ऑनलाईन बुद्धीबळ: मुख्य पान

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
28 Dec 2014 - 9:48 pm

ऑनलाईन बुद्धीबळ

बुद्धीबळाच्या या धाग्याच्या निमित्ताने मला मला इथलेच व्यासंगी चतुरंग यांचा खास उल्लेख करून त्यांचे आभार मानायचे आहेत. गेली काही वर्षे नियमितपणे त्यांनी ज्या आत्मीयतेने बुद्धीबळाविषयी लेख लिहून आणि जागतिक बुद्धीबळ स्पर्धेच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक चर्चा घडवून आणली, आणि बऱ्याच हौशी पाठीराख्यांना या खेळाचा आनंद घ्यायला लावला, त्याला तोड नाही. आणि त्यांनीच इथल्या बऱ्याच लोकांना मदतीला घेऊन चिकाटीने आंतर्जालावरील पहिल्याच अशा आगळ्या-वेगळ्या 'बुद्धीबळाचे नियम' या पुस्तिकेचं संकलन आणि प्रकाशन केलं. या पुस्तिकेचा दुवा मी पुढे या धाग्यात दिलेला आहे. त्यांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मला हा उपद्वयाप करायचा विचार करायला उद्युक्त केलंय. या ऑनलाईन बुद्धीबळाच्या धाग्यासाठी नीलकांत यांच्या पाठिंब्याबरोबरच संपादकांनीही मदत केली आहे, अपर्णा अक्षय, पैसाताई, किसन शिंदे, प्रा डॉ, वल्लीशेठ हे त्यांपैकी काही; प्रभाकर पेठकर, मुक्तविहारी आणि संजय क्षीरसागर यांनीही प्रोत्साहन दिलं, त्या सर्वांचे आभार!

तांत्रिक अडचणी न येता शक्य झाल्यास जानेवारी १० ते जानेवारी २५ या कालावधीत खुली बुद्धीबळ-स्पर्धा घेऊन २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी विजेते घोषित करण्याचा प्रयत्न आहे.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Dec 2014 - 6:48 am | मुक्त विहारि

पण ह्या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा आणि पाठींबा...

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Dec 2014 - 9:32 am | ज्ञानोबाचे पैजार

ही जबरदस्त उत्कंठावर्धक योजना आहे.
हा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक म्हणुन तरी सहभागी होणारच.
एखादा होउन गेलेला सामना बघायची सोय आहे का या मधे?

पैजरबुवा,

तुम्ही प्रेक्षक म्हणून प्रवेश केलात की आधी झालेल्या सामन्यावर क्लिक करून (व्ह्यू)त्या सामन्यातील खेळी पहाता येतात. सामना अखेरीस असलेली पटाची स्थितीही दिसते. पटाच्या उजवीकडे दिसणारी Back ही कळ क्रमशः क्लिक केली की सुरूवातीपर्यंतचा सर्व खेळ उलट्या क्रमाने पहाता येतो. आम्ही चाचणी म्हणून घेतलेल्या सामन्यातील खेळी 'लिस्ट 'स्वरूपात अशा दिसतात:

Score sheet:
1. d2-d4 d7-d5
2. e2-e3 b8-c6
3. b1-a3 c8-f5
4. c2-c3 g8-f6
5. g1-f3 e7-e6
6. f3-g5 f5-g6
7. d1-a4 f8-d6
8. f1-b5 e8-g8
9. e1-g1 f6-g4
10. a4-d1 d8-g5
11. d1-f3 g4-h2
12. f3-d1 h2-f1
13. d1-f1 e6-e5
14. b5-c6 b7-c6
15. a3-c2 e5-e4
16. a2-a4 g5-h5
17. g2-g3 a7-a6
18. c2-e1 a6-a5
19. e1-g2 g6-f5
20. f2-f4 f5-g4
21. g2-h4 g4-f3
22. f1-h3 f3-e2
23. h3-d7 e2-d3
24. d7-c7 h5-d1
25. g1-g2 d6-c7
26. b2-b3 d1-f1
27. g2-h2 f7-f6
28. h4-g2 g7-g5
29. h2-h3 h7-h5
30. f4-g5 f6-g5
31. g3-g4 f1-h1

सर्वांना आठवण करून देण्यासाठी धागा वर आणते आहे. किती जणांनी खेळून पाहिले? स्पर्धा लवकरात लवकर सुरू करूया. कोण भाग घेऊ इच्छितात त्यांनी त्यांनी लवकरात लवकर नावे नोंदवा!