बाबा वाक्यं प्रमाणम....२ भिकारी....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
13 Nov 2014 - 4:46 am
गाभा: 

गेले कित्येक महिने "मिपा"वर ह्या ना त्या स्वरूपात डू.आय.डीं.चा विषय निघतो.

मला अद्याप तरी मिपाच्या अंगणातून बाद करण्यात आलेले नाही.किंबहूना, असे अपमान सहन करायची पाळी आणू नये, असेच संस्कार झालेले असावेत.पण काय तो एकदा सोक्षमोक्ष लावूनच टाकू या, म्हणून नेहमीप्रमाणे बाबांकडे गेलो.(आमचे बाबा जरा बरे सल्ले देतात.)

नेहमीचा नमस्कार झाला आणि आम्ही विषयाला सुरुवात केली.

मी : बाबा एक शंका होती,

बाबा: बोल..ऐकतोय.

मी : आजकाल आमच्या मिपावरती डू.आय.डींचे प्रमाण फारच वाढले आहे.तर काही उपाय सुचतोय का ते बघा ना?

बाबा : तुला रे लेका कसला त्रास?

मी : अहो, परवाच तर मुंज झाली आणि आत्ता भीक मागायला सुरुवात केलीच आहे.तर उगाच कुणी नासकी भीक घालायला नको.म्हणून विचारले.

बाबा : अरे बाबा, साधे सोपे सरळ आहे.राजाकडे भीक मागायला जात जा.

मी : बाबा, असे कोड्यांत बोलू नका.काय ते स्पष्ट बोला.

बाबा : थांब.तुला एक गोष्टच सांगतो.

एका गावांत २ भिकारी रहात होते.गांव तसे छोटेच.त्यामुळे भीक घालणारे पण कमीच.तरी पण एक भिकारी मात्र जास्त तग धरून असायचा.दुसर्‍याला नेहमी प्रश्र्न पडायचा, की आपल्यापेक्षा हा अधिक तग कसा काय धरून राहतो?त्यामुळे तो जी काही भीक मिळेल ती खायचा.पण त्यामुळे तर त्याची शक्ती अजूनच कमी व्हायला लागली.शेवटी एक वेळ अशी आली की, तो आसन्नमरण अवस्थेत पोहोचला.जगायची काहीच शास्वती नसल्याने, त्याने धीर करून दुसर्‍या भिकार्‍याला विचारले, की बाबारे मी अशा अवस्थेला कसा काय पोहोचलो?

दुसरा भिकारी म्हणाला, तू जे मिळत होते ते खात होतास.मी मात्र मला जे योग्य वाटत होते तेच खात होतो.

मी : म्हणजे काय? कथा संपली.

बाबा : हो.

मी : मला नाही कळाली.

बाबा : ह्यात न कळण्यासारखे काय आहे? आपल्या संसारात पण असेच असते.एक साधी चप्पल घ्यायची तरी आपण चार दुकाने हिंडतोच ना?मग तसेच आपण शिक्षणाच्या बाबतीत किंवा माणसे जोडण्याच्या बाबतीत का नाही करू शकत्?याहू,रेडीफच्या वेळीच जी-मेलचा प्रवेश झाला.पण जी-मेल जास्त विश्वासार्ह का ठरले? तर एखादा जी-मेल धारकच दुसर्‍या व्यक्तीसाठी अर्ज करू शकत होता किंवा दुसर्‍या व्यक्तीसाठी जामीन राहू शकत होता.ज्या बँका किंवा ज्या संस्था जामीनदारीवर चालतात, त्याच संस्था टिकतात.भल्या वाढत नसतील पण काळाप्रमाणे बदलल्या तर टिकतात आणि अशाच उत्तम कार्यकर्त्यांमुळे वाढतात देखील.मनोगत-उपक्रम जवळपास बंद पडले.पण त्याच सुमारास आलेले "मिपा" अद्याप तग धरून आहे."मिपा"चा हा चिवटपणा बर्‍याच लोकांना बघवत नाही आणि मग ह्या ना त्या रुपाने "मिपाकरांचे" आणि पर्यायाने "मिपा"चे खच्चीकरण करण्याचा हा विचित्र मार्ग ते अवलंबतात.

त्रासदायक कर्मचार्‍यांची भरती केलेला कारखाना जास्त दिवस टिकत नाही.किंवा खोगीर भरती केलेले सैन्य पण जास्त काळ तग धरू शकत नाही.कर्मचार्‍यांची भरती जशी भक्कम पुराव्याने केली जाते, तशीच भरती ज्या संस्था करतात त्याच टिकतात.

आज तू माझ्या पाशी आलास आणि मन मोकळे केलेस, हे उत्तम.तसेच मन तू संपादक मंडळापाशी पण मोकळे करू शकला असतास.

