मंदिर.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
5 Sep 2014 - 12:36 am
गाभा: 

"काय हो, आज जेवायचे आहे ना?"

"अगं.थांब जरा.तिथे कं. ईंटरनेट ब्लॉक करते म्हणून कुठे जाता येत नाही.अन इथे तू.एक-दोन चार तासांचाच काय तो उशीर झाला आणि व्य.नि.ला उत्तर वेळेवर न दिल्याने घोळ झाला.आता परत तसे नको व्हायला."

"अहो.तिथे तुम्ही न जेवता, त्या वेळात बघताच ना?मग आता इथे तरी शांत पणे जेवा."

"तुझे म्हणणे बरोबर आहे.पण अज्जुन माझे "थायलंड" पुर्ण झाले नाही.निदान ते तरी पुर्ण बघू दे.म्हणजे मग मी उद्या "पेरूला" जायला मोकळा."

"तुमचे आपले हे नेहमीचेच.अहो, मी काय म्हणते, थोडे खावून तर घ्या.बघा तरी हा "तवा पुलाव" कसा झाला आहे?"

"अगं, मघाशी तू करत होतीस तेंव्हा नुसत्या वासानेच पोट भरले.शिवाय अद्याप तो सकाळचा "मटण कलिया" तर पचू दे.शिवाय परत तू, मी नको-नको म्हणत असतांना देखील चार-पाच चुरम्याचे लाडू खायला घालतलेस की."

"पण मी म्हणते, इतके काय ते मेले वाचायचे? मी तर मोजींच्या लेखावरचे प्रतिसाद वाचते आणि मनसोक्त हसून बंद करते."

"ओके.आज तू मंदिरात गेली होतीस का?"

"हो तर.मी रोजच जाते.एक दहा मिनिटे ध्यान लावून बसले की एक्दम मस्त वाटते.का हो?"

"मग मी पण आत्ता मंदिरातच बसलोय, ध्यान लावून.माझे वाचून संपले की येतोच जेवायला."

"आग लागो या सवतेला" असे तणतणत बायको जाते.

नवरा आपला परत मंदिरात शिरतो.

===============================================================================

मित्रांनो, तुमचे पण ह्या "मिपा" नावाच्या मंदिरात स्वागत आहे.फक्त त्या मान-अपमानाच्या चपला मात्र इथे आणू नका.इथे व्यक्तीगत असे काहीच नसते, पण दोषांना मात्र इथे थारा नाही.त्यामुळे निर्मळ मनाने आणि गर्व बाजूला ठेवून या.थोड्या फार चापट्या पण बसतीलच, पण त्या बसल्याशिवाय मंदिरातले देव दिसत नाहीत.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2014 - 12:57 am | डॉ सुहास म्हात्रे

चिमटेखोर लेख आवडला =))

टवाळ कार्टा's picture

5 Sep 2014 - 8:18 am | टवाळ कार्टा

मुविकाका रॉक्स \m/

किसन शिंदे's picture

5 Sep 2014 - 8:52 am | किसन शिंदे

हाहाहाहा

बाकी दिलेल्या उपमा बदलून थोड्याफार फरकाने इतरांच्या घरीही असे संवाद/वाद घडत असणार.

भिंगरी's picture

5 Sep 2014 - 9:12 am | भिंगरी

सकाळ संध्याकाळ मिसळ्पाव खातेस,
'अजीर्ण होईल', असे ऐकावे लागते..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Sep 2014 - 9:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फक्त त्या मान-अपमानाच्या चपला मात्र इथे आणू नका.

+१११११

केदार-मिसळपाव's picture

5 Sep 2014 - 7:06 pm | केदार-मिसळपाव

तसले पब्लिक इथे फार नाहिये.

जेपी's picture

5 Sep 2014 - 9:38 am | जेपी

मस्तच लेखन.
अवांतर-बराच वेळ आहे मोकळा?
:-)

श्रीरंग_जोशी's picture

5 Sep 2014 - 9:45 am | श्रीरंग_जोशी

स्फूट आवडले.

या सवतीबाबत नेमकेपणाने ठाऊक झाल्यावर 'सवत माझी लाडकी' अशी परिस्थिती बहुतेक घरांत निर्माण होत असावी असा विश्वास वाटतो.

बाकी मिपावर पडिक असणारे अविवाहित पण 'एकटे नसणारे' यांच्या कौशल्याला दाद द्यायलाच हवी :-).

प्रचेतस's picture

5 Sep 2014 - 9:46 am | प्रचेतस

मस्ताड

समीरसूर's picture

5 Sep 2014 - 9:48 am | समीरसूर

सकाळच्या कांदापोह्यांच्या फोडणीची तडतडच जणू...मजा आली.

एस's picture

5 Sep 2014 - 11:35 am | एस

:-))

सुहास झेले's picture

5 Sep 2014 - 11:41 am | सुहास झेले

हा हा हा =))

ऋतुराज चित्रे's picture

5 Sep 2014 - 11:45 am | ऋतुराज चित्रे

घरोघरी मिपाच्या चुली

कंजूस's picture

5 Sep 2014 - 12:58 pm | कंजूस

हा हा आणि धरलं तर चावतंय सोडलं तर पुरोहिताचं भूत मानगुटीवर बसतंय.
आमच्याकडे हेच चालायचं पूर्वी.आता दावणगिरीची कृती मिळाल्यापासून विनातक्रार मिपावाचन करायला आणि गिळायला मिळतंय.नवीन हिट पाककृतीची विचारणा असते.

विअर्ड विक्स's picture

5 Sep 2014 - 1:06 pm | विअर्ड विक्स

मंदिरातच आलो आहोत तर, लेखनप्रतिभा रुपी देवीस आमचा नमस्कार. लेख आवडला.

सस्नेह's picture

5 Sep 2014 - 2:34 pm | सस्नेह

त्या मान-अपमानाच्या चपला मात्र इथे आणू नका.

अगदी अगदी !

केदार-मिसळपाव's picture

5 Sep 2014 - 7:04 pm | केदार-मिसळपाव

मस्त लिहीलय

मुक्त विहारि's picture

5 Sep 2014 - 11:57 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद देणार्‍यांचे आभार...