा करोडपती हे की नाही हा विषयच नाही, त्यास पैशाची आवश्यकता हे की नाही हा ही विषय नाही, त्यास त्याने केलेल्या कामगिरीबद्दल काहीएक सन्मान मिळालाच पाहिजे, होय, अगदी रोख व कागदी सर्टीफिकटाच्या स्वरुपात, पण हे होताना देशातील अन्य असन्ख्य होतकरू खेळाडू/सामान्य जनता यान्च्या आसुसलेल्या नजरान्मधे निराशेचे अन्जन घातले जात नाहीना याची काळजी प्रत्येकच प्रशासनाने घेतली पाहिजे व आपली जबाबदारी बघुन वागले पाहीजे
उगाच चारजण करतात म्हणुन "हलवायच्या घरावर तुळशीपत्र" या न्यायाने "बक्षिसे" जाहीर करत सुटू नये!.
येवढेच कौतुक असेल, तर बिन्द्राला, पुणे शहरी बोलवावे सत्कारासाठी, पालिकेच्या निधीसहीत, पुण्याच्या रस्तोरस्ती पैसाफन्ड प्रमाणे पैसे गोळाकरायला कलमाडी प्रभुतिन्नि हाती कटोरा घेवुन उभे रहावे, आणि मग तो निधी, जर बिन्द्राने सत्काराचे आमन्त्रण स्विकारुन तो इथे आला, तरच त्यास सुयोग्य हस्ते द्यावे! (व हे करताना जिथे तिथे केवळ आपले व आपल्या पक्षाच्या प्रमुखाचे/प्रमुखीचे मुखडे न झळकवता, बिन्द्राचा सत्कार हा पक्षीय सत्कार नसून, पुणेकर जनतेतर्फेचा, देशाभिमानाचा सत्कार हे याचे भान ठेवुन वागावे)
पण हे होईल का?
.
एनिवे, मी तरी मागे का राहू? माझ्या ऐपतीप्रमाणे, सारासार विवेकबुद्धिप्रमाणे, मी देखिल माझ्याकडून रुपये सव्वा अकराचे बक्षीस जाहीर करतो! (कुठे कसे पाठवावे, कोण सान्गु शकेल का?) Tongue Smile
...;
आपला, लिम्बुटिम्बु
**************

तुमच्या पोटात का दुखावे?

असे बक्षिस देण्यात काहीच हरकत नाही, तुमच्या पोटात का दुखावे? त्यामुळे विजेत्यास प्रोत्साहन मिळते

याला मत दिले आहे.

प्रत्येकजण स्वतः पैसे पाठवू शकत नाहि म्हणून तर सरकार निवडून दिले आहे. क्रिकेटवर उधळले जातात ते पैसे प्रोत्साहन आणि इतर खेळाडुंसाठी जरा कुठे सोडले तर तुमचा टॅक्स वाया जातो होय रे!

माझ्या करातील रकमेतून ऑलिंपिकमध्ये देशाची मान उंचावणार्‍या खेळाडुंना रक्कम दिल्याबद्द्ल मला (कधी नव्हे तो Smile ) महाराष्ट्र शासनाचा अभिमान वाटतो.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

विजेत्यास प्रोत्साहन

बरोबर आहे फक्त प्रोत्साहन विजेत्यास मिळते असे मुद्द्यात म्ह्टले आहे त्या ऐवजी प्रोत्साहन खेळाडूंना मिळते. प्रसिद्धी आणि पैसे सर्वांनाच हवे असतात परंतु दुर्दैवाने आपल्या देशांत इतर खेळांची किंमत नाही. ती किंमत अशाप्रकारे वसूल होणार असेल तर पोहोणे, हॉकी, सॉकर, तिरंदाजी,ऍथेलिटिक्स अशा अनेक खेळांतील खेळाडूंना उत्साह येईल.

+१

फक्त एकच "करेक्शन"! माझ्या माहितीत आपल्या देशात फुटबॉल खेळतात सॉकर नाही! Wink

आणि असं प्रोत्साहन मिळालंच पाहिजे!

अवांतर आणि माझे मत

माझ्या माहितीत आपल्या देशात फुटबॉल खेळतात सॉकर नाही!

नाही. भारतात ज्या खेळाला फूटबॉल म्हणतात त्यालाच जगात सॉकर म्हणतात. अमेरिकेत खेळला जाणारा फूटबॉल (ज्यात बॉल पायापेक्षा हातात जास्त वेळ असतो!!) हा अमेरिकेबाहेर फारसा प्रचलीत नाही. अमेरिकन फूटबॉलसारखाच वाटणारा रग्बी हा खेळ युरोपात (विशेषतः इंग्लंडमध्ये) सॉकरखालोखाल लोकप्रिय आहे.