मी : तूमचे म्हणणे खरे आहे.पण मिपाच्या संपादकांना तसाही भरपूर त्रास होत असतो."बिन-पगारी, बिन-अधिकारी आणि फुल्ल्ल्ल्ल्ल हमाली" म्हणजे कोण? तर मिपाचे संपादक.त्यांच्या त्या त्रासाला खतपाणी घालण्यापेक्षा आणि त्यात भर घालण्यापेक्षा, तुमच्याशी बोललो.

बाबा : झाले तुझे समाधान.म्हणजे उद्या जर "मिपा"च्या संपादकांनी तुझे ओळखपत्र आणि मोबाइल नंबर मागीतला, तर तुला भीड मानायला नको.

मी : एका पायावर."कर नाही त्याला डर कशाला?"आणि एक शंका होती.तुम्ही,"राजा पाशी भीक मागायला जा"असे का सांगीतलेत?

बाबा : अरे, ह्या मिपावर अनेक राजा माणसे लेख लिहीतात.प्रसंगी एकमेकांत युद्ध पण खेळतात.पण तह करून परत एकत्र पण येतात.त्या राजा माणसांचे लेख वाचत जा.जमल्यास पुर्वी "मिपा"वर जे अनेक उत्तम लेख लिहील्या गेले त्यांचा शोध घे आणि आपले मन आनंदी कर.निर्मळ आणि उत्तम मन, हेच खरे आरोग्य.

मी : हो पण त्या डू.आय.डींचे काय?

बाबा : ती काळजी तू करू नकोस.हे जग ३ वाक्यांवरच चालते.

१. ज्या गोष्टी तुझ्या हातात आहेत, त्याच कर.
२. ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत, त्याची चिंता भगवंतापाशी घेवून जा,भगवंत काय करायचे ते बघेल.
३. कूठल्या गोष्टी तुझ्या हातात आहेत आणि कुठल्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत, हे ओळखायचे तारतम्य ठेव.

मी : चला निघतो मी.आत्ता पासूनच राजा लोकांच्या लेखांच्या मागे लागतो.

तर मंडळी, आज पासून आम्ही भीक मागणार ती राजालोकांकडेच.आमच्या परीने आम्ही डू.आय.डीं.चा प्रश्र्न, निदान आमच्या पुरता तरी सोडवला आहे.

अर्थात आम्ही जरी बाबांचे भक्त असलो, तरी... मिपाच्या जाणकार लोकांचे सल्ले ऐकण्याची आमची तयारी आहे.

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

13 Nov 2014 - 4:56 am | स्पंदना

बरचं काही बरं लिहीले आहे बर हो!
मिपा हा लोकांच्या मनातुन वाहणारा खळ्खळ झरा आहे. जरा मिसळेल काडी कचरा पण मागचा स्त्रोत तसाच निखळ राहील.

हे प्रत्येक दिवशी जाणवतेय, म्हणूनच त्या पोटतिडीके पायीच लिहीले आहे...तुम्हाला राग येणार नाही, ह्याची कल्पना होतीच.आमच्या सारख्या मिपाकरांच्या, मिपाकर आणि मिपाविषयी असलेल्या प्रेमाला, तुम्ही समजून घेता, ह्यातच सगळे आले.

सध्या नितळ पाणी मिळत आहे आणि हे असेच मिळत राहू दे, हीच त्या भगवंताचरणी प्रार्थना..

मिपाचे संपादक फार सोशीक आहेत, ह्याची कल्पना पण आहे, जाणीव पण आहे आणि स्वानुभव पण आहे.(अशीच जाणीव, जर डू.आय.डींनी पण ठेवली तर फार उत्तम.)पण ह्या अशा सोशीकपणाचा फायदा बरेच जण घेतात.

"भले तर देवू कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी हाणू काठी." हे तत्व कधी ना कधी वापरावे लागतेच.मग आत्ताच का नको?कारण गेले काही महिने हा धूमाकूळ आणि गदारोळ चालू आहे.जे काम उद्या करायचेच आहे, ते काम आजच केले तर, त्यात वाईट काय आहे?

स्पंदना's picture

13 Nov 2014 - 5:41 am | स्पंदना

या काठीला आवाज नसतो मुवि पण काठी आहे!!

या काठीला आवाज नसतो मुवि पण काठी आहे!!

आवाज पण आयकु आला. *biggrin*

टवाळ कार्टा's picture

13 Nov 2014 - 10:58 am | टवाळ कार्टा

=))

खटपट्या's picture

13 Nov 2014 - 6:00 am | खटपट्या

चांगले लिहीलेय.

