भारतीय युद्धाचे नियम : अर्जुन युद्धास अपात्र ?

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
3 May 2014 - 7:49 pm

युद्धाचे नियम ठरविण्या साठी दोन्ही पक्षांची बैठक सुरु झाली. कौरवांतर्फे दुर्योधन आणि शकुनी उपस्थित होते तर पांडव पक्ष तर्फे पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आणि सात्यिकी उपस्थित होते. काही मतभेद असल्यास पितामह भीष्म यांचा निर्णय अंतिम असेल असे ठरले. रथी बरोबर रथी, धनुर्धारी बरोबर धनुर्धारी, पदाती बरोबर पदाती युद्ध करेल. सूर्यास्त झाल्यावर युद्ध बंद होईल. स्त्रिया, किन्नर, सेवक हे युद्धात भाग घेणार नाही आणि यांच्यावर कुणी हात ही उचलणार नाही. अश्या अनेक बाबींवर सर्वांचे एकमत झाले.

अचानक शकुनी म्हणाला, पण काही लोक एका जन्मात काही काळ स्त्री म्हणून राहतात आणि काही काळ पुरुष म्हणून, अश्या लोकांना युद्धात भाग घेता येईल का? पितामह म्हणाले, असे लोक किन्नर समान असतात, धर्मानुसार यांना युद्धात भाग घेता येणार नाही. पितामह म्हणाले धृष्टद्युम्न, शिखंडी, पूर्वी शिखण्डीनी होता, स्थूलकर्ण या यक्षाने त्याला पुरुषत्व प्रदान केले असेले तरी ही तो या जन्मांत स्त्री आणि पुरुष दोन्ही रुपात वावरला आहे म्हणून त्याला युद्धात भाग घेता येणार नाही. शिवाय तो गेल्या जन्मी स्त्री होता अशी ही वाच्यता आहे. धृष्टद्युम्न उतरला, पितामह, पण शिखंडीगेल्या जन्मी स्त्री होता, त्याला काही पुरावा नाही. या घटकेला तो पुरुष आहे, हेच सत्य. शिखंडी पांडवांचा एक प्रमुख सेनापती आहे. तरी ही पितामह तुमचा आदर म्हणून तुम्ही जर शिखंडी वर शस्त्र न उचलण्याचा निर्णय घेतला असेल तर शिखंडी ही तुमच्या वर शस्त्र उचलणार नाही, हे वचन मी देतो.

शकुनीच्या म्हणाला, शिखंडीचे एक वेळ चालेल, तो आपणहून स्त्री म्हणून वावरत नव्हता. शिवाय एका यक्षाने त्याला पुरुषत्व प्रदान केले असल्यामुळे, त्याला पुरुष मानता येते. पण जो पुरुष असूनही स्त्रियांप्रमाणे राजा विराटच्या रनिवासात वावरत होता. अश्या ब्रह्न्नलेला स्त्री समजावे कि पुरुष? अश्या किन्नरा बरोबर आम्ही युद्ध करणार नाही. युद्धाच्या नियमानुसार त्याला युद्धापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. सात्यीकी रागाने म्हणाला, अजून युद्धाला सुरुवात झाली नाही, आणि तुम्ही अर्जुनाला घाबरून त्याला युद्धापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र करीत आहात. त्याचे वाक्य मधेच तोडत दुर्योधन उतरला, सात्यीकी, अर्जुनापेक्षा ही श्रेष्ठ धनुर्धर असा माझा प्रिय मित्र कर्ण आहे. तो भीष्म सेनापती असें युद्धात उतरणार नाही असा त्याचा निश्चय आहे. तरी ही आम्ही युद्धात उतरलो आहे. पितामह भीष्म, गुरु द्रोण सारखे सेनानी असल्यामुळे आम्हाला अर्जुनाची मुळीच भीती नाही. प्रश्न तत्वाचा आहे, अर्जुनाला जर किन्नर मानले, तर तो युद्धास अपात्र ठरेल. पितामह भीष्म धर्मवेत्ता आहे, ते जो काही निर्णय करतील आम्हाला मान्य आहे.

पितामह म्हणाले, सेनापती धृष्टद्युम्न, अर्जुन काही काळ स्त्री वेशात वावरला, हे सत्य आहे. धर्मानुसार तो युद्ध करण्यास अपात्र आहे. यावर धृष्टद्युम्न म्हणाला, पितामह हा अन्याय आहे, आम्हाला तुमचा निर्णय स्वीकार्य नाही. पितामह उतरले, धृष्टद्युम्ना, मी आपला निर्णय ऐकविला आहे, माझा निर्णय मान्य आहे कि नाही हे ठरविण्याचा अधिकार धर्मराज युधिष्ठिर यांना आहे, तुला नाही. बैठक समाप्त झाली. सात्यकी आणि धृष्टद्युम्न निघून गेल्या वर, दुर्योधन शकुनीस म्हणाला, मामाश्री, पास तर तुम्ही मस्त टाकला, काही फायदा होईल का? शकुनी म्हणाला, बघू या, कर्ण युद्धात उतरणार नाही आहे, आता अर्जुन जर युद्धापासून दूर झाला तर उत्तमच , आपल्याला युद्ध सहज जिंकता येईल.

