चला जुजबी एचटीएमएल शिकुया

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in जनातलं, मनातलं
27 May 2015 - 6:23 am

इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग

नमस्कार मंडळी,

बऱ्याच वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना मी एचटीएमएल शिकलो. कामाच्या ठिकाणी कधी याचा उपयोग करावा लागला नसला तरी मिपावर याचा थोडाफार उपयोग लेख व प्रतिसाद प्रकाशित करताना करत असतो. मिपाचा टेक्स्ट इडिटींग टूलबार आपल्याला बरेच पर्याय उपलब्ध करून देतो. तसेच त्यातले कुठलेही बटन क्लिक केल्यास संबंधीत फॉरमॅटींगसाठी वापरले जाणारे एचटीएमएल कोड आपल्याला दिसू शकते. या कोडमध्ये काही किंचितसे बदल केल्यास आपण आपल्या लेखाच्या व प्रतिसादाच्या सादरीकरणाला अधिक आकर्षक बनवू शकतो.

त्याखेरीज काही साधे एचटीएमएल कोड वापरून आपण मजकुराला अधिक फॉरमॅट करू शकतो जे या टेक्स्ट एडिटर टूलबारच्या मदतीने करणे शक्य नाही.

फॉन्ट साइझ व फॉन्ट कलर

हे अक्षर निळ्या रंगात आहे.

यासाठी खालील एचटीएमएल कोडचा वापर केला आहे.

हे अक्षर निळ्या रंगात आहे.

हा फॉन्ट साइझ ७ आहे.
हा फॉन्ट साइझ १ आहे.

यासाठी खालील एचटीएमएल कोडचा वापर केला आहे.
हा फॉन्ट साइझ ७ आहे.
हा फॉन्ट साइझ १ आहे.

चित्र लहान मोठे करणे व दुवा नव्या टॅबमध्ये उघडेल याची व्यवस्था करणे

या फोटोची रुंदी बदललेली नाही

ग्यानबा तुकाराम

या फोटोची रुंदी मूळ प्रतिमेपेक्षा २०% अधिक आहे. लांबी-रुंदीचे गुणोत्तर आपोआप सांभाळले गेले आहे.

ग्यानबा तुकाराम

या फोटोची रुंदी मूळ प्रतिमेपेक्षा २०% कमी आहे. लांबी-रुंदीचे गुणोत्तर आपोआप सांभाळले गेले आहे. तसेच या चित्रावर क्लिक केल्यास त्याची मूळ प्रतिमा नव्या टॅबमध्ये उघडते.

ग्यानबा तुकाराम

वरील तीन प्रयोग करण्यासाठी वापरलेले कोड. प्रत्यक्ष फरक करणारे कोड लाल रंगात लिहिले आहे.

इथे width थेट एककात लिहिण्याऐवजी 120% व 80% अशी टक्क्यांमध्येही लिहिता आली असती.

अनऑर्डर्ड लिस्टची बुलेटींग स्टाइल बदलणे

• नवे लेखन
• माझे लेखन
• वाचनखुणा

यासाठी वापरलेले कोड खालीलप्रमाणे

नवे लेखन

माझे लेखन

वाचनखुणा

• नवे लेखन
• माझे लेखन
• वाचनखुणा

यासाठी वापरलेले कोड खालीलप्रमाणे

नवे लेखन

माझे लेखन

वाचनखुणा

अलाइनमेंटची दिशा बदलणे

लेफ्ट अलाइनमेंट
सेन्टर अलाइनमेंट
राइट अलाइनमेंट
यासाठी वापरलेले कोड खालीलप्रमाणे
लेफ्ट अलाइनमेंट

सेन्टर अलाइनमेंट

राइट अलाइनमेंट

ही सर्व एचटीएमएलच्या मूलभूत वापराची उदाहरणे आहेत. यापासून सुरुवात करून तुम्ही स्वतःच पुढे शिकू शकता. इतर कशापेक्षाही एचटीएमएल शिकणे सोपे आहे कारण कुठल्याही वेबपेजचे एचटीएमएल कोड आपण ब्राउझरचा View source पर्याय वापरून बघू शकतो.

