शाही अंडा मसाला

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
13 Jul 2014 - 7:34 pm

साहित्य- ४/५ अंडी उकडून,
२/३ टोमॅटो किवा १ वाटी तयार टोमॅटो प्युरे,
२/३ मध्यम कांदे,
१ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,
१ चहाचा चमचा कसूरी मेथी, १तमालपत्राचे पान
७/८ काजूबिया, साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,
१ मोठा चमचा हेवी क्रिम किवा साय,२ मोठे चमचे तेल,१चमचा बटर,
मीठ चवीनुसार, १/२ चहाचा चमचा साखर
थोडी कोथिंबिर गार्निशिंग साठी.

कॄती- खोबरे किंचित लालसर कोरडेच भाजून घ्या व बाजूला ठेवा.
एक चमचाभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता.
खोबरे व ह्या सर्व मिश्रणाची मिक्सर मधून पेस्ट करा.सिल्किश टेक्श्चर येईल.
कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात ही कांदा टोमॅटो इ.ची पेस्ट घाला.थोडे पाणी घालून सरसरीत करुन घ्या म्हणजे चांगली ग्रेव्ही होईल. एक तमालपत्राचे पान घाला. उकळू द्या. बटर घाला.
आता उकडलेली अंडी चार भाग करुन घाला व दोन तीन उकळ्या येऊ द्या.
हेवी क्रिम किवा साय घाला.
मीठ व साखर घाला.
१/२ चमचा साखर घालून ग्रेव्ही गोड होत नाही,तर किंचित गोडूस चव येते. ती नको असेल तर साखर घालू नका.
कोथिंबिरीने सजवा.(केवळ कोथिंबिर आणण्यासाठी ५ ,६ किमी जायचा कंटाळा केल्यामुळे फोटोत कोथिंबिर नाहीये..)

अंड्याऐवजी बटाटे,पनीर किवा आपापले डोके लढवून इतर काही घालून अंडेविरहित व्हर्जन करता येईल.

.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

13 Jul 2014 - 7:41 pm | मुक्त विहारि

झक्कास..

विजुभाऊ's picture

13 Jul 2014 - 8:11 pm | विजुभाऊ

झकास. लवकरच करुन पहाण्यात आणि चाखण्यात येईल

अजया's picture

13 Jul 2014 - 8:39 pm | अजया

छान पाकृ.करेन नक्की.

शाली's picture

13 Jul 2014 - 11:13 pm | शाली

*good*

पैसा's picture

14 Jul 2014 - 12:00 am | पैसा

कसली भारी पाकृ आणि फोटो! बरेच दिवसांनी स्वातीकडून एक मस्त पाकृ आली!

रेवती's picture

14 Jul 2014 - 12:47 am | रेवती

वाह! फोटू व कृती आवडली. मी अंडे खात नसले तरी बाकीच्यांना करून घालता येईल. शिवाय ही पाकृ अंडे न घालता कशी करायची त्याबद्दलही सुचवण्या आहेतच!

Maharani's picture

14 Jul 2014 - 6:53 am | Maharani

nakki karun baghanar.... *ok*

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2014 - 11:26 am | दिपक.कुवेत

पण अंड आणि क्रिम/साय घालुन चविचा अंदाज येत नाहिये.

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2014 - 12:15 pm | प्रभाकर पेठकर

चविष्ट पाककृती.

अंडी फोडून न घालता, सोलून तशीच आख्खी घालावित आणि कसूरी मेथी आधी न घालता सर्वात शेवटी त्याची पावडर वरून घालावी.

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2014 - 12:17 pm | प्रभाकर पेठकर

'अंडी फोडून' च्या ऐवजी 'अंडी फोडी करून' असे वाचावे.

गणपा's picture

14 Jul 2014 - 1:08 pm | गणपा

सहमत
फार तर उकडलेल्या अंड्याला काट्याने टोचे मारुन घ्यावेत.
पाकॄ आवडली हे वेसांनल.

सुनील's picture

14 Jul 2014 - 2:04 pm | सुनील

किंबहुना रटरटणार्‍या रश्शात अंडी फोडूनच घालावीत. एक वेगळा प्रकार.

बाकी पाकृ मस्तच!

सुनीलराव मलाही लाल-तिखटजाळ रश्यात अंडी फोडुन घातलेलीच आवडतात.
इथे काजु-क्रिम असे गोडुस पदार्थ असताना फोडुन घातलेली अंडी कशी दिसतील/लागतील बरं?

सुनील's picture

14 Jul 2014 - 2:22 pm | सुनील

ह्म्म. तुमच्याकडे बिंदू आहे! ;)

शाही मसाल्यात उकडलेली अंडीच चांगली लागतील.

नंदन's picture

14 Jul 2014 - 1:16 pm | नंदन

पाकृ. ग्रेव्ही अगदी रिच, चविष्ट दिसते आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jul 2014 - 1:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

पाकृ पाहुन तोंपासु

सानिकास्वप्निल's picture

14 Jul 2014 - 5:34 pm | सानिकास्वप्निल

आवडली :)

आयुर्हित's picture

22 Jul 2014 - 9:19 pm | आयुर्हित

शाही पाकॄ जिंदाबाद. फोटो पाहुन तर अगदी तोंपासू!

पण आले,लसुण आणि हळदीशिवाय ही पाकॄ शाही कशी होईल बरे?

सस्नेह's picture

22 Jul 2014 - 9:46 pm | सस्नेह

बाकी या गोडूस ग्रेव्हीला अंड्यापेक्षा पनीरच साजून दिसेल असे नमूद करू इच्छिते.

प्यारे१'s picture

22 Jul 2014 - 11:59 pm | प्यारे१

पाकृ चवीला गोडूस वाटली तरी 'परिणाम' तिखटच होतील असं वाटतंय.