मिपा मराठी डायलॉग......

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
11 Jan 2015 - 3:50 pm
गाभा: 

मध्यंतरी जालावरती ऐक पिंक टाकलेली पहिली, गमतीशीर वाटली. इंग्रजी चित्रपटांचे जगप्रसिद्ध डायलॉगस गुजरातीत भाषांतरित केल्यास, किती मनोरंजक होतात हे जाणवले, इथे व्याकरण, भाषांतराचे नियम, वैगरे गद्य गोष्टींना स्थान न देत, केवळ मनोरंजनात्मक हेतू ठेवून, पडलेल्या जिलब्या होत्या. त्याच/ तशाच प्रकारे आपण मराठीत हे जगप्रसिद्ध डायलॉगस भाषांतरित केले तर ? मला गुजराती तसूभरही येत नाही, तरीही अंदाजे याचा अर्थ उमगून मजा वाटली. मराठीत हे किंवा असे डायलॉग तयार करताना, व्याकरण/नियम यांचा बागुलबुवा न करता, कोकणी, वऱ्हाडी, नगरी, पुणेरी, कोल्हा/सोला पुरी, ग्रामीण / शहरी मारांग्लीश शब्द वापरून केले, तर ?
(संधर्भ: आंतरजालावरून साभार )

चित्रपट : द डार्क नाईट
जोकर: “Why so serious?”
गुज्जु डायलॉग: केम आतलि फाटे छे ?
मिपा मराठी डायलॉग:………

चित्रपट : स्पायडरमन
अंकल बेन: “With great power comes great Responsibility”
गुज्जु डायलॉग: जेटली शक्ती, ऐटली जवाबदारी.
मिपा मराठी डायलॉग:………

चित्रपट : फोरेस्त गंप
फोरेस्त गंप :“Life’s a box of chocolates, Forrest. You never know what you’re gonna get.”
गुज्जु डायलॉग: बा बोली, के, जिवन तो पेडा ना डब्बा जेवुं हे
मिपा मराठी डायलॉग:………

चित्रपट : ३००
किंग लिओनेडस: “Spartans! Ready your breakfast and eat hearty… For tonight, we dine in hell!”
गुज्जु डायलॉग: भाईलो ! आजे राते, नरकमा ठेपला खासु !
मिपा मराठी डायलॉग:………

चित्रपट : टर्मिनेटर
T ८००/अर्नोल्ड :“Stay here, I’ll be back”
गुज्जु डायलॉग: खाम, ५ मिनीतमा, पाचो आवीस.
मिपा मराठी डायलॉग:………

चित्रपट : सिक्स्थ सेन्स
जोएल : “I see dead people”
गुज्जु डायलॉग: मा फाडी, मने मरेला देखाय छे.
मिपा मराठी डायलॉग:………

चित्रपट : लॉर्ड ऑफ द रिंग
बोरोमीर : “One does not simply walk into Mordor.”
गुज्जु डायलॉग: मोरडोरमा घुसवामाटे, **मां जान जोये.
मिपा मराठी डायलॉग:………

चित्रपट : स्टार वॉर
डार्थ वेडर :“Luke, I am your Father”
गुज्जु डायलॉग: जो-बांका, थारो बापू छे.
मिपा मराठी डायलॉग:………

चित्रपट : द गॉडफादर
डॉन कोर्लिओन :“I’m gonna make him an offer he can’t refuse”
गुज्जु डायलॉग: ऐने ऐवी स्कीम आपीस, खुशिथी दोफ़्रै जासें.
मिपा मराठी डायलॉग:………

चित्रपट : अपोलो १३
मिशन कंट्रोल :“Houston we have a problem “
गुज्जु डायलॉग: हयुस्तानिया, बें ऐक दाव थयि गयो.
मिपा मराठी डायलॉग:………

प्रतिक्रिया

जेपी's picture

11 Jan 2015 - 3:59 pm | जेपी

भारी आहे.
चांगलय...
पण काय मटेरियला नाय आपल्याकडे.

जातवेद's picture

11 Jan 2015 - 7:47 pm | जातवेद

बेन काका म्हानालं, "भावा पीटर, लै भारी पावर असत्या किनी ती लै मोठी जबाबदारीपन घेऊन येत्या काय"!

संचित's picture

11 Jan 2015 - 8:16 pm | संचित

Spartans! Ready your breakfast and eat hearty… For tonight, we dine in hell!”
पोरांनो पोटभर नाश्ता करा कि र! रातच्याला जेवनाच नरकातून आमंत्रण हाय.

काळा पहाड's picture

11 Jan 2015 - 8:35 pm | काळा पहाड

“Luke, I am your Father”
तुझ्या आवशीचा घोव हाय मी. मला बोलतोस ****?

“I’m gonna make him an offer he can’t refuse”
घे म्हणाव आणि फूट

“Houston we have a problem “
हेडॉफिस, हवाल्दार भोसले बोल्तोय गोवंडीहून. इथं राडा झालाय.

“Why so serious?”
बाप मेला का रे तुझा?

“With great power comes great Responsibility”
तीनशे हॉर्सपावरची गाडी हाये राव. निस्ता टच करायचा अ‍ॅक्षीलेटर, फूटभर दाबायचा न्हाई. नायतर जाल ढगात.

“Life’s a box of chocolates, Forrest. You never know what you’re gonna get.”
जीवन मटका आहे. कधी चिकन मिळतं तर कधी वरण्भातावर भागवायचं.

खटपट्या's picture

12 Jan 2015 - 12:37 am | खटपट्या

चित्रपट : सिक्स्थ सेन्स
जोएल : “I see dead people”
गुज्जु डायलॉग: मा फाडी, मने मरेला देखाय छे.
मिपा मराठी डायलॉग:
१. मला मिपाकर दिसतात.
२. आवशीक खाव, ती कोपर्‍यावरची हडळ रातची माज्यावांगडा गजाली करुक येतां. पार कालजाचा पानी पानी व्हता.

वेल्लाभट's picture

12 Jan 2015 - 12:39 pm | वेल्लाभट

Why so serious?
हे काय बोकडासारखं तोंड करून बसलायस?

आनन्दा's picture

12 Jan 2015 - 4:36 pm | आनन्दा

हे बघा.. गणपतराव. :)

he bagha

सूड's picture

12 Jan 2015 - 5:42 pm | सूड

>>Why so serious?

१) कसला इच्यार करतोय रामय्या!!
२) आसं आंबिल पिल्यागत का त्वांड केलंय?

Life’s a box of chocolates, Forrest. You never know what you’re gonna get.”

आयुक्ष म्हंजे मोजींच्या कथा, माताय कधी काय वाचायला मिळेल कळत नाही!!

“Spartans! Ready your breakfast and eat hearty… For tonight, we dine in hell!”

आताच पोटभर खाऊन घ्या, रात्री पेठेतून (पुणे ३०) जेवणाचं आमंत्रण आहे!!

Stay here, I’ll be back”

सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.

“I’m gonna make him an offer he can’t refuse”

ताका अनाहिताची मेंबरशिप देतंलंय!!

यसवायजी's picture

13 Jan 2015 - 9:31 pm | यसवायजी

नादेबाद!!! जिकलैस भावा :))))