याखेरीज एचटीएमएल शिकण्यासाठी मला सर्वाधिक आवडणारी वेबसाइट म्हणजे w3schools.com.

एचटीएमएलचे प्रयोग करताना तुम्ही पूर्वपरिक्षणाद्वारे खात्री करू शकता की तुम्हाला हवा तो इफेक्ट मिळतोय की नाही. मिपावर लेख व मूळ प्रतिसादात चित्राची कमाल रुंदी ६४० असू द्या. उप-प्रतिसाद असल्यास ६४० पेक्षाही कमी ठेवा. असे न केल्यास ते चित्र उजवीकडच्या दुव्यांवर अतिक्रमण करते.

या धाग्यात मी सुचवलेले पर्याय वापरून तुम्ही स्पेशल इफेक्ट असलेल्या प्रतिक्रिया देऊ शकता. त्याखेरीज स्वतः वेगळे काहीतरी करून बघू शकता. हे करताना काही प्रश्न असल्यास कृपया प्रतिक्रियेद्वारे विचारा.

आपण सगळे मिळून मिपावरचे सादरीकरण अधिक आकर्षक व शिस्तबद्ध करूया.

तंत्रमाहिती

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

5 Jun 2015 - 8:47 am | प्रमोद देर्देकर

अहो रंगाशेठ जर मुळ चित्र समजा ५०*५० अशा आकारात दिले ऑनमाऊसओवर ने ५००*५०० होवुन जाईल म्हणजे ज्याला पाहिजे तो ते मोठे करुन पाहु शकतो. आणि ऑनमाऊस ऑऊटने पुन्हा पहिल्या आकारात येईल. ज्यामुळे लेखाची जागा नाही का वाचली.

श्रीरंग_जोशी's picture

5 Jun 2015 - 8:54 am | श्रीरंग_जोशी

आता आलं लक्षात.
अ‍ॅमेझॉनवर हा प्रकार पाहिला आहे.

सध्या तरी याला सहज जमणारा पण तेवढाही उपयुक्त नसणारा पर्याय म्हणजे चित्र लहान आकारात दाखवायचे अन त्यावर त्याच चित्राचा दुवा द्यायचा ज्यावर वाचाकांनी क्लिक केल्यास चित्र नव्या टॅबमध्ये मूळ आकारमानात उघडेल.

वर लेखातले चित्राचे क्र. ३ चे उदाहरण याच प्रकाराचे आहे.

श्रीरंग_जोशी's picture

6 Jun 2015 - 8:29 pm | श्रीरंग_जोशी

वर लेखात target = "_blank" विषयी फारच थोडक्यात लिहिल्यामुळे त्याची उपयुक्तता नेमकेपणाने बर्‍याच वाचकांपर्यंत पोचली नाही असे दिसत आहे.

फायदा असा की दुवा नव्या टॅबमध्ये आपोआप उघडतो. सध्याच्या टॅबमधले पेज तसेच राहते. संगणकावरून मिपावर येणार्‍यांना दुव्यावर राइट क्लिक करून ओपन लिंक इन अ न्यु टॅब हा पर्याय असतो. टचस्क्रीन डिव्हायसेसवरून मिपावर येणार्‍यांना हा पर्याय सहजपणे उपलब्ध असण्याची शक्यता कमी असते.

उदा टंकलेखन साहाय्य यावर केवळ नेहमीसारखा दुवा दिल्यास

टंकलेखन साहाय्य

ते पान सध्याच्या टॅबवर उघडले जाईल अन सध्याचा धागा बदलला जाईल. संगणकावरून मिपावर येणार्‍यांना दुव्यावर राइट क्लिक करून ओपन लिंक इन अ न्यु टॅब हा पर्याय असतो. टचस्क्रीन डिव्हायसेसवरून मिपावर येणार्‍यांना हा पर्याय सहजपणे उपलब्ध असण्याची शक्यता कमी असते.

