ऑरेंज कुकिज

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
21 Apr 2014 - 5:30 am

.

साहित्यः

अडीच वाट्या मैदा
३/४ वाटी साखर
२२५ ग्राम बटर किंवा दोन स्टीकस बटर (रुम टेम्परेचरला असलेले)
१ अंडे
१ टेस्पून संत्र्याचा रस
१ टेस्पून किसलेले संत्र्याचे साल
१/२ टीस्पून किसलेले आले
१/४ टीस्पून मीठ

.

पाकृ:

मिक्सींग बाऊलमध्ये बटर व साखर एकत्र करुन फेटून घ्या.
त्यात किसलेले संत्र्याचे साल. किसलेले आले, मीठ व फेटलेले अंडे घालून चांगले फेटा.
त्यात थोडा-थोडा करुन मैदा घाला व मिश्रण फोल्ड करा.
संत्र्याचा रस व थोडा मैदा घालून एकत्र करा.

.

मिश्रण चांगले मळून क्लिंग फिल्ममध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये एक तास ठेवा.
एका तासाने मिश्रणाचा थोडा भाग काढून, थोड्या मैद्यावर जाडसर लाटून घ्या व कुकी कटरने कातून घ्या.
ओव्हन १८० डिग्री सें प्री-हीट करायला ठेवा.
बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर लावून घ्या व त्यावर कातलेल्या कुकिज थोड्या अंतरावर रचून ठेवा.
१८० डिग्री सें वर १०-१२ मिनिटे कुकिज हलक्या सोनेरी रंगावर बेक करुन घ्या.
बेक झाल्या की ट्रे बाहेर काढून ५ मिनिटे ठेवा व नंतर कुकिज कुलिंग रॅकवर काढून ठेवा.
पूर्ण गार झाल्या की हवाबंद डब्यात भरुन ठेवा.

.

ह्या कुकिज तुम्ही कॉफी, चहा, दुधाबरोबर सर्व्ह करु शकता. नुसत्याही खायला छान लागतात.
आवडत असल्यास आल्याचे प्रमाण वाढवू शकता. ह्या पाक्रुत सटल हिंट येते आल्याची.

.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2014 - 5:50 am | अत्रुप्त आत्मा

मी पैला :D
सगळी भिस्कुटं माजी...
बाकिची परतिक्रीया भिस्कुटं संपल्यावर! :D

स्पंदना's picture

21 Apr 2014 - 8:04 am | स्पंदना

ये आतुम्स, मला येक ध्ये न?
ये द्ये ना!
चिमणीचा घास? तेव्हढ तरी? ये दे ना!

मनिष's picture

21 Apr 2014 - 12:28 pm | मनिष

बचपन याद दिला दे!!! :)

खरंच काय मस्त दिसतात आहे! ऑरेंज आणि आले म्हणजे चवही खासच असणार...बेकिंग मधे उडी घ्यावी का?

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2014 - 1:20 pm | अत्रुप्त आत्मा

@ये आतुम्स, मला येक ध्ये न?
ये द्ये ना!
चिमणीचा घास? तेव्हढ तरी? ये दे ना!>>> :D .. :D .. :D

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif

वरती खाल्ली तेवडी माजी... :D
आणि ही खाली गरम/गरम काडलीयेत ती तुमची! :D
http://www.sherv.net/cm/emoticons/eating/cookies-smiley-emoticon.gif

बालगंधर्व's picture

21 Apr 2014 - 5:38 pm | बालगंधर्व

अपर्ना तै. मलापन एक देताव का? सनिका तैचया कुकिझ चान अहेत.सुघरन

मदनबाण's picture

21 Apr 2014 - 6:54 am | मदनबाण

आह्ह... मस्तच ! :)

किसन शिंदे's picture

21 Apr 2014 - 7:26 am | किसन शिंदे

जबरा!

जीव वेडावला!

नंदन's picture

21 Apr 2014 - 9:21 am | नंदन

खल्लास पाकृ!

