पर्यावरणाचे भान

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
6 Jun 2014 - 1:09 am
गाभा: 

५ जून म्हणजे पर्यावरण दिवस या निमित्ताने पर्यावरणाचे भान

सर्व जबाबदार नागरीक जमेल तशी पर्यावरणाची काळजी घेत आहेतच परंतू त्याला एक चळवळ बनवून सर्व नागरीकांना पर्यावरणाचे भान असेल इतपत सुजाण करणे ही सूद्दा आपली सर्व मिपाकारांचीच जबाबदारी आहे.

मला माझे जूने दिवस आठवतात व अजुनही मला या विषयावर खूप काही नवीन करावेसे वाटते ते असे.....

घरात
१)वीज,पाणी,स्वयंपाकाचा गॅस,अन्न नीट जपून वापरतो व सर्वांना तशी सक्त ताकीदही देतो(मिनीमाइझ)
२)ताटातील उरलेली शिते पक्ष्यांना ठेवून उरलेले अन्न, कापतांना वाया जाणारा भाज्यांचा भाग व फळांची साले एका रिकाम्या कून्डीत साठवून त्याचे सेंद्रिय खत तयार करणे व ते शोभेच्या झाडांना/तुळशीला खत म्ह्णून वापरता येते(रिसायकल)
३)फ्रंट्लोडेड वाशींग मशिन ज्यास कमी पाणी लागते(मिनीमाइझ)व त्यासाठी खास बनवलेली पर्यावरण पूरक वाशिंग पावडर वापरतो(रिसायकल)
४)दाढी करतांना मगमध्ये व गाडी धुतांना बादलीत पाणी घेवुन कमीत कमी पाण्याचा वापर करतो(मिनीमाइझ)
५)घराबाहेर पडतांना सर्व बाथरुममधिल सर्व नळ व विजेचे स्वीचेस बंद आहेत याची खात्री करतो(मिनीमाइझ)
६)मच्छर अगरबत्ती/कॉइल न वापरता मच्छरदाणीचाच वापर करतो(मिनीमाइझ)

कार्यालयात
१)जागेवर आल्यावरच लाइट,पंखा/एसी सुरु करणे व जागेवरून उठल्यावर ते बंद करतो(मिनीमाइझ)
२)कॉन्फ्रेन्स संपल्यावर लाइट,पंखा/एसी बंद करतो(मिनीमाइझ)
३)कार्यालयात जातांना घराजवळील सहकार्यांना कारपूल चा आग्रह धरतो(मिनीमाइझ)
४)शक्य झाले त्यावेळी कार्यालयाजवळ घर घेतले, जेणेकरुन इंधन व वेळही वाचवता आला(मिनीमाइझ)
५)सतत गळणारे नळ बदलण्यासाठी अ‍ॅड्मीनला पाठपूरावा करतो(मिनीमाइझ)
६)जेवढी भुक असेल तेवढेच ताटात वाढुन घेतो, जेणेकरुन कॅंटीनमधील अन्न वाया जात नाही(मिनीमाइझ)
७)शक्यतो अगदी नाइलाज असेल तर कमीत कमी प्रिन्ट्स/झेरॉक्स घेतो(मिनीमाइझ)
८)झेरॉक्सवाल्याला सांगुन त्याकडे फेकले जाणारे पाठकोरे कागद मागवून त्याचा जास्तीत जास्त वापर करणे(रिसायकल)

प्रवास करतांना
१)एकटा असतांना सार्वजनिक वाहतुक सेवेला प्राधान्य देतो(मिनीमाइझ)
२)दोन लोक असतांना सार्वजनिक वाहतुक सेवेला प्राधान्य देतो, शक्य नसेल तरच दुचाकी काढतो(मिनीमाइझ)
३)दोन पेक्षा जास्त लोक असतांना सार्वजनिक वाहतुक सेवेला प्राधान्य देतो, शक्य नसेल तरच कार काढतो(मिनीमाइझ)
४)दुचाकी व कारचा पेट्रोलचा वापर कमी व्हावा म्हणून चाकात हवा फुल्ल ठेवणे, रखरखाव चांगला करणे, एचएचओ किट बसवून घेणे व पर्यावरण पूरक फुएल अ‍ॅडिटिव्हचा वापर करुन प्रदुषण ३४ ते ४०% कमी करतो(मिनीमाइझ)

परन्तू अजूनही सौर उर्जा व CNG चा वापर करत नाही हा एक अपराध वाटतो.
लहानमुलांची इलेक्ट्रोनिक्स खेळणी, जुने मोबाइल व कॅमेराचे जुने सेल फेकतांना काय चांगली व्यवस्था करता येईल ह्याच्या शोधात आहे!

प्रतिक्रिया

आज पर्यावरणाचे भान ठेवल्याने जरा दमणूक झालीये. ऑरग्यानिक शेतात काम करून आल्याने आता काही लिहिणे शक्य नाही. धो धो पाऊस पाडून पर्यावरणाने आमचे कपडे भिजवून तसेच काम करवले. काय म्हणू या पर्यावरणाला? ;)

पांडुरंग हरि वासुदेव हरि...!!!

