पाकपुर्‍या (पाकातले चिरोटे)

मितान's picture
मितान in पाककृती
13 Jul 2014 - 5:18 pm

पावसाळा सुरू झाला की आईचा स्वयंपाक बदलायचा. पक्वान्न पण बदलायची. आंबे संपलेत, श्रीखंड खाण्यासारखे हवामान नाही, श्रावणातला पुरणाचा रतीब सुरू व्हायचा आहे, खिरींचा खुराक सुरू व्हायला हिवाळा अजून यायचाय, बाहेर भुरभुर पावसामुळे चमचमीत नि गोड खायचा आमचा हट्ट पुरवायचा आहे.... असं सगळं असायचं. मग काय सुरू व्हायचे एकेक पदार्थ.. कधी गुळातले गडगिळे, कधी कणिक तुपावर एकदम चॉकलेटी भाजून त्याचा शिरा, गोड पुर्‍या, सुधारस, साखरभात आणि आमच्या अत्यंत आवडत्या पाकपुर्‍या. म्हणजेच चिरोटे !
आता मी तिच्या भूमिकेत गेलेय. लेक माझ्यासारखीच खवैय्यिण ( वा ! ) असल्याने तिचेही हट्ट भरपूर असतात. आजही असाच हट्ट केला तिने. अनायसे सुट्टीपण ! मोकळा वेळ सत्कारणी लावावा म्हणून काहीतरी गोड पदार्थ करायचे ठरवले. घरात मैदा होता. बरेच दिवस झाले पाकातले चिरोटे केले नव्हते. मग तेच करावेत असे ठरवले. तासाभरात चिरोटे तयार होऊन व्हाटस्अप वर मैत्रिणींना फोटो टाकले सुद्धा ! बऱ्याच जणींनी रेसिपी मागितली. म्हणून इथे देतेय.

साहित्य :

३ कप मैदा
३ टेबल्स्पून तूप (मोहन)
१ १/२ कप ताजे दही
२ टे स्पू तांदळाचे पीठ
चिमुटभर मीठ
१ १/२ कप साखर
तळण्यासाठी तेल किंवा तूप
केशर किंवा केशर इसेन्स, वेलची पूड
कृती :
मैदा चाळून घ्या. त्यात तूप चांगले कडकडीत गरम करुन घाला. चिमुटभर मीठ आणि दही घाला. मऊ पीठ मळून घ्या. हे पीठ १५ मिनिटे झाकुन ठेवा.
आता पाक करायचा. एका पसरट भांड्यात साखर घ्या. ती बुडेल एवढे पाणी घाला. मध्यम आचेवर उकळायला ठेवा . उकळी आली की त्यात वेलची पूड आणि केशर घाला. पाक ५ मिनिटे उकळू द्या. थेंबभर पाक ताटात टाकून बघा. तो थोड्या वेळात घट्ट झाला पाहिजे. असा पाक तयार झाला की गॅस बंद करा.
आता चिरोटे लाटायला घ्यायचे.
मैदा आता अजून थोडावेळ मळुन घ्या. पोळीला करतो तसे गोळे करून घ्या. चिरोट्याच्या पोळीला मध्ये लावण्यासाठी साटं तयार करून घ्या. त्यासाठी तांदळाच्या पिठात तेल घालून मिसळून घ्या.
मैद्याचा एक गोळा घेऊन अगदी पातळ पोळी लाटून घ्या. ती बाजूला ठेवा. अशाच अजून दोन पोळ्या लाटून घ्या. आता पहिल्या पोळीला साटं लावून त्यावर दुसरी पोळी ठेवा. त्या पोळीलाही साटं लावून त्यावर तिसरी पोळी ठेवा. आता या तीनही पोळ्यांचा रोल करायचा. रोल करतानाही पोळी गुंडाळली की त्याला साटं लावून मग वरची गुंडाळी करायची. रोल थोडा घट्ट असावा. ढिला असेल तर चिरोटे तळताना सुटतात.
आता रोलचे पातळ काप करून घ्या. कापाच्या ज्या बाजूला पापुद्रे दिसतायत ती बाजू हातावर हलकीच दाबून घ्या. नंतर हलक्या हाताने गोल किंवा लांबट आकारात लाटून घ्या. कढईत तेल किंवा तूप तापत ठेवा. तेल पूर्ण गरम झाले की गॅस मंद करा. आणि त्यात चिरोटे तळून घ्या. ते जरा कोमट असतानाच पाकात टाका.
चिरोट्यांचा दुसरा घाणा तळून होईपर्यंत पहिला घाणा पाकात ठेवायचा. आणि मग पाक निथळून एका चाळणीत चिरोटे गार होऊ द्यायचे. शक्यतो एकावर एक न येऊ देता. म्हणजे मऊ पडत नाहीत.
अशाच पद्धतीने सगळे चिरोटे तळून पाकातून काढून गार होऊ द्या. किंवा गरमागरम खायला घ्या.
chirote