त्याऐवजी

टंकलेखन साहाय्य

दुव्याच्या कोडमध्ये वरीलप्रमाणे target = "_blank" जोडल्यास दुव्याचे पान नव्या टॅबमध्ये उघडेल.

ही पद्धत फेसबुकवर युझर्सनी शेअर केलेल्या दुव्यांसाठी व जीमेलसारख्या इमेल सुविधांमध्ये इमेलच्या मजकुरातील दुव्यांसाठी वापरली जाते.

नवीन टॅबमध्ये दुवा उघडणे- target=_blank द्यावे लागत नाही मोबाइलमध्ये- कारण ओपरा ब्राउजर आणि युसी ब्राएजर तुम्हाला नवीन टॅबमध्ये(foreground अथवा background मध्ये अथवा त्याच पेजमध्ये)पेज उघडायचा पर्याय देतात. blank न देण्याचा फायदा असा की तो दुवा पाहून झाला की backबटण दाबले की लेखातल्या मूळजागी झटकन येतो.मात्र target_blankवापरल्यास पुन्हा परत मागे येतांना लेख पुन्हा लोड होतो. ओडियो व्हिडियोसाठी हा पर्याय चांगला आहे कारण जो काही प्लेअर असेल तो सुरू होतो.(ओडियो फाइल ऐकणे अजून वाचक/श्रोते यांच्या कानी उतरले नाही ते अलाहिदा).आता e books प्रमाणे audio booksचा प्रसार वाढेल तेव्हा बघू.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jun 2015 - 3:35 am | श्रीरंग_जोशी

मी सुचवलेला पर्याय हा बहुतांश डिव्हाइसेसवरील डिफॉल्ट ब्राउझर्सचे बिहेविअर पाहून सुचवला आहे. आपोआप नव्या टॅबमध्ये ओपन होण्याचा फायदा असा की युझर मूळ पेजवर जिथे आहे किंवा जे काही करत आहे ते तसेच राहते अन संदर्भासाठी पाहिजे तितके वेळा दुसर्‍या टॅबमध्ये डोकावून पाहता येते.

उदा. मी एखाद्या प्रतिक्रियेला उप-प्रतिक्रिया देत आहे. ती टंकता टंकता माझ्या लक्षात आले की वरच्या प्रतिक्रियेत एक दुवा आहे. तो दुवा आपोआप नव्या टॅबमध्ये उघडला गेला तर मी सध्याच्या टॅबमधली टंकनक्रिया तशीच सोडून टॅब बदलून संदर्भासाठी दुव्याच्या पेजवरची माहिती वाचू शकतो. पुन्हा टॅब बदलून मूळ प्रतिक्रिया टंकण्याचे काम करू शकतो. कधी क्लिष्ट विषय असल्यास ही क्रिया पुन्हा पुन्हा करावी लागू शकते. ज्या पेजवर प्रतिक्रिया टंकणे सुरू आहे तेथील मजकुरही स्क्रोल करून वाचला जाऊ शकतोच.

कदाचित माझी ही design philosophy मी हा विषय ज्या काळात शिकलो (१५ वर्षांपूर्वी) तेव्हा मिळालेल्या मार्गदर्शनावर आधारीत आहे. कदाचित आज हे शिकणारे किंवा या विषयातले व्यावसायिक खूप वेगळ्या design philosophy चा पुरस्कार करत असावेत.

बाकी फेसबुक व जीमेल बाय डिफॉल्ट 'ओपन इन अ न्यु टॅब'चा वापर करतात.

एक प्रश्न: आपण जेव्हा फोटो दुसरीकडे अपलोड करून img srcवगैरे लिंक देतो तशी पेपरमधल्या लिखाणाचा फोटो काढून लिंक दिल्यास त्यातील लिखाण वाचता येत नाही.scan apps,scan to pdf वगैरे अॅपस वापरून काही सुधारणा होते का?विशेषत: मराठी लिखाणात?(थोडे अवांतर आहे).