कपिलमुनी's picture

6 Jun 2014 - 3:45 pm | कपिलमुनी

वापरून झालेले शेव्हिंग ब्लेड्स कसे डिस्पोज करायचे ?
कचराकूंडीत टाकले तर गायी / गुरे आणि कचरा वेचणार्याना इजा होते .. कोणी पर्यावरणपूरक मार्ग सुचवेल का ?

आदूबाळ's picture

6 Jun 2014 - 3:59 pm | आदूबाळ

मी चौथा!

कुठे होता आयुर्हितकाका? लाँग टाईम...

लेख आवडला.

बाळ सप्रे's picture

6 Jun 2014 - 4:42 pm | बाळ सप्रे

मिपावर
१) लहानात लहान प्रतिसाद द्यावा.(मिनीमाइझ)

टवाळ कार्टा's picture

6 Jun 2014 - 4:54 pm | टवाळ कार्टा

.

राघवेंद्र's picture

6 Jun 2014 - 7:26 pm | राघवेंद्र

:) चांगला धागा आहे आणि हा षटकार !!!

पर्या वरणाचे भान कसे मिनी मा इ़झ करावे... हा एक राश्ट्रीय प्रश्न ठरु शकतो. काय विचार आहेत ?

असंका's picture

7 Jun 2014 - 11:51 am | असंका

आयुर्हितसाहेब,

एक प्रश्न,-

वरण भात करण्यासाठी मी एक वाटी तांदूळ, एक वाटी तूर डाळ यांना दोन दोन वाटी पाणी घेऊन प्रेशर कूकर मध्ये ठेवले. आता गॅस चा कमीत कमी वापर व्हावा म्ह्णून मी किती शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा?

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2014 - 1:39 pm | टवाळ कार्टा

तुमी शिंगल काय? ;)

आता हे एव्हढे जिन्नस शिंगल माणसालाच पूरतील ना! पण आपण आलात तर दुधात साखर! निम्म निम्म वाटून घेऊ. फक्त ते शिट्ट्या किती ते सांगू देत, मग या. नाहितर कच्चा किंवा जळका खावा लागेल...

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2014 - 2:41 pm | टवाळ कार्टा

"फुकट ते पौष्टीक" हा पुणेकरांचा नियम मी कशोशीने पाळायचा प्रयत्न करतो :)

असंका's picture

7 Jun 2014 - 2:47 pm | असंका

कळ्ळं नाही...

सोरी...आता कळ्ळं. जे फुकट ते पौष्टीक.

आमचा कुकाणेकरांचा पण असाच नियम आहे- फुकट घालाल जेवू, तर बाप लेक येऊ...! ;-)

पण सध्या तरी उत्तराची वाट बघा...किंवा मग आपणच ट्राय करा उत्तर द्यायचा..?

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2014 - 2:59 pm | टवाळ कार्टा

उत्तराची वाट बघत बसलो तर तितक्या वेळात "बिरबलाची खिचडी"पण शिजुन तयार होइल :)

मग नकाच बघू वाट!! तुम्हीच सांगून टाका!! शेवटी पोटाचा प्रश्न आहे हो....

आत्मशून्य's picture

7 Jun 2014 - 7:01 pm | आत्मशून्य

अहो सगळ्या चांगल्या गोष्टी विकत थोड्याच मिळतात ? हा मुक्तविहारींचा विचार पाळावा असेच सुचवेन.

कवितानागेश's picture

7 Jun 2014 - 7:14 pm | कवितानागेश

अहो अकौन्टन्ट, शिट्ट्या होउ द्यायच्या नसतातच.
कूकरमध्ये प्रेशर आले, हिसिन्ग सुरु झालं, की गॅस्ची ज्योत कमी करायची. ५-७ मिनिटं तशीच कमी ठेवायची. तेवढ्या प्रेशरवर आतलं सगळं काही शिजतं. मग गॅस बन्द करायचा. आणि अजून १० मिनिटांनी कूकर उघडायचा.

असंका's picture

7 Jun 2014 - 8:16 pm | असंका

फूस्स झालं.
अगदी हेच सांगणार होतो....शिट्टी झाली म्हणजे तयार झालेली वाफ बाहेर जाउन वाया गेली.

धन्यवाद!

अनिता's picture

8 Jun 2014 - 2:37 am | अनिता

शिट्टीची वाफ मी चेहर्यावर घेउन क्रीम वगैरेचा खर्च वाचवते!(minimize)

भ ट क्या खे ड वा ला's picture

19 Jun 2014 - 8:43 pm | भ ट क्या खे ड वा ला

'स्वयंपाक घरातील विज्ञान' हे पुस्तक वाचा शिटी करणे (कुकरची) काही गरजेचे नाही

वेल्लाभट's picture

13 Jun 2014 - 4:17 pm | वेल्लाभट

पेट्रोलचा वापर कमी व्हावा म्हणून चाकात हवा फुल्ल ठेवणे

असलं काहीतरी करताना त्याचे तांत्रिक परिणाम व संभाव्य धोके लक्षात घ्या बरं का !
बाकी जे मिनिमाईझ व रिसायकल करता ते चांगलंच आहे.

