आठवणी दाटतात .......... !!

डॉ. दत्ता फाटक's picture
डॉ. दत्ता फाटक in जनातलं, मनातलं
26 Jun 2014 - 6:56 pm

ते दिवस खूप म्हणजे खूपच छान होते, गांवकुसाकडे एवढी प्रगती झाली नव्हती, आमची दगडी शाळा नांनदुरकीच्या झाडा-जवळ भरायची, एकच मोठा वर्ग, त्यात पहिली ते तिसरीचे वर्ग भरायचे, बाकडी वगैरे कांही नव्हती, एकाखालीएकशा चौरस पट्टे पंधरा- सोळाफूट लांबीचे मुरुमाच्या मातीचे ताशीवदगडी ची-याचे बांध माती ओघळू नये म्हणूनचे, एकच खुर्ची-टेबल, बसायला तरटाची बसकणं, भरपूर धूळ,
बंडोपंत परांजपे मास्तर, एकहाती कळकीचा फोक, एकहाती खडू, डोक्यावर तिरकस स्वभावाप्रमाणे तिरकस टोपी, हात-धुलाईचा झब्बा, कंचं बांधलेलं भोंगळ धोतर, उभंगंध, आणि अनुनासिक बोलणं, दोनचार खास शिव्या तोंडी लावायला, भारी मा- रकुटा मास्तर, एकदा वर्गात काहीबाहीं झालं आणि दोनबोटामध्ये पेन्सिल ठवून बोटावर सपाटून मार खाल्ला, खूप खुन्नस खा-ल्ली, दुस-या दिवशी बापू घा-याच्या कुपणावरची सुकी खजकूयली आणून ती पावडर मधल्या सुट्टीत कोणीनाहीसे बघून भोंगळ धोतरात फुंकली न सूबाल्या केला, वर्ग भरला, पाहतो तो मास्तरांच तांडव सुरू, आणि तोंडाने शंकराच धद द्धत असं स्तवन आहे ना तसं उच्चरवात चालू मी कृतकृत्य झालो, पण नामी क्षिक्षा झाली ,“ कोंबड्याची” दोन पायांतून हात काढून कान धरण्याची, मग काय कोणीतरी चुगली खाल्ली आणि आमची मास्तर हाती दंड घेवून संघवाल्या सारखी परेड घेवून गाजत (वाजवणारं कोणी नव्हतं म्हणून) मागे वानरसेसह आमच्या दारी पोहोचली, “” बळवंतराव आहेत का ! इति मास्तर, आमचा आजा डोईवरून हात फिरवीत बाहेर आला, तो तोंडाचा ओ करूनच, सगळं गा-हाण घातलं, आणि कौल मागितला, आज्याने कसलाही विचार नकरता “मास्तर फोक द्या इकडे,”” गर्जलेच की हो !! उभाआडवा फोडून काढला, कोणीतरी मध्ये पडलं न सुटका झाली त्यावेळी आजच्या सारखं नव्ह्तं, ? पाठीच काय सगळ्या अंगाच धिरड झालवतं, दोन दिवस आजा तेल हळद लावून सेवा करत होता तोंडाने असं वागु नकोरे करत डोळ्यातून पाणी गाळत होता. पण एवढ होऊनही आम्ही सुधारलो नाहीच पुन्हा नवी विटी नवा दांडू !! “” आम्ही बि - घडलो तुम्ही बि - घडाना”” असं नव्हे ! उलटेच. ते वयचं तसं होतं.
, मास्तर आला नाही की पर्वणी असायची आणि त्यात उन्हाळा असला तर खूपच धमाल! आठनऊ जणांचा चमू असायचा, धावत घरी जावून एकदोन जणं बेचक्या घेवून येत, एखादा होममेड ( मराठी शब्द अज्ञात ) चेंडू म्हणजे मध्ये गोलसर दगड बाजूनी नारळाचा काथ्या आणि सुतळीने घट्ट बांधलेला आबाधुबीसाठी लगोरीसाठी, भेंडीची, काजूच्या डाम्भ्याची विटी दांडू. अगदी तिखट मिठाच्या पुड्यासुध्दा, सबंध दिवस पर्वणीचा असे, खेळ झाला की गांव तलावात डुबक्या भर उन्हातल्या, मग वानरसेना नानू भंडा-याच्या कंपाउंडात, गावापासुन दूर पण रानमेव्यान भरगच्च, गावरान कै-या, “काळ्यामैनेच्या ” करवंदाच्या जाळ्या, द्राक्षापेक्षा मोठी न चविष्ट, फारकाय पांढरट पिवळी गोडट भोकरं, कायन्काय, बेचकीनं हिरव्याटंच कोवळ्या कै-यां च्या घडावर बेच्कीन निशाणा साधला की धपकन पाच सात कै-या पडत, बहुदा त्या ठेचळून फुटायच्या त्यात मीठ तिखट घालून तोंड आंबट करून कधी चंबू करून तिखटाच्या साथीन सु $$ सु निघणारा आवाज, मग करवंदीच्या जाळीवर धाड, तोंडातला क्षोभ कमी करण्यासाठीचाआणि शेवटी पांढरट पिवळ्या गोडसर पण गोंदा सारख्या चिकट गेंदेदार फळांचा आस्वाद दिवस कसा मावळतीला गेला त समजायचंच नाही मग धावाधाव घरी गेल्यावर साळसूदपणें हातपाय आणि खास करून तोंडधून देव्हा-याकडे मोर्च्या, शुभं करोति पासून ते, श्री गणेशायनमहा, अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध ---- चालू मग ओटीवरल्या काजव्याच्या ढिम्म प्रकाशात उजळणी अगदी सव्वायकी, दिडकीपर्यंत मग शाळेचा उरलासुरला अभ्यास, अंगणातली घोंगडीवरची बैठक आणि तसंच कलंडण, डोळे केंव्हा मिटायचे कळायचं सुध्दा नाही, दिवसभराची वणवण, जग यायची ते चला गिळायला, नाहीतर खादीला हे बोधन रागानी नव्हे प्रेमानीच असे. तो एक भाषेचा प्रेमळ प्रकार होता.असा सोन्याचा दिवस तुमच्या नशिबी कधीच येणार नाही का सांगा. कालाय तस्मै नमः एवढच खरं बाकी सगळं मिथ्या !! लेखन सीमा !!

साहित्यिकअनुभव

प्रतिक्रिया

psajid's picture

1 Jul 2014 - 3:04 pm | psajid

जुने दिवस डोळ्यापुढे उभे राहिले ! लेख अजून विस्ताराने, अलंकारिक आणि वर्णनात्मक लिहला असता तर अजून रंजकता आली असती. बाकी लेख सुंदर !

हा लेख आधी वाचला होता काहो?

भिकापाटील's picture

2 Jul 2014 - 6:46 am | भिकापाटील

फाटकसाहेब गाव कोन्त म्हणायच तूमचं....

अनुप ढेरे's picture

2 Jul 2014 - 11:06 am | अनुप ढेरे

छान लिहिलय. आवडलं !