शेजवान बिट्टे

hitesh's picture
hitesh in पाककृती
16 Nov 2014 - 2:18 pm

साहित्य :

१ बिट्टे करण्यासाठी : १ वाटी कणीक , पाणी , तेल किंवा तूप

२ बाजारात मिळणारी शेजवान चटणी

३ दही : अर्धी वाटी.

चपातीसाठी मळतो तशी कणीक मळुन घ्यावी.

त्याचा गोळा करुन पोळपाटावर एक चपाती लाटावी.

त्याला तेल किंवा तुप लावावे आणि बाकरवडीला करतात तसा रोल करावा. रॉल थोडा दाबुन करावा म्हणजे त्याचे थर सुटणार नाहीत.

अशा प्रकारे रोल करावेत. माणशी दोन रोल पुरतात. चाकूने त्याच्या बाकरवड्या कापाव्यात.

मग प्यानमध्ये दोन चमचे तुप गरम करावे आणि हे बिट्टे शॅलो फ्राय करावेत. थोडा रंग बदलला की झाकण लावुन ठेवावे. गरम करावे. मध्येच उघडुन हलवुन पुन्हा गरम करावे.

व्यवस्थीत शिजले की ताटात घ्यावेत. त्यावर गरजेनुसार दही , शेजवान चटणी व मीठ घालुन कालवावे व खावे.

याबरोबर तिखट आमटी , पातळ पालक भाजी वगैरे गोष्टी छान लागतात.

हे डीप फ्रायही करतात.. कणकेतच तिखट मीठ वगैरे घालता येते.

बिट्ट्यासोबत तुप गूळ खातात असेही ऐकिवात आहे.

प्रतिक्रिया

hitesh's picture

16 Nov 2014 - 2:27 pm | hitesh

संपादक धन्यवाद !

विश्वजीत भोसले पाटील's picture

16 Nov 2014 - 3:03 pm | विश्वजीत भोसले पाटील

छान

जेपी's picture

16 Nov 2014 - 3:08 pm | जेपी

ऑं....
हितेश भाय एकदम हिकड.चांगलय.

आमच्या नानाला....
जाऊ दे आज त्याची आठवण नको.

विश्वजीत भोसले पाटील's picture

16 Nov 2014 - 3:40 pm | विश्वजीत भोसले पाटील

हा नाना कोण मिपाचा चालकमालक हाये काय ??

स्वप्नज's picture

16 Nov 2014 - 4:20 pm | स्वप्नज

हा नाना मिपावर जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सर्वत्र आढळणारा प्राणी (पक्षीः माणूस) आहे. सर्वत्र वावर असतो...वेगवेगळ्या रुपात.

हा नाना कोण मिपाचा चालकमालक हाये काय ??
आमच्या नानासाहेबाबद्द्ल काय सांगु ? येत जा नाना समजुन जातील नाना काय चिज आहेत.

तुम्हाला चीज म्हणायचेय काय? नानांना चीज म्हणताय होय? पाकृचा धागा असला म्हणून काय झाले!

नाखु's picture

17 Nov 2014 - 12:44 pm | नाखु

यालाच नानांचे मिपावरील योगदानाचे "चीज" झाले आहे असे समजावे काय??

बरोबरे. सगळ्या गोष्टींचे चीज व्हायला तसाही वेळ लागतो.......त्यामुळे तुम्ही तसे समजू शकता.

hitesh's picture

16 Nov 2014 - 5:37 pm | hitesh

मि नाना नाही

जेपी's picture

16 Nov 2014 - 6:00 pm | जेपी

मि नाना नाही

माहित आहे रे नाना.

hitesh's picture

16 Nov 2014 - 6:02 pm | hitesh

अंगी नाना कळा आहेत. पण मी नाना नाही

पैसा's picture

16 Nov 2014 - 6:10 pm | पैसा

जेप्या, नाना वायलां. ह्ये डॉक्टर आहेत.

हितेश, पाकृ आवडली.

जेपी's picture

16 Nov 2014 - 6:15 pm | जेपी

पैसाताय
डॉक्टर हाय तर मनां येगळोच सौंशय येतो.

hitesh's picture

16 Nov 2014 - 6:20 pm | hitesh

.

>>डॉक्टर हाय तर मनां येगळोच सौंशय येतो.