या फोटोतले काही वेटोळे जिलबीसारखे दिसत असले तरी चिरोटेच आहेत. बर्‍याच दिवसांनी केल्यामुळे तळण्याआधी किती पातळ पोळी लाटावी हा अंदाज चुकल्याने त्या जिलब्या झाल्यात ! ;)

या प्रमाणात मध्यम आकाराचे साधारण ४० चिरोटे तयार होतात. हे चिरोटे (उरले तर) ८ दिवस फ्रिजबाहेर किंवा १०-१२ दिवस फ्रीज मध्ये चांगले टिकतात.

प्रतिक्रिया

एसमाळी's picture

13 Jul 2014 - 5:39 pm | एसमाळी

मस्तच रेसीपी.
खाऊन किती वर्ष लोटली पण चव आज हि लक्षात आहे.आमच्या मराठवाड्यातील झक्कास रेसीपी.(इतरत्र चिरोटे करतात. पिठी साखर वापरुन)

पाकातली पुरी हा माझा भयंकर आवडता प्रकार आहे. लहानपणी वाढदिवस आला की आधी दोन दिवस गोडाचे काय हवे? अशी विचारणा आईकडून होत असे. पाकातली पुरी हे उत्तर कधीही बदलले नाही. ;) पाकातले चिरोटेही आवडते आहेत. फोटू पाहून करावेसे वाटतायत. पुरी करताना दही घालून रवा मैदा रात्री मळून ठेवते. आता पुर्‍या करायलाच हव्यात. फोटू फारच गोड आलाय.

सस्नेह's picture

19 Jul 2014 - 1:30 pm | सस्नेह

मलापण पा चि भयंकर आवडतात फोटोत शिरून दोन खाऊनपण आले

चित्रगुप्त's picture

13 Jul 2014 - 6:30 pm | चित्रगुप्त

वा वा वा... तोंडाला पाणी सुटलंय फोटो बघून.

पाकातली पुरी हा माझा भयंकर आवडता प्रकार आहे. लहानपणी वाढदिवस आला की आधी दोन दिवस गोडाचे काय हवे? अशी विचारणा आईकडून होत असे. पाकातली पुरी हे उत्तर कधीही बदलले नाही

काय योगायोग आहे! माझेही अगदी असेच आहे. अजुनही दर वाढदिवसाला पाकातल्या पुर्‍याच बनतात.

आमचे मिपावरील लेखनः
http://www.misalpav.com/user/9160/authored

वाव... काय मस्त दिसतायत पुर्‍या... यम्म्म्म्मी

स्वाती दिनेश's picture

13 Jul 2014 - 6:58 pm | स्वाती दिनेश

पाकातले चिरोटे आवडले,
स्वाती

मुक्त विहारि's picture

13 Jul 2014 - 7:15 pm | मुक्त विहारि

हा प्रकार फार उत्तम करते.

मला पाकातले चिरोटे, हा प्रकार जास्त आवडत नाही. (संध्याकाळच्या पेयाबरोबर पाकातले चिरोटे?)