दिपक.कुवेत's picture

21 Apr 2014 - 10:41 am | दिपक.कुवेत

ऑरेंज असलेलं काहिहि आवडत. कुकिज फारच जब्राट दिसत आहेत. पण चहाबरोबर खाण्यापेक्षा मी नुसत्याच खाईन अर्थात अआ आणि अपर्णानी शील्लक ठेवल्या तर!

कवितानागेश's picture

21 Apr 2014 - 11:42 am | कवितानागेश

३/४ वाटी साखर म्हंजे साधारण किती ग्रॅम?
जणू काही मी लगेच करुन बघणारेय.. :P

साती's picture

21 Apr 2014 - 1:08 pm | साती

मस्तच दिसतायत.
बेकिंग बर्याचदा पार गंडलंय माझं त्यामुळे करायची हिंमत होत नाही.

पुन्हा सगळी कॉस्ट बाजारात मिळणार्या पदार्थांच्या तुलनेत दुप्पट तिप्पट जास्त होते.

सखी's picture

21 Apr 2014 - 6:14 pm | सखी

मस्तच दिसत आहेत बिस्कीटं, पटकन एक उचलावसं वाटतं.
साती बेकींगसाठी काटेकोरपणा फार महत्वाचा असे म्ह्टले जाते, सगळ्या गोष्टी अगदी मोजुनमापुनच घ्याव्या लागतात. अर्थात मी यातली एक्सर्पट नाही, पण हे खुप शेफकडुन नेहमी ऐकत आली आहे. ओवनचे तापमान बरोबर असावे लागते नाहीतर पदार्थ बाहेरुन झाल्यासारखा वाटले आणि आतुन कच्चाही राहु शकतो. आपण गॅसवरच्या स्वयंपाकात थोडेफार कमीजास्त झाले तर अ‍ॅडजस्ट करु शकतो तसं बेकींगच होत नाही कारण एकदा पदार्थ ओव्हनमध्ये गेला की झाल्यावरच बाहेर काढतो. शेवटची गार होण्याची पायरीपण महत्वाची असते. इथे अजुन टीपा आहेत.

प्यारे१'s picture

21 Apr 2014 - 1:18 pm | प्यारे१

नाद खुळाच!

आल्यावरुन एक विनोदः

एका लग्नात एक माणूस आक्खा बॉक्स आलं घेऊन येतो नि स्टेजवर नवरा नवरीला देतो.
नवरानवरी संभ्रमात. हे आलं कशाला म्हणे?
आलं आणणारा अजून संभ्रमात. अहो पत्रिकेवर तुम्हीच तर छापलंय....'आहेर आणू नयेत पण आलंच पाहिजे' :)

घ्या अजून एक कूकी घ्या! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2014 - 1:26 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटून दुसर्‍या फोटुतली ट्रे वरची बिस्किटं पाहिल्यामुळे मला मनोहर बेकरीची अठवण झाली. आपण तिथं जिन्नस नेऊन दिले,की दोन/तीन दिवसात बिस्किटं करून मिळायची. आपल्याला दिलेल्या टायमाला बेकरीवर गेलो की अशीच ट्रेच्या ट्रे भरलेली बिस्किटं समोर यायची..गरम/गरम.. (आपलीच असल्यामुळे लग्गेच १ उचलताही यायचं! ;) ..) आज हे सगळं आठवलं! त्यामुळे आज सांजच्याला मनोहर बेकरी शोधणे आले पेरुगेटाच्या फुडची...र्‍हायली असेल तर!

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2014 - 1:29 pm | पिलीयन रायडर

साहित्या मध्ये पिठ पण काय स्टाईल मध्ये ठेवलय.. नाहीतर आम्ही .. २ चमचे भुताचे ओट्यावर सांडल्याशिवाय पदार्थ नीट होत नाही आमचा..

ही बाई दिवसेंदिवस तापदायक होत चालली आहे.. हिची सुपारी घ्या रे कुणी तरी..!!

प्यारे१'s picture

21 Apr 2014 - 1:36 pm | प्यारे१

>>>ही बाई दिवसेंदिवस तापदायक होत चालली आहे.. हिची सुपारी घ्या रे कुणी तरी..!!

