एक उत्खनन केलेली बातमी - प्राचीन भारतातलं धातू-विज्ञान (सतीश ब. कुलकर्णी)

उत्खनक's picture
उत्खनक in तंत्रजगत
16 Jun 2015 - 8:34 pm

डिस्क्लेमरः
नाम स्वभावाला अनुसरून एक जुनी बातमी इथे टाकतोय. यातले संदर्भ तसे म्हटले तर भरपूर महत्त्वाचे आहेत. सत्यासत्यतेची पडताळणी मी केलेली नाही. पण कदाचित इथे कुणाला याबद्दल काही माहिती असावी किंवा कुणाला ही बातमी उपयुक्त असावी.. म्हणून हा धागा.
आणि हो.. संक्षिप्त धाग्यासाठी अगोदरच क्षमा मागतो. :)
---------------------

प्राचीन भारतातलं धातू-विज्ञान (सतीश ब. कुलकर्णी)
Sunday, August 11, 2013 AT 02:00 AM (IST)

भारतात ऋग्वेदकाळापासून खाणकामाची माहिती होती. सोनं, कांस्य, तांबं, लोखंड, शिसं, कथील हे धातू भारतीयांना ज्ञात होते. दिल्लीतल्या कुतुबमिनारजवळचा लोहस्तंभ सोळाशे वर्षांपासून न गंजता उभा आहे. ब्रिटनमध्ये शोध लागलेल्या स्टेनलेस स्टील या मिश्रधातूची शताब्दी दोन दिवसांनी सुरू होत आहे; त्यानिमित्त भारतातल्याही प्राचीन धातुविज्ञानाविषयी...

http://www.esakal.com/esakal/20130811/5086148089117355766.htm

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Jun 2015 - 12:08 am | मुक्त विहारि

बरीच शास्त्रे प्रगत होती, असे वाटते.

धातू शास्त्र, शिल्प शास्त्र इ.

पण पुढे पकीय आक्रमणामुळे इथली शिक्षण परंपरा अस्तंगत होत गेली, हे हिंदूस्थानाचे दुर्दैव.

डिस्क्लेमर : पुराणातील उल्लेख केलेल्या गोष्टी पुराणातच राहू द्याव्यात ही विनंती.

अर्धवटराव's picture

17 Jun 2015 - 12:43 am | अर्धवटराव

हे सगळं खरच असावं अशी आशा ;)

पण हे सर्व ज्ञान केवळ परकीय आक्रमणामुळे नष्ट झालं हे पटत नाहि. या ज्ञानातुन मिळणारी शक्ती जर परकीय आक्रमण थोपवु शकत नसेल तर ति परकीय शक्ती यांच्यापेक्षा जास्त मोठी होती, अ‍ॅडव्हान्स्ड होती असं म्हणावं लागेल...

धन्यवाद! सत्यासत्यतेबद्दल मी बोलण्याच्या पात्रतेचा समजत नाही स्वतःला.
मला आपलं इतकंच वाटतंय.. जर असे प्रयोग सफल झालेले असतील तर ते धातू व्यापारी तत्वावर वापरण्यास हरकत नसावी. तसेही मेक इन इंडिया चे प्रयत्न चालू आहेत सध्या जोरात. अर्थात् त्याबद्दल काही प्रयत्न चाललेले असतील तर काही वाचनात आले नाहीत.

मुक्त विहारि's picture

17 Jun 2015 - 9:30 pm | मुक्त विहारि

हे प्रत्यक्ष पुरावे समोर असतांना, अज्जुन कुठले पुरावे हवेत?

शेखरमोघे's picture

28 Jul 2015 - 8:50 pm | शेखरमोघे

एक अन्दाज असा : अनेक वेळा जे काही सन्शोधन, उत्खनन इ. इ. झाले त्यात सातत्य ठेवले गेले नाही. कारणे अनेक असू शकतील - जसे खनिजाचा साठाच (सहज खणून काढण्याजोगा) सम्पून गेला, ज्या राजाने त्या सगळ्या उद्योगाला पाठिम्बा दिला त्याचा (युद्धात वगैरे) म्रुत्यु इ. इ. त्यामुळे जे काही आगळे वेगळे लिहून ठेवण्यापुरते (ते ही त्रोटक) जे केले गेले त्याच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या. पुरावा म्हणून एखद्या अश्म युगातील महाकाय प्राण्याचा सान्गाडा जरी मिळाला तरी त्यावरून त्या प्राण्याबद्दल जसा फक्त तर्कच करता येतो तसेच वेदाच्या दोन ओळीत लिहिलेल्या माहितीवरून एखाद्या अद्भुत धातूची पुरेशी माहिती (त्याच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाकरता जी जी लागेल ती) मिळणार नाही - त्याकरता पुन्हा प्रयोगशाळेतला खटाटोप, खर्च आणि मनस्ताप करावाच लागेल.

त्याकरता पुन्हा प्रयोगशाळेतला खटाटोप, खर्च आणि मनस्ताप करावाच लागेल.>>
काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं . सुरवात करायच्या आधीच मनस्तापाची भाषा . म्हणूनच आपल्याकडे सगळं असूनही ते भंगारात पडल्यागत झालंय . भारतीयांच्या ह्याच मानसिकतेमुळे ते ज्ञान नष्ट झालं असावं

मनस्तापाची भाषा नव्हे तर फक्त सावधगिरीचा इशारा. "एखादी करामत मला जमली" असे जर कोणी एखाद्या बखरीत लिहून ठेवले असले तरी ती आपल्यालालादेखील करता येण्याकरता तेव्हढे फक्त लिखाणच जर हातात असेल तर ते कधीही अपुरेच म्हणावे लागेल. आपल्याकडे असलेले जुने सगळे भन्गारच असे मानणे चुकीचे तसेच ते जुने आहे आणि म्हणून सोनेच आहे हा आग्रह चुकीचा. व्यवस्थित पारखून घ्या आणि मगच आपले मत बनवा.

