मराठी कथा

पुस्तकमित्र's picture
पुस्तकमित्र in जनातलं, मनातलं
14 Feb 2015 - 1:52 pm

नमस्कार मंडळी!
कादंबरी, आत्मचरित्र, विनोदी साहित्य, कविता असे विविध साहित्यप्रकार हाताळून आता तुमच्या साठी घेऊन येत आहोत एक नवा विषय - मराठी कथा.
आपल्या काही आवडत्या कथांविषयी ह्या धाग्यात बोलूया. जेणेकरुन मराठीतील काही उत्तमोत्तम कथांचा आढावाही घेता येईल.
चला तर मग आपल्या आवडत्या कथांविषयी लिहायला.

कथा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

14 Feb 2015 - 10:40 pm | प्रचेतस

रत्नाकर मतकरींच्या सर्वच गूढकथा आवडतात.
त्यातही मला विशेष आवडणार्या म्हणजे--

लपाछपी
हेडस्टडी
ड्राक्युला
टोक टोक पक्षी
मला विक्रम दिसतो
मदा पाटणकरची गोष्ट

दमांच्या माझ्या आवडत्या कथा-
व्यंकूची शिकवणी,
माझी पहिली चोरी,
माझ्या बापाची पेंड,
बाबू शेलारचे धाडस,
भुताचा जन्म

प्रचेतस's picture

14 Feb 2015 - 10:47 pm | प्रचेतस

श्री. दा. पानवलकर - सूर्य

आदूबाळ's picture

14 Feb 2015 - 10:49 pm | आदूबाळ

अगदी अगदी.

आदूबाळ's picture

14 Feb 2015 - 11:04 pm | आदूबाळ

तुती - जी ए कुलकर्णी

सानिकास्वप्निल's picture

15 Feb 2015 - 1:04 am | सानिकास्वप्निल

रत्नाकर मतकरींच्या सर्वच गूढकथा आवडतात.

असेच म्हणते तरीही काही आवडलेल्या देत आहे

ट्रॅप
ड्रॅक्युला
मंदा पाटणकरची गोष्ट
बारा-पस्तीस
नाईटमेअर
झोपाळा
मध्यरात्रीचे पडघम
ऐक टोले पडतायेत
व्हायरस
कम ऑन रॉकी

श. ना. नवरे
एकच प्रश्न
तिन्ही सांजा
शांत

द.मा
भुताचा जन्म
माझ्या बापाची पेंड

प्रियंवदा करंडे
सूनबाई
कथा एका व्यथेची

आशा बगे
मारवा

पुस्तकमित्र, खूपच काही लिहिता येण्यासारखे आहे 'कथा' या विषयी.
मराठीत विशेषतः साठ सत्तरच्या शतकात लघुकथा,दीर्घकथा हा फॉर्म फारच वापरला गेला.
विशेषतः दिवाळी अंक हा प्रकार उदयाला आल्यावर बहुतेक लेखकांनी हा फॉर्म हाताळलाच आहे.
त्याआधीही मौज, सत्यकथा यात कथा होतीच. पण दिवाळी अंकांमुळे जास्तच प्रिय झाला कथा हा प्रकार.
माडगूळकर, मिरासदार, शंकर पाटील , वपु, जीए अश्या अनेक लेखकांच्या मांदियाळीत माझ्या मनात घर करून राहिल्यात त्या मात्र अरविंद गोखले यांच्या कथा.

पन्नास साठाच्या दशकात कथाविषय असणार्‍या, साध्यासुध्या व्यक्तींच्या भन्नाट कथा आहेत या.
सगळ्या कथामधल्या नायकनायिका या आपल्याला सर्वत्र दिसणार्‍या,नैतिक अनैतिकतेच्या भोवर्‍यात फिरणार्‍या अशा आहेत.
मला त्यांच्या नायिका जास्त भावतात. कमला, मंजुळा अश्या साध्यासुध्या नावाच्या. साधासुधा संसार करणार्या.
पण मग त्यांच्यातच एक वेगळा स्पार्क दिसतो.
'कातरवेळ' कथेतली नायिका नवर्याची वाट पहाणारी, संध्याकाळी आपल्या भरल्या संसाराच्या आणि लाडक्या नवर्याच्या विचारात असतानाच तिला आठवतो तो तिचा लहानपणीचा प्रियकर. वास्तविक ती तिच्या आयुष्यात सुखी नाही असे नाही. पण तरिही मागच्या आयुष्यातल्या आठवणी कातरवेळी येतच रहातात. आत्ता या क्षणी आपला प्रियकर काय करत असेल अशी चुटपुट तिला लावून जातात.

