मटाराची दिंडे / दिंड

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
2 Sep 2014 - 3:51 am

हल्ली गणपतीत रोज काही ना काही गोड खाणं होत आहे विचार केला काहीतरी चमचमीत, तिखट तसेच सात्विक बनवावे म्हणजे सणासुदीचे पदार्थ खाण्याची रंगत अजून वाढेल :)

.

साहित्य सारणः

१ वाटी फ्रोझन मटार (तुम्ही कच्चे मटार घेतले तर ते आधी बोटचेपे वाफवून घ्या)
१ टेस्पून आले+ हि.मिरची+ कोथींबीर पेस्ट
१ टेस्पून खवलेला ओला नारळ
१ टीस्पून लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून साखर
बारीक चिरलेली कोथींबीर

0.

पाकृ:

पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करून आले+ हि.मिरची+ कोथींबीर पेस्ट घालून परतावे.
त्यात मटार घालून थोडे मॅश करून घ्यावे.
आता त्यात ओले खोबरे, कोथींबीर, मीठ, साखर व लिंबाचा रस घालून परतून एक वाफ काढावी.
सारण शिजले की गॅस बंद करून गार होऊ द्यावे.

.

साहित्य उकडः

१/२ वाटी दूध + १/२ वाटी पाणी
१ वाटी तांदूळपिठी / मोदकपिठी
मीठ
थोडे तूप

.

पाकृ:

एका भांड्यात दूध + पाणी व तूप घालून उकळायला ठेवावे.
तांदूळपिठीत मीठ मिक्स करुन घ्यावे.
दुध-पाण्याला उकळी फुटली की त्यात तांदूळपिठी घालावी व ढवळून एकत्र करावे.
मंद आचेवर एक-दोन वाफा काढाव्यात.

.

उकडीला ताटात काढून गरम असताना तेल-पाण्यच्या हाताने खूप मळावे.
मळून त्याचे छोटे गोळे तयार करावे.
प्लॅस्टिक पेपर किंवा रिक्लोझेबल बॅगेला तेलाचा हात फिरवून घेणे व त्यावर मळलेल्या उकडीचा गोळा ठेवून छोटी पूरी लाटावी.
त्यावर चमचाभर मटाराचे सारण भरून दोन्ही बाजुने पुरीची घडी घालावी.
मग उरलेल्या दोन्ही बाजूंची घडी एकमेकांवर घालावी.
सर्व तयार केलेले दिंडे उकडण्यासाठी १५-२० मिनिटे मोदकपात्रात ,कुकर किंवा मोठ्या भांड्यात चाळणीवर ठेवावे.

.

गरमच सर्व्ह करा.
खरं तर हे असेच नुसते छान लागतात खायला पण हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर ही सर्व्ह करु शकता.

.

नोटः

तुम्ही दिंडे / दिंड ऐवजी उकडीचे तिखट मोदक ही बनवू शकता :)

प्रतिक्रिया

आहा!! काय मस्त पाककृती आहे ही.
करणार! करणार!! करणार!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Sep 2014 - 7:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

झॅक!!!! :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Sep 2014 - 7:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

शेवटचा फोटो केवळ अप्रतिम!!! तों.पा.सु.!!!

कपिलमुनी's picture

2 Sep 2014 - 8:26 am | कपिलमुनी

पाकृ आणि फोटो छान !

मोमोजचं सानिका व्हर्जन फार आवडलं !नक्की करुन पाहीन.

दिपक.कुवेत's picture

2 Sep 2014 - 10:38 am | दिपक.कुवेत

तिखट दिंड आवडले

सुहास झेले's picture

2 Sep 2014 - 10:42 am | सुहास झेले

खल्लास.... पहिला फोटो बघताच काही क्षण थांबून राहिलो :)

पिंगू's picture

2 Sep 2014 - 10:44 am | पिंगू

एक नंबर..

रायनची आई's picture

2 Sep 2014 - 10:46 am | रायनची आई

क्लासिक यार्..एकदम सुन्दर दिसत आहेत्.नक्की करुन बघणार्..पण उकड काढताना त्यात पाण्याबरोबर दूध घ्यायचे प्रयोजन समजले नाही.. ते न घालता करुन बघितले तर?

सानिकास्वप्निल's picture

2 Sep 2014 - 3:43 pm | सानिकास्वप्निल

उकड काढताना त्यात पाण्याबरोबर दूध घेतले कारण दुधाने व तुपाने उकड मऊसूत होते, नरम राहते वातड होत नाही. तुम्ही पूर्णपणे पाण्याचा वापर ही करु शकता फक्त उकड काढताना तूप घालावे व खूप मळावे.

धन्यवाद :)

वा.. मस्तच. छान दिसतायत दिंड.

मनिष's picture

2 Sep 2014 - 11:08 am | मनिष

अहाहा.........काय सुरेख दिसतात आहे. करून बघायला आवडेल, जमेल की नाही माहित नाही. :P

रुमानी's picture

2 Sep 2014 - 11:21 am | रुमानी

मस्त...!

सविता००१'s picture

2 Sep 2014 - 11:46 am | सविता००१

नेहमीप्रमाणेच :)

अत्रुप्त आत्मा's picture

2 Sep 2014 - 12:25 pm | अत्रुप्त आत्मा

आंssss... पहिल्या फोटूनीच मारलं!
आता मि.पा. बल्ल्लवाचार्य अणी चार्यांच्या कडून १ कट्टा जालाच पायजे! :-\
आम्ही फ़ोटूवर कीती दिवस काढायचे!? :-(

मनिष's picture

2 Sep 2014 - 12:39 pm | मनिष

अगदी! अगदी! :-)

मुक्त विहारि's picture

3 Sep 2014 - 12:17 am | मुक्त विहारि

सहमत आहे...

प्यारे१'s picture

2 Sep 2014 - 12:54 pm | प्यारे१

:-/

मृत्युन्जय's picture

2 Sep 2014 - 12:59 pm | मृत्युन्जय

खल्लास. सुंदरच.

सूड's picture

2 Sep 2014 - 2:30 pm | सूड

स्पीचलेस !!

इशा१२३'s picture

2 Sep 2014 - 2:57 pm | इशा१२३

सुंदर आणि सोपा पदार्थ.करुन बघतेच..

पैसा's picture

2 Sep 2014 - 2:58 pm | पैसा

अप्रतिम प्रकार आहे हा!

आदूबाळ's picture

2 Sep 2014 - 3:00 pm | आदूबाळ

हम्म्म्म्म....

रेवती's picture

2 Sep 2014 - 3:30 pm | रेवती

सानिके, मी तुझी शेजारीण व्हायला तयार आहे.

पहील्यांदाच पाहीला हा प्रकार पण मस्त आणि चविष्ट दिसतोय. सोपी पाकृ असल्यामूळे करुन बघण्यास हरकत नाही.

भिंगरी's picture

2 Sep 2014 - 4:32 pm | भिंगरी

मटारच्या करंज्या करते नेहमी,पण हे नविनच आहे
पाहुनच कधी करते असं झालय.
रेवतीताईंनी थोडी जागा दिली तर मीही शेजारी येईन म्हणते.
सुंदरपाकृ

अविनाशकुलकर्णी's picture

2 Sep 2014 - 7:51 pm | अविनाशकुलकर्णी

छान... मोमो टाईप रेसिपी वाटते

त्रिवेणी's picture

3 Sep 2014 - 12:52 pm | त्रिवेणी

खुप सुंदर ग सानिका