<<< कथामोजी >>>

प्यारे१'s picture
प्यारे१ in पाककृती
6 Jul 2014 - 10:09 pm

साहित्यः
१. एखादी पन्नास ते सत्तर ओळींमधली साधीशी कथा अथवा किस्सा.
२. रोजच्या वापरात शक्यतो नसलेले एखादा मराठी अथवा इंग्रजी भाषेतला मराठी लिपीत लिहीलेले शब्द.
३. वरील प्रमाणेच प्रकारची नावे.
४. बक्खळ काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार आणि मोडके पाय.
५. विरामचिन्हं टाकावीशी वाटतील तेव्हा.

कृती:

कुठलाही किस्सा घ्या अथवा गोष्ट घ्या. त्यातल्या वाक्यांची आणि शब्दांची सालं काढून घ्या. त्यांचे अर्थ वेगळे करा.
आता काहीही बादरायण संबंध असलेले/ नसलेले चार पाच नावांचे लोक घ्या. त्यांना वरील वाक्य आणि शब्दात गुंफा.
डोळ्याला पट्टी बांधून गाढवाला शेपूट काढतात तसं सालं काढलेल्या शब्दांना कुठंही काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार द्या. सजावटीसाठी एखादा शब्द अर्धवट मोडा.

फारच सरळसोट दिसत असेल तर एखादा पॅरेग्राफ खाली या.
(टी आर पी च्या आवश्यकतेनुसार 'तयार' बल्लव अशा गोष्टी करु शकतात.)

सगळ्यात शेवटी विरामचिन्हांचा सढळ हस्ते वापर करा.

झाली आपली पाककृती तयार!

(ता. क. ह्या पाकृस फोटो नाहीत. पण 'इच्चुकां'नी मिपावरचे सर्वाधिक यशस्वी धागे शोधून पहावेत. त्यात आपणास आवश्यक ते डो़ळे निववणारे प्रकार 'निच्चित' सापडतील.)

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

6 Jul 2014 - 10:12 pm | सस्नेह

पहिली !

सस्नेह's picture

6 Jul 2014 - 10:31 pm | सस्नेह

आमचेकडे, शब्दांची साले काढण्याचे सालकाढणे, गाढवांना शेपट्या काढण्याची पेण्शिल, काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार इ.साठी अर्धचंद्राकार कातणे इ. साहित्य माफक दारात मिळेल !

दिपक.कुवेत's picture

6 Jul 2014 - 10:17 pm | दिपक.कुवेत

कधीहि नाहि पहिला.....आता काढा किस!!!

मी दुसरा म्हणायच्या आत तुम्ही कोईटवरुन नंबर लावलात. :(

आयुर्हित's picture

6 Jul 2014 - 10:19 pm | आयुर्हित

पाककृती तयार झाली की डिझायनर डिशमध्ये वाढुन घेवुन वरुन दोन चार स्मायल्या पेराव्यात व गरम गरम सर्व करावे.

गरम गरम सर्व करावे म्हणजे नेमके काय काय करावे?

बॅटमॅन's picture

7 Jul 2014 - 1:14 pm | बॅटमॅन

म्हंजे सर्व काही गरमागरम करावे. गारढोण करू नये.

किसन शिंदे's picture

6 Jul 2014 - 10:26 pm | किसन शिंदे

थांबायला हवंय राव हे कुठेतरी! *sad*

प्यारे१'s picture

6 Jul 2014 - 10:31 pm | प्यारे१

कोण कोणास कधी कुठे कुठल्या परिस्थितीत म्हणाले? ससंदर्भ स्पष्ट करा. - ५ गुण.
धन्यवाद.

सीरियसली कुणासाठी आहे रे वरचं वाक्य किस्ना?

सस्नेह's picture

6 Jul 2014 - 10:32 pm | सस्नेह

काय व कुठे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2014 - 10:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय व कुठे ?

-दिलीप बिरुटे

धन्या's picture

6 Jul 2014 - 10:37 pm | धन्या

काय व कुठे ?

बॅटमॅन's picture

7 Jul 2014 - 1:58 am | बॅटमॅन

यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं, यद्वा तद्वा भविष्यति ||

ची टेक्स्ट व्हर्जन.

मुक्त विहारि's picture

7 Jul 2014 - 8:10 am | मुक्त विहारि

नक्की करून बघीन..

अजया's picture

7 Jul 2014 - 8:10 am | अजया

प्यारेकाका, पा कृ जळल्यासारखी वाटली. गॅस थोडा कमी ठेवत जा. *wink*

शेजार्यांच्या घरातील पाकृच्या वासावर उपाय म्हणून घाईघाईने ही पाकृ बनवली असावी.

अती घाई, पाकृ करपून जाई !!!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2014 - 12:43 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

प्यारे१'s picture

7 Jul 2014 - 12:57 pm | प्यारे१

:) अजून शिकतोय हो! करपायचीच. तुम्ही थोर्थोर लोक्स काहीही खपवून घेताच की नैतरी.

आपल्यासारख्या थोर व्यक्तीने आम्हाला थोर म्हटले हा आपला विनय आणि आमचे भाग्य आहे. :)

प्यारे१'s picture

7 Jul 2014 - 1:31 pm | प्यारे१

क्या आप के डिक्शनरी में 'भाग्य' नाम का कोई शब्द है?
(क्या आपके टुथपेस्ट च्या चालीवर)
आणि आमच्याकडं विनय बिनय नाय बरं का! ;)

-ट्यार्पी प्रयत्नशील!

क्या आप के डिक्शनरी में 'भाग्य' नाम का कोई शब्द है?

आहे की, मात्र आमची भाग्य या शब्दाची व्याख्या वेगळी आहे.

माणसाच्या आयुष्यातील संधीं किंवा अधोगती यांना पुरक किंवा मारक ठरणारे सारे अंतर्बाह्य घटक म्हणजे भाग्य.

धन्या's picture

7 Jul 2014 - 1:39 pm | धन्या

एक सांगायचं राहीलं, या अंतर्बाह्य घटकांमध्ये आकाशातील ग्रह तारे येत नाहीत. पूर्वसंचित वगैरे आमच्या दृष्टीने अस्तित्वातच नाही त्यामुळे तेही यात येत नाही. :)

प्यारे१'s picture

7 Jul 2014 - 2:00 pm | प्यारे१

चालतंय की!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2014 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा

@>>> वा..वा..वा..!!! पारलौकिकाच्या कचाट्यातून, (भाग्याला) मुक्ति देणारी व्याख्या! मान गये __/\__

ही रेशीपी वाप्रुन केलेले नवी डीष

http://misalpav.com/node/28258 ओपन फुल्ल टॉस

नाही म्हणजे हे पाय जिवंतपणीचे कि रस्सा केल्यानंतरचे. *lol*