त्यामुळे माझ्या साठी मिरपूड घालून चिरोटे केल्या जातात.

प्यारे१'s picture

13 Jul 2014 - 7:27 pm | प्यारे१

मस्ताडच!

मस्तच! अरे वा बरेच जण आहेत की वादिला पु-या खाणारे.

कंजूस's picture

13 Jul 2014 - 8:48 pm | कंजूस

मस्त आला आहे फोटो .
धाकटा भाऊ या पुऱ्या लहानपणी आवडीने खायचा आणि सगळ्या पाकाने अंग बरबटून ठेवायचा .आजच केल्या होत्या .मलाही आंबट गोड चवीच्या आवडतात .नुसत्या गोड नाही आवडत .रवा मैदा योग्य प्रमाणात पडल्यास कणीदार होतात .

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2014 - 9:55 am | अत्रुप्त आत्मा

ताटात..मधे त्या दोन खमंग तळलेल्या दिस्ताहेत ना..त्या माज्या!!! *yahoo*

बदलापूरात काटदर्‍यांकडे खास चैत्री पाडवा, दसरा आणि दिवाळीला मिळणारे पाकातले चिरोटे आठवून अंमळ हळवा झालो. ;)

रामदास's picture

14 Jul 2014 - 9:21 pm | रामदास

होण्यासारखं बदलापूरात बरंच काही आहे.

सुहास झेले's picture

14 Jul 2014 - 10:20 am | सुहास झेले

सहीच... :)

खूप वर्ष झाली पाकातल्या पुऱ्या खाऊन... :(

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2014 - 11:18 am | दिपक.कुवेत

पाकातले चिरोटे एकदम टेम्टींग आणि खुशखुशीत दिसत आहेत. लगेच उचलुन खावेसे वाटतायेत. पाकातल्या पुर्‍या हा माझा सुद्धा भयंकर आवडता पदार्थ आहे. त्यातल्या त्यात हलक्या गरम पुर्‍या खायला तर जाम मजा येते. पण पाकातल्या पुर्‍या आणि चिरोटे हे दोन वेगळे पदार्थ आहेत ना? चिरोटे मैद्याचे ठिक आहेत पण पुर्‍या मला मैद्याच्या कधीच आवडत नाहित. गार झाल्या कि कडक होतात. त्यापेक्षा कणीक + रवा घालुन पुर्‍या मस्त मउ होतात आणि नंतरहि मउ राहतात. पुर्‍यांचा पाक उरला तर त्यात लिंबु पिळुन सुधारस करतात जो सुद्धा मला कधीच आवडत नाहि.

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2014 - 12:08 pm | प्रभाकर पेठकर

>>>>पाकातल्या पुर्‍या आणि चिरोटे हे दोन वेगळे पदार्थ आहेत ना?

होय. माझ्या मतेही हे दोन वेगळे प्रकार आहेत. पाकातल्या पुर्‍या ह्या आपल्या साध्या पुर्‍या तळून झाल्यावर पाकातून काढतात आणि चिरोटे वरिल पाककृतीप्रमाणे बहुपदरी असतात. त्या तिनही पोळ्यांना वेगवगळे रंग लावूनही चिरोटे बनवितात. तसेच सात-सात पोळ्या लाटूनही वरील प्रमाणेच चिरोटे करतात. खुसखुशीत चिरोटे लहानपणीच काय अजूनही आवडतात पण डॉक्टरचे वटारलेले डोळे..... जाऊद्या. नम्र नकार.

येस्स ! पुढच्या वेळी रंगीत करून बघेन. आई लवंगलतिका करताना असेच ५ रंग वापरते ते आठवलं. ( आमाला कुठुन येवढी भारी युक्ती सुचायला ! )

दीपकभाऊंनी सांगितल्याप्रमाणे रवा नि कणिक घेतली तर पुरीला पदर सुटतील का ?