आयुर्हित's picture

15 Jun 2014 - 1:22 am | आयुर्हित

चाकात हवा फुल्ल ठेवणे म्हणजे गाडी/टायर उत्पादकांनी सुचविल्याप्रमाणे वरच्या पातळीत हवेचा दाब ठेवणे व दर आठवड्याला परत तपासुन घेणे असे म्हणायचे आहे.

अवांतरः एक्स्प्रेसहायवेवरुन जातांना मुद्दाम परत एकदा हवा भरणे गरजेचे आहे. सिमेंट्चा रस्ता असल्याने असंख्य हादरे बसतात त्यामूळे हवा कमी असेल तर चाक फुटण्याची दाट शक्यता असते.

धर्मराजमुटके's picture

13 Jun 2014 - 5:32 pm | धर्मराजमुटके

उर्जा कमीत कमी वापरली जावी म्हणून मी जास्तीत जास्त वेळ झोपून राहण्याचा प्रयत्न करतो पण बायको ऐकत नाही व जबरदस्तीने उठवते.
जोक अपार्ट, चांगले उपाय. यातील बरेचसे अंमलात आणतो पण अभी भोत कुच करना बाकी हय !

प्रभाकर पेठकर's picture

19 Jun 2014 - 8:55 pm | प्रभाकर पेठकर

पर्यावरण वगैरे कांही कळत नव्हते तेंव्हाच्या वयात ह्यातील अर्ध्याहून जास्त गोष्टी पिताश्रींनी आमच्या ढुंगणावर रट्टे हाणून शिकविल्या आहेत. त्याकाळी पर्यावरणापेक्षा, वडील घरात असले की, घरातले 'वातावरण' जास्त महत्त्वाचे असायचे.

आयुर्हित's picture

20 Jun 2014 - 12:10 am | आयुर्हित

घरातले 'वातावरण' चांगले असण्याचा फायदा आम्हालांही मिळाला आहे.

सस्नेह's picture

19 Jun 2014 - 10:08 pm | सस्नेह

इतकं 'पर्यावरण -पर्यावरण' खेळायला वेळ कसा मिळतो तुम्हाला ?

आयुर्हित's picture

20 Jun 2014 - 12:06 am | आयुर्हित

१० वर्षे नोकरी झाल्याबरोबर 'स्व' ला ओळखले आणि ज्यात आनंद मिळतो तेच करायचे ठरवले.
पण योग्य वेळ येईपर्यंत म्ह्णजे अजून ८ वर्षांनी नोकरी सोडुन लोकांना कायमस्वरूपी अखंड आनंद (सत्चिदानंद) कसा होईल यावर लक्ष देत आहे. त्यामूळे वेळच वेळ असतो!

मराठे's picture

20 Jun 2014 - 12:29 am | मराठे

रिड्युस - रीयुज - रीसायकल
मुलाला शाळेत केजी पासून शिकवत असल्यामुळे तोच आता आम्हाला शिकवत असतो.

आयुर्हित's picture

20 Jun 2014 - 1:43 am | आयुर्हित

वीज बचतीचे सोपे उपाय
साभार :तर वीज वाचेल

पर्यावरण म्हणजे रिकामपणचे धंदे असल्यागत प्रतिसाद पाहून करमणूक तर झालीच, पण वाईटही वाटलं.

(तेच ते एक मिपाकर म्हणून शरम वैग्रे वैग्रे.)

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jun 2014 - 3:43 pm | राजेंद्र मेहेंदळे

१. नव्या घरी शिफ्ट झाल्यावर मोठ्या मुश्कीलिने घरकामाला नवीन मोलकरीण मिळाली (जुनी तेवढ्या लांब यायला तयार नव्हती)...तिने पहील्या दिवसापासुन प्रत्येक कामाला धो धो नळ सोडायला सुरुवात केली. आमचे रक्त जळु लागले ते बघुन,पण काय करणार? निर्वाणीचा ईशारा "ह्ये पघा,मला अस्संच जमतंय,तुम्हाला झेपत नसंल तर नवी बाई ठेवा"....आमची माघार
२.उरलेले अन्न खिडकीसमोर पत्र्यावर टाकु लागलो, तर कावळे कबुतरे ते खाउन खाली टाकु लागली. सोसायटीची नोटीस....सगळा ओला कचरा पेटीतच टाका नाहीतर दंड भरा

अजुन भरपुर किस्से आहेत, पण बाकी गॅस,पाणी,वीज वाचवणे,सार्वजनिक वाहतुक वापरणे याच्याशी सहमत

इरसाल's picture

20 Jun 2014 - 3:56 pm | इरसाल

निर्वाणीचा ईशारा "ह्ये पघा,मला अस्संच जमतंय,तुम्हाला झेपत नसंल तरनवी बाई ठेवा....आमची माघार

ओ काय पण काय सांगताय ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jun 2014 - 5:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हणजे मी सरळ अर्थाने विचारतोय्...डबल मिनींग नाही