संदीप डांगे's picture

30 Jul 2015 - 12:59 pm | संदीप डांगे

विज्ञान किंवा तंत्रज्ञानामधे मूळ कल्पना फार महत्त्वाची असते. तिच्यावर प्रयोग करूनच तिची सत्यता किंवा व्यवहार्यता पटवता येते. यामधे एडीसनच्या प्रसिद्ध बल्बचा शोधाचे उदाहरण देता येईल. ९०० (कि जास्त?) वेळा चुकल्यावरही त्याचे म्हणणे होते की मी चुकलो नाही तर बल्बमधे कोणते वायू वापरता येण्याजोगे नाहीत याची यादी मी बनवली आहे.

खर्‍या वैज्ञानिकास मनस्ताप हा शब्द माहित नसतो. एखादी गोष्ट झाली तर आनंदच आहे, नाही झाली तर होऊ शकत नाही याचा पुरावा मिळेल. आधीच त्याबद्दल आडाखे बांधून स्वस्थ बसणे हे वैज्ञानिक विचारांचे लक्षण खचितच नव्हे.

अगदी १०० वर्षांपूर्वी पर्यंत युद्धात वापरली जाणारी शस्त्रास्त्रे ही ढाल-तलवारी,शिवाय तोफा,व अन्य धारदार पाती असलेल्या वस्तू कोणत्या धातूंची बनवलेली असत.यांच्या निर्मितीची केंद्रे कुठे होती यावर प्रकाश टाकला जावा ही विनंती.

आनंदी गोपाळ's picture

29 Jul 2015 - 9:55 pm | आनंदी गोपाळ

तलवार या शब्दाला समानार्थि शब्द फिरंग असा आहे असे "ऐकून" आहे. ;)
थोरल्या महाराजांची भवानी तलवारही तशीच फिरंगी होती असाही एक दावा वाचनात आलेला आहे.
जपानातल्या सामुराई स्वोर्ड्सच्या स्टील टेंपरिंगबद्दलची डिटेल माहिती जालावर उपलब्ध आहे.
गोनिदांच्या महाराष्ट्र दर्शन नामक पुस्तकात, महाराष्ट्रातील हत्यारे, या प्रकरणात नुसत्या स्टील टेंपरिंगबद्दलच नव्हे, तर हत्यारांच्या प्रकारांबद्दल, तोफा ओतण्याबद्दल, त्यांच्या वापराच्या पद्धतींबद्दल, मेन्टेनन्सबद्दलही भरपूर माहिती आहे.

भारतीय मेटॅलर्जीचे 'गुरु' कौंडिण्य ऋषी होते म्हणे. जमीन कांडून तिच्यातून धातू काढणारे असे काहीसे त्या कौंडिण्य शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल "ऐकले" आहे.

*टीप : हे 'ऐकले' प्रकरण = हाताशी या क्षणी संदर्भग्रंथ नाही. आठवणीतून लिहितो आहे असे समजावे.

शशिकांत ओक's picture

29 Jul 2015 - 10:57 pm | शशिकांत ओक

आणि त्यांच्या वापराच्या सरावासाठी, कशी काय तालीम केली जात असे, घोडे, हत्ती आणि अन्य पशूंची पैदास आणि शिक्षण करवून वाहतूक आणि युद्धात वापर करायला काय व कुठे सोयी उपलब्ध होत्या. वगैरे माहिती दिली तर आनंद वाटेल.

Jack_Bauer's picture

30 Jul 2015 - 12:24 am | Jack_Bauer

लेख वाचला , आपल्याकडे हे सगळे होते पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्री शास्त्री आणि श्री प्रभू यांनी नुसता वाद चर्चा यापलीकडे जाऊन वेदकालीन ज्ञान पुस्तकातून काढून प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचा घाट घातला आहे....याबद्दल त्यांचे खूप आभार...

सतोश ताइतवाले's picture

2 Sep 2016 - 7:21 pm | सतोश ताइतवाले

एव्हडी प्रगती झाली होती तर कुठे गेले एवढे ज्ञान
आणि त्याचा फायदा अपल्याला आता सद्या
का होत नाही नेहमी पाचत्यानांच का याचा फायदा होतो
नुसते एव्हडी प्रगत होते असे बोलून नाही चालणार
याचा आपल्याला फायदा पण जाला पाहिजे
चीन ने तर आपल्या प्राचीन ज्ञान चोरून
ते ज्ञान त्यांच्या रॉकेट प्रक्षेपणा मध्ये वापरले
आणि अजून आप्यालालच वापरात येत नाही

एकच लोह स्तंभ आहे आणी बाकी कुठेच काहीच कस नाही?

जगाच्या दृष्टीने जस्त (Zinc) नावाचा धातु शोधला अँड्रेयास मारग्राफ ह्या जर्मन केमिस्टने १७४६मध्ये. फक्त भारतात जस्त ह्या धातुच उत्पादन हे ख्रिस्तपुर्व ६ शतकापासुन सुरु होत.
जस्त धातुच्या शुद्धी करणाची प्रोसेस शोधुन काढणारे भारतीयच होते.
http://www.infinityfoundation.com/mandala/t_es/t_es_agraw_zinc_frameset.htm
http://www.ancient-asia-journal.com/articles/10.5334/aa.06112/

उत्खनक's picture

11 Dec 2018 - 9:12 pm | उत्खनक

हे वाचनात नव्हते आले.
दुव्यांबद्दल धन्यवाद!