मांजरांच्या प्रणयाने लैंगिक आयुष्याची किशोरावस्थेत ओळख होणारी 'आभा सावंत'
एका बोक्याच्या पुरुषी नजरेने घायाळ होणारी. तिच्या आयुष्यातली बालपण संपून तरूणपण सुरू होण्याची पायरी 'आभा सावंत' या कथेत सुरेख रंगवली आहे.

नवर्‍यासोबत, नवर्‍याइतकेच कष्टं नोकरीत उपसणारी 'मंजुळा.' तिच्या दृष्टीने रतिक्रीडा ही उत्साही मनाने आणि उत्फुल्लतेने करायची गोष्टं , केवळ यांत्रिकपणे नव्हे. प्रदूषण, गरमी, चाळीतले भोचक लोक, रोजच्या आयुष्यातली धावपळ आणि नवर्याने घरकामात बिल्कुल मदत न करणे यांमुळे नवर्‍यावर अतिशय प्रेम असूनही ती त्याला शरीरक्रीडेत साथ देऊ शकत नाही. जणू त्यावेळच्या वर्कींग वुमनची प्रोटोटाईप.
'विघ्नहर्ती' मधीलपुतण्याच्या लग्नात बाधा येऊ नये म्हणून खाली लग्न चालू असताना वर नवर्‍याच्या प्रेताजवळ, त्याच्या मृत्युची बातमी कुणालाही न सांगता बसून रहाणारी काकू.
'गंधवार्ता' मधली घटस्फोटित नवरा गावात परत आलाय या बातमीने बावचळून गेलेली आणि घरच्यांना चुकवून त्याला भेटायला जाणारी घटस्फोटिता.
या चटकन आठवलेल्या व्यक्तिरेखा.
आता पुस्तक शेवटचे वाचल्याला दहा बारा वर्षे झाली आणि सध्या ते जवळही नाही.
केव्हातरी या पुस्तकावर भरभरून लिहायची इच्छा मात्रं आहे.

याच कथासंग्रहातील पुरुष व्यक्तिरेखांवर पुन्हा केव्हातरी लिहेन.

अरविंद गोखलेंबद्दलच लिहायला आले होते. तू सगळं लिहीलंस :)

जव्हेरगंज's picture

22 Sep 2016 - 12:54 am | जव्हेरगंज

'कातरवेळ' माझी आवडती कथा!!!!

अरविंद गोखले यांच्या पुस्तकाचे नाव कळू शकेल काय?!

कवितानागेश's picture

15 Feb 2015 - 5:08 am | कवितानागेश

आवडलेल्या कथा आठवताना मिलिंद
बोकिल यांच्या काही कथा चटकन आठवतायत.
त्यातल्या यंत्र, आरंभ, झेन गार्डन या कथा वाचल्यावर फार दिवस मनात घोळत राहिल्या. झेन गार्डेन तर कथेतल्या नायिकेप्रमाणेच एकेक अर्थ सांगत हळूहळू उलगडत गेली.
अजून काहीकथांबद्दल पुन्हा लिहिते.

गवि's picture

16 Feb 2015 - 12:47 pm | गवि

अगदी सहमत.

बोकिलांचीच आणखी एक दिवाळी अंकात आलेली कथा. आता नेमकं नाव आठवत नाही, पण एका खेडेगावात / दूरच्या वस्तीवर कुत्र्यांना विष घालण्याच्या मोहिमेवर सरकारी डॉक्टरला प्रोटेक्शन म्हणून गेलेल्या पोलीसाने सांगितलेली त्या घटनेची कथा. वेगळंच काहीतरी.

सुहास शिरवळकरांनी गूढ कादंबर्‍या तशा बर्‍यापैकी लिहिल्या तरी गूढकथा मात्र मोजक्याच लिहिल्यात.
'मरण-खेळ' आणि 'कातळ पॉइंट' ह्या त्यांच्या गूढकथा खूप जबरदस्त आहेत.

