मला पडलेले काही (गहन) प्रश्न

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
18 Nov 2014 - 10:54 am

आपणा सर्वांना प्रत्यही अनेक प्रश्न पडत असतात. काही प्रश्नांची उत्तरे मिळून जातात तर काही तसेच मनात पडून राहतात. माझ्या मनात पडून राहिलेल्या अशाच काही प्रश्नांची ही जंत्री.

मी त्यांचे वर्गीकरण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे (जित्याची खोड!).

वर्ग १ - वर-खाली
शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे ही वरून खाली लावीत जावीत की खालून वर?

एखाद्या देशातील बहुसंख्य जनतेच्या ह्या सवयीचा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काही संबंध जोडता येईल काय? म्हणजे एखाद्या देशातील बहुसंख्य लोक जर शर्टाची बटणे खाऊन वर लावीत जात असतील तर त्या देशाची अर्थव्यवस्था सुधारत जाते इत्यादी...

वर्ग २ - डावे-उजवे
पायतणे घालताना प्रथम डाव्या पायाचे घालावे की उजव्या. की दोन्ही पायांची एकाच वेळेस?

प्रथम डाव्या पायात पायतणे घालणारी मंडळी डाव्या विचारसरणीची आणि उजव्या पायात घालणारी उजव्या विचारसरणीची, असे निरीक्षण कुणाच्या पाहण्यात आहे काय? असल्यास, दोन्ही पायात एकाच वेळेस पायतणे घालणारी मंडळी कोणत्या विचारसणीची म्हणावीत?

वर्ग २ अ - डावे-उजवे गोंधळ
लोक डाव्या आणि उजव्या मोजांतील फरक कसा ओळखतात? ;)

मोजे उत्पादक त्यावर काही खूण का करून ठेवीत नाहीत?

इयरफोनवर तशी सोय असते. परंतु त्यावरील L आणि R ही अक्षरे इतकी बारीक असतात की बर्‍याचदा डाव्या कानाचा इयरफोन उजव्या कानात घातला जातो (अर्थात, त्यामुळे फार काही बिघडते असे नाही! पण असो)

वर्ग ३ - रंग
लाल शाईने चेक लिहिला तर तो वैध ठरतो काय?

चेक लिहिताना निळी किंवा काळी शाई वापरणे ही प्रथा आहे. परंतु, लाल शाई वापरण्यावर काही कायदेशीर निर्बंध आहेत काय? (चेक बाऊन्स झाल्यास दंडाची रक्कम भरण्याची हमी देत असणारांनीच कृपया 'वापरून पहा' असा (आगाऊ) सल्ला द्यावा!)

(क्रमशः)

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रश्न अंत्यत गहन आहेत.विचार करुण उत्तरे देतो.

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2014 - 11:14 am | टवाळ कार्टा

शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे ही वरून खाली लावीत जावीत की खालून वर?

ज्या क्रमाने काढली त्याच क्रमाने...पटकन लागतील

पायतणे घालताना प्रथम डाव्या पायाचे घालावे की उजव्या. की दोन्ही पायांची एकाच वेळेस?

पळण्यासाठी किती वेळ आहे त्यानुसार जो पाय पुढे असेल त्या पायात पहिली...किंवा ज्या पायाची च्प्पल जवळ असेल त्या पायात...

लोक डाव्या आणि उजव्या मोजांतील फरक कसा ओळखतात?

जो डावीकडच्या पायात घालतात तो डावा मोजा...उरलेला उजवा मोजा...आणखीही उरलेला असेल तर जिथून चोरला तिथे परत नेऊन ठेवावा ;)

लाल शाईने चेक लिहिला तर तो वैध ठरतो काय?

तुम्ही मास्तर आहात का? :)

स्वीत स्वाति's picture

19 Nov 2014 - 11:00 am | स्वीत स्वाति

सर्व च प्रतिसाद :-))

टवाळ कार्टा's picture

19 Nov 2014 - 1:15 pm | टवाळ कार्टा

ठ्यांकू :) \m/

प्रसाद१९७१'s picture

18 Nov 2014 - 2:09 pm | प्रसाद१९७१

शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे ही वरून खाली लावीत जावीत की खालून वर?

खालुन वर, त्यामुळे शर्टाची दोन्ही टोके जुळतात आणि बटणे वर खाली होत नाहीत.
ह्या प्रश्नानंतर तुम्ही विनोद करायचा अतिशय केविलवाणा प्रयत्न केला आहेत हे लक्षात घ्या.

L आणि R ही अक्षरे इतकी बारीक असतात की बर्‍याचदा डाव्या कानाचा इयरफोन उजव्या कानात घातला जातो (अर्थात, त्यामुळे फार काही बिघडते असे नाही! पण असो)

:-( माझे बिघडते कधी कधी.

इयरफोनवर तशी सोय असते. परंतु त्यावरील L आणि R ही अक्षरे इतकी बारीक असतात की बर्‍याचदा डाव्या कानाचा इयरफोन उजव्या कानात घातला जातो (अर्थात, त्यामुळे फार काही बिघडते असे नाही! पण असो)

अहो, स्वतः पाणिनीने 'ऋ' आणि 'लृ' यांमध्ये 'सावर्ण्य' अर्थात दोहोंचे उच्चारस्थान व प्रयत्न शेम टु शेम आहेत (जवळपास) असे म्हटले आहे. दोष आपला नाही.

सोनीच्या इअरफोनमध्ये फरक पडतो. जाळी अर्धी असते आणि आकार किंचिँत वाकडा असतो. इतरांचे पूर्ण जाळी आणि पूर्ण गोल असल्याने फरक पडत नाही.

नितिन थत्ते's picture

19 Nov 2014 - 7:10 am | नितिन थत्ते

+१
आणि इन-इअरफोन असेल तर डाव्या इअरफोनवर हाताला जाणवेल असे एक टिंब असते. (फोनच्या कीपॅडवर ५ आकड्याला असते तसे)

मुक्त विहारि's picture

19 Nov 2014 - 7:55 am | मुक्त विहारि

त्या इयरफोनला "डावा" आणि "उजवा" असे कशाला लिहायचे?

मी बर्‍याच वेळा इकडचा फोन तिकडे करून बघीतले. पण मला काहीच फरक जाणवला नाही...

गोल भागाकडे समोरून पाहिलेत तर एकाला उजवीकडे आणि दुसऱ्याला डावीकडे अर्ध्या भागात जाळी असते तो भाग कानाच्या भोकासमोर आला पाहिजे उरलेला बंद अर्धा भाग कानाच्या पाळीच्या पातळ हाडासमोर आला पाहिजे.असे केल्याने चांगला आवाज येतो.

रस्त्याने चालतांना बाहेरचे आवाज हॉर्न वगैरे थोडेतरी ऐकू आले पाहिजेत. बाहेरचा आवाज पूर्ण बंद करणारे टोपणछाप इअरफोन फार वेळ वापरू नयेत. मेंदूला त्रास होतो चक्कर येते.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2014 - 8:55 am | मुक्त विहारि

अशी गंमत आहे होय?

च्यामारी शाळेत हे असले काही का शिकवत नाहीत?

बरे आहे, की आम्ही ह्या मिपाच्या शाळेत आलो ते.

इथे वाट्टेल ते , योग्य शब्दांत विचारले की, बर्‍याच शंकांची उत्तरे मिळतात.

कंजूस भाऊ धन्यवाद...

आतिवास's picture

19 Nov 2014 - 12:54 pm | आतिवास

'क्रमश:' पाहून आनंद झाला :-)

टवाळ कार्टा's picture

19 Nov 2014 - 1:15 pm | टवाळ कार्टा

=))

सुनील's picture

20 Nov 2014 - 9:28 am | सुनील

लाल शाईने चेक लिहिला तर तो वैध ठरतो काय?

हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे! :(

शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे ही वरून खाली लावीत जावीत की खालून वर?
जमेल तस करा.
पायतणे घालताना प्रथम डाव्या पायाचे घालावे की उजव्या. की दोन्ही पायांची एकाच वेळेस?
पायतणे कुठली आहेत त्यावरुन ठरवाव.मंदीराबाहेची आसतिल तर दोनी पायात एकदाच घालुन निघावे.
लोक डाव्या आणि उजव्या मोजांतील फरक कसा ओळखतात?
मोजा मोजी करण्यात वेळ जातो. चप्पल वापरावी.
लाल शाईने चेक लिहिला तर तो वैध ठरतो काय?
होय.(बँकेत विचारुन विचारुन खात्री केली आहे.)