श्रीरंग_जोशी's picture

7 Jun 2015 - 3:54 am | श्रीरंग_जोशी

देवनागरी लिपीतल्या छापील मजकूराच्या फोटोमधली अक्षरे सहजपणे वाचता न येणे हे मी पण अनुभवले आहे. तुलनेत रोमन लिपीतील मजकुर वाचायला सोपा जातो.

याची काही कारणे:

• वर्तमानपत्रातला मजकूर असल्यास कागदाच्या दर्जामुळे पार्श्वरंग तेवढा शुभ्र नसतो
• फोटो काढताना कॅमेरा किंवा फोन यांची सावली त्या मजकूरावर पडल्यामुळे उजेड कमी असतो
• वर्तमानपत्रातली फॉन्ट साइझ बरीच कमी असू शकते
• जवळून फोटो काढल्यामुळे कॅमेर्‍याचे थोडेसेही थरथरणे अक्षरांचा शार्पनेस कमी करते

माझ्या मते तरी मूळ फोटो अधिक काळजी घेऊन काढणेच अधिक इष्ट. स्कॅनर यंत्र वापरून फोटोपेक्षा चांगला दर्जा मिळवता येत असला तरी तो पर्याय सुटसुटीत नसतो.

या संबंधीचे अ‍ॅप्स मी वापरले नसल्याने त्याविषयी काही बोलू शकत नाही. इतर कुणी अनुभवी व्यक्तिने त्याबद्दल लिहिल्यास उत्तम.

अवांतर - चित्र अन लिखित मजकूर असलेले पत्रक डिझाइन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट पब्लिशर हे एक उत्तम टूल आहे. मला हे मिपाकर अभ्याने सुचवले होते.

अजो's picture

7 Jun 2015 - 3:06 am | अजो

खूप छान माहीती.

ओपन_इन _न्यु_टॅब चा उपयोग पटला.मल्टिटास्किंग करता येऊ शकणाय्रा फोनमध्ये सोपे आहे.----फोटो मोठा केल्यावरही अक्षरे सुस्पष्ट दिसणे हे फोकसिंग चांगले झाल्याचे लक्षण आहे.

आपण मागे चर्चा केली--लेखातच वरती /शेवटी जा याचा कोड देण्याबद्दल -तर अशी किमान दोन रेडिमेड बटन्स लेखनाच्या चौकटीवर लेखकांच्या सोयीसाठी देता आली तर---------!

श्रीरंग_जोशी's picture

7 Jun 2015 - 8:33 am | श्रीरंग_जोशी

लेखाच्या आत नेव्हिगेट करण्यासाठी जे कोड लागते त्यासाठी रेडिमेड बटन्सची कल्पना चांगली आहे. मालकांकडे मांडून पाहूया.

कुठल्या एखाद्या लेखात प्रथम वापरून बघुया. या सुविधेची उपयुक्तता मिपाकरांपर्यंत पोचली पाहीजे.

पाटील हो's picture

12 Jun 2015 - 11:46 am | पाटील हो

अजून काय नवीन आहे काय हो ?

महासंग्राम's picture

15 Mar 2016 - 9:42 am | महासंग्राम

भारी चकि रंगाभाऊ

नाना स्कॉच's picture

15 Mar 2016 - 10:48 am | नाना स्कॉच

हे अक्षर लाल रंगात आहे.

उल्का's picture

2 Jun 2016 - 3:10 pm | उल्का

ह्या धाग्याचा समावेश 'दखल' मध्ये करावा. जेणेकरुन सर्व नवीन सद्स्याना लाभ घेता येईल.
अजुन असे काही शिकण्यासारखे मिपा धागे माहीत असल्यास ते क्रुपया सांगावेत.