पांडवांच्या छावणी कडे परतताना, धृष्टद्युम्न सात्यीकीला म्हणाला, मला चिंता वाटते, महाराज युधिष्ठिर यांनी, पितामह भीष्म यांचा निर्णयाचा स्वीकार केला तर काय होईल. सात्यीकी हसत-हसत म्हणाला, कशाला चिंता करतो मित्र, मी माझ्या कृष्णाला चांगलेच ओळखतो. या भारतीय युद्धात ठरलेल्या कुठल्या ही नियमांचे पालन होणार नाही. युद्ध जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष कुठल्या ही थरावर जातील, हे या घटकेला सांगणे अशक्य. पण एक सांगतो, अर्जुन शिखंडीच्या मागे उभा राहून पितामह वर बाणांचा वर्षाव करीत आहे, हे दृश्य मला आत्ताच डोळ्यांसमोर दिसत आहे. मित्र, दुर्योधन आणि शकुनी यांनी किती ही कट-कारस्थान रचले तरी ही या युद्धात आपलाच विजय होणार आहे. कृष्ण सारखा कुटील या जगात कुणी ही नाही. जिथे कृष्ण तिथे धर्म आणि तिथेच विजय.

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

3 May 2014 - 9:31 pm | पैसा

:)

पण स्त्रिवेश हे जुगारातिल अट पूरी करण्यासाठी पत्करला असेल तर ते नाटक ठरते वस्तुस्थिति नाही. अन्यथा बालगंधर्वही किन्नरच. थोडक्यात नाट्य आणि वास्तव यातील फरक जो पुरुष समजतो तो क्रिस्मासला दिवाळी म्हणत नाही.

अरे हो मीपण उगा विशष भट्काव्तो आहो, त्यापेक्षा केजरीवाल कोण श्रीकृष्ण का यावर चर्चा अपेक्षित आहे नाही का ?

आत्मशून्य's picture

3 May 2014 - 10:48 pm | आत्मशून्य

सात्यकिच्या तोंडी फार चुकीची वाक्ये व तीही चक्क घुसडली आहेत असे वाटते. कारण जर अर्जुन किन्नर असता तर भिष्मासमोर शिखंडीला उभाच करावा लागला नसता, सरळ अर्जुनासमोरच भिष्माने धनुश्य म्यान केले नसते का ? की आणखी काही तर्क आहे भिष्माच्या अर्जुनाशी युध्द करायच्या कृतीचा ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2014 - 10:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहो हे भार्तिय राज्कारण आहे ! इथे काय्पण शक्य आहे... एखाद्याला घाणेरडा आहे असे सिद्ध करायला "प्रथम त्याच्या अंगावर बादलीभर घाण उडवायची आणि मग 'बघा तो किती घाणेरडा आहे' असे सतत जपत रहायचे" ;) हाकानाका !

अर्जुन आजच्या जगात असता तर तोच खरा शिखंडी असल्याचे सिद्ध करण्याची पात्रता दाखवणारे लेख / प्रतिसाद मिपावरच काय कमी दिसत आहेत ? ;) :)

आत्मशून्य's picture

3 May 2014 - 11:08 pm | आत्मशून्य

:D xD xD xD

विवेकपटाईत's picture

5 May 2014 - 7:19 pm | विवेकपटाईत

शकुनीला काहीही करून अर्जुनला युद्धा पासून दूर करायचे आहे. पितामह ही कौरवांच्या सभेतील एक प्यादा ते शकुनीच्या विरुद्ध कसे जाणार. अर्जुन किन्नर नाही पण तो स्त्री वेशात काही काळ वावरत होता म्हणून त्याला किन्नर घोषित करून युद्धा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पण सत्यीकीचा मित्र कृष्ण ही कमी कुटील नाही, म्हणून सत्यीकीच्या तोंडी हे वाक्य.

बाकी शकुनीचे आणि दुर्योधन यांचे कट कारस्थान कितपत साध्य होईल, हे काळच ठरवेल. अर्जुनाला युद्ध लढण्यास अयोग्य ठरविल्या जाईल किंवा युद्धात अर्जुन आपल्या मित्रांच्या सहय्याने सर्वांचा पराभव करेल. लवकर कळेलच.

आत्मशून्य's picture

5 May 2014 - 8:08 pm | आत्मशून्य

माताय, सर्व प्रथम लेख वाचला तेंव्हा नमो च्या वादग्रस्त पत्रकार परिशद वा
विविध गोष्टी ज्यावर न्यायालयींन खटले चालवले गेले त्यानुश्न्गाने उहापोह हां लेख करतोय का हां प्रश्न मणि निर्माण झाहला होतिआ पन त्से धिस्क्लेमर न सापड्ल्य़ाने

महाभारत पुन्हा लिहताय का हां प्रश्न मनात आला. इतकच.

आयुर्हित's picture

3 May 2014 - 10:28 pm | आयुर्हित

यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः|
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।७८।।

१००% सहमत

धन्या's picture

3 May 2014 - 11:13 pm | धन्या

आवडला.

आवडला, बाकी मला सांगा कृष्ण कोण हो? व्य. नि. केलात तरी चालेल.
धन्यवाद.