कपिलमुनी's picture

16 Feb 2015 - 1:25 pm | कपिलमुनी

विदूषक : जी ए कुलकर्णी

आंतरजालावर प्रकाशित झालेल्या कथांना नेहमीच अशा चर्चांमधून बाहेर ठेवलं जातं. तसं कृपया करु नये ही विनंती.

नवीन मराठी आंतरजाल हे माध्यम दुर्लक्षून चालणार नाही. तिथे सर्वच लेखक ग्लॅमर लाभलेले असतील असं नव्हे. अनेकजण टोपणनावांनीही असतील.

पण आवडलेल्या ई-कथांचा आवर्जून उल्लेख व्हावा ही विनंती.

खालील "लठ्ठंभारती" नावाची कथा खूप छान आहे:

http://www.manogat.com/node/11011

कुठूनतरी दुवा मिळाला आणि वाचनात आली होती. अश्याच आणखी काही कथा काळाच्या ओघात मागे पडल्या असतील तर लिंक्स द्याव्यात.

आदूबाळ's picture

16 Feb 2015 - 5:46 pm | आदूबाळ

+१

- वेगळ्याच विषयावरील एक कथा - भाग , आणि .

हे गृहस्थ हल्ली ललित लिहीत नाहीत त्याबद्दल त्यांचा निषेध.

- संतोष शिंत्रे यांची एक कथा.

अजून आठवल्या की देतो.

आवडत्या कथांमध्ये अग्रक्रमाने आशा बगेंची रुक्मिणी.लहानपणापासून परिचित तो.ती भिक्षुकाची मुलगी.काहीशी आश्रित भावना तिच्या मनात.वडिल गेल्यावर आजी एकटीच उरलेली तिला.पण आजीजवळ तिचा बाळकृष्ण आहे,सुखदुःखाचा सांगाति.त्याची थट्टा उडवणारी ,गुलमोहराच्या फुलाच्या रंगाचा शालू शोधणारी मनस्वी ती.तिला त्याने मागणी घालून लग्न केल्यावरही तो सापडलेलाच नाही.अचानक गवसतो तो लहानपणच्या आठवणीतून.
ही माझी अतिशय आवडती कथा.
सानियाच्या अनेक कथा आवडतात.विशेषतः तिच्या नायिका.
शंकर पाटलांच्या काही कथा.वेणा,भुजंग
मिरासदारी तर पूर्णच!
अजून बर्याच कथा आठवत आहेत पण नावं नाहीत.आठवेल तसे लिहितेच.

सिरुसेरि's picture

22 Sep 2016 - 5:19 pm | सिरुसेरि

वड्यांचे दिवस अशी एक कथा पुर्वी वाचली होती .

मि ६ वीत असताना वाचलेली जप्ती ही कथा फार आवडली होती. हा कथासंग्रह आठवत नाही पण लेखिकेचा होता एवढं नक्की. कोणी सांगु शकेल तर खुप बरं होईल. या कथेवर स्टार प्रवाह वर एक १३ भागांची मालिका देखील आली होती.

खुप आवडलेल्या आणि आत्ता आठवणार्या कथा:
विश्वनाथ एक शिम्पी- वि वा शिरवडकर
घोडा- ह. मो. मराठे
किडके जग- गंगाधर गाडगीळ
नागीण- चारुता सागर
द लास्ट लीफ- ओ. हेन्री
म्हैस- पु. ल.
भोग- आप्पासाहेब खोत
हरीशंकर परसाईंच्या असंख्य
आता आमोद सुनांसी आले- दि.बा. मोकाशी

फिक्शन मध्ये कथांचं आणि माझं उत्तम जमतं, कादंबरीशी गट्टी जमत नाही हे लहाणपणीच माझ्या लक्षात आलं.. तेव्हापासून अक्षरशः असंख्य उत्तमोत्तम कथा वाचल्या हिंदी, मराठी आणी इन्ग्लीश मधल्या देखील. दुर्दैवाने हिंदी कथांसाठी हिंदी समय सारखी सुंदर साईट आहे, ईंग्रजी कथांसाठी देखील अतिशय छान साईट्स आहेत. मराठी कथा अश्या प्रकारे एका साईट्वर मिळत नाहीत हे दुर्दैव.