प्रत्येक क्षेत्रात प्रस्थापित 'व'रिजिनल धेंडे आसनांवर बसलेले असतात पण एकदा कोणीतरी 'सोंग्यापांग्या' येऊन त्यांचे आसन डळमळीत करतो.

प्रचेतस's picture

13 Nov 2014 - 8:29 am | प्रचेतस

मस्तच

hitesh's picture

13 Nov 2014 - 8:53 am | hitesh

१. कोण ओरिजिनल कोण डु आय हे कसे ठरवणार ?

२. समजा एखाद्याचा आयडी पुर्वी डिलिट झाला आहे , पण तेंव्हा त्याची व्यक्तीगत आयडी कुठे रजिस्टर होती ?

३. मग आता नवा आयडी आल्यावर ही 'त्याचीच ' आयडी कसे ठरवणार ?

४. प्रत्येक आयडीसाठी नाव फोन मागणे आधी कम्पल्सरी करा. मग त्यानंतर डिलिट केलेला आयडी पुन्हा आला तर तो डु आय ठरु शकेल.

५. डु आयडी ने कवितेला छान छान म्हटले तr चालते , पण मोदींचे अच्छे दिन आले का असे विचारले की मात्र चालत नाही. असे का होते बुवा ?

बोका-ए-आझम's picture

13 Nov 2014 - 9:09 am | बोका-ए-आझम

तुमच्या विचारांना विरोध करण्याचा इतर सभासदांचा अधिकार तुम्हाला मान्य आहे की नाही? जसं मोदींचे अच्छे दिन कुठे आहेत हे विचारायचा तुम्हाला अधिकार आहे, तसंच तुमच्या मुद्द्याचा प्रतिवाद करायचा इतरांना अधिकार आहे. मी चेक केलं तेव्हा तरी हा देश लोकशाही मार्गानेच चालत होता.;)

hitesh's picture

13 Nov 2014 - 9:15 am | hitesh

आहे की.. म्हणुअच आम्ही सर्वांचे स्वागत करतो. वर्जिनल डु , राजा रंक असा भेद करत नाही.

बोकाभौ,चोराच्या मनात चांदणे,खाई त्याला खवखवे या वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करुन दाखवाल का प्लीज!!

बोका-ए-आझम's picture

13 Nov 2014 - 9:45 am | बोका-ए-आझम

अजयातै, जो ड्यु अायडी लोकांचं डोकं खाई, त्याला सं मं च्या नावाने खवखवे! ;)

अजया's picture

13 Nov 2014 - 9:47 am | अजया

=))

टवाळ कार्टा's picture

13 Nov 2014 - 10:59 am | टवाळ कार्टा

=))

जेपी's picture

13 Nov 2014 - 9:22 am | जेपी

आहे की.. म्हणुअच आम्ही सर्वांचे स्वागत करतो. वर्जिनल डु , राजा रंक असा भेद करत नाही.

आमीपण करतो.पण चपटी टाकुन आल्यासारखे बरळत नाही.

hitesh's picture

13 Nov 2014 - 9:36 am | hitesh

दारु पिलेला माणुस खरे बोलतो असे म्हणतात . खरे आहे का हो ?

दारु पिलेला माणुस खरे बोलतो असे म्हणतात . खरे आहे का हो ?
आसेल. पण ते खर कमी आनि थापा जास्त आसतात.

बोका-ए-आझम's picture

13 Nov 2014 - 9:48 am | बोका-ए-आझम

माई नी माई आयडी पे तेरे
बोल रहा है नाना
एकही आयडी से लिखकर तू
अपनी ताकत आजमाना!

hitesh's picture

13 Nov 2014 - 10:30 am | hitesh

बोका तेरा दिमाग दिवाना

हाय राम ! माई को डाले दाना

टवाळ कार्टा's picture

13 Nov 2014 - 10:59 am | टवाळ कार्टा

=))

हाडक्या's picture

13 Nov 2014 - 5:41 pm | हाडक्या

हा हा हा ...

मी 'माई को बोले नाना ' असं वाचलं आधी.. ;)

बॅटमॅन's picture

13 Nov 2014 - 12:33 pm | बॅटमॅन

हा हा हा =))

एक नंबर हो बोकेइलाही बोकापन्हा.

स्पा's picture

13 Nov 2014 - 11:08 am | स्पा

सुरेख दवणीय...

मुक्त विहारि's picture

13 Nov 2014 - 11:20 am | मुक्त विहारि

लोचट माणसे नकोशी वाटतात.

त्यांना त्यांचा लोचटपणा दिसत नाही, आम्हाला त्यांची आधी कीव करावीशी वाटायची, आजकाल ते ही वाटत नाही.

एखाद्या मुलीने नकार दिला, तर तो पचवायची पण अशा व्यक्तींची मानसीक तयारी असेल का? असा प्रश्र्न मनांत येतो.

