स्टर फ्राइड चायनिज चिकन

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
30 Jul 2014 - 9:58 pm

.

साहित्य-
५०० ग्राम बोनलेस चिकन ब्रेस्ट पिसेस
हिरवी, पिवळी, लाल भोपळी मिरची १/२ वाटी प्रत्येकी- चौकोनी तुकडे. रंगीत मिरच्या उपलब्ध नसतील तर हिरवी भोपळी मिरची
२-३ कांदापाती,१ मध्यम कांदा
पेरभर आलं ,
२ मोठ्या किवा ३-४ लहान लसूण पाकळ्या
२ सुक्या लाल मिरच्या
१ टेबलस्पून शेजवान सॉस
२टेबलस्पून सोयासॉस
१ टीस्पून मिरपूड
१/२ चमचा साखर
२ टेबलस्पून वाइनविनेगर, ते उपलब्ध नसेल तर साधे विनेगर + कुकिंगवाइन/व्हाइटवाइन प्रत्येकी १-१ टेबलस्पून,
अथवा २-३ टेबलस्पून लिंबाचा रस + १ टेबलस्पून कुकिंगवाइन/व्हाइटवाइन
(ज्यांना वाईन नको असेल त्यांनी घालू नये.)
२ टेबलस्पून कॉर्नस्टार्च
१/४ चमचा एमएसजी (अजिनोमोटो) -ऑप्शनल
मीठ चवीनुसार
२ चमचे तेल +१चमचा ऑलिव ऑइल

कृती-
चिकनपिस धुवून साधारण इंचभराचे लांब लांब तुकडे करून घ्या.
त्यात १चमचा ऑलिवऑइल, २ चमचे वाइनविनेगर, १चमचा मिरपूड, १चमचा सोयासॉस, १चमचा कॉर्नस्टार्च घाला, किंचित मीठ घाला व चिकनपिसना ते चोळा, एकत्र करून मुरवत ठेवा.
रंगीत भोपळी मिरच्यांचे चौकोनी तुकडे (जरा मोठेच)करा.
कांदा चौकोनी चिरा.तुकडे थोडे मोठेच असू द्या.
आलं व लसूण बारीक चिरा.
कांदापात बारीक चिरा.
एका कढईत चमचाभर तेल गरम करा,
त्यात मोठ्या आचेवर लसूण व आल्याचे तुकडे घाला व परता. लाल मिरच्या घालून परता.
कांदा , भोपळीमिरच्या घालून परता. किंचित मीठ घाला.
सोयासॉस, शेजवानसॉस घाला व परता.
भाज्या क्रंचीच राहू द्या, त्या बाजूला काढून ठेवा.
सर्व वेळ आच मोठी राहू द्या.
आता त्याच कढईत चमचाभर तेल घालून गरम करा, त्यात चिकनचे मुरवलेले तुकडे घाला व मोठ्या आचेवर परतत रहा, चिकन शिजू द्या. पण क्रंची राहू द्या.
चिकन झाले की त्यात भाज्या घाला व एकत्र करा.
थोड्या पाण्यात कॉर्नस्टार्च विरघळून घाला.
आपण भाज्यांमध्ये व चिकनमध्ये मीठ घातलेले आहे व एमएसजीही खारट असते हे लक्षात घेऊन मीठ व एमएसजी घाला.
किंचित साखर घाला.
कांदापात घाला.
सर्ववेळ आच मोठी राहू द्या.
फ्राइड राइस अथवा न्यूडल्स बरोबर खा.

.

तळटीप- गटारीसाठी ही पाकृ केली पण मिपाचा संप असल्यामुळे श्रावणातला असला तरी बुधवार पाहून येथे देत आहे.तरी श्रावण्,श्रावण.. करु नये!

प्रतिक्रिया

आआआ हा हा हा....ज ब रा ट. _/\_

यशोधरा's picture

30 Jul 2014 - 10:10 pm | यशोधरा

हैला! मार डाला!

बालगंधर्व's picture

1 Aug 2014 - 12:54 pm | बालगंधर्व

स्वति तै, तुमने मुजे बिहि मर डला. कुहुप दिव्सनी तोनडाला पानि सुतेल असे रेसिपि पहिलि.
धेउरोडल्ला कुथे अस चिनिज भेतेल का? कुनि मला सनगु शकील क?

कुनि मला सनगु शकील क?

तुम्ही शकीललाच का नाही विचारत?

आता श्रावणासाठी पाककृती द्यावी...

मुक्त विहारि's picture

30 Jul 2014 - 10:25 pm | मुक्त विहारि

झक्कास..

आमचे गुरुजी म्ह्णतात... काय वाट्टेल ते पाळा पण खाण्याचे आणि पिण्याचे बंधन पाळू नका...