त्यांची ' जान्हवी ' ही अप्रतिम कथा आहे. त्यांचीच ' घार ' सुद्धा सुंदर आहे. हिंदी/उर्दूमध्ये सादत हसन मंटो, प्रेमचंद, मन्नू भंडारी हे फार ताकदीचे लेखक. इंग्लिशमध्ये फ्रेडरिक फोर्साईथचे No Comebacks आणि The Veteran हे कथासंग्रह अफाट आहेत. प्रत्येक कथा जबरदस्त. पण एकच निवडायची झाली तर There are no snakes in Ireland ही जबराट आहे. मिपावर वाचलेल्या कथांपैकी ' अठरा पावलांचा स्टार्ट ' ही आदूबाळ यांची, ' कळते रे ' ही रातराणी यांची आणि लोकमान्य ही मृत्युंजय यांची शतशब्दकथा आवडल्या होत्या. गविंची ' टोलनाक्यावर ', रामदासकाकांच्या ' शिंपिणीचे घरटे ', ' काटेकोरांटीची फुलं ', ' टिचला बिलोरी आयना ' या कथा आंतरजालावरच्या आॅल टाईम ग्रेट कलाकृती आहेत. आमचा अभ्याभौ सुरेख व्यक्तिचित्र-कम-कथा किंवा कथाचित्र लिहितो. त्यातलं - व्हय ओ भैया, जी ९ या लय म्हणजे लय भारी आहेत. गविंची बीपीओ ही पण अशीच खल्लास कथा आहे.

' अठरा पावलांचा स्टार्ट ' ही आदूबाळ यांची

धन्यवाद!

दोन पटकन आठवणारी नावे.
विलास सारंगांची "आतंक" या कथासंग्रहामधली प्रत्येक कथा मुळाला हादरवणारी So shall he descend to your roots and shake them in their clinging to the earth. त्यावर एक स्वतंत्र लेख लिहायला हवा.
भारत सासणेच्या काही निवडक कथा आवडतात मात्र ते "रीपीट" होतात व कधी कधी त्यांच्या कथा उघड काही इंग्रजी वरुन "प्रभावित" असतात. बोर्जेस चा प्रभाव तर सुस्पष्ट असतो कधी कधी. तरीही अनेकदा ते खोलवर नेत तळ गाठतात.
"उपसंहार" चटकन आठवणारी एका मौजे च्या दिवाळी अंकात होती. माणुस रीतसर सरकारी नोकरीत "बाबु" आहे यावर विश्वास बसत नाही. तरीही तरीही अनेक कथा विलक्षण आहेत त्यांच्या सिंपली सुपर्ब.
आणि श्याम मनोहरच्या "बिनमौजेच्या गोष्टी" बस नाम ही काफी है.
बाकी क्लासीक्स मध्ये जीए आणि कंपनी आहेतच.

सुंड्या's picture

23 Sep 2016 - 7:50 pm | सुंड्या

रत्नाकर मतकरींच्या गुढकथा एकदम बेस्ट सगळ्यात जास्त आवडलेली-"पाऊसातला पाहुणा"(हेच नाव होतं बहुतेक) आणि "खेकडा",
सर्वात जास्त आवडलेली कथा म्हणजे अण्णाभाऊ साठेंची-"श्मशानातलं सोनं",
सत्यजित रे यांचा "Indigo" नावाचा कथा संग्रह एकदा तरी वाचावाच कथाप्रेमींनी.
क्रमश:

सौन्दर्य's picture

23 Sep 2016 - 8:13 pm | सौन्दर्य

खूप आवडलेलं पुस्तक म्हणजे 'पॅपिलॉन'मुळ लेखक हेन्री शेरीयर, मराठी अनुवाद रवींद्र गुर्जर ह्यांनी केला आहे. अप्रतिम पुस्तक, मनाला उभारी देणारे पुस्तक.

इसापनीती हे असेच जीवन जगायला, मनुष्य स्वभाव ओळखायाला शिकवणारे पुस्तक. इसापाने ह्या गोष्टी दोन हजार वर्षांपूर्वी सांगितल्या असे म्हंटले जाते, पण त्यातील प्राणी आजच्या जीवनात पावलो पावली दृष्टीक्षेपात येतात.

बोका-ए-आझम's picture

23 Sep 2016 - 11:50 pm | बोका-ए-आझम

जेव्हा मी जात चोरली होती ही जबरदस्त कथा आहे.