काजू अ‍ॅपल मिठाई

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
21 Oct 2014 - 9:23 pm

.

साहित्यः

१ वाटी काजू पावडर
१/२ वाटी साखर
१/४ वाटी पाणी
सजावटीसाठी लवंगा
खायचा रंग (मी केशर सिरपमध्ये थोडा खायचा रंग मिसळला आहे)

.

पाकृ:

नॉन-स्टीक पॅनमध्ये साखर्+पाणी एकत्र करून त्याचा एकतारी पाक तयार करावा.
पाक तयार झाल्यावर त्यात काजू पावडर घालून मिश्रण एकत्र गोळा होईपर्यंत ढवळावे.
मिश्रण कडेने सुटू लागले व त्याचा गोळा होऊ लागला की ताटात काढून थोडे गार होऊ द्यावे.
सधारण कोमट झाले की त्याचे गोळे करुन घ्यावे. (इथे थंड वातावरण असल्यामुळे मिश्रण लगेच गार झाले त्यामुळे मला लगेच त्याचे गोळे करावे लागले)

छोटे गोळे तयार करुन वरुन हलके दाबून घ्यावे.
आता एक न वापरातला रंगाचा ब्रश स्वच्छ धुवून घ्यावा.
खायच्या रंगात बुडवून तयार गोळ्यावर त्याचे स्ट्रोक्स मारुन घ्यावे.
दाबलेल्या भागात लवंग देठ म्हणून रोवून ठेवावी. (तुम्ही देठासाठी पिस्त्याचे काप ही वापरू शकता)

.

काजू अ‍ॅपल तयार आहे. दिवाळीला मिठाई म्हणून तुम्ही खाऊ शकता , खिलवू शकता :)

.

तुम्हा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
.

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

21 Oct 2014 - 9:25 pm | बहुगुणी

कातिल फोटो! (आणि ती बॉक्सची सजावटही आवडली.)

रेवती's picture

21 Oct 2014 - 10:00 pm | रेवती

अच्छा.....असे करतात काय हे प्रकार! मिठाईच्या दुकानात सफरचंदे, कलिंगडे बनवून ठेवलेली बघितलीत पण ते प्रकार कसे बनत असतील हे माहित नव्हते. छान दिसतायत अ‍ॅपल्स.

फोटो न दिसल्याने अतीव आनंद जाहला. :D

स्वाती दिनेश's picture

21 Oct 2014 - 10:24 pm | स्वाती दिनेश

छान दिसते आहे मिठाई..
स्वाती

शिद's picture

21 Oct 2014 - 10:27 pm | शिद

आहाहा...काय ती पाकृ, काय ते फोटो, काय ते सादरीकरण...डोळे निवले अगदी.

भिंगरी's picture

21 Oct 2014 - 10:58 pm | भिंगरी

मला सफरचंद आवडत नाही,पण हे नक्की आवडेल.

मधुरा देशपांडे's picture

21 Oct 2014 - 11:03 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम. सुंदर.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Oct 2014 - 11:52 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा.....! :)

अजया's picture

22 Oct 2014 - 12:26 am | अजया

उठा उठा दिवाळी अाली
सानिकाची पाकृ आली!!

पहिला फोटो पाहून डोळेच बाहेर आले. एवढा चिकना मी लग्नातही दिसलो नव्हतो...

पाषाणभेद's picture

22 Oct 2014 - 10:10 am | पाषाणभेद

अरे काय हे? :-)

मिठाई मस्तच

मुक्त विहारि's picture

22 Oct 2014 - 7:30 am | मुक्त विहारि

आवडली....

सतिश गावडे's picture

22 Oct 2014 - 8:55 am | सतिश गावडे

पहिला आणि शेवटचा फोटो कहर आहेत. :)

सखी's picture

23 Oct 2014 - 12:01 am | सखी

हेच म्हणते, नक्की कशाकशाला दाद द्यायची हे ही कळत नाही सानिकेची पाकृ आल्यावर.

एक खोका { या अ‍ॅपल मिठाईचाच बरंका... ;) } इकडे माझ्याकडे पाठवुन द्या बरे ! :)

{मॅंगो काजुकतली प्रेमी} ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rajan gets his way on RBI's restructuring plan

अनन्न्या's picture

22 Oct 2014 - 10:33 am | अनन्न्या

हेच प्रमाण मी काजूच्या फुलांसाठी वापरते.

आदूबाळ's picture

22 Oct 2014 - 2:14 pm | आदूबाळ

हे काय आणिक?

मधुरा देशपांडे's picture

22 Oct 2014 - 2:19 pm | मधुरा देशपांडे

इथे अनन्या ताईच्या काजुच्या फुलांची पाकृ आहे.

एक नंबर मिठाई आणि फोटो तर क्या कहने..

आनंदी गोपाळ's picture

22 Oct 2014 - 5:25 pm | आनंदी गोपाळ

दिवाळीच्या अ‍ॅटमबाँबसारखे दिसलेत ते ;)

सस्नेह's picture

23 Oct 2014 - 6:50 am | सस्नेह

असल्या हुच्चभ्रू ऐटमची पाकृ इतकी सोपी !
फार्फार धन्यवाद सानिकाताई.

जुइ's picture

23 Oct 2014 - 6:52 am | जुइ

अप्रतिम!!!

इशा१२३'s picture

23 Oct 2014 - 4:07 pm | इशा१२३

मस्तच आणि तुझ्या सादरिकरणाच्या कौशल्यामुळे कोणतिहि रेसेपी सोपीच वाटते.
नक्की करुन पाहिन.आत्तापर्यंत आयतीच दुकानातली खाल्ली होती.
फोटो...जाउदे...तु छळ चालुच ठेवणार आमचा. :'(

गौरीबाई गोवेकर's picture

25 Oct 2014 - 1:28 pm | गौरीबाई गोवेकर

छान रेसिपी.

प्यारे१'s picture

25 Oct 2014 - 6:04 pm | प्यारे१

___/\___

पाकृमधली सचिन तेंडुलकर.
कन्सिस्ट्न्टली अबोव्ह द क्लास.

तुमचा अभिषेक's picture

26 Oct 2014 - 10:11 pm | तुमचा अभिषेक

हि दुकानातच पाहिली होती.. घरीही करता येते.. ते ही एवढ्या चार ओळींच्या कृतीत.. ग्रेट!

सुखी जीव's picture

29 Oct 2014 - 1:48 pm | सुखी जीव

पहिला फोटो काय कातील !!
आणि हे घरी करता येत हि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
कमाल आहे तुमची