त्यामुळे हे असे पदार्थ बिंधास्त टाका...

सुहास झेले's picture

30 Jul 2014 - 10:33 pm | सुहास झेले

खल्लास.... बाकी काय शब्दच नाय !!!

श्रावणमध्ये मास मच्छी स्वस्त होणार, त्यामुळे अजून नॉनवेज पाककृती येऊ देत ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jul 2014 - 11:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

युम्मी !

मयुरा गुप्ते's picture

31 Jul 2014 - 1:12 am | मयुरा गुप्ते

स्टर फ्राय चिकन.. अप्रतिम!

-मयुरा.

स्पा's picture

31 Jul 2014 - 10:34 am | स्पा

खल्लास

दिपक.कुवेत's picture

31 Jul 2014 - 11:34 am | दिपक.कुवेत

फारच जीवघेणा आलाय. व्हेज वाले ह्यात चीकन एवजी ऑल टाईम फेवरेट पनीर घालु शकतात.

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 12:22 pm | कवितानागेश

येस्स! मस्तच दिसतय.
आम्ही पनीर, मशरुम्स, बटाता, सोयाचन्क्स, सुरण(?) असं काहीही घालू शकतो.

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 3:39 pm | प्यारे१

+१११
लीमाऊ करणार आणि आम्ही खाणार.

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 4:31 pm | कवितानागेश

याला म्हणतात positive thinking! ;)

सानिकास्वप्निल's picture

31 Jul 2014 - 12:58 pm | सानिकास्वप्निल

आम्हाला चालतं श्रावणात ;)
मस्तं दिसत आहे चिकन, तोंपासू

तुम्ही, वरच्या सानिकातै, ते मधल्या आळीतले पेठकरकाका आणि दिपकभौ, तो गायबलेला गणपा, अजून त्या भिंगरीमॅम, जागुतै, अजून कोण राहिलं ते सर्वजण,

तर तुम्हां सर्वांना प्राणिपात! (सतिशरावांकडून शब्द उधार). कारण असं की, तुमच्यामुळे माझं वजन कमी होण्यास जाम फायदा होतोय. इतक्या सुंदर सुंदर डिशेस आणि तोंपासु फोटो पाहिले की नेहमीचं जेवण मिळमिळीत वाटू लागतं. मग आम्ही कमी जेवतो. मग ह्या पाकृ करून पाहायचा अंगभूत कंटाळा येतो. मग आम्ही हेही खात नाही. मग आमचं वजन कमी होत जातं. मग लोक आमच्या घेरा देहगडाकडे कौतुकाने बघू लागतात. मग आम्हीही ठोकून देतो, "मिपावलकरांचं प्याकेज घेतलंय क्र्याश कोर्साचं. मग!"

तर मग पुन्हा एकदा आभार. अशाच एकसे एक पाकृ टाकत रहा.

Maharani's picture

31 Jul 2014 - 3:00 pm | Maharani

वा वा ..

गणपा's picture

31 Jul 2014 - 3:17 pm | गणपा

मस्त रंगेबीरंगी पाकृ.

पिलीयन रायडर's picture

31 Jul 2014 - 4:35 pm | पिलीयन रायडर

मस्त फोटो.. चिकनच्या ऐवजी पनीर वगैरे घालुन करायचा नुसताच विचार करु.. किंवा मग हाटिलात जाऊन हादडु.. (तिथे पण एवढं सुंदर दिसत नाही..) इतकं निगुतीनं करायचं कुठलंच काम आपल्याकडुन होणार नाही..

मला त्यातला भात वाढा, अगदी नावालाच वाढा बरं का!! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 5:18 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/halloween/cute-pumpkin.gif

शाकाहार्‍यांसाठी भात आहे ना? छान दिसतोय. पूर्वी तू कृती दिली होतीस.

प्रभाकर पेठकर's picture

1 Aug 2014 - 12:09 pm | प्रभाकर पेठकर

आकर्षक छायाचित्र आणि तपशिलवार पाककृती. चीनी पाककृत्या आवडतातच. त्यात माझा श्रावण-बिवण नसल्याने पहिली संधी मिळताच करून पाहणार/खाणार आहे.

पैसा's picture

1 Aug 2014 - 12:27 pm | पैसा

किती आकर्षक फोटो ते! आणि कृती पण अगदी तपशीलवार! झक्कास!

gaurikambli's picture

1 Aug 2014 - 12:50 pm | gaurikambli

अप्रतिम....

उमा @ मिपा's picture

1 Aug 2014 - 3:08 pm | उमा @ मिपा

मस्त.

स्वातीताई, पनीर घालून केली अाज.मस्तच होते गं!

तुमचा अभिषेक's picture

1 Aug 2014 - 10:03 pm | तुमचा अभिषेक

लव्हली :)