अशा माणसांची सुधारायची शक्यता फार कमीच असते.पालथ्या घड्यावर किती पाणी ओतणार?

अगदी राहवलेच नाही, म्हणून लिहीले.राग नसावा.

तुमच्याकडे दुसरा कुठला उपाय असेल तर सांगा.

बादवे,

आमचे वरील विचार मंथन स्पा ह्यांच्या बरोबर आहे, हे सांगायला नकोच.

(काय करणार? डू.आय.डी. झाला तरी मुळ स्वभाव थोडीच जाणार?)

मूवी काका आपण डोम्बोलीत भेटलो कि विचार मंथन करूच ;)

मुक्त विहारि's picture

13 Nov 2014 - 11:32 am | मुक्त विहारि

फेब्रुवारीमध्ये मोठा सत्यनारायण घालायचा विचार आहे.

सुधांशुनूलकर's picture

14 Nov 2014 - 2:25 pm | सुधांशुनूलकर

सत्यनारायणासाठी मेहूण म्हणून आम्ही आत्ताच नंबर लावत आहोत...

अवांतर : बाकी लेख फर्मास.

मुक्त विहारि's picture

14 Nov 2014 - 10:26 pm | मुक्त विहारि

ठरले तर मग...

एखादा मस्त एका दिवसांत होणारा ट्रेक ठरवा...

सत्यनारायण घालूया.

(आपल्याला काय? कट्टा करायला किंवा सत्यनारायण घालायला, वेळ-काळ लागत नाही.)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2014 - 10:54 pm | अत्रुप्त आत्मा

@मोठा सत्यनारायण घालायचा विचार आहे.>>> लक्ष आहें हां मांझंssssss!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

पण तो चानस हुकला...

ह्यावेळी पुण्यातल्या सत्यनारायणाचे भटजी तुम्हीच.

कुठे??? नंदि पॅलेस मधेच का?

स्पंदना's picture

14 Nov 2014 - 4:43 am | स्पंदना

बाब्बो!! ह्यो तुमचा बाबा??????
स्पा?????? कित्ता कमाताय???

मुक्त विहारि's picture

15 Nov 2014 - 3:28 am | मुक्त विहारि

खुलासा म्हणून सध्या इतकेच...

सत्यनारायणाची कथा आमाला किमान आयकु यावी याची सोय करण्यात येईल.

दिपक.कुवेत's picture

14 Nov 2014 - 6:51 am | दिपक.कुवेत

कथा आयकु आली/नाय आली तरी तिर्थ / प्रसादाची सोय मुवि नक्कि करतील. म्हणुन तो चुकवू नकोस.

दुपारच्या जेवणात तीर्थाला फाटा.

निराकार गाढव's picture

13 Nov 2014 - 2:54 pm | निराकार गाढव

तर उगाच कुणी नासकी भीक घालायला नको.म्हणून विचारले.

संक्षेपात सांगायचं म्हंजी: वरिजेनल आयडी वरिजेनल भीका घालत्यात.... ब्रोब्र?

मदनबाण's picture

13 Nov 2014 - 3:17 pm | मदनबाण

ह्म्म्म...
चालु द्या...

जाता जाता :- पण जी-मेल जास्त विश्वासार्ह का ठरले? तर एखादा जी-मेल धारकच दुसर्‍या व्यक्तीसाठी अर्ज करू शकत होता किंवा दुसर्‍या व्यक्तीसाठी जामीन राहू शकत होता.
अहं... मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अनेक लोकांची अकांउट क्रिएशनची प्रोसेस सुरु होउन सर्व्हर क्रॅश होउ नये अशी काळजी घेण्यासाठी आणि एक प्रकारे नविन उत्पादनाची जाहिरात + क्रेझ निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर केला जातो. थोडक्यात सांगायचे झाले तर... जे फ्लिपकार्टचे मेगा सेल च्या दिवशी झाले ते गुगल ने नविन मेल सुविधा सुरु करतानाच टाळले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres
Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism
After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres
Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism
After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

सतिश गावडे's picture

13 Nov 2014 - 3:51 pm | सतिश गावडे

मुवि, तुम्हाला छळणारा एक डुआयडी नुकताच गायीवर बसुन आला होता. :)

दिपक.कुवेत's picture

14 Nov 2014 - 6:54 am | दिपक.कुवेत

मान गये...किसे??? मिपा जैसे नर्मल संस्थल और मुविं जैसे पारखी नजर....दोनोंको. ह्यातला पारखी मराठि शब्द वाटत असेल तर त्य्जागी हिंदि शब्द काय येईल बरे?

पारखी च्या जागी गुराखी कसा वाटतो.
गाईंना हाकालणारा *wink*