कोणीतरी 'काहीतरी' म्हणतंय ब्वा..... पण आम्ही काही ऐकणार नाही आहोत. बोलणार तर नाहीच्च :)

सानिकाजी, आपल्याला पाकृ बद्दलच्या प्रतिसादांशिवाय सेन्च्युरी चालेल का?

अगदीच कातिल आलाय पहिला नी शेवटचा फोटो.

सुहास झेले's picture

21 Apr 2014 - 3:19 pm | सुहास झेले

निशब्द... :)

साती's picture

21 Apr 2014 - 3:24 pm | साती

यात बेकिंग सोडा , बेकींग पावडर हे शत्रू नसल्याने (शत्रू म्हटलंय कारण हे घातलेले पदार्थं मी आत्तापर्यंत धड करू शकलेले नाही) करून पाहावं असे टेंप्टेशन होतेय. ;)
संत्र्याचा जूस ताजा वापरला की विकतचा?

सानिकास्वप्निल's picture

21 Apr 2014 - 4:28 pm | सानिकास्वप्निल

संत्र्याचा रस ताजा वापरला अहे :)
धन्यवाद

प्रतिसाद नेहमीचाच समजून घ्यावा. दोन ओळी जास्तीच्या लिहून हव्या असल्यास निदान डझनभर कुक्या पाठवून द्याव्यात. निवडणुकीमुळे आम्हाला ही सवय लागली आहे. ;)

मधुरा देशपांडे's picture

21 Apr 2014 - 9:38 pm | मधुरा देशपांडे

प्रतिसाद नेहमीचाच समजून घ्यावा.

शुचि's picture

21 Apr 2014 - 10:17 pm | शुचि

हाहाहा कुक्या :)
काय गं एक भाकरी - अनेक भाकरी पण एक कुकी अन अनेक कुक्या? :) :)

पैसा's picture

21 Apr 2014 - 5:23 pm | पैसा

अफाट सुंदर दिसतंय! परत कधी येणार आहेस ग! आता आमच्याकडे यायचंच हं! ;)

भावना कल्लोळ's picture

21 Apr 2014 - 5:40 pm | भावना कल्लोळ

मी हा धागा उघडलाच नाही आहे, मी काही पाहिलेच नाही आहे… हुश्श

आरोही's picture

21 Apr 2014 - 7:05 pm | आरोही

कुकीज आवडल्या ...

श्रीरंग_जोशी's picture

21 Apr 2014 - 11:20 pm | श्रीरंग_जोशी

पाकृ नेहमीप्रमाणेच आवडली.

एक अवांतर प्रश्न - भारतीय दृष्टीकोनातून कुकी व बिस्कीट यात नेमका फरक तो काय?

मराठे's picture

21 Apr 2014 - 11:27 pm | मराठे

वेsssssड!

यशोधरा's picture

22 Apr 2014 - 9:24 am | यशोधरा

हायला! भारी! अगं तू एखादा ब्रँड का नाही सुरु करत खाद्य पदार्थांचा? सगळे लाळगाळू मिपाकर - माझ्यासकट - झैरातीसाठी मॉडेलं बनू ;)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2014 - 12:18 pm | अत्रुप्त आत्मा

@एखादा ब्रँड का नाही सुरु करत खाद्य पदार्थांचा?>>> +++१११

श्रीवेद's picture

22 Apr 2014 - 12:03 pm | श्रीवेद

मस्तच !

कसल्या दिसताहेत.. जर ह्या कुकीज घरी खायला नेल्या तर दाट युद्ध रंगण्याची शक्यता आहे. कारण जो तो तुटून पडेल..

वा वा वा... खुपच मस्त गं.. यम्मी.. :)

अनन्या वर्तक's picture

28 Apr 2014 - 10:28 pm | अनन्या वर्तक

पाककृती नेहमीप्रमाणेच आवडली. फोटो सुद्धा छान आहेत.

एग्लेस् केक ची पाक्रु सान्गू शकेल का कोणी?

सस्नेह's picture

7 May 2014 - 10:50 pm | सस्नेह

पण या नुसत्याच खायला आवडतील, चहात बिस्किट बुडवून नै बै !