(कॉफी कशी करावी?)

पुण्याचे वटवाघूळ's picture
पुण्याचे वटवाघूळ in पाककृती
3 Aug 2014 - 10:40 pm

एक कप कॉफीला अर्धा कप पाणी ...दोन चमचे साखर घाला...एक चमचा कॉफी घाला... उकळा ...बाजूला दुसऱ्या गॅसवर दूध गरम करायला ठेवा. कॉफी चांगली २ मिनिटे मुरु द्या आणि मग अर्धा कप दुध घाला. हि सर्वसामान्य पद्धत. पण कॉफी 'नक्की' कशी करावी ??? कुणी काही प्रयोग करते का ??

मी जनरली अर्धा लिटर दुधाची पिशवी फोडून त्यात अर्धा कप पाणी घालून तापवायला ठेवतो त्यात 'मद्रास कॉफी' ३-४ चमचे तयार ठेवतो ...आणि दुध तापायला लागले कि थोडी थोडी कॉफी घालून हलकेच ढवळतो मधून मधून ...(साय पण विरघळली पाहिजे) ...GAS मंद करून हळूहळू एक हलका चॉकलेटी रंग येईस्तो प्रक्रिया चालू ठेवतो आणि मग गाळून (वरील चोथा थोडासाच दाबून...फार नाही) मग ती वाफाळती कॉफी २ पातेल्यात चढवतो (वरून ओततो ...) जरा छान फेस झालं कि २ मोठ्या मग्स मध्ये भरून कलत्रासहा पितो ... कधी फारच म्हणजे अर्ल ग्रे च्या २ कॉफी bags फक्त २-३ वेळा बुडवून काढतो (एकूण डुबकी चा वेळ ५-६ सेकंद इतकाच)...
फारच मस्त लागते ...

आता तुम्ही सांगा ...

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

3 Aug 2014 - 10:41 pm | यसवायजी

जम्या नई

अत्रुप्त आत्मा's picture

3 Aug 2014 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/drink/coffee-machine.gif
=============
झालं.......... ;)

अनुप कोहळे's picture

4 Aug 2014 - 10:44 am | अनुप कोहळे

कॉपी पेस्ट झाले.....
पण कॉफी काळीच पसंद करतो

आयुर्हित's picture

4 Aug 2014 - 12:28 pm | आयुर्हित

santa----- "if i drink coffee, i ca'nt sleep!!!!"

Banta----- "with me it's the opposite.if i sleep i can't drink coffee."

प्रसाद गोडबोले's picture

4 Aug 2014 - 3:03 pm | प्रसाद गोडबोले

कॉफी गंडलीये

निवेदिता-ताई's picture

6 Aug 2014 - 7:35 am | निवेदिता-ताई

मस्त

नूतन सावंत's picture

30 Apr 2015 - 11:36 am | नूतन सावंत

तुमची कॉफी छानच लागत असेल पण या पद्धतीनेही करून पहा कधीतरी.एक कप कॉफीसाठी रिकामा कप घेऊन त्यात एक चमचा साखर व आवडीप्रमाणे अर्धा ते पाउण चमचा नेस्कॅफे घालून मोजून चार थेंब पाणी घालून चमच्याने घोटायला सुरुवात करावी.साधारण मिनिटभर र्घोटावे लागते.या अवधीत साखर वितळून मश्रन फिके चॉकलेटी दिसू लागते.त्यावर कपभर उकळते दुध ओतून ढवळावे,स्वादस्ष्ट फेसाळलेली कॉफी तयार.वासानेच समाधान होते.

विशाखा पाटील's picture

30 Apr 2015 - 11:47 am | विशाखा पाटील

या पद्धतीने कॉफी मस्त लागते. फक्त कॉफी घोटतांना चार थेंब पाण्याच्याऐवजी बर्फाचा एक खडा टाकून घोटते.

एस's picture

30 Apr 2015 - 3:25 pm | एस

ये मालूम न था!

अयसा बी करक्ये देख्येंगे! धन्यवाद या माहितीबद्दल!

मी साखर, नेस्कॅफे मध्ये डायरेक्ट उकळतं दूध ओततो. हा प्रकार सांच्याला करुन बघतो.

तुषार काळभोर's picture

30 Apr 2015 - 4:20 pm | तुषार काळभोर

एकदम मस्स्त फेस येतो.
कुठेतरी घरगुती एस्प्रेस्सो तयार करायची पद्धत म्हणून हा प्रकार वाचला होता.
(मी पाण्याऐवजी अर्धा-एक चमचा दूध टाकतो. आणि बहुतेक वेळा थंडगार दूधाने ग्लास भरतो)

तिमा's picture

1 May 2015 - 8:42 pm | तिमा

कॉफी कशीही करा, पण पिण्यापूर्वी एक चमचा कंडेन्स्ड मिल्क घाला आणि ढवळा. अमृततुल्य चव येते.

झकास's picture

1 May 2015 - 9:36 pm | झकास

मद्रास कॉफी म्हणजे नक्की काय? filter coffee का?