असो,

असे बक्षिस देण्यात काहीच हरकत नाही, तुमच्या पोटात का दुखावे? त्यामुळे विजेत्यास प्रोत्साहन मिळते

असे मत दिले आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भारतात

भारतात ज्या खेळाला फूटबॉल म्हणतात त्यालाच जगात सॉकर म्हणतात.
जग म्हणजे अमेरीका का? अमेरिकेतला सॉकरच भारतात, युरोपात फुटबॉल म्हणून खेळला जातो ना?

(अमेरीकेत फुटबॉलमधे बॉलला हात लावलेले कसे चालतात हा प्रश्न पडलेली) अदिती

अमेरिकन फूटबॉल

हा खेळण्याचा बॉल एक फूट लांबीचा असतो म्हणून त्याला फूटबॉल असे म्हटले जाते.

भारतीय फूटबॉलला सॉकर म्हणणारे इतर अनेक देशही असावेत. नसले तरी फरक नाही. जो जेथे राहतो, तो तेथील संज्ञा वापरतो इतकेच.

फुटबॉल/सॉकर

भारतात ज्या खेळाला फूटबॉल म्हणतात त्यालाच जगात सॉकर म्हणतात.

'फुटबॉल' हा शब्द 'अमेरिकन फुटबॉल', 'सॉकर', 'रग्बी' अश्या खेळांसाठी सामायिक म्हणून वापरला जातो.
सॉकर हा फुटबॉलचा समानर्थी शब्द आहे. 'सॉकर' खेळाची जागतिक संघटना देखिल फिफा (फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन)या नावाने ओळखली जाते.

अमेरिकन फुटबॉल नावाची व्युत्पत्ती बॉलच्या १ फुट आकारावरुन आहे ही मात्र नवीन माहिती मिळाली.

मतदान केलं

मतदान केलं आहे, धन्यवाद..

तात्या.

सरपन्च, आभारी हे! :)

अरे व्वा! तात्या, बरच बारीक लक्ष हे की तुमच! Smile
मतदानाबद्दल आभारी हे! Smile

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) Big Grin Tongue

विजेत्यास प्रोत्साहन मिळते..

आणि ते मिळालेच पाहिजे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

असे बक्षिस

असे बक्षिस देण्यात काहीच हरकत नाही, तुमच्या पोटात का दुखावे? त्यामुळे विजेत्यास प्रोत्साहन मिळते

ह्याला मत दिले आहे !

बॉक्सिंग मध्ये जे पदक मिळाले आहे हरयानातील भिवानी जिल्हातील भिवानी बॉक्सिंग कल्बच्या खेळाडूंना.. काल एनडीटीव्ही वर त्यांच्या कोच व त्याची प्रशिक्षण शाळा पाहीली... जर शक्य झाले तर तो कार्यक्रम पुन्हा पहा... आज संध्याकाळी आहे १० वाजता शक्यतो !

वर्षाला एक गोल्बज व एक जोड फाटका बुट .. ह्याच्या जीवावर प्रक्स्टीस करुन ही मुलं राज्य पातळीवर प्रचंड मोठी व चांगली कामगीरी करत आहेत... दोन वर्षापुर्वी त्याला अर्जुन पुरस्कार मिळाला होता.. हे आमच्या बातमीत ही नव्हते... कारण .. हे क्रीकेट नाही आहे... की ना येथे प्रचंड पैसा आहे ना प्रसिध्दी पण तरी ही नेटाने प्राक्टीस करुन तो महाखेळ मेळाव्यात गेला व शेवटी एक का होईना पदक तर घेऊन आला.... बिंद्रा श्रींमत घरात जन्मला आहे म्हनून त्यांचे कार्य लहान होत नाही हो.. !
पण तीच सुविधा, जी प्रसिध्दी व पैसा चेंडूफळीच्या खेळाडूना मिळते .. तीच सुविधा ह्या खेळाडूना मिळाली तर अशी वर्षानूवर्षे पदकाकडे डोळे लावून बसण्याची गरजच नाही !

जरा हे वाचा http://in.jagran.yahoo.com/news/sports/general/7_9_4751649/

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

शेवटचा पर्याय निवडला आहे.....

उत्तेजनार्थ पारितोषिके देणे ठीक. पण इतके दिवस जेव्हा तो कष्ट घेत होता जेव्हा त्याला उत्तेजनाची गरज होती तेव्हा त्याला ही मदत का दिली गेली नाही. आता त्याला पदक मिळाल्यावर त्याला खैरात द्यायला चढाओढ चालली आहे इतके दिवस त्याला उत्तेजन द्यायला का नाही पुढे गेले.
स्वतःला ऑलिम्पिकचे शिल्पकार म्हणविणार्‍या रां*च्यांनीच गरवारे बालभवन चा बाजार मांडला होता. सारसबागेपाशी असलेले सर्कशीचे मैदान बंद करून तिथे काय म्हणे कायमस्वरूपी ऍथलेटिक्स ट्रॅक बांधला आहे त्याचा वापर किती होतो हा भाग अलाहिदा. असेच एक शिवाजी स्टेडीयम बांधले आहे जुन्याबाजारासमोर तिथे तर कधीही कुस्त्या झाल्याचे ऐकिवात नाही उलट तेसमोरच्याच झोपडपट्टीत राहणार्‍या भैयांच्या नौटंकीच्या कार्यक्रमासाठी दिले जाते. अर्थात असा वायफळ खर्च करणार्‍या पुणे नगरपालिकेला २५ लाख फार मोठे नाहीत पण दुसराकरतो म्हणून खोटा मोठेपणा मिळवण्यासाठि अशा फालतू घोषणा कशाला करून ठेवायच्या..

पुण्याचे पेशवे

बक्षिसाऐव

बक्षिसाऐवजी खरोखर खेळाकरता काही भरीव खर्च व्हावा, जिन्कण्याआधी "प्रोत्साहन" मिळाले तर बरे!

माझही हेच म्हणने आहे !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

वरील काही प्रमाणात सर्व

हा जनतेचा कररुपी पैसा वापरुन केलेला राजकीय स्टण्ट वा प्रचार आहे
होय. पण थोडेसेच पैसे वापरून असा स्टंट केला तर काही वाईट नाही. तमाम पुतळे, कोनशीलालेख, वगैरे राजकीय स्टंट असतात. तरी थोडेफार पुतळे उभारले तरी काही हरकत नाही. कोनशीलेनंतर पूल/इमारत वगैरे बनणार असेल तर कोण्या राजकारण्याच्या नावाचा शिलालेखात उदोउदो झाला तरी काही वाईट नाही.

असे बक्षिस देण्यात काहीच हरकत नाही, तुमच्या पोटात का दुखावे? त्यामुळे विजेत्यास प्रोत्साहन मिळते
सहमत. पण बक्षिसाच्या राशीवर अवलंबून आहे. राशी खूपच ("खूप"ची व्याख्या व्यक्तिसापेक्ष) असेल, तर करदात्याच्या पोटात दुखावे.

दिल तर दिल, मला काय त्याचे?
थोडाफार सहमत. वरील उत्तर बघावे.

सगळेच देतात, मग त्यान्नी मागे का रहावे?
असहमत. पण बक्षीस दिले नाही तर विजेता गाव सोडून बक्षीस देणार्‍या गावात जाणार असेल तर मग फायदे/तोटे बघून बक्षिसाची रक्कम ठरवावी - सहमत.

बक्षिसाऐवजी खरोखर खेळाकरता काही भरीव खर्च व्हावा, जिन्कण्याआधी "प्रोत्साहन" मिळाले तर बरे!
येथे "ऐवजी" शब्द कुठून आला. बक्षीस द्यावे तर द्यावे, आणि खरोखर खेळाकरिता... जिंकण्याआधी... बरे!" अशा वाक्याशी सहमत.

>>>> येथे

>>>> येथे "ऐवजी" शब्द कुठून आला
तब्बल २८ वर्षानन्तर पदक मिळाले "म्हणून मग आता नन्तर जाग येवुन " केवळ विजेत्यास बक्षिसे वाटायला नकोत, "त्या ऐवजी" त्या आधीच काही कृती व्हावी, जेणेकरून भावी विजेते जास्त सन्ख्येने तयार होऊ शकतील, या सन्दर्भाने तो शब्द आणला हे! Smile शब्दमर्यादेमुळे / शब्दयोजनेमुळे नेमका अर्थ ध्वनित होत नसल्यास, तो माझा दोष! Smile क्षमस्व!

बाकी, सगळ्या ऑप्शनच्या विश्लेषणाबद्दल धन्यवाद!

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) Big Grin Tongue