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2014 - 4:28 pm | दिपक.कुवेत

आय थींक तुझा का माझा जरा गोंधळ उडालाय. तुमच्याकडे चिरोट्यांनाच पुरी म्हणतात का? वर म्हटल्याप्रमाणे चिरोट्यांना पदर सुटण्यासाठि मैदाच योग्य. मैद्यामुळे त्या खुशखुशीतहि होतात. मी जे कणिक + रवा म्हणतोय ते साध्या पुर्‍यासांठि. ज्यांच्या नेहमीप्रमाणे पुर्‍या करुन साखरेच्या पाकात (किंचीत लिंबु पिळलेल्या) सोडायच्या.

सानिकास्वप्निल's picture

14 Jul 2014 - 5:31 pm | सानिकास्वप्निल

वर मितानताईने दिले त्यांना आम्ही पाकातले चिरोटेच म्हणतो, रंगीत चिरोटे केले तर वरून थोडी पिठीसाखर ही भुरभुरतो (मागे मिपा दिवाळी अंकासाठी मी पाकृ दिली होती) .

आम्ही सुद्धा पाकातल्या पुर्‍या , कणकेच्या किंवा रवा-मैद्याच्या पुर्‍या तळून केशर + साखरेच्या पाकात सोडतो व निथळून त्यावर सुक्यामेव्याची पुड भुरभुरतो. माझी आई तर आमरस घालून पाकतल्या पुर्‍या करते , कसल्या भन्नाट लागतात :)

मितान ताई पाकातले चिरोटे भारी दिसत आहेत :) यम्मी!!

मुक्त विहारि's picture

14 Jul 2014 - 3:10 pm | मुक्त विहारि

साधे चिरोटे करा आणि पाकात न बुडवता, सॅकरिन बरोबर खा.

गोड खाल्याचे समाधान आणि मधूमेहपण वाढणार नाही.

(बादवे, साखरेच्या पाका ऐवजी, सॅकरीनचा पाक केला तर चालेल का? म्हणजे मधूमेह असणार्‍या व्यक्तींना पण उत्तम)

आयुर्हित's picture

20 Jul 2014 - 1:11 pm | आयुर्हित

व्यनि केलाय व खफ वरही लिंक दिली आहे.

प्रभो's picture

14 Jul 2014 - 11:43 am | प्रभो

भारी!

सविता००१'s picture

14 Jul 2014 - 12:07 pm | सविता००१

सुंदरच दिसताहेत.
भन्नाट आवडता पदार्थ.

Maharani's picture

14 Jul 2014 - 12:59 pm | Maharani

Mitan....khupach chan....

फोटू फारच टेंम्टीग आहे.
रसना चाळावली.

झकासराव's picture

14 Jul 2014 - 1:44 pm | झकासराव

कालच आपटे फुड्सचे पाकातले चिरोटे घेवुन आलोय.
त्यामुळे अमंळ कमी जळजळ झाली. :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jul 2014 - 1:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

फोटोही मस्तच..फार कष्ट लागतात का हो हे करायला? नाही म्हणजे एकदा करुन बघावेत म्हणतो घरी :)

मितान's picture

14 Jul 2014 - 2:13 pm | मितान

फार कष्ट लागतात का हो हे करायला? >>>>> जोडीने केले तर कष्ट नि साखर दोन्ही कमी लागतात ;) :)

स्पा's picture

14 Jul 2014 - 2:12 pm | स्पा

यम्मी ...
सही वाटतायेत

धन्यवाद सर्व खवैय्यांना !
मिपावरचे सगळे बल्लवाचार्य आणि सुगरणी धाग्यावर यीऊन गेल्यामुळे पाकपुर्‍या धन्य झाल्या ! *yes3*

त्रिवेणी's picture

14 Jul 2014 - 2:35 pm | त्रिवेणी

*good*

स्पंदना's picture

18 Jul 2014 - 9:15 pm | स्पंदना

सहीच!
अगदी पहिल्यांदा केल्या होत्या तेंव्हा चुकुन पातीच्या बाजूने लाटल्या होत्या अन मग ते जाड जाड लाटे तळले होते. आता जमतात. करुन पाहेन परत एकदा.