ही खंयची भाषा मरे? =))))

हरकाम्या's picture

16 Nov 2014 - 6:16 pm | हरकाम्या

रेसिपी चांगली वाटते. पण फोटो असा टाकलाय की. ताटातले पदार्थ नावडते असल्यावर माणुस ताटाची जी अवस्था
करतो तसा आला आहे. फोटो पाहिल्यावर असे वाटते की " रेसिपी " आवडलेली नाही.

hitesh's picture

16 Nov 2014 - 6:19 pm | hitesh

एक माणसापुरतेच केले होते. म्हणुन त्याच ताटात कालवले व खाल्ले.म्।रेसिपी छान होती.

जेपी's picture

16 Nov 2014 - 6:34 pm | जेपी

एक माणासा....
संशय बळावला माझा.

hitesh's picture

16 Nov 2014 - 6:39 pm | hitesh

हे रोल आधी वाफवुन किंवा शिजवुन घेऊन मग बिट्टे करता येतील.. पुढच्या रविवारी नवे वेरिएशन करणार आहे.

साहित्यात भेंडी लिहायचे विसरले आहे का? मला काही कळली नाही पाकृ. नाव भारी आहे मात्र!

hitesh's picture

16 Nov 2014 - 8:12 pm | hitesh

भेंडीची भाजी त्याच्याबरोबर खायला केली होती.

रेवती's picture

16 Nov 2014 - 8:16 pm | रेवती

अच्छा.

रमेश आठवले's picture

17 Nov 2014 - 2:06 am | रमेश आठवले

शेजवान चटणीत काय काय असते ?

माई पण सुगरण आहेत बरं का...

दिपक.कुवेत's picture

17 Nov 2014 - 12:41 pm | दिपक.कुवेत

नाना - माई ह्यांच्यावर खमंग वादावादि करण्यात चटचट संपतील.... पण ती भेंडिची भाजी बिट्ट्यांना कशी लावून खाल्लीत ते जरा सांगाल का? सचित्र दाखवलत तर फारच सोप जाईल समजायला...

hitesh's picture

17 Nov 2014 - 4:21 pm | hitesh

दही व चटणी लावलेला एक बिट्टा व एक भेंडीचा तुकडा असे खाणे.

पण याच्याबरोबर पातळ भाजीच हवी. कालचा बेत अचानक ठरल्यानेभेंडीबरोबर खावे लागले.

hitesh's picture

17 Nov 2014 - 3:15 pm | hitesh

र् रोल केले.

http://postimg.org/image/i7fj7f5z5/

रोल वाफवले . म्ग तुकडे करुन शॅलो फ्राय केले.
http://postimg.org/image/497js72zf/

सोबत पालकाची पातळ भाजी
http://postimg.org/image/pbpzu76yd/

म्हन्जे आज माईंनी नै केला सैंपाक??

hitesh's picture

17 Nov 2014 - 4:19 pm | hitesh

मि नाना , माई यापयकी कुणी नाही.

hitesh's picture

17 Nov 2014 - 4:16 pm | hitesh

पण मला न शिजवता केलेले जास्त आवडले.

hitesh's picture

17 Nov 2014 - 4:23 pm | hitesh

डीप फ्राय करुन कुरकुरीत केले तर शेजवान चटणीसोबत चकणा म्हणुन खाता येईल

ता क . आम्हे दारु पीत नै.

जेपी's picture

17 Nov 2014 - 5:20 pm | जेपी

हितेस भाय,
दारु पेत नायतर चांगली सवय हाय.
आमचा नानाला मात्र लै वैट्ट सवय.गेला बिचारा.

गौरी लेले's picture

17 Nov 2014 - 4:46 pm | गौरी लेले

छान पाककृती ... आता घरी करुन पाहिले पाहिजे :)

दिपक.कुवेत's picture

17 Nov 2014 - 5:52 pm | दिपक.कुवेत

कुणाला?? बिट्ट्यांना??

शिरा पडो मेल्या. आधी पाह्यला नको? नीट जमलेत न जमलेत ते?

तुला भारी रे काळजी :).... हे आप्लं बिट्ट्यांची रे!!

जेपी's picture

17 Nov 2014 - 5:56 pm | जेपी

=))

hitesh's picture

17 Nov 2014 - 9:13 pm | hitesh

म्या इथलं वाचुन केलं

http://